Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवजयंतीला शिवजन्मोत्सव सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत शिवजयंती साजरी न करता यंदा शिवजन्मोत्सव सोहळा होणार असल्याची माहिती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सुनील बागूल यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा सोहळा होणार असून, राज्यात पथदर्शी सोहळा ठरेल, असे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्यात ४० फूट उंचीचे होर्डिंग व ६१ फुटी भगव्या ध्वजाचे आकर्षण असेल.

शिवजयंती सोहळा समितीतर्फे हॉटेल एमराल्ड पार्कमध्ये पत्रकार परिषद झाली. त्या वेळी बागूल यांनी सोहळ्याची माहिती दिली. या सोहळ्यानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचा सोहळा होणार असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी १९ फेब्रुवारी रोजी अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ९ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरुवातीला जिजाऊ वंदन, शिववंदन होऊन शिवगर्जना होणार आहे. त्यानंतर १० वाजता गोल्फ क्लब येथून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. ही पालखी खडकाळी सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅँड, पंचवटी कारंजामार्गे पालखी रामकुंडाकडे अभिषेक करण्यासाठी जाणार आहे. या सोहळ्यात ढोल पथक, लेझीम पथक, चित्ररथ सहभागी होणार आहे. सोहळ्यात जिल्ह्यातून लाखो शिवप्रेमी सहभागी होतील, असा दावा व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत. हे सर्व चित्ररथ ऐतिहासिक घटनेवर आधारित असतील. या सोहळ्यात डीजे वाजवण्यात येणार नसून, पारंपरिक वाद्यांचा वापर केला जाणार आहे. ज्याप्रमाणे जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे तालुका स्तरावरदेखील कार्यक्रम होणार आहेत. सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीने हा कार्यक्रम होईल. अनंत कान्हेरे मैदानावर १०० फूट लांब व ४० फूट उंच अशा मापाचे होर्डिंग लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ६१ फूट उंचीचा भगवा ध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या मिरवणुकीत घोडदळ व पायदळ असेल. त्याचप्रमाणे आदिवासी भागातून आलेली नृत्यपथकेदेखील यात सहभागी होतील. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, सर्व पक्ष सहभागी होतील. या सोहळ्यासाठी ईदगाह मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

रात्री बाराला जल्लोष

सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला १८ तारखेच्या रात्री १२ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर भगवा ध्वज उभारावा, रोषणाई करावी, सडा-रांगोळी काढून शिवप्रतिमेची पूजा करून घरात गोडधोडच जेवण करावे, असे आवाहन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगररचनात स्वतंत्र छाननी कक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील नगररचना विभागात ऑनलाइन बांधकाम परवानगीसंदर्भात सॉफ्टेक कंपनीने क्रेडाई व वास्तुविशारदांच्या मागणीनुसार नगररचना विभागात स्वतंत्रपणे छाननी कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी कंपनीने मनुष्यबळही उपलब्ध करून दिले असल्याने कंपनीने आपल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. मात्र, वास्तुविशारदांच्या प्रस्तावांमध्येच मोठ्या त्रुटी असल्याने पेंडन्सीचे प्रमाण कायम राहिले आहे. दरम्यान, क्रेडाईने सॉफ्टेक कंपनीला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु क्रेडाईने आपले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे समोर आले आहे.

शहरातील बांधकाम परवानग्या ऑनलाइन देण्यासंदर्भात नगररचना विभागात गेल्या वर्षी १ मेपासून ऑटो डीसीआर प्रणाली लागू करण्यात आली आहे; मात्र या ऑटो डीसीआर प्रणालीच्या कार्यपद्धतीविषयी अभियंते व वास्तुविशारदांकडून आक्षेप घेण्यात आले. तांत्रिक अडचणींसह विविध त्रुटींमुळे एकाच वेळी ऑनलाइन व ऑफलाइन फाइल सादर करावी लागत असल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिकेच्या वतीने १८ जानेवारीला सॉफ्टेक कंपनी आणि क्रेडाईसह विविध संघटनांसोबत बैठक झाली होती. कंपनीच्या सादरीकरणावेळीही प्रश्न प्रलंबित राहिल्याने आयुक्तांसमवेत कंपनीचे प्रतिनिधी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कंपनीला छाननी कक्ष सुरू करण्यासह मनुष्यबळ वाढविण्याचा आदेश देण्यात आला होता. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी व बांधकाम परवानग्या जलद मिळण्यासाठी सॉफ्टेक कंपनीला १५ फेब्रुवारीचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार आता या अल्टिमेटमला महिना झाला असून, कंपनीने यंत्रणेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी नगररचना विभागात स्वतंत्र छाननी कक्ष सुरू केला आहे. या ठिकाणी दोन संगणक लावून त्यासाठीचे आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करून दिले आहे. परंतु तरीही बांधकाम परवानग्या जलद मिळत नसल्याचे चित्र आहे. वास्तुविशारदांच्या प्रस्तावातच मोठ्या त्रुटी असल्याने प्रलंबित प्रस्तावांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे महिनाभराचा अवधी देऊन प्रश्न कायम राहिला आहे.

क्रेडाईकडून निराशा

ऑटो डीसीआर प्रणाली राबविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची तक्रार संबंधित कंपनीने आयुक्तांसमवेतच्या बैठकीत केली होती. त्या पार्श्वभूमीवर क्रेडाईच्या वतीने ही प्रणाली पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होईपर्यंत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी कंपनीवर टाकण्यात आली; परंतु क्रेडाईने मात्र आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही. तांत्रिक मनुष्यबळ कंपनीने स्वत:च लक्ष पुरवले असून, क्रेडाईचा दावा फसवा ठरला आहे.

७२४ ऑनलाइन प्रस्ताव दाखल

१६४ ऑनलाइन मंजूर प्रस्ताव

३३४ त्रुटींमुळे प्रलंबित प्रस्ताव

४८ प्रलंबित प्रस्ताव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घशात वाटाणा अडकून बाळाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

दोनच दिवसांपूर्वी पहिला वाढदिवस साजरा केलेल्या सुजय जयेश बिजुटकर या बालकाच्या घशात वटाणा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान चौक परिसरात घडली. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुजया बिजुटकर या हनुमान चौकात राहत असून त्या नोकरी करतात. त्यांचा एक वर्षाचा मुलगा सुजय जयेश बिजुटकर याने सकाळी सात वाजेच्या दरम्यान घरात खेळता खेळता वाटाण्याचा दाणा तोंडात टाकला. हा प्रकार त्याची आई सुजया यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात त्याला नेले. यावेळी डॉक्टरांनी उपचार करून त्याला घरी पाठविले. मात्र, साडेआठ वाजेच्या सुमारास सुजया यांना नोकरीवर जायचे असल्याने त्यांनी सुजयला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची हालचाल जाणवली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत घरातील व्यक्तींना याची माहिती दिली. सुजयचे वडील मुंबईला नोकरीसाठी असल्याचे समजते. घरातील सर्वांनी तातडीने सुजयला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. दोनच दिवसांपूर्वी सुजयचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

यापूर्वी दोन घटना

यापूर्वी याच हनुमान चौक भागात एका वर्षाच्या मुलाच्या तोंडात फुगा अडकून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. गेल्या आठवड्यात मुलीने दहा रुपयांचे नाणे गिळल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडकोची दाट वस्ती असल्याने हा प्रकाराची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी बिजुटकर यांच्या घराजवळ गर्दी केली होती. दोनच दिवसांपूर्वी पहिला वाढदिवस साजरा झाल्यानंतर सुजयला या जगाचा निरोप घ्यावा लागल्याने नागरिकांकडून दुःख व्यक्त केले जात होते.

बालकांजवळ लहान वस्तू हाताळण्यास देऊ नये. कारण ते कोणतीही वस्तू तोंडातच घालतात. मुलाचे पाय हातात धरून त्याला उलटे पकडून पाठीवर मारल्यास तोंडातील वस्तू बाहेर निघण्यास मदत होते. त्याचबरोबर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
- डॉ. मनिष पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाच्या अनास्थेमुळे ‘रंगवैखरी’चा बोजवारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या 'रंगवैखरी' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन कलाविष्कार स्पर्धेचा अक्षरश: बोजवारा उडाला. अवघ्या दहा डोक्यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत उण्यापुऱ्या दोनच कॉलेजांनी सहभाग घेत सरकारची लाज राखली. हाताशी ४० दिवसांचा कालावधी असूनही प्रसिद्धी करण्यात नेहमीप्रमाणे कमी पडलेल्या शासनाने मनापासून एखादी स्पर्धा घ्यायची नाही, असा विडा उचललेला आहे की काय अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती यासंदर्भातील विविध कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून सातत्याने योजले जात आहेत. याच उपक्रमांच्या मालिकेतील 'रंगवैखरी' ही कलाविष्कार-स्पर्धा, मराठीच्या समृद्ध अशा भाषिक, साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने प्रेरित होती. स्पर्धेच्या या वर्षासाठी 'महाराष्ट्री ते मराठी : मराठी भाषेच्या विकासाचा टप्पा' हा विषय देण्यात आलेला होता. या विषयाच्या अनुषंगाने सादर केल्या जाणाऱ्या सादरीकरणात नाट्य, चित्र, शिल्प, नृत्य, संगीत यांच्यापैकी किमान तीन कलांचा समावेश गरजेचा होता. मराठी भाषा गौरव दिनाच्या (२७ फेब्रुवारी) पार्श्वभूमीवर योजलेल्या या स्पर्धेत, मराठी साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प या कलांच्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृती यांचे रंगमंचीय प्रकटीकरण करण्याची संधी तरुण कलाकारांना मिळाली. परंतु, त्याला अत्यंत कमी सहभाग असल्याने स्पर्धेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला गेला.

स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आग्रही आवाहन मराठी भाषा तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकाद्वारे केले होते. परंतु, कागदी घोडे नाचवणारे सरकारी बाबू हे आवाहन कॉलेजेसपर्यंत नेण्यात असमर्थ ठरल्याने ही स्थिती ओढावली.

नाशिक विभागाला समन्वयक नाही

शासनाच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या या इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी एक समन्वयकसुद्धा नाशिकला नेमण्यात आला नाही. त्यामुळे स्पर्धेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. समन्वयक हा केवळ परीक्षकांची ने-आण करण्यापुरताच नसून, स्पर्धेत त्याचा मोलाचा सहभाग असतो. परंतु, राज्य मराठी विकास संस्थेतर्फे समन्वयकाची मागणी करण्यात आली नाही किंवा शासनानेही एखादा प्रतिनिधी नाशिकला पाठवला नाही हा अनास्थेचाच एक भाग आहे.

तांत्रिकदृष्ट्याही असक्षमता

राज्य नाट्य स्पर्धा समर्थपणे पेललेले परशुराम साईखेडकर नाट्यगृह रंगवैखरी स्पर्धांसाठी मात्र अनलकी ठरले की काय अशी चर्चाही रंगली होती. कारण सुरुवातीपासूनच साऊंड सिस्टम, लाइट यांचा प्रचंड गोंधळ उडालेला होता. लाइटने तर अनेकदा मोक्याच्या ठिकाणीच दगा दिला. काहीवेळ अंधारातच अनाऊन्समेंट करून सूत्रसंचालिकेने प्रसंग तारून नेला.

'ताटी उघडा' महाअंतिम फेरीत

राज्याच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या रंगवैखरी या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बीवायके कॉलेजची 'ताटी उघडा' ही एकांकिका अव्वल ठरली. मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी ही एकांकिका जाणार आहे. दिग्दर्शन कृतार्थ कंसारा, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत शुभम लांडगे यांचे तर यात बागेश्री पारनेरकर, अभिजीत लेंडे, शिवम येवलेकर, प्रतीक विसपुते यांच्यासह विद्यार्थ्यांनी भूमिका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे रुग्णालयाची वाताहत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दिवसाकाठी सुमारे ७५ रेल्वेगाड्यांतून वीस हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा असणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात अवघे एकच डॉक्टर कार्यरत असल्याने हे रुग्णालय 'असून अडचण, नसून खोळंबा' ठरू लागले आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रेल्वे स्टेशनवर अचानक वैद्यकीय उपचारांची गरज भासणाऱ्या रुग्णांची डॉक्टरांच्या पुरेशा संख्येअभावी हेळसांड सुरू आहे.

सेवाग्राम एक्स्प्रेसने नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मिस्त्रीलाल सोनी या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. वास्तविक पाहता या प्रवाशाला लासलगाव रेल्वे स्टेशनपूर्वीच वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. नाशिकरोडलाही पुरेशा डॉक्टरांअभावी या प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील रुग्णालयातील डॉक्टर्स उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे येथील रुग्णालय निव्वळ शोभेपुरतेच ठरले आहे.

तुटपुंज्या कर्मचारऱ्यांवर भिस्त

या रुग्णालयात सध्या केवळ पाचच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात प्रत्येकी एक डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका, कम्पाउंडर आणि सुरक्षा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या रुग्णालयाच्या हद्दीत घोटी ते निफाड रेल्वे स्थानकांदरम्यानचा समावेश होतो. सुमारे १२०० कार्यरत व १००० सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळुन सुमारे ५००० नागरिकांचा भार या रुग्णालयावर आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सध्या मनमाड रुग्णालयाचे डॉक्टर क्षत्रिय प्रतिनियुक्तीवर असून, येथे नेमणुकीस असलेले डॉ. श्रावणकुमारही रजेवर आहेत. कंत्राटी डॉक्टरही सेवेत नाहीत. शिवाय येथील डॉक्टरांना टीएमडब्ल्यू येथेही व्हिजिट करावी लागते. रात्रीच्या वेळी या रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नसतात.

आपत्कालीन सुविधा कुचकामी

धावत्या रेल्वे गाडीत प्रवाशांना वैद्यकीय उपचारांची गरज पडल्यास १३९ या क्रमांकावर प्रवाशांनी माहिती द्यावयाची असते. याविषयीची माहिती रेल्वेच्या सर्वच बोगींत असते. मात्र, या क्रमांकावर लवकर संपर्कच होत नसल्याचा अनुभव प्रवाशांना वारंवार आला आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या ट्विटर अकाउंटवरही मदत मागता येते. परंतु, प्रवाशांना याबाबतही पुरेशी माहिती नसते. गाडीतील ऑन ड्युटी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि टीसीकडेही याविषयी मागणी नोंदवता येते. परंतु, बऱ्याचदा टीसी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही प्रवाशांना शोधता येत नाहीत. परिणामी आपत्कालीन वैद्यकीय सुविधाही कुचकामी ठरत आहेत.

रेल्वे प्रवासात १३९ क्रमांकावर कळविल्यास प्रवाशांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. याशिवाय टीसीकडेही मागणी नोंदविता येते. ट्विटरद्वारेही प्रवासी ही सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतात. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

-राजेश फोकणे, माजी सदस्य, रेल्वे सल्लागार समिती, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल योजनेत पोटभाडेकरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील घरांमध्ये मूळ लाभार्थींनीच पोटभाडेकरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात निलगिरीबाग येथील घरकुल योजनेत २५ पोटभाडेकरू आढळले असून, अन्य घरकुल योजनांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचा दावा मिळकत विभागाने केला आहे. त्यामुळे घरकुल योजनेसह महापालिकेच्या गाळ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सभापती शीतल माळोदे यांनी दिले आहेत.

विधी समितीची बैठक सभापती शीतल माळोदे यांच्या अधयक्षतेखाली झाली. बैठकीला उपसभापती राकेश दोंदे, संतोष गायकवाड, नीलेश ठाकरे, हिमगौरी आडके, शरद मोरे, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे उपस्थित होते. या वेळी महापालिकेच्या गाळ्यांसह घरकुलांमध्ये पोटभाडेकरू असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर गायकवाड यांनी जेएनएनयूआरएमअंतर्गत उभारलेल्या घरकुलांमध्ये मूळ लाभार्थींनीच पोटभाडेकरू ठेवल्याचा आरोप केला. त्यावर झोपडपट्टी विभागाच्या वतीने खुलासा करण्यात आला. महापालिकेचे झोपडपट्टी अधिकारी रामनाथ हिंगमिरे यांनी गेल्या वर्षी झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करीत नीलगिरीबाग येथील घरकुल योजनेत २५ पोटभाडेकरू असल्याची माहिती दिली, तसेच अन्य घरकुल योजनांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शहरातील सहा विभागांतील घरकुल योजनांमधील लाभार्थींची चौकशी करून पोटभाडेकरू आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये पोटभाडेकरूंवर कारवाई करण्याच्या विषयावरही या वेळी चर्चा झाली. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या काळात गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात काही ठिकाणी पोटभाडेकरू आढळून आले होते. त्या संदर्भातील कारवाईचा अहवाल आयुक्तांकडे असल्याचे स्पष्टीकरण विविध कर विभागांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे सभापती माळोदे यांनी गाळ्यांचेही सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

नोटिसांचा निव्वळ फार्स

महापालिकेच्या झोपडपट्टी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नीलगिरी बाग येथील घरकुल योजनेत पोटभाडेकरू आढळून आले होते. या सर्वांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोटीस देण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यांनतर लाभार्थींकडून नोटिसांना उत्तर मिळाले आहे. नोटिसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पुढे काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे झोपडपट्टी विभागाकडून निव्वळ नोटिसांचा फार्स अवलंबला जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

बैठकीला लिपिक

भाजपने सत्तेच्या सोयीसाठी तयार केलेल्या समित्या फार्स ठरत असल्याचे समोर आले आहे. नव्याने तयार केलेल्या समित्यांच्या बैठकींमध्ये अधिकारीच येत नसल्याने या समित्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत तर चक्क ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यातून प्रशासनाने कोणताही बोध घेतला नाही. विधी समितीच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांनीच पाठ फिरवली. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांअभावी ही बैठकच सव्वा तास उशिराने सुरू झाली, तर या बैठकीतही दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. आयुक्तांकडे बैठक असल्याचे कारण देत लिपिकांच्या हजेरीने सभापतींसह सदस्यही भडकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगड दर्शनाची अनोखी पर्वणी!

$
0
0

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर साकारणार भव्य प्रतिकृती

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने व आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाची भव्य प्रतिकृती बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. १२० बाय ८० फूट आकाराची 'राजगड' ही प्रतिकृती राज्यातील पहिला-वहिला मोठा प्रकल्प असल्याचे रचनाकाराचे म्हणणे आहे. शहरवासीयांसाठी राजगड भ्रमंतीची ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

सिन्नरच्या पोलिस परेड मैदानावर सध्या सांगली येथील शिवदुर्ग रचना या गड-किल्ले प्रतिकृती निर्मिती संस्थेचे प्रमुख रचनाकार सुनील रजपूत व सहायक रचनाकार श्रीरंग पटवर्धन राजगडाची प्रतिकृती निर्माण करण्यात व्यस्त आहेत. शिवकाळात रायगडावर जसे वैभव होते, वास्तू होत्या, तशी हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याची माहिती रजपूत यांनी दिली.

राजगडाची उंची साधारणपणे ७ फूट असेल. नागरिकांना पाहण्यासाठी किल्ल्याच्या बाजून ३ ते ४ फूट लांबी-रुंदीचा रॅम्प उभारण्यात येईल. मात्र त्याचा लूक निसर्गवाटेसारखा असेल. पाहणाऱ्यांना आपण किल्ल्याभोवती फिरत आहोत, एवढा जीवंतपणा अनुभवता येईल. किल्ला उभारणीसाठी सरासरी ४० दिवसांचा कालावधी लागतो. शिवसेना दरवर्षी तिथीनुसार ४ मार्चला शिवजयंती साजरी करते. त्या पार्श्वभूमीवर आमदार वाजे यांनी नियोजन केले होते. तथापि, सिन्नरकरांनी एकत्रितपणे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कारागिरांनी कामाचा वेग वाढवला आहे. तरीदेखील फेब्रुवारी अखेरीस किल्ल्याची प्रतिकृती उभी करून नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वाजे यांनी दिली.

असे असेल शिवकालीन वैभव

किल्ल्याची लांबी-रुंदी १२० बाय ७० फूट असेल, तर उंची साधारणत: ७ फूट राहील. राजगडावरील सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती माजी, तलाव, राजवाडा, निवाड्याची जागा, सदर, मावळ्यांचे वाडे, घोड्यांची पागा, तलाव, बालेकिल्ला व त्याचे प्रवेशद्वार हुबेहूब साकारण्यात येणार आहे. किल्ल्याचे पहाड तसेच वास्तूंचे अवलोकन व्हावे, यासाठी गडावर प्लास्टर ऑफ पॅरिसचे १ इंच आकाराचे ५०० मावळे ठिकठिकाणी उभे करण्यात येतील. गडाच्या बालेकिल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात येईल.

३६० फूट लांबीची तटबंदी

राजगडाची भव्य-दिव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून, जीवंतपणा येण्यासाठी प्रामुख्याने दगड-मातीचा वापर करण्यात येत आहे. किल्ल्याभोवती ३६० फूट लांब व १५ फूट उंच तटबंदी उभारण्यात येत असून, ६० ट्रॉली दगड, ५० ट्रॉली माती, मावळ्यांची मांडणी आणि १ लाख विटा या प्रतिकृतीवर कोरण्याचे कसब रचनाकार सुनील रजपूत आणि श्रीरंग पटवर्धन दाखणार आहेत. त्यासाठी ३५ ते ४० मजूर-कारागीर अहोरात्र जुंपलेले आहेत.

२५६ किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन

राजगडाच्या प्रतिकृतीपासून जवळच नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमातीच्या पुढ्यात दुर्ग दर्शन संस्थेच्या वतीने २६० किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मालोजीराजे भोसले यांच्यापासून झाशीच्या राणीपर्यंतचे १२५ पराक्रमी सेनापतींच्या समाधीस्थळांचे चित्रदेखील इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये गोदापात्राची स्वच्छता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या-गोदावरी संगम घाट परिसरातील गोदापात्राच्या अस्वच्छतेबाबत महाराष्ट्र टाइम्सने मांडलेल्या वास्तवाची दखल घेत स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. नगरपालिका आरोग्य सभापती विष्णू दोबाडे यांनी नगरसेवक सागर उजे यांच्यासोबत पाहणी करीत तातडीने स्वछतेचे आदेश दिले. शुक्रवारी दुपारनंतर आरोग्य निरीक्षक शाम गोसावी यांनी गोदापात्राची सफाई सुरू केली.

गोदापात्राच्या अस्वच्छतेबाबत 'मटा'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर, याची भाजपचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी दखल घेत नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर यांनी आरोग्य सभापती विष्णू दोबाडे यांच्यामवेत चर्चा केली. यावेळी गोदापात्र स्वच्छतेबाबत नियमित उपाययोजना करण्यासाठी तरतूद करण्याचे ठरविण्यात आले. आरोग्य सभापती विष्णू दोबाडे आणि नगरसेवक सागर उजे यांनी गोदापात्रची पाहणी करीत स्वच्छतेचे आदेश दिले. नदीपात्रात शेवाळ वाहून आले असून, गटारींचे पाणीही वाहत आहे. नदीपात्रात प्लास्टिक कचरा जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्स हिसकावून चोरट्यांचा पोबारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेची पर्स हिसकावून धूम ठोकली. ही हनुमानवाडीत घडली असून, पर्समध्ये सुमारे सहा हजार रुपये होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

संगीता कन्हैय्यालाल शर्मा (५२ रा. केशवलिलापार्क, हनुमानवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गंगापूररोड लिंकरोडवर गुरूवारी (दि. १५) सायंकाळी शर्मा या अॅटोरिक्षाची प्रतीक्षा करीत होत्या. श्रद्धा लॉन्स समोर उभ्या असलेल्या शर्मा यांच्याजवळ एक दुचाकी येऊन थांबली. दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी चोपडा लॉन्सकडे जाण्याचा मार्ग विचारला. शर्मा चोरट्यांना उत्तर देत असताना दोघापैकी एकाने त्यांच्या हातातील पर्स ओढली. पर्स हाती येताच दुसऱ्याने भरधाव वेगात दुचाकी पळवली. पर्समध्ये सहा हजार रुपयांची रोकड आणि गॅस सिलिंडर पुस्तक असा मुद्देमाल होता. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक इंगोले करीत आहेत.\R

चाकूधारी तरुण गजाआड

धारदार चाकू जवळ बाळगून दुचाकीने जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश रमेश गिरी (२४, रा. आरटीओ कार्यालयाजवळ) आणि भगवान मंजीराम तळेकर (२९, रा. हिरावाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. गोळे कॉलनी परिसरात बुधवारी रात्री दुचाकीस्वार धारदार चाकू घेवून फिरत असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पोहचून दोघांना ताब्यात घेतले. दोघांच्या अंगझडतीत धारदार चाकू आढळून आला. दहशत निर्माण करण्यासाठी दोघे संशयित चाकू घेऊन फिरत होते. संशयितांच्या ताब्यातील दुचाकीही चोरीची असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांच्या अटकेने काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. घटनेचा अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.

देवळालीगावात जुगारींवर कारवाई

देवळालीगावातील गांधीपुतळा भागात मटका जुगार खेळणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. घटनेचा अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

युवतीची आत्महत्या; तरुणाविरूद्ध गुन्हा

मैत्री करीत नाही, बोलत नाही म्हणून बदनामी करून युवतीस आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या संशयित तरुणाविरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सागर बबन मोहिते (रा. श्रमिकनगर, सातपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याच भागात राहणाऱ्या साक्षी जगताप (वय १७) या युवतीने १२ जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास करताना तसेच मृत्यूपूर्वी साक्षीच्या जबानीवरून पोलिसांनी संशयित मोहितेविरोधात गुन्हा दाखल केला. मोहिते हा साक्षीला नेहमीच मैत्री करण्यासाठी विचारत होता. तसेच तीने बोलावे यासाठी प्रयत्न करायचा. संशयिताकडे साक्षीने दुर्लक्ष केल्याने त्याने या भागात साक्षीची बदनामी सुरू केली. या बदनामीमुळे १२ जानेवारी रोजी तिने आत्महत्या केली. घटनेचा अधिक तपास पीएसआय अवतारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये आज हल्लाबोल आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात निफाड येथे आज (दि.१७) सकाळी १० वाजता शिवाजी चौक येथे हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील सर्व नेते या मोर्चाच्या निमित्ताने निफाडला येणार आहेत.

या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजीमंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक निफाडमध्ये दाखल होत आहेत.

हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांच्यासह तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी यांनी कंबर कसली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार यांच्या उपस्थितीत इतर पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी आपल्या विकासकामांचे

लोकार्पण आणि भूमिपूजन याचा बार उडवून देत निफाड मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत सेनेसाठी वातावरण तयार केले होते. त्यानंतर आता त्यांचा मुख्य स्पर्धक असलेल्या राष्ट्रवादीनेही हल्लाबोलच्या निमित्ताने ग्राउंड तयार करायला सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर कोयत्याने हल्ला

$
0
0

दोघा संशयितांना अटक; एक जण फरार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

किरकोळ वादाचे हाणामारीत रुपांतर होऊन दोघांनी कोयत्याचे वार केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिकरोड उड्डापुलाखालील भाजीबाजारात बुधवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नवाज बबू शेख (वय २९, रा. सैलानीबाबा दर्ग्याजवळ, श्रीकृष्णनगर, एकलहरे रोड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जखमी नवाज याच्या फिर्यादीनुसार, या हल्ल्याप्रकरणी दत्ता भांगरे, सुनील थोरात आणि गणू थोरात या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यापैकी दत्तू आणि सुनील या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी नाशिकरोड कोर्टात न्यायालयात हजर केले. कोर्टाने त्यांना मंगळवारपर्यंत (दि. २०) पोलिस कोठडी सुनावली आहे. गणू थोरात फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

नवाजचे मित्र नाना हुळहुळे, अक्षय विसपुते आणि गणेश मानकर यांच्यासोबत बुधवारी रात्री सिन्नर कला सांस्कृतिक कला केंद्राच्या कार्यक्रमाला गेला होता. तिथे नवाजची भेट माजी नगरसेवक शिवाजी भागवत आणि कन्हैय्या साळवे यांच्याशी झाली. येथे त्यांच्यासोबत असलेल्या दत्ता भांगरे याने नवाजसोबत वाद उपस्थित करून त्यास मारहाण केली. वाद मिटवल्यावर नवाज त्याच्या मित्रांसह नाशिकरोडला येत असताना दत्ता भांगरे याने गाडीने पाठलाग केला. घाबरलेल्या नवाजने चेहेडी चाडेगाव मार्गाने थेट नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. तेथे दत्ता याच्यासह सुनील आणि गणू यांनी नवाजशी पुन्हा वाद घातला. पोलिसांसह शिवाजी भागवत व कन्हैय्या साळवे यांनी हा वाद मिटविला. पोलिस ठाण्यातून घरी परतत असताना सावरकर उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात गाठून दत्ता आणि सुनील यांनी नवाजवर कोयत्याचे जीवघेणा हल्ला केला.

जखमांवर ४५ टाके

हल्लेखोरांनी नवाजच्या मानवर आणि डाव्या हातावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात नवाजवर दोन वार करण्यात आले. यात त्याला एकूण ४५ टाके घालण्यात आले. नवाजच्या मित्रांनी मध्यस्थी करून हल्लेखोरांना रोखले आणि नवाजला प्रथम बिटको व नंतर जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईचं दु:ख यंदाही सरेना!

$
0
0

येवल्यातील उत्तरभागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागाला यंदाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चांदगावसह परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, अनेक ठिकाणांहून टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होऊ लागले आहेत. चांदगावचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला गेला मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यास मंजुरी न दिल्याने हंडाभर पाण्यासाठी तळमळणाऱ्या चांदगावकरांसह परिसरातील वाड्या अन् वस्त्यांवरील ग्रामस्थांचा घसा अधिकच कोरडा होत चालला आहे.

उत्तरपूर्व भागात पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसल्याने या भागातील जनता केवळ पावसाळ्यातील आभाळमायेवरच जगत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागण्याअगोदरच काही महिने या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. अनेक गावांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजला गेलेला असल्याकारणाने गेल्या महिनाभरापासूनच पिण्याच्या पाण्याची गरज निर्माण होऊ लागली आहे. या उत्तरपूर्व पट्ट्यातील अनेक गावात तर यंदा डिसेंबरपासूनच टंचाई जाणवू लागली. गेल्या काही दिवसांत टंचाईची दाहकता अधिकच वाढल्याचे चित्र समोर आलं आहे. अनेक गावातून 'टँकर द्या हो, टँकर' अशी आर्त साद प्रस्तावाव्दारे शासनदरबारी घातली जात आहे.

चांदगाव हे एक तहानलेलं गाव. गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता. पुढे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी गेला. मात्र, त्यावर जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीची मोहोर न उमटल्याने अद्यापही चांदगावकर शासकीय टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

दानशुरांमुळे तात्पुरता दिलासा

काही समाजसेवी संस्था आणि गावातील काही दानशूर यांच्या सहकार्याने चांदगावात नुकताच टँकर सुरू झाला आहे. काही ग्रामस्थांच्या पुढाकारातून बाहेरून आणलेला एक टँकर गावातील विहिरीत खाली केला जात आहे. हा टँकर गावात येताच पाणी घेण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन महिलांची लगबग दिसत आहे. लहान मुले-मुली, बायकांसह पुरुषांची देखील धावपळ आणि गर्दी होत आहे. मात्र, दिवसभरात हे पाणी पुरत नसल्याने पाण्यासाठी सर्वांचीच वणवण सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकाच्या नियुक्तीवर आक्षेप

$
0
0

शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रशचिन्ह

म. टा. वृत्तसेवा, निफाड

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय काकासाहेब नगर (ता. निफाड) या शाळेतील शालेय पोषण आहार उपक्रमात बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल मुख्याध्यापकाला ७९ हजार २३३ रुपये दंड, शिस्तभंग कारवाई व निलंबनाची शिफारस केलेली आहे. असे असताना संबंधित मुख्याध्यापकांना बारावी बोर्डाच्या काकासाहेब नगर येथील परीक्षा केंद्राचे संचालकपद दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत निफाड पंचायत समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

रानवड कारखाना येथील कर्मवीर के. के. वाघ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बी. डी. पगार हे पोषण आहार योजनेत दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करून दंड आकारण्यात आला आहे. असे असताना संबंधित मुख्याध्यापकाला बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून नियुक्त केले आहे. यावरून निफाड पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत शिक्षण विभागाने बोर्डाला हे कळवले का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यावर सभापती पंडितराव आहेर यांनी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांना जाब विचारला. त्यावर जगताप यांनी बोर्डाला ही माहिती दिल्याचे सांगितले. मात्र, तरीही बोर्डाने पगार यांची नियुक्ती केल्याने उद्या परीक्षेत काही गैरप्रकार झाला, तर आपण जबाबदार राहणार नाही असे लेखी पत्र बोर्डाला तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले.

जिल्हा परिषदेचे नवे मुख्याधिकारी गिते यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तालुक्यातील सर्व कर्मचारी, अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याबाबत सक्त आदेश काढण्यात येणार आहेत. तसेच, खोटा दाखला देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सभापती पंडितराव आहेर यांनी स्पष्ट केले.

यावेळी बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, पोषण आहार विभाग आदी विभागांच्या संबंधित कामांचा आढावा, तक्रारी, सूचना याबाबत चर्चा झाली. या बैठकीला उपसभापती गुरुदेव कांदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना गटनेता शिवा सुराशे, राजेश पाटील, संजय शेवाळे, सपना बागूल, दिलीप सूर्यवंशी, रंजना पाटील, रत्ना संगमनेरे, नितीन जाधव, नितीन पवार, अलका घोलप, अनुसया जगताप, सोनाली चारोस्कर, गयाबाई सुपणार, सोमनाथ पानगव्हाणे, आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. नवलसिंग चव्हाण, बांधकाम विभागाचे रामनाथ काळे आदी उपस्थित होते.

पोषण आहारात दोषी असलेल्या मुख्याध्यापकांवर कर्तव्यात बेजबाबदारपणाची कारवाई झाली असल्याने त्यांना केंद्र संचालकपदाची जबाबदारी देऊ नये, असे बोर्डाचे सचिव मारवाडी यांना सांगितले होते. मात्र, तरीही त्यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. पगार यांना निलंबन करण्याची जबाबदारी संस्थेची आहे, त्यांचा पगार बंद कारावा, असे पत्र जिल्हा परिषदेने वेतनपथकाला दिले आहे.

- सरोज जगताप, गटशिक्षण अधिकारी, निफाड पंचायत समिती

वावी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही भेट दिली असता, त्या ठिकाणी दोन महिन्याला साडेआठ क्विंटल धान्य लागत असूनही तिथे १३ क्विंटल धान्य आढळून आले. याचा अर्थ पोषण आहार शिजवताना कागदोपत्री धान्य दाखवले जाते. प्रत्यक्षात या धान्याचा उपयोगच केला जात नाही हे समोर येते. त्यामुळे पोषण आहाराच्या गैरप्रकारात शाळेतील मुख्याध्यापकसह अधिकारीही जबाबदार आहेत.

- शिवा सुराशे, पंचायत समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकार नाही भानावर, राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर’

$
0
0

राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करतानाच 'सरकार नाही भानावर, राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर' अशी जनतेला साद घालत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या 'हल्लाबोल' मोर्चाचे शुक्रवारी येवल्यात आगमन झाले.

राज्यभर राज्य सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडण्यासाठी निघालेला हा हल्लाबोल मोर्चा शुक्रवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यात प्रवेशकर्ता होताना येवला शहरातील शनिपटांगणावर राष्ट्रवादीच्या राज्यातील दिग्गज नेत्यांची जाहीर सभा झाली. खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंढे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील आदी नेत्यांची प्रमुख भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृध्द कलाकारांचे मानधन रखडले

$
0
0

नाशिकच्या काही मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकारांनी २०१४-१५ मध्ये अर्ज केल्यानंतर त्यांना शासनाकडून मानधन मंजूर झाले मात्र अद्यापही त्यांना ते मिळालेले नाही.

मानधन मंजूर झाल्याचे पत्र कलाकारांना देण्यात आलेले आहे. परंतु, ते कधी मिळणार याची अनेकांना प्रतीक्षा आहे. यातील बरेचसे कलाकार नव्वदी पार केलेले असून त्यातील काही अंथरुणावर खिळून आहे. विशेष म्हणजे ही बाब शासनाला माहित असूनही या कलाकारांचे मानधन अद्यापपर्यंत जमा झालेले नाही. मानधन जमा होण्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे होते ते सर्व करण्यात आले आहे त्यामुळे हे पैसे लवकर जमा करण्यात यावे, अशी मागणी वृद्ध साहित्यक व कलाकार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'त्या' शेतकरी महिलेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ

$
0
0

मुंबईत मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चांदवड तालुक्यातील शेतकरी शकुंतला कारभारी झाल्टे यांची मागणी मालकी हक्क जमीन ताब्याबाबत आहे. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश, निफाड यांच्याकडे अपिल न्यायप्रविष्ठ आहे. कोर्टाकडून अंतिम निकाल पारीत झाल्यानंतर झाल्टे यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

शकुंतला झाल्टे यांनी शुक्रवारी मंत्रालयाजवळ विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्माजी पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केल्यानंतर व्यथित शेतकरी मंत्रालयात धाव घेऊ लागले आहेत. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकरी महिला शकुंतला झाल्टे यांचा मालकी हक्काच्या जमिनीबाबत वाद सुरू आहे. या जमिनीचा ताबा मिळावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. झाल्टे यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी चांदवड प्रांताधिकाऱ्यांना उपोषणाबाबतचे निवेदन दिले होते. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांची मागणी दिवाणी स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी उपोषण अथवा अन्य आंदोलन करू नये अशी विनंती करीत त्यांचे समुपदेशनही करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालय, निफाड यांच्याकडे त्यांनी दाद मागावी, असा सल्ला त्यांना देण्यात आला.

शकुंतला झाल्टे यांचे जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणे उचित नाही. जमिनीच्या संदर्भातील दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असल्याने व्यथित होऊन त्यांनी हे पाऊल उचलले असावे. न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करणे न्यायोचित होईल.
- सिद्धार्थ भंडारे, प्रांताधिकारी चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅरेथॉनसाठी स्पर्धक सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मॅरेथॉन २०१८ स्पर्धेसाठी देशविदेशातील शेकडो स्पर्धक डेरेदाखल झाले आहेत. स्पर्धेला रविवारी पहाटे ५ वाजेपासून सुरूवात होणार असून, अनेक नामांकित खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असल्याने काही विक्रम मोडले जाणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नाशिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशविदेशातील १३ हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांची नोंदणी झाली असून, ही प्रक्रिया आज, शनिवारी शेवटच्या दिवशीही सुरू होती. स्पर्धेसाठी केनीया येथून आलेल्या ४० वर्षाच्या पीटर व्हॅमगी याने सांगितले की, नाशिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी आम्ही प्रथमच येथे आलो आहोत. पीटरसमवेत, सीसीलीया वारूतुमो (वय ३०, केनिया), मीकायस यामाटा (वय २६, इथोपीया) आणि आयसॅक केम्बोई (वय ३२ केनीया) आले आहेत.

स्पर्धकांनी यापूर्वी भारत, नेपाळ, चीन तसेच साउथ आफ्रिका येथे होणाऱ्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या मॅरेथॉनबाबत त्यांना भारतातूनच माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मॅरेथॉनसाठी सुरू झालेल्या वेबसाईटवर नोंदणी केली. देशभरातील इतर शहरापेक्षा नाशिकमधील वातावरण अधिक अल्हाददायक असल्याचे या खेळाडुंनी सांगितले. मीकायस यामाटा याने सांगितले की, १० किलोमीटर अंतरासाठी त्यास २८ मिनिटांचा तर ४२ किलोमीटर अंतर अवघ्या दोन तास २५ मिनिटांत कापले. येथे यापेक्षा कमी वेळासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. परदेशातील या स्पर्धकांसमोर आर्मीचे अधिकारी तसेच जवान आणि स्थानिक खेळाडू कसे आवाहन उभे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवासाची सुविधा

देशातील उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, कोलकत्ता अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून स्पर्धक शहरात दाखल झाले. यातील काहींनी निवासाची सुविधा उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. ही माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना समजताच त्यांनी खेळाडुंसाठी पोलिस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक सहामध्ये निवासासह इतर सुविधा पुरविण्याचे आदेश दिले. परराज्यातून आलेल्या खेळाडुंना यामुळे दिलासा मिळाला.

वाहतूक मार्गात बदल

३, ५, १०, २१ आणि ४२ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असून, प्रत्येक स्पर्धेची सुरूवात गोल्फ क्लबपासूनच होणार आहे. गोल्फ क्लबपासून निघालेले स्पर्धक त्र्यंबक नाका, अशोक स्तंभ, गंगापूररोड, महात्मानगर, एबीबी सर्कलपासून त्र्यंबकेश्वररोडवरील हॉटेल संस्कृती आणि तेथून त्र्यंबकरोडने पुन्हा गोल्फ क्लबपर्यंत येणार आहेत. तीन किलोमीटर अंतरासाठी धावणारे स्पर्धक केटीएचएम कॉलेजसमोरील उड्डाणपुलाजवळून उजवीकडे वळून तरणतलावापर्यंत पोहचतील. पाच किलोमीटर अंतरासाठी धावणाऱ्या स्पर्धकांना जूना त्र्यंबकनाका येथून, तर १०, २१ आणि ४२ किलोमीटर स्पर्धतील स्पर्धकांना जेहानसर्कल येथून एबीबी सिग्नल आणि तेथून पुढे स्पर्धेच्या टप्प्यापर्यंत पोहचावे लागणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीत पोलिसांनी बदल केला असून, पहाटे पाच ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. रस्त्याच्या एका बाजुला स्पर्धक तर दुसऱ्या बाजुला दुहेरी पध्दतीने वाहने धावतील. तर, रस्ता क्रॉस करण्यासाठी ठिकठिकाणी जागा मोकळी करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजी रस्त्यावर!

$
0
0

टीम मटा

नाशिक : वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शनिवारी प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, तसेच नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफतर्फे शहरात ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने करून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.


राज्य शिक्षक परिषदेचे धरणे

नाशिक : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच दि. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरात शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा क्रमांक सतरावरून आता पहिल्या तीनमध्ये आला आहे. त्यासाठी शिक्षकांनी दिलेले योगदान विचारात घेऊन मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आले.

या निवेदनात समाविष्ट मागण्यांमध्ये सन २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू व्हावा, कॅशलेस मेडिक्लेम योजना जिल्हा परिषद शिक्षकांना लागू व्हावी, २३ ऑक्टोबर २०१७ चा वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी लादलेला शासननिर्णय रद्द करण्यात यावा, ऑनलाइन कामाचे प्रमाणे २० टक्क्यांवर आणावे, शाळांची वीजदेयके शासनाने परस्पर वीज कंपनीस अदा करावीत, २००५ नंतरच्या मृत शिक्षक व शिक्षकेतरांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळावी, १ आणि २ जुलैच्या घोषित शाळांना अनुदान मिळावे, शालार्थ आयडी प्रस्तावांवर कार्यवाही करून योग्य प्रस्तावांना मार्चअखेर आयडी मिळावा व शालार्थ प्रणाली अद्ययावत करावी, दर महिन्यास १ तारखेला वेतन मिळायला हवे, बोगस दिव्यांग व बोगस दुर्धर आजारग्रस्तांची सक्षम प्राधिकरणाकडून शारीरिक तपासणी करावी त्यात कुणीही बोगस आढळल्यास कारवाई करावी, प्राथमिक विभागासाठी चट्टोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी त्वरित लागू करावी, पदवीधर शिक्षकांना बी. एड. करण्यास मान्यता मिळावी, आकृतिबंध त्वरित जाहीर करावा, सर्व अशैक्षणिक कामे, पोषण आहार, बांधकाम ही कामे काढून घेऊन सक्षम विभागाकडे द्यावीत, शिक्षकेतरांना आश्वासित प्रगत योजना लागू करावी, पदवीधर ग्रंथपालांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग कार्यवाहक डी. यू. अहिरे, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे-पाटील, जिल्हा कार्यवाह शरद निकम, गुलाब भामरे, सुमन हिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



प्राथमिक शिक्षकांचा एल्गार

नाशिक : वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटना आंदोलनाच्या भूमिकेत असताना शनिवारी या संघटनांमध्ये प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचीही भर पडली. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर नाशिक पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जून २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील एकस्तर व प्रोत्साहनभत्ता फरक बिले त्वरित मिळावीत, पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे काल्पनिक वेतनवाढ देऊन १५ नुसार प्रोत्साहन भत्त्यात दर वर्षी वाढ देण्यात यावी, कार्यालयीन कर्मचाऱ्याप्रमाणे एलआयसी कपात पगारातून व्हावी, ३९ ब प्रलंबित बिले त्वरित मिळावीत, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजुरीसाठी त्वरित पाठवावीत, नाशिक तालुक्यातील आदिवासी परिसरातील सर्व गावे अवघड क्षेत्र म्हणून घोषित व्हावीत, एमएससी आयटी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या अभ्यासक्रमाची सक्ती करू नये, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पाच हप्ते काही शिक्षकांच्या फंडात जमा नाहीत, ते जमा करावेत आदी प्रश्न या धरणे आंदोलनात मांडण्यात आले. या आंदोलनात सुभाष अहिरे, अशोक ठाकरे, तुकाराम पोटिंदे, प्रदीप पेखळे, बाळू भोये, रामनाथ सानप आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीचा बिगुल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ क मध्ये पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, एप्रिलमध्ये ही निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या माध्यमातून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभागातील ४७ हजार २२८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून, नावांबाबत, तसेच बदलाबाबत काही हरकती असल्यास २६ फेब्रुवारीपर्यंत त्या दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.

मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ क जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्यांवरून प्रभागनिहाय मतदारयाद्यांचे विभाजन करून प्रभाग १३ क ची प्रारूप मतदारयादी तयार केली आहे. शनिवारी महापालिकेच्या वतीने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यासाठी हरकती व सूचना मागविल्या आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी, तसेच पाहण्यासाठी ही मतदारयादी महापालिका मुख्यालयी राजीव गांधी भवन येथे, तसेच नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीविषयी मतदारांच्या हरकती व सूचनांकरिता १७ ते २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रारूप मतदारयादीनुसार प्रभागातील तब्बल ४७ हजार २२८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून, त्यामध्ये २४ हजार १४० पुरुष, तर २३ हजार ८८ महिला मतदारांचा समावेश आहे.

राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, सुरेखा भोसले यांच्या अंत्यविधीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केली होती. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलली असून, भाजप व शिवसेनेकडून ही जागा लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे मनसेची ही जागा धोक्यात आली आहे. भाजप व शिवसेनेकडून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र संभ्रमावस्था कायम आहे. ही निवडणूक लढवावी, असा काँग्रेसमध्ये दबाव आहे, तर मनसेच्या वतीने ही जागा बिनविरोध करण्यासाठी भोसले यांच्याच कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहुल चोक्सीचा नाशिकच्या व्यापारालाही गंडा

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या गीतांजली ग्रुपचा मेहुल चोक्सी याने नाशिकच्या फ्रेंचायजीला सात कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकप्रमाणे देशभरातील १०० च्या आसपास फ्रेंचायजीही यात फसले गेले आहेत. या सर्वांच्या फसवणुकीचा आकडा ३०० कोटींच्या आसपास आहे. यातील अनेकांनी स्थानिक पातळीवर या विरोधात तक्रारी केल्या असून, काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे गीतांजली जेम्सच्या विविध स्किममध्ये नाशिकचे ९०० हून अधिक ग्राहक फसले होते. त्यांना रिटर्न ज्वेलरीसुध्दा आली नाही. पण, यांचे पैसे फ्रेंचायची घेणाऱ्या वैभव ज्वेलर्सने आपल्या खिशाला चाट देऊन परत केल्यामुळे ते बचावले आहेत.

नाशिकमध्ये गीतांजली जेम्सची फ्रेंचायजी कॅनडा कॉर्नरवर येथील एका सराफाला देण्यात आली होती. पण, काही महिन्यानंतर त्यांनी व्यवहारात पारदर्शकता नसल्यामुळे ती सोडली. त्यानंतर नाशिकरोडवरील दत्त मंदिर चौकातील वैभव ज्वेलर्सच्या भास्कर माळवे व वैभव माळवे यांनी ही फ्रेंचायजी २०१२ मध्ये घेतली व १८ महिन्यानंतर त्यांनी ती सोडली. अॅडव्हान्स पेमेंट देऊनही माल न दिल्यामुळे वादाला सुरुवात झाली व त्यानंतर झालेल्या अनेक व्यवहारात फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ही फ्रेंचायजी सोडली पण, तोपर्यंत त्यांना ७ कोटींचा फटका बसला होता. त्यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून, सेबीकडेही तक्रार केली आहे.

मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपने देशभरात फ्रेंचायजी दिल्या. त्यानंतर त्यात अनेकांची फसगत झाली. पण, त्याची दखल आतापर्यंत सरकारी पातळीवर घेण्यात आली नाही. या फ्रेंचायजी सोडण्यामागे आर्थिक फसवणूक हे कारण असले तरी चोक्सीने मात्र काही प्रकरणात फ्रेंचायचीला त्यात दोषी ठरवले आहे. यात मालाच्या किमतीतही मोठा घोटाळा केल्याचे बोलले जात आहे.

पंजाब नॅशनल बँकेने मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सीबीआयने मुंबई, पुणे, सूरत, जयपूर, हैदराबाद आणि कोईमतूरसह एकूण २० ठिकाणी 'गीतांजली'च्या कार्यालय, शोरुम्सवर छापे टाकले आहे. त्यामुळे हा गीतांजलीचा या गैरव्यवहारात फ्रेंचायजीचा विषयाची सुध्दा चौकशी झाल्यास मोठा गैरव्यवहार बाहेर येणार आहे.

गीतांजली जेम्सची आम्ही फेंचायजी घेतली होती. अठरा महिन्यांनंतरच आम्ही तो सोडली. त्यातून आमची ७ कोटींची फसवणूक झाली आहे. त्याविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. आमच्यासारखेच देशभरातील १०० च्या आसपास फ्रेंचायजी फसल्या असून, फसणुकीचा आकडा ३०० कोटींच्या आसपास आहे.

- वैभव भास्कर माळवे, सराफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images