Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गांधींच्या विचारांचा साहित्यिक हरपला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. मु. ब. शहा यांचे रविवारी (दि. ८) त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. डॉ. शहा यांनी साहित्याला वाहिलेल्या आपल्या जीवनात विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. मराठी साहित्याला हिंदीत अनुवादित करण्यासाठी महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी जवळपास पन्नास पुस्तकांचे लिखाण केले असून, राजवाडे संशोधन मंडळाच्या तेरा खंडांचेही संपादन त्यांनी केले.

'गांधी विचार', 'साने गुरुजीं'च्या कथांचे हिंदीत अनुवादासोबतच मराठी साहित्य अनुवादित करीत त्यांनी साहित्यकक्षा मिळवल्या होत्या. प्रा. शहा यांच्यावर पांझरा नदीकिनारी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेत शोक व्यक्त केला.

प्रा. शहा विविध सामाजिक संघटनांना बळ देत त्या संस्थाचे आधारवड बनले होते. नम्र आणि गंभीरपणे सहज भाषेत विचार मांडण्याची दीर्घकालीन प्रभाव ठेवत त्यांना हिंदी साहित्यातला मानाचा 'गंगाशरण पुरस्कार' राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते. गांधी विचार व प्रसार-प्रचार, इतिहास संशोधन, अनुवाद, हिंदी साहित्य निर्गमित करण्यात प्रा. शहा यांचे योगदान अविस्मरणीय असेच होते. राष्ट्रभाषा सभा, राष्ट्रसेवा दल, आंतरभारती या संस्थामध्ये डॉ. शहा यांनी विविध पदे भूषवित या संस्थांना नव्या उच्चतेवर नेण्याचा प्रयत्न केला. 'छात्रभारती' या संघटनेचे ते संस्थापक होते. मनमिळाऊ गांधी विचारवंत आणि प्रत्यक्ष त्यांच्या विचारांचे जीवन जगणारा साहित्यिक महाराष्ट्राने गमावला आहे.

त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनिल सोनार, प्राचार्य कृष्णा पोतदार, पितांबर सरोदे, प्राचार्य विश्वास पाटील, कवी जगदीश देवपूरकर, सुलभा भानगावकर, प्रा. चेतन सोनार, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, गो. पी. लांडगे, योगेंद्र जुनागडे, हेमंत मदाने, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जे. यू. ठाकरे, लखन भतवाल, उदयोजक निरंजन भतवाल यांच्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानसिक आजारात आधार गरजेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना आधाराची गरज असते. कुटुंबासह समाजाने त्यांना हा आधार द्यायलाच हवा, अशी अपेक्षा अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये ही मुलाखत झाली. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीची नाशिक शाखा, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सिव्हिल हॉस्पिटल यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांनी ‘प्रवास मनाचा’ या कार्यक्रमांतर्गत मानस‌िक आरोग्याबाबतचा प्रवास उलगडला. डॉ. नकुल वंजारी आणि डॉ. स्वाती चव्हाण या मानसोपचार तज्ज्ञांनी त्यांची मुलाखत घेतली. मानसिक आजारात रुग्णाला कौटुंबीक आणि सामाजिक पाठबळाची गरज असते. त्याच्या या गरजा पूर्ण करायला हव्यात, असे मत अमृता आणि कुलकर्णी यांनी व्यक्त केले. डॉ. नीलेश जेजुरकर यांनी नाटिकेद्वारे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे का महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकर्षक साहित्याकडे वाढता कल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी आली, की घर सजावटीचे वेध लागतात. जराशी कल्पकता वापरून, पण जास्त वेळ खर्ची न घालता झटपट घर सजविण्याला अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. दर वर्षीपेक्षा यंदा वेगळ्या पद्धतीने घर सजावट करावी, असा आग्रहही यामागे असतो. या सर्व विचारांनी बाजारात खिशाला परवडतील आणि अधिक काळ टिकतील अशा आर्टिफिशियल सजावट साहित्याची, वस्तूंची चलती आहे. फुलांपासून ते प्लास्टिकच्या पणत्या, लोकर, मोत्याची तोरणे यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत सजावटीसाठी आर्टिफिशियल वस्तूंकडे अनेकाच कल वाढल्याचे दिसून येते. पूर्वी ज्याप्रमाणे केवळ मातीच्या पणत्या, खऱ्याखुऱ्या फुलांची आरास, माळा करून दिवाळी सणासाठी विशेष सजावट केली जात असे. मात्र, ठराविक काळानंतर या वस्तू, सजावट खराब होत असल्याने पुन्हा पुन्हा ते करण्यासाठी मोठा वेळ खर्ची घालावा लागत असे. सध्याच्या धावपळीच्या व अनेक कुटुंबांमधील जवळपास सर्वच व्यक्ती नोकरी करीत असल्याने या सजावटीसाठी फारसा वेळ उपलब्ध नसतो. त्यामुळे खराब होणार नाही व घरही चांगले सजवलेले दिसेल, अशा वस्तूंना साहजिकच प्राधान्य मिळू लागले आहे.

--

या वस्तूंना मागणी

या सजावटीच्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने कापडी, प्लास्टिकची फुले, या फुलांचे बुके, लोकरीचे रुमाल, प्लास्टिकच्या रंगीबेरंगी पणत्या, मोत्यांची, कापडी पानांची तोरणे अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूल या ठिकाणी या वस्तू सहज उपलब्ध होतील इतके विक्रेते दाखल झाले आहेत.

--

असे आहेत दर

पाच फुलांचा गुच्छ २५ रुपयांना, एक फूल २० रुपयांना, तोरण ८० रुपयांना, तर अर्धा डझन पणत्या ६० रुपयांना अशा या वस्तूंच्या सर्वसाधारण किमती आहेत. शिवाय जयपूर, राजस्थानहून खास वॉल हँगिंग्जदेखील विक्रीस आले असून, त्यांनादेखील ग्राहकांची पसंती मिळत आहे.

----

पावसाने खरेदीला ब्रेक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एेन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडणे अवघड बनले आहे. नेमका सायंकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याने बोनस, पगार होऊनही अनेकांची खरेदी रखडली असून, पाऊस थांबत नाही तोपर्यंत नागरिक खरेदीसाठी येणार नसल्याने दुकानदारांवरदेखील हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.

दसऱ्यानंतर नागरिक दिवाळीच्या खरेदीला प्राधान्य देत असतात. दसऱ्यानंतर येणारा शनिवार आणि रविवार खरेदीसाठी धामधुमीचा असतो. सुरुवातीला शहरातील बाजारपेठांतही खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. अनेकांनी शनिवारी व रविवारी खरेदीचा बेत आखला होता. परंतु, अचानक आलेल्या पावसाने अनेकांचे नियोजन बिघडवले आहे. अनेकांची खरेदी आता पुढील शनिवारी व रविवारी म्हणजेच १४ आणि १५ तारखेला होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदी, जीएसटीचा प्रभाव आधीच बाजारपेठेत दिसून येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने तरी बाजाराला तेजी येईल, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. मात्र, सध्या तरी ती फोल ठरली आहे. त्यातच सातत्याने होत असलेल्या लोडशेडिंगचा फटकाही खरेदीला बसत आहे. कपड्यांच्या दुकानात प्रकाशामध्ये जसे कपडे दिसतात, त्यांचे रंग पाहायला मिळतात, तसे बॅटरीच्या उजेडात दिसत नाहीत. त्यामुळे नागरिक दिवसा किंवा ज्यावेळी वीजप्रवाह असेल त्यावेळीच कपडे खरेदी करतात. मात्र, वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांची कपडे खरेदी थांबली आहे.

ऑनलाइन खरेदीकडे कल

बाजारात जाण्यासाठी साततत्याने येणाऱ्या अडचणी, ट्रॅफिकचा त्रास, पार्किंग प्रॉब्लेम यामुळे अनेक नागरिक घरात बसून ऑनलाइन खरेदीलादेखील प्राधान्य देताना दिसत आहेत. ऑनलाइन वस्तू घरोघरी पोहोचविणारे डिलिव्हरी बॉयदेखील फेस्टिव्हल सीझनमुळे मेटाकुटीस आले आहेत.

--

सध्या पावसाचे वातावरण असल्याने बाहेर जाणे नकोसे वाटते. लोडशेडिंगमुळे दुकानात वस्तू चॉइस करता येत नाही. मुलांची खरेदी आम्ही ऑनलाइन केली. मेनरोडवर वस्तू चांगल्या आहेत. परंतु, तेथपर्यंत गाडी जात नसल्याने आम्ही तेथे जाणे टाळतो.

-ज्ञानदा सोनार, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व

$
0
0


धुळे ः जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सोमवारी (दि. ९) सकाळी आठ वाजेपासून तालुका स्तरावर सुरू झाली. धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांपैकी धुळे तालुक्यात ३३ पैकी २०, साक्री तालुक्यात ३३ पैकी २५ आणि शिरपूर तालुक्यात १७ पैकी १३ सरपंचपदांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. यावेळी सर्वाधिक ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्याने भाजपचे सुपडे साफ झाले आहे. तर एकमेव शिंदखेडा तालुक्यातील १९ पैकी १३ ग्रामपंचायतीवर भाजपला संधी मिळाली आहे. धुळे जिल्ह्यात सत्ताधारी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल असतानादेखील काँग्रेसला विजयी होण्यात यश आले आहे. दरम्यान चारही तालुक्यात काँग्रेस व भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपनेत्यांना यशस्वी होण्यासाठी कंबर कसावी लागणार हे या निकालाकडे पाहून लक्षात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरेशा सुविधांची वानवा

$
0
0

जुने सीबीएस

--

पुरेशा सुविधांची वानवा


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘सप्तशृंगगडावर जाण्यासाठी मी या बस स्टँडवर आले आहे. पण, येथील स्वच्छतागृह म्हणावे तसे चांगले नाही. थोडीफार स्वच्छता आहे. पण, सरसकट तीन रुपये घेतले जातात, मग सेवा कोण देणार?’, कीर्ती खैरनार या महिलेचा हा प्रश्नच या ठिकाणच्या सेवेची अधिक माहिती देतो.

जुने सीबीएस येथून दिंडोरी, वणी, सप्तशृंगगड, पेठ, सुरगाणा, कळवण, नंदुरबार, सटाणा, देवळा, साक्री आदी भागात एसटी बसची सेवा दिली जाते. त्यामुळे या बस स्टँडच्या ठिकाणी ज‍वळपास दहा ते पंधरा हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. यातील निम्म्या महिला प्रवासी गृहित धरल्या, तरी या महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात एसटी महामंडळ सपशेल अपयशी ठरले आहे.

--

तीन रुपयांचा भुर्दंड

स्वच्छतागृहांची देखभाल करण्याचे काम सुलभ या कंपनीला देण्यात आले आहे. या ठिकाणी तीन रुपये दिले, तरच महिलांना आत प्रवेश दिला जातो. पाण्याची मोठी टाकी आत उभारण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पाचच शौचालये आत आहेत. यातील चारच शौचालये सुरू आहेत, तर एका शौचालय बंद आहे. म्हणजेच तीन रुपये घेऊनही या ठिकाणी अल्प प्रमाणातच सुविधा पुरविली जाते. टँकरने दररोज येथे पाणी आणले जाते. या ठिकाणी दिवसभरात स्वच्छता केली जात असल्याचा दावा ठेकेदार करतात.

--

इतरांचीही भिस्त

जुने सीबीएस परिसरात सार्वजनिक शौचालयच नाही. त्यामुळे या परिसरातील हातगाडीवाल्यांपासून तर दुकानदारांपर्यंत साऱ्यांचीच मदार या स्वच्छतागृहावर आहे. त्यामुळे दिवसाकाठी हजारो महिला या स्वच्छतागृहाचा वापर करताना दिसतात. मात्र, तरीही पुरेशा सुविधांचा अभाव येथे दिसतो.

--

नंदुरबारहून मी या बस स्टँडच्या ठिकाणी आले आहे. मात्र, येथील स्वच्छतागृहाचा दर्जा तितकासा चांगला नाही. पैसे घेतात, मग सुविधा का देत नाहीत?

-सीमा गायकवाड, प्रवासी


-------

मेळा बस स्टँड

--

बसपोर्टऐवजी स्वच्छतागृह द्या!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये देखभाल व स्वच्छतेच्या नावाखाली पाच पाच रुपये उकळले जातात. परंतु, प्रत्यक्षात स्वच्छतागृहांमध्ये गेल्यास तेथे हवी तशी स्वच्छताही केलेली नसते. दररोज तासन् तास एसटीने प्रवास करावा लागत असल्याने या स्वच्छतागृहांचा वापर करावाच लागतो. परंतु, येथील अस्वच्छतेमुळे तेथे जावेसेदेखील वाटत नाही,’ अशा प्रतिक्रिया मेळा बस स्टँड येथे महिला प्रवाशांनी व्यक्त केल्या.

एअरपोर्टच्या धर्तीवर येथे राज्यातील पहिले वातानुकूलित बसपोर्ट उभारण्याचा भूमिपूजन सोहळा जुलै महिन्यात पार पडला. चौदा कोटी रुपये खर्च करून वर्षभरात हे बसपोर्ट तयार करण्याचे स्वप्न राज्य सरकारने नाशिककरांना दाखविले. मात्र, तीन महिन्यांच्या काळात येथे त्यादृष्टीने हालचाली नाहीत. शिवाय, बस स्टँडवर असलेल्या सुविधांकडेदेखील दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे. मेळा बस स्टँडवर असलेल्या स्वच्छतागृहात सात ते आठ शौचालये आहेत. त्यांचा वापर करायचा असल्यास पाच रुपये आकारणी केली जाते. स्वच्छतागृहांमध्ये जाण्याअगोदरच येत असलेल्या दुर्गधीमुळे अनेकींना तेथे जाणेच नकोसे होते. शिवाय स्वच्छतेच्या नावाखाली केवळ सर्वत्र पाणी टाकून स्वच्छता कर्मचारीदेखील काढता पाय घेतात. त्यामुळे डागाळलेल्या शौचालयांसह खराब भिंती, जळमटे अशी परिस्थिती येथे आहे. पैसे आकारणी केली जात असल्याने किमान सुविधा तरी पुरवाव्यात, अशी माफक अपेक्षा येथे येणाऱ्या महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

--

टँकरवरच भिस्त

शहरातील सर्वच स्वच्छतागृहांची भिस्त टँकरच्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे दिसेत. एखादा दिवसदेखील येथे पाण्याचा टँकर आला नाही, तर या स्वच्छतागृहांच्या जवळून ये-जा करणेदेखील कठीण होते, अशी परिस्थिती आहे.

--

व्यवसायानिमित्त शहरभर फिरावे लागते. अशा परिस्थितीत सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु, रोज पैसे देऊन येथे जाणे परवडत नाही. शिवाय, अस्वच्छतेमुळे जावेसेदेखील वाटत नाही.

-प्रमिला जगताप

---------

महामार्ग बस स्टँड

--

स्वच्छतागृहाची वाट दूर


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्य बस स्टँडपासून लांबवर आणि असुविधांनी युक्त अशी महामार्ग बस स्टँडवरील स्वच्छतागृहाची स्थिती आहे. अंधार असताना या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी जाणे महिलांसाठी असुरक्षेचे ठरत आहे. कारण, या भागात दिवे नसल्याने अंधार असतोच, शिवाय प्रवाशांना हे स्वच्छतागृह शोधूनही सापडणे अवघड होते. त्यातच या ठिकाणी आर्थिक लुटीचा प्रकार होत असूनही योग्य ती सुविधा मिळतच नसल्याची महिलांची तक्रार आहे.

शहरातून मुंबई, नगर, शिर्डी अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी महामार्ग बस स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. नाशिकजवळील तालुके किंवा शेजारील जिल्ह्यांमधील व्यक्ती, ज्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरात जायचे असल्यास त्यांना या बस स्टँडशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत नैसर्गिक विधींसाठी किमान सुविधा उपलब्ध असाव्यात, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. मात्र, बस स्टँड एकीकडे आणि स्वच्छतागृह दुसरीकडे अशा परिस्थितीमुळे जणू प्रवाशांच्या आरोग्याशीच खेळ होत आहे.

महिला आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता ही प्राथमिक बाब आहे. मात्र, नैसर्गिक विधी करण्याची तातडीची गरज उद्भवली, तरी पुरेशा सुविधांअभावी अनेक महिला येथे जाणे टाळतात. बस निघून जाण्याची भीती, बस स्टँडपासून किमान काही मिनिटे चालण्याची सक्ती, शिवाय स्वच्छतागृहाबाहेर गाडीवर बसलेले, गटांनी उभे असलेले पुरुष व स्वच्छतागृहासमोर वाढलेले गवत यामुळे महिलावर्गाला येथे जाण्याची भीती वाटत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीमुळे काही महिला पुरेसे पाणीदेखील पिणे टाळतात. याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत असून, या ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते, पण पाचपैकी एक शौचालय बंद आहे.

---

सॅनिटरी वेंडिंग मशिन्स नाहीत

बस स्टँडजवळ सहज उपलब्ध होईल असे एकही दुकान नसल्याने मासिक पाळीच्या काळात महिलांची घुसमट होत असून, अशा नाजूक बाबतीत संकोच बाळगत वावरावे लागत आहे. त्यामुळे शहरातील बस स्टँडवरील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशिन्सची सुविधा आवश्यक असताना त्या पुरविण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही हालचालींची साधी चिन्हेदेखील नाहीत.

--

अहमदनगर जिल्ह्यातून मी आले आहे. नाशिकला एक-दोन तासांतच कामे करून पुढच्या प्रवासाला निघायचे आहे. बस स्टँडवर स्वच्छतागृह शोधत होते. मात्र, ते बरेच दूर आहे. माझ्यासारख्या वयस्कर बायकांना चालण्याचा त्रास होतो.

-शोभा अहिरराव, प्रवासी


----------

नवीन सीबीएस

--

निम्मी शौचालये बंदच


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या नवीन सीबीएस येथील महिला स्वच्छतागृहात सर्रास पाच रुपये घेऊन महिलांची लूट केली जात आहे. येथील निम्मी शौचालयेदेखील बंदच आहेत. मात्र, पैसे आकारूनही या ठिकाणी त्या तुलनेत सुविधांची मात्र येथे वानवा असल्याची स्थिती आहे.

‘माझ्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी दररोज मी या बस स्टँडवर येते. पण, रोज पाच रुपये कसे द्यायचे, हा मलाही प्रश्न आहे. म्हणून मी तेथे जाण्याचे टाळते. कधी कधी तर नाईलाजच असतो...’ सुषमा इंगळे या नोकरदार सांगत होत्या. आजच्या आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या नाशिक शहरातील मुख्य बस स्टँडच्या ठिकाणी असलेल्या महिला स्वच्छतागृहाची कुणी अशी कल्पनाच केली नसेल. महिला स्वच्छतागृहाच्या ठिकाणी एकूण दहा शौचालये आहेत. यातील तब्बल सहा शौचालये बंद आहेत, तर उर्वरित चार शौचालयांचीही अवस्था म्हणावी तशी चांगली नाही. पाण्याची उपलब्धता असली, तरी स्वच्छतेचा मात्र मोठा अभाव आहे. त्यामुळेच बस स्टँडमधील प्रवाशांनाही दुर्गंधीला सामोरे जावे लागते. आधुनिक स्वरूपाची इमारत या बस स्टँडसाठी उभारली असली, तरी स्वच्छतागृहाची समस्या मात्र भीषण आहे. पैसे दिल्यानंतरच स्वच्छतागृहाच्या आत शिरण्याची व्यवस्था ठेकेदाराने केली आहे. त्यामुळे महिला नकार देण्याचा प्रश्नच नाही. पाच रुपये दिले की मगच प्रवेश मिळतो. आत गेल्यानंतर तेथील अस्वच्छतेमुळे महिलांची मोठीच कुचंबणा होत आहे.

--

‘त्या’ दिवसांत परीक्षाच

मासिक पाळीच्या काळात आधार लाभेल अशी या स्वच्छतागृहाची स्थिती नाही. चेंजिंग रूम किंवा सुरक्षित असे वातावरण नसल्याने या ठिकाणी दररोज येणाऱ्या हजारो महिला प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात एसटी महामंडळ सपशेल अपयशी ठरले आहे.

--

अधून-मधून मी पुण्याला जाते. ‘शिवनेरी’ची सुविधा चांगली आहे. पण, स्वच्छतागृह अतिशय वाईट आहे. चांगले आणि सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे अशक्य आहे का?

-संपदा पाठक, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा गाळ्यांचे होणार ऑडिट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मालकीच्या तिबेटीयन मार्केटमधील गाळ्यांमध्ये ज्वलनशील पदार्थांमुळे झालेल्या स्फोटाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. पालिकेच्या गाळ्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास प्रतिबंध असतानाही हा प्रकार घडल्याने महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व गाळ्यांच्या वापराची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिका संकुलातील गाळ्यांच्या वापराच्या तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती आयुक्तांना अहवाल देणार आहे. शनिवारी तिबेटीयन मार्केटमधील एका गाळ्यात स्फोट होऊन तब्बल ९ गाळ्यांचे नुकसान झाले होते. पालिका गाळ्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेऊ नये, अशा अटी व शर्ती आहेत. परंतु, तरीही गाळेधारकांकडून या गाळ्यांच्या वापराचा गैरवापर होत असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे. त्यामुळे या गाळेधारकांना नोटीस देण्यात आली आहे. विविध कर विभागाचे उपायुक्त, अग्निशमन विभागाचे प्रमुख, आरोग्य विभागप्रमुख अशा चार जणांची ही समिती असणार आहे. ही समिती गाळ्यांच्या वापराचे ऑडीट करणार असून, तिबेटीयन मार्केटसोबतच पालिकेच्या सर्व १२ व्यावसायिक संकुलातील दोन हजार गाळ्यांची तपासणी करणार आहे.

संबंधितांकडून भरपाई

शनिवारी झालेल्या स्फोटामुळे ९ ते १० गाळ्यांचे नुकसान झाले आहे. या गाळेधारकाने ज्वलनशील पदार्थ ठेवल्याने पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले असून, गाळेधारकाकडून झालेले आर्थिक नुकसान भरून घेतले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीतील बंड शमले

$
0
0

भूखंड विकसनासाठी कन्सल्टंट नियुक्तीला हिरवा कंदील

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या गेल्या सभेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारणाऱ्या भाजपसकट दहा सदस्यांनी शांततामय मार्गाने तोडगा काढत, आपले पत्र मागे घेतले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत सभापतींविरोधात बंड शमल्यात जमा असून, सभापतींनी सर्व विषय दुरूस्तीसह मंजूर केले आहेत. बंड करणाऱ्या सदस्यांनी योग्य तोडगा काढून माघार घेतल्यानंतर आता वादावर पडदा पडला आहे. दरम्यान, स्थायीच्या बैठकीत पीपीपी तत्त्वावरील भूखंडासाठी कन्सल्टंट नेमणे, चिखली नाला पंपिंग स्टेशन उभारणीच्या व शिक्षकांच्या मानधनावरील भरतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

स्थायी समितीमधील १६ सदस्यांपैकी १० सदस्यांनी गेल्या स्थायीच्या बैठकीनंतर नगरसचिवांना पत्र लिहून तीन ते चार सभांमध्ये मंजूर केलेल्या विषयांच्या इतिवृत्तावर आक्षेप घेतले होते. यामध्ये सभा क्र. १४, १५, १७, १८ व ७ यांच्यातील काही मंजूर विषयांचे इतिवृत्त मंजूर करू नये, असे पत्र देत थेट सभापतींच्या कामकाजावर अविश्वास दाखवला होता. त्यात भाजपचे जगदीश पाटील, मुकेश शहाणे, सुनीता पिंगळे, शाम बडोदे यांच्यासह शिवसेनेचे सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, काँग्रेसच्या वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, अपक्ष मुशीर सैय्यद यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपमध्येच मोठी खळबळ उडाली होती. थेट पदाधिकाऱ्यांनी या नगरसेवकांची कानउघाडणी केली होती. भाजपच्या काही सदस्यांनी आरोप मागे घेतले असले तरी, शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य ठाम होते.

सोमवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत मात्र या सदस्यांनी हे पत्र पुन्हा पटलावर ठेवले. त्यानंतर त्यात दुरूस्ती करण्याची मागणी केली. त्याला सभापतींनीही तातडीने मंजूरी दिल्याने सदस्यांनी आपले बंड मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. गेल्या पंधरा दिवसात बऱ्याच घडामोडी घडून या सदस्यांचे मन परिवर्तन करण्यात सभापतींना यश आले आहे.त्यामुळे या सदस्यांनी आपण आपले पत्र मागे घेतल्याचे जाहिर केल्यानंतर सभापतींनीही वादावर पडदा टाकला असून आता वाद राहीला नसल्याचे आयुक्तांसमोर जाहीर केले आहे.

गनधारीला तूर्तास ब्रेक

महापालिकेतील सुरक्षा यंत्रणा बाजूला सारून त्याऐवजी खासगी बंदूकधारी सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या प्रस्तावाला समितीत विरोध करण्यात आला. पालिकेत महापालिकेत १३८ सुरक्षारक्षक आहेत. त्यांना सहा महिन्यासाठी प्रशिक्षित करून बंदुकीचे परवाने देता येतील किंवा पोलिसांची सुरक्षाव्यवस्था घेता येईल. याबाबत पालिकेवर खासगी सुरक्षारक्षकांचा आर्थिक बोझा नको, अशी मागणी प्रवीण तिदमे यांनी केली. त्यावर आयुक्तांकडून अहवाल मागवला जाईल, असे सांगत तोपर्यंत प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सभापती गांगुर्डे यांनी जाहीर केला.
पेस्ट कंट्रोलला पुन्हा नोटीस

शहरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचा मुद्दा पुन्हा स्थायीत गाजला. मुशीर सय्यद यांनी संबंधित ठेकेदाराला दिलेल्या पहिल्या नोटिशीला काय उत्तर आले याची विचारणा केली. सदर ठेकेदाराने नोटिसला उत्तर दिले असून, ते आयुक्तांकडे अवलोकनार्थ सादर करण्यात आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली. मात्र सदर ठेकेदारास अंतिम नोटीस देऊन ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. जगदीश पाटील यांनी घरोघरी धूर फवारणी होते का, डेंग्यूचे डास दिवसा चावत असताना त्यावेळी फवारणी होते का, असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर बुकाणेंनी फवारणी होत असल्याचे सांगितल्यावर जोरदार गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी संगनमत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला. सभापती गांगुर्डे यांनीदेखील सदस्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे नमूद करीत आरोग्याधिकारी बुकाणे यांना तंबी दिली. संबंधित ठेकेदारास अंतिम नोटीस बजावून ठेका रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात यावी, असे निर्देशही सभापती गांगुर्डेंनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य अभियंत्यांना मनसेकडून कोळसा भेट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहर व जिल्ह्यात वाढलेल्या वीज भारनियमनाविरोधात मनसेतर्फे सोमवारी महावितरण कंपनीच्या नाशिकरोड येथील मुख्य अभियंत्यांना कोळसा भेट देऊन निषेध करण्यात आला.

कोळशाच्या तुटवड्यामुळे महावितरणने नाशिकमध्ये भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला यांना मनस्ताप होत आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना कोळसा भेट देऊन निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर परिस्थिती न सुधारल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुमठेकर यांनी लवकरच महावितरण भारनियमनाच्या परिस्थितीवर मात करणार असल्याचे आश्वासन दिले.

मनसेचे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, मनविसेचे शहरप्रमुख श्याम गोहाड, किशोर जाचक, प्रकाश कोरडे, रिना सोनार, विक्रम कदम, प्रवीण पवार, प्रमोद साखरे, सचिन सिसोदिया, साहेबराव खर्जुल, सचिन चव्हाण, सुनील पाटोळे, अमर जमधडे, प्रसाद घुमरे, नितीन धानापुणे, संदीप आहेर आदींसह मनसेच्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही याबाबत निवेदन दिलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्रिमहोदयांना २१ लाखांची पैठणीभेट!

$
0
0

राज्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचा ‘उद्योग’

नामदेव पवार, सातपूर

तीन खात्यांचा कार्यभार सांभाळणाऱ्या विदर्भातील एका ‘प्रवीण’ राज्यमंत्र्यास दिवाळसणासाठी तब्बल २१ लाख रुपयांच्या पैठणींची भेट देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मंत्रिमहोदयांना खुश ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या विशेष सहकार्याने हा ‘उद्योग’ केला आहे. मंत्रिमहोदयांनी काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर लाखो रुपयांच्या पैठणी खरेदीची ऑर्डर देण्यात आली हे विशेष.

या दिवाळीभेटीची आर्थिक झळ बसलेल्या तीनही विभागांत चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे. या राज्यमंत्र्यांकडे कार्यभार असलेल्या संबंधित विभागाचे मुख्य अभियंते व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदरमोड करीत येवल्यातील एका नामांकित पैठणी शोरूममधून ही खरेदी केली. धक्कादायक बाब म्हणजे खरेदीची बिले या तीन सरकारी खात्यांच्या नावाने बनविण्यात आली. ऑडिटमध्ये संबंधित विभागांना या बिलांबाबत विचारणा होऊ शकते, या साध्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही ठेकेदारांना बिलांमध्ये वाटा उचलण्यास सांगण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी अडीचशे, तर सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तीनशे अशा एकूण साडेपाचशे पैठणी खरेदी केल्या आहेत. तीन ते सहा हजार रुपये किमतीच्या या पैठणी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी ही खरेदी केली, त्यातील काही विदर्भातीलच आहेत. काही अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. काही जणांनी थेट फोन बंद केला.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर मंत्रिमहोदयांच्या पाहुण्यांनी पाच व सहा ऑक्टोबर असे दोन दिवस ठाण मांडून अधिकारीवर्गाच्या माध्यमातून खरेदीचे सोपस्कार पूर्ण केले. मंत्र्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून या दोन पाहुण्यांचे विश्रामगृहात बुकिंग करण्यात आले होते. पैठणीच्या नामांकित शोरूमला खरेदीची ऑर्डर आधीच देण्यात आली होती, असे सांगितले जाते.

देशभर मंदीचे वातावरण असतानाच, भाजपच्या या मंत्रिमहोदयांना मात्र ऐनदिवाळीत अच्छे दिन आल्याची उपहासात्मक चर्चा एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये रंगत आहे. येवल्यातून खरेदी करण्यात आलेल्या या साडेपाचशे पैठणी साहेबांकडून आप्तेष्ट आणि पाहुण्यांना दिवाळीची भेट म्हणून देणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात भाजपचे वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यंदा प्रथमच सरपंच पदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली असून, याचा फायदा भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील १० पैकी ७ ग्रामपंचायतीत भाजपचे तर ३ ग्रा. प. वर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहेत. १० पैकी मोहपाडा ग्रा. प. निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित ९ ग्रा. प. साठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सौंदाणे व दाभाडी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता मिळवीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडले आहे. या निवडणूक निकालानंतर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना धक्का बसला. ग्रामीण भागात भाजप नेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वात भाजपाने मुसंडी मारली आहे. येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात सोमवारी मतमोजणी झाली. मतमोजणीस प्रारंभ होताच सर्वप्रथम दाभाडी ग्रापचा निकाल हाती आला आणि भाजपच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेची सत्ता असलेल्या दाभाडीत सरपंचपदी भाजपच्या चारुशीला अमोल निकम विजयी झाल्या. त्यांनी सेनेच्या वनमाला निकम यांचा १ हजार ७५७ मतांनी पराभव केला. तसेच एकूण १७ पैकी १० जागा जिंकत भाजपने निर्वावाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर तिकडे सौंदाणे ग्रामपंचायतीत देखील भाजपचे डॉ मिलिंद पवार विजयी झाले. त्यांनी सेनेचे चेतन पवार यांचा २२२ मतांनी पराभव केला आहे. या ग्रा.प. तील एकूण १७ पैकी ८ जागा भाजपने पटकावल्या आहेत. दाभाडी व सौंदाणे या दोन्ही ग्रा.प.सह एकूण ७ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला असून, ग्रामीण भागातील सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.

चिठ्ठीद्वारे सदस्य निवड

जाटपाडे येथील ग्रापत देखील भाजपची सत्ता आली असून सरपंचपदी रेखाबाई राजेंद्र पवार या विजयी झाल्या. शिवसेनेच्या शैला वाघ यांचा १९३ मतांनी पराभव केला.

याच ग्रापतील वार्ड क्र. २ मधील सख्खे चुलत भाऊ उमेदवार जगन्नाथ सोनवणे व त्यांचे प्रतिस्पर्धी भिकन सोनवणे यांना २०९ अशी समासमान मते मिळाल्याने याचा निकाल चिठ्ठीद्वारे काढण्यात आला. यात भिकन सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले.

टोकडे व रोंझेत भगवा

तालुक्यातील ९ पैकी टोकडे व रोंझे या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा फडकला आहे. रोंझे येथे सरपंचपदी सेनेच्या सुमनबाई उगले तर टोकडे येथे सुपडाबाई निमडे या विजयी झाल्यात.

सुरेगाव रस्तामध्ये डमाळेंचा डंका

येवलाः तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. पहिल्यांदाच थेट जनतेतून प्रत्यक्ष मतदानाद्वारे होणारी सरपंचपदाची निवडणूक अन् गावपुढाऱ्यांनी त्यात ‘मिनी आमदारकी’ समजून लावलेला जोर लक्षात घेता निकालानंतर ‘कही खुशी, तो कही गम’ दिसून आला.

सुरेगाव रस्ताच्या सरपंचपदी शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते तथा भाजपचे विद्यमान प्रांतिक सदस्य बाबा डमाळे यांच्या पत्नी वंदना डमाळे यांनी वैशाली गायकयांचा पराभव केला. आडगाव चोथवामध्ये सरपंचपदी सुवर्णा नवनाथ खोकले (७४३) यांचा विजय झाला.

चांदगावमध्ये संगिता सोनवणे सरपंचपदी विजयी झाल्या. एरंडगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या मंदाकिनी विनायक पडोळ, नायगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई ढोणे, कुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय गायकवाड यांचा विजय झाला.

कळवणमध्ये मातब्बरांचा पराभव

कळवण : तालुक्यातील शिरसमणी, कुंडाणे(ओ) व जयपूरच्या थेट सरपंचाची निवडणूक बिनविरोध झाल्याने १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या लढतीत नवोदित चेहरे व मातब्बरांना मतदारांनी पुन्हा संधी मिळाली. मानूर व जयदरच्या सरपंचांनी प्रभागातून देखील विजय संपादन केला. १३ ग्रामपंचायतींच्या ६४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नवीन चेहरे व मातब्बरांचा ग्रामपंचायतमध्ये शिरकाव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिटको’च्या इमारत आराखड्यात बदल

$
0
0

प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार उघड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनपा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा आणखी एक नमूना स्थायी समितीच्या सभेत समोर आला असून, विस्तारित बिटको रुग्णालयाच्या आराखड्यात परस्पर बदल करण्यात आले आहेत. वैद्यकीय व बांधकाम विभागात समन्वय नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या खर्च झालेल्या बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीत विविध वॉर्डांच्या निर्मितीसाठी आता भिंतींची तोडफोड करावी लागणार आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी कबुली दिल्यानंतर बिटको रुग्णालयाच्या नियोजनासाठी स्थानिक नगरसेवकांची समिती गठीत करण्याचा निर्णय सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी जाहीर केला.

महासभा व स्थायी समितीत बिटको रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहीला आहे. सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी (दि. ९) पुन्हा एकदा बिटको रूग्णालयाच्या नूतन इमारतीसाठी कोट्यवधी रूपयांच्या यंत्रसामग्री खरेदीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. स्थायी समितीने बिटको रुग्णालयाची गेल्या आठवड्यात पाहणी केली होती. याठिकाणी सात मजल्यांचे रुग्णालय उभारण्याची मूळ योजना होती. परंतु, रुग्णालयाचे मजले परस्पर घटविण्यात आल्याने रुग्णालयातील अपघात, सर्जरी, आदी विभागांचे नियोजन चुकले आहे, अशी तक्रार लवटे यांनी मांडली.

इमारतीचे दोन मजले खर्च पेलवत नसल्यामुळे परस्पर कमी केले तर मेडिकल, सर्जिकल वॉर्डाचा इमारतीत पत्ताच नाही. रुग्णांसाठी सामान्य कक्ष नाही अशा परिस्थितीत रुग्णालय कसे चालेल, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच रुग्णालयासाठी कर्मचारी कोठून आणणार, असा सवालही त्यांनी केल्यावर रुग्णालयासाठी २६५ कर्मचारी भरतीचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला असून, उर्वरित कर्मचाऱ्यांचीदेखील आऊटसोर्सिंगद्वारे भरती केली जाईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डेकाटे यांनी सांगितले. रुग्णालयाचे दोन मजले कमी झाल्याने तळमजल्यावर बाह्यरुग्ण कक्ष तर उर्वरित दोन मजल्यावर भिंती काढून अन्य वॉर्ड तयार केले जातील, असेही डेकाटेंनी स्पष्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

नगरसेवकांची समिती का?

बिटको रुग्णालय आणि त्यातील डॉक्टर हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता तर या रुग्णालयाची परस्पर तोडफोड करण्यात आली आहे. त्याची गंभीर दखल घेत, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थानिक नगरसेवकांची समिती गठीत केली आहे. या रुग्णालयाचे नियोजन करण्याचे काम समितीकडे असणार आहे. परंतु, या समितीच्या नियुक्तीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बिटकोचा प्रश्न मोठा असताना, त्यात कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यात युवकांना संधी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना हादरा देऊन सत्तापरिवर्तन घडवून आणले. ग्रामपंचायतीत तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. तर पक्षीय पातळीवर बहुतांश ठिकाणी भाजपला मानणाऱ्या वर्गाला संधी देताना काही ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसलाही मतदारांनी पसंती दिली आहे. देवळा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी खामखेडा, वाखारवाडी, कणकापूर व सरस्वतीवाडी येथील सरपंचपदाची निवडणूक माघारीनंतरच बिनविरोध पार पडली होती. तर उर्वरित ८ ग्रामपंचायातींच्या सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यांच्या ६५ जागांकरिता शनिवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी १० वाजता देवळा तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीत मतमोजणीस प्रारंभ झाला. संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या विठेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांच्या संपूर्ण पॅनलचा धुव्वा उडवून भाजपप्रणित परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सत्तापरवर्तन घडवून आणले. विठेवाडी ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलचे सरपंचपदाच्या उमेदवार भारती विलास पवार निवडून आल्या.
वासोळ ग्रामपंचायतीत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी अहिरे, कैलास उर्फ के. पी. भामरे, अशोक निकम यांच्या हुतात्मा पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार अनिता दिलीप खुरसाणे निवडून आल्या आहेत. संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या वाजगाव ग्रामपंचायतीत नाशिक जिल्हा सूतगिरणीचे माजी अध्यक्ष धर्मराज देवरे यांच्या नेतृत्वाखालील ‘आपलं पॅनल’ने सत्तापरिवर्तन घडवून आणले. आपलं पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार प्रकाश पंडित मोहन प्रचंड मतांनी निवडून आले. मटाणे ग्रामपंचायतीत तरुणांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत सत्तापरिवर्तन घडवून आणले. प्रभाग १ मधील सर्वसाधारण जागेवर विकास सोसायटीचे संचालक भाऊसाहेब आनंदा आहेर यांनी विद्यमान उपसरपंच अनिल हिरामण पगार यांचा ८३ मतांनी पराभव केला. मटाणे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी सुरेखा राजाराम पवार निवडून आल्या. फुलेनगर ग्रामपंचायतीत सदस्यपदाकरिता एक जागा बिनविरोध झाली होती तर सरपंचपदासाठी रंजनाबाई बाळू खैरनार विजयी झाल्या. चिंचवे ग्रामपंचातीत सरपंचपदासाठी परिवर्तन पॅनलचे युवा कार्यकर्ते रवींद्र शंकर पवार हे निवडून आले. भऊर ग्रामपंचायतीच्या पाच जागा माघारीनंतर बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित सरपंचपदासह सहा जागांसाठी मतमोजणी होऊन सरपंचपदासाठी दादाजी दावल मोरे विजयी झाले. श्रीरामपूर ( वाखारवाडी ) ग्रामपंचायतीच्या, सरस्वतीवाडी, कणकापूर, येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांना ‘कार’बोनस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढत्या रोगराईमुळे नागरिकांची यंदाची दिवाळी खडतर असली तरी, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिवाळीनिमीत्त नव्या वाहनांची भेट मिळणार आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी आठ स्विफ्ट डिझायर व तीन मारुती सुझुकी सियाझ कार खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मान्यता दिली. सध्या आर्थिक कोंडीतून मार्गक्रमण करणाऱ्या पालिकेच्या तिजोरीवर यामुळे ९० लाखांचा बोजा पडणार आहे. जीएसटीमुळे या गाड्यांच्या खरेदीला ब्रेक लागला होता. विशेष म्हणजे विषय समित्यांच्या सभापतींबरोबरच उपसभापतींनाही गाड्यांची भेट दिल्याने पदाधिकाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

महापालिकेत सत्ताधारी भाजपने पदांची भारंभार निर्मिती केल्यानंतर आता त्यांना सोयीसुविधाही देण्यासाठी आपले सर्व बळ वापरले आहे. पदाधिकाऱ्यांसाठी नवी वाहने खरेदी करण्याचा मनसेच्या कारभारातील सिलसिला भाजपच्या सत्तेतही सुरूच आहे. महापौर, उपमहापौर वगळता सर्व पदाधिकाऱ्यांना नव्या गाड्यांचे डोहाळे लागले आहेत. विशेषत: विषय समित्यांच्या पुनरूज्जीवनानंतर नवीन वाहन खरेदीच्या मागणीने जोर धरला होता. पालिकेतील सध्याची वाहने जुनी झाल्याचा साक्षात्कार यांत्रिकी विभागालाही झाला असून, त्यांनी पदाधिकाऱ्यांसाठी वाहने खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला बालकल्याण समिती सभापती, तसेच शहर सुधारणा, विधी व वैद्यकीय-आरोग्य समिती सभापतींबरोबरच या समित्यांच्या उपसभापतींनादेखील शासकीय वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेतील सत्तारूढ भाजपने घेतला होता. या वाहन खरेदीला काही महिन्यांपूर्वी महासभेची मंजुरीदेखील मिळाली होती. त्याच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू झाली होती.

या गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होताच जीएसटी लागू झाल्यामुळे वाहनांच्या किमती वाढल्या. त्यातच उपमहापौर, सभागृहनेत्यांबरोबरच विरोधी पक्षनेत्यांसाठीदेखील नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव पुढे आला. वाहन खरेदीसाठी विरोधी पक्षांकडून विरोध होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांनादेखील वाहने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपमहापौर, सभागृहनेते व विरोधी पक्षनेत्यांसाठी मारुती सुझुकी कंपनीची सियाझ सिग्मा या डिझेल कार खरेदी केल्या जाणार आहेत. तीन सियाझ खरेदीसाठी २९ लाख ९ हजार ५५६ रुपये, तर आठ स्विफ्ट डिझायर खरेदीसाठी ६१ लाख २७ हजार ५३६ रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने झटक्यात मंजुरी दिली.

उपसभापतींवरही खैरात

महिला बालकल्याण समितीसह तीनही विषय समित्यांच्या सभापती सोबतच आता उपसभापतींसाठी स्विफ्ट डिझायर कार खरेदी केल्या जाणार आहेत. आतापर्यंत पालिकेत केवळ सभापतींनाच वाहने दिली जात होती. परंतु, आता उपसभापतींनाही वाहने देण्याचा प्रताप पहिल्यांदाच झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. जीएसटीमुळे एलबीटी रद्द झाल्याने पालिकेची आर्थिक स्वायत्तता संपुष्टात आली आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेची ही वाहनखरेदी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे विरोधकांनाही या खरेदीत समावेश करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मटा भूमिका
नाशिक महापालिकेने आजवरील सर्वच प्रथा-परंपरांना फाटा देऊन जणू नवनवीन विक्रम करण्याचा निर्धारच केलेला दिसतो. आर्थिक आणीबाणीमुळे विकास कामांना कात्री लावण्याची किंवा त्यामुळेच शहर बससेवा ताब्यात न घेण्याची मखलाशी करणाऱ्या पालिकेने पदाधिकाऱ्यांसाठी मात्र किमती गाड्या घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे प्रथमच उपसभापतींनाही अलिशान गाड्या मिळणार आहेत. नेत्यांवर होणारा हा दौलतजादा नाशिककरांच्या कररुपाने गोळा होणाऱ्या पैशावर होत असल्याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटाची ८० टक्के प्रकरणे निघणार निकाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियम‌ित करण्याच्या धोरणाला मंजुरी दिल्यानंतर नाशिकमधील अनधिकृत बांधकामांसह कपाटांचाही प्रश्न निकाली निघणार आहे. राज्यसरकारने अशा बांधकामांबाबत अर्ज मागवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे महापालिकेकडून आठ ते दहा दिवसांत ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. शहरातील सहा आणि साडेसात मीटरवरील ८० टक्के कपाटांचे प्रश्न निकाली निघतील, असा कृष्‍णा यांनी केला आहे. याशिवाय पालिकेला आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. दुसरीकडे अनधिकृत बांधकामे नियम‌ित करताना आकारला जाणारा प्रीम‌ियम दर परवडणारा नसल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजी कायम आहे.

अनधिकृत बांधकामे एफएसआय व अतिरिक्त प्रीम‌ियमच्या सहाय्याने अधिकृत करण्याच्या राज्याच्या धोरणावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर अनधिकृत बांधकामांना दिलासा मिळाला आहे. या धोरणाअंतर्गत सहा मह‌िन्यांत संबंधित बांधकामधारकांनी महापालिकेकडे अर्ज करायचे असून, त्यानंतर त्यावर एफएसआय व प्रीम‌ियम आकारून ते नियम‌ित केले जाणार आहेत. नाशिकमध्ये कपाटाचा प्रश्न बिकट असून, या धोरणामुळे कपाट प्रश्नाची बरीचशी कोंडी फुटणार आहे. या धोरणाच्या अमंलबजावणीसाठी पालिकेची तयारी सुरू झाली असून, येत्या दहा ते पंधरा दिवसांत त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली जाणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांग‌ितले. अनधिकृत बांधकामधारकांना सहा महिन्यांत पालिकेकडे अर्ज करायचा असून, त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त अभियंता व कर्मचारी वर्गही उपलब्ध करून दिला जाणार आहे. शहरातील सहा व साडेसात मीटरवरील कपाट प्रश्न सोडविण्यासाठी टीडीआर वापरण्यात बंदी घालण्यात आली आहे. परंतु, या धोरणामुळे शहरातील सहा व साडेसात मीटर रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे अतिरिक्त प्रीम‌ियम भरून नियम‌ित करता येणार आहेत. यामुळे शहरातील जवळपास ८० टक्के कपाट प्रश्न सुटेल, असा दावा आयुक्त कृष्णा यांनी केला आहे. त्यातून पालिकेला आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे.

प्रीम‌ियम दर कळीचा मुद्दा

सहा व साडेसात मीटर वरील बांधकामे ही अतिरिक्त प्रीम‌ियम शुल्क आकारून नियम‌ित करता येणार असली तरी, प्रीम‌ियमचा दर हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. रेडीरेकनरच्या जवळपास १० ते ८० टक्के प्रीम‌ियम शुल्क आकारले जाणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे या धोरणाला शहरातून किती प्रतिसाद मिळतो यावरच यश ठरणार आहे. पालिकेने यापूर्वीच जवळपास सहा हजार इमारतींचा आकडा जमा केला आहे. त्यामुळे नोट‌िफिकेशन निघाल्यानंतर त्याला किती प्रतिसाद मिळतो, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायानेही फुटेना द्वारकाची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर पोलिसांनी वापरलेला यू-टर्न पर्यायाचा अवघ्या दीड तासात बोजवारा उडाला. अतिक्रमण, टर्निंग रेड‌ियससाठी पुरेशा जागेचा अभाव, तसेच यू-टर्नसाठी दूरवरचा प्रवास यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. पोलिसांनी एक ते दीड तासात हा प्रयोग थांबवला. मात्र, पोलिसांनी या संदर्भात एक अहवाल तयार केला असून, काही महत्वाचे बदल झाल्यानंतर वाहतुकीसाठी हाच पर्याय ठेवण्याचे सूतोवाच पोलिसांनी केले.

द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिसांनी आजवर वेगवेगळे प्रयोग राबवले. सोमवारी सकाळी त्या दृष्टीकोनातून यू-टर्न पर्यायाची चाचपणी करण्यात आली. मात्र, द्वारकावरील समस्या ‘जैसे थे’ असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. द्वारकासह, काठेगल्ली सिग्नल, वडाळा नाका चौफुली, ट्रॅक्टर हाऊस, मुंबई नाका, सारडा सर्कल अशा ठिकाणी वाहनांच्या गतीला ब्रेक लागला. काठे गल्ली ते द्वारका पोलिस चौकी असा प्रवास करण्यासाठी अर्धातासापेक्षा जास्त वेळ खर्ची पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेषतः नाशिकरोड आणि औरंगाबादरोडवरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. त्यातच वडाळा नाका चौफुलीच्या तिथे वाहनांची मोठी गर्दी झाली. वडाळा नाका बाजुच्या नागरिकांना इंदिरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येताना नाकीनऊ आले. पोलिसांनी सकाळी ११ वाजता वाहतूक वळवली. नेमकी याच वेळी कार्यालये तसेच इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय होती. यावेळी ८० पोलिस कर्मचारी, १० पोलिस अधिकारी हजर होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनीही भेट देऊन बदललेल्या वाहतुकीच्या परिणामांची पाहणी केली. दरम्यान, ९ तसेच १० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ ते ४ या वेळेत वाहतूक मार्गात बदल केला जाणार होता.

पोलिसांनी अवघ्या दीड तासात वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. तसेच १० तारखेलाही वाहतुकीत कोणताही बदल करणार नसल्याचे सांगितले. हा एक अभ्यास होता. याठिकाणी काय बदल करणे अपेक्ष‌ित आहे, हे समजून घेण्यासाठी यू-टर्न पर्यायांची चाचपणी करण्यात आली. यामुळे द्वारका परिसरातील अनेक बारकावे समोर आले असून, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी स्पष्ट केले.

नंतर वाहतूक सुरळीत

पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना काही वेळातच पोलिसांनी बंदोबस्त हटवला. त्यानंतर साधारण एक तासानंतर सर्व परिस्थिती सुरळीत झाली. पोलिस नसताना वाहतूक कोंडी नसल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नवीन बदलाबाबत चर्चा सुरू केली.

सिग्नल्स बसवून तसेच अतिक्रमण हटवल्यानंतरच येथील परिस्थिती सुरळीत होऊ शकते. आजमितीस सर्व समस्या जैसे थे असून, वाहनचालकांना नाहक मनस्ताप करण्यास भाग पाडण्यात आले.

- राजू परदेशी, वाहनचालक

आज ट्रान्सपोर्ट बंद असल्याने मोठी वाहने रस्त्यावर नाहीत. छोट्या वाहनांमुळेच ही परिस्थिती उद्भवली असून, ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्रासाला सामोरे जावे लागले. विशेषतः स्थानिक नागरिकांना याचा सर्वाध‌िक त्रास झाला.

- इस्माईल शेख, स्थानिक नागरिक


सोशल मीड‌ियावर संमिश्र प्रतिक्रिया

पोलिसांनी या बदलाबाबत यापूर्वीच कळवले होते. दोन दिवस याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. काहींनी पोलिसांच्या निर्णयाला सकारात्मक म्हटले, तर काहींनी हा निर्णय व्यवहार्य नसल्याचे म्हणत त्यास विरोध केला. त्यातच सोमवारी सकाळी वाहतूक कोंडीला सुरुवात झाल्यानंतर नेट‌िझन्सनी फेसबुक, ट्विटर तसेच व्हॉटसअॅपच्या माध्यमातून आपली मते व्यक्त केली. हा प्रयोग असून, यातून भविष्यात फायदा होणार असल्याचा एक मत प्रवाह होता, तर दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नाहक मनस्ताप झाल्याची भावना व्यक्त झाली. मात्र, बऱ्याच नेट‌िझन्सनी परिसरातील वाढलेल्याअतिक्रमणावर बोट ठेऊन महापालिकेच्या कारभारावर निशाणा साधला.


..तर यू-टर्नचाच ऑप्शन

द्वारका व परिसरातील अगदी किरकोळ समस्या दूर झाल्या तर तेथे यू-टर्नचाच पर्याय वापरणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण काढण्यासह द्वारका सर्कलचा विस्तार कमी करणे, सिग्नल व्यवस्था सुरू करणे, तसेच यू-टर्न घेतला जातो तेथील डिझाइनमध्ये बदल करण्याबाबतचा अहवाल शहर पोलिसांतर्फे महापालिकेसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे.

द्वारकावरील वाहतूक कोंडीमुळे नाशिककरांना सतत त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच सर्कलच्या चारही बाजूने पोलिस बंदोबस्त पुरवावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. सोमवारी केलेल्या चाचपणीबाबत बोलताना पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले की, द्वारकाच्या चारही टोकांना अतिक्रमण दिसते. तसेच रिक्षा थांबे, बस थांबेही आहेतच. दुसरीकडे वाहनांच्या टर्निंग रेड‌ियससाठी पुरेशी जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहतुकीच्या वेगावर परिणाम होतो. पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेशिस्त वाहनचालक कोंडीला हातभार लावतात. साधारणतः एक ते दीड तास आम्ही सर्व ठिकाणी येणाऱ्या समस्या, त्यावरील उत्तरे शोधली. याचा एक स्वतंत्र अहवाल तयार करून तो महापालिका तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सादर केला जाणार आहे. संबंध‌ित विभागांनी आम्ही सादर केलेल्या शिफारशींवर काम केले तर काही दिवसांनी यू-टर्नच्या माध्यमातून द्वारकावरील वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यात येईल, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.


यामुळे झाली वाहतूक कोंडी

- परिसरातील अतिक्रमण

- द्वारका सर्कलचा मोठा आकार

- वाहने वळविण्यासाठी जागेचा अभाव

- ट्रॅक्टर हाऊस येथील यू- टर्न रस्त्यावरील असमतोल

- द्वारकाच्या चारही कोपऱ्यांवरील रिक्षा व बस थांबे

पोलिसांनी मांडलेली निरीक्षणे

- द्वारका परिसरातील अतिक्रमणे हटवावीत

- नाशिकरोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी लेफ्ट कॉर्नर मोकळा व्हावा

- द्वारका सर्कलचा आकार कमी झाल्यास सिग्नल यंत्रणा सुरू होणे शक्य

- वडाळा नाका चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा कार्यन्वित व्हावी

- द्वारका सर्कलवरच पुरेसा टर्निंग रेड‌ियस असावा

- ट्रॅक्टर हाऊसजवळील रस्ता समतोल असावा

- काठेगल्ली सिग्नलकडून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर व्हावा


द्वारका समस्येवर कधीतरी उत्तर शोधणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोनातून चाचपणी करण्यात आली. पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध झाल्यास, तसेच काही डिझाइनमध्ये बदल केल्यास यू-टर्नचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. अतिक्रमण ही सर्वात मोठी डोकेदुखी असून, हा अहवाल संबंध‌ित विभागांना देण्यात येईल.

- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरिबांची दिवाळी गोड करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘साखर अनुदान सुरू करा, गरिबांची दिवाळी गोड करा’, ‘मागच्या दिवाळीत नोटबंदी, यंदाच्या दिवाळीत लाइट बंदी’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’ यांसारख्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. काळे कपडे परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या आंदोलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

इंधनाचे वाढते दर, शेतकऱ्यांना अद्याप मिळू न शकलेली कर्जमाफी यांसारख्या अनेक मुद्दयांवर केंद्र आणि राज्य सरकारला खिंडीत गाठण्याचे काम भाजपच्या विरोधी पक्षांनी सुरू केले आहे. ऐन दिवाळीत देशवासियांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केले. काळे कपडे परिधान करून आलेल्या आंदोलकांनी ‘कोण म्हणते कर्जमाफी देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, विकासासोबत प्रकाशही हरवला यांसारख्या घोषणा देत सरकारचा निषेध केला. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटल्यानुसार गेल्या तीन वर्षांत महागाईने उच्चांक गाठला असून शेती व औद्योगिक उत्पन्न घटले आहे. त्यामुळे गरीब, कष्टकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्क‌िल झाले आहे. जागतिक पातळीवर पेट्रोल-डिझेलची किंमती कमी होत असताना भारतात मात्र इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. घरगुती गॅसचे दरही वाढविण्यात आल्याने कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नाशिकमधील उद्योगधंद्यांनाही महागाईची झळ बसली असताना भारनियमनाचीही त्यामध्ये भर पडली आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेक उद्योगधंदे देशोधडीस लागले असून बेरोजगारीही वाढली आहे. कामगार वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीत डाळींसह जीवनावश्यक वस्तूही महागल्या असून, सर्वसामान्यांनाच त्याची अधिक झळ सोसावी लागते आहे. अंत्योदय व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना मिळणाऱ्या अन्नधान्यात कपात केल्यामुळे त्यांची दिवाळी कडू झाली आहे. शहर बससेवा, आरोग्यसेवेबाबतच्या तक्रारींचा पाढाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी वाचला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार, नाना महाले, दत्ता पाटील, विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, मुख्तार शेख, अंबादास खैरे, कविता कर्डक,शोभा साबळे, सुषमा पगारे, समीना मेमन आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावात प्रस्थापितांना दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर प्रगतीचा गाडा अडकून अपेक्षित असलेले ‘परिवर्तन’ घडले. माजी आमदार दिलीपराव बनकर यांच्या परिवर्तन पॅनलने १७ जागांपैकी सरपंच पदासह १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या उमेदवार अलका अशोक बनकर यांनी प्रतिस्पर्धी प्रगती पॅनलच्या उमेदवार वैशाली भास्कर बनकर यांचा तब्बल चार हजार ३९६ मतांनी दणदणीत पराभव करत विक्रमी मतांचा ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयाने दिलीप बनकर यांनी सलग तिसऱ्यांदा भास्कर बनकरांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली.

ग्रामपंचायत निवडणुकीतील पानीपत

ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव भास्कर बनकरांसाठी मोठा धक्का मानला जातो. १९९७ ते २००२ हा पाच वर्षाचा अपवाद वगळता भास्कर बनकर यांच्या सलग तीस वर्ष सत्ता होती. तर ग्रामपंचायतीची सत्ता नसल्याने विधानसभा निवडणुकीत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागलेले दिलीप बनकरांचा या विजयाने आमदारकीचा राजयोग जुळण्याची शक्यता वाढली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी

विजयी उमेदवार

छाया पाटील, नीलेश कडाळे, मालती साळवे, अल्पेश पारख, सोनली विधाते, सुहास मोरे, अश्विनी खोडे, सुरेश गायकवाड, किरण लभडे, शितल बनकर, महेंद्र गांगुर्डे, विशाल बनकर, रुक्मिणी मोरे, अलका वारडे, संजय मोरे, सत्यभामा बनकर,

शीतल मोरे.

सरपंच पदाचा निकाल

अलका बनकर (परिवर्तन पॅनल, विजयी, मते ११९३७)

वैशाली बनकर (प्रगती पॅनल, पराभूत, मते ७५४१)

आमदार कदम यांनाही हादरा

दिलीप बनकरांच्या मोठ्या विजयाने व पिंपळगाव शहरावरील वर्चस्वाने आमदार अनिल कदम यांना हादरा बसला आहे. दिलीप नकर, अनिल कदम यांच्यातील अंतिम सामना आता विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

अन् त्या हसल्या..

२५ वर्षापूर्वी बनकर यांच्या वस्तीवर भीषण दरोडा पडला होता. त्यात शंकरराव बनकर, अशोकराव बनकर, विलासराव बनकर यांच्यासह गुरखा मृत्युमुखी पडले होते. या घटनेनंतर आनंद आणि हसू यापासून कोसो दूर राहून अलका बनकर यांनी शेतीत २५ वर्ष मन रमविले. आज सरपंचपदी निवड झाल्यानंतर पती अशोक बनकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेताना अलका बनकर यांना अश्रू अनावर झाले. हा प्रसंग पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुचकर पदार्थ झटपट बनविण्याच्या टिप्स

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

विविध प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थ झटपट कसे बनवावेत, याच्या टिप्स नामांकित शेफ संजीव कपूर यांनी महिलांना दिल्या. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व व्हेजिको ट्रीतर्फे संजीव कपूर खजानाच्या वतीने इंदिरानगर येथे झालेल्या कार्यक्रमात महिलांनी ही पर्वणी साधली.

या अनोख्या कार्यक्रमाला महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे खाद्यपदार्थ शिकविण्याबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. सध्या सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत. त्यातच महिलावर्गाची दिवाळीतील सर्वांत असणारे फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. यापार्श्वभूमीवर कमी वेळेत रुचकर खाद्यपदार्थ कसे बनवावेत, हे यावेळी प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आले.

या पदार्थांची प्रात्यक्षिके

यावेळी शेफ संजीव कपूर यांनी गुलाबजाम चीज केक, कांचीपूरम इडली, पनीर टिक्‍का, ब्रेड पकोडा, पावभाजी, अपरीकोट आणि चिल्ली मोजिटो, एबीसी ज्युस यांसारखे विविध खाद्यपदार्थ सोप्या व सरळ पद्धतीन झटपट कसे बनवावेत, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर फळांना किंवा भाज्यांना निरनिराळे आकार देऊन आकर्षक कसे बनविता येते, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. विविध रुचकर खाद्यपदार्थ बनविण्याबरोबरच ते देताना कसे सजावावेत याविषयीदेखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.


हसत-खेळत मार्गदर्शन

विशेष म्हणजे यावेळी शहरातील विविध स्थानिक कलावंतांनी गाणी, झुम्बा डान्सचे सादरीकरण केल्याने हसत-खेळत पदार्थ शिका, असे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमामुळे अनेक नवनवीन पदार्थ महिलांना शिकावयास मिळाल्याने महिला व युवतींमध्ये आनंदाचे वातावरण होते.



महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता सुरू होणार असला, तरी एक वाजेपासूनच महिलांची गर्दी झाली होती. महिलांचा उत्साह पाहून शेफ कपूर यांनीही जादा वेळ देऊन अनेक पदार्थ बनवून दाखविले. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व व्हेजिको ट्रीतर्फे झालेल्या या कार्यक्रमाचे महिलांनी कौतुक करून असेे कार्यक्रम वेळोवेळी घ्यावेत, असे मत व्य‍क्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा, गटप्रवर्तकांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आक्रमकतेने मांडल्या जाणाऱ्या मागण्या, शेकडो महिलांची घोषणाबाजी आणि जोरजोरात सुरू असलेला थाळीनाद यामुळे आशा, गटप्रवर्तकांनी काढलेल्या मोर्चाने सोमवारी शहर दणाणून गेले.

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा नाशिकच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा बी. डी. भालेकर मैदानापासून सोमवारी सकाळी सुरू निघाला. शालिमार, एम. जी. रोड, सीबीएस येथून जिल्हा परिषदेसमोर आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा व गट प्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला.

आशा व आशा गट प्रवर्तकांना अल्प मानधनावर काम करावे लागत असून सातत्याने मानधन थकीत राहत असल्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार केवळ आश्वासने दिले जात असून त्याची पूर्तता होत नसल्याने या वर्गाने तीव्र असमाधान व्यक्त करत विविध मागण्या मांडल्या. यामध्ये आशा व आशा गटप्रवर्तक महिलांना केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार दरमहा १५ हजार रुपये किमान वेतन द्यावे, थकित मानधन मिळावे, कुष्ठरोग सर्व्हे तसेच लसीकरणासाठी किमान दररोजचा कामाचा मोबदला ३०० रुपये मिळावा, मेडिकल किट्स देऊन पुनर्भरणी करावी, शासकीय जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राते सन्मानाची वागणूक मिळावी, २००५ पासून आजपर्यंत मोबदल्याची सर्व थकीत रक्कम, लसीकरण, पोषण आहार आदी कामांची मोबदल्याची रक्कम त्वरित देण्याचा आदेश करा, आदी मागण्यांचा यात समावेश होता. जिल्हा परिषद अधिकारी यांनी निवेदन घेण्यासाठी गेटवर यावे, यासाठी प्रचंड घोषणा देण्यात आल्या. ‘आयटक’चे राज्य अध्यक्ष राजू देसले, जिल्हा सरचिटणीस सुवर्णा मेतकर, जिल्हा संघटक विजय दराडे, राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप, सुमन बागुल आदी उपस्थित होते.

थकित मानधन तीन दिवसात

आशा व आशा गट प्रवर्तकांच्या प्रतिनिधींशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना व जिल्हा परिषद आरोग्यधिकारी सुशील वाघचौरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ३ हजार ६७२ आशा व गटप्रवर्तकांचे चार महिन्यांचे थकित मानधन २ कोटी रुपये तीन दिवसात खात्यावर जमा होतील, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे आयटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्व आशा यांना सन्मानाची वागणूक मिळेल यासाठी पत्र दिले जाईल, दरमहा मानधनवाढ, भाऊबीज भेट, किमान वेतन सर्वे पैसे वाढीबाबत सरकारला कळविले जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वाघचौरे यांनी मोर्चेकऱ्यांसमोर बाहेर येऊन सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांमधून सोडले पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत चार दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. रविवारी रात्रभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह निफाड, बागलाण, देवळा, येवला, मालेगाव, कळवण, पेठ, चांदवड या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात ३७४ मिलीमीटर पाऊस पडला. शहरात अवघ्या दोन तासात ८.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली असून गंगापूर आणि दारणासह आळंदी, वालदेवी धरणातून सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामूळे गोदावरी नदीमधील पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पंचवटीतील गोदाकाठावर असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणीपातळी पोहचली आहे.

व‌िजेच्या तारा तुटल्या
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महापारेषणच्या तारांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. शहर आणि आसपासच्या परिसरात तीन ठिकाणी वीज पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. जेलरोड, देवळाली, गंगापूररोडसह शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाश‌िकरोड परीसरात अधिक नुकसान झाले.

धरण......पाणीविसर्ग (क्यूसेक)
दारणा........२५०
गंगापूर........१७९३
आळंदी........६८७
वालदेवी........१०७
नांदूर मध्यमेश्वर........१०७७९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>