Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एनएसएस शिबिरांमधून युवकांचा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध श्रमसंस्कार शिबिरातून युवकांचा व समाजाचा विकास होतो, असे प्रतिपादन ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

मखमलाबाद कॉलेजच्या वतीने दरी-मातोरी (‌ता. नाशिक) आयोजित ‘एनएसएस’च्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी ‘मविप्र’चे माजी उपसभापती अॅड. पंडितराव पिंगळे, संचालक सचिन पिंगळे, संजय फडोळ, पंढरीनाथ पिंगळे, प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दतात्रय वेलजाळी, प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. नलिनी बागूल, ग्रामसेवक दौलत गांगुर्डे, सरपंच शोभा माळेकर, उपसरपंच राजेंद्र पिंगळे यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.

स्वयंसेवकांना मार्गदर्शन नीलिमा पवार म्हणाल्या, की प्रत्येकाला संवाद करताच आला पाहिजे. ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक हे संस्थेसाठी भूषण आहे. लोकांमध्ये गेल्याशिवाय, समाजामध्ये वावरल्याशिवाय शहाणपण येत नाही. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांवरील अवलंबित्व सोडून स्वयंपूर्ण व्हायला हवे. एनएसएस शिबिरामुळे स्वयंविकास होतो व सकारात्मक विचाराने माणूस पुढे जातो.

यावेळी पंडितराव पिंगळे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी थोरामोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. माणसे समजायला एकत्र यावे लागते. तसेच विद्यापीठ आणि शाळा हे अमृताचे कुंभ आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ‘एनएसएस’च्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढतो. प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी परिचय व स्वागत केले. डॉ. दत्तात्रय वेलजाळी यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका आहेर व ममता सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नलिनी बागूल यांनी आभार मानले.

या कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग
दरी गावात झालेल्या शिबिरात विद्यार्थ्यांनी जलसाक्षरता स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान राबविले. तसेच गावालगत १७६ चर खोदले. यातून पावसाळ्यात तब्बल दीड लाख लीटर पाणी अडवून भूजल पातळीत वाढ केली जाईल. याशिवाय स्वयंसेवकांनी ग्रामसर्वेक्षणासह स्वच्छता, वृक्षारोपण असे उपक्रम राबविले. प्रा. डॉ. भाऊसाहेब भंडारे, प्रा. अशोक सोनवणे, प्रा. रवींद्र अहिरे, प्रा. डॉ. राहुल पाटील, प्रा. डॉ. नानासाहेब गुरुळे आदींनी त्यांचे शिबीर काळात स्वयंसेवकांचे उद्‍बोधन केले. स्वयंसेवकांनी शेतकरी आत्महत्या या विषयावर पथनाट्य सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मनवी उत्क्रांतीचे साधन म्हणजे शिक्षण’

$
0
0

श‌िक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य, व‌िव‌िध धर्मांचे तौलन‌िक अभ्यासक आण‌ि ज्येष्ठ व‌िचारवंत प्राचार्य बेजन देसाई यांच्या नावाने कार्यरत असणाऱ्या ‘बेजन देसाई फाउंडेशन’च्या माध्यमातून नाशिकमध्ये ‘यूएसडी’ अर्थात ‘युनिक स्किल डेव्हलपमेंट’चा श्रीगणेशा बुधवारी (दि. २७) कॅबिनेट व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होतो. या निमित्ताने फाउंडेशनच्या कार्याविषयी अध्यक्ष मनोज टिबरीवाल यांच्याशी साधलेला हा संवाद ‘मटा’ च्या वाचकांसाठी...

प्रश्न : फाउंडेशन ज्यांच्या नावाने कार्यरत आहे त्यांना मोठे वलय असल्याने संस्थेची जबाबदारी खूपच वाढते. याविषयी आपले मत काय?
उत्तर : केवळ अभ्यासक्रम शिकविणे आणि जीवनास उपयोगी ठरेल असे शिक्षण देणे या दोन्ही पद्धतींमध्ये टोकाचा फरक आहे. याच वस्तुस्थितीची जाणीव ठेवून फाउंडेशनचे मार्गदर्शक प्राचार्य बेजन देसाई यांनी जीवनभर शिक्षणात सर्जनशील प्रयोगांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याच विचारांपासून प्रेरणा घेत स्थापन झालेले हे फाउंडेशन आहे. विद्यार्थ्यांना एकात्म आणि पूर्णयोगावर आधारित शिक्षण मिळावे, या उद्देशाने फाउंडेशनने नाशिकमधील १७ व्यक्तींना श्री अरविंद सोसायटी, पाँडेचेरी येथे उत्तम प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. याच विचारातून टिचर्स ट्रेनिंग सेंटरही उभे राहिले आहे. फाउंडेशनकडून समाजाची असलेली अपेक्षा लक्षात घेऊन अगोदर चांगला शिक्षक नंतर चांगला विद्यार्थी या दिशेने फाउंडेशनच्या कार्याचा श्रीगणेशा देसाई सरांच्या कार्यकाळातच सुरू झाला होता.

प्रश्न : फाउंडेशच्या यूएसडी सेंटरविषयी नाशिककरांना उत्सुकता आहे. ‌त्याविषयी थोडक्यात सांगा.
उत्तर : शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा केवळ अभ्यासक्रमातच रमणारा नसतो. प्रत्येकाचा नैसर्गिक कल आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ही वेगळ्या अभिरुचीशी संबंधित असते. अनेकदा त्याच्यावर पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील अभ्यासक्रम लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यातील कौशल्याधिष्ठित व्यक्तिमत्वास बाधा पोहचण्याची अधिक शक्यता असते. हे वास्तव विचारात घेऊन फाउंडेशनने कौशल्य विकसनासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले आहे. या संसंधानांच्या आधारावर पुण्यातील ‘युनिक स्किल डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या सहकार्याने उच्च माध्यमिक स्तरावरील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना विविध २६ विषयांमधील कौशल्य विकसनाचे विनामूल्य शिक्षण हे वर्षभरात दिले जाणार आहे. हा प्रयोग ‘मेक इन नाशिक’ आणि पर्यायाने ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेत नाशिकमधून खारीचा वाटा उचलून देईल.

प्रश्न : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाची गरज आहे...
उत्तर : नक्कीच ! महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी हा सामान्य घरांमधून येणारा असल्याने त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी कौशल्य विकसनाचे हे शिक्षण पूरक ठरेल. यासाठी आमच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी महापालिकेच्या तीन शाळांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. शालेय गळती रोखण्यासह शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या संधीचा उपयोग महापालिकेच्या शाळांना नक्कीच होईल. त्यांनी इच्छाशक्ती दाखविल्यास फाउंडेशनही नक्कीच मदतीचा हात देईल.

प्रश्न : पाचशे विद्यार्थी प्रशिक्षित करण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर कसे आहे?
उत्तर : होय, त्या दृष्टीने फाउंडेशनने आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे. पाथर्डी फाटा येथील मानवधन सामाजिक संस्थेमध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. त्यात आवश्यक तितक्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह, अद्ययावत सुविधा, लॅबरॉटरी, कॉम्प्युटर शिवाय कौशल्य शिक्षणासाठी आवश्यक ती उच्च तंत्रज्ञानावर आधारित मशिनरी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या सर्व गोष्टींची पूर्तता झाली आहे.

प्रश्न : केवळ शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचाही भार कसोटीच्या प्रसंगात फाउंडेशनने वाहिला आहे. त्याविषयी अधिक सांगा.
प्रश्न : मराठवाड्यात दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळ होता. १५ डिसेंबर २०१५ ते १५ मे २०१६ या सहा महिन्यांत बेजन देसाई फाउंडेशननने डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोजच्या जेवणाचीही सुविधा केली होती. याशिवाय विद्यापीठात आर. ओ. प्लांट उभारून शुद्ध पाण्याचीही सुविधा केली गेली. त्यांच्या शिक्षण पूर्तीत फाउंडेशनच्या वतीने मिळालेला मायेचा ओलावाही निर्णायक होता.

प्रश्न : ‘वूमन्स एम्पॉवरमेंट’ सारखेही उद्दिष्ट फाउंडेशन कसे जपते?
उत्तर : शिक्षणाच्याच माध्यमातून ‘वूमन्स एम्पॉवरमेंट’ उभारले जाते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने संचलित निराधार महिलांना आधार देणारे अनुरक्षण गृह सुरू आहे. येथे देसाई फाउंडेशनच्या मदतीने अनेक मुलींना नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील काही मुली आडगांव, रचना ट्रस्ट, जिल्हा रुग्णालयात शिक्षण घेत आहेत. तर यातील काही विद्यार्थिनी स्वत:च्या पायांवर सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत.

प्रश्न : फाउंडेशनचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. त्याविषयी माहिती द्या.
उत्तर : अशी उदाहरणे भरपूर आहे. प्रातिनिधिक उदाहरणे सांगता येतील, वडिल रिक्षाचालक व आईचा डबे बनविण्याचा व्यवसाय असताना अशा संघर्षाच्या परिस्थितीतील रोहित शिंदे या विद्यार्थ्याला अमेरिकेत शिक्षणास पाठविण्यासाठी फाउंडेशने मदत केली. अशाच परिस्थितीशी झगडणाऱ्या मानसी मदन मोहन या विद्यार्थिनीस एअर होस्टेस बनविण्यापर्यंत प्रोत्साहन दिले. त्र्यंबकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वाहार संस्थेच्या शाळेस दोन वर्गखोल्या बांधून दिल्या. ‘नाशिप्र’च्या नाशिकरोड येथील इंग्रजी शाळेला १२ हजार स्क्वेअर फुटांची इमारत शालेय वापरासाठी बांधून दिली.

प्रश्न : फाउंडेशनचे कार्य हे समाजाला दिलेले आश्वासन आहे, असा आपला विश्वास आहे...
उत्तर : ‘बेजन देसाई फाउंडेशन’ आणि ‘जयम फाउंडेशन’ या सामाजिक संस्था हातात हात घालून काम करीत आहेत. त्यांच्या कार्याचा प्रकाशझोत प्रामुख्याने ‘शिक्षण’, ‘पर्यावरण’ आणि ‘आरोग्य’ विषयांवर आहे. देसाई फाउंडेशनने यापूर्वी विद्यार्थ्यांना दिलेले कौशल्य विकसनाचे प्रशिक्षण यूएसडीच्या मोठ्या प्रकल्पात आता रुपांतरीत होते आहे. तर जयम फाउंडेशनचे कार्य ८ हजार कुटुंबांपर्यंत पोहचलेले आहे. शुद्ध पाणी, १७५ एकर जमिनीवरील दोन लाख वृक्षांची लागवड, आनंदवनात उभा केलेले मेगा बायोगॅस प्लांट आदी प्रकल्प यशस्वी झाले आहेत. ‘मानवी उत्क्रांतीचे साधन ,’ म्हणून शिक्षणाकडे देसाई सरांनी पाहिले. या सामाजिक कार्यातून फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य हेच ब्रीद जपण्यासाठी प्रयत्नशील राहील म्हणून फाउंडेशनचे कार्य हे सामाजिक आश्वासन आहे.

(शब्दांकन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट श्वानांचा सातपूरला सुळसुळाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर सहा विभागांमधून स्मार्ट मोहल्ला म्हणून नामांकन दिलेल्या नीलकंठेश्वर नगरमध्ये मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट श्वानांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि त्यानंतरच स्मार्ट मोहल्ला म्हणून घोषणा करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या आदेशावरून नाशिक महापालिकेत स्मार्ट मोहल्लाची संकल्पना राबविली जात आहे. यासाठी शहरातील सहाही विभागात आरोग्य विभागाने स्मार्ट मोहल्ला करण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. सातपूर भागातही आरोग्य विभागाने नीलकंठेश्वरनगरला स्मार्ट मोहल्लाचे नामांकन असल्याचे जाहीर केले. सभापती माधुरी बोलकर यांनी अधिकाऱ्यांसोबत स्मार्ट मोहल्ल्याची नुकतेच पहाणी केली होती. याप्रसंगी त्यांनी परिसरात घाण, कचरा टाकला जाता कामा नये, याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. पहाणी दौऱ्यात रहिवाशांनी स्मार्ट मोहल्ल्यात मोकाट श्वानांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी बोलकर यांच्याकडे केल्या होत्या. असे असतांनाही आरोग्य विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने संभाव्य स्मार्ट मोहल्ल्यात मोकाट श्वानांचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट मोहल्ला जाहीर करण्यापूर्वी तरी मोकाट श्वानांचा बंदोबस्त महापालिकेने करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अशोकनगरमधील नीलकंठेश्वरनगरमध्ये रहिवाशांसह कामगारांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट मोहल्ला जाहीर करण्यापूर्वी तरी मोकाट श्वानांचा महापालिकेने बंदोबस्त करावा. उघड्यावर खाद्यपदार्थ टाकले जात असल्याने मोकाट श्वान नीलकंठेश्वरनगर भागात येतात.
- राजेंद्र बैरागी, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्ण सेवेचे अर्धशतक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
‘एकच धर्म... मानव धर्म’ असे ब्रीद घेवून या नावाने संस्था स्थापन करणाऱ्या नाशिकच्या तरुणाईने मनोरुग्णाला आपुलकीचा हात दिला आहे. मनोरुग्णांला शोधून त्याला आंघोळ घालण्यापासून त्याची कटींग, दाढी व नखे कापण्याचे काम दर रविवारी ही तरुण मंडळी करतात. तब्बल पाच आठवड्यांपासून सुरू केलेले हे काम आता अर्धशतकापर्यंत पोहचले आहे. मनोरुग्णांची सेवा करत त्यांनी माणुसकी धर्माचा मार्ग समाजाला दाखवला आहे.

मनोरुग्णांची वाढणारी संख्या व त्यानंतर त्याची होणारी हेटाळणी हे समाजात नवीन नाही. पण, या रुग्णांना मायेचा हात मिळाला तर त्यातून परिवर्तनाची आशा बळावते. या रुग्णांची एकूण स्थिती व त्यातून त्यांना होणारा त्रासही प्रचंड असतो. अशा रुग्णांकडे जाण्यास बरेच जण घाबरतात. पण या संस्थेच्या सदस्यांना मात्र हे धैर्य केले. त्यासाठी त्यांनी अगोदर हे मनोरुग्ण शोधले त्यानंतर त्यांच्यावर माणुसकीचे उपचार केले.

स्वत: अनाथ असलेल्या सुलक्षणा आहेर यांचा मनोरुग्ण सेवेमध्ये मोलाची भूमिका आहे. त्याच या संस्थेच्या प्रमुख आहेत. अवघ्या १२ दिवसांची असतानाच सुलक्षणा याच्या वाट्याला अनाथ होण्याची वेळ आली. त्यानंतर नाशिक येथील अनाथाश्रमामध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमामधून बाहेर पडलेल्या सुलक्षणाला दोन दिवस सीबीएसवर काढावे लागले. त्यानंतर ‌त्यांनी बेघर मुलांकरिता काम सुरू केले. आता त्यांनी मनोरुग्ण सेवा सुरू केली आहे. त्यांना या कार्यात संस्थेच्या अन्य सदस्यांसह सुधीर दोंड यांचीही मदत होते. मनोरुग्णांसाठी कपडे वा अन्य मदत करायची असल्यास इच्छुकांनी ७०३८२०५८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

नाशिककरांचा प्रतिसाद
यापूर्वी या संस्थेचे सदस्य मनोरुग्णांना कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये नेत. येथे डॉ. भरत वाटवाण त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्याचे काम करत होते. त्यानंतर या रुग्णांवर नाशिकमध्येच सेवा देण्याचे काम या तरुणाईने केले व त्यांना नागरिकांनीही प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुंबई-आग्रा महामार्ग सर्व्हिस रोडवर कचरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नदी, नाले, पूल, गटारी, वापराविना पडलेल्या जागा अशा ठिकाणी सर्रासपणे कचरा टाकणारे आता मुख्य महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरही कचरा टाकू लागले आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांच्याकडेला आता कचऱ्याचे ढिगारे जमा व्हायला लागले आहेत. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा डिंगोरा पिटला जात असताना दुसरीकडे रस्तेच अस्वच्छ होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाच्या पंचवटी परिसरातील हनुमाननगर, अमृतधाम, के. के. वाघ कॉलेज आदी भागातील सर्व्हिस रोडलगत हा कचरा मोठ्या प्रमाणात जमा व्हायला लागला आहे. त्यात कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, काचेच्या तुटलेल्या, फुटलेल्या वस्तूंचे प्रमाण जास्त दिसत आहेत. या रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनातूनही हा कचरा रस्त्याच्या कडेला फेकण्यात येतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या सरंक्षक भिंतीमुळे हा कचरा वारा सुटल्यानंतर रस्त्यावरच येतो. या भागात कचरा टाकणाऱ्यांवर कुणीही आळा घालणारे नसल्यामुळे थोड्याच दिवसात या भागात कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे तयार होतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे कचरा पडू लागला आहे.

रहिवाशांकडूनच अस्वच्छता
स्थानिक रहिवाशांकडून आपल्या घरातील कचरा रस्त्याने जाताना सर्रासपणे याच मार्गावर फेकला जातो. सार्वजनिक स्वास्थ बिघडविणारे असे कृत्य करताना कुणीही विरोध करीत नसल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनणार चालली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ निवृ‌त्तिनाथ मंदिर उभारणी हे ईश्वरी कार्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
श्री संत निवृ‌त्तिनाथांचे काळ्या पाषाणातील मंदिर उभारणी हे ईश्वरी कार्य आहे. ते आपल्या हातून घडत आहे. याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

निवृ‌त्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोधार कामाचे भूमिपूजन आणि भक्त निवासाचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्र्यंबकमधील कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाल्याचे दिसून आले. या प्रसंगी मंचावर जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आशिष शेलार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र आदींसह साधू संतांची प्रमुख उपस्थिती होती.

वारकरी संप्रदायाची महतीविषयी मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्रावर परकीय आक्रमण होत असताना वारकरी संप्रदायाने भागवत धर्म जनामनात पोहचविला. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता वारकरी पायी पंढरपूर वारीस जातात. पांडुंगाचे नाव घेत दरसाल नवी उमेद घेतात. कुंभमेळ्याबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, की कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच आम्ही सत्तेत आलो. त्यामुळे काम करण्यास अतिशय कमी वेळ मिळाला. तरीही सरकारने २४०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला. कुंभमेळा हे शिवधनुष्य होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यात यशस्वी कामगिरी करून दाखविली. म्हणूनच एमआयटीसारख्या संस्थेने अमेरिकेत त्यांचा गौरव केला. युनेस्कोत कुंभमेळा जागत‌िक वारसा घोषित केला आहे. त्र्यंबकचे महत्त्व अनन्य साधारण आहे. देशभरातील संतांना येथे यावेच लागते.

कार्यक्रमास आळंदीचे मारुतीबाबा कुर्हेकर, षडदर्शन आखाडा परिषद अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज, माधव महाराज घुले, पंढरपुरचे श्री गुरूचैतन्य महाराज देगलूरकर, बंडा महाराज कऱ्हाडकर, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, महामंडळेश्वर देवबाप्पा रघुनाथ महाराज, जीर्णोद्धार समितीप्रमुख संदीपन महाराज शिंदे, वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले, सिन्नरचे त्र्यंबकबाबा भगत, गजानन महाराज संस्थान, शेगावचे अध्यक्ष शिवशंकर पाटील, ललिता शिंदे यांच्यासह मंदिराचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.

निवृ‌त्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोधार कामाचे भूमिपूजन आणि भक्त निवासाचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात पंडित कोल्हे महाराज यांनी संत निवृत्तीनाथ महाराज अंभग पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या गाथेचे पाठांतर करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यास सुवर्ण प्रतिमा भेट देण्यात आली.

त्यांच्या नशिबी नसावे भाग्य!
त्र्यंबकच्या विकासासाठी स्वतंत्र बैठक घेणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोणतीही ठोस घोषणा न करता त्यांनी संत निवृत्तीनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्य सरकारी योजनेत कसे बसते याबाबत तरतूद करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेता आले हे मी माझे भाग्य समजतो, असे ते म्हणाले. राज्यातील यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या नशिबात ते नसावे, अशी कोपरखळीही त्यांनी विरोधी पक्षाला मारली.

नियोजनाचा अभाव

संत निवृ‌त्तिनाथ महाराज समाधी मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन मंदिराच्या सभामंडपात होते. तेथे जातांना अरुंद गेटमधून मुख्यमंत्री आत गेले. अनेकांना मंदिर सभामंडपात पोहचताच आले नाही. येथे विश्वस्त आणि त्यांचे आप्तमित्र यांचीच जास्त गर्दी केली. मुख्यमंत्र्यांचे औक्षण विश्वस्त मंडळींच्याच हातून झाले. वास्तविक सर्वसामान्य वारकरी महिलेच्या हातून औक्षण व्हावे, अशी अपेक्षा होती. शिक्षण घेणारी मुले दुपारी एक वाजेपासून मंदिरासमोर भजन म्हणत होती. प्रत्यक्ष कार्यक्रम चार वाजेच्या दरम्यान झाला. लहान वारकरी मुले तीन तास ताटकळली. पुढाऱ्यांच्या गराड्यात सापडलेल्या मुख्यमंत्र्यांचे त्यांच्याकडे लक्षही गेले नाही. पोलिसांनी सकाळपासूनच शहरात बंदोबस्त आवळला होता. शहराबाहेर भाविकांची वाहने थांबविण्यात आली. त्यामुळे दोन किलोमीटरची पायपीट भाविकांना करावी लागली. मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार होता त्या मार्गावर सकाळपासून दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, व्यवसायिकांनी त्यास विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीसाठी नाशिकला जोडरस्ता

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक
समृद्धी महामार्गाशी नाशिक शहर थेट जोडले जावे यासाठी डेडिकेटेड कनेक्टरची (समृद्धी महामार्गासाठीचा जोडरस्ता) मागणी होत आहे. इगतपुरीपासून नाशिक शहरापर्यंत तो कसा तयार करता येईल, याचा अभ्यास करण्याचे आदेश यंत्रणेला तात्काळ दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नाशिककरांना दिली. हा मार्ग झाल्यास शहर थेट समृद्धी महामार्गाशी जोडले जाऊ शकणार आहे.

‘क्रेडाई’च्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित शेल्टर २०१७ प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष सुनील कोतवाल, उदय घुगे, उमेश वानखेडे, आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे आदी मान्यवर उपस्थ‌ित होते. समृद्धी महामार्ग नाशिक शहराशी जोडल्यास निश्च‌ितच शहराच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे हा महामार्ग शहराशी जोडावा अशी मागणी ‘क्रेडाई’चे अध्यक्ष सुनील कोतवाल आणि समन्वयक उदय घुगे यांनी यावेळी केली. हाच धागा पकडत फडणवीस म्हणाले, की समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. त्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमिनी देखील देत आहेत. या महिनाअखेरपर्यंत ५० टक्क्याहून अधिक जमिनी सरकारच्या हाती असतील. त्यामुळे दोन महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण करून फेब्रुवारीमध्ये महामार्गाचे काम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला देशाच्या २० वर्ष पुढे घेऊन जाण्याऐवढी या महामार्गाची शक्ती आहे.

डीपीसीआरबाबत मुंबईत बैठक
शहर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीपीसीआर) अनेक अडथळे आहेत. त्यामुळे शहरात पार्किंग व इतर अनेक विषयांशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास यावेळी आणून देण्यात आली. डीपीसीआरमध्ये बदल करावा अशी बांधकाम व्यावसायिकांची मागणी असेल तर याबाबत मुंबईत लवकरच बैठक घेतली जाईल. बांधकाम व्यावसायिकांना अपेक्षित बदल करण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
नागरिकांना परवडणारी घरे द्या
२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वाधिक गुंतवणूक बांधकाम व्यवसायामध्ये होणार आहे. सरकारला शहरात १० लाख तर ग्रामीण भागात साडे बारा लाख घरे बांधायची आहेत. झोपडपट्टीधारक, बेघर तसेच तरुणाईला परवडणारी घरे द्यायची आहेत. सोलापूरमध्ये ३० हजार तर नागपूरमध्ये १० हजार घरांचे काम सुरू आहे. नाशिकमध्येही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून क्रेडाईने हे शिवधनुष्य पेलावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महापालिका आणि बांधकाम व्यावसायिक एकत्रित आले तर नाशिकमध्येही नागरिकांना परवडेल असा हाउसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर तयार होईल आणि बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येतील. अशा प्रकारचे प्रस्ताव आल्यास आयुक्तांनी आमच्याकडे पाठवावेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून त्यास तात्काळ मान्यता मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नाशिकला उत्तम शहर बनवू
नाशिक शहर मी दत्तक घेतले आहे. हे शहर उत्तम झाले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. महापालिका, लोकप्रत‌िनिधी तसेच क्रेडाई त्यासाठी घेऊन येणाऱ्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क तयार करण्यास विलंब झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. परंतु ते आता आम्ही लवकरच सुरू करीत आहोत. या माध्यमातूनच वायफाय सिटी करण्यात येणार असून शहराला वेगळा दर्जा मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानातर्फे रंगले ‘उत्तरदायित्व’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवी मनात एकमेकांबद्दल मत्सर, अहंकार, द्वेष सतत खदखदत असतो आणि भविष्यात त्याचे परिणाम युद्धरूपात सर्वांना भोगावे लागतात. या युद्धात होणाऱ्या रणसंग्रामात अनेक जनांचा निष्कारण बळी जातो पण या सर्वांचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार या प्रश्नाचे उत्तर शोधणारे नाटक म्हणजे ‘उत्तरदायित्व’.
सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रेक्षकांसाठी राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणारे नाटक विनामूल्य दाखविण्यात येते. त्याअंतर्गत ‘उत्तरदायित्व’ हे नाटक सादर करण्यात आले. नाटकाचे लेखन विद्याधर निरंतर यांनी केले होते. दिग्दर्शन रोहित पगारे यांचे होते. नेपथ्य नीलेश राजगुरू यांचे तर प्रकाश योजना रवींद्र रहाणे यांची होती. पार्श्वसंगीत रोहित सरोदे यांचे, रंगभूषा माणिक कानडे, निर्मिती प्रमुख आनंद जाधव होते. रंगमंच व्यवस्था रोहित जाधव यांची होती. नाटकात अजय तारगे, किरण जायभावे, मंजुषा फणसळकर, प्रतिक विसपुते, धनंजय निकम, विश्वंभर परवर, कृतार्थ कंसारा, अभिजित लेंडे, प्रसाद काळे, रोहित पगारे, नीलेश राजगुरू, रघुवीर शिरसाठ, सागर काची, तिष्या मुनवर, तेजस्वी देव यांनी भूमिका केल्या.

आज ‘मून विदाउट स्काय’
प्रारंभी नाटकातील सर्व कलावंतांचा सावाना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सावानाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी, नाट्यगृह सचिव डॉ. धर्माजी बोडके यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लेखक विद्याधर निरंतर यांचा सत्कार पसा नाट्यगृह व्यवस्थापक दिलीप बोरसे यांनी केला. राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे नाटक ‘मून विदाउट स्काय’ हेदेखील गुरूवारी, २८ डिसेंबर रोजी प. सा. नाट्यगृहात दाखविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिलिंडर स्फोटाने हिरावाडी हादरली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हिरावाडी परिसरातील शिवकृपानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यात मंगळवारी (दि. २६) पहाटे पाचच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. स्फोटाच्या आवाजाने हिरावाडी परिसर हादरून गेला. या स्फोटाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने यात जी‌वितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मूळचे उत्तर प्रदेशातील केशव मकलू चव्हाण व अखिलेश केशव चव्हाण यांनी शिवकृपानगर येथे पाणीपुरी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. राहत्या इमारतीच्या गच्चीवरच्या भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या या कारखान्यात नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. २६) पाणीपुरी बनविणे सुरू होते. यावेळी सिलिंडरच्या नळीने अचानक पेट घेतला. या पेटलेल्या नळीमुळे जवळच असलेल्या खाद्यतेलाच्या डब्याचाही भडका उडाला. नळी आणि डब्याच्या आगीमुळे येथे असलेल्या सिलिंडरच्या दोन टाक्या एकापाठोपाठ एक अशा फुटल्या त्यांचे स्फोट झाले. पहाटेच्या साखरझोपेत असलेल्या येथील रहिवाशांची या स्फोटाच्या आवाजाने झोपमोड झाली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आपापल्या घराबाहेर पळ काढला. इमारतीच्या गच्चीवर आग लागल्याचे बघून त्यांनी अग्निशामक दलाला आणि पंचवटी पोलिस स्टेशनला दूरध्वनीवर कळविले. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझविली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी तेथील पाणीपुरी बनविण्याच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य जळून खाक झाल्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

रहिवाशी भागात अनधिकृत व्यवसाय

हिरावाडीतील शिवकृपानगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथे अनेक महिन्यांपासून पाणीपुरी तयार करण्याची भट्टी सुरू होती. ही भट्टी येथे लोकवस्तीच्या ठिकाणी अनधिकृतपणे सुरू असताना त्याची तक्रार कोणीच का केली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाच्या हा प्रकार कधी लक्षात आला नसावा का? लोकवस्तीच्या ठिकाणी अशा प्रकारे धोकेदायक व्यवसाय केले जात असतील तर तेथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होतो. स्फोट होऊन लागलेल्या आगीची झळ जर शेजारच्या इतर इमारतींना बसली असती, तर मोठा धोका निर्माण झाला असता. अशा प्रकारच्या लोकवस्तीतील अनधिकृत व्यवसायांवर बंदी घालण्याची मागणी या घटनेमुळे जोर धरू लागली आहे.

‘सप्तशृंगी’तील घटनेला उजाळा

पंचवटीतील मेरी परिसरातील तारावाला नगर येथील सप्तशृंगी अपार्टमेंटच्या गाळ्यात अनधिकृतपणे स्फोटक वस्तू बनविण्याचा प्रकार सुरू होता. सात वर्षांपूर्वी त्या गाळ्यात स्फोट होऊन मोठी जीवितहानी झाली होती. पाणीपुरीच्या भट्टीच्या स्फोटामुळे रहिवाशांमध्ये सप्तशृंगी इमारतीतील स्फोटाच्या घटनेला अनेकांनी उजाळा दिला. या गंभीर घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. लोकवस्तीत असे प्रकार घडत असतील तर त्याची माहिती स्थानिक नागरिकांनी द्यायला हवी, तरच अशा घटना टळू शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्त दाखला तीन लाखांत

$
0
0

नाशिकः जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या, शहरातील एकाच हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या १० ते १२ जणांनी बीड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला वापरून आरोग्य विभागात नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. हा आकडा यापेक्षा अनेकपट अधिक असून, आरोग्य विभाग मात्र चौकशी करण्याचे टाळत आहे.

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय आणि रूग्णालये (डीएमइआर) मार्फत राज्यातील सरकारी हॉस्पिटल्ससाठी स्टाफ नर्स व इतर पदासाठी वेळोवेळी परिक्षा घेतली जाते. २००८ पासूनची निवड झालेल्या व्यक्तींची यादी पाहिल्यास यात गत वर्षी प्रकल्पग्रस्त नसलेला व्यक्ती पुढील वर्षी प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळवून नोकरी पदरात पाडून घेतो. नाशिकमधील असे १० ते १२ व्यक्ती सध्या स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. या घोटाळ्याबाबत बोलतांना सूत्रांनी सांगितले की, या व्यक्तींचे मुळ नाशिक जिल्ह्यातीलच आहे. त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांचे दाखले मात्र बीड तसेच जळगाव जिल्ह्याचे आहेत. मुख्यत्वे बीडमधून मिळणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची यादी पाहता हा जिल्हा विविध विकासकामांमुळे समृद्ध झाला असावा, असे म्हणण्यास वाव आहे. प्रकल्पग्रस्त दाखला मिळणाऱ्या कुटुंबातील एकाच सदस्यास लाभ मिळू शकतो. मात्र, आजमितीस एकाच कुटुंबातील भाऊ, बहीण, नवरा-बायको असे प्रकल्पग्रस्तांची प्रमाणपत्रे मिळवून लाभ उठवत आहेत. याप्रकरणी सर्वच स्तरावर तक्रारी करूनही चौकशी होत नाही.

प्रमाणपत्र देणारेच करतात व्हेरिफाय

प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्याचे सर्वाध‌िक काम बीड जिल्ह्यात होते. औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक एजंट कार्यरत असून, अगदी तीन लाख रुपयांत असे प्रमाणपत्र देण्यात येते. दुर्दैवाने एखाद्या प्रकरणाची तक्रार करण्यात आल्यास प्रकल्पग्रस्तांचे दाखले व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा त्याच पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात येतात. याप्रकरणी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान जवळपास २६ बनावट प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण मॅरेथॉनमध्ये धावल्या ४५० महिला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नारी सहाय्यता केंद्र बागलाण, महिला पंतजली योग समितीच्या वतीने आयोजित बागलाण मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. तरुणी व महिलांसाठी आयोजित या मॅरेथॉनसाठी सकाळपासूनच उंदड प्रतिसाद लाभला. सात किलोमिटर अंतराच्या या मॅरेथॉनचा समारोप ठेंगोडा येथील श्री सिद्धीविनायक मंदिराजवळ करण्यात आला. या स्पर्धेत सुमारे ४५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.

लोकनेते कै. पं. धं. पाटील चौकात सकाळी सात वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, नगराध्यक्ष सुनील मोरे, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील, संयोजक डॉ. विद्या सोनवणे, नारी सहायता केंद्राच्या अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे, नंदकिशोर शेवाळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.

सात किलोमिटर अंतराच्या स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात १५-३० वर्ष आणि दुसऱ्या गटात ३० ते ७० वर्ष असे विभाजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थिनींसह ज्येष्ठ महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने शहराच्या माध्यमातून प्रथमच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद दिला.

सटाणा ते ठेगोंडा श्री सिद्धीविनायक मंदिरादरम्यान ठिकठिकाणी स्पर्धकांना प्रात्साहन देण्यासाठी विविध सामाजिक मंडळांनी मंडपासह इतर सुविधा दिल्या होत्या. विजयी स्पर्धकांना प्रसिद्धी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. व्हावळ, नगराध्यक्ष सुनील मोरे, भारत स्वाभिमान संघटनेच्या महामंत्री लता शिंदे, योगशिक्षिका योगिता काळे, निखिल महाले व मधुकर नंदाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वतीतेसाठी नारी सहायत्ता केंद्र व पतंजली योग समितीच्या कल्पना पवार, शितल जाधव, रुपाली कोठावदे, अपेक्षा चव्हाण, प्रतिभा शिंदे, सुजाता पाठक, आशा भदाणे, संगिता मोरे, मेघना भावसार, वर्षा शिरोंडे, अनिता शिंपी यांनी परिश्रम घेतले.

ठेगोंडा येथील मंद‌रिापर्यंत स्पर्धा

ठेगोंडा श्री सिद्धीविनायक मंद‌रि येथे १५ ते ३० वयोगटातील मोहिनी साबळे (प्रथम), विमल महाले (द्वितीय), अश्विनी महाले (तृतीय), प्रिया जाधव, ललीता गावीत यांना उत्तेजनार्थ बंक्षीस देण्यात आले. तर ३० ते पुढील वयोगटात ऊर्मिला जाधव (प्रथम), कृणाली खैरणार (द्वितीय), नंद‌निी अहिरे (तृतीय), तर उषा ठाकरे व छाया गायकवाड यांना (उत्तेजनार्थ) बक्षीस देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुसतीच पायाभरणी, ‌विकास कधी?

$
0
0


सटाणा नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांची वर्षपूर्ती ही शहराच्या विकासपर्वाच्या विकासाची पायाभरणी करणारी ठरली आहे. सटाणा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपयांची पुनद पाणीपुरवठा योजनेची नांदी, शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २ कोटी रुपये खर्चाची रिंगरोडची होत असलेली निर्मिती व सोबत जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन या कामांतून विकासाची आस दाखविणाऱ्या नगराध्यक्ष सुनील मोरे यांना मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागणार आहे.

सटाणा नगर परिषदेचे तिसरे थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कार्यकाळास २६ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. सटाणा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरविकासाची स्वप्नांची मालिका दाखवून राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपाच्या शिलेदारांना पराभूत करून शहराच्या प्रथम नागरिकपदावर विराजमान होणाऱ्या सुनील मोरे यांनी ‘सत्तेशिवाय शहाणपण नाही’ या उक्त‌िनुसार भारतीय जनता पक्षाशी सलगी केली असली, तरीही एक वर्षात विकास बाळसे धरू शकला नाही. वर्षपूर्तीनंतर शहरात विकासकामांची रेलचेल की नुसताच भुलभुलैया असेल, याबाबतचे चित्र लवकचर स्पष्ट होणार आहे.

गत दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोखडात विकासापासून वंचित असलेल्या सटाणावासियांनी सटाणा शहर विकास आघाडीच्या मनमोहक स्वप्नांना व घोषणांना डोक्यावर घेतले. थेट नगराध्यक्ष पदासह सटाणा शहर विकास आघाडीच्या ५ सदस्यांना विजयी केले. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने शहर विकास आघाडीने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाच्या पाच नगरसेवकांना सोबत घेऊन पालिकेतील सत्तेचे समीकरण जुळविले आहे. उपनगराध्यक्ष, सभापती अशी सत्तेची ऊब देवून मतदार संघातील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या सहकार्याने स्वप्नपूर्तीसाठी वाटचाल सुरू केली आहे.

सटाणावासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व संवदेनशील असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाला पर्याय ठरणाऱ्या बायपास व रिंगरोडचा प्रश्न, देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक, बालगोपाळ व वृद्धांसाठी असलेले बालोद्यान, पार्क, ग्रीन जिम आदी प्रश्न आ वासून होतेच. तब्बल दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे राज्यात व पालिकेत सत्ता असतानादेखील तत्कालीन आमदार संजय चव्हाणांसह अनुयायांना उपरोक्त प्रश्न सोडविण्यात अपयश आले होते. या पार्श्वभूमीवर सटाणा नगरपालिकेत गत वर्षभरापूर्वी जनतेने सत्तांतर घडवून आणले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात पालिकेतील पदांच्या संगीतखुर्चीमुळे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत गेले, ते आजही कायम आहेच. विद्यमान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आपल्या नव्या दमाच्या खेळांडूचा पदग्रहण समारंभ २६ डिसेंबर २०१६ रोजी आम जनतेत अत्यंत रुबाबदारपणे केला. यामुळे साहजिकच जनतेच्या अपेक्षा अधिक उंचावल्या.

प्रारंभी स्वच्छ व सुंदर सटाणा संकल्पना राबविण्याचा मानस ठेवत त्यांनी शहरातील सर्वच मोकळे भूखंड, पटांगणे, खासगी मालमत्ताधारकांच्या मोकळ्या भूखंडांवरील गाजरगवताचे निर्मूलन केले. परिणामी ही मैदाने व खुल्या जागा मोकळा श्वास घेऊ लागली. परिणामी, डासांचे निर्मूलन झाले. तणनाशकांची फवारणी करून त्रास वाढू नये याची व्यवस्थादेखील केली. मात्र, पावसाळ्यात पुन्हा गवत वाढले आणि स्थिती जैसे थे झाली.

शहरात सर्वत्र स्वच्छ व सुंदर सटाणा निर्मितीसाठी व जनतेच्या आरोग्यासाठी शहरातील नऊ हजार शौचालयांना डास प्रतिबंधक जाळी बसविण्याचा उपक्रम राबविला. शहरातील मोकळ्या भिंतींवर विविध आकर्षक रचना व सुविचार, काव्यमय पंक्तींद्वारे जनतेला स्वच्छतेकडे प्रवृत्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या तसेच अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छ व सुंदर सटाणा शहराचे संकल्पित चित्र कागदावरच राहिल्याचे वास्तव शहरात फेरफटका मारल्यावर दिसून येते.

सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून गती दिली, ही निश्चितपणे वर्षभरातील जमेची बाजू आहे. सटाणा शहराला पुनद धरणातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण मंजूर करून घेतानाच पुनद धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनकरिता ५५ कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे. सदर मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. यामुळे ही मोठी ऐतिहासिक कामगिरी करून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मोरे यांनी यश संपादन केले आहे.

निवडणूक कार्यकाळातील आश्वासनपूर्तीच्या दिशेने मोरे यांनी दुसरे पाऊल टाकले आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या पाठक मैदानावर नाना-नानी पार्क, तसेच भाक्षी रोड ते नामपूर रोडला जोडणाऱ्या रिंगरोडचा भूमिपूजन समारंभ आटोपून प्रत्यक्ष कामांना चालना देण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांच्या या विकासकामांना प्रत्यक्षात नववर्षात प्रारंभ होत आहे. वर्षपूर्तीपूर्वी विद्यमान शहर विकास आघाडी व भाजपच्या संयुक्त टीमने शहरवासीयांच्या गुलाबी स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लाल गालीचे टाकण्यास प्रारंभ केला आहे.

सटाणा नगरपरिषद हद्दीतील दोधेश्वर नाक्यानजीक असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्कॉयवॉक व्हावा, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असलेल्या या कामासाठीदेखील मंजुरी मिळणार आहे. शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज रथ मार्गावरील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी गतकाळात शासनाने निधीदेखील मंजूर केला होता. मात्र, तत्कालीन सत्ताधारी वर्गाने सदरचा निधी अन्यत्र वापरून गोंधळ केला होता. मात्र, विद्यमान नगराध्यक्ष मोरे यांनी पुनश्च शासनाकडून ८८ लाख रुपये या कामासाठी मंजूर करून घेत विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी चालना दिली आहे.

नववसाहतींमधील परिस्थिती ‘जैसे थे’

सटाणा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन देणाऱ्या विद्यमान नगराध्यक्षांनी सटाणा नगरपरिषदेला कररूपाने सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या नववसाहत परिसरांना अच्छे दिन अद्यापही दाखविलेले नाहीत. किंबहुना या वर्षभरात एकही नव्याने रस्ता, गटारी, करण्यात न आल्याने नववसाहतीमध्ये आजही रहिवाशांना खड्डयातून आपला मार्ग काढीत जावे लागत आहे. या परिसरात गटारी, नाले नसल्याने शौचखड्डयांचे पाणी इतरत्र पसरून घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. परिणामी नववसाहत परिसरात आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. प्रचंड घरपट्टी आकारूनदेखील शहरातील जनतेला सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने नववसाहत परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठा

सटाणा पालिकेच्या वतीने शहरात सुमारे पाच जलकुंभ आहेत. शहरातील चार उद्भवविहिरी आहेत. एक दिवसाआड बारमाही पाणीपुरवठा करण्यात येतो. गिरणा नदीपात्र दुथडी भरून वाहत असतानादेखील शहरवासीयांना दरडोई प्रतिमाणसी १५० लिटर पाणीपुरवठा करण्यास पालिका प्रशासन सक्षम नसल्याने शहरवासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो. त्यातही गिरणा नदीपात्रातील जॅकवेल व अथवा मोटार नादुरूस्त झाल्यास शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो. पर्यायाने दुसरी मोटारदेखील कोणत्याही प्रशासनाला उपलब्ध करता आलेली नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे.

स्वच्छतेची ऐसीतैसी

सटाणा शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पालिकेतील आरोग्य कर्मचारी मर्यादीत आहेत. परिणामी शहरातील स्वच्छता हा विषय डोकेदुखीचा ठरला आहे. खासगी ठेकेदारी पद्धतीवर दिलेली स्वच्छता मोहीमदेखील चर्चेचा विषय आहे. पालिकेतील बहुतांश कर्मचारी स्वच्छता विभागाकडे असताना नात्यागोत्यांमुळे विविध विभागांवर कामे करीत असल्याची चर्चा आहे. परिणामी ‘स्वच्छ, सुंदर सटाणा’ संकल्पनेला गालबोट लागले आहे. गटारीदेखील तुंडुंब भरून वाहत असताना त्या उकरण्यास विलंब होत असतो.

अतिक्रमण विभाग सक्रिय नाही

सटाणा शहरातून जाणारा विंचूर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्ग अत्यंत संवेदनशील झाला आहे. या राज्य महामार्गाच्या दुतर्फा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, पंतसंस्था, पेट्रोल पंप, शाळा, विद्यालये, खासगी व व्यापारी प्रतिष्ठाणे आहेत. राज्य महामार्गावरील अतिक्रमण, फेरीवाले, दुचाकी वाहने काढण्यासाठी पालिकेची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने याठिकाणी दररोज लहान-मोठ्या स्वरुपाचे अपघात होत असतात. यामुळे पालिका प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.

वर्षभरातील ठळक वाटचाल

- पालिकेच्या इतिहासात प्रथमच सिटी डेव्हलपमेंट प्लान व डीपीआर प्रकल्प खासगी कंपनीकडून तयार

- ११ वर्षांपासून पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम १ कोटी १५ लाख रुपयांचे वितरण

- पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ९३.८४ टक्के वसुली

- शहरातील बंद स्थितीतील ४.५ किमी लांबीच्या गटारी वाहत्या केल्या

- तिमाही फवारणी मोहीम शहरात सुरू

- पालिकेचा हेल्पलाइन नंबर सुरू

- पंतप्रधान आवास योजनेत शहराचा समावेश

- महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत १२० महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण

- पालिकेच्या वतीने पहिल्यांदा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सुरू

- जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन

नगराध्यक्ष म्हणतात...

शब्दपूर्ती हेच ध्येय

पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीने दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ती करण्यासाठी झटत आहोत. प्रत्येक आश्वासनाची पूर्ती करणे हेच अंतिम ध्येय आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मदतीने व सहकार्याने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील चार वर्ष ही सटाणा शहरात विकासाची गंगोत्री आणणारी असतील. पालिका सभागृहात कोणताही गट-तट नाही. केवळ शहरविकास हाच ध्यास घेऊन सर्वच नगरसेवक कामकाज करून सहकार्य करीत आहेत, ही समाधानाची बाब असल्यानेच वर्षभरात आपण महत्त्वपूर्ण विकासकांमाचे ठराव करून घेतले आहेत. आता या कामांची अंमलबजावणी करून प्रत्यक्षात विकास करणे हा उद्देश आहे. यामुळेच पालिकेच्या इतिहासात प्रथमच आपण ६५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करून विकासाची चाहुल या अर्थसंकल्पातून प्रतिबिंब‌ित केली आहे.

- सुनील मोरे, नगराध्यक्ष

अधिकारी म्हणतात...

वर्षभरातील पालिका प्रशासनाचे कामकाज अत्यंत सुखद व समाधानकारक आहे. पक्षीय पातळीवर झालेल्या निवडणुका विसरून सर्वच नगरसेवक आपापल्या प्रभागासोबतच शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या विविध योजना व नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा कल असला तरीही प्रशासकीय पातळीवर सातत्याने करावा लागणारा पाठपुरावा, शासनाचे निकष व तांत्रिक अडीअडचणींमुळे विलंब होतो. मात्र, तरीही शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्रित कामकाज करीत असल्याचा अनुभव निश्चितपणे आशादायक आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणूनदेखील आपण अत्यंत काळजीपूर्वक व सूक्ष्मपणे पालिका प्रशासनाच्या कारभाराकडे लक्ष ठेवून आहोत.

- हेमलता डगळे, मुख्याधिकारी


विरोधक म्हणतात...

‘शायनिंग सटाणा’चे फुगे

गत वर्षभरापासून केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या शहरविकास आघाडीने एक वर्षात शहरातील जनतेची फसवणूक केलेली आहे. कोणताही विकास झालेला नाही की ठोस कामे झालेली नाहीत. केवळ वल्गना करून शाय‌निंग इंडियाच्या धर्तीवर सटाणा शायनिंगचे फुगे उडविण्यात येत आहेत. नाना-नानी पार्क, रिगरोंडचे भूमिपूजन होऊन तीन महिने लोटूनही साधी वीटही रचण्यात आली नाही.

- काकाजी सोनवणे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस


विरोधक म्हणतात...

काम दाखवा...

विद्यमान प्रशासनाचे शहरात एक रुपयाच्या विकासाचेही काम नाही. काम दाखवा आणि बक्षीस मिळवा हे आपले जाहीर आवाहन असून, गत कार्यकाळातील कामेच यावर्षीदेखील होत आहेत. शहरविकासासाठी सभागृहात आपण एका विचाराने असलो, तरी मनात प्रचंड खंत असून आगामी बैठकीत यावर आपण निश्चितपणे खडे बोल सुनावणार आहोत.

- दिनकर सोनवणे, गटनेते, काँग्रेस

(संकलन- कैलास येवला)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’साठी उद्या मतदान

$
0
0

निवडणुकीसाठी राज्यातील ३२ मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा; तयारी पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळांसाठी गुरुवारी (दि. २८) मतदान होणार आहे. राज्यभरात या निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान प्रक्रियेसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन व सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. २६) मतदान साहित्याचेही वितरण करण्यात आले.

ही आहेत मतदान केंद्रे

नाशिकमध्ये आयुर्वेद सेवा संघाचे आयुर्वेद कॉलेज, मुंबई भायखळा येथील ग्रँट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल कंपाऊंड, मुंबई येथे सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, के. ई. एम. हॉस्पिटल कंपाऊंड, सेंट्रल मुंबई येथील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, वरळी येथे आर. ए. पोतदार आयुर्वेद कॉलेज, सायन येथे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एस.ए.एस.एस. योगिता डेंटल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, खारघर नवी मुंबई येथे येरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज, पुणे येथील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, बी. जे. मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेद कॉलेज, आकुर्डी येथील पी. डी. ई. एस. कॉलेज ऑफ आयुर्वेद अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, सांगली जिल्ह्यात मिरज येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज, सातारा येथील एस. सी. मुथा आर्यांग्ल आयुर्वेद कॉलेज, कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय कॉलेज, सोलापूर येथे डॉ. वैशंपायन मेमोरिअल शासकीय वैद्यकीय कॉलेज, नाशिक येथे आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद कॉलेज, धुळे येथे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय कॉलेज, जळगाव येथे चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेज, अहमदनगर येथे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज, संगमनेर येथे श्रीमती मथुराबाई भाऊसाहेब थोरात दंत कॉलेज, औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय कॉलेज, नांदेड

येथे शासकीय वैद्यकीय कॉलेज, लातूर येथे शासकीय वैद्यकीय कॉलेज, बीड जिल्ह्यात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज, वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि एन. के. पी. साळवे मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, अमरावती येथील विदर्भ आयुर्वेद कॉलेज, यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय कॉलेज, अकोला येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज, गोंदिया येथे शासकीय कॉलेज या सर्व ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

३० डिसेंबरला निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळांच्या निवडणुकीची मतमोजणी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात होणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी (दि. २८) सकाळी १० ते ४ या वेळेत विविध केंद्रांवर मतदान प्रक्रिया होईल. ‘आरोग्य’साठी उद्या मतदान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची वेबसाइट मात्र ऑफलाइनच

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र शासनाकडून डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत विविध अॅप वेबसाइट नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्यात आल्या आहेत. मात्र येथील महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याचे समोर आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे हे संकेतस्थळ बंद असल्याचे सांगण्यात आले असले तरी पालिकेचा ऑफलाइन कारभारासोबत ऑनलाइनचा कारभार देखील भोंगळ असल्याचे यातून समोर आले आहे.

कुठल्या शासकीय कार्यालयाची इतंभूत माहिती ही संकेतस्थळावर दिलेली असणे अपेक्षित असते. केंद्र शासनाकडून डिजिटल इंडिया अभियान अंतर्गत सर्वच शासकीय कार्यालये पेपरलेस व्हावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र येथील महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या www.malegaoncorporation.orgया संकेतस्थळाचा शोध घेतला असता ‘आयपी अॅड्रेस कूड नॉट फाउंड’ असा संदेश इंटरनेट दिसत आहे. या संकेतस्थळासाठीचे डोमेन नव्याने करण्यास पालिकेच्या संगणकविभागाकडून उशीर झाल्यामुळेच हे संकेतस्थळ बंद झाले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, १९ डिसेंबरपासून संकेतस्थळ बंद असून, याबाबत पालिका प्रशासनास विचारणा केली असता संकेतच्या डोमेन रजिस्ट्रेशनचे काम झाले असून, तांत्रिक अडचणीमुळे ते कार्यरत होण्यास काही अवधी लागणार आहे. काही ब्राउजरवर संकेतस्थळ ओपन होत असल्याचेही त्यांचे म्हणणले आहे. येथील पालिकेच्या भोंगळ कारभाराचा अनेकवेळा प्रत्यय अनेकांना आला असून, आता संकेतस्थळ देखील कार्यरत नसल्याने इंटरनेटच्या जगतात पालिका ऑफलाइन झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांना आठ लाखांची ‘किक’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्याचे पेग रिचवून आपल्यासह इतरांचे जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामांना शहर वाहतूक शाखेने दंडाचा उतारा दिला. जानेवारी ते डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ४६६ तळीरामांवर कारवाई करीत सात लाख ७१ हजार ७१० रुपयांचा दंड वसूल केला. एका तळीरामाला सरासरी सोळाशे रुपये दंड बसला.

जीवघेण्या अपघातांमध्ये सर्वाध‌िक प्रमाण ‘हिट अॅण्ड रन’चे असते. ओव्हर स्पीड आणि मद्यपान ही अपघाताची प्रमुख दोन कारणे मानली जातात. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये दिसून येणारे साधर्म्य लक्षात घेता हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाने मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जानेवारी ते डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत शहर वाहतूक शाखेने एकूण ४६६ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांच्या श्वासाद्वारे त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण मोजले जाते. यासाठी पोलिस ब्रेथ अॅनालायझरचा वापर करतात. यानंतर संबंध‌ित वाहनचालकास लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवले जाते. वाहनचालकाच्या रक्तातदेखील प्रमाणीत मात्रेपेक्षा अधिक स्वरुपात अल्कोहोल आढळून आल्यास त्यास पुढील कारवाईसाठी कोर्टात हजर करण्यात येते. तेथे कोर्ट साधारणतः पंधराशे रुपयांपर्यंत दंड करू शकते. काही प्रकरणांमध्ये ही रक्कम आणखी वाढू शकते. या प्रकारे यंदा शहर वाहतूक शाखेने ४६६ मद्यपी वाहनचालकांकडून सात लाख ७१ हजार ७१० रुपयांचा दंड वसूल केला. सध्या नाताळाचे दिवस सुरू असून, ३१ डिसेंबर रोजी नववर्षारंभ पार्ट्यांचे आयोजन केले जाईल. यादरम्यान देखील मद्य प्राशनाचे प्रमाण मोठे असते. पोलिसांनी आपल्या परीने तयारी सुरू केली असून, तळीरामांमुळे अपघात घडू नयेत, यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

हॉर्न वाजवणे भोवले

विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणास हातभार लावण्याचा उद्योग ७४ वाहनचालकांना भोवला. शहर वाहतूक शाखेने ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांत सदर वाहनचालकांकडून ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ऑगस्ट महिन्यात सर्वाध‌िक म्हणजे ३७ जणांवर कारवाई झाली. यानंतर सप्टेंबरमध्ये नऊ, ऑक्टोबर महिन्यात दोन तर नोव्हेंबर महिन्यात २६ जणांवर कारवाई करण्यात आली. नो हॉकिंग डेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. त्यामुळे आमचा जोर कारवाईवर नसतो. जनजागृतीनंतरही सुधारणा होणार नसेल तर कारवाईस गती देण्यात येणार असल्याचे संबंध‌ित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महिना....केसेस संख्या....दंड वसूल

जानेवारी....१४....१५७००

फेब्रुवारी....९....११०००

मार्च....७....५७००

एप्रिल....१३....१९८००

मे....८....९०००

जून....२....०

जुलै....४९....७६०००

ऑगस्ट....८७....१५०६००

सप्टेंबर....१४....२४६१०

ऑक्टोबर....४३....५७३००

नोव्हेंबर....१०१....१८७८००

डिसेंबर....११९....२१४२००

एकूण....४६६....७७१७१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायलॉन मांजाची व्हॉट्सअॅपवर विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राणीमात्रांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या आणि खरेदी विक्रीस बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजाची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. संशयित व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपला कार्यभाग साधत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आदित्य विलास भरीतकर (मखमलाबादरोड, पंचवटी, मूळ रा. रामेश्‍वरपूर, अकोले, जि. नगर) आणि रोहीत सुधीर चिने (रा. विद्यानगर, मखमलाबादरोड, पंचवटी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशय‌ितांची नावे आहेत. शहर तसेच जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री तसेच खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. या मांजामुळे मानवी जीवन तर धोक्यात येतेच पण पुढील अनेक महिने पक्ष्यांना जगणे मुश्किल होते. नायलॉन मांजा तुटतच नसल्याने त्यात गुंतलेल्या पक्ष्याची मरणाशिवाय सुटका होत नाही. दुसरीकडे या मांजामुळे दुचाकीचालकाची मान, कान, नाक कापणे असे प्रकार घडतात. यामुळे काही जणांचा मृत्यू झाला असून, अनेक व्यक्ती मरणाच्या दारातून परत आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. दुकानदारांकडून चोरून-लपून विक्री होत असल्याने पोलिस सतत छापे मारून कारवाई करतात. त्यामुळे या मांजाविक्रीचे प्रमाण आटोक्यात आले. मात्र, पंतग उडवणाऱ्यांकडून नायलॉन मांजालाच पंसती दिली जात असल्याचे हेरून आजही लपून-छपून मांजाची विक्री केली जाते. त्यामुळे वरील दोघा संशयितांनी सोशल मीड‌ियाचा आधार घेत मांजा पुरवण्याची तयारी केली. व्हॉट्सअॅपवर तशी जाहिरात करून दोघांनी मांजा विक्री सुरू केली. काही व्हॉटसअॅप ग्रुपवर ‘नायलॉन मांजाचे गट्टू मिळतील’, असा मेसेज फिरत होता. तसेच खरेदीसाठी ८४८४८३७०९१, ८६६८५६७९३५, ८४४६००४००४ हे मोबाइल क्रमांक दिले होते. अनेक ग्रुपवर हा मेसेज व्हायरल होत असल्याची दखल भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी घेतली. त्यांनी लागलीच सदर प्रकाराचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक कमलाकर जाधव, पोलिस हवालदार सातपूते, पगारे, निंबाळकर यांना वरील क्रमांकाशी संपर्क साधण्यास सांगितले. संशयितांशी संपर्क होताच संबंध‌ितांनी मांजा घेण्यासाठी सोमवारी (दि. २५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवाजी गार्डनच्या गेटजवळ बोलविले. या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नायलॉन मांजा विक्रीसंबंधी काही माहिती असल्यास नागरिकांनी नज‌िकच्या पोलिस स्टेशनशी अथवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीच्या प्रांगणात रंगले ‘मृच्छकटिकम्’

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या बाराव्या अधिवेशनाचे दुसरे पुप्ष मंगळवारी (दि. २६) रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या दिवशी एचपीटी कॉलेजच्या प्रांगणात सायंकाळच्या प्रहरात ‘मृच्छकटिकम्’ या संस्कृत नाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला.

संस्कृत भाषेचे अध्ययन सर्व प्रथम एचपीटी कॉलेजमध्ये सुरू झाले. यामुळे कॉलेजमध्ये संस्कृत नाट्यकला व साहित्याची जोपासना करण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर बृहन्महाराष्ट्र प्राच्याविद्या परिषदेच्या बाराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने खूप वर्षांनंतर संस्कृत नाटकाचा प्रयोग एचपीटीच्या प्रांगणात सादर करण्यात आला. शूद्रक या लेखकाने लिहिलेल्या या संस्कृत नाट्याचा हा दिमाखदार प्रयोग नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडे यांना समर्पित करण्यात आला. कॉलेजच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर व निखील जगताप यांनी ही रंगावृत्ती तयार केली. ही रंगावृत्ती रेणुका येवलेकर व आर्या शिंगणे यांनी दिग्दर्शित केली. वैष्णवी शेजवलकर, प्रद्युम्न शेजवलकर, अबोली गटणे, कृतिका महाशब्दे यांनी संगीत दिले. सादर झालेल्या संस्कृत नाटकात शकारची भूमिका कल्पेश कुलकर्णी, मैत्रेयची भूमिका अंकुश जोशी आणि संवाहकाची भूमिका तन्मय भोळे यांनी सादर केली. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अधिवेशनात सहभागी सर्व प्रतिभागी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून ‘वीक्षा’ (विस्डम) प्रदर्शन एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉल मांडण्यात आले आहे. आज (दि. २७) देखील प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बससेवा मनपाकडेच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी महामंडळाऐवजी शहरातील सार्वजनिक बससेवा महापालिकेकडे देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांनी क्रेडाईच्या कार्यक्रमात महापालिकेनेच बससेवा चालविण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. त्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे फडवणीस यांनी स्पष्ट केल्याने कन्सल्टंटचा अहवाल येण्यापूर्वीच बससेवेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

सशक्त सार्वजनिक वाहतूक सेवेशिवाय कुठलेही शहर चांगले विकसित होऊ शकत नाही असे सांगत, चांगल्या बसेस लीजवर घेऊन बससेवा चालविण्याचे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे महामंडळाची बससेवा बंद होऊन लवकरच नाशिकमध्ये महापालिका आणि खासगी ठेकेदाराच्या मदतीने बसेस धावणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाईच्या शेल्टर २०१७ या कार्यक्रमाचा मंगळवारी समारोप झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल आदींसह आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शहर बससेवेचा प्रश्न निकाली काढला आहे. शहरात बससेवा चालविण्यास एसटी तयार नाही, तर महापालिकेची बससेवा चालविण्याची आर्थिक क्षमता नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बससेवा चालवण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार महापालिकेच्या पाठीशी राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडवणीस यांनी दिले. बससेवेसंदर्भात अनेक मॉडेल सध्या तयार झाले आहेत. चांगल्या बसेस लीजवर घेऊन आपण लोकांना चांगली सार्वजनिक बससेवा देऊ शकतो. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. त्यामुळे बससेवा महापालिकाच चालवेल हे आता स्पष्ट झाले असून, महापालिकेने नियुक्त केलेल्या कन्सल्टंटच्या अहवालाआधीच बससेवेचा मुद्दा आता निकाली निघाला आहे.

नोकरभरती, खरेदीला चाप

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बससेवा ही नागपूर पॅटर्नच्या धर्तीवर खासगी ठेकेदारामार्फत चालविण्याची सूचना केली आहे. बसेसची खरेदी आणि त्यासाठी लागणाऱ्या नोकरभरतीसाठी इच्छुक असलेल्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना चाप लागणार आहे. बससेवा महापालिकेने चालविल्यास बसेसची खरेदी आणि त्यासाठी मनुष्यबळ लागणार होते. त्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळवून हा बार वाजवण्याचा प्रयत्न होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच बससेवा थेट लीजवर घेण्याचे निर्देश दिल्याने सत्ताधाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

नाशिकला वेगळा दर्जा

नाशिकला आपण दत्तक घेतले असून, शहर उत्तम झाले पाहिजे, यासाठी मी आग्रही असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. नाशिकमध्ये सीसीटीव्ही नेटवर्क उभारले जाणार असून, त्यासाठी निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. शहर वायफाय केले जाणार आहे. नाशिकला वेगळा दर्जा दिला जाणार असून, नाशिकच्या विकासाबाबत क्रेडाई, लोकप्रतिनिधी, महापालिकेकडून येणाऱ्या प्रस्तावांबाबत आपण सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कवितेचे गाणे होताना’ शनिवारी उलगडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी येत्या शनिवारी (दि. ३० डिसेंबर) ‘कवितेचे गाणे होताना’ या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. प.सा.नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल रंगणार आहे.

‘संधिप्रकाशात’, ‘सांग सख्या रे’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ यांसारखे पस्तीसपेक्षा अधिक अल्बम्स, नक्षत्रांचे देणे, मधली सुट्टी, ‘सारेगमप’सारख्या मालिका, तीसपेक्षा जास्त चित्रपटांचे संगीत, मैत्र जीवांचे यासारखे उत्कृष्ट कार्यक्रम सादर करणाऱ्या डॉ. सलील कुलकर्णी यांची ‘कवितेचे गाणे होताना’ ही मैफल साऱ्यांनी आवर्जून अनुभवावी अशीच आहे. सलील यांची गाणी अन् मनसोक्त गप्पा, त्यासोबतच ‘चिंटू’ चित्रपटातील गाण्यांचा गायक शुभंकर सलील कुलकर्णी याला प्रथमच प्रत्यक्ष ऐकण्याचा योगदेखील चालून आला आहे.

सदस्यांना सवलत

या कार्यक्रमाचा तिकीट दर २०० रुपये आहे. मात्र, मटा कल्चर क्लबच्या विद्यमान सदस्यांना सवलतीच्या दरात म्हणजे १०० रुपयांना एक तिकीट मिळेल. नव्याने सदस्य होणाऱ्यांना दोन तिकिटे मोफत मिळतील. तरी या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सरसावले मालेगावकर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

‘अस्वच्छ मालेगाव’ ही ओळख पुसून काढण्यासाठी महापालिका प्रशासनासह ‘स्मार्ट’ होत असलेल्या मालेगावकरांनाही आता स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असल्यामुळे पालिकेने तयार केलेले स्वच्छता अॅप्लिकेशन डाउनलोड करून त्याद्वारे कचऱ्यासंदर्भात तक्रारी करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण सन २०१८ साठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

येत्या ४ जानेवारीपासून या सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. यात नागरिकांचा सहभागास देखील गुणांकन असल्याने स्वच्छता अॅप शहरातील नागरिकांनी वापरावे यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या चार दिवसांपासून खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘डोअर टू डोअर’ या अॅपविषयी जनजागृती केली जात असल्यामुळे गेल्या चार दिवसातच तीन हजारांहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.

पालिका आयुक्त संगीता धायगुडे याच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहराचा क्रमांक जास्तीत जास्त वरचा असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात नागरिकांना आपापल्या भागातील कचरा व अस्वच्छतेच्या समस्येचे निवारण बसल्या जागी करता यावे यासाठी स्वच्छता अॅप वापराबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळाल्यास स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या गुणांकनात वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी पालिकेचे उपायुक्त राजू खैरनार, स्वच्छ सर्वेक्षण २०१८चे शहर समन्वय परितोष हिरे यांसह एकूण २० पथक

शहरातील प्रत्येक प्रभागात जावून डोअर टू डोअर भेट देवून नागरिकांना माहिती देत आहेत.

शहरातील मोसमपूल, सटाणा नाका, रावळगाव नाका यासह प्रत्येक प्रभागात तसेच दवाखाने, शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, बाजारपेठा या सार्वजनिक ठिकाणांवर कॅम्प लावण्यात आले असून, पालिकेच्या पथकाद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाइलमध्ये स्वच्छता अॅप डाउनलोड करून दिले जात आहे. इतकेच नाही तर या अॅपद्वारे नागरिक आपल्या परिसरातील कचरा व स्वच्छतेची तक्रार कशी करावी, फोटो कसा अपलोड करावा, त्याचे निवारण कसे होईल, निवारण न झाल्यास काय करावे किंवा तक्रार निवारणनंतर पाठपुरावा कसा करावा याचे डेमो दिले जात आहेत.

दोन निरीक्षकांवर कारवाई

स्वच्छता अॅपवर येणाऱ्या तक्रारींचे निवारण २४ तासांत करणे बंधकारक असल्याने तसे न झाल्यास पालिकेला निगेटिव्ह मार्किंग मिळणार आहे. याचा परिणाम स्वच्छ सर्वेक्षणावर होत असतो. नागरिकांकडून या अॅपवर तक्रारी येत असल्या तरी स्वच्छता विभागाचे निरीक्षक त्या तातडीने सोडवत नसल्याने आयुक्त धायगुडे यांनी मानधन पदावरील दोन स्वच्छता निरीक्षकांना कामावरून कमी केल्याची कारवाई देखील केली आहे.

अशी करा कचऱ्याची तक्रार

शहरातील कचऱ्या संबंध‌च्यिा तक्रारी नागरिक या अॅपद्वारे करू शकतात. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Swachhata-MoHUAया नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यावर आपल्या परिसरातील कचऱ्याचा फोटो अपलोड करायचा. तक्रार निवारण झाली की नाही तसेच त्याबद्दल आपले मत देखील येथे नोंदवता येते. या सोबतच पालिकेकडून १८०८३३१५०० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, यावरही तक्रार करता येणार आहे.

यूजर्स पोहोचले सात हजारांवर

गेले चार दिवस सुट्टीचा कालावधी असला तरी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या टीमने जोरदार अभियान सुरू ठेवले आहे. या मोहिमेपूर्वी अॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या केवळ चार हजार ५०० इतकी होती. या चारदिवसाच्या मोहिमेनंतर अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ७ हजाराच्या पुढे गेली आहे. दिवसाला किमान एक हजार अॅप यूजर वाढत असल्याची माहिती समन्वयक हिरे यांनी ‘मटा’ला दिली. अजून दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार असून, नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८साठी स्वच्छता अॅपबाबत मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान किमान १० हजार यूजर्स व्हावेत हे पालिका प्रशासनाचे लक्ष आहे. या अॅपद्वारे शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.- राजू खैरनार, उपायुक्त, मालेगाव मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images