Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पालिका करणार ३ कोटींची औषध खरेदी

0
0
महापालिकेचे हॉस्पिटल, दवाखाने तसेच रक्तदान शिबिरांसाठी वैद्यकीय विभागाने तीन कोटी रुपयांची औषधे तसेच साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे.

थर्टी फर्स्टचा ताण पोलिसांवर

0
0
थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे वेध लागलेल्या मद्य शौकिनांसाठी पहाटे पाचपर्यंत परमिट रूम आणि बार सुरू राहणार असल्याचा आदेश दिल्याने या दिवशी पोलिसांवरचा ताण अधिकच वाढणार आहे.

विद्यापीठ, महापालिका एकत्र येणार?

0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिका आणि विद्यापीठात करार करणे आवश्यक असल्याने प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो महासभेला सादर होण्याची शक्यता आहे.

ठरावाद्वारे बेकायदा कामांची कबुली

0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदा देण्यात आलेल्या परवान्यांची बाब उघडकीस आल्यानंतर एका ठरावाद्वारे ही बाब कबूल करतानाच ग्रामपंचायतीच्या मूखंडांनी आजवरची सारीच कामे अधिकृत असल्याचा ठरावही केला आहे.

विद्यार्थी, युवती पदाधिका-यांना दालन नाही

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभारण्यात आलेले ‘राष्ट्रवादी भवन’ हे जिल्ह्यातील सर्वसामान्यांपासून पक्षातील कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या भवनात स्थान न मिळाल्याने पक्षातील काही आघाड्या नाराज असल्याची चर्चा आहे. नव्या कार्यालयात शहर, जिल्ह्यासह महिला आघाडीसाठी स्वतंत्र दालन आहे.

कानपिचक्या, दिलासा आणि निराशा

0
0
जिल्ह्यातील नेत्यांना सर्वांसमोर दिलेल्या कानपिचक्या, कांद्याच्या भाव घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांना निर्यातमूल्य शून्य करण्याचा दिलासा देण्यासह लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबद्दलची उत्सुकता कायम ठेवणारा केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचा यंदाचा नाशिक दौरा संमिश्र ठरला.

गॅसच्या भडक्यामुळे ५ जखमी

0
0
गॅस पेटविताना अचानक झालेल्या भडक्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. पंचवटीतल्या अमृतधाम परिसरातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

एसटीची सिंहस्थवारी मार्गावर

0
0
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीचा सर्वाधिक ताण एसटी महामंडळावर येणार असून महामंडळानेही आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

साहेबराव पाटील यांना क्लीन चिट

0
0
जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालकांनी महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांना क्लीन चीट दिली आहे. तसे पत्र सहसंचालकांनी औद्योगिक संघटनांना दिले असून ठोस पुरावे देण्यात संघटनांना अपयश आल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

उद्धव ठाकरे शनिवारी नाशिकमध्ये

0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी, २८ डिसेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून यात आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाची रणनिती ठरविण्यासह उमेदवाराबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.

रोबो करणार नदीची स्वच्छता!

0
0
गोदावरीसह अन्य नदी नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने सुमारे ४ कोटी ६३ लाख रुपये खर्च करून रोबो मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीला येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कांदा निर्यातमूल्यात कपात

0
0
कांद्याच्या दरात होणारी घसरण थांबविण्यासाठी कांद्याचे निर्यातमूल्य ३५० डॉलरहून दीडशे डॉलर प्रति मेट्रिक टन करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वीजशोधकाच्या जागेचा शोध

0
0
आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये वीज शोधक (लाइटनिंग डिटेक्टर) मशीन लावण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सरकारी नाकर्तेपणामुळेच या मशीनला जागा उपलब्ध न झाल्याने हे मशीन अखेर परत गेले आहे.

अंधांच्या मार्गदर्शनाखाली चालणार कार

0
0
‘राऊंड टेबल इंडिया’च्या वतीने १२ जानेवारी रोजी ब्लाइन्ड मेन्स कार रॅली (बीएमआर २०१४) होणार आहे. सकाळी ८.३० वाजता सिटी सेंटर मॉल येथून या रॅलीला सुरुवात होईल. नेव्हिगेटर म्हणून यात अंध युवक सहभागी होणार असून डोळस व्यक्ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली पूर्ण करणार आहेत.

रोबो करणार नदीची स्वच्छता!

0
0
गोदावरीसह अन्य नदी नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने सुमारे ४ कोटी ६३ लाख रुपये खर्च करून रोबो मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीला येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एसटीची सिंहस्थवारी मार्गावर

0
0
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीचा सर्वाधिक ताण एसटी महामंडळावर येणार असून महामंडळानेही आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. महामंडळाच्या नाशिक विभागाने सुमारे दीड कोटी रुपये खर्च असलेली अनेक विकासकामे हाती घेतली असून पुढल्या नवरात्रोत्सवापर्यंत ती मार्गी लावण्याचा त्यांचा मानस आहे.

उद्धव ठाकरे शनिवारी नाशिक दौऱ्यावर

0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी, २८ डिसेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून यात आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाची रणनिती ठरविण्यासह उमेदवाराबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.

... तर वाइन उद्योगालाही प्रचंड लाभ

0
0
जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल आणि जगभरातून असंख्य जण ज्यात सहभागी होतील, असा फेस्टिव्हल आयोजित केल्यास वाइन उद्योगासह नाशिकलाही त्याचा प्रचंड लाभ होईल, अशी अपेक्षा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

एव्हरेस्ट मोहिम म्हणजे क्षमतेचा कस

0
0
‘एव्हरेस्ट सर करण्याचा अनुभव आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या अनुभवांपैकी एक होता. ही मोहिम म्हणजे तुमच्या क्षमतेचा कस असते’, असे मत एव्हरेस्टवीर डॉ. मुराद लाला यांनी व्यक्त केले. इंडियन मेड‌िकल असोसिएशनच्या नाशिक शाखेला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

वीज चोरी कारवाईसाठी पोलिसांवर मदार

0
0
जळगाव जिल्ह्यात महावितरण व क्रॉम्प्टनच्या वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक येथिल पोलिस स्टेशनवरच मदार असल्याने कारवाईस विलंब होत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी महावितरणचे एकच पोलिस स्टेशन असल्याने त्यावर जादा कामाचा ताण पडत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images