Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निर्मोही आखाड्यात मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनातील निर्मोही आखाड्यात आलेल्या दोन चोरट्यांनी चार मोबाइल लंपास केले. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ललितकुमार सतीशप्रसाद दुवेदी (वय २८, भारत सेवाश्रम, तपोवन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तपोवनातील निर्मोही आखाड्यात भाविकांची दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. दोन फेब्रुवारी रोजी या ठिकाणी एमएच १५/एफएल २०७२ या वाहनावर आलेल्या दोघांनी दोन सॅमसंग आणि दोन लावा कंपनीचे असे एकूण चार मोबाइल लंपास केले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय धनश्री पाटील तपास करीत आहेत.

सायबर कॅफे फोडले

दिंडोरी रोडवरील बाणगंगा सोसायटीतील गाळा क्रमांक ११ मधील साईकृष्ण सायबर कॅफे फोडून चोरट्यांनी ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३ फेब्रुवारीस पहाटेच्या सुमारास झाली. या प्रकरणी बाळकृष्ण पुंडलीक पवार (वय ५२, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास दुकान फोडून आत प्रवेश केला. दुकानातील एक अॅसुस कंपनीचा सीपीयू, सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा, रोख रक्कम, तसेच एचपी कंपनीचा एक लॅपटॉप असा मुद्देमाल लंपास केला. दुकान फोडल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पीएसआय व्होंडे तपास करीत आहेत.

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत मोहन चंद्रभान कदम (वय २५, रा. भरविहीर बुद्रुक, ता. इगतपुरी) याचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी- अंबड रोडवरील जनता स्वीट दुकानासमोर शनिवारी (दि. ३) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. अंबड गावातील गोंधळाचा कार्यक्रम आटोपून मोहन भाऊ प्रवीण खंडेराव कदम (वय २८, रा. पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) याच्या दुचाकीवर (एमएच १५/बीएफ ४०८५) घराकडे परतत असताना अपघात झाला. जनता स्वीटसमोर पाथर्डी फाट्याकडून भरधाव कारने (एमएच ०४/जीयू ५४३७) समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार मोहनच्या डोक्यासह इतर शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोहनचा भाऊदेखील गंभीर जखमी झाला. या प्रकरणी प्रवीणच्या फिर्यादीनुसार, अंबड पोलिसांनी कारचालक राजेश रमेश खैरनार (वय ४६, रा. उत्तमनगर, एकता चौक, सिडको) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयित कारचालकास पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके तपास करीत आहेत.

जुगार अड्ड्यांवर छापे

शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या ठिकाणाहून रोकड, जुगाराचे साहित्य जप्त करण्यासह संशयितांना अटक करण्यात आली आहे. अंबड पोलिसांनी शुक्रवारी (दि. २) रात्री केलेल्या कारवाईत किरण संजय जाधव (वय २७, रा. हरिओम रो हाऊस ४, साईग्राम, अंबड) या संशयितासह आणखी सहा जणांना अटक केली. अंबड लिंक रोडवरील एन. एम. एंटरप्राइजेस या दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयित पत्त्यावर जुगार खेळत होते. अंबड पोलिसांनी रात्री सव्वाअकराच्या सुमारास येथे कारवाई करून रोकड आणि जुगाराचे साहित्य असा २० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत. नाशिकरोड पोलिसांनी सामनगावरोडवरील एकलहरा गेट परिसरातील मोकळ्या जागेत मटका खेळणाऱ्या दोन जणांना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अटक केली. दीपक रामा धोत्रे आणि एकनाथ बाबूराव बोरोडे (दोघे रा. एकलहरा गेट, सामनगाव रोड) अशी मटका खेळणाऱ्या आरोपींची नावे आहेत. नाशिकरोड पोलिसांनी संशयितांविरोधात जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत. दरम्यान, सातपूर पोलिसांनी कार्बन नाका, भाजी मार्केट, सातपूर या ठिकाणी शनिवारी दुपारच्या सुमारास कारवाई करीत संजय रामलाल बागूल (४५, द्वारकामाई अपार्टमेंट, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) याला अटक केली. कल्याण नावाचा मटका खेळताना, तसेच खेळवताना बागूल पोलिसांच्या हाती लागला होता. पोलिस शिपाई कासार तपास करीत आहेत.

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

गावठी कट्टा बाळगणाऱ्या चेतन आनंदा ठमके (वय १९, रा. नवजीवन डे स्कूल, त्रिमूर्ती चौक, सिडको) आणि पंकज विनोद आहेर (वय १८, रा. शिवशक्ती चौक, साईबाबा मंदिरासमोर, त्रिमूर्ती चौक, सिडको) या दोघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. व्ही. एन. नाईक कॉलेजच्या भिंतीजवळ शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुधाच्या एटीएमला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळतो व ग्राहकांना जास्त दराने दूध विकत घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून सिन्नर तालुका दूध उत्पादक संघाने शेतकरी ते ग्राहक थेट सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध मिळावे यासाठी महाराष्ट्रात प्रथमच 'एनी टाइम मिल्क सेंटर' (ATM) सुरू करण्यात आले आहे. या एटीएमला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, विसेमळा परिसरात असलेल्या सेंटरमधून दररोज तीनशे लिटर दुधाची विक्री होत आहे.

हा उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक येथे सुरू झाला आहे. या सेंटरनंतर शहराच्या विविध भागांत दुधाची एटीएम सुरू होणार आहेत. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणे व ग्राहकांना चागल्या प्रतिचे दूध उपलब्ध करून देणे या सेंटरचा उद्देश आहे. या सेंटरमधून घेतलेले दूध त्याच ठिकाणी तपासून घेण्याचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी हा संघ प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांनी गोठ्यात आणलेले दुध दोन तासात या केंद्रा उपलब्ध होत आहे. गेल्या ५ वर्षापासून हा संघ संरक्षण खात्याला दुधाचा पुरवठा करीत आहे. ग्राहकांना एक कार्ड देण्यात आले आहे. त्या कार्डच्या आधारे ग्राहकांना हव्या तेवढ्या रकमेचे हवे तेवढे दूध उपलब्ध होत आहे. या ठिकाणी सायवाल जातीच्या गायीच्या दुधाचा भाव ८० रुपये लिटर, गायीच्या दुधाचा भाव ४५ रुपये लिटर तर म्हशीच्या दुधाचा भाव ६५ रुपये लिटर आहे.

५० सेंटर सुरू करणार

याप्रकारचे नाशिक शहरात ५० एटीम लवकरच सुरू करणार असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन माणिकराव कोकाटे यांनी दिली. प्रत्येक गावात दूध सहकारी संस्था स्थापन करून संगणकीकृत संकलन केंद्रातर्फे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना दुधाला योग्य भावाची हमी मिळावी यासाठी संघ नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. या केंद्रात दुधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थदेखील थोड्याच दिवसांत मिळणार आहेत. ज्यांनी एटीएम कार्ड काढले नसेल, अशांनादेखील या केंद्रात दूध मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे हे सेंटर २४ तास उघडे राहत असल्याने रात्री उशिरा घरी येणाऱ्यांची सोय झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थकांचा मार्चमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या विरोधात मार्च महिन्यात मुंबई येथे भुजबळ समर्थकांचा मेळावा काढण्याचे निश्चित झाले आहे. विधीमंडळ अधिवेशन काळात हा मोर्चा काढला जाणार असून त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, अशी माहिती समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी जाहीर केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारीणीची रविवारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. तपोवन परिसरातील जयशंकर लॉन्स येथे झालेल्या बैठकीस संघटनेचे उपाध्यक्ष बापू भुजबळ, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे, मधुकर जेजुरकर आदींसह राज्यभरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कृष्णकांत कुदळे म्हणाले, की मुंबई जवळच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक मोर्चात कसे सामील होतील याची तयारी करायला हवी. विविध जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी यांची हाय पॉवर कमिटी तयार करण्यात येणार आहे.

आमदार जयंत जाधव म्हणाले, की आपली शक्ती संघटीत आहे. ज्या क्षणाला मोर्चाची तारीख कळेल तेव्हा निघता आले पाहिजे. विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगड घालून तारीख निश्चित करायची आहे. हा मोर्चा भुजबळ समर्थकांचा आहे. शिस्तबद्धपणे हा मोर्चा काढायचा आहे.

अन्याय झाल्यानंतर समाज एकसंघ होऊन पेटून उठतो हे अनेकदा बघायला मिळाले आहे. 'अन्याय पे चर्चा' हा नाशिकला सुरू झालेला उपक्रम राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये राबविण्याची उपस्थितांनी तयारी दर्शविली. मुंबईला होणाऱ्या मोर्चासाठी राज्यभरात वातावरण निर्मिती करण्याचे काम करण्याचे काम केले जावे, अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या. मोर्चाच्या तयारीसाठी अहोरात्र प्रयत्न करून पाच लाख भुजबळ समर्थकांसह विधानभवनावर मोर्चा घेऊन जाण्यासाठी तयारी करण्याची उपस्थितांनी शपथ घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला लाखोंचा फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यात दररोज २ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. नाशिक जिल्ह्यात एसटीच्या ११०२ बस असून त्या रोज ३ लाख किलोमीटर धावतात. एका दिवसाला या बसला ६६ हजार लिटर डिझेल लागते. पण, गेल्या वर्षभरात डिझेलमध्ये झालेल्या भाववाढीमुळे सरासरी ४ रुपये खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे एसटीला महिन्याला ७९ लाख २० हजाराचा फटका बसतो आहे. राज्यात हाच आकडा कोट्यवधींच्या घरात आहे. राज्यात एसटीच्या १७ हजार आसपास गाड्या रोज धावतात त्यांना १२ लाख लिटर लागते. त्यामुळे राज्यात एसटीला दररोज ४८ लाखांचे नुकसान होते.

वेगवेगळ्या कारणांनी एसटीचा तोटा वाढत असला तरी, त्यावर अद्याप उत्तर मिळाले नाही. हा तोटा भरण्यासाठी भाडेवाढ हा सरळ विषय एसटीसमोर आहे, मात्र त्यातून प्रवाशांच्या संख्येत घट होईल ही भीती आहे. त्यामुळे एसटीने गेल्या तीन वर्षांत भाडेवाढ केली नाही. पर्यायाने दरवर्षी डिझेल दरवाढीचा फटका एसटीला सहन करावा लागतो. तोट्यामुळे एसटीच्या सेवेवर त्याचा परिणाम होतो व त्यातून प्रवाशांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो.

जिल्ह्यात एसटीचे १३ आगार असून राज्यातील कानाकोपऱ्यात या डेपोतून बस धावतात. नाशिक महानगरात एसटीच्या सिटी बससुद्धा आहेत. त्यामुळे एसटीवर जिल्ह्यात डिझेलचा बोजा वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत एसटीने कात टाकण्यास सुरुवात केली असून, शिवशाही बसने एसटीला उभारी दिली आहे. खासगी वाहतुकीशी सामना करीत महामंडळाने प्रवाशांना आकर्षित केले आहे. पण, तरीही इतर ठिकाणी सुरू असलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या घटल्यामुळे त्याचा बोजाही वाढतो आहे. त्यामुळे डिझेल दरवाढीवर भविष्यात एसटीला तोटा भरून काढण्यासाठी मार्ग शोधावा लागणार आहे.

असा आहे एसटीचा खर्च

राज्यातील एसटीला वार्षिक कमाई ही ७०५६ कोटी आहे. त्यातून एकूण खर्च ७५७४ कोटी होतो. पगारावर ३१५७ कोटी, डिझेल खर्च २९६८ कोटी आहे. त्यामुळे एसटीला वार्षिक तोटा ५२८, तर संचित तोटा २३०० कोटी होतो. या सर्व खर्चात डिझेलच्या दरवाढीचा फटका आता वाढत आहे.

डिझेल दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात एसटीला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्यातून काही मार्ग काढल्यास प्रवाशांना अधिक सुविधा देता येतील. जिल्ह्यात दररोज सरासरी २ लाख ६४ हजार रुपयांच्या आसपास हा जादा खर्च येतो.

- राजेंद्र जगताप, वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परेल आणि करीरोड येथे उड्डाण पुलाचे गर्डर लावण्याचे काम रविवारी (दि. ४) करावे लागल्याने मध्य रेल्वेच्या सर्व मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला. मुंबईच्या लोकलसह नाशिकच्या पंचवटी, राज्यराणीसह काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दादरदरम्यान सर्व चार मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक झाला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेचार असा आठ तासांचा हा ब्लॉक होता. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीनदरम्यान अप फास्ट तर डाऊन स्लो मार्गावर सहा तासांसाठी ब्लॉक होता. या काळात लोकल सेवा बंद होती. सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस, सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस, सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस रविवारी धावल्या नाहीत. सीएसएमटी मुंबई -हावडा एक्स्प्रेस ३.३५ वाजता निघाली. सीएसएमटी मुंबई - हावडा कोलकाता मेल ५ फेब्रुवारीला रात्री १२.१० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक ११०९३ सीएसएमटी मुंबई - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस ५ फेब्रुवारीला १.१० वाजता सुटेल. मेगाब्लॉकमुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या तसेच येणाऱ्यांना त्रास झाला. रविवार असल्यामुळे चाकरमान्यांची गर्दी कमी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक जबाबदारीचे भान समाजातून मिळते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी आपण आरोग्यदायी हवे. आपण सक्षम असू तरच समाजातील वंचित घटकांना न्याय देता येऊ शकतो. कुटुंब आणि समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी खांद्यावर घेताना स्ट्रेस येऊ शकतो. अशा वेळी आपल्या कुटुंबातील सदस्याकडे पाहा आणि कामाला लागा, असा सल्ला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला.

पोलिस दलातर्फे सर्व पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो फ्रेम करून देण्याची सुरुवात शहर पोलिस आयुक्तालयाने केली असून, त्याच्या पहिल्याच कार्यक्रमादरम्यान पोलिस आयुक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कौटुंबिक पातळीवर मनुष्य समाधानी असेल तर तो पूर्ण क्षमतेने आपल्या कामाला न्याय देतो. विशेषत: आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब महत्त्वाची ठरते. पोलिसांना कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर काम करताना अनेकदा स्ट्रेसला सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळ्या आणि तेवढ्याच जटिल समस्या निर्माण होतात. अशा वेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांना समोर ठेवून विचार करा. त्यांचा आनंद, गरजा या तुमच्यापासून सुरू होतात. एक कुटुंब म्हणून तुम्ही जशी कुटुंबातील सदस्यांची काळजी घेता, तसेच तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेला व्यक्तीही कोणत्या तरी कुटुंबातील सदस्य असतो, याची जाणीव सदैव असू द्या, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वैयक्तिक फोटो काढून त्यांची फ्रेम तयार करून अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. सुमारे ४० अधिकाऱ्यांना फोटो फ्रेम्स देण्यात आल्या. पुढील टप्प्यात उर्वरित अधिकाऱ्यांना अशा फोटो फ्रेम्स देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड अभियांत्रिकेचे अभिनव पेटंट फाईल चांदवड अभियांत्रिकीच्या प्रकल्पाला पेटंट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अचानक भूस्खलन झाले तर जीवितहानी टाळता येऊ शकते व तातडीने मदत करून पीडितांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकते हे चांदवड येथील एसएनबीजे संस्थेच्या जैन महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहे. या संशोधन प्रकल्पाचे पुणे विद्यापीठ पातळीवर कौतुक झाले असून, या प्रकल्पाचे पेटंटसुद्धा चांदवड महाविद्यालयातील या गुणवंताना मिळाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या चांदवडच्या श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यापीठ पातळीवर संशोधनात आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. या महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे पहिले अभिनव विषयावरील प्रकल्पाचे पेटंट महाविद्यालयाने फाइल केले आहे. विद्यापीठ निर्धारीत अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थीवर्गात रिसर्च अॅप्टिट्यूड रुजविण्यात महाविद्यालय यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे पहिले पेटंट फाइल झाल्याचे स्थापत्य विभागप्रमुख प्रा. वाय. एल. भिरुड यांनी सांगितले. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी मधुर गुजराथी, अंकिता चोभारकर, बबलू जगताप, समिक्षा घोगरे, प्रणाली हांडगे या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील भूस्खलनसारख्या प्रकारावर उपाययोजना म्हणून 'स्लाइडिंग सेगमेंटल रिटेनिंग वॉल' या प्रकल्पाचे पेटंट फाइल केले आहे. तसेच हा प्रकल्प भूस्खलन झाल्यानंतर होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपयुक्त आहे. हे संशोधन प्रा. वाय. एल. भिरुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी त्यांना प्रा. आर. एम. सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सहमानद सचिव व समन्वयक झुंबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

संशोधनपर प्रकल्पामुळे पुणे विद्यापीठात महाविद्यालयाची मान उंचावली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाद्वारे पहिले पेटंट फाइल केले हे कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.

- अजित सुराणा, पदाधिकारी, एसएनजेबी चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सटाणा नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक मुन्ना शेख यांनी तिसऱ्या दिवशी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. सटाण्याचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कार्यालयांच्या नूतनीकरणाच्या खर्चाची माहिती मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेख उपोषणाला बसले होते.

समिती सभागृह, नगराध्यक्ष दालन, मुख्याधिकारी दालन नूतनीकरणाबाबतच्या माहिती अधिकारात केलेल्या मागणीबाबत ५ फेब्रुवारी २०१८ रोजी चार वाजेच्या अपील सुनावणीच्या वेळी आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात येईल तसेच, जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे केलेल्या तक्रारीअर्जाबाबतचा नगरपरिषद कार्यालयाकडील चौकशीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे लेखी आश्वासन पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी शेख यांना दिल्याने त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.

यावेळी मुख्याधिकारी हेमलता डगळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, नगरसेवक दिनकर सोनवणे, व्यापारी आघाडीचे बिंदूशेठ शर्मा, नगरसेवक काका सोनवणे, राहुल पाटील, साहेबराव सोनवणे, फईम शेख, धर्माआबा सोनवणे, महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगीत कारंजाला अवकळा

$
0
0

देखभाल व्यवस्थित नसल्याने दुरवस्था; पर्यटकांचा हिरमोड

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाघाटाचे सौंदर्य खुलविण्यासाठी होळकर पूलावरून गोदापात्रात सोडण्यात आलेला रंगीत कारंजा सध्या आचके देत असल्याच्या स्थितीत दिसतोय. देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे या पुलावरील कारंजे काही सुरू तर काही बंद अवस्थेत आहेत. त्यांच्यावरील रंगीत दिव्यांच्या झगमगाट मंदावला असून, कुठे तरी एखादाच रंगीत दिवा मिणमिणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र या पूलावर दिसत असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गोदावरीचे सौंदर्य खुलविण्यासाठी बसविण्यात आलेल्या या कारंजामुळे होळकर पूलावरून पडणारे पाणी आणि त्यावर विविध रंगांच्या दिव्यांच्या पडणारा प्रकाश यांच्यामुळे कारंजासह गांधी तलावात त्याचे पडणारे प्रतिबिंब हे या भागातील आकर्षण ठरले होते.

पावसाळ्यात पूराच्या काळात या पूलावरील बसविण्यात आलेला हा कारंजा दुर्लक्षित झाला. त्यानंतर या कारंजासाठी गोदावरी पात्रात बसविण्यात आलेल्या जलपरींची दुरुस्ती करण्यात आली. ज्या पाईपमधून पाण्याचा प्रवाह कारंजाकडे जातो, ते पाइपही दुरुस्त करण्यात आले. गांधी तलावाच्या भागाकडे असलेली जलपरी दुरुस्त करण्यासाठी गांधीतलाव पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता. तेथील जलपरी बसविण्यात आल्यानंतर हे कारंजे सुरू करण्यात आले.

पंचवटीकडील बाजूचे कारंजे सुरू झाले मात्र रविवार कारंजाकडील कारंजे अर्ध्याच भागात सुरू आहेत. त्यात ज्या भागात कारंजे सुरू होते, तेथे रंगीत दिवे बंद होते आणि ज्या भागात दिवे सुरू होते तेथे कारंजातून पाणी पडत नव्हते अशी स्थिती आहे. आज नाही तर उद्या हे कारंजे सुरळीत सुरू होतील, असे वाटत असताना सध्या कारंजातून पंचवटीकडील बाजूस अत्यंत वेगाने पाणी पडत आहे. तर रविवार कारंजाच्या बाजूचे कारंजे बंद पडले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली दिसून येते. कुठला तरी एखादा दुसरा दिवा मिणमिण करीत असल्याचे दिसत असल्यामुळे सौंदर्य वाढविणारा हा कारंजा जणू काही शेवटचे आचके देत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जनतेच्या पैशातून उभारण्यात येणारे प्रकल्पांचा सुरवातीला मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, असे प्रकल्पांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे हे प्रकल्प बंद पडतात. होळकरपूलावरील रंगीत कारंजाचीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कारंज्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

किशोरभाई पटेल, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींनी गिरवले निर्भयतेचे धडे

$
0
0

मसगा महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियानांतर्गत कार्यशाळा झाली. यात कॉलेज विद्यार्थिनींनी आत्मरक्षणाचे धडे गिरवले. प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक पूनम राऊत व उपप्राचार्य बी. ए. अहिरे होते.

या कार्यशाळेत १०० युवतींनी सहभाग घेतला. प्रथम सत्रात कराटे प्रशिक्षक विनोद जाधव यांनी प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले. अली अजगर यांनी १० मी. रायफल शूटिंगचे प्रात्यक्षिक करून घेतले. याबरोबर कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. युवतींमध्ये सर्वोत्कृष्ट रायफल शूटिंग प्राविण्य मिळवलेल्या सूचिता बच्छाव, अलकुमा कौसर व योगिता बच्छाव यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. विषारी, बिनविषारी सर्पांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य आरती महाजन, एस. बी. पाटील, डॉ. वसईत, प्राचार्य आव्हाढ, अकबर आदी उपस्थित होते. यू. व्ही. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. इंदिराताई हिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पोलिस उपनिरीक्षक पूनम राउत, नितीन खैरनार, यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस ग्राहकांची आर्थिक पिळवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती गॅस सिलिंडरची घरपोच देताना डिलीव्हरी बॉयकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे. निर्धारित किमतीपेक्षा केवळ पोच देण्यासाठी प्रतिसिलिंडर तब्बल ३० ते ४० रुपये आकारले जात असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात पुरवठा विभाग ढिम्म असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

शहरात अनेक गॅस वितरक आहेत त्यांनी आपल्याकडील गॅस वितरणाची जबाबदारी मुलांकडे सोपवली आहे. या मुलांकडून पावतीच्या रकमेपेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून वसूल केले जात आहेत. सिडको, नाशिकरोडमध्ये हा प्रकार सर्रास सुरू असून, याबाबत वितरकांकडे तक्रार केली असता ठीक आहे, बघून घेतो अशी उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवणूक केली जात आहे. सिडको येथील मयूर खैरनार यांनी वितरकांकडे तक्रार करतो असे डिलीव्हरी बॉयला सांगितले. आमचे कुणीही काहीही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे डिलिव्हरी बॉयकडून उत्तर देण्यात आले. यावर खैरनार यांनी आम्ही जास्त पैसे घेऊन डिलीव्हरी करतो, असे लिहून दे, असे डिलीव्हरीबॉयला सांगितले असता त्याने तसे लिहूनही दिले. पावतीपेक्षा जास्त पैसे न दिल्यास सिलिंडर परत नेण्याची धमकी दिली जात आहे. परिसरातील काही ग्राहकांनी पैसे दिले नाही तर त्यांचे सिलिंडर परस्पर विकल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिलीव्हरी बॉयच्या या वर्तणुकीने अनेक ग्राहक त्रस्त असून, कंपनीचे अधिकारी व पुरवठा अधिकारी मात्र या प्रकरणावर हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

मी पावतीवर जेवढी रक्कम आहे तेवढी देण्यास तयार होतो; परंतु मला तेवढ्या रकमेवर सिलिंडर देण्यास डिलीव्हरी बॉयकडून नकार देण्यात आला. पावतीच्या तीस रुपये जास्त रक्कम देत असाल तरच सिलिंडर दिले जाईल, असे सांगण्यात आले. असाच प्रकार आमच्या संपूर्ण विभागात सुरू आहे.

- मयूरकुमार खैरनार, विनयनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची प्रेमप्रकणातून आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

मूळचा मालेगाव तालुक्यातील मोरदर टिप्पे येथील भरत तानाजी ठुमरे याने अशोकनगर भागातील रामेश्वर संकुलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. सातपूर पोलिसांनी भरतचे मोबाइल तपासल्यावर नेमके कारण उघडकीस आले. भरतचे तीन वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होते. त्यांच्या विवाहाला कुटुंबीयांचीही परवानगी होती. मात्र, प्रेयसीनेच नकार दिल्याने भरतला नैराश्याने ग्रासले. नाशिकमध्ये मित्राच्या घरी त्याने आत्महत्या केली. मला प्रेयसीने धोका दिल्याचे भरतने मोबाइलवर पाठविलेल्या एका मेसेजमध्ये नमूद केलेले होते, असे पोलिसांनी सांगितले. हवालदार शेजवळ तपास करीत आहेत.

अपघातात एक जखमी

सिन्नर फाटा : नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथील फुलेनगर परिसरात रस्ता ओलांडताना भरधाव कारने धडक दिल्याने अर्जुन रमेश पवार (वय २५, रा. पळसे) याला गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. अर्जुन दुचाकी (एमएच १७/जी ७५४१) महामार्गाच्या कडेला उभी करून पेट्रोल आणण्यासाठी महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच १२/एनजे ३५३० या क्रमांकाच्या कारने त्याला जोरात धडक दिली. अपघातानंतर कारचालकाने पोबारा केला. स्थानिक नागरिकांनी जखमी अर्जुनला पालिकेच्या बिटको रुग्णालयात व नंतर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संबंधित कारचालकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीट-धोबी समाजाचे प्रश्न सोडवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संत गाडगेबाबांनी स्वच्छतेबाबत समर्पित आयुष्य घालविले. बाबांचे कार्य आदर्शवत असून, परीट समाजाचे आरक्षण व इतर राज्य व दिल्ली पातळीवरचे प्रलंबित प्रश्न आगामी काळात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले.

महाराष्ट्र परीट (धोबी) समाजाचे अकरावे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. एकनाथ बोरसे अध्यक्षस्थानी होते. माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्याम रजक, मध्य प्रदेशचे खासदार अमित खत्री, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील परीट (धोबी) समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. याशिवाय संघटन, समाजविकास याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी या अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन श्याम रजक यांच्या हस्ते झाले. उद्योजक राजेंद्र यशवंतराव खैरनार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. किसन जोर्वेकर म्हणाले, की नाशिकच्या पवित्र भूमीत हे अधिवेशन होत असून, राज्यातील परीट-धोबी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरेल. माजी ऊर्जामंत्री श्याम रजक म्हणाले, की या समाजाला दिशा देण्याचे काम अधिवेशन करणार आहे. महाराष्ट्रातील परीट-धोबी समाजाला इतर राज्यांप्रमाणे आरक्षण मिळवून देण्यासाठी देशस्तरावर मी प्रयत्नशील राहीन. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की समाजाचे अधिवेशन होणे हे त्या समाजाच्या विकासासाठी गरजेचे आहे. परीट समाजाने व्यवसाय करताना नवीन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. परीट धोबी समाजाच्या प्रश्नांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार हिरे यांनीही शुभेच्छा देत समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी तुकाराम दळवी, खासदार अमित खत्री आदींची भाषणे झाली. एकनाथ बोरसे यांना स्व. अशोक राऊत स्मरणार्थ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हल्लाबोल मोर्चा’साठी येवल्यात बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केलेल्या 'हल्लाबोल मोर्चा'चे १६ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यात आगमन होत आहे. जिल्ह्यात येताना या मोर्चाचे पहिले ठिकाण असणार आहे ते येवला. या मोर्चात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, माजीमंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने येवल्यात होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनाच्या दृष्टीने शनिवारी (दि.३) येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

येवल्यात येणारा 'हल्लाबोल मोर्चा' आणि त्यातील होणारी सभा लक्षात घेता शनिवारी येवला शहरातील आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य अॅड. माणिकभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, भागीनाथ पगारे, संजय बनकर, मोहन शेलार, भागुनाथ उशीर, भागवत सोनवणे, कारभारी लभडे, शामाताई श्रीश्रीमाळ, हरीभाऊ जगताप यांनी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. १६ फेब्रुवारीला येवला शहरातील शनिपटांगण येथे सायंकाळी सहा वाजता या हल्लाबोल मोर्चा अंतर्गत जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी अॅड. माणिकराव शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनर लूट बेतली जिवावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जऊळके शिवारातील सय्यद पिंप्री ते दहावा मैल या रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास फिल्मी स्टाइल लुटीचा प्रयत्न झाला. थेट चालत्या कंटेनरवर चढून लुटीचा प्रयत्न करणारा संशयित पडल्याने चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले, तर दुसऱ्याला अटक केली.

श्याम आत्माराम सहाणे (वय १८, रा. ओढा, तालुका नाशिक) असे कंटनेरखाली मृत्यू झालेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी श्रीकांत बाळासाहेब हांडे (वय २२, मूळ रा. सांगली, हल्ली कळंबोली, तालुका पनवेल) या कंटेनरचालकाने फिर्याद दिली आहे. कंटेनरचालक हांडे शनिवारी एक्स्पोर्ट द्राक्ष भरण्यासाठी दिंडोरी तालुक्यात आला होता. एमएच ४६/एएफ ७४७८ या कंटेनरमध्ये द्राक्ष भरून हांडे जऊळके शिवारातील सय्यद पिंप्री ते दहावा मैल या रस्त्यावरून जात असताना एमएच १५/ईके ६२९४ या दुचाकीवर सहाणे हा राजेंद्र उर्फ राजू भागूजी निंबेकर (वय २५, रा, तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) आणि त्याच्या साथीदारासमवेत आला. या तिघांनी ट्रकलुटीच्या इराद्याने कंटेनरला दुचाकी आडवी घालण्याचा प्रयत्न करून कंटेनर थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालक हांडेला लुटीची कल्पना आल्याने त्याने कंटेनर उभा केला नाही. यामुळे संतापलेल्या तिघांपैकी एकाने मोठा दगड फेकून कंटेनरची काच फोडली. मात्र, तरीही कंटेनर थांबला नाही. अखेर संशयितांपैकी अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत होता. त्याच्यामागे निंबेकर, तर सर्वांत मागे सहाणे बसलेला होता. त्याने चालत्या कंटनेरला पकडून केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने चालकाला शिवीगाळही केली. मात्र, या प्रयत्नात त्याचा तोल गेला अन् तो कंटेनरच्या चाकाखाली सापडला. कंटेनर अंगावरून गेल्याने सहाणेचा जागीच मृत्यू झाला, तर कंटेनरचालक महामार्गाच्या दिशेने पुढे गेला. महामार्गावर दिंडोरी पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन पाहिल्यानंतर चालक हांडेने कंटेनर थांबवून सर्व प्रकार सांगितला. यानंतर हांडेला घेऊन पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिथे संशयितही उभे होते. हांडेच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन संशयिताची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून, निंबेकर पोलिस कोठडीत आहे. निंबेकरविरोधात यापूर्वी आडगावसह इतर काही पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आधारतीर्थ’चा महिला व बालकल्याणला ठेंगा!

$
0
0

शासकीय मान्यतेशिवाय आधारतीर्थ अनाथालयाचा कारभार


arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : आधारतीर्थ या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या अनाथालयाला महिला व बालकल्याण विभागासह दुसऱ्या कोणत्याही विभागाची मान्यताच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या चौकशीत यावर शिक्कामोर्तब झाले. याबाबत अवगत असूनही महिला व बाल कल्याण विभाग चुप्पी साधून आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आसारा देण्याचे काम आधारतीर्थकडून होते, असा दावा संस्थाचालकांकडून केला जातो. या ठिकाणी जवळपास दीडशेपेक्षा अधिक मुले-मुली राहतात. नियमानुसार ० ते १८ वयोगटातील कोणत्याही मुलाचे संस्थांना संगोपन करायचे असल्यास त्यास महिला व बाल कल्याण विभाग किंवा समाजकल्याण तसेच सक्षम विभागाची मंजुरी आवश्यक असते. मात्र, तशी कोणतीही मान्यता आधारतीर्थकडे नाही. काही तक्रारींच्या अनुषंगाने जवळपास १५ दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी तसेच समिती सदस्यांनी अचानक तेथे पाहणी केली. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या.

महिला व बाल कल्याण विभागाच्या मान्यतेची आवश्यकता नसून, या संस्थेला समाज कल्याण विभागाची लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे संस्थाचालक त्र्यंबकराज गायकवाड यांनी सांगितले आहे. वास्तविक समाज कल्याण विभाग फक्त अनुसूचित जाती तसेच जमाती यासंबंधित काम करतो. तर, आश्रम शाळेसाठी आदिवासी हा निकष आहे. उर्वरीत सर्व समाजातील मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागाचीच मान्यता असते. मुलांची काळजी व संरक्षणासंदर्भात असलेल्या कायद्यातच हे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहवालाकडे लक्ष

याबाबत सूत्रांनी सांगितले, की यापूर्वी महिला व बाल कल्याण विभागाकडून गायकवाड यांच्यासह आधारतीर्थची अनेकदा चौकशी झाली. मात्र, पुढे काहीच होत नाही. अगदी विभागीय स्तरावरून झालेल्या चौकशीलाही 'आधारतीर्थ'कडून दाद देण्यात आली नाही. १५ दिवसांपूर्वी झालेल्या चौकशीचा अहवाल पुणे येथील आयुक्तालय कार्यालयात पाठवण्यात आला असून, तिथे काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आधारतीर्थ ही संस्था मागील १० ते १२ वर्षांपासून सुरू असून, संस्थेला मदतीचा आर्थिक ओघ मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, कोठे नोंदणीच नसल्याने मुलांचे पुनर्वसन कोठे आणि कसे होते हे स्पष्ट होत नाही.

अनाथालयातील बालकांना पालक!

संस्थेकडे मुळातच मान्यता नसून, ती घेण्यासाठी प्रयत्न झाल्याचे पुरावेही यावेळी समोर आले नाहीत. नियमानुसार एकाच ठिकाणी मुले तसेच मुलींना ठेवता येत नाही. तसेच नोंद असलेली जवळपास ३० ते ३५ मुले संस्थेत आढळून आली नाही. याबाबत चौकशी केली असता ही मुले गावी गेली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कोणतेही दप्तरही समोर आणण्यात आले नाही. विशेष म्हणजे अनाथालय म्हणून दाखविलेल्या या ठिकाणी राहणाऱ्या मुलांना पालकही आहेत.

मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांची भेट!

मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी आधारतीर्थला भेट दिली होती. मुख्यमंत्र्याच्या भेटीतच गायकवाड यांनी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला होता. कायद्याचा कोणताही आधार असल्याचे पुरावे संस्थेकडून आजवर समोर आलेले नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री तसेच सहकारी मंत्री भेट देत असतील तर अधिकारी कारवाई करण्याची धमक दाखवतील काय, असा सवाल यानिमित्ताने चर्चिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचित्र अपघातात तीन जण मृत्युमुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील साक्री आणि सटाणा तालुक्याच्या सीमेवर तीन दुचाकींच्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जायखेडा व पिंपळेनर पोलिस ठाण्याच्या हद्दीवरून पोलिसांनी वाद निर्माण केल्याने या अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक मदत मिळण्यास विलंब झाल्याने एकास प्राण गमवावा लागला. दरम्यान, उशिरापर्यंत या अपघातग्रस्त व्यक्तींची नावे कळू शकली नाहीत.

जायखेडा पेालिसांशी संपर्क साधला असता, पिंपळनेर व जायखेडा पोलिस ठाण्याच्या अगदीच सीमेरेषेवर हा अपघात घडला. यात दोघे जागीच मृत्युमुखी पडले. तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. अपघातातील तीनही दुचाकी या साक्री तालुक्यातील उंभर्टी व पिंपळनेर येथील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस थांब्याच्या जागेचा कंपनीलाच पडला ‘विसर’

$
0
0

ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापनाची चूक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाला पळसे येथील बस थांब्यासाठी निवारा शेड उभे करण्याच्या जागेचाच विसर पडल्याचे समोर आले आहे. या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाने नियोजित ठिकाण सोडून भलतीकडेच बस थांबा निवारा शेड उभे करण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक शेतकऱ्यांनी उधळून लावला आहे.

सिन्नर ते नाशिकरोडपैकी सिन्नर ते पळसेदरम्यान नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या महामार्गालगतच्या गावांच्या बस थांब्यावर नवीन निवारा शेड उभे करण्याचे काम चेतक एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. पळसे येथे किमी. १९७/५०० येथे नियोजित बस थांबा असताना कंपनीने पळसे येथील सुधाकर गायधनी यांच्या गट नंबर ११४ आणि १४१८ मधील शेताच्या कडेलाच बस थांबा निश्चित करून नवीन निवारा शेड उभारण्याच्या कामाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या दोन्ही बस थांब्यांपैकी एक थांबा पळसे गावापासून चक्क एक किलोमीटर दूर आहे.

ठेकेदार कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाला नियोजित बस थांब्याच्या जागेचा विसर पडल्याचे स्थानिक शेतकरी सुधाकर गायधनी यांनी तत्काळ लक्षात आणून दिले. त्यानंतर ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही आपली 'चूक' लक्षात आली. तेव्हा या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब काढता पाय घेतला.

मूळ जागामालकांना मोबदला

पळसे येथे पूर्वीपासूनचा बस थांबा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीलगत होता त्या जमीनमालकांना नव्याने बस थांबा उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा सरकारकडून लाखो रुपयांचा मोबदलाही मिळालेला आहे. मात्र, असे असतानाही ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र भलतीकडेच बस थांब्याचे निवारा शेड उभे करण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक शेतकऱ्यांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नियोजित बस थांबा शेड माझ्या शेताच्या कडेला नसतानाही कंपनीने माझ्या शेताच्या कडेला बस थांबा निवारा शेड उभारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कामास विरोध करताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला.
-सुधाकर गायधनी, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे हागणदारीमुक्त जाहीर

$
0
0

केंद्रीय समितीचे पत्र महापालिकेला प्राप्त

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेला केंद्रीय समितीने हागणदारीमुक्त शहराचा दर्जा दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. हे धुळेकर नागरिकांचा सहभाग आणि योगदानामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन महापौर कल्पना महाले यांनी केले. तसेच स्वच्छ भारत अभियानासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

केंद्र सरकारच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली (क्युसीआय) मार्फत शहराला हागणदारीमुक्त दर्जा टिकविल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल शनिवारी (दि. ३) महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते आयुक्त सुधाकर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. गेल्यावर्षी दि. २१ जुलैला केंद्रीय समितीने पाहणी करून हागणदारीमुक्त शहराचा दर्जा जाहीर करीत प्रमाणपत्र दिले होते. त्या प्रमाणपत्राची मुदत सहा महिने अर्थात दि.२१ जानेवारीपर्यंत असल्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये क्युसीआयकडून दि. २२ जानेवारी रोजी शहरात पुनर्तपासणी करण्यात आली. यामध्ये पुन्हा एकदा शहर हागणदारीमुक्त असल्याचे प्रमाणित करण्यात आले असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र महापालिकेस प्राप्त झालेले आहे.

हा दर्जा असाच टिकविण्यासाठी धुळेकरांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. महापौर दालनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त अभिषेक कदम, अनूप डुरे, मुख्य लेखापरीक्षक राजू सोळुंखे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


शहरातील नागरिकांच्या सहकार्याशिवाय विकासात्मक कामाला गती नागरिकांनी हागणदारीमुक्तीसाठी दाखविलेले सहकार्य मोलाचे आहे. तसेच शहर हागणदारीमुक्त व स्वच्छतेसाठी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार लागला आहे.
-सुधाकर देखमुख, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्था नामांतर: ठेवीदारांच्या पैशांवर संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेने स्थलांतर व नामांतरानंतर ठेवीदारांना तुटपुंजा परतावा देत असून, त्या विरोधात न्याय मागण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पैसे देणेही बंद करण्यात आल्याची तक्रार ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी केली आहे. ठेवीदारांचे गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी केली आहे.

या प्रकरणी वसंत गोविंद टिकेकर या निवृत्त शिक्षकाने आपली व्यथा मांडली आहे. केंद्रीय विद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले टिकेकर यांच्या पत्नी मंगला यांनी विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेत जवळपास दोन लाख १४ हजार रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर टिकेकर यांना पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी संचालकांकडे पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे टिकेकर यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नाही. याच दरम्यान विद्या महिला पतसंस्थेचे नाव 'नंदिनी' असे करण्यात आले. उपनगर परिरसरातील कार्यालय पंचवटीतील हिरावाडी येथे सुरू झाले. या ठिकाणी टिकेकर यांनी पैशांबाबत विचारणा केली असता त्यांना पाच हजार रुपये महिनाभरानंतर परतावा देण्यास सुरुवात झाली. आपण एकरकमी गुंतवलेली रक्कम तुटपुंजा स्वरूपात मिळत असल्याने टिकेकर यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. आता बँकेने ते पाच हजार रुपये देणेही बंद केले. टिकेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या महिला पतसंस्थेत अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या ठेवी आहेत. संचालकांनी नामांतर करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला असून, ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. दोषी व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी टिकेकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images