Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गीता पठण स्पर्धेत नेहा कुऱ्हाडे प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चिन्मय मिशन नाशिकद्वारा आयोजित पंचवटीत‌ील चिन्मय चेतना आश्रमात झालेल्या गीता पठण स्पर्धेत विद्या प्रबोधिनी प्रशाळेच्या नेहा कुऱ्हाडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आचार्या ब्रह्मचारिणी प्रेरणा चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.

गीता पठण स्पर्धेत नाशिक शहरासह जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड येथील १६ शाळांतील ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावर्षी ही स्पर्धा श्रीमद्भगवत गीतेच्या १७ व्या अध्यायावर चार गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे रुपये २ हजार, १ हजार, पाचशे व दोनशे पन्नास तसेच प्रमाणपत्र, मानचिन्ह देण्यात आले. चिन्मय मिशनचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, सेक्रेटरी गावले, विश्वस्त व्ही. एच. पाटील व आचार्या ब्रह्मचरिणी प्रेरणा चैतन्या यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचा निकाल
- अ गट (बालवाडी ते पहिली) : १) आर्या साखरेकर, २) आरूषी ढगे, ३) नचिकेत महाले, उत्तेजनार्थ : ओवी दीक्षित, रुद्राणी चौधरी
- ब गट (इयत्ता दुसरी ते चौथी) : १) वैद्येही सानप, २) तन्मय काळे, ३) श्रुती शेलार, उत्तेजनार्थ : वेद कापडणीस, समृद्धी उपासनी, स्वरा कुलकर्णी
- क गट (पाचवी ते सातवी) १) चिन्मय गरूड, २) अवी परांजपे, ३) अवनी कोंबडे, उत्तेजनार्थ : श्रेया वांगणेकर, सार्थक चव्हाण
- ड गट (आठवी ते दहावी) : १) नेहा कुऱ्हाडे, २) केतकी देसाई, ३) जीवन गुंजाळ, उत्तेजनार्थ : तितिक्षा येवले, कोशी घाडमोडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भास’ पुस्तकाचे आज प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीमती सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालय, शंकराचार्य न्यास, गौतमी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापिका डॉ. निरुपमा कुलकर्णी लिखित ‘भास एक प्रयोगशील नाटककार’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह, गंगापूररोड येथे होणार आहे.

संस्कृत भाषा सभेच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख, संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. कार्यक्रमास डॉ. मो. स. गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. संस्कृत साहित्यातील भास या प्रथितयश नाटककाराने चौदा कलाकृती रचल्या. या भासाचे जीवन, काळ यासह बंडखोरी दाखवणाऱ्या १४ नाटकांचा रसग्रहणात्मक परिचय या पुस्तकात आहे.

या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, गौतमी प्रकाशनच्या संचालिका सारिका देशमुख, डॉ. देवदत्त देशमुख, तेजश्री वेदविख्यात, रमेश देशमुख यांसह संस्कृत भाषा सभेतर्फे करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कविता संग्रहांचे उद्या प्रकाशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिकच्या सुमती पवार यांनी लिहिलेल्या चार कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणार असल्याची माहिती कवयित्री सुमती पवार यांनी दिली.

सुमती पवार यांनी सांगितले, की एकाच वेळी ‘संस्कार’, ‘सृजन’, ‘शिदोरी’ आणि ‘सुमतीचे श्लोक’ अशा चार कवितासंग्रहांचे प्रकाशन व्हावे ही अनेक दिवसांपासूनच इच्छा होती. पुण्याच्या वैशाली प्रकाशन हे कविता संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या काव्यसंग्रहांचे प्रकाशन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवी किशोर पाठक हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुमती पवार व वैशाली प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हलाल’साठी पोलिस बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिहेरी तलाकवर आधारित ‘हलाल’ हा मराठी शुक्रवारी शहरातील दोन ते तीन चित्रपटगृहांमध्ये पोलिस बंदोबस्तात प्रसिद्ध झाला. चित्रपटला विरोधी होण्याची शक्यता असल्याने चित्रपटागृहांबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, दिवसभर कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.

तिहेरी तलाक प्रथेबाबत या वर्षात बरीच चर्चा झाली. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे तसेच अंतिम आदेशामुळे तिहेरी तलाक पद्धतीवर सर्वच बाजुने चर्चा झाली. हाच धागा पकडून हलाल नावाचा मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. आज तो शहरातील दोन ते तीन चित्रपटगृहांमध्ये झळकला. सदर चित्रपटातील आशयास काही गटांकडून विरोधी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी संबंधीत चित्रपटगृहांना पोलिस बंदोबस्त पुरवला. प्रेक्षकांच्या तपासणीसह चित्रपटगृहातही पोलिस ठाण मांडून होते. दरम्यान एका मल्टिफ्लेक्समध्ये हलालसाठी स्क्रिन उपलब्ध होती. मात्र, सदर चित्रपटाबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल असून, त्यावर १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. हायकोर्टाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच सदर चित्रपट प्रसिद्ध करण्याची भूमिका मल्टीप्लेक्स संचालकांनी घेतली. सुरुवातीस येथेही पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनास कोणीही उघड विरोध केल्याचे समोर आले नाही.

चित्रपटाला विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे बंदोबस्त पुरवण्यात आला. सध्यातरी बंदोबस्त कायम असून, हळूहळू तो काढून घेण्यात येईल. शहरात दोन ते तीन ठिकाणी चित्रपट दाखवण्यात येणार होता. मात्र, एका ठिकाणी शो रद्द करण्यात आला.
- श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या टेम्पोला अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील दळवट येथील क्रीडा स्पर्धा आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचा पिकअप टेम्पो आणि जनावरांनी भरलेल्या टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात चिंचला येथील शहीद भगतसिंग आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अन्य १८ विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाले. गुरुवारी (दि.५) रात्री नऊच्या सुमारास सुरगाणा-उंबरठाण रस्त्यावरील म्हैसखडक फाट्याजवळ ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, गुरुवारी आमदार. जे. पी. गावित संचलित चिंचला येथील अनुदानित आश्रम शाळेतील ३२ विद्यार्थी, विद्यार्थीनी दळवट येथील क्रीडा स्पर्धत सहभागी झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर हे सगळे पिकअप टेम्पोने (जीजे १५ झेड ३५४०) चिंचला येथे परतत असताना रात्री ९च्या सुमारास म्हैसखडक फाट्याजवळ उंबरठाणकडून जनावरे भरून सुरगाण्याकडे येणाऱ्या टेम्पोशी (एम. एच. १५ डीके १४८५) समोरासमोर धडक झाली.

विद्यार्थ्यांचा टेम्पो उलटला झाला तर जनावरे भरलेला टेम्पो झाडावर आदळला. या दुर्घटनेत फुलवंती मनीराम चौधरी (वय १३) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कल्पेश कनसे (१५), रूक्म‌िणी भोये (१३), गायत्री पवार (१४), राजेंद्र पाडवी (१६), जयश्री निकुळे (१७), मनिषा भोये (१८), गणेश बोरसे (१५), सुशीला भोये (१५), किरण भोये (१६), दिनेश

वाघमारे (१५), वनिता धुळे (१३), सरीता गायकवाड (१३), गिता पाडवी (१५), मोनिका भुसारे १३), महेश निकूळे (१५), अर्चना वाघेरा (१४), राजश्री जाधव(१३) मनिषा पवार(१३) हे जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी वाहानांनी गुजरात राज्यातील वासदा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान विद्यार्थ्यांसोबत शिक्षक नसल्याने या बाबतची खबर पृथ्वीराज गावित यांनी दिल्यानंतर सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरगाणा पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून, जनावरे वाहतूक करणारा टेम्पोचालक सोमनाथ मुळाणे (रा. गोळशी) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमध्ये कोंबून किंवा जीपगाड्यांच्या टपावर बसवून नेले जाते. या घटनेनंतर तरी विद्यार्थी वाहतुकीत फरक पडणार काय, असा प्रश्न उपस्थ‌ित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात टाकल्यानंतरही ‘पसा’ला दुरवस्थेचे ग्रहण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक जळमटांमध्ये अडकलेल्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. तुटलेल्या खुर्च्या, फाटलेला पडदा, स्वच्छतागृहाची लागलेली वाट अशी सध्या अवस्था असून राज्य नाट्य स्पर्धांसाठी परशुराम साईखेडकर नाट्यगृहालाच पसंती प्रथम देण्यात येते; मात्र अशी अवस्था असल्यास या स्पर्धा तेथे होतील का? अशी शंका आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह हे सावानाच्या अखत्यारीत येते. अत्यंत माफक भाडे आणि वस्तुंचा, बाहेरील मैदानाचा मुबलक वापर असे स्वरूप असलेल्या ‘पसा’ने गेल्या वर्षीच कात टाकली; मात्र रंगरंगोटी व आतील रचना बदलामुळे नाशकातील आकर्षक वास्तुंपैकी एक अशी ‘पसा’ची झालेली ख्याती आतील मोडकळीस आलेली व्यवस्था पाहिल्यास खोटेपणाची वाटते. नव्याचे नऊ दिवस, त्याप्रमाणे ‘पसा’चेही झाले. ‘पसा’ चे मोडकळीला आलेले दरवाजे सतत उघडे असल्याने त्यातून येणारी दुर्गंधी कार्यक्रमातून निघून जाण्यासाठी भाग पाडत आहे. बाहेरच्या बाजुला असलेली पाण्याची टाकी केवळ शोभेसाठी आहे की काय, असे वाटून जाते. त्यात कधी पाणी असते तर कधी कोरडीठाक? उन्हाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध झाले पाहिजे अशी प्रेक्षकांची ओरड असते. अचानक आग लागल्यानंतर वापरावयाच्या ‘फायर एक्स्टींग्युशर’ची अवस्था पाहिली तर त्याने आग विझेल की नाही अशी शंका येते. अनेक खुर्च्यांना आत टेकवायला जागाच नाहीत. त्यातून करकर आवाज येत असल्याने कार्यक्रम सुरू असताना रसभंग होतो. नूतनीकरण केल्यानंतर काही दिवसांतच ‘पसा’ची ही अवस्था झाली आहे.

तांत्रिक बाबतीत मागेच
कोणतेही नाट्यगृह म्हटले की त्याच्या तांत्रिक बाजू भरभक्कम असतील तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. नाटक सादर करावयाचे म्हणजे त्याला अनेक बाबींचे सहाय्य लागते. स्टेज, स्टेप्स, लाइट्स, साउंड सिस्टिम मजबूत असल्याशिवाय नाटक सादर करणे सहज शक्य होत नाही. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मात्र नेमके याच गोष्टींची वाणवा आहे. प्रेक्षकांना खुर्चीत बसल्यानंतर सर्वात प्रथम दिसतो तो पडदा. नाट्यगृहाचा पडदा इतक्या ठिकाणी फाटलेला आहे की ‘पसा’ची लक्तरे अशी का टांगली आहे असा प्रश्न पडावा. धुळीने प्रचंड भरलेला हा पडदा म्हणजे प्रथमदर्शनी दिसणारे दारिद्र्य आहे. हा पडदा तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी अनेक रंगकर्मींनीही केली आहे.

... तरीही ‘राज्यनाट्य’साठी पसंती
पूर्वी राज्य नाट्य स्पर्धा कालिदास कलामंदिरात होत. मात्र, समाजकल्याण विभागाने त्यातून अंग काढून घेतल्याने आता या स्पर्धा परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये होतात. परंतु, या स्पर्धांनाही अनेक बाधा येत आहेत. सभागृह उशिरा ताब्यात मिळणे, तांत्रिक अनेक अडचणी येणे असे प्रकार सुरू झाले आहे तरीही राज्य नाट्यसाठी ‘पसा’लाच पसंती देण्यात येते. यापूर्वी, वीस वर्षे आधीही ‘पसा’मध्येच नाट्यस्पर्धा होत. मध्यंतरी ठिकाण बदलण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा येथे स्पर्धा होत असल्याने आर्थिक हातभार लागतोय.

साउंड सिस्टिम सुधारावे
परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये अनेक वर्षांपासून अनेक स्पर्धा, नाटके तसेच नृत्याचे कार्यक्रम होतात; परंतु कोणत्याही स्पर्धेला देण्यात येणारे साउंह नेहमीच खराब होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना सारखा व्यत्यय येत असल्याने साउंड सिस्टिम सुधारावे, अशी सूचना प्रेक्षक नेहमीच करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द्वारका’कोंडीवर उतारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी नवा पर्याय शोधला आहे. यासाठी अनेकदा चाचपणी करण्यात आली. नवीन मार्गांनुसार येत्या ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर सदर पर्यायांवर शिक्कामोर्तब करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

द्वारकेवरील वाहतूक कोंडी शहरवासीयांसाठी मोठी समस्या ठरली आहे. मुंबई-आग्रा हायवेचे काम पूर्ण होण्यापूर्वीपासून द्वारका सर्कल वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपूल तसेच नवीन रस्त्यांमुळे द्वारका सर्कल समस्येची तीव्रता कमी होण्याची चिन्हे होती. मात्र, एकंदरीत भोंगळ कारभाराचा फटका नाशिककरांना बसला. याठिकाणी किमान आठ ते दहा वेगवेगळे रस्ते एकत्र येऊन मिळत असल्याने नेहमीच गोंधळ उडतो. त्यातच रस्त्यांची रुंदी, वाहनांची संख्या, रस्त्यांची संख्या यामुळे येथे नक्की काय उपाययोजना राबवाव्यात, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना सतावतो. या पार्श्वभूमीवर, वाहतूक विभागाने या वर्षाच्या सुरुवातीपासून वेगवेगळे प्रयोग राबवले. तसेच काही अधिकाऱ्यांनी अभ्यास केला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनीही १८ जुन रोजी या ठिकाणी पाहणी करून वाहतुकीचे नियोजन करण्याचा पर्याय पडताळून पाहिला. त्यात, द्वारका सर्कल येथे वाहने एकमेकांना क्रॉस करणार नाहीत, या पद्धतीने नियोजन व्हायला हवे, यावर एकमत झाले. त्यानुसार पोलिस, नॅशनल हायवे अॅथोरटी ऑफ इंडिया, तसेच महापालिकेने काही फेरबदल केले. आता नवीन पर्यायानुसार पुण्याकडून येणारी सर्व प्रकारची वाहने वडाळा नाका येथून वळून पुन्हा द्वारकेच्या दिशेने येतील. तर, पुणेकडे जाणारी वाहने ट्रॅक्टर हाउसपर्यंत पोहचून तेथून यू-टर्न घेऊन पुन्हा द्वारकेच्या दिशेने येतील. यामुळे वाहने समोरसमोर येणार नाहीत.

दोन दिवस असेल बदल

वाहतुकीचे बदल प्रयोगिक तत्त्वावर असून, ९ ते १० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. या दरम्यान येणाऱ्या अडचणी, वाहतूक मार्गातील बदलाचा फायदा यांचाही आढावा घेण्यात येणार आहे. या दोन दिवसांतील निष्कर्षाचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

अशी धावणार वाहने

- पुणे बाजुकडून येणारी वाहने द्वारका सर्कल येथे डाव्या बाजुने वळण घेऊन पुढे जातील. वडाळा नाका येथे यू-टर्न घेऊन पुढे नाशिक व धुळे बाजुकडे मार्गस्थ होईल.

- मुंबईकडून द्वारकासर्कलकडे येणारी व पुण्याकडे जाणारी वाहतूक द्वारका सर्कल येथून सरळ पुढे मार्गस्थ होईल. तसेच ट्रॅक्टर हाउस येथून यू-टर्न घेऊन द्वारका येथून डाव्या बाजुला वळेल.

- सारडा सर्कल किंवा नाशिकहून आलेल्या तसेच पुणे वा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना देखील यू-टर्न घेऊनच पुन्हा द्वारका सर्कलकडे यावे.

- धुळे बाजुकडून येणाऱ्या वाहनांनी द्वारका सर्कल येथून पुढे यावे. तसेच वडाळा नाका येथून यू-टर्न घेऊन नाशिकच्या बाजुस जावे.


मटा भूमिका

द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता आणखी एका प्रयोग केला जात असून त्याचा उद्देश चांगला असला तरी जोपर्यंत बेशिस्त वाहनचालक, सर्विस रोडवरील बेकायदा पार्किंग अन् वाहतूक नियमांना धाब्यावर बसविणारे नागरिक यांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत या समस्येवर शंभर टक्के उतारा सापडणार नाही. सध्या प्रयोगासाठी जे पर्याय दिले गेले आहेत, त्यातही संबंधित ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन समस्येचे ठिकाण तेवढे शिफ्ट होईल अशीच शक्यता आहे. या चौकातील भुयारी मार्गाचा प्रभावी वापर करण्यासाठी पूर्वीच संबंधित यंत्रणांनी कष्ट घेतले असते तर आज एवढी डोकेदुखी झालीच नसती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी परवानगी, मगच परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी संस्थांमार्फत आयोजित केल्या जात असलेल्या अवांतर परीक्षांवर राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी चाप बसवला होता. आता या निर्णयात सुधारणा करण्यात आली असून त्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. खासगी संस्थांना शाळांमध्ये अवांतर परीक्षा आयोजित करता येतील; पण त्यासाठी या संस्थांना शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

राज्यातील अनेक शाळांमध्ये खासगी संस्थांमार्फत अभ्यासेतर, अवांतर परीक्षांचे आयोजन केले जाते. मुख्याध्यापक संघ, अशासकीय संस्था, व्यक्ती आदींकडून या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. टॅलेंट सर्च, भाषा विषयक, सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांचा यात समावेश असतो. मात्र, या परीक्षांचे स्वरुप, अभ्याक्रम, गुणांकन अशा पद्धतीने योग्य परीक्षण झालेले नसते. तसेच अनेक संस्था, व्यक्ती या परीक्षांसाठी वेगळे शुल्क देखील आकारतात. या अतिरिक्त परीक्षांमुळे येणारा ताण कमी करण्यासाठी परवानगीशिवाय परीक्षांचे आयोजन करण्यावर निर्बंध असावे असा निर्णय राज्य शिक्षण विभागाने जानेवारीत दिला होता. मात्र, या परीक्षांना विशेष बाब म्हणून परवानगी देण्याची मागणी राज्यातील विविध संस्थांनी केल्यानंतर त्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यानुसार खासगी संस्था, व्यक्तींना शाळांमध्ये परीक्षा घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

तर अशा परीक्षांवर बंदी

शिक्षण विभागांच्या नियमांचे पालन होत नसल्यास, विद्यार्थ्यांना अशा परीक्षांची सक्ती होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला मिळाल्यास अशा परीक्षांवर थेट बंदी आणली जाणार आहे. त्यामुळे खासगी संस्थांना शिक्षण विभागाच्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या परीक्षा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेस चालना देणाऱ्या, अवांतर वाचनास प्रोत्साहन देणाऱ्या आहेत की नाही, याबाबतही विचार केला जाणार आहे.

हे महत्त्वाचे

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत, वाचनास प्रोत्साहन देणाऱ्या, राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या, व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या परीक्षा एखाद्या खासगी संस्थेने तयार केली असेल व ही संस्था ना-नफा ना-तोटा तत्वावर काम करणारी असेल तर त्यांना या परीक्षा आयोजित करता येणार आहेत. मात्र, या संस्थांना मागील तीन वर्षांचे वार्षिक ताळेबंद, संस्था निबंधक कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना-भाजपमध्ये मालेगावात चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात एकीकडे ऑक्टोबर हिटने तापमान वाढले असून, नऊ ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यात शिवसेना-भाजपातील संघर्ष वाढत असून, त्यामुळे या निवडणुकीत देखील सेना-भाजपात थेट लढत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे शिवशक्ती पॅनल व भाजप नेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पेनलमध्येच मुख्य लढत होत आहे.

तालुक्यातील दहा पैकी एक मोहपाडा ग्रा. प. निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे नऊ ग्रा. प. साठी राजकीय लढाई सुरू आहे. यातील दाभाडी व सौंदाणे ग्रा. प. च्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही गावांमध्ये गेल्या दोन पंचवार्षिकपासून सेनेचा भगवा फडकत आहे. मात्र यावेळी हिरे समर्थकांनी सेनेपुढे कडवे आव्हान उभे केले असून, भुसे समर्थकांनी देखील सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.

गावपातळीवरील निवडणूक असल्याने सर्वच गावात नातीगोती, भाऊबंदकी हे फॅक्टर महत्त्वाचे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पक्षीय रंग पाहायला मिळत आहेत.

प्रथमच सरपंच पदासाठी थेट निवडणूक होत असल्याने गावपातळीवरील अनेक मात्तबरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दाभाडी येथे सरपंचपदासाठी शिवसेनेच्या वनमाला निकम, भाजपच्या चारुशीला निकम व अपक्ष सुहासिनी निकम यांच्यात तिरंगी लढत आहे. सौंदाणेत शिवसेनेचे चेतन पवार व भाजपचे डॉ. मिलिंद पवार यांच्यात लढत आहे. यासह अन्य दोन उमेदवार देखील रिंगणात आहेत.

दाभाडी व सौंदाणे या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत असून, या नऊही ग्रा. प. च्या निवडणुकीनंतरच शिवसेनेचा गावपातळीवर पाया किती भक्कम आहे व भाजपला शहरानंतर गावात किती जनाधार मिळतो हे स्पष्ट होणार असल्याने तालुक्याचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावात परिवर्तन की प्रगती?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतच्या थेट सरपंच आणि १७ सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी मतदान होत असून, दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल आणि भास्कर बनकर यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलमध्ये थेट ासामना होणार आहे.

दोन्ही पॅनलच्या वतीने गत आठ दहा दिवसांपासून शहरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील ज्येष्ठ नेते प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी प्रचारात सक्रिय असल्यामुळे दोन्ही पॅनलला ज्येष्ठ नेत्यांचे चांगले पाठबळ मिळाले आहे. गत आठ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सांयकाळी थांबली. मात्र ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही पॅनलकडून प्रचाराची राळ उडविण्यात आली होती.

प्रत्यक्ष भेटी, चौकसभा, जाहीर सभा, सोशल मीड‌ियावर झालेला प्रचार व अपप्रचार यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. पिंपळगाव ग्रामपंचायतवर गत तीस वर्षांपासून भास्कर बनकर यांची एकहाती सत्ता आहे. १९९७ चा अपवाद वगळता ग्रामपंचायतच्या प्रत्येक निवडणुकति भास्कर बनकर यांच्या साथीला कधी दिलीप बनकर तर कधी तानाजी बनकर होते. एक निवडणूक तर बिनविरोध पार पडली होती. या निवडणुकीत मात्र भास्कर बनकर यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी शहरातील मातब्बर नेते एकत्र आले आहेत. त्यातच थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दिलीप बनकर यांनी आपल्या भावजय अलका बनकर यांनाच रिंगणात उतरवल्यानंतर निवडणुकीतील चुरश कमालीची वाढली. दिलीप बनकर यांच्यासोबत ज्येष्ठ नेते प्रताप मोरे, तानाजी बनकर, अशोक शहा, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, सपंत विधाते विश्वास मोरे, सोमनाथ मोरे आदी मातब्बर नेते सक्रिय झाल्याने भास्कर बनकर काहीसे एकाकी पडले असले, तरी निवडणुकीत मतदाराचां कैाल महत्त्वाचा असल्याने भास्कर बनकर यांची भिस्त मतदारांवरच आहे.

अॅड. शातांराम बनकर, पढंरीनाथ देशमाने, चंद्रकांत खोडे, रामराव डेरे, जयमरा खोडे आदी मान्यवरासह दिलीप मोरे यांच्यासारखा हुकुमी एक्का भास्कर बनकर यांच्या साथीला आहे. तर युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगला प्रभाव असलेले युवा नेते राजेश पाटील सुजीत मोरे, दीपक बनकर, आशिष बागुल, राज गांगुर्डे, रामराव मोरे, विक्रम मोरे, नकुल शिंदे, राहुल बनकर, संदीप बनकर अशी युवा नेत्यांची फौज भास्कर बनकरांच्या पाठ‌िशी आहे. सत्यजीत मोरे, महेंद्र गांगुर्डे, किरण लभडे, लक्ष्मण खोडे, रामराव बनकर आदी बिनीचे शिलेदार भास्कर बनकर यांच्या पॅनलमधुन उमेदवारी करीत आहेत. शिवाय संपन्न राजकीय वारसा असलेल्या नामवंत घराण्यातील महिला संध्या मोरे, शितल बनकर, छाया पाटील, सविता खोडे, सुवर्णा देशमाने आदी भास्कर बनकर यांच्या पॅनलच्या उमेदवार आहेज.

दिलीप बनकर यांच्या पॅनलमधून सतीश मोरे, संजय मोरे, सुनिल गांगुर्डे, गणेश बनकर, सुहास मोरे असे प्रभावी युवा नेते उमेदवारी करीत आहेत. प्रचार काळात दोन्ही पॅनलने आपली भूमिका मतदारापर्यंत पोहचविली आहे. युवा नेत्यांची उमेदवारी दिलीप बनकरांना विजयापथावर पोहचवणार की एकाकी पडूनही भास्कर बनकर मतदारांची सहानुभूती मिळवतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होर्इल.

पिंपळगावात ३६ बूथ

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि १७ सदस्य निवडीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. निवडणूक विभागाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. ए. शेख यांनी दिली. पिंपळगाव ग्रामपंचायतसाठी यंदा प्रथमच थेट सरपंच निवड होत असून सहा वॉर्डातून १७ सदस्य उभे आहेत. सहा वॉर्डात ३६ मतदान बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. या साठी बुथ अधिकाऱ्यांसह तीस महिला कर्मचारी परिश्रम घेत आहेत. पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा वॉर्डातून एकूण मतदार संख्या २७ हजार ९०४ इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिशन इंद्रधनुष्य’चा रविवारी शुभारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राज्यात ७ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेतंर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ ८ ऑक्टोबर, रविवारी येथील सामान्य रुग्णालय प्रांगणात होणार आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी दिली.

येथील सामान्य रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाडावी उपस्थित होते. डॉ. डांगे यांनी पत्रकार परिषदेत विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. शहरातील मुस्ल‌िमबहुल भागात आजही लसीकरणाबाबत उदासीनता आहे. देशातील अशा १८७ जिल्ह्यात केंद्रशासनाने ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ मालेगावी होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण मालेगावात केले जाणार आहे. या मोहिमेतंर्गत ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान दरमहा ७ ते १४ तारखेदरम्यान शहरातील ९ आरोग्य केंद्रांवर ३६२ सत्रात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. तसेच विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी शहरातील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय तसेच नर्सिंग कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात मार्केटमधील पाच गाळ्यांचं नुकसान झालं आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून प्राथमिक माहिती घेतली जात आहे.

आज पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला. नुकसान झालेले व्यावसायिक गाळे बंद असल्यानं कुणीही जखमी झालं नाही. हा स्फोट नेमका कशामुळं झाला हे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्र्यांसह त्यांचे मंत्रीच बोगस’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अकोले

या पुढील पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतून निवडून द्या, म्हणजे या सरकारला कळेल की खरी लोकशाही काय आहे. ६ लाख शेतकरी हे बोगस आहेत, असे सांगणारे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीच बोगस आहेत, अशी टीका माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केली. आज सामान्य शेतकरी, आदिवासी, कामगार, विद्यार्थी या सरकारच्या धोरणाला कंटाळला आहे. हे सरकार नालयक आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अकोले तहसील कार्यलयासमोर धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पिचड बोलत होते. सुरेश गडाख, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, भाऊपाटील नवले, अशोक देशमुख, के. डी. धुमाळ, बाळू भोर, कैलास वाकचौरे, सचिन शेटे, बाळासाहेब वडजे, नामदेव पिचड, परशराम शेळके, कुमोदिनी पोखरकर, चंद्रकला धुमाळ, कल्पना सुरपुरिया, रवींद्र देशमुख, राहुल देशमुख, शंभू नेहे आदी या वेळी उपस्थित होते. सुमारे ३ तास चाललेल्या या धिक्कार मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन विविध घोषणा दिल्या. उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी यांनी बळीराजाचा वेश परिधान करून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. बैलगाड्या, घोडे, ट्रॅक्टर व त्यावर विविध फळभाज्या बांधून हा मोर्चा मराठी शाळेच्या प्रांगणातून अकोले शहरातून कोल्हार-घोटी रस्त्याने तहसील कचेरीवर नेण्यात आला.

मधुकर पिचड म्हणाले की, आज कधी नव्हे इतके विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी मनातील भावना मोकळ्या करू लागले आहेत. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असून हे सरकार फुकट खाऊ लोकांचे आहे. राज्यातील ८०० इंजिनीअरिंग कॉलेज बंद पडली असून कंपन्या बंद पडल्या आहेत. जीएसटी आणि नोटबंदीमुळे सामान्य माणूस या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेठीस धरला जात असून पंतप्रधान मनमानी पद्धतीने देश चालवत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना बजावल्या नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मालकीच्या तिबेटीयन मार्केटमधील गाळ्यांमध्ये झालेल्या स्फोटाची गंभीर दखल पालिकेनेही घेतली असून, या गाळ्यांच्या मालकांना अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे. तसेच, सोमवारी या गाळेधारकांना आर्थिक नुकसानीबाबतच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास बंदी असतानाही गाळेधारकांनी त्यात गॅस सिलिंडर ठेवल्यामुळे अटी व शर्तींचा भंग म्हणून हे गाळे जप्त केले जाण्याची शक्यता आहे.

तिबेटीयन मार्केटमधील एका गाळ्यात पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या स्फोट होऊन पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे जवळपास पाच ते सहा गाळ्यांचे नुकसान झाले आहे. ज्वलनशील पदार्थामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालिकेच्या गाळ्यांचा वापर व्यावसायिक कारणाऐवजी ज्वलनशील पदार्थ ठेवण्यासाठी करणे हा अटी व शर्तीचा भंग आहे. त्यामुळे महापालिकेने चार गाळेमालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने या नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचा तातडीने खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले म्हणून सोमवारी नुकसानीच्या भरपाईसाठी नोटीस देण्यात येणार आहे. तसेच, अटी व शर्तीचा भंग केला म्हणून गाळे जप्तीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिबेटीयन मार्केटमधील गाळ्यांचा गैरवापर केला जात असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-पॉस मशिनमध्येही फेरफार

$
0
0

जिल्ह्यात तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने रेशन दुकानदारांना पॉईंट ऑफ सेल (ई पॉस मशिन) चा वापर सक्तीचा केला असला तरी या मशिनमध्येही फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दुकानांसह कामात अनियमितता आढळलेल्या एका दुकानाचा परवाना पुरवठा विभागाने रद्द केला आहे.

स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील दोन हजार ६०९ दुकानांमध्ये हे मशिन्स बसविण्यात आले आहेत. या मशिन्सद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जात आहे. नांदगाव तालुक्यातील खादगाव आणि बोराळे येथील रेशनदुकान क्रमांक १५४ आणि ३७ मधील ई-पॉस मशिन्समध्ये फेरफार करण्यात आल्याचे पुरवठा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या मशिन्समध्ये सेल क्लोजचे बटण देण्यात आले असून, महिन्याच्या अखेरीस दुकानदारांनी हे बटण दाबून सेल क्लोज करणे आवश्यक असते. दुकानदाराने ही प्रक्रिया करताच संगणकावरून ऑनलाइनने पुरवठा विभागाला त्याची माहिती मिळते. मात्र, दुकान क्रमांक १५४ चे मालक छगन विठ्ठल वडक्ते आणि ३७ चे मालक संतोष भोसले यांनी महिना संपण्यापूर्वीच सेल क्लोजचे बटन दाबून धान्य संपल्याचे संकेत दिले. त्यांच्या या कृतीबाबत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी या दोन्ही दुकानांची तपासणी केली. तेव्हा दुकानदारांकडून हस्तलिखित स्वरूपात धान्याचे वाटप सुरू असल्याचे उघडकीस आले. मशिनमध्ये फेरफार करत अपहार केल्याचा ठपका ठेऊन संबंधित दोन्ही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यांची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त केल्याची माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

२२ तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त

ई-पॉस मशिनमध्ये फेरफार झाल्याच्या २० ते २२ तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, तपासाअंती त्यात तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिकाऱ्यांनी संबंधित दुकान मालकांना ताकीद दिली होती. मालेगाव धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या कक्षेतील किरकोळ केरोसीन परवानाधारक हमीद खान शहा मोहमंद यांच्याविरुद्ध तहसीलदारांनी पोल‌सिात तक्रार दिली आहे. अनियमितता आढळून आल्याने पुरवठा विभागाने शहा यांचाही केरोसीन परवाना रद्द केला असून, १०० टक्के अनामत रक्कम जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारनियमनाला झटका!

$
0
0

नाशिक ः शहर व ग्रामीण भागात सुरू झालेल्या अनियमित वीज भारनियमनाविरोधात जनतेतील वाढता रोष पाहून राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी या तिन्ही पक्षांतर्फे महावितरण कंपनीविरोधात आंदोलने करण्यात आली. शिवसेनेने जनआंदोलन छेडण्यासह महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा दिला असून, शहर काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला, तर राष्ट्रवादीतर्फे महावितरणच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे आगामी दिवसांत हा प्रश्न हातघाईवर येण्याची चिन्हे आहेत.

-----

...तर महावितरणला टाळे!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे सुरू असलेले शहरी व ग्रामीण भागातील भारनियमन रद्द न केल्यास जनआंदोलन छेडण्यात इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. तातडीने भारनियमन रद्द न झाल्यास महावितरणाच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल व अभियंत्यांना कोंडून ठेवण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

दिवाळीच्या तोंडावर शहरामध्ये नागरिकांसह व्यापारी व लघु उद्योजकसुद्धा भारनियमनामुळे अडचणीत आले असून, उत्पादन व बाजारपेठ यांना मोठ्याप्रमाणात फटका बसत आहे. सोबतच ग्रामीण भागात शेतकऱ्यालाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या तोंडावर व शेतीचा चांगला हंगाम असतानाच महावितरण कंपनीच्या वतीन दोन दिवसांपासून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सत्तेत असलेली शिवसेनाही या भारनियमनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन भारनियमन तातडीने रद्द करण्याची मागणी केली. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारनियमन रद्द न केल्यास कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा दिला, तसेच आवश्यकता भासल्यास अधिकाऱ्यांनाही कार्यालयमांमध्ये कोंडू असा सज्जड दम भरला.

महावितरणाने वर्षभरची वीजनिर्मितीची गरज व आपत्कालीन गरज लक्षात घेऊन विशेषतः ऑक्टोबर महिन्यात होणारी कृषी ग्राहकांची मागणीतील वाढ व ऑक्टोबर हीट लक्षात घेऊन पुरेसे व योग्य नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे अपेक्षित वाढ महावितरणाला ओळखता आली नाही. परिणामी संपूर्ण राज्यात भारनियमन करावे लागत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापाऱ्यांनाही बसत आहे. करारानुसार महाजेनको व इतर कुठलीही कंपनी वीज पुरविण्यास असमर्थ ठरल्यास त्यांच्याबरोबरचे करार तातडीने रद्द करावेत, वीजपुरवठ्याच्या खुल्या व स्पर्धात्मक निविदा काढून वीज विकत घेऊन ग्राहकांची मागणी पुरवावी. मात्र, सणासुदीच्या तोंडावर भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

--

कोळसा भेट

निफाड ः अवाजवी भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या निफाड तालुक्यातील नागरिकांनी शनिवारी दुपारी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या नाशिकरोड कार्यालयावर धड़क दिली. निफाड़ तालुका शिवसेना पदाधिकारी व आमदार कदम यांनी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता खंदारे, कार्यकारी अभियंता डी. के. आहेर, नाशिकचे कार्यकारी अभियंता ठाकरे, चांदवडचे अभियंता वाडे यांना घेराव घालत कोळसा भेट देऊन आंदोलन केले. निफाड़ तालुक्यातील भारनियमन सोमवारपर्यंत सुरळीत न झाल्यास अचानक मारझोड आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा आमदार कदम यांनी यावेळी दिला.

------

काँग्रेसचा कॅन्डल मार्च

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवाजवी भारनियमनाविरोधात शहर काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च काढत अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या शहर कार्यालयापासून ते भद्रकालीतील महावितरण कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

महावितरणने तात्काळ भारनियमन रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला. महावितरणच्या वतीने अचानकपणे शहर व ग्रामीण भागात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. एेन दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या भारनियमनामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या भारनियमनाविरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कॅन्डल मार्च काढून अनोखे आंदोलन झाले. कॅन्डल मार्च महात्मा गांधी रोडमार्गे मेनरोड, दहीपूल, गाडगेबाबा पुतळा परिसरातून भद्रकालीतील महावितरण कार्यालयावर पोहोचला, त्यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना मेणबत्या भेट देत निषेध नोंदविला. शहरातील भारनियमन त्वरित बंद करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शहर अभियंत्यांना देण्यात आले. आंदोलनात डॉ. हेमलता पाटील, वत्सलाताई खैरे, राहुल दिवे, आशा तडवी, हनिफ बशीर, वसंत ठाकूर, आर. आर. पाटील, लक्ष्मण जायभावे, समीर कांबळे, रईस शेख, बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलग मुन्ना ठाकूर आदी सहभागी झाले होते.

--


विकास अन् प्रकाश गायब

काँग्रेसने काढलेल्या कॅन्डल मार्च आंदोलनात पक्षाच्या वतीने लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील स्लोगन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विकासासोबत प्रकाशही गायब असे पोस्टर्सही यावेळी झळकविण्यात आले. फडणवीस सरकारचा जाहीर निषेध, हेच का अच्छे दिन? अशा स्लोगनद्वारे सरकारवर टीका करण्यात आली. काही भांडवलदारांच्या भल्यासाठी भारनियमन केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

----

राष्ट्रवादीची घोषणाबाजी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरात सध्या सुरू असलेले भारनियमन त्वरित रद्द करण्याची मागणी करीत नाशिकरोड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.

कार्यकारी अभियंता धनंजय आहेर यांना भारनियमन रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, प्रशांत वाघ, अशोक पाटील, राहुल तुपे, स्वप्निल सोनवणे, राजेंद्र पाळदे, गोरक्षनाथ सरोदे, बाळासाहेब जाधव, रेखा नायडू, मिलिंद पगारे, तानाजी लोखंडे, ताहीर शेख, बशीर शेख, प्रकाश साडे, अनिता भामरे, भाऊसाहेब अरिंगळे आदी उपस्थित होते.

निवेदनाचा आशय असा ः एेन दिवाळीच्या तोंडावर कोणतीही पूर्वसूचना न देता अघोषित भारनियमन सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. व्यापार-उद्योगासही फटका बसणार आहे. पाणीपुरवठा शुद्धीकरणाला अडथळा येत असल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. शहरात चार तास, तर ग्रामीण भागात सहा तास भारनियमन होत आहे. ऑक्टोबर हीटने जनता त्रस्त असतानाच भारनियमन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातले तीन राष्ट्रीय महामार्ग कागदावरच

$
0
0

नाशिक ः अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी जिल्ह्यातील तीन राज्य महामार्गांचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक दौऱ्यात तत्त्वत: मान्यता दिली. पण, वर्ष उलटूनही हे महामार्ग कागदावरच असून, त्याचे प्रस्ताव फक्त स्टेट हायवेकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रायलाकडे पाठविण्यात आले आहेत.

स्टेट हायवेने केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावाला जेव्हा मंजुरी मिळेल, तेव्हाच हे महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होतील व नंतर त्यांच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतरच सर्वेक्षण, डीपीआर होणार आहे. स्टेट हायवे असलेल्या या रस्त्यांत एक रस्ता नाशिक-वणी आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास या रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी होईल व भाविकांना जाण्यासाठी सुविधा मिळेल, असा उद्देश होता. हा मार्ग अवघा ४५ किलोमीटरचा आहे. दुसरा मार्ग हा १२५ किलोमीटरचा असून, यात सौंदाणे ते वाजदा हे अंतर आहे. त्यातून गुजरात कनेक्ट वाढावे व मुंबई-आग्रा महामार्गावरील ट्रॅफिक कमी व्हावी, हा हेतू आहे. सौंदाणे-देवळा-कळवण-बोरगाव-सुरगाणा-भरडीपाडा-वाजदा असा हा महामार्ग आहे. यातून आदिवासी भागातील महत्त्वाची गावे राष्ट्रीय महामार्गाला कनेक्ट होणार आहेत. तिसरा मार्ग हा नाशिक-त्र्यंबकेश्वर-अंबोली-हरसूल-आेझरखेड असून, तो १३० किलोमीटरचा आहे. यामुळे गुजरातच्या भाविकांना त्र्यंबकेश्वर येथील कनेक्ट वाढणार अाहे.

खासदार हरिश्चंद चव्हाण यांनी यातील काही मार्गांची मागणी केल्यानंतर गडकरी यांनी या स्टेट हायवेवर राष्ट्रीय महामार्गची घोषणा केली. पण, पुढे त्यातून काहीच घडले नाही.

--

पाठपुरावा होणे गरजेचे

या महामार्गांचे केवळ प्रस्ताव पाठविण्याचे काम झाले व रस्ते रखडले आहेत. हे तीनही रस्ते वर्ग झाले असते, तर त्यातून राष्ट्रीय महामार्गांच्या संख्येत वाढ झाली असती. विशेष म्हणजे या रस्त्यांची लांबीसुद्धा फार नाही. नाशिक जिल्ह्यात वणी, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यात त्र्यंबकेश्वला देशभरातून भाविक येतात, तर वणी येथे येणाऱ्या भाविकांत गुजरातच्या भाविकांची संख्या मोठी आहे. या महामार्गांची घोषणा कागदावरच राहू नये यासाठी त्याचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे.

--

स्टेट हायवे असलेले तीन रस्ते राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली होती. त्यानुसार याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रायलाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे रस्ते वर्ग होतील.

-आर. एस. सोमवंशी, मुख्य अभियंता, स्टेट हायवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पावसाचा कहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन ते तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे टोमॅटो, कांदा, भात, बाजरी, मका, भुईमूग, नागली, द्राक्ष शेतीसह भाजीपाला संकटात सापडला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने जोरदार आक्रमण केल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

गेल्या वर्षी नोटाबंदीपासून सुरू झालेली साडेसाती वर्ष संपत आले तरीही शेतकऱ्यांचा पीछा सोडत नसल्याचे दिसत आहे. नोटाबंदीमुळे अनेक दिवस मार्केट बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यानंतर सतत कुठल्या न कुठल्या कारणाने शेतकरी संकटात सापडत गेले. जूनमध्ये शेतकरी आंदोलनामुळेही शेतमालाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर जीएसटीमुळेही शेतमालाला फटका बसला आहे. त्यानंतर पाकिस्तान बॉर्डर बंद असल्यामुळे टोमॅटो पिकालाही फटका बसला आहे. आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भ‌ीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून दररोज दुपारी दोननंतर पावसाचे वातावरण तयार होत आहे. त्यानंतर लगेचच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होत आहे. यामुळे कापणीला आलेली बाजरी, मकासह भुईमूग, भात, नागली आदी पिकांचे नुकसान होत आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये भाताचे नुकसान

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. वास्तविक पाहता, हा परतीचा पाऊस आहे. भरदुपारी विजांचा कडकडाट होत आहे. भात कापणीला आला आहे. त्यांना हा पाऊस नुकसानीचा आहे. गरी भाते निसवणीच्या अवस्थेत आहेत. त्यांनादेखील हा पाऊस काही प्रमाणावर नुकसानकारकच ठरणार आहे. नागली, वरई, उडीद, भुईमुगासह इतर खरीप पिके आता अंतिम टप्प्यात आली आहेत. पावसाची सरासरी यावर्षी ओलांडून २०० मिमी पाऊस जास्त झाला आहे.

कृषी विभागाकडून मार्गदर्शन नाही

यंदा खरिपाची लागवड कमी झाली असून, बागायती पिकांसह भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. बदलत्या हवामानाचा वाईट परिणाम होत असताना शासन स्तरावरून मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे दर दिवसाला बदलणाऱ्या हवामानापासून पिकांना कसे वाचवावे याबाबत शेतकरी चिंतेत आहेत.

मालेगाव, नांदगाव, सटाणा कोरडाच

यंदाच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झालेल्या नांदगाव, मनमाड, मालेगाव, कळवण आदी तालुक्यांत परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. वास्तविक पाहता या या तालुक्यात परतीच्या पावसाची गरज असताना तिकडे मात्र दिवसभर कडकडीत ऊन असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आठ दिवसांपासून सुरू झालेल्या भारनियमनामुळे आधीच ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. त्यात रोजच पाऊस होत असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार या भीतीने बळीराजा रडकुंडीला आला आहे.

चार जनावरांचा मृत्यू

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाची रिपरिप सुरूच असून, नाशिककरांना हा पाऊस आता नको नकोसा वाटू लागला आहे. सिन्नर तालुक्यात वीज अंगावर पडून एका गायीचा मृत्यू झाला, तर पेठ तालुक्यात दोन बैल आणि एका रेड्याचा मृत्यू झाला. परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने पुन्हा आपला लहरीपणा दाखविण्यास सुरुवात केली आहे. गेले तीन–चार दिवस विश्रांती घेणाऱ्या परतीच्या पावसाने शुक्रवारपासून नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत असताना दुपारनंतर काळ्या मेघांनी शहरावर मांडव धरला. दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरी कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. हा गारवा रात्री उशिरापर्यंत कायम होता. शहरात सकाळी साडेआठपर्यंत दोन मिलिमीटर पाऊस‌ झाला होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांना जेट पॅचर

$
0
0

राज्य व जिल्हा मार्गांसाठी पीडब्लूडीचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्यानंतर हे खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर मशिनचा वापर करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. राज्य व जिल्हा मार्गावर पडलेलेले हे खड्डे बुजवण्यासाठी हे मशिन भाड्याने घेतले जाणार आहे. त्याचा प्रायोगिक वापर पिंपळगाव-निफाड रस्त्यावर करण्यात आला. त्यानंतर हे मशिन भाड्याने घेण्यासाठी टेंडर काढले जाणार आहे.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने सार्वजिक बांधकाम विभागाला ते बुजवण्यासाठी डेडलाइन देण्यात आली आहे. पण, हे रस्ते बुजवण्यासाठी काढलेल्या टेंडरला जीएसटीमुळे शासकीय ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्लॅन बीनुसार हे रस्ते स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी ३० नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली असून, तोपर्यंत सर्व खड्डे या महामार्गावर बुजवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा मार्गावरील रस्ते ३० डिसेंबरपर्यंत बुजवायचे आहेत. या कमी कालावधीत हे काम अत्याधुनिक मशिनच्या मदतीने करून ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जेट पॅचरचा उपयोग केला जाणार आहे. या मशिनच्या सहाय्याने बजुविले जाणारे खड्डे दोन वर्षे उखडत नसल्यामुळे त्याचा उपयोग केला जाणार आहे. खड्डे किती भरले याची नोंद देखील मशिनद्वारे होणार आहे. या मशिनद्वारे केले जाणारे मिक्सिंग खड्डयात घट्ट बसते. सुरुवातीला हाय प्रेशर ब्लोअरच्या सहाय्याने खड्डयातील धूळ साफ केली जाते. यानंतर या खड्डयात डांबराचे कोटिंग केले जाते. नंतर डांबराचा थर हाय प्रेशरने दिला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर स्मारक समस्यांच्या गर्तेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मद्याच्या बाटल्या ,वाढलेले गवत, अस्वच्छता, बंद व तुटलेले पथदीप, लॉन्समध्ये मधोमध जमा असलेला पालापाचोळ्याचे ढिग अशी अवस्था स्वामी नारायण नगरमधील सावरकर स्मारकाची झालेली आहे. शिवाय स्मारकाच्या मागच्या बाजूला प्लास्टिकचे आणि ग्लास मद्याच्या बाटल्यांचा ढिग साचल्यामुळे सावरकर स्मारक मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. त्यामुळे या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक तीन हा भाजप शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. त्यांच्या प्रयत्नाने स्वामीनारायण नगर येथे स्वातंत्र्यवीर वीर विनायक दामोदर सावरकर स्मारक काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. पण या स्मारकाची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने ते समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अनेक दिवसांपासून स्मारक बंदच असल्याची स्थिती आहे. या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरात असलेल्या लॉन्समधील गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images