Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एम.कॉमच्या परीक्षेसोबत कंपनी सेक्रेटरी परीक्षा

$
0
0
व‌िद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पुढे ढकलण्यात आलेली एम.कॉम.च्या परीक्षेचा कालावधी व‌िद्यार्थ्यांना पुन्हा त्रासदायक ठरला आहे. या प्रश्नी तोडगा काढण्याची शक्कल पुणे व‌िद्यापीठाने पुन्हा लढव‌िली असली तरीही व‌िद्यार्थ्यांचा मनस्ताप टळलेला नाही. यामुळे व‌िद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महिलेवर अॅसिड हल्ला

$
0
0
देवळाली कॅम्प परिसरात लॅमरोडवर घराकडे चाललेल्या महिलेवर अॅसिड हल्ला करून तिघे मोटरसायकलस्वार पसार झाले. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार

$
0
0
अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना येवल्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाश‌िकचा सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज

$
0
0
जगातील भाव‌िकांसाठी तीर्थक्षेत्र असणारा नाश‌िकचा गोदाघाट हा या शहराचा वारसा आहे. नाश‌िककरांनी या वारशाचे प्रयत्नपूर्वक जतन करायला हवे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्क‌िटेक्ट कृष्णराव जयसीम यांनी व्यक्त केली.

आंदोलनाची नशा

$
0
0
अनेक संस्थांच्या तऱ्हेवाईक कार्यपध्दतीचा नागरिकांनी इतका धसका घेतला आहे क‌ि जो तो आंदोलनाची भाषा बोलू लागला आहे. शहरातील एका शैक्षण‌िक संस्थेव‌िरोधातले आंदोलनही सध्या चर्चेत आहे. अशातच त्या संस्थेच्या भोवताली पालक पुन्हा जमा झाले असून ते आंदोलनाच्या पाव‌ित्र्या‌त असल्याची बातमी दोन द‌िवसांपूर्वी शहरात फुटली. अन् आंदोलनाशी न‌िगडीत घटकांनी त्या संस्थेच्या द‌िशेने धाव घेतली.

नाट्यसंपदेचा वाजणार बिगुल

$
0
0
नटवर्य प्रभाकर पणशीकर यांचा स्मृतिदिन व नाट्यसंपदा संस्थेला नाट्यक्षेत्रात ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाट्यसंपदा सुवर्णजयंती पुरस्कार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेला आज, १६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे.

आम्ही सामान्यांच्या पाठीशी

$
0
0
‘आम आदमी पार्टीची स्थापना सामन्यांसाठीच झाली आहे. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘आप’चे कार्यकर्ते जनलक्ष्मी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मदत करणार असल्याची माहिती ‘आप’चे जगबीर सिंग यांच्यामार्फत देण्यात आली.

धावले ८ हजार नाशिककर

$
0
0
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ६३ व्या स्मृतीदिनानिमित्त संपूर्ण भारतभर रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत तब्बल आठ हजार नाशिककरांनी या दौडमध्ये सहभाग घेऊन युनिटीचे दर्शन घडवले.

हुश्श ! झाली टीईटी

$
0
0
नवश‌िक्षकांसाठी सक्तीची करण्यात आलेल्या टीईटी (ट‌िचर्स इलिज‌िब‌िलीटी टेस्ट) परीक्षेला ज‌िल्हाभरातून सुमारे बत्तीस हजार उमेदवार उपस्थ‌ि‌त होते. शहरातील १०५ केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेला ९७ टक्के उमेदवारांनी हजेरी लावली होती.

एसटीच्या संकल्पाला पहिल्याच दिवशी खो

$
0
0
एसटी महामंडळाच्या बस ठरल्याप्रमाणे सोमवारी अगदी वेळेत धावतील, अशी प्रवाशांची अपेक्षा पहिल्याच दिवशी फोल ठरली. पिंपळगाव बसवंत येथील रास्ता रोकोमुळे मालेगाव, धुळे मार्गावरील बसगाड्या तब्बल तासभर उशिराने धावल्या.

नाशिकरोडच्या पुलाखाली बजबजपुरी

$
0
0
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकरोडचा भाजीबाजार हा वादाचा विषय ठरला आहे. सावरकर उड्डाणपुलाखालील अनधिकृत बाजाराने नाशिकरोडला बकाल रुप आले आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

कडाक्याच्या थंडीत टँकरच्या वा-या

$
0
0
नाशिकचे तापमान सात अंश सेल्सिअसच्या आसपास असतानाच नशिकपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सिन्नर तालुक्यात मात्र काही गावांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

कांद्याचा प्रश्न चिघळणार

$
0
0
वाढीव निर्यात शुल्कामुळे निर्यातदारांना भारतातून कांद्याची निर्यात करणे परवडत नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे असून याचा थेट परिणाम सध्या आलेल्या पोळ कांद्याच्या बंपर क्रॉपवर झाला आहे.

गाळ्यांना व्यावसायिकांची प्रतीक्षा

$
0
0
महापालिकेने शहरातील अनेक भागात गाळे उभारले आहेत. परंतु बऱ्याच ठिकणी गाळे अनेक वर्षांपासून पडून आहेत. गंगापूररोडला लागून असलेले आनंदवीलीतील गाळे २००७ पासून बांधून पडले आहेत.

नाट्यसंपदा एकांक‌िका स्पर्धेला जल्लोषात सुरूवात

$
0
0
नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार आंतरमहाविद्यालयीन एकांक‌‌िका स्पर्धा आयोजीत केल्या असून परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सोमवारी या स्पर्धेला प्रारंभ झाला. सोमवारी दिवसभरात पाच एकांकीका सादर झाल्या.

बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात 'आप'ची उडी

$
0
0
‘कार्यमुक्त केल्याच्या कारणास्तव आंदोलनात उतरलेल्या जनलक्ष्मी बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा (आप) पाठींबा असून या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू’ असे प्रतिपादन 'आप'च्या राज्य समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी केले.

‘दिगंबरा दिगंबरा’चा जयघोष

$
0
0
‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात आज शहरासह उपनगरांमध्ये श्रीदत्त जयंती महापूजा, गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कर्करोगग्रस्तांना ‘मुक्त’ शिक्षणाची दिशा

$
0
0
आपले सकारात्मक विचारच आपल्याला, आपल्या कृतीला पर्यायाने आयुष्याला घडवत असतात. ऐन उमेदीच्या काळातले काही युवक शिक्षण, करिअरची ओढ असताना नोकरी करत असतात.

अखेर केमिस्टचा संप मागे

$
0
0
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) जाचाला कंटाळून बंदची हाक देणाऱ्या औषध विक्रेत्यांना हायकोर्टाच्या निर्णयामुळे बंद मागे घ्यावा लागला आहे.

पर्यावरण अहवालात महापालिकेचे ‘कॉपी पेस्ट’

$
0
0
महापालिकेने गेल्या दोन वर्षांत तयार केलेले पर्यावरण अहवाल एकसारखेच असल्याचे समोर आले आहे. पर्यावरण अहवाल तयार करून त्यादृष्टीने शहरात उपाययोजना राबवण्यासाठी हा अहवाल महासभेला सादर केला जातो.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images