Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लॉन्सचा ‘बँडबाजा’...

$
0
0

रिपोर्ताज

नाशिकमध्ये मागील दहा-बारा वर्षांत उभे राहिलेले बहुतांश लॉन्स आणि मंगल कार्यालये अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आजमितीस अशा १६६ आस्थापना नियमबाह्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, हे सर्व लॉन्स एका रात्रीत उभे राहिलेले नाहीत, हेही तितकेच खरे आहे. या लॉन्स व मंगल कार्यालयांच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांची सोय होऊन तेथे हजारो विवाह पार पडले असले, तरी महापालिकेचा मोठा महसूलही बुडाला आहे. या सर्व आस्थापनांचे अर्थकारण, मजुरांपासून ते अगदी केटरर्सपर्यंत अशा छोट्या-मोठ्या घटकांची गुजराण, संभाव्य कारवाईमुळे मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका, महापालिकेची भूमिका याचा रिपोर्ताजच्या माध्यमातून घेतलेला वेध...
--
महापालिकेने शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या १६६ लॉन्स व मंगल कार्यालयांना नोटिसा बजावल्या असून, नियमितीकरणासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या जवळपास दोनशे लॉन्स आणि मंगल कार्यालयांद्वारे वर्षाला दोनशे कोटींची आर्थिक उलाढाल होत असून, या व्यवसायातून जवळपास वर्षाला ६० ते ७० हजार रोजगार उपलब्ध होतात. त्यात बँड, घोडा, गुरुजी, डेकोरेटरर्स, केटरर्स, कारागीर आदींचा समावेश होतो. सोबतच शेतकऱ्यांना लॉन्सच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायही उपलब्ध होत असल्याने शहर आणि आजूबाजूच्या परिसरात लॉन्स आणि मंगल कार्यालये फोफावली आहेत. परंतु, या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे नवीन विकास नियंत्रण नियमावलीत लॉन्स आणि मंगल कार्यालयांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्यात अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना आता व्यवसाय करण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. महापालिकेच्या कारवाईने व्यवसायावर संकट ओढावले, तर मोठा रोजगार आणि आर्थिक उलाढालीवर त्याचे विपरित परिणाम होणार आहेत. त्यामुळे यावर योग्य तोडगा काढण्याची मागणी लॉन्सचालकांसह संलग्न व्यावसायिकांनी केली आहे.

लग्नाच्या रेशीमगाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे म्हटले जाते. सर्वांत पवित्र बंधन म्हणून याकडे पाहिले जाते. पूर्वी विवाह समारंभ दिमाखदार न करता घरासमोर अंगणात किंवा मंदिरात साधेपणाने करण्याची पद्धत होती. मुलगी ज्या घराच्या अंगणात खेळली, बागडली तेथेच तिचे लग्न व्हावे, तेथून तिला विधीपूर्वक वराकडे सुपूर्द करणे अशी ती प्रथा पार पडत असे. परंतु, कालांतराने यात मानमरातब, प्रसिद्धी, पैशाचा देखावा, डामडौल या गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे मंदिरात किंवा घराच्या अंगणात लावलेले लग्न आता काही लाखांच्या घरात जाऊन पोहोचते. यात वधुपित्याचे कंबरडेही मोडते. परंतु, अनेकदा त्यांच्याकडून हौसेच्या नावाखाली पैशाची उधळपट्टीही केली जाते. सध्या मंगल कार्यालयांचा खर्च लाखोंची मर्यादा ओलांडत आहे. लॉन्स, मंगल कार्यालयात लग्न म्हणजे वधुपित्याच्या कपाळावर आठ्या पडत आहेत. अगदी लग्न समारंभाच्या बोर्डपासून तर बिदाईपर्यंत सारेच मंगल कार्यालयांच्या अखत्यारित गेल्याने पैशाचा पुरता पाऊसच पाडायला लागतो आणि त्यामुळे 'घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून' या म्हणीचा प्रत्यय वधुपिता घेताना दिसतो. विवाह समारंभांचा डोळे दिपविणारा खर्च पाहता लग्न हे दोन जिवांचे मीलन आहे वगैरे गोष्टी बासनात गुंडाळून ठेवाव्यात, अशीच स्थिती आहे.
लोकांची ही हौस पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉन्स व मंगल कार्यालयांचे पेव फुटले आहे. त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळाला असून, त्यात बँड, घोडा, गुरूजी, डेकोरेटर्स, केटरर्स, कारागीर आदींचाही व्यवसाय वाढीस लागला आहे. त्यामुळे या व्यवसायाची व्याप्ती मोठी असून, एका लॉन्स व मंगल कार्यालयातील एका लग्नामुळे जवळपास तीनशे ते चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यातून साधारणात २ ते ५ लाखांपर्यंतचा खर्च होऊन हा पैसा चलनात येतो. लग्नकार्यासोबतच विविध बैठका, सामाजिक कार्य, सभा-समारंभ यासाठीसुद्धा ही मंगल कार्यालये व लॉन्सचा वापर होतो. त्यामुळे या व्यवसायने नाशिकमध्ये मोठे स्वरूप धारण केले असून, यातून वर्षाला थेट दोनशे कोटींची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या इतर घटकांची उलाढालही जवळपास शंभर कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीडशे तो दोनशे कोटींच्या घरात पोहोचते. जवळपास ६० ते ७० हजार कुटुंबांना यातून रोजगार मिळत असल्याचे चित्र आहे. परंतु, या व्यवसायाला आता नियमांचा फटका बसला असून, महापालिकेने या व्यवसायाविरोधात थेट कारवाईचे अस्र उगारले आहे. त्यामुळे लॉन्स व जागामालकांसह त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांवर संकट ओढावले आहे.
--
महापालिकेच्या नोटिसा
महापालिका क्षेत्रात लॉन्स व मंगल कार्यालयांची परवानगी घेण्यासाठी विशेष नियमावली नवीन विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी ग्रीन झोनमध्ये जमीन एनए केल्यानंतर शेतकऱ्यांकडून शेतीपूरक व्यवसायाच्या नावाने लॉन्स सुरू करण्यात आल्या. परंतु, कालांतराने शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने शहराबाहेर असलेल्या लॉन्स व मंगल कार्यालये शहराचा भाग झाली आहेत. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यातील आर्थिक उलाढाल पाहता आता शहर व आजूबाजूच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर लॉन्स आणि मंगल कार्यालयांचे पेव फुटले असून, बहुसंख्य लॉन्स व मंगल कार्यालयांच्या मालकांनी यासाठीचे सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहराच्या बाहेर जाणाऱ्या रोडवर जागामालकांनी मंगल कार्यालये व लॉन्स सुरू केले आहेत. त्यातील बहुतांश महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी न घेताच सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेडे कोणतेही अर्जफाटा न करताच अनधिकृतपणे सर्रास व्यवसाय सुरू आहेत. अनेक लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे बांधकाम केले गेले असून, त्याबाबतच्या तक्रारी नगररचना विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सर्व लॉन्स व मंगल कार्यालयांचे विभागनिहाय सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरात तब्बल १६६ लॉन्स व मंगल कार्यालये अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले. त्यात सर्वाधिक ६५ एवढी संख्या पंचवटीत आहे. त्यापाठोपाठ नाशिकरोड येथील २४ आणि सिडकोतील १९ लॉन्स व मंगल कार्यालयांचा समावेश आहे. सातपूरमध्ये सर्वांत कमी अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. नगररचना विभागाने आता या मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना नोटिसा बजावल्या असून, मुदतीत त्यांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. वेळेत कारवाई केली नाही, तर अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पोलिस बंदोबस्तात बुलडोझर चालविण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे.

--

विभागनिहाय आकडेवारी

विभाग संख्या

सातपूर ०६
नाशिक टीपी स्कीम-२ १५
नवीन नाशिक १९
पंचवटी ६५
नाशिक पूर्व १४
नाशिक गावठाण ०९
पाथर्डी परिसर १४
नाशिकरोड २४
एकूण १६६

--

महापालिकेला मिळणार ३५ कोटी
शहरात सध्या अनधिकृतपणे सुरू असलेल्या १६६ लॉन्स व मंगल कार्यालयांमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहराचा बराचसा भाग पिवळ्या पट्ट्यात आला असून, व्यावसायिक झोन झाला आहे. त्यामुळे या लॉन्सधारकांना लॉन्स व मंगल कार्यालये नियमित करण्यासाठी व्यावसायिक दराने दंडाची आकारणी केली जाणार आहे. सध्याच्या दरानुसार एका लॉन्स किंवा मंगल कार्यालयाला परवानगीसाठी जागेनुसार १५ ते ५० लाखांपर्यंतची रक्कम महापालिकेला मोजावी लागणार आहे. त्यात विकास शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क त्यांना महापालिकेला भरावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत साधारणात ३५ कोटींचा भरणा या लॉन्स, तसेच मंगल कार्यालयांच्या नियमितीकरणातून होणार आहे. सोबतच नियमितीकरणानंतर घरपट्टी व पाणीपट्टीतून महापालिकेला दर वर्षी मोठा महसूलही मिळणार आहे. त्यामुळे या लॉन्स व मंगल कार्यालयांच्या नियमितीकरणाने महापालिकेचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळेच महापालिकेने या व्यावसायिकांना नोटिसा काढल्या असून, नियमितीकरणासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून या लॉन्स व कार्यालयांवर बुलडोझर चालविला जाणार आहे.

अशी असेल कारवाईची प्रक्रिया

नगररचना विभाग
प्रथम नोटीस- १५ दिवस
अंतिम नोटीस- १५ दिवस
अतिक्रमण निर्मूलन विभाग
प्रथम नोटीस-१५ दिवस
अंतिम नोटीस-१५ दिवस
अतिक्रमणधारकाची सुनावणी
पोलिस बंदोबस्तात कारवाई
---
अशी आहे नियमावली

मंगल कार्यालयासाठी जागा- ०.४० हेक्टर
पार्किंगसाठी ४० टक्के जागा
लॉन्ससाठी आवश्यक जागा- ०.८० हेक्टर
पार्किंगसाठी ४० टक्के जागा

---

नियमितीकरणाची प्रक्रिया

परवानगी अर्ज
सातबारा उतारा
एनए दाखला
क्लीअर टायटल
ले-आऊट
आरक्षण नसल्याचे प्रमाणपत्र
ना हरकत दाखला
विकासशुल्क
शेतसारा भरल्याची पावती
नकाशाची छाननी
बांधकाम परवानगी
भोगवटा प्रमाणपत्र
-----

दंड आकारणीचे निकष

अनधिकृत वापराप्रकरणी ५ हजारांचा दंड
विकास शुल्काची दंडासह आकारणी
व्यावसायिक वापर असल्याने दंड अधिक
एका मंगल कार्यालया एकूण दंड १५ ते ५० लाखांपर्यंत
---
अर्थचक्र

शहरातील लॉन्स, मंगल कार्यालये- २००
एका लॉन्सची उलाढाल- २५ ते ५० लाख
व्यवसायाचे दिवस- ५० ते ६०
वर्षाला रोजगार- तीन हजार
लग्नाचे पॅकेज- २ ते ५ लाखांपर्यंत
केटरर्सची संख्या- ५० ते ६०
डेकोरेटर्सची संख्या- ३० ते ४०
वार्षिक उलाढाल- २०० कोटींपर्यंत (अंदाजे)
--
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
शहर व परिसरात असलेल्या सुमारे दोनशे लॉन्स व मंगल कार्यालयांपैकी जवळपास निम्म्या लॉन्स व मंगल कार्यालये शेतीपूरक आहेत. रस्त्याला जमीन लागून असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या भागात थोडेसे बांधकाम करून लॉन्स व मंगल कार्यालय उभारून व्यवसाय सुरू केला. त्यामुळे शेतीत फटका बसला, तरी या लॉन्स व मंगल कार्यालयातून थोडेसे पैसे मिळत असल्याने कुटुंबाचा गाडा व्यवस्थित सुरू होता. पूर्वी हा भाग हिरव्या पट्ट्यात असल्याने त्यांना कोणत्याही परवानगीची गरज वाटली नाही. त्यामुळे शहराच्या बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर लॉन्स सुरू झाले. कालातंराने त्याचे रुपांतर मंगल कार्यालयांमध्ये झाले. परंतु, नव्या विकास आराखड्यात हा भाग आता पिवळ्या पट्ट्यात आल्याने त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होऊन सगळेच नियम लागू झाले आहेत. त्यामुळे शहर विस्ताराचा फटका या शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना आता हे नियमित करण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
--
बड्या हस्तींवरही संक्रांत
शहर व परिसरात असलेल्या लॉन्स व मंगल कार्यालयांमधील आर्थिक उलाढालीमुळे या क्षेत्रात आता बड्या हस्तींनी प्रवेश केला आहे. सुरुवातील शेतकऱ्यांकडून लॉन्स व मंगल कार्यालये शेतीपूरक व्यवसाय म्हणून चालविले जात होती. परंतु, कालातंराने यातील अर्थचक्र बघून राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनी त्यात उडी घेतली. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात काही बड्या हस्तींच्याही अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालये आढळून आली आहेत. त्यात विशेषत: आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे या बड्या हस्तींनी नियम धाब्यावर बसविले असून, आपले कोणी काही करू शकत नाहीत, या आविर्भावात लॉन्स व मंगल कार्यालये सुरू ठेवली आहेत. या क्षेत्रातील बड्या हस्तींमुळे महापालिकेने या लॉन्स व मंगल कार्यालयांपासून अंतर ठेवले होते. परंतु, सर्वेक्षणामुळे आता महापालिकेला कारवाईची प्रक्रिया पूर्णच करावी लागणार असल्याने सगळ्यांवर संक्रांत ओढावली आहे.
--
महापौरांची 'तत्परता'
नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात महापौर रंजना भानसी यांचे पती पोपटराव भानसी यांच्या मालकीचेही मंगल कार्यालय अनधिकृत आढळून आले होते. खुद्द महापौरांच्याच पतीचे मंगल कार्यालय आढळल्याने नगररचना विभागाने तातडीने या मंगल कार्यालयाला अधिकृत करण्यासंदर्भातील विनंती महापौरांकडे केली. शहरात महापौरांच्याच पतीचे अनधिकृत मंगल कार्यालय आढळून आले, तर त्याची वाच्यता होऊन महापौरांसह महापालिकेची बदनामी होईल. त्यामुळे महापौरांनी आपल्या कुटुंबातील मालकीचे असलेले मंगल कार्यालय रीतसर अर्ज करून व शुल्क भरून नियमित करून घेतले आहे. महापौरांसह पंचवटीतल्या एका नगरसेवकांच्या नातेवाइकाच्या नावावर असलेल्या मंगल कार्यालयाचीही अधिकृत कागदोपत्री पूर्तता करून घेण्यात आली आहे. महापौरांच्या कुटुंबातील मंगल कार्यालयाचे नियमितीकरण झाल्यानंतरच नगररचना विभागाने शहरातील अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालयांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे महापौरांची 'तत्परता' फळाला आली असून, नाथ कृपेने सुरू केलेले मंगल कार्यालय वाचले आहे.
--
वाहतूक कोंडी अन् पोलिसांची डोकेदुखी
लग्नसराईत शहरवासीयांसह सर्वांनाचा वाहतूक कोंडीमुळे मन:स्तापाला सामोरे जावे लागते. पोलिसांसाठी तर हा सातत्याने डोकेदुखीचा विषय ठरला आहे. दाट लग्नतिथीत औरंगाबादरोड येथे वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणेही नागरिकांना शिक्षा वाटू लागते. वाहतूक कोंडीमुळे तास-दोन तास नागरिकांना अडकून पडावे लागल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. वाहतूक पोलिसांनाही अशावेळी वाहतूक कोंडीचे नियोजन करणे अवघड होते. या समस्येचा सामना केवळ औरंगाबादरोडवरच करावा लागतो असेही नाही. नाशिकरोड, दिंडोरीरोड, पंचवटी, गंगापूररोड आणि शहरातील अन्य उपनगरांमध्येही नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होऊ लागल्याने मंगल कार्यालये आणि लॉन्सचा विषय पुढे आला आहे.
--
सुरुवातीला शेतीपूरक असलेला हा व्यवसाय आता विस्तारला असून, मोठी इकॉनॉमी यावर अवलंबून आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होत असल्याने महापालिकेने या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. लॉन्स व मंगल कार्यालये अनधिकृत असली, तर ती नियमित करून घेणे आवश्यक आहे. महापालिकेने योग्य तो सकारात्मक तोडगा काढला पाहिजे.
-प्रकाश मते, अध्यक्ष, नाशिक मंगल कार्यालये अँड लॉन्स असोसिएशन
--
अनधिकृतपणे सुरू असलेल्या लॉन्स व मंगल कार्यालय चालकांना महापालिकेने यापूर्वीही नियमितीकरणासाठी नोटिसा दिल्या होत्या. यापूर्वी हिरव्या पट्ट्यात त्यांना नियमितीकरणाची संधी होती. परंतु, आता नवीन विकास आराखड्यात शहराचा बराचसा भाग पिवळ्या पट्ट्यात वर्ग झाला असून, हा भाग आता व्यावसायिक झाला आहे. त्यामुळे लॉन्स व मंगल कार्यालये अधिकृत करण्यासाठी व्यावसायिक दराने आकारणी केली जाणार आहे.
-आकाश बागूल, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग
--
मंगल कार्यालये, लॉन्स यांच्याशी केटरिंग व्यावसायिकांचे अतूट नाते आहे. नाशिकमध्ये केटरिंग असोसिएशन कार्यरत असून, अधिकृत ५० परवानाधारक सदस्य आहेत. लॉन्स, मंगल कार्यालयांवर कारवाई झाल्यास त्याचा विपरित परिणाम केटरिंग आणि त्यावर अवलंबून घटकांवर होईल. रोजगारावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अनधिकृत मंगल कार्यालयांवर कारवाई झाली, तर तेथील ऑर्डर्स घेणे केटरिंग व्यावसायिकांनाही बंद करावे लागेल.
-सागर गाढवे, इच्छामणी केटरर्स
--
लॉन्स आणि मंगल कार्यालये मंडप, डेकोरेशनसह सर्वच व्यवस्था पुरवित असल्याने मंडप व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. पंचवटीसह अनेक भागात मोकळे भूखंड असून, महापालिका ते मंगल कार्यांसाठी भाडेतत्त्वावर द्यायलाही तयार आहे. गेल्या वर्षी शहरात ११ मोठे विवाह झाले होते. तेथे डेकोरेटिव्ह कामही खूप होते. यंदा असे दोनच विवाह झाले. त्यामुळे या व्यवसायावरही ५० टक्क्यांहून अधिक परिणाम झाला. लॉन्सवरही डेकोरेशनच्या ऑर्डर्स असतात. त्यावर कारवाई झाली, तर त्याचा परिणाम डेकोरेशनच्या व्यवसायावरही होऊ शकतो.
-केशव डिंगोरे, संचालक, डिंगोरे डेकोरेटर्स
--
शेतीतून काही मिळत नसल्याने पूरक व्यवसाय म्हणून असंख्य शेतकऱ्यांनी स्वमालकीच्या जागेवर लॉन्स सुरू केले. त्यामुळे त्यास अनधिकृत म्हणणे संयुक्तिक नाही. काही परवानग्या राहिल्या असतील. किराणा व्यापाऱ्यांपासून अनेक व्यावसायिक मंगल कार्यालयांच्या व्यवसायावर अवलंबून आहेत, याचाही विचार व्हायला हवा. संघटनेशी संबंधित सर्व जण दोन दिवसांत बैठक घेऊन या विषयावर चर्चा करणार आहोत. महापालिकेला आमचे पूर्ण सहकार्य आहे. दाट लग्नतिथीत वाहतूक नियोजनासाठी पोलिसांकडे पैसे भरून बंदोबस्त घेण्याचीही आमची तयारी आहे.
-सुनील चोपडा, सचिव, मंगल कार्यालये आणि लॉन्स असोसिएशन
--
नगररचना विभागाने पाठविलेल्या नोटिसा हा त्यांच्या प्रोसेसचा भाग आहे. लॉन्सवर बांधकामापेक्षा गार्डन जास्त आहे. आतापर्यंत सरकारच्या नियमांचे पालन लॉन्सचालकांनी केले आहेत. मिरवणुका बंद केल्या, तसेच डीजे बंद केले. लॉन्स ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे 'एनए'ची मागणी करूनही ते 'एनए' होऊ शकले नाही. आता यलो झोन झाल्यामुळे लॉन्सचालक नियमानुसार दंड भरण्यास तयार आहेत, त्यामुळे लॉन्स अधिकृत होतील.
-संदीप काकड, लक्ष्मी लॉन्स
--
लॉन्ससाठी आवश्यक बांधकाम स्वतःच्या जागेत केलेले आहे, ते काही अतिक्रमण नाही. पार्किंगसाठी पुरेशी जागा सोडलेली आहे. लग्नाचा मुहूर्त एकाच दिवशी एकाच वेळी येत असल्यामुळे कधी-कधी वाहनांची संख्या प्रचंड वाढते. अशावेळी थोडी अडचण होऊ शकते. महापालिकेच्या सर्व करांबरोबर अन्य काही दंडांची रक्कम लॉन्सधारक भरत आलेले आहेत. नियमानुसार परवाने घेण्यास लॉन्सचालकांनी प्रस्ताव टाकलेले आहेत. त्यामुळे सहानुभूतीने विचार व्हायला हवा. एकदमच व्यवसायवर गदा आणून यावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडवू नये.
-सुभाष क्षीरसागर, इंदू लॉन्स व ऑर्चिड्स बॅन्क्वेट्स
--
नाशिकचा विकास आराखडा मंजूर होण्याअगोदरपासून लॉन्स अधिकृत करण्यासाठी आम्ही महापालिकेकडे फाइल जमा केली आहे. 'एनए'साठी प्रयत्न केले असता ग्रीन झोनमुळे तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकले नाही. हा परिसर यलो झोन झाला असल्यामुळे आम्ही लॉन्स अधिकृत करून घेत आहोत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे.
-प्रशांत निमसे, यश लॉन्स
--
लॉन्स अधिकृत करून घेण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. महापालिकेची परवानगी घेऊन त्यांच्या नियमाप्रमाणे करांचा भरणा करण्यात येत आहे. ग्रीन झोनमुळे अडचणी येत असताना जो काही दंड आकारण्यात आला तो भरण्यात आलेला आहे. आता अधिकृत करून घेण्यासाठी ज्या काही अटी-शर्ती आहेत, त्या पूर्ण करून देण्याची आमची तयारी आहे.
-शांताराम दिंडे, रुख्मिणी लॉन्स
--
शहरी भागातच काय, पण ग्रामीण भागातही कोणतेही मंगलकार्य करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे लॉन्स, मंगल कार्यालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही. लॉन्समुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. लॉन्सच्या जागेत विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आलेली असल्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासही मोठा हातभार लावला जात आहे.
-भास्कर पवार, गोदावरी लॉन्स
--
(संकलन : विनोद पाटील, प्रवीण बिडवे, रामनाथ माळोदे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहस्त्रक मतदारांचा उद्या सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि. १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या आणि नुकतेच मतदार म्हणून हक्क प्राप्त झालेल्या मतदारांना 'सहस्त्रक मतदार' असे संबोधण्यात येते. अशा काही मतदारांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला असून, गुरूवारी (दि. २५) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.

केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे देशभरात गुरुवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेनेही यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर पथनाट्य, प्रभातफेरीद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तर मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धावपटू मोनिका आथरे, संजीवनी जाधव उपस्थित राहणार आहेत. सहस्त्रक मतदारांप्रमाणेच दिव्यांग मतदारांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

--

कार्डचे वाटप

मतदार यादी पुर्नरीक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी केलेल्या नूतन मतदारांना प्रातिनिधिक स्वरुपात एपिक मतदार कार्डचे (पीव्हीसी) वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या प्रश्नमंजुषा परीक्षेत राज्य स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आदित्य बैरागी आणि प्रदीप वडजे या विद्यार्थ्यांनाही यावेळी गौरविण्यात येणार आहे. निवडणूक प्रणाली व्यवस्थितरित्या राबविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जिल्ह्यातील १९ बीएलओंचा (बुथ लेवल ऑफिसर) सत्कारही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोस जयंतीनिमित्त विद्यार्थिनीस मदत

$
0
0

डॉ. गुजर हायस्कूल

येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार यांनी नेताजी बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नेताजींच्या जीवनकार्यावर कथा व कविता सादरीकरण केले. याप्रसंगी मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार यांनी सुभाष बाबू यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. अनिता पवार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. यावेळी परिसरातून हिंदी व इंग्लिश मीडियमच्या दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढीत नेताजींच्या नावाचा जयघोष केला. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता मजुमदार सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते.

सावित्रीबाई फुले विद्यामंदिर

नाशिक : पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरात नेताजी बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विष्णू मगर तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील शेवाळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. 'तूम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुँगा' अशी घोषणा करून भारतीय स्वातंत्र्यासाठी अनमोल भूमिका त्यांनी बजावली. 'आयएएस'पदाचा राजीनामा देऊन भारत मातेची सेवा त्यांनी केली, असे विद्या महाजन यांनी सांगितले. थोर पुरुषांचे जीवन अन् विचार प्रेरणादायी असतात त्याचा स्वीकार करून ध्येय गाठता येते असे अध्यक्ष विष्णू मगर यांनी सांगितले. मुख्याध्यापक सुनील शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती महाले यांनी आभार मानले. यावेळी जयश्री पवार, वैशाली राजभोज, प्रशांत गवळी, नीलिमा पडोळ, लक्ष्मण काशीद यांचे विशेष सहकार्य लाभले.

नॅशनल अँटी क्राइम अॅण्ड ह्यूमन राइट्स कौन्सिल ऑफ इंडियातर्फे बोस यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोर्ड ऑफ डायरेक्टर डॉ. अब्दुल मन्नान शेख, डायरेक्टर जनरल माइकल प्रिमिंजर, व्हाइस चेअरमन सैय्यद राशिद, लिगल अॅडव्हायझर सुकदेव जाधव, पीआरओ मुकुंद जयसिंग, गुन्हे तपासक आवेस चौधरी, संदीप परब व अब्दुल सलाम, अकील सैय्यद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुले खिळखिळी...

$
0
0

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

डोक्यावर गळके छत, ...भिंतींभोवती घुशींची असंख्य बिळे, ...चेंबर्सवरील ढापे फुटलेले, ...पिण्याचे पाणी साठविण्याच्या टाकीत घोंगावणारे डास, पाण्याच्या टाकीभोवती ड्रेनेजच्या पाण्याचे साचलेले डबके, ...डक्टमधील पाइपांना लागलेली गळती, ...फुटलेल्या फरशा, ...उखडलेले काँक्रिटीकरण, ...स्लॅबचे निखळलेले प्लास्टर..., दरवाजांच्या उखडलेल्या बिजागिऱ्या,... खिडक्यांचे अर्धवट काचकाम ...अन् भरदिवसाही व्हरांड्यांत दाटलेला अंधार...... हे दृश्य महापालिकेने तीन वर्षांपूर्वी सामनगावरोडवरील अश्विनी कॉलनीत उभारलेल्या घरकुल योजनेतील इमारतींमधील आहे.

परिसरातील झोपडपट्टीवासीयांना नवी घरे मिळाली खरी, परंतु येथील समस्यांमुळे अवघ्या तीन वर्षांतच या घरकुल योजनेत वास्तव्यास आलेल्या नागरिकांना अक्षरशः श्वास गुदमरत असल्याची प्रचीती आली आहे. तीन वर्षांपूर्वी सामनगावरोडवरील जयप्रकाशनगर झोपडपट्टीतील नागरिकांसाठी महापालिकेने अश्विनी कॉलनी येथे नवीन घरकुल योजना राबविली. पाच मजल्यांच्या प्रत्येक इमारतीत ८० घरकुलांचा समावेश असलेल्या एकूण चार टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या. आर्थिक दुर्बल घटकांतील तब्बल ३२० कुटुंबांना अल्पखर्चात या योजनेत घरे मिळाली. सुरुवातीला या योजनेतील लाभार्थ्यांना मोठा आनंदही झाला. परंतु, त्यांचा आनंद अवघ्या तीन वर्षांतच मावळला आहे. सध्या या घरकुल योजनेत वास्तव्याला असणाऱ्या सर्वच कुटुंबांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. अपुरी जागा आणि दररोज जिन्याने कराव्या लागणाऱ्या चढ-उतरीने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. आरोग्य, स्वच्छता, वीज, पाणी, सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांचा येथे बोजवारा उडालेला आहे. या घरकुल योजनेतील लाभार्थी कुटुंबांना कौटुंबिक प्रायव्हसी जपताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे दररोजच्या कुरबुरी वाढल्या आहेत. अत्यंत छोटी घरे असल्याने येथे जणूकाही कोंडवाडाच तयार झाला आहे.

--

पाण्यासाठी भटकंती

अश्विनी कॉलनीतील घरकुल योजनेसाठी महापालिकेने स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सुविधा दिलेली आहे. मात्र, पाणी साठवण्याच्या टाकीजवळील ड्रेनेजचा चेंबर फुटून या टाकीभोवती दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचलेले असल्याने या पाण्यालाही दुर्गंधी येते. परिणामी या टाकीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येत नाही. त्यामुळे येथील बहुतांश कुटुंबांतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात दररोज भटकंती करावी लागत आहे. पिण्याचे पाणी साठविण्याच्या टाकीत डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात आहे.

संरक्षक भिंतीकडे ठेकेदाराची पाठ

या घरकुल योजनेच्या संरक्षक भिंतीच्या कामाकडे ठेकेदाराने पाठ फिरविल्याने येथे संरक्षक भिंतच अस्तित्वात नाही. नागरिकांनी काही ठिकाणी दोर बांधलेला आहे. शेजारील रस्त्यावरील वाहनांमुळे या घरकुलांत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबांतील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पार्किंगच्या जागेवरही झाडेझुडपे वाढली आहेत.

--

गळतीने रहिवासी त्रस्त

या घरकुल योजनेतील सर्व चारही इमारतींमधील सर्व मजल्यांवरील ३२० बाथरूम्सला गळती लागलेली आहे. या घरकुल योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे येथे घरे मिळालेले नागरिक त्रस्त झाले आहेत. लिकेजमुळे सर्व बाथरूम्सचे छत खराब झाले आहे. या बाथरूम्सचा वापर करणेही अवघड झाले आहे. काही नागरिकांनी स्वतः बाथरूमची दुरुस्ती केली असता बाथरूमच्या भांड्याखाली वाळू व रेतीऐवजी अक्षरशः प्लास्टिकच्या गोण्या आणि जुनी पादत्राणे आढळून आली. बांधकाम ठेकेदाराने अशाप्रकारचे साहित्य बाथरूम्समध्ये वापरलेले असल्याने अवघ्या दोन वर्षांतच या घरकुल योजनेतील सुविधांचा फज्जा उडाला आहे.

--

अश्विनी कॉलनीतील घरकुल योजनेतील इमारतींची गेल्या तीन वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या इमारतींभोवती घुशींची बिळे वाढली आहे. पार्किंग आणि संरक्षक भिंतीचे काम अद्यापही अपूर्णच आहे.

-महेश पगार, स्थानिक रहिवासी

या घरकुल योजनेतील सर्व बाथरूम्सना गळती लागलेली आहे. डक्टमधील पाइपांमधूनही गळती सुरू आहे. लिकेजमुळे घरांचे छत आणि भिंती खराब झाल्या आहेत.

-दत्तात्रय कांगणे, स्थानिक रहिवासी

अश्विनी कॉलनीतील घरकुल योजनेतील समस्यांबाबत महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना आतापर्यंत अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, त्यांनी दखल घेतलेली नाही. अत्यंत सुमार दर्जाचे बाधंकाम झालेले असल्याने या इमारती कोसळण्याची दाट शक्यता आहे.

-धनाजी कटारे, स्थानिक रहिवासी

महापालिकेकडून या घरकुलांच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. परिणामी प्रतिकुटुंब दरमहा १०० रुपये वर्गणी काढून स्वच्छता, वीजबिल आदी कामे केली जातात. डासांच्या प्रादुर्भावाने सारेच त्रस्त झाले आहेत.

-सुमित पांडवळे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांसाठी २५ ला बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मनपा गाळेधारकांना लावलेल्या रेडीरेकनरच्या दरासंदर्भात गाळेधारकांनी आमदारांच्या माध्यमातून थेट नगरविकास राज्यमंत्र्याकडे कैफियत मांडल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी गाळेधारकांसाठी धावपळ सुरू केली आहे. गाळेधारकांच्या प्रश्नांबाबच चर्चा करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक २५ जानेवारी बोलविण्यात आली आहे. स्थायी समिती सभागृहात सकाळी ११ वाजता ही बैठक होत असून सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आंमत्रित करण्यात आले आहे.

शहरात मनपाच्या विविध इमारतींमध्ये सुमारे दोन हजार गाळे आहेत. यापैकी बहुतांश गाळेधारकांचे भाडे करार संपुष्टात आले असून, प्रशासनाने सरसकट सर्व गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये अस्वस्थता असून वाढीव दर गाळेधारकांना अवजड झाले आहेत. त्यामुळे दर कमी करण्याचे साकडे गाळेधारकांनी महापौरांसह पदाधिकाऱ्यांना घातले आहे. दोन वर्षांपासून विलंब शुल्क व गाळे भाडेवाढीवरून प्रशासन व गाळेधारक यांच्यात वाद सुरू आहे. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, या समितीच्या बैठकांना मुहूर्त न लागल्याने आजवर भाडेवाढीचा विषय लांबणीवर पडला. याप्रकरणात भाजपाच्या पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी लक्ष घालून गाळेधारकांची भेट नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची घालून दिली. त्यात पाटील यांनी विलंब शुल्क न आकारण्याची मनपास सूचना केली. त्यानंतर सत्ताधारी जागे झाले असून त्या या समितीची पहिली बैठक २५ जानेवारी रोजी बोलविली आहे. त्यामुळे या बैठकीकडे गाळेधारकांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावत विरोधात जलसमाधीचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि विवादास्पद ठरलेला पद्मवात चित्रपट बुधवारी शहरात प्रदर्शित होणार आहे. मात्र, या प्रदर्शनास राष्ट्रीय करणी सेना, अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतीदल, महाराणा प्रताप युवा सेना, महाराणा प्रताप राजपुत महासंघ, युवा मंच, क्षत्रिय संस्थान व समस्त राजपूत व हिंदू समाज संघटनांनी विरोध दर्शवला आहे. विरोध झुगारून सदर चित्रपटास मंजुरी मिळाल्याने याविरोधात बुधवारी दुपारी एक वाजता गंगापूर धरण येथे जलसमाधी आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या चित्रपटास कडाकडून विरोध करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके, क्रांतीदल संस्थापक संतोष पवार, किशोर पवार उपस्थित होते. सतीमाता पद्मावती यांच्या जीवनावर चुकीच्या पध्दतीने चित्रकरण केले जात असल्याने तसेच यात इतिहासाची तोडमोड केल्याने दीड वर्षांपासून राष्ट्रीय करणी संघटनेसह राजपूत संघटनांनी विरोध दर्शवला. वेळोवळी समजही देण्यात आली. त्यानुसार, सदर चित्रपट सुरुवातीस राजपूत समाजाच्या इतिहासकारांना तसेच नेत्यांना दाखविल्यानंतरच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात येईल, असे ठरले होते. प्रत्यक्षात दोन लोकानांच चित्रपट दाखवण्यात आला. तसेच त्यांचा प्रखर विरोध असताना मंजुरीसाठी तो सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. जनभावनेचा आदर न करता चित्रपट प्रदर्शनास मंजुरी मिळाली. त्यामुळे हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारवरील रजपूत संघटनांचा विश्वास उडाला असल्याचे पत्रकार परिषदेत सर्वांनी स्पष्ट केले. आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. मात्र, यापुढे समाजाचा कोणत्याही स्वरूपात अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस सरकार जबाबदार असणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सरकारने या प्रकरणी न्याय मिळवून दिला नाही तर बुधवारी गंगापूर धरणात जलसमाधी घेऊ असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. यावेळी राजेंद्रसिंग चव्हाण, समीर देशमुख, विजय टाटिया, करमसिंग देवरे, जितेंद्र गिरासे, नेपालसिंग राठोड, बंटी राजपूत, करणसिंग बावरी यांच्यासह इतर उपस्थित होते.


पोलिसांचा बंदोबस्त

'पद्मावत' चित्रपटाचा प्रीमियर बुधवारी काही थिएटरमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पोलिस स्टेशन पातळीवर बंदोबस्त पुरविण्याचे नियोजन केले आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शनास मंजुरी दिली असून, सर्वांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा हातात घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्वांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७०० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ७ ते ९ आणि १० ते १ अशा वेळेत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. सकाळच्या सत्रात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसह पालकांना पाचारण करून पोलिसांनी समज दिली. या विशेष मोहिमेत एक हजार ७०१ वाहनचालकांवर कारवाई करून पाच लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हेल्मेट वापरामुळे शहरात जीवघेण्या अपघातांच्या घटनेत सातत्याने घट होत आहे. मात्र अनेकदा नागरिक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट सोबत ठेवतात पण परिधान करीत नाहीत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २३) शहर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी सकाळी ७ ते ९ तसेच १० ते १ या वेळेत ३९ ठिकाणी नाकाबंदी केली. या मोहिमेत हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ७४२ दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दुचाकी चालकांकडून तीन लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. याशिवाय सीट बेल्ट, सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सीट अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९५९ वाहनचालकांकडून एक लाख ९१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत ८० अधिकारी ४५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याने वाहनचालकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

--

पाऊण लाखाचा दंड वसुल

सिन्नर फाटा : नाशिकरोड शहर वाहतूक आणि स्थानिक पोलिसांतर्फे तब्बल २३६ बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी जवळपास पाऊण लाख रुपयांचा आर्थिक दंडही वसूल केला. नाशिकरोड विभागातील नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी तीन, देवळाली कँप पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा आठ पॉइंटवर स्थानिक व वाहतूक पोलिसांनी रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. हेल्मेटविना दुचाकी वाहन चालविणाऱ्या ९१ दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येक पाचशे रुपयांप्रमाणे ४५ हजर ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४५ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे २९ हजार रुपये असा एकूण ७४ हजार ५०० रुपये इतका दंड पोलिसांनी वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश देवीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी बुधवारपासून (दि. २४) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. शहरातील सुमारे ९८ शाळांमधून २ हजारावर जागांसाठी तर जिल्ह्यात सुमारे ४५० शाळांमधून सुमारे ६ हजारांवर अशा एकूण ८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या अंतर्गत १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात याणार आहे. ऑनलाइनद्वारे १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज आल्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी या प्रक्रियेची पहिली सोडत जाहीर होणार आहे. यानंतर प्रवेशाचे विविध टप्पे यात पार पडतील. पहिल्या सोडतीनंतर १६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सोडतमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्याला प्रत्यक्षात प्रवेश दिला जाईल. ७ आणि ८ मार्च रोजी दुसरी सोडत काढण्यात येईल. यात निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना ९ ते २१ मार्च दरम्यान प्रवेश पूर्ण करावा लागेल. २६ आणि २७ मार्च रोजी तिसरी सोडत जाहीर होणार आहे. २८ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

या प्रक्रियेत विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्यांक शाळा वगळून), स्वयं अर्थ सहाय्यीत शाळांमध्ये नर्सरी आणि प्राथमिक प्रवेशांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारूडातून समाजाला जगण्याचे बळ मिळते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकनाथ महाराजांनी समाजाला भरभरून दान दिले, त्यापैकी एक म्हणजे भारूड. भारूड म्हणजे बहुरूढ. रूढ अर्थाने भाविकांपर्यंत नेणारे म्हणून ते भारूड. अशा या भारूडातून समाजाला आजही जगण्याचे बळ मिळते, असे प्रतिपादन प्रा. आशा कुलकर्णी यांनी केले.

नाशिक शहर महिला संघटना अंतर्गत 'आम्ही साऱ्याजणी' महिला मंडळातर्फे आयोजित भारूड महोत्सवात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, सकाळपासून काम करून थकलेला कष्टकरी समाज रात्री पोथ्या, कीर्तन ऐकायला जात असे. अशावेळी त्याला एकदम ज्ञान न देता आधी त्याचे मनोरंजन करून त्याची भावस्थिती तयार करण्यासाठी नाथांनी भारूड रचले. कष्टकरी समाजाची बोलीभाषा आत्मसात करून त्यातून अध्यात्म मांडण्याचा नाथांचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि भारूड जनमानसात पोहोचले.

यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, प्रसिद्ध नृत्यांगना संजीवनी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. आमदार हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, सर्व महिला मंडळानी एकत्र येऊन काही कार्यक्रम राबवावे असे मनापासून वाटते. आम्ही साऱ्याजणी हे महिला मंडळ अनेक महिला मंडळांना घेऊन एकत्र आणण्याचे काम करीत आहे.

कार्यक्रमात समर्थ महिला मंडळ, दुर्गा महिला मंडळ, श्रीरंग महिला मंडळ, वनिता महिला मंडळ, विरंगुळा महिला मंडळ, पंचगुरू महिला मंडळ आणि उषाकिरण महिला मंडळ यांनी भारूड रचना सादर केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७२ इमारतींत नियमभंग

$
0
0

प्रशासनाकडून अनेक वर्षे डोळेझाक

अनेक वर्षांपासून संबंधितांकडून अशा प्रकारचा अनधिकृत वापर करून एकप्रकारे महापालिकेची आर्थिक फसवणूकच केली जात असताना दुसरीकडे प्रशासनाकडूनही डोळेझाक होत आल्याने चित्र आहे. नगररचना विभाग, कर संकलन आणि अतिक्रमण विभागासह विभागीय अधिकाऱ्यांचेही या अनधिकृत वापराकडे दुर्लक्ष होत असल्याने संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित मालमत्ताधारक व व्यवसाय करणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाईबरोबरच मागील काही वर्षांचे शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने वसूल केल्यास महापालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होणार आहे.

तळघर, टेरेस अनधिकृत वापराची संख्या

विभाग गोडावून दुकाने इतर व्यवसाय

नाशिकरोड २३ ४१ ०९
नाशिक पूर्व २८ ३२ ११
सिडको, सातपूर १२ ०३ ०२
नाशिक पश्चिम १६ ४६ ०६
पंचवटी विभाग ३९ ३० २५
एकूण ११७ १०५ ५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस सेवेसाठी महापालिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिटीबस सेवेसंदर्भात क्रिसिल संस्थेने महापालिकेला प्रारूप अहवाल सादर केल्यानंतर प्रशासनाने सिटीबससंदर्भात अंतिम निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. सिटीबस ताब्यात घेण्यासंदर्भातील अंतिम अहवाल क्रिसिलकडून ३१ जानेवारीपर्यंत सादर केला जाणार आहे. आयुक्तांनी विभागप्रमुखांकडून बससेवेसंदर्भात सूचना मागविल्या आहेत. अंतिम अहवाल व विभागप्रमुखांच्या सूचनेनंतर फेब्रुवारीच्या महासभेत सिटी बससेवेचा प्रस्ताव आणि क्रिसिलचा अहवाल मांडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. पीपीपी तत्वावर बससेवा चालविण्याची महापालिकेची तयारी असून त्यांसाठी बजेटमध्ये ८० कोटींची तरतूद करण्याचीही तयारी सुरू झाली आहे.

महामंडळाने सिटीबससेवा चालविण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने आता बससेवा ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. गेल्या आठवड्यात क्रिसिल संस्थेने शहर सिटीबस सेवेबाबतचा प्रारूप अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यात, संस्थेने तीन पर्याय सुचविले असून, ठेकेदाराकडून बससेवा चालविणे, महापालिकेने चालविणे तसेच पीपीपी तत्त्वावर बससेवा चालविण्याचा त्यात समावेश आहे. या प्रारूप अहवालानंतर प्रशासनाने बससेवेसंदर्भात अंतीम निर्णय घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना क्रिसिल संस्थेला दिला आहे. तसेच सर्व विभागप्रमुखांना बससेवेसंदर्भात सूचना देण्याचे आदेश देण्यात आले असून, त्या सूचना व अभिप्राय हे ३१ जानेवारीपर्यंत सादर होणार आहेत. त्यानंतर, त्याबाबतचा प्रस्ताव फेबु्रवारीत होणाऱ्या महासभेत मांडला जाणार आहे. महासभेच्या निर्णयानंतरच बससेवेसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. पीपीपी तत्वावर बससेवा घेतल्यानंतर तूट भरून काढण्यासाठी करवाढीचाही पर्याय खुला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पीपीपी तत्त्वावर बससेवा चालवायची झाल्यास त्यातील कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय महासभेने घ्यायचा असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.


सरकारकडे निधीची मागणी

महापालिकेने पीपीपी तत्त्वावर बससेवा चालविण्याचा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर भाडंवली खर्च लागणार आहे. त्यामुळे भांडवली खर्चासाठी लागणारा निधी राज्यसरकारकडून मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविला जाणार असून, राज्य परिवहन महामंडळाकडे त्यांच्या जागांचीही मागणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सोबतच महापालिकेने स्वत:च्या काही जागांचीही तयारी ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक बससेवेला आर्थिक मदत देण्याची घोषणा क्रेडाईच्या कार्यक्रमात केली होती. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे लक्ष लागून आहे.

बजेटमध्ये ८० कोटींची तरतूद

पीपीपी मॉडेलनुसार बससेवा चालविण्याला महापालिकेची पसंती आहे. त्यामुळे यासाठी प्रथम महापालिकेला २० कोटी रुपये भांडवली खर्च येणार असून सुमारे ७२ कोटी रुपये महसुली खर्च अपेक्षित आहे. त्यात नवीन बस खरेदीचाही समावेश आहे. शहर बससेवेचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात येणार असल्याने सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात सुमारे ८० कोटींची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या निधीसह भांडवली कामांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

पीपीपीवर शिक्कामोर्तब

शहर बससेवा ही महापालिकेनेच चालविली पाहिजे. परंतु, ती कोणत्या पद्धतीने चालवायची याचा निर्णय महापालिकेलाच घ्यावा लागणार आहे. पीपीपी तत्वावर बससेवा चालविण्याचा हा त्यातला उत्तम पर्याय आहे. शहर बससेवा महापालिका चालवणार, हे आता जवळपास नक्की झाले आहे फक्त महासभेला पर्याय निवडायचा आहे. त्यामुळे, बससेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन समिती स्थापन करायची की एसपीव्ही अर्थात स्वतंत्र कंपनी स्थापन करायची, याचाही फैसला महासभेला करावा लागणार आहे. मात्र, सत्ताधारी भाजपाकडून एसपीव्ही ऐवजी परिवहन समिती स्थापण्यालाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २७८ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक

$
0
0

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींमधील ४९३ रिक्तपदांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी साडेचार या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. १२ फेब्रुवारीला अर्ज छाननी होणार असून १५ फेब्रुवारीला दुपारी तीनपर्यंत इच्छुक उमेदवारांना माघार घेता येणार असून त्यानंतर लगेचच निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. तर २६ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे.

तालुका ग्रामपंचायती रिक्त पदे

बागलाण ५० ९१
दिंडोरी ३५ ७४
मालेगाव ३४ ६९
कळवण २५ ४२
निफाड १९ २७
इगतपुरी १७ २९
त्र्यंबकेश्वर १६ २९
नाशिक १६ २५
चांदवड १४ ४६
सिन्नर १० १४
येवला १० १०
पेठ ०९ १०
नांदगाव ०८ १०
सुरगाणा ४ ४
देवळा ११ १३


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एप्रिलपासून चेतणार पसा नाट्ययज्ञ

$
0
0

नाट्यगृह मिळणार विनामू्ल्य; उत्पन्न मिळणार नाट्यसंस्थांना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचा वसा स्वीकारणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने स्थानिक धडपड्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी परशुराम सायखेडकर नाट्ययज्ञाचे आयोजन केले आहे. रंगकर्मींना स्टेज देण्याबरोबरच नाट्य चळवळीला अर्थपूर्णता प्राप्त व्हावी, यासाठी हौशी व प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य देत सावानाने पसा नाट्ययज्ञ उपक्रम हाती घेतला आहे. येत्या एप्रिलपासून या उपक्रमास प्रारंभ होणार आहे.

हा उपक्रम सुरू करण्याकरिता सावाना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नाट्यसंस्था प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये एप्रिल २०१८ पासून दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी एका संस्थेने नाटक सादर करावे असे ठरविण्यात आले. संस्थांना नाटक सादर करण्याकरिता सावाना विनामूल्य प. सा. नाट्यगृह उपलब्ध करून देणार आहे.

या बैठकीस सावानाचे कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, नाट्यगृह सचिव प्राचार्य डॉ. धर्माजी बोडके, दत्ता पाटील, राजेश शर्मा, प्रवीण कांबळे, प्रवीण काळोखे, हेमंत गव्हाणे, आनंद जाधव. प्रशांत हिरे, विनोद राठोड, रवींद्र ढवळे, सचिन शिंदे, संजय करंजकर, लक्ष्मण कोकणे उपस्थित होते. यावेळी प. सा. नाट्यगृह समितीचीही बैठक झाली. यावेळी उपस्थितांनी नाट्यगृह दुरुस्तीबाबत समाधान व्यक्त केले. ईश्वर जगताप, सुरेश राका, दिलीप जाधव. नंदू वराडे आदींनी यावेळी विविध सूचना केल्या.

नाट्यसंस्था होणार भक्कम

सावानाच्या सभासदांकरिता चार रांगा राखीव ठेवण्यात येणार असून, अन्य खुर्च्यांची तिकिटे नाट्यसंस्था विकणार असून, त्याचे संपूर्ण उत्पन्नदेखील नाटक सादर करणाऱ्या संस्थेला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना जसे उत्तम नाटक बघण्याची संधी मिळणार आहे, तशी नाट्यसंस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्याची संधी सादरकर्त्या संस्थेला मिळणार आहे.

या नाट्यसंस्था करणार सादरीकरण

या बैठकीत पुढीलप्रमाणे नाट्यसंस्थानी नाटक सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. एप्रिल २०१८ - सुरभी थिएटर, मे - मयुरी थिएटर, जून - द जीनियस, जुलै - राही - प्रेरणा फाउंडेशन, ऑगस्ट - नाट्यसेवा, सप्टेंबर - अरंग, ऑक्टोबर - क. का. वाघ परफॉर्मिंग आर्ट्स, नोव्हेंबर - नाट्य नम्रता, डिसेंबर - सपान, जानेवारी २०१९ - स्पंदन, फेब्रुवारी २०१९ - सावाना बालभवन, मार्च २०१९ मध्ये सर्व संस्था एकत्रितपणे एक नाटक सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक : पेट्रोल @ ८०.५६ रुपये लिटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढच होत असून, मंगळवारी हे दर ८० रुपये ५० पैशांच्याही वर गेले. यापुढील काळातही इंधनांच्या दरात वाढच होणार असून, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे. डिझेलचे दरही ६६ रुपये ७६ पैशांपर्यंत गेले असून, हे दर वाढतच राहिले तर नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.

पूर्वी प्रत्येक १५ दिवसांनी इंधनाचे दर बदलण्यात येत होते. परंतु, १ मे २०१७ पासून देशभरात प्रायोगिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याची पध्दती सुरू झाली आहे. दि. १६ जून २०१७ पासून दररोज मूल्यनिर्धारण करण्याची व्यवस्था देशभरात लागू झाली. गेल्या १५ दिवसांपासून इंधनाचे दर दररोजच वाढत आहेत. कधी ३० ते ३५ पैशांनी तर कधी १५ ते २० पैशांची हे दर वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर महाग होत चालले आहे. गेल्या सप्ताहात १६ जानेवारी रोजी पेट्रोलचे दर ७९ रुपये ४२ पैसे प्रतिलिटर होते. डिझेलचे दर ६५ रुपये १८ पैसे प्रतिलिटर होते. हेच दर मंगळवारी (दि. २३) अनुक्रमे ८० रुपये ५६ पैसे आणि ६६ रुपये ७६ पैशांपर्यंत पोहोचले आहेत. तीन दिवसांपूर्वीच पेट्रोलचे दर ८० रुपयांच्या पुढे सरकल्याची माहिती नाशिक पेट्रोल डिझेल असोसिएशनचे पदाधिकारी नितीन धात्रक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरातील विश्वासनगर भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडत असल्याने अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात सभापती माधुरी बोलकर यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा जागी झाली. त्यानंतर दूषित पाणीपुरवठ्याचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेतले गेले. सांडपाणी व पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या एकाच ठिकाणी असल्याने गळती लागलेल्या वाहिन्यांद्वारे सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत मिसळत असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

परिसरात चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरठ्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असतानादेखील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडवत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. तशा तक्रारी सभापती बोलकर यांच्याकडे केल्यावर त्यांनाही याविषयी नाराजी व्यक्त करून संबंधितांना कार्यवाहीची सूचना केली.

वेगाने वाढलेल्या अशोकनगर भागात पिण्याचे पाणी मुबलक मिळावे या हेतूने सभापती बोलकर, नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नवीन जलकुंभ उभारला. परंतु, जलवाहिन्या जुन्या असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असूनही त्याकडे पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांना विचारला जाब

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी महापालिका, तसेच सभापती बोलकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर सभापतींनी योग्य कार्यवाहीच्या सूचना पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाला दिल्या होत्या. त्याकडे पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केल्याने सभापती बोलकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ दूषित पाणी बंद करण्याचे आदेश दिले. विश्वासनगर भागात ज्याठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत होता तेथे त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करीत समस्या जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत दूषित पाणी बंद करणार असल्याचे आश्वासन रहिवाशांना दिले.

विश्वासनगर भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून तात्काळ पाणीपुरवठा विभागाकूडन दूषित पाणीपुरवठा बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. याबाबत आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.

-माधुरी बोलकर, सभापती, सातपूर प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्रिमूर्ती चौक होणार आयडॉल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्तांनीच पुढाकार घेऊन शहरातील काही महत्त्वाचे चौक सुशोभिकरण करून त्याठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने आयडॉल चौक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्रिमूर्ती चौकापासून सुरुवात करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी या चौकाचे काम सुरू झाले असून, याठिकाणची वाहतूक लवकरच नियोजित होऊन हा चौक मोकळा श्वास घेणार आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तेरा चौकांचे वाहतुकीचे व्यवस्थापन यादृष्टीने सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक रहदारीचा चौक असलेला त्रिमूर्ती चौक मॉडेल म्हणून विकसित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह नगरसेवक सुधाकर बडगुजर, शाम साबळे, नगरसेविका हर्षा बडगुजर, भाग्यश्री ढोमसे व महानगर पालिकेच्या अधिकार्यांनी या चौकाची पाहणी केली होती. त्यानुसार नव्याने आराखडा तयार करण्यात आला होता. या चौकात असलेला बसथांबा, रिक्षा थांबा त्याचबरोबर सिग्नल यामुळे वाहतुकीची कोंडीच होत होती. त्याचबरोबर या चौकाच्या एकाबाजूला भाजीबाजार असल्याने सायंकाळी या ठिकाणाहून प्रवास करणे जिकिरीचे होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या चौफुलीचे काम सुरू केले. येत्या आठवड्याभरातच हा चौक सुशोभित होऊन वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात सोयीचा होणार असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस निरीक्षक कड यांनी केला आहे. यावेळी महापालिका उपअभियंता ए. जे. काझी उपस्थित होते.

बससाठी स्वतंत्र जागा

त्रिमूर्ती चौकातील सिग्नल आणि बस थांबा हे जवळजवळ असल्याने बसथांब्यावर बस उभी राहिली आणि सिग्नल सुटला तरी वाहतूक सुरळीत होत नव्हती. त्यामुळे बस थांब्यावर बसला उभे राहण्यासाठी मंगळवारपासून स्वतंत्र जागा करून देण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरुपाचे बॅरिकेटस् याठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता बस थांबा आणि इतर वाहतूक यात अंतर राहणार आहे.

रिक्षा थांबा सरकविला

या मुख्य रस्त्यावरच रिक्षा थांबा असून, त्याचबरोबर पवननगरकडून येणारे रिक्षाचालकही अनेकदा रस्त्यातच रिक्षा उभ्या करीत असतात. त्यामुळे मूळ रिक्षाथांबाच आता मागे सरकविण्यात आला आहे. या परिसरात रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास बंदी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यात रिक्षा उभी दिसली तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या चौकात आता नव्याने झेब्रा पट्टे मारण्यात येत असून सिग्नलचा वापर योग्य प्रकारे करण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात येत असल्याने आता या चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

त्रिमूर्ती चौकाबरोबरच अन्य वाहतूकही सुरळीत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे. लवकरच पवननगर व उत्तमनगर येथेही वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.

- मधुकर कड, वरिष्ठ पेालिस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग तीन दिवस बँका बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सलग तीन दिवस सुटी आल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. यामुळे आज, गुरुवारी बँकांमध्ये गर्दी होणार आहे. बँकेने ऑनलाइन व एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असूनही बहुतांश व्यवहारांसाठी बँकेत रोज ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे सलग बँका बंद असल्यामुळे अनेकांची अडचण होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्यामुळे शुक्रवारी (दि. २६) बँका बंद राहणार आहे. त्यानंतर २७ जानेवारीला चौथा शनिवार व २८ला रविवार असल्यामुळे सलग तीन दिवस सुटी असणार आहे. नोटाबंदीनंतर बँका व एटीएम बंद असल्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. त्यानंतर मात्र व्यवहार सुरळीत झाले. तरी एटीएमची अडचण अनेक ठिकाणी होती. पण, गेल्या काही महिन्यांपासून एटीएमची अडचण दूर झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. आता या तीन दिवसांत मात्र एटीएमवरही गर्दी होणार आहे. त्यासाठी बँकेने तयारी केली असली तरी एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास कॅश शॉर्टेजचा प्रश्न येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीबाधित करणार इच्छामरणाचा ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी विरोधात अनेक आंदोलने करूनही राज्य सरकार त्याची फारशी दखल घेत नसल्याने समृद्धीबाधितांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत याबाबतचा ठराव केला जाणार आहे.

सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असून, समृद्धी महामार्गाकरिता जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात आहेत. यातून बागायती क्षेत्र वगळावे, भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सरकारने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत ठराव करून राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्याचा निर्णय समृद्धीबाधित संघर्ष समितीने घेतला आहे.

पिकाऊ व बागायती जमीन संपादित करू नये, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याउलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल करीत आहेत. या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी २६ जानेवारी २०१८ रोजी ग्रामसभेत राष्ट्रपतींनी इच्छामरणाची परवानगी द्यावी, असा ठराव मांडून निषेध व्यक्त करणार असल्याचे समितीने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडलाही बंदोबस्तात शो

$
0
0

नाशिकरोडलाही बंदोबस्तात शो

नाशिकरोड : 'पद्मावत' चित्रपटाचा पहिला शो सात वाजता सिनेमॅक्स रेजिमेन्टल प्लाझा येथे झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्या शोला फारशी गर्दी नव्हती. रोज दोन शो होणार असल्याची माहिती थिएटरचे व्यवस्थापक नीलेश चव्हाण यांनी दिली.

विरोध करणाऱ्यांवर कारवाई

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला 'पद्मावत' सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत असून या पार्श्वभूमीवर येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनास विरोध करणाऱ्यांवर किंवा कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्वोच्च न्यायलयाने या सिनेमावर बंदी घालता येणार नसल्याचे आदेश दिले असून या आदेशाचे मालेगाव पोलिसांकडून पालन केले जाणारा असल्याचे पत्रकारांना सांगितले. मालेगावच्या सिनेमॅक्स मल्टिप्लेक्ससह मोहन, सुभाष, दीपक या सिनेमागृहांत शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट मतदारकार्डांना ब्रेक

$
0
0

ठरणार pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT

नाशिक : बदलत्या काळाची पावले ओळखत निवडणूक आयोगही डिजिटल इंडियाच्या मार्गावर आरूढ झाला आहे. कृष्ण धवल कागदी मतदार ओळखपत्रांची जागा आता आकर्षक रंगसंगतीतील इपिक (elector photo identification card) या स्मार्ट कार्डने घेतली असून नाशिककरांनाही ते भावले आहे. यावरील बारकोडमुळे बनावट मतदार ओळखपत्रांना ब्रेक लागणार असून पोलिसही त्याच्या सत्यतेची सहजतेने शहानिशा करू शकणार आहेत. यामुळे मतदारांच्या मतदानाच्या हक्काची जपणूक होणार आहे.

मतदार हा लोकशाहीचा खरा आधारस्तंभ असून त्यामुळेच त्याला राजा म्हटले जाते. मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदाराची ओळखही स्पष्ट व्हावी यासाठी मतदारांना भारत निवडणूक आयोगातर्फे ओळखपत्र दिले जाते. गेली कित्येक वर्ष कृष्णधवल आणि लॅमिनेटेड स्वरुपात नागरिकांना या ओळखपत्रांचे वितरण केले जात होते. परंतु, बदलत्या काळानुसार निवडणूक विभागानेही कात टाकली असून निवडणूक प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी डिजिटल क्रांतीच्या दिशेने आयोगाची पावले पडू लागली आहेत. जिल्ह्यातील मतदानकेंद्रांचे डिजिटायजेशन अंतिम टप्प्यात आले असून जगभरात कोठेही असणाऱ्या मतदाराला त्याच्या मतदान केंद्र, कक्षासह सर्व तपशील घरबसल्या पहाता येणार आहे. मतदार यादी अद्ययावत आणि परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर' ही प्रणालीही अलीकडेच देशभर कार्यान्वित केली आहे. यापुढच्या टप्प्यात आता मतदार ओळखपत्रही स्मार्ट बनविण्यात आली आहेत. पूर्वीच्या ओळखपत्रांवर स्टीकररुपात बारकोड होता. परंतु, त्याच्याही डुप्लीकेशनचे प्रकार उघडकीस आल्याने आता स्मार्ट कार्डवर स्मार्ट बारकोडचे प्रिंटींग करण्यात आले आहे. त्याच्या लिंकिंगची प्रक्रिया सध्या सुरू असून हे मतदार ओेळखपत्र खरे की खोटे हे त्याद्वारे तपासता येणार आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्या प्रत्येक मतदाराला आता इपिक कार्ड दिले जात असून ऑक्टोबरपासून ३५ हजार मतदार कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. नवीन ३१ हजार कार्डही निवडणूक शाखेला प्राप्त झाली असून त्यांचे वाटपही बीएलओ घरोघरी जाऊन करणार आहेत. विशेष म्हणजे मतदारांचे अर्ज एकगठ्ठा स्कॅन करून ते ऑनलाइन पद्धतीनेच मुंबईत 'अतिशय इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड'कडे पाठविली जातात. तेथे हे स्मार्ट कार्ड प्रिंट करून ते जिल्हा निवडणूक शाखेकडे पाठविले जातात.


अधिकृत पुरावा ठरणार

स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत मतदानाद्वारे जनतेचा प्रतिनिधी ठरविताना मतदाराची ओळख आणि वयाचा पुरावा म्हणून हे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी जन्माचा पुरावा म्हणून हे स्मार्ट ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, असे या ओळखपत्राच्या मागील बाजूस स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मतदानासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी जे ओळखपत्र ग्राह्य धरले जाते ते अन्य ठिकाणी ग्राह्य धरले जाऊ नये ही मतदारांना खटकणारी आणि बुचकळ्यात पाडणारी बाब ठरते आहे.

आयोगाच्या निर्देशांमुळे निवडणूक प्रक्रियेची डिजिटल युगाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रत्येक नवीन मतदाराला स्मार्ट मतदार ओळखपत्र दिले जात असून ते १५ ते २० वर्षे टिकेल, अशा गुणवत्तेचे आहे. त्यासाठी मतदार स्वत:चा सद्यस्थितीतील फोटो आणि निवासाचा पुरावा जोडून आठ नंबरचा अर्ज करू शकतो.
- गणेश राठोड, तहसीलदार, निवडणूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images