Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महसूल प्रचंड, तरीही समस्या उदंड

$
0
0

मटा फोकस

--

महसूल प्रचंड, तरीही समस्या उदंड

--


मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ख्याती असलेल्या नाशिकमध्ये देशभरातून हजारो प्रवासी प्रामुख्याने रेल्वेने येतात. परंतु, येथील रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथून दररोज सुमारे वीस हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला नऊ ते अकरा कोटींचा मोठा महसूल मिळतो. मात्र, तरीही येथे सरकते जिने, प्रवाशांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन, पंचवटीला होणारा विलंब, लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसणे, विविध एक्स्प्रेसमध्ये बोगींची कमतरता, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग यांसारख्या सुविधांप्रश्नी तातडीने उपाययोजनांची गरज आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून जातात. गैरसाेयी दूर करण्याचे आश्वासनही देतात. परंतु, त्याची अंमलबजावणी अभावानेच होते.

--

संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार

--

प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष

नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात महिनाभरापूर्वी रात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाले होते. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. रेल्वे स्टेशन परिसरात ३० मार्च २०१६ रोजी अकरा जिलेटिन आणि पंचवीस डिटोनेटर वेळीच जप्त करण्यात आल्याने दुर्घटना टळली. दुसऱ्याच दिवशी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. मात्र, असे प्रकार घडूनदेखील येथे मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या तोकडी आहे. मुख्य प्रवेशद्वारात असणारे मेटल डिटेक्टर व स्कॅनर अनेकदा बंद असतात. सिन्नर फाटा, देवी चौक, पार्सल ऑफिस मार्गावर सुरक्षा यंत्रणा नाही. पोलिस व सुरक्षा बलाची संख्या तोकडी आहे. श्वान पथक, बॉम्बशोध पथकाचा अभाव आहे. कुंभमेळ्यानंतर सीसीटीव्ही कक्ष बंद झाला आहे. यावरून प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेच अधोरेखित होते.

--

स्टेशनवर डझनभर प्रवेश मार्ग

हे स्टेशन संवेदनशील भागात आहे. मात्र, तरीही त्याला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नाही. त्यामुळे समाजकंटक घुसखोरी करतात. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांना नेहमीच्या पश्चिम भागातून प्रवेशासाठी तिकीट विक्री, तसेच तिकीट आरक्षण, पार्सल विभाग, मालधक्का, सुभाषरोड, देवी चौकातील पूल असे अर्धा डझन मार्ग आहेत. पूर्वेला सिन्नर फाटा व शेजारील अनेक भागातून स्थानकात सहज प्रवेश करता येतो. कुंभमेळ्यात अनेक ठिकाणी मुंबईच्या कंपनीद्वारे मेटल डिटेक्टर लावण्यात आले. सिंहस्थ पर्वणी संपताच ते काढण्यात आले. सिन्नर फाटा प्रवेशद्वार तर सताड उघडे असते. कुंभमेळ्यात स्थानकासह परिसरात किमान १०० सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्यासाठी स्वतंत्र खोलीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. आता हा कक्ष बंदच असतो.

--

गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभाव

येथून दररोज शंभरावर रेल्वेगाड्या धावतात. जंक्शन नसतानाही सकाळी व सायंकाळी पाच ते दहापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पादचारी पूल खूपच तोकडा ठरतो. जिन्यांची चढणही अवघड असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते. प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. येथे तीन पादचारी पूल होते. चौथा पूल कुंभमेळ्यात उभारण्यात आला. तो प्लॅटफर्म एकवरून सुरू होऊन चारपर्यंत जातो. हा पूल अन्य पादचारी पुलांना जोडल्यास गर्दीचे व्यवस्थापन होऊ शकते. तसा प्रस्ताव दाखल झाला असला, तरी त्यावर निर्णय होणे बाकी आहे.

--

रुग्णवाहिकेअभावी जिवाशी खेळ

रेल्वे स्टेशनवर २४ तास वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका ठेवावी लागते. प्रवाशाने पुढील स्टेशनवर उपचार देण्याची विनंती केली, तर डॉक्टरांना समवेत जावे लागते. मात्र, नाशिकरोड स्टेशनवर रुग्णवाहिकाच नाही. रेल्वेखाली कोणी ठार झाले, तर पोलिस व हमालच मृतदेहाचे अवशेष गोळा करतात. कुंभमेळ्यात खासदारांच्या हस्ते स्वयंसेवी रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले. मात्र, ती बंद पडली. अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नसते. स्टेशनवरील हॉटेलमधील अन्नाचा दर्जाही सुमार असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात चालकाला दंड केला होता.

--

सरकत्या जिन्यांची निकड

अंध, दिव्यांग, ज्येष्ठांसाठी नाशिकरोड स्टेशनवर दोन लिफ्ट नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु, अन्य प्रवाशांना येथील उंच व अरुंद जिने चढताना त्रास होतो. गर्दीच्या वेळी मुंबईसारखी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते. मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकच्या प्रवाशांसाठी तातडीने सरकते जिने मंजूर करण्यात आले खरे. तथापि, लिफ्टप्रमाणे त्याला वर्षभराचा विलंब होऊ नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

--

राज्यांतर्गत गाड्यांत अपुऱ्या बोगी

नाशिक ते भुसावळदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठा आहे. भुसावळ पॅसेंजर त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बोगींची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. देवळाली कॅम्पहून पहाटे साडेचारला सुटणाऱ्या या पॅसेंजरला प्रचंड गर्दी असते. खान्देशाचा दोनशे-अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा फक्त चाळीस ते पन्नास रुपयांत होत असल्याने या गाडीला गर्दी होणे क्रमप्राप्त आहे. जळगाव, भुसावळला जाण्यासाठी काशी, भागलपूर, पुष्पक, गोरखपूर, पाटणा, गोदान या लांबपल्ल्याच्या गाड्या आहेत. मात्र, त्यांचे तिकीटही अधिक आहे. या गाड्यांमध्ये परराज्यांतील प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे भुसावळ पॅसेंजरच्या बोगी वाढवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. मराठवाड्याला जाणाऱ्या व येणाऱ्यांसाठी तपोवन व जनशताब्दी या दोनच गाड्या दररोज धावतात. त्यामुळे त्यांना बाराही महिने गर्दी असते. या गाड्यांची बोगी संख्या वाढविण्याची मागणी आहे. रेल्वे गाड्यांना होणारा विलंब ही नाशिकच्या प्रवाशांची जुनीच तक्रार आहे. इगतपुरी ते कसारादरम्यान अनेकदा अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होते. गाड्यांना विलंब होतो. नोकरी, व्यवसायानिमित्ताने पंचवटी, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी याप्रश्नी अनेकदा आंदोलने केली तरीही प्रशासन बोध घेत नाही. फक्त नाशिकच्या पासधारकांसाठी पंचवटी एक्स्प्रेसला स्वतंत्र बोगी जोडल्याने पासधारकांची सोय झाली आहे.

--

अस्वच्छता, दुर्गंधीच्या गर्तेत

नाशिकरोड स्टेशन गेली दोन वर्षे स्वच्छतेबाबत देशात पहिल्या दहा स्थानकांत होते. यंदा ते १६९ क्रमांकावर पोहोचले आहे. नाशिकरोड स्टेशनवर स्वच्छतागृहे आहेत. परंतु, त्यासाठी शुल्क आहे. पहिल्या प्लॅटफॉर्मवर तिकीट बुकिंग, पार्सल ऑफिस येथील स्वच्छतागृहांचा वापर प्रामुख्याने होतो. दिव्यांगांसाठी चौथ्या प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह आहे. तेथेपर्यंत जाणे त्यांना जिकिरीचे ठरते. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. भिकारी, गर्दुले कुठेही घाण करीत असल्याची स्थिती येथे दिसून येते. त्यामुळे हे स्टेशन अस्वच्छता, दुर्गंधीच्या गर्तेत सापडल्याच दिसून येते.

---

पार्किंग, वेटिंग रूमची समस्या

या स्टेशनसाठी देवी चौक, पार्सल ऑफिस आणि सुभाषरोडवर पार्किंग आहे. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने हे तीनही पार्किंग अपुरे पडू लागले आहेत. तीनपैकी फक्त एकच पार्किंग कारसाठी आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी कायम असते. दिव्यांगांच्या वाहनांसाठी असलेल्या पार्किंगमध्येही घुसखोरी वाढली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वाहनांसाठी पार्किंग शोधावे लागते. रेल्वे फलाटावर पार्किंग होणे ही धोकादायक बाब ठरू लागली आहे. स्टेशनवर प्रवाशांसाठी वेटिंग रूम आहे. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत ते अपुरे पडते. वेटिंग रूममध्ये सामान्य प्रवासीदेखील घुसखोरी करतात. येथे प्रवाशांचे साहित्य ठेवण्यासाठी पुरेसे लॉकर नसल्याने प्रवाशांचे साहित्य चोरी होण्याचे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे नवीन वेटिंग रूम बांधावी, लॉकर्स उपलब्ध करावेत, सुरक्षारक्षक नेमावेत अशा मागण्या होत आहेत.

---

पोलिस, नशेखोर अन् अतिक्रमणे

स्टेशनची सुरक्षा रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. त्यांच्या मदतीला राज्याचे लोहमार्ग पोलिस स्टेशन आहे. पन्नासहून अधिक संख्या असलेल्या या पोलिसांसाठी खुराड्यासारखे कार्यालय आहे. येथे पोलिसांनाच बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे तक्रारदार उभेच राहतात. महिला पोलिसांसाठी चेंजिग रूम नाही. स्वच्छतागृह, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पोलिसांची निवासस्थानेही छोटी आहेत. दुसरीकडे या स्टेशनवर नशाबाजांचा वाढता वावर दिसून येतो. रात्री प्रवाशांना लुटलेही जाते. दोन वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर स्टेशनशेजारी बलात्कार झाला होता. त्यानंतर बीडहून आलेल्या प्रशिक्षणार्थी गरोदर महिला पोलिस उपनिरीक्षाचा सर्वांदेखत विनयभंग करण्यात आला होता. त्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांनाही कठीण होऊन बसले आहे. या स्टेशनला सर्व बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. स्टेशनवरच नव्हे, तर प्लॅटफॉर्मवरही वाहने बेकायदा पार्क केली जातात. परिणामी प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश करून बाहेर पडणे अवघड होत आहे.

--

नाशिक-पुणे मार्गाची प्रतीक्षा

नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद झाली, एक कोटीची टोकन रक्कम मिळाली. परंतु, काम सुरू होत नाही. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखला जातो. तो राष्ट्रीय महामार्गाने जोडला जात आहे. त्याचबरोबर रेल्वेमार्गेही जोडणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास नाशिकच्या दळणवळण, व्यापार व उद्योगाचा फायदा होईल.

--

राजधानी एक्स्प्रेसची गरज

मुंबईहून सुटणाऱ्या, परंतु नाशिकरोडला न थांबणाऱ्या दहाहून अधिक गाड्या आहेत. या गाड्यांना नाशिकरोडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा देण्याची गरज आहे. निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी मंगळवारी मुंबईहून नाशिकमार्गे दिल्लीला जाते. ही गाडी नियमित सुरू करावी, तसेच नाशिकला थांबवावी, अशीदेखील मागणी आहे. मुंबईहून अंत्योदय सुरू करण्यात आली असून, ती झारखंडला टाटानगर येथे जाते. तिलाही नाशिकरोडला थांबा हवा. गुजरातमार्गे तीन राजधानी एक्स्प्रेस आहेत. परंतु, नाशिकमार्गे एकही नाही. नाशिकरोडला मध्य रेल्वे मार्गाने दिल्लीला जाणारी राजधानीसारखी जलद एक्स्प्रेस मिळाल्यास ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ या शहरांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

--

प्रवाशांचीही सुविधांकडे पाठ

रेल्वेने नाशिकरोडला प्रवाशांसाठी काही चांगल्या सुविधा दिसलेल्या आहेत. रेल्वेने येथे पैसे टाकून तिकीट घेण्याची दोन व्हेंडिंग मशिन्स बसविली. मात्र, प्रवासी त्याकडे फिरकतच नसल्याने एक मशिन मुंबईला हलविण्यात आले. कार्ड स्वॅप करून तिकीट काढण्याचीही सोय आहे. त्यालाही प्रतिसाद कमी असतो. येथे एक रुपयात मशिनद्वारे बाटलीभर मिनरल वॉटर मिळते. परंतु, प्रवासी त्याकडेही जात नाहीत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव या स्टेशन्सवर येस बँकेच्या मदतीने वॉटर प्युरिफायरच्या साहाय्याने शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे.

--

लिफ्ट आहे, पण...

अंध, दिव्यांग, ज्येष्ठ प्रवाशांना जिन्याने जावे लागू नये, तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चार महिन्यांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवर लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची सोय झाली आहे. या लिफ्टचा वापर वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रचंड गर्दीच्या वेळी लिफ्टमुळे सोय होते. परंतु, अन्य वेळी पुरेसा वापर होत नाही. स्टेशनवरील चौथ्या प्लॅटफॉर्मचादेखील पुरेसा वापर व्हावा, या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.

--

नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये पुरेसे मेटल डिटेक्टर, स्कॅनिंग मशिन्स व सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत. लांबपल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा द्यावा. नाशिक-पुणे मार्गासारखे प्रकल्प लवकर व्हावेत. सरकते जिने बसवावेत.

-राजेंद्र जाधव

--

रेल्वेने खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करावी. स्टेशनवरील नशेबाज व गुंडांचा बंदोबस्त करावा. परिसरातील पार्किंग समस्या निकाली काढावी. आरक्षण तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी उपाय योजावेत.

-बाळनाथ सरोदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे विभागाचे साडे तीन कोटी रुपयांचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एसटी कामगारांनी मागण्यांसाठी पुकारलेला संप चार दिवसानंतर अखेर भाऊबीजेच्या दिवशी न्यायालयाच्या आदेशाने मागे घेण्यात आला. मात्र या संपाने धुळे विभागाचे साडे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय इतर माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील पाणी सोडावे लागले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी 'मटा'शी बोलताना दिली. शनिवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेला धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून सुरत, नाशिक व भुसावळकडे बस सोडून अधिकृतरित्या संपाची स्थगिती झाली. चार दिवसांच्या खंडानंतर एसटी रस्त्यावर धावत असल्यामुळे शनिवारी आगारात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.

एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या काळात बेमुदत संप पुकारला होता. यामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मात्र पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने चार दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे. दिवाळीच्या सणाला जाणारे-येणारे प्रवासी, तालुक्याच्या ठिकाणी दिवाळीचा बाजार खरेदीसाठी येणारे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता.

या चार दिवसांत खासगी वाहन चालक प्रवाशांची अक्षरश: लूट करीत होते. दिवाळीत संप सुरू असल्यामुळे सामान्यांना गावी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. याचा फायदा घेत खासगी वाहन धारकांना उभी लूट सुरू केली होती. एस. टी. कर्मचाऱ्यांचा हा पुकारलेला संप रास्त असल्याचीही अनेकांची भावना होती. मात्र या संपामुळे बाजारपेठा, बसस्थानक ओस पडली होते. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एस. टी. वाहतुकीचा संप लवकरच मिटेल आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबतील, अशी अशा नागरिकांना, प्रवाशांना लागून राहिली होती. त्या प्रमाणेच पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

दिवाळीच्या सणासाठी गावे आलेल्या प्रवाशांना आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले आहेत. संपामुळे नागरिकांनी मिळेल ती वाहने पकडून घर गाठले आहे. मात्र आता परतीच्या प्रवासात पुन्हा एसटीचा आधार घ्यावा लागणार आहे. संप कालावधीत आरक्षित तिकीटावर प्रवास न झालेले तसेच येत्या दिवसांत प्रवासासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांच्या शनिवारी आरक्षण खिडकीवर रांगा लागल्या होत्या. शिवाय औरंगाबाद, नाशिक विना वाहक विना थांबा बसच्या काउंटरवरदेखील गर्दी दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेल मैफलीने भारावले श्रोते

$
0
0

मालेगाव

---

सुरेल मैफलीने भारावले श्रोते

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगाला अलवार स्पर्श करणारा पहाटेचा गारवा, दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळलेले वातावरण आणि रंगमंचावरून सादर होणारी विलंबित एकतालातील बंदिश... दीपावली पाडव्यानिमित्त मालेगाव येथील एकता सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित पाडवा पहाटनिमित्तचे असे आल्हाददायक वातावरण आणि सुरेल मैफलीने मालेगावकर भारावून गेले होते.

पुण्याचे सुप्रसिद्ध गायक सुरंजन खंडाळकर व सुस्मिरात डव्हाळकर यांच्या सुश्राव्य गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. पद्मा वाव्हळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मैफलीची सुरुवात दोन्ही गायकांच्या अहिरभैरव रागातील ‘अलबेला सजना आयो रेे’ या गीताने झाली. त्यानंतर सुस्मिरात यांनी ‘ध्यान लागले रामाचे’, सुरंजन यांनी ‘सावळे रुपडे’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हे अभंग सादर करीत वातावरण विठूमय करून टाकले.

मैफलीच्या उत्तरार्धात गायिका सुस्मिरात यांनी ‘अबीर गुलाल’, ‘बोलवा विठ्ठल’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यांच्या ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, तर सुरंजन यांनी सादर केलेल्या ‘पद्नाभा नारायण’ व ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीतांनी तर अधिकच बहार आणली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप दोघांनी सादर केलेल्या ‘बाजे रे मुरली या बाजे’ या भैरवीने झाला. या दोघांच्या सुरेल आवाजाला सागर पटोका तबला, अभिषेक शिनकर संवादिनी, गणेश डाव्हाल पखवाज, सुजित पाटील तालवाद्य यांनी साथसंगत केली. यावेळी कलावंतांचा अॅड. उदय कुलकर्णी व शोभा बडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकता मंचाचे डॉ. विनोद गोरवाडकर यांनी आभार मानले. यावेळी मालेगावकर रसिकांची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्र दिव्यांनी उजळले शिवालय

$
0
0

झोडग्यात पाडवानिमित्त दीपोत्सव साजरा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

‘लक्ष दिव्यांची आरास झगमगे महाद्वार, प्रकाशाने उजळले शिवालयाचे आवर’या काव्यपंक्तीचा प्रत्यय तालुक्यातील झोडगे येथील हेमाडपंती शिवालयात दीपावली पाडव्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. २०) आयोजित करण्यात आलेल्या झोडगे दीपोत्सवात उपस्थितांना आला. हजारो दिव्यांचा प्रकाश अन् त्यात उजळून निघालेले हेमाडपंती शिवालय असे नयनरम्य दृश्य उपस्थितांना यावेळी अनुभवता आले. या दीपोत्सवाच्या दृश्याने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेदेखील भारावून त्यांनी झोडगे दीपोत्सव भविष्यात जिल्ह्याची ओळख होईल, असे गौरवद्गार काढले.

तालुक्यातील झोडगे गावाला बाराव्या शतकात यादव काळात उभारण्यात आलेल्या हेमाडपंती शिवालयाचा वारसा लाभलेला आहे. याच ऐतिहासिक, पुरातन शिवालयाचे जतन संवर्धन व्हावे, लोकांना याची माहिती व्हावी या उद्देशाने दिवाळीनिमित्त याठिकाणी स्थानिक तरुणांकडून गेल्या ६ वर्षांपासून झोडगे दीपोत्सव आयोजित केला जातो. यंदाचे दीपोत्सवाचे हे सातवे वर्ष होते. ‘दिवा लावू तेजाचा वारसा जपू शिवालयाचा’या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत शिवालयप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला एक दिवा प्रज्वलित करून याठिकाणी उपस्थिती लावली. यंदाच्या दीपोत्सवात राज्यमंत्री दादा भुसे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

राष्ट्रीय महामार्गालगत हे शिवालय असून, इतर वेळी अंधारात असलेले हे शिवालय दीपोत्सवात प्रकाशमय झाल्याने महामार्गावरील अनेक प्रवाशांचे ते लक्ष वेधून घेत होते. दीपोत्सवाला मालेगाव शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह धुळे, नाशिक, मनमाड, सटाणा, कळवण, देवळा, चांदवड येथूनदेखील नागरिक दीपोत्सवात सहभागी झाले होते. आयोजनात गावातील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले यांनी मोलाचे सहकार्य दिले. भूषण देसले यांच्या संकल्पनेतून मंदिर प्रांगणातील शिल्पांवर प्रकाशयोजना करण्यात आली होती. यावेळी दीपोत्सव संयोजक ओमप्रकाश देसले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कवी कमलाकर देसले यांच्या पसायदान गायनाने दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.

विकासासाठी प्रयत्न करणार

गेल्या सात वर्षांपासून झोडगेत होणारा हा अनोखा सोहळा एक नयनरम्य दृश्य अनुभूती सर्वांना देत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस या दीपोत्सवाची व्यापकता वाढते आहे, असे मत राज्यमंत्री भुसे यांनी केले. त्यांनी भविष्यात झोडगे दीपोत्सव हा नाशिक जिल्ह्याचा उपक्रम होईल, असेही सांगितले. मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागेल, असे मत राज्यमंत्री भुसे यांनी व्यक्त केले. मंदिर प्रांगणात उद्यान, जॉगिंग ट्रेक यासारख्या सुविधा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांज पाडव्यात हरखले रसिक

$
0
0

कॉलेजरोड

---

सांज पाडव्यात हरखले रसिक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायंकाळची गुलाबी थंडी अन् रम्य वारा... हिंदी, मराठी सुमधूर गाण्यांचे एकाहून एक सरस सादरीकरण... अशा मनमोहक वातावरणात शुक्रवारच्या सायंकाळी रसिक हरखून गेले होते. निमित्त होते गोदा श्रद्धा फाउंडेशनतर्फे कॉलेजरोड येथे आयोजित सांज पाडवा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.

दर वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्यानिमित्त कॉलेजरोड येथील गोदा श्रद्धा फाउंडेशनतर्फे सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले होते. सांज पाडव्याचे पंधरावे पुष्प यंदा गुंफण्यात आले. हा सांज पाडवा यादगार करण्यासाठी सेलिब्रेटी कलाकार फेम अमेय दाते, जुईली जोगळेकर, सोहम गोराणे, चैतन्य देवढे, नंदिनी गायकवाड यांची संगीत मैफल झाली. कार्यक्रमाचे निवदेन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने केले. जुईली यांच्या गणपती स्तोत्र गायनाने या सुगम मैफलीचा कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला.

जुईली यांनी ‘आली माझ्या घरी दिवाळी’, ‘आत्ताच बया मन सावरलं’, ‘कांदे पोहे’, ‘मला म्हणत्यात हो पुण्याची मैना’ अशा अनेक बहारदार गाण्यांनी नाशिककरांना मोहित केले. सोहम आणि चैतन्य यांनी ‘देवा तुझ्या नावाचं याडं लागलं’, बोबडी गवळण, पोवाडा, ‘लख्ख पडला प्रकाश आत्ता’, ‘ब्रिंग इट ऑन’ यांचे ड्युएट सादर करीत नाशिककर रसिकांची मने जिंकली. यावेळी प्रत्येक सादरीकरणास दर्दी नाशिककरांची दाद मिळत होती.

अमेय दाते यांनी ‘सूर निरागस हो’, ‘तेनू इतना’, ‘तेरे संग यारा’ अशा अनेक हिंदी-मराठी गाण्यांची पेशकश नाशिककरांसाठी सादर केली. नंदिनी गायकवाड यांनी ‘वाजले की बारा’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘दही दूध लोणी’ या मराठमोळ्या गीतांनी नाशिककरांची मने जिंकली. अनेक रसिकांनी यावेळी ठेका ठरलेला दिसून आला.

गोदा श्रद्धा फाउंडेशनच्या सांज पाडव्यास सिनेकलाकारांची खास परंपरा आहे. यापूर्वी या कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, स्वप्निल बांदोडकर, वैशाली माडे-भैसणे, जसराज जोशी, रोहित राऊत, आनंदी जोशी, कार्तिकी गायकवाड, ऊर्मिला धनगर, मुग्धा वैशंपायन, अभिजित कोसंबी, कौशिक देशपांडे यांनी आपला कलाविष्कार सादर केला आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या गायकांची मैफल अनुभवण्यासाठी नाशिककरांची तोबा गर्दी जमली होती.

---

प्रतिष्ठितांचा सन्मान

फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी यावेळी नाशिककरांसमवेत संवाद साधला. दिवाळीच्या शुभेच्छा देत नाशिकच्या प्रतिष्ठितांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार प्रा. देवायानी फरांदे, माजी आमदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार अनिल कदम, सहाय्यक पोलिस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, तसेच कथक नृत्यांगणा रेखा नाडगौडा, माजी नगरसेवक दत्ताजी पाटील यांच्यासोबत नाशिकमधील अनेक राजकीय नेते, पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार, व्यावसायिक आदींनी या सांज पाडव्याची अनुभूती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायको माहेरी; नवरोजी ढाब्यावरी!

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

दिवाळसणातील सुट्ट्यांमुळे बहुतांशी महिलांना माहेरी जातात असल्याने तळीराम नवरोजींना काहीशी मोकळीक मिळते. बायकोच्या हजेरीत धाकापोटी ‘पिण्या’वर मर्यादा येते. मात्र, दिवाळीत तिच्या गैरहजेरीत मनसोक्त पिण्याची हौस भागवून घेण्यावर अनेक तळीराम नवरोजींचा भर असतो. त्यामुळे सध्या ​ ढाब्यावर केवळ सांयकाळीच नव्हे तर सकाळपासून तळीरामांची गर्दी दिसत आहे.

भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा असलेला दिवाळी हा प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. वसुबारस, नरकचतुदर्शी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज अशा विविध सणांची पर्वणी असलेल्या या सणातील भाऊबीजेला लग्न झालेली प्रत्येक स्त्री माहेरी जात असते. तिच्या गैरहजेरीत मद्यमानाचे शौकीन असलेले नवरोजी आपल्या मित्रमंडळीसह आनंद लुटीत आहेत.

शाळांना सुट्टी असल्याने महिलांना माहेरी काही दिवस राहणे शक्य होत असल्यामुळे त्यांचा मुक्काम वाढतो. तळीराम तर याच दिवसांची प्रतीक्षा करीत असतात. इतर दिवशी काही झाले तरी बायकोच्या धाकामुळे त्यांचे पिण्याचे प्रमाण कमीच असते. आनंद असो की दुःख ‘पिनेवालो की पिनेका बहाना चाहिए’ या गीताप्रमाणे दिवाळीत आनंद साजरा करताना मद्यप्राशन करण्यावर त्यांचा भर असतो. तळीरामांच्या तर रोजच्या बोलण्यात मद्यपानाच्या गोष्टींचा समावेश असल्याचे दिसते. त्यांच्या बोलण्यात मद्यपानाच्या बाबतीच्या शब्दांचा सर्वसाधारण बोलण्यातही वापर करीत असल्याचे दिसते. त्यात क्वार्टर, हाफसाईज, खंबा, सिक्स्टी, नाईन्टी असे शब्द त्यांच्या तोंडून सहज निघत असतात.


धम्माल ‘सोशल’ चर्चा

सुटीच्या दिवसात दरवर्षी हॉटेल, बार, धाबे यांच्यात तळीराम नवरोजींची हमखास गर्दी होत असल्याचा हॉटेलचालकांचा अनुभव आहे. तेच चित्र यंदाही दिसते. सोशल मीडियावरदेखील या विषयाच्या पोस्ट आडिओ, व्हिडीओ, टाईप केलेल्या मजकूरासह व्हायरल होत आहेत. ‘मेरी बिबी मईके गई’ या गाण्यावर नवरोजी बेडवरच धम्माल नाचत असल्याच्या व्हिडोओने चांगलेच मनोरंजन केले आहे. सोशल मिडियावर सध्या हाच विषय मोठा चर्चेचा ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यान बडे, सुविधा तोकड्या

$
0
0

मटा मालिका उद्यानांचे तीनतेरा

--

--

सध्या दिवाळीची सुटी असल्याने नाशिककरांचा कल शहरातील मोठ्या उद्यानांकडे आहे. मात्र, महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे या सर्व उद्यानांची मोठी दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील मोठ्या उद्यानांच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकणारी ही मालिका...


--

उद्यान बडे, सुविधा तोकड्या

--

राजन जोशी, इंदिरानगर


नाशिक महानगरच्या प्रवेशद्वारावरच व पांडवलेणीच्या मागील बाजूस असलेल्या वनविभागाच्या जागेचा विकास करून वन विभागाकडून ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करून त्यावर फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात अत्याधुनिक पद्धतीचा लेझर शो सुरू करण्यात आला असला, तरी या ठिकाणी असलेल्या असंख्य त्रुटींमुळे आजही या उद्यानात नागरिकांना पाहिजे त्या सेवा-सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

या उद्यानात झाडांना साधे पाणीसुद्धा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा येथील लेझर शो बंदच असल्याने नाशिककरांचा हिरमोड होत असून, केवळ निवडणुकीपुरताच या उद्यानाचा उदो उदो झाल्याचे मत नाशिककरांकडून व्यक्‍त होत आहे.

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन या वन विभागाच्या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला. पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या या जागेचा वापर पूर्वी केवळ जिल्ह्यात ठिकठिकाणी पकडलेले बिबटे आणून ठेवणे यासाठीच होत होता. या ठिकाणी नक्षत्र उद्यान उभारण्यात आले. या उद्यानाचा फारसा वापर होत नव्हता. अत्यंत दाटी झाडी असलेल्या या भागात सायंकाळी नागरिकांना जाण्याससुद्धा भीती वाटेल अशी परिस्थिती होती. मात्र, राज ठाकरेंसह महापालिकेने पत्रव्यवहार करून सदरची वनविभागाच्या ताब्यात असलेली जागा ही महापालिकेकडे वर्ग करून त्या ठिकाणी उद्यान साकारण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच म्हणजेच साधारणतः एक वर्षापूर्वी या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्यानात विविध प्राण्यांची शिल्पे उभारण्यात आली असून, त्यांचे विविध आवाज नागरिकांना ऐकण्यास मिळतात. या उद्यानाचे मोठे आकर्षण म्हणजे येथे असलेला लेझर शो. या लेझर शोच्या माध्यमातून थेट येथील झाडांनाच बोलके करण्यात आले आहे. त्यामुळे हे नाशिककरांसाठी मोठे आकर्षण आहे. उद्‌घाटनानंतर याठिकाणी नाशिककरांची खूपच गर्दी होत असल्याचे दिसून आले. मात्र, हा शो अनेकदा बंदच राहत असल्याने अनेकांची निराश होत आहे.

--

पार्किंगअभावी खोळंबा

या ठिकाणी सध्याच्या सर्वात मोठी समस्या ही वाहनतळाची आहे. या गार्डनमध्ये येणाऱ्यांना अक्षरशः सर्व्हिसरोडवर वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी तिकीट विक्रीसाठी केवळ एकच खिडकी ठेवण्यात आल्याने नागरिकांची गर्दी होते व पर्यायाने अनेकदा वादविवादसुद्धा होत असतात. या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या जागेत किंवा वनौषधी उद्यान असलेल्या जागेत तरी वाहनतळाची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

--

आत प्रकाश, बाहेर अंधार!

या उद्यानात पूर्णपणे प्रकाशव्यवस्था असली, तरी बाहेर किंवा प्रवेशद्वारालगत प्रकाशव्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होतात. ही जागा वन विभागाच्या ताब्यात असल्याने या ठिकाणी पूर्वीपासून मोर किंवा अन्य वन्यपशू आढळून येतात. या पशूंना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थाच नसल्याचे दिसते. मागील काही महिन्यांपूर्वी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी येथील तळ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला होता. महापालिकेने यापूर्वी शहरात पेलिकन पार्क उभारले होते. तेही खासगी पद्धतीने ठेकेदाराकडे सांभाळण्यास दिले होते. मात्र, कालांतराने ते बंद झाले. त्याचप्रमाणे आता फुलपाखरू उद्यानदेखील महापालिकेने खासगी ठेकेदाराकडे दिलेले असून, त्याची निगा राखण्याबरोबरच ते सुरळीतपणे चालले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

--

पुरेशा सुरक्षा यंत्रणेची अपेक्षा

बयाचदा या ठिकाणी काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गर्दी करीत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या प्रकाराला अटकाव घालण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे. या उद्यानालगत असलेल्या फाळके स्मारकाचेही गाजावाजा करून उद्‌घाटन करण्यात आले होते. मात्र, आता हे स्मारक म्हणजे प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले असल्याचे चित्र असून, याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त होत असते. त्यामुळे या उद्यानाचाही भविष्यात तसा वापर होऊ नये यासाठी या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा ठेवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.

--

शहरातील एकमेव असा लेझर शो फुलपाखरू उद्यानात सुरू करण्यात आला. त्यामुळे ही नाशिककरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र नाशिकमध्ये यापूर्वी झालेले अनेक प्रकल्प हे ठेकेदारांच्या किंवा अनियोजनामुळे बंद झाले आहेत व त्या जागा पडून आहेत. तशी अवस्था या प्रकल्पाची होऊ नये.

-मंगेश गायधनी, नागरिक

--

येथील झाडांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने ती सुकली आहेत. त्याचबरोबर येथील लेझर शो बऱ्याचदा बंदच राहत असून, नाशिककर किंवा बाहेरगावाहून आलेले पर्यटक या ठिकाणी गेल्यावर त्यांचा हिरमोड होताे. याबाबत आयुक्‍तांना निवेदने देऊन चर्चा करण्यात आली आहे. मात्र, काहीही उपयोग होत नाही.

-सुदाम डेमसे, सभापती, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीतही फुलपाखरू उद्यानातील लेझर शो बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पांडवलेण्याच्या मागील बाजूस असलेल्या वनविभागाच्या जागेत उभारलेल्या फुलपाखरू उद्यानातील लेझर शो बंदच झाला असून, तो पुन्हा कार्यरत करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या सुट्टीत हा लेझर शो बंद असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. वारंवार अशा पद्धतीने हा शो बंद करण्यात येऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

पांडवलेण्याच्या मागील बाजूस असलेल्या वनविभागाच्या जागेत फुलपाखरू उद्यान साकारण्यात आले आहे. संपूर्ण जंगलमय परिसर असलेल्या या भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने हे गार्डन उभारण्यात आले असून, या उद्यानात शहरातील पहिला लेझर शो उभारण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षणाचा संदेश या लेझर शोच्या माध्यमातून देण्यात येत आहे. हा शो सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बंद पडला होता. नंतर पुन्हा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने हा शो पुन्हा बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे बंद केलेला शो अद्याप सुरू न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. आजही अनेक नाशिककर किंवा अनेक पर्यटक या ठिकाणी लेझर शो पाहण्यासाठी जातात, पण त्यांची निराशा होते. ऐन दिवाळीत अशा पद्धतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पाची अशी अवस्था होत असल्याने भविष्यात या प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीत धामधुमीत उद्‌घाटन करण्यात आलेल्या या शोचे आता नवनिर्माण होणार की नाही, असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता हा शो पुन्हा सुरू होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


पावसाळ्यामुळे हा लेझर शो बंद ठेवण्यात आला होता. पावसाळा संपल्यावर हा शो सुरू करण्यात आला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने तो पुन्हा बंद ठेवण्यात आला आहे. आता पावसाळा संपल्याने लवकरच तो सुरू करण्यात येईल.

- राहुल वाघ, वनरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक शहरात वीस अपघातप्रवण क्षेत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराचा मंदावलेला वेग व सतत होणारे अपघात टाळण्यासाठी नाशिक शहर वाहतूक नियंत्रण समितीची (मोबिल‌िटी सेल) बैठक सोमवारी राजीव गांधी भवन येथे आयोज‌ित करण्यात आली होती. यावेळी आरटीओच्या वतीने २० अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून, ती कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

ही बैठक राजीवगांधी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यात राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, नाशिक महानगरपालिका, पोलिस, नाशिक शहरातील संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.


द्वारकेच्या वाहतुकीवर चर्चा

यात प्रामुख्याने द्वारका येथील वाहतुकीचा प्रश्न चर्चेला आला. या ठिकाणची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नाशिक महापालिका व पोलिस यांच्या संयुक्त विद्यामाने नुकताच एक प्रयोग करण्यात आला. मात्र, तो फोल ठरला. यावेळी पोलिस प्रशासनाने त्यावर टिप्पणी तयार केली असून, ती या बैठकीत सादर करण्यात आली. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी असलेला डोम वाहतुकीला अडथळा ठरत असून, त्यावर काय उपाय करता येईल, यावर विचार करण्यात आला. लवकरच या ठिकाणची पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

अहवाल सादर करा

प्रादेशिक परिवहन विभागाने नाशिक शहरात सतत अपघात होणारी २० ठिकाणे निर्देश‌ित केली असून, त्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना करता येतील, त्याबाबतचा अहवाल २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करावा, असे आदेश संबंधीत विभागांना देण्यात आले आहेत.
द्वारका सर्कल कमी होणार

द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. या ठिकाणाहून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. या ठिकाणची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी त्या ठिकाणी असलेले सर्कल कमी करता येईल का, याबाबत विचार करण्यात आला.

शहरातील सिग्नल्स वाढणार

शहरात ३२ सिग्नल्स कार्यान्वित आहेत. शहराच्या कोणत्या भागात आणखी सिग्नल्स बसवणे गरजेचे आहे, त्याचा सर्व्हे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नाशिक महापालिकेचा विद्युत विभाग व पोलिस यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून येत्या काही दिवसात ठिकाणे ठरविली जाणार आहेत.

३५० स्पीड ब्रेकरचे प्रस्ताव

शहरात ३५० ठिकाणी स्पीड ब्रेकर्स बसवावीत असा नागरिकांकडून प्रस्ताव आला आहे. परंतु, कोर्टाच्या २००५ च्या आदेशानुसार स्पीड ब्रेकर्स बसविता येत नाही. याबाबत वाहतूक पोलिस व महापालिकेचे अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांनी उपाययोजना कराव्यात असा निर्णय घेण्यात आला.


दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कराव्यात

नाशिक शहराचा वाहतूक आराखडा तयार करताना नागरिकांच्या सूचनांचा व हरकतींचा सखोल अभ्यास करावा व दिर्घकालीन उपाययोजना तयार कराव्यात, असे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीनदुबळ्यांसह कष्टाळूंची दिवाळी झाली गोड

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांसह संस्थांनी दीपोत्सवात दीनदुबळ्यांसह कष्टकऱ्यांना फराळ वाटप केला. दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा, म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.


वाहक, चालकांना रोटरीतर्फे फराळ

मालेगाव ः येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या वतीने येथील बस स्थानकातील वाहक-चालकांना भाऊबीज निमित्ताने फराळ वाटप करण्यात आला. कुठलाही सण व उत्सव आपल्या कुटुंबात न साजरा करता प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या चालक व वाहकांच्या हाती फराळ पडताच त्यांचे डोळे पाणावले होते. हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे मत ओम गगराणी यांनी व्यक्त केले. यावेळी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपप्रांतपाल राजेंद्र अहिरे, अध्यक्ष प्रमोद देवरे, सेक्रेटरी राजेंद्र दिघे, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी, पोलिस उपनिरीक्षक भिमराव पाटील उपस्थित होते. गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सतीश कलंत्री यांनी सांगितले.

सूत्रसंचालन कुंदन चव्हाण यांनी तर आभार श्रीकांत जोशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र देवरे, अशोक वेताळ, शाम दुसाने, रमेश मोरे, विलास सोनजे आदींनी पुढाकार घेतला.


‘एक करंजी मोलाची'

येवलाः दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी, शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर, कसे तरी उभ्या असलेल्या कुडाच्या झोपडीतील आदिवासींचे चित्र म्हणजे अगदी त्याउलट. तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर. अशा या आदिवासी दिनदुबळ्यांच्या जीवनात एकप्रकारे दिपावलीची पणती पेटवण्याचे काम येवल्यातील खटपट युवा मंचने यंदाही केले.

येवला शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच व नाशिक येथील नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने यंदाच्या दीपावलीतही ‘एक करंजी मोलाची’ व ‘एक वस्त्र मोलाचे’ हे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत जमा झालेला फराळ तसेच कपडे खटपट मंचच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सायगाव, कोटमगाव, नागडे, पुरणगाव येथील आदिवासी वस्तीवरील आदिवासी व कष्टकरी कुटुंबातील बांधवांना वाटले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खटपट युवा मंचच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील संत नामदेव मंदिरात सलग तीन दिवस शहरातील नागरिकांकडून फराळ व कपडे जमा झाले होते. एक वस्त्र मोलाचें अंतर्गत विविध प्रकारचे कपडे, स्वेटर, ब्लॅकेट, साड्या आदींचा समावेश होता. ही सर्व पाकीटे, कपडे तसेच जमा झालेली खेळणी तालुक्यातील सायगाव फाटा, नागडे गावातील शाळेच्या समोरील परिसरातील, तसेच विठ्ठलाचे कोटमगाव, येवला शहरातील गोशाळा मैदानासमोरील आदिवासी व कष्टकरी वाड्यावस्त्यांवर वाटप करण्यात आले.

धडपड मंचचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके, खटपट मंचचे अध्यक्ष मुकेश लचके, जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण शिंदे, सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी, प्रा. दत्तात्रय नागडेकर, आबा सुकासे, संतोष खंदारे, राहुल सुताने, रामा तुपसाखरे, सुहास भांबारे, संतोष टिभे आदींच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांना फराळ तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले.


एकलव्य ग्रुपकडून मदत

पिंपळगाव बसवंत ः येथील एकलव्य ग्रुपने गरीब दिनदुबळ्यांना दिवाळीचा फराळ, नवीन कपडे, मिठार्इ वाटप केली. ग्रुपच्या कल्याणी तळेकर, रेणुका गोसावी, गणेश डेरे, वारीस काझी, प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरिबांची दिवाळी साजरी करायची या निर्धाराने उत्तम नियोजन केले. संपूर्ण पिंपळगाव शहरात फेरी काढून फराळ कपड्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील नागरिकांना आवाहन करून गरिबांसाठी फराळ कपडे यांची मदत मागितली. पिंपळगावकरांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. संकलन करण्यात आलेला फराळ आणि कपडे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर वाटप करण्यात आले.


सिन्नरमध्ये फराळ वाटप

सिन्नर ः आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेत सिन्नर शहरातील गरीब, दिव्यांगांना फराळ वाटप करण्यात आला. सरदवाडी रोड त्रिमूर्ती चौक येथील युवामंथन प्रतिष्ठानचे भरत शिंदे, डॉ. सुधीर कुशारे, रामहरी शिरसाठ, शिवाजी घुगे आदींनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे शहरातील विविध संघटनांनी कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे पोलिसांची 'प्रदूषणयुक्त' दिवाळी

$
0
0

फटाके बॉक्स खरेदीची सक्ती केल्याचा प्रकार

--

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम धुळे जिल्हा पोलिस दलाने केल्याने कुरबुरी सुरू झाल्या आहेत. कारण ठरले आहे ते फटाक्यांच्या बॉक्सची करण्यात आलेली सक्तीची खरेदी. धुळे जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनला फटाक्यांच्या बॉक्सची खरेदी करण्याची सक्ती करीत असल्याची बाब समोर आली आहे.

दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाने आणि मुख्यमंत्र्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. परंतु, धुळे जिल्हा पोलिस दलाने प्रदुषणमुक्त दिवाळीच्या उद्देशाला हरताळ फासत आपल्या प्रत्येक कर्मचार्‍याला एक हजार रुपयांच्या फटाके खरेदीची सक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे काही व्हीआयपी पोलिस ठाण्यांना तर जास्तीचे बॉक्स विक्रीचे ‘टार्गेट’देण्यात आल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या फटाके विक्रीतून नेमके कोणाचे उखळ पांढरे झाले? असा सवाल पोलिस उपस्थित करीत आहेत. एकंदरीत धुळे पोलिसांनी प्रदूषणमुक्त दिवाळीला हातभार न लावता पोलिस मुख्यालय आणि शहरात ‘प्रदूषणयुक्त’दिवाळीलाच खतपाणी घातल्याची ओरड होत असून, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.

काय आहे खरेदीचे गौडबंगाल?

गेल्या काही वर्षांपूर्वी एका विशिष्ट ठेकेदाराकडून पोलिसांच्या गणवेश खरेदीच्या सक्तीचा विषय गाजला होता. आता पोलिसांना फटके खरेदीची सक्ती झाल्याचा विषय पोलिस वर्तुळात चांगलाच गाजतो आहे. कारण वरिष्ठ स्तरावरून धुळे जिल्हा पोलिसांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे फटाके खरेदी करण्याची सक्ती झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पोलिसांकडून उमटत आहेत. धुळे जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यात प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांचे फटाके खरेदी सक्तीची करण्यात आली होती. तसेच व्हीआयपी पोलिस स्टेशन आणि व्हीआयपी पोलिसांच्या ब्रँचला जास्तीचे फटाके बॉक्स विक्रीचे ‘टार्गेट’ देण्यात आल्याने त्यांच्याकडूनही नाराजीचा सूर उमटत आहे. या फटाके विक्रीतून २० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे. त्यातून एक हजार रुपयामागे किमान ३०० रुपये कमिशन पकडले तरी सहा लाख रुपयांचा फायदा नेमका कोणाला झाला? पुण्याहून हे फटाके खरेदी कशासाठी आणले? अशा अनेक प्रश्नांनी खरेदीमागे काय गौडबंगाल आहे, असा सवाल पोलिसांकडून उपस्थित होत आहे.

टक्केवारीचा मलिदा कोणाला?

एक हजार पन्नास रुपयांच्या त्या बॉक्समधील फटाक्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण अनेक पोलिसांनी सदरच्या बॉक्समधील फटाक्यांची गुणवत्ता चांगली नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहीही असो सुमारे दोन हजारपैकी दीड हजार पोलिसांनी हे फटाक्यांचे बॉक्स खरेदी केले आणि ते फटाके फोडले. यामुळे पोलिस मुख्यालयात त्या-त्या तालुक्यांच्या पोलिस वसाहतीत व शहरात या फटाक्यामधून प्रदूषण झालेच. यातून पुन्हा पोलिसांची आर्थिक लुबाडणूक झाली, या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? फटाक्याच्या दारूतून टक्केवारीचा मलिदा लाटणारा कोण? याचाही शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.

---

धुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फटाके खरेदीची कुठलीही सक्ती करण्यात आलेली नव्हती. सर्वांसाठी ही फटाके खरेदी ऐच्छिक होती. यामुळे बहुतांश पोलिसांनी स्वेच्छेने फटाके खरेदी केली आहे.

-एम. रामकुमार, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा-सुविधा असाव्यात कायमस्वरूपी

$
0
0

मटा फोकस

सेवा-सुविधा असाव्यात कायमस्वरूपी

--

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ व महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, तसेच पर्यटनस्थळ असलेल्या श्री सप्तशृंगदेवी गडावर प्रचंड संख्येने भाविक हजेरी लावतात. दिवाळीच्या धामधुमीत व त्यानंतर आठवडाभर लाखो भाविकांची गडावर दर्शनासाठी रीघ दिसून येते. चैत्र व नवरात्रोत्सव या कालावधीत दोन यात्रा गडावर भरतात. या काळात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत, तसेच सर्वच शासकीय यंत्रणांकडून यथायोग्य नियोजन होत असते. मात्र, गडावरील गर्दी आता नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे गडावर उद््भवणाऱ्या अडचणी, विविध समस्यांची सोडवणूक होण्यासाठी, तसेच गर्दीचे व्यवस्थापन व मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता होण्याबाबत केवळ यात्रोत्सवापुरतेच नव्हे, तर वर्षभर अर्थात, कायमस्वरूपी नियोजन करणे गरजेचे बनले आहे.

--

संकलन ः दीपक महाजन

--


गर्दीचे व्हावे व्यवस्थापन

सप्तशृंगगडावर अनेकदा पहिल्या पायरीपासून बारी लागते. भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी अथवा अन्य धोका टाळण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी नियोजन केले जावे. बाऱ्यांमध्ये नियंत्रण व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची नियुक्ती गरजेची बनली आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली, तर धोका वाढू शकतो. त्यामुळे योग्य वेळीच त्यावर तोडगा निघायला हवा. येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्याकामी पुरेसे सर्वेक्षण केले जावे आणि त्यानंतर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

मूलभूत सुविधांची निकड

दिवाळीच्या धामधुमीत भाविक व पर्यटकांची मोठी संख्या गडावर दिसून येत आहे. गर्दी वाढत असली, तरी सुविधा तुटपुंज्या ठरत आहेत. गडावरील स्वच्छतागृहांचा मुद्दा कळीचा बनला आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे. भाविकांसाठीचा वेटिंग हॉल होणेदेखील आवश्यक बनले आहे. पुरेशा पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय होणे गरजेचे आहे. पहिली पायरी ते भगवती मंदिरापर्यंत लहान मुलांसाठी शौचालय गरजेचे आहे. राम मंदिर टप्प्याजवळ कायमस्वरूपी पाणपोयी असावी, अशीही भाविकांची अपेक्षा आहे. अंध व दिव्यांग भाविकांकरिता देवी दर्शनासाठी स्वतंत्र सोय तयार व्हायला हवी. काहींना पायऱ्या चढताना दम लागतो. हृदयाचा त्रास होऊ लागतो. अशा वेळी आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पायरी ते मंदिर परिसरात कायमस्वरूपी डॉक्टर, ऑक्सिजन सेवा उपलब्ध असावी. पार्किंगचा प्रश्न गंभीर असताना त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नाही. स्काय वॉकची संकल्पना आणली गेली. मात्र, ते काम अर्धवट स्थितीतच आहे. घाटाच्या रस्त्यांचे रुंदीकरण होणेही गरजेचे आहे. देवस्थान ट्रस्टच्या खोल्या कमी पडतात. त्यांची संख्या योग्य त्या सुविधांसह वाढायला हवी.

--

‘त्या’ व्यावसायिकांना आवरावे

गडावर कुठलेही वाहन आले, की परिसरातील बहुतांश व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी प्रत्येकाला अशा अाविर्भावात हातवारे करतात, जणू त्यांची मक्तेदारी अथवा सुभेदारीच आहे. यावर बंधने अाणणे गरजेचे आहे. अनेकांना इच्छा नसतानादेखील त्यांच्या कृतीचे शिकार व्हावे लागते. त्यामुळे भाविक व पर्यटक वैतागल्याचे दिसून येते. आपल्याकडील सेवा-सुविधांचा प्रचार ते ज्या पद्धतीने करतात, त्यावर अनेकांचा आक्षेप आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

--

या बाबी होणे गरजेचे

कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड हे भगवतीचे अत्यंत जागृत देवस्थान आहे. लाखोंच्या संख्येने भाविकांची वर्दळ येथे फारशी विशेष बाब राहिलेली नाही. मात्र, गडावर अजूनही पुरेशा सेवा-सुविधांची वानवा आहे. परिसरात पार्किंगची मोठी समस्या आहे. गर्दीचा सतत उच्चांक गाठला जात असतानाच कायमस्वरूपी पोलिस ठाणेदेखील गडावर नाही. त्यामुळे भाविकांची पाकिटे व इतर साहित्य चोरणारेही सापडत नाहीत. पोलिसांअभावी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील बहुचर्चित फ्युनिक्युलर ट्रॉली अद्यापही सुरू झालेली नाही. गड व परिसरात स्वच्छतागृहांची कमतरता भासत आहे. स्काय वॉकचा प्रश्न सुटण्यास तयार नाही. क्राउड पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे. देवस्थान ट्रस्टच्या खोल्यांचा प्रश्नही जैसे थे आहे. परिसरातील घाटरस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे असून, बाह्य वळणरस्तादेखील मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. घाटात ठिकठिकाणी पथदीप बसविणे गरजेचे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय अपेक्षितरीत्या व्हायला हवी. वेटिंग हॉलचे कामदेखील पेंडिंगच आहे. पुरेशी स्वच्छता, निर्माल्य संकलनाचाही अभाव दिसून येतो. भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने अशा एक ना अनेक अत्यंत महत्त्वाच्या बाबी गडावर होणे गरजेचे बनले आहे.

--

आम्ही वेळोवेळी सप्तशृंगगडावर येत असतो. वर्षभर येथे गर्दी ठरलेलीच आहे. मात्र, येथे यात्रा काळात गर्दीबाबत जसे नियोजन असते अगदी तसेच नियोजन कायमस्वरूपी करायला हवे. पार्किंगची सुविधा, फ्युनिक्युलर ट्रॉली आदी प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष घालावे.

-सिद्धांत आहिरे, भाविक, ओझर

--

प्लास्टिकमुक्ती, पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्यासाठी योग्य त्या ठिकाणी सोय होणे गरजेचे आहे. काही व्यावसायिकांच्या उत्साहाला आवर घालायला हवा. गडाच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रशासनाने लक्ष घालावे. येथे स्वतंत्र पोलिस चौकी निर्माण होणे गरजेचे आहे. पाकीटमारांचा सुळसुळाट थांबवायला हवा.

-सुरेश कोठावदे, भाविक, कळवण

--

ट्रस्ट अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व कार्यालयीन व्यवस्थापनाच्या संयुक्तिक प्रयत्नांतून भाविकांना सेवा-सुविधा देण्यास ट्रस्ट प्रयत्नरत आहे. भाविकांना भेडसावणाऱ्या समस्या व अत्यावश्यक सेवेबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. ९० खोल्यांचे काम ट्रस्टने हाती घेतले आहे. राजराजेशवरी हॉलचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे.

-डॉ. रावसाहेब शिंदे, विश्वस्त, सप्तशंृग देवस्थान ट्रस्ट

--

जर विविध प्रशासकीय विभागांनी अधिकतम सहभाग दर्शविला, तर भविष्यकाळात गडावर स्वतंत्र पोलिस स्टेशन, घाटरस्त्यांवर पथदीप, कठड्यांचे नूतनीकरण, रिफ्लेक्टर, संरक्षक जाळ्या आदी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. भाविकांना भगवतीच्या दर्शनासह सुरक्षित पर्यटनही अनुभवता येईल.

-सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

--

सप्तशृंगगड ग्रामपंचायतीमार्फत विकास आराखड्यात विविध बाबींची नोंद घेतली आहे. मम्मादेवी चौकात कूपनलिका बसविलेली असून, लवकरच गडावर शुद्ध पाण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. बस स्टँडजवळ भक्त निवास, गडावर चार ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. गावांतर्गत रस्ते, डोम व ठिकठिकाणी पाणपोयांची सुविधा निर्माण करण्यात येईल.

-राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगगड

---

यासंदर्भात व्हावे नियोजन

--

-पुरेशा सेवा-सुविधांचा अभाव

-पिण्याच्या पाण्याची निकड

-पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष

-क्राउड पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

-पोलिसांअभावी सुरक्षेचा प्रश्न गंभीर

-फ्युनिक्युलर ट्रॉलीला सापडेना मुहूर्त

-स्वच्छतागृहांची भासतेय कमतरता

-स्काय वॉकचा तिढा सुटेना

-घाटरस्ता रुंदीकरणाची गरज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची रिक्षात प्रसुती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडलगत फुलेनगर परिसरातील महापालिकेच्या मायको दवाखान्यात दाखल झालेल्या महिलेची डिल‌िव्हरी प्रवेशद्वारावरच रिक्षात करण्याची वेळ आली. या दवाखान्यातील आरोग्य सेवक हजर नसल्यामुळे आजूबाजूच्या महिलांच्या मदतीने तिची डिल‌िव्हरी करण्यात आली. या प्रकाराने फुलेनगर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

फुलेनगर परिसरात राहणारी मोनिका राजेशकुमार साकेत या महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे ती सोमवारी (दि. २३) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मायको दवाखान्यात आली. त्यावेळी दवाखान्यातील एका नर्सने तिला तपासले. जास्त दुखल्यास पुन्हा दवाखान्यात येण्यास सांगितले. ही महिला घरी गेली. दुपारी दोनच्या सुमारास महिलेच्या पोटात कळा येऊ लागल्यामुळे तिला रिक्षातून दवाखान्याजवळ आणण्यात आले. तेथे तिच्या पोटात जास्त दुखून रक्तस्त्राव व्हायला लागला. मात्र, त्यावेळी दवाखान्यात कोणीच नसल्यामुळे अडचण निर्माण झाली. तेथे जमलेल्या महिलांच्या मदतीने तिची रिक्षात डिल‌िव्हरी झाली. सुदैवाने महिलांची वेळेवर मदत मिळाल्यामुळे ही महिला आणि बाळ सुस्थितीत आहे. या प्रसंगामुळे महिलेस अश्रू अनावर झाले होते.

नगरसेवकांची भेट

या घटनेची माहिती येथील नागरिकांनी नगरसेवक जगदीश पाटील आणि नगरसेविका शांता हिरे यांना कळविली. त्यांनी मायको दवाखान्यात येऊन या महिलेची विचारपूस केली. त्यावेळीदेखील या दवाखान्यातील एकही कर्मचारी हजर नसल्याचे त्यांना दिसले. जगदीश पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना या घडलेल्या घटनेची माहिती दिली. या दवाखान्यात कशा प्रकारे कामचुकारपणा चालतो, हे सांगून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकावर वाहनांच्या रांगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दिवाळीची सुटी असल्यामुळे पर्यटनाला निघालेल्या वाहनांमुळे गेले दोन दिवस वाहनधारकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी कुठे अर्धा तास तर कुठे तास न तास गाड्या पुढे सरकत नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. नाशिक शहरात द्वारका सर्कलवर ट्रॅफिकची समस्या नेहमीचीच आहे. पण त्यात या सुट्यांमुळे भर पडली. सोमवारी दुपारी ४ पर्यंत तर चांदवड, पुणे, मुंबईकडून येणाऱ्या वाहनांच्या तिनही मार्गांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

द्वारकासह अनेक महामार्गांवरही ट्रॅफिक जाम झाल्यामुळे वाहने पुढे सरकत नव्हती. दिवाळीनिमित्त कार्यलयांना सलग सुट्या असल्यामुळे अनेकांनी सुट्या वाढवून बाहेरगावी जाण्याचा प्लॅन तयार केला. दिवाळीत अडकलेले व्यापारीसुद्धा आता बाहेर पडू लागले आहेत. त्यातच शाळा, महाविद्यालयांनाही सुट्या असल्यामुळे गर्दीत वाढ झाली आहे. नाशिक - पुणे मार्गावर रस्त्यांचे काम सुरू असल्याचाही फटका या वाहनांना बसला. त्यातून वाहनांची कोंडी झाली.

बसचे वेळापत्रक कोलमडले

संपामुळे बंद असलेल्या बस सुरू झाल्या असल्या तरी ट्रॅफिक जाममुळे बसचे वेळापत्रकही कोलमडले. अनेक बस उश‌िरा स्थानकामध्ये दाखल होत असल्यामुळे येथेही कोंडी झाली. काही बसेस येण्याच्या वेळेत मोठा फरकही पडला.

प्रत्येक चौकात कोंडीच

वाहनांची वाढलेली संख्या त्यात बाहेरगावहून आलेल्या वाहनांची संख्या यामुळे शहरातही प्रत्येक चौकात ट्रॅफिक जामचा अनुभव सगळ्यांनाच आला. त्यात काही ठिकाणी मोठी कोंडी तर काही ठिकाणी काही मिनिटांत वाहतूक सुरळीत होत होती. अनेक ठिकाणी वाहन रस्त्यांवरच उभी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यात काही ठिकाणी ट्रॅफिक पोल‌िस असल्यामुळे ही कोंडी सुटत होती. पण, जेथे पोल‌िस नाही तेथे मात्र हा प्रश्न कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांवरील कर्जभार कमी झालेला नाही. यामुळेच निफाडसारख्या सधन तालुक्यात कर्जबाजारी द्राक्षबागायतदार शेतकऱ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्‍या ८८वर पोहोचली आहे.

नैताळे (ता. निफाड) येथून जवळच असलेल्या श्रीरामनगर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबाजी श्रीहरी हंडोरे (वय ४७) यांनी सोमवारी रात्री रहात्या घराजवळील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबाजी हंडोरे हे आपल्या कुटुंबासमावेत शिवरेफाटा ते श्रीरामनगर या रोडलगतच्या शेतात बांधलेल्या घरी रहात होते. पहाटे त्यांचा मुलगा जनावरांना चारा टाकण्यासाठी उठला असता त्याला आपले वडील बाबाजी हंडोरे हे पत्र्याच्या शेडला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. बाबाजी हंडोरे यांच्याकडे श्रीरामनगर सोसायटीचे १,८२,५०० इतके कर्ज आहे. ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार नसल्याने कर्जमाफीचा फायदा न मिळाल्याने हंडोरे हे नैराश्यग्रस्त झाले होते, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराला पुन्हा होर्डिंग्जचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

होर्डिंग्ज हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना नाशिक महापालिका मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात सर्वच भागात कोणीही होर्डिंग्ज लावत असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरून अपघात होत आहेत. या होर्डिंग्जच्या वादांतून अनेकदा हाणामारीचे प्रकारही झाले आहेत.

दिवाळीत होर्डिंग्जच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये शुभेच्छांचे मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या चमकोगिरीला पुन्हा वेग आला आहे. शहरात पंचवटी कारंजा, निमाणी बसस्टॅँड येथे होर्डिंग्जची बजबजपुरी झाली आहे. तीन वर्षांपूर्वी या भागात होर्डिंग्ज लावण्याच्या वादातून एका युवकाचा खून झाला होता. यातून धडा घेत हा प्रकार थांबेल, अशी आशा होती. परंतु, तसे घडले नाही. उलट येथील होर्डिंग्जच्या संख्येत दुपटीने वाढ झाली.

नाशिकरोड परिसरालाही होर्डिंग्जचा विळखा पडला असून, या विद्रुपीकरणावर प्रशासनाने लवकर कारवाई न केल्यास होर्डिंग्जच्या वादातून शहराची शांतता धोक्यात येऊ शकते. काही दिवसांमध्ये होर्डिंग्जच्या वादातून परिसरात हाणामाऱ्यांचे प्रकार घडले होते. भाऊ, नाना, दादा यांनी तर शहरातल्या प्रत्येक भागात होर्डिंग्जरुपात आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने होर्डिंग्जसाठी जागा निश्चित केल्या असून, त्याऐवजी मिळेल त्या ठिकाणी ते लावले जात आहेत.

नाशिक-पुणे रोड होर्डिंगमय

मिसरूड न फुटलेल्या ‘युवा नेत्यांनी’ही आपल्या वाढदिवसाच्या जाहिराती होर्डिंग्जद्वारे चौकाचौकांत झळकावल्या आहेत. बिटको चौकानंतर दत्तमंदिर रोडवर अनेकांनी होर्डिंग्ज झळकवले आहे. रस्त्यावरुन येताना या होर्डिंग्जमुळे अनेक अपघात घडत असून होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उपनगरच्या चौकात अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे होर्डिंग्ज लागत असून, त्यावरून वातावरण दूष‌ित होत आहे. त्याचप्रमाणे गांधीनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, बोधलेनगर परिसरात अतिक्रमण विभागाने सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

पोलिसांकडून मनाई आदेश

होर्डिंग्जला प्रतिबंध करण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले असून, नियमांचा भंग केल्यास अथवा कुठेही परवानगी न घेता होर्डिंग्ज लावल्यास कलम १३४ प्रमाणे कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तांनीही प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. परंतु, होर्डिंग्जमुळे कोणावर कारवाई झाली, असे ऐकिवात नाही.


नगरसेवकांचा दबाव

होर्डिंग्जबाबत कारवाईस टाळाटाळ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कारवाईसाठी गेल्यावर नगरसेवकच फोन करुन कारवाई थांबवण्याची सूचना करतात. त्यामुळे कारवाई करणे अवघड होते. प्रशासनाने वेळीच याची दखल न घेतल्यास पुन्हा सर्व शहर होर्डिंगमय होण्यास वेळ लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सततच्या छेडछाडीला कंटाळून घोटीतील तरुणीने धावत्या रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखी संजय भगत (१९, रा. महाराणा प्रतापनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राखी ही गावातच ब्युटी पार्लरचे शिक्षण घेत होती. गेल्या वर्षभरापासून गावातीलच किरण गजानन लहाने हा तरुण तिला रस्त्यात आडवून कायम त्रास देत होता. ब्युटी पार्लरजवळ थांबून तिची छेड काढीत असे. तसेच ‘माझ्याशी लग्न कर’ असे धमावित असे. तिने याबाबत आपल्या पालकांना कल्पना दिली. पालकांनीही किरणला समज दिली होती. मात्र, त्याच्याकडून राखीला होणारा छेडछाडीचा त्रास काही कमी होत नव्हता. या नेहमीच्या छेडछाडीला व जाचाला कंटाळून रविवारी (दि. २२) दुपारी एक वाजे दरम्यान राखी हिने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी राखी हिची आई शुभांगी भगत यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित किरण गजानन लहाने याच्याविरोधात कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित किरण फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश सांगळे, सुहास गोसावी, बिपीन जगताप, शीतल गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाने उजळले आदिवासी पाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध सामाजिक संस्थांनी आदिवासी पाड्यांवरील व्यक्तींप्रति प्रेमाचे नाते जपत पाड्यांवर दिवाळी साजरी केली. विविध संस्थामार्फत आदिवासी बांधवांची दिवाळी नवीन कपडे, फराळाचे वाटप करून आनंददायी बनवली.

--

कर्मयोगी सेवाभावी संस्था

कर्मयोगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवर दिवाळीचा फराळ व कपडे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते गावाजवळील हर्षवाडी, लेकुरवाळी पाडा, दुगारवाडी पाडा येथील आदिवासी बांधवांना फराळ व कपडेवाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज पळसकर, काशीनाथ खडसे, ऋषिकेश जंगम, अविनाश बाविस्कर, भास्कर वानखेडे आदी उपस्थित होते.

--

बळी महाराज मंदिर

पंचवटीतील अमृतधाम परिसरातील बळी महाराज मंदिरात दर वर्षीप्रमाणे यावर्षीही बलिप्रतिपदेनिमित्त हजारो महिलांनी दिवाळी फराळ अर्पण केला. या फराळासह सुमारे तीन हजार कपड्यांचे जोड सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उंडओहोळ, घाणीचा पाडा, बेडसे या गावांतील आदिवासी बांधवांना वितरित करण्यात आले. नाशिकपासून सुमारे ९० किलोमीटर दूर व गुजरातच्या सीमेवर असलेल्या या गावांत रविवारी झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बार्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुनील तावडे, बळी महाराज अमर मित्रमंडळाचे अध्यक्ष वाळू शिंदे, सुनील सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ धूम, नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. सहायक निरीक्षक तावडे यांनी आदिवासी बांधवांना दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आवाहन केले. दिवाळी हा सण केवळ नावापुरताच माहिती असणाऱ्या गरीब आदिवासी बांधवांना मिठाई व कपड्यांचे वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहेऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहत होता. आदिवासी बांधवांसमवेत बळी महाराज अमर मित्रमंडळाच्या सदस्यांनी वनभोजनही केले. याप्रसंगी उंडओहोळ येथील ढवळू कोती, भास्कर बेंडकोळी, सोमनाथ गुंबाडे, कृष्णा जाधव, गणपत जाधव, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते.

--

ज्ञानोपासना सामाजिक संस्था

ज्या घरांमध्ये आजही विजेच्या दिव्यांचा प्रकाश पोहोचलेला नाही, अशा आदिवासी पाड्यांवरील घरांत आनंदाचे दीप प्रज्वलित करीत ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अनोखी दिवाळी साजरी केली. समाजातील गरजू व वंचितांना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. वंचित घटकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा याकरिता ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजेवाडी भोकरपाडा या आदिवासी पाड्यांवर जाऊन चिवडा, लाडू, करंजी, चकली, मिठाई आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी फटाके उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, तुषार शेलार, स्वप्निल जावळे, रोशन काठे, सुरज उगले, विजय दशमुखे, अमोल देशमुख, राजश्री धनेश्वर, अमित मोरे, राहुल भामरे आदी सभासद व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्यांचे स्क्रॅप उघड्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात औद्योगिक वसाहतींची स्थापना झाल्यापासूनच कारखान्यांमधून निघणारे स्क्रॅप टाकण्याची व्यवस्था न झाल्याने बहुतांश कारखान्यांतील स्क्रॅप मटेरिअल चक्क उघड्यावर टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारावर कारवाई झाल्यानंतर हा प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे आढळून येत असल्याने संबंधित यंत्रणांनी कारखान्यांसाठी स्क्रॅप झोन उभारण्यासंदर्भात पुढाकार घेण्याची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

कारखान्यासंटीच्या स्क्रॅप झोनअभावी कारखान्यांमधील निघणारे भंगार पुन्हा उघड्यावरच पडणार का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. महापालिका, एमआयडीसी व महाराष्ट्र शासनाने कारखाने व घरांमधील निघाणाऱ्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे. महापालिकेने नुकताच अनधिकृत असलेला भंगार बाजार पोलिसांच्या मदतीने हटविला खरा. परंतु, तोच भंगार बाजार ग्रामीण भागात पाय पसरू लागल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत आहे. शासनानेच यावर योग्य तो उपाय शोधावा, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

शहरात सन १९६८ नंतर कारखान्यांचे मोठे जाळे पसरायला सुरुवात झाली. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत हजारो कारखाने सुरू झाल्याने देशभरातील कामगारांना रोजगार उपलब्ध झाला. वाढत्या शहरीकरणात कारखान्यांचीही संख्या वाढत गेली. या पार्श्वभूमीवर कारखान्यांमधून निघणारे भंगार घेणाऱ्या व्यावसायिकांनी अंबड लिंकरोडवर अनधिकृत भंगाराची दुकाने थाटली होती. अनधिकृत असलेल्या भंगाराच्या दुकानांत अनेक चुकीचे प्रकार घडत असल्याने महापालिकेने व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक दिलीप दातीर यांनी केली होती. महापालिकेनेदेखील अनधिकृत भंगार बाजाराविरोधात न्यायालयात धाव घेतली. महापालिका व नगरसेवक दातीर यांच्या पाठपुराव्यामुळे अनधिकृत भंगार बाजाराच्या अतिक्रमणावर दुसऱ्यांदा कारवाई होऊन तो हटविण्यात आला. त्यानंतर आता कारखान्यांमधील स्क्रॅपचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

---

रहिवासी भागात दुकाने

शहरात रोजच फिरणाऱ्या घंटागाड्यांमध्ये प्लास्टिक, पुठ्ठा, प्लास्टिकच्या बाटल्या व इतरही भंगाराचे साहित्य गोळा केले जाते. परंतु, स्क्रॅप झोनची सुविधाच नसल्याने रहिवासी भागात संबंधित भंगार खरेदी करणारी दुकाने उघडली आहेत. त्यामुळे महापालिका, एमआयडीसी व महाराष्ट्र शासनानेच भंगाराचे साहित्य खरेदी करणाऱ्यांसाठी स्क्रॅप झोनची नियमानुसार उभारणी करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे. महापालिकेने अंबड लिंकरोडवर असलेली अनधिकृत भंगार दुकाने हटविल्यावर आता शासनानेच भंगार दुकानांच्या जागेसाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा दर तीन हजार पार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दीपोत्सवानंतर कांद्याने उसळी घेतली असून, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला ३२५१ रुपये, तर नव्याने दाखल होत असलेल्या लाल कांद्याला ३०५३ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. लाल कांदा दरात पंधराशे, तर उन्हाळ कांदा दरात सातशे रुपयांची प्रतिक्विंटलमागे भाववाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या सोमवारी कांद्याला २५५१ इतका भाव मिळाला होता. त्यानंतर सोमवारी (दि. २३) उन्हाळ कांद्याला किमान १२००, कमाल ३२५१, तर सरासरी २९५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याने दोन वर्षानंतर तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात येण्यास उशीर झाला आहे. परिणामी उन्हाळ कांदा भाव खात आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला किमान १८०० रुपये, कमाल ३०५२, तर सरासरी २६५० प्रतिक्विंटलला असा भाव मिळाला. गत सोमवारच्या तुलनेत पंधराशे रुपयांची भाववाढ झाली आहे.

लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला ३२५१, तर लाल कांद्याला ३०५३ रुपये असा भाव मिळाला. आता केंद्र सरकारने कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. येणाऱ्या दिवसांत लाल कांद्याची मोठी आवक होऊन भाव स्थिर होतील.

- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images