Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अर्धन्यायिक आदेशांची पडताळणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणातील कामकाज व आदेशांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच न्यायिक प्रक्रिया पारदर्शक व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने निवडक आदेशांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘निर्णय परीक्षण समिती’ गठीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली आहे.

उपविभाग, जिल्हा व विभाग अशा तीन स्तरांवर या समितीची निर्मिती होणार असल्याने आता तालुका ते विभागीय पातळीवरील सर्वच अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांतील आदेशांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे नियमांकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे मानले जात आहे.

राज्य महसूल अधिनियम कलम २५७ च्या तरतुदीनुसार, ‘कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्याने केलेल्या कार्यवाहीच्या नियमानुसारतेबद्दल तसेच स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी अधिकाऱ्याने केलेल्या कोणत्याही चौकशी किंवा कार्यवाहीचे कागदपत्रे मागवून तपासता येण्याची या अंतर्गत तरतूद आहे. तसेच जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम पाचनुसार महसूल विभागातील जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर महसूल अधिकाऱ्यांनी महसूल व इतर अर्ध्य न्यायिक प्रकरणात पारीत केलेल्या निवडक आदेशांचे न्यायिक व गुणवत्ता स्तरावर तपासणीसाठी ‘निवड परीक्षण समिती’ गठीत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त झगडे यांनी जिल्हाधिकऱ्यांना दिले आहेत.

त्याअनुषंगाने तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पारित केलेल्या निवडक आदेशांच्या परीक्षणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती आणि उप जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशांच्या तपासणीसाठी महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त सामान्य प्रशासन रघुनाथ गावडे व सहाय्यक आयुक्त उन्मेष महाजन यांची विभागस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. या समित्यांमुळे अर्धन्यायिक कामकाजात सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच आदेशांचा दर्जाही सुधारेल, असेही झगडे यांनी सांगितले.

अहवाल सादर करा
सदर समितीअंतर्गत कार्यवाही करताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या प्रकरणांची तपासणी करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित करावेत. तसेच संबंधित समित्यांनी तपासणीबाबतचा स्पष्ट अहवाल विभागीय समितीला सादर करण्यासंदर्भात सूचनाही झगडे यांनी दिल्या आहेत.

नागरिकांच्या अर्ध न्यायिक प्रकरणे बरेचदा तालुकास्तरावरील अधिकारी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे पाठवितात. बरेच निर्णय चुकीचेही आढळून आलेले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय परीक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
- महेश झगडे,
विभागीय आयुक्त, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृत्तपत्र विक्रेते ताजनपुरेंचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे सदस्य संजय ताजनपुरे एकलहरे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेते सेवाभावी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ताजनपुरे यांनी परिवर्तन विकास पॅनलतर्फे मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकली आहे. सत्कारावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष अनिल कुलथे, खजिनदार वसंत घोडे, सरचिटणीस गौतम सोनवणे, कार्यकारिणी सदस्य सुनील जाधव, जितेंद्र भोसले, दत्ता निराणे, मनोहर खोले, सतीश आहेर, योगेश भट, इस्माईल पठाण, विजय सोनार, उत्तम गांगुर्डे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघा ५२० टन कचरा संकलित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने शहरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता महाअभियानात ५२० टन कचरा जमा केल्याचा दावा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. परंतु, या मोहिमेच्या प्रारंभ व व समारोपादिवशीच तब्बल ३९९ टन कचरा गोळा केल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून आल्याने मध्यल्या काळात ही मोहीम फसल्याची कबुलीच जणू महापालिकेने दिली आहे.

महापौरांनी मंगळवारी स्वच्छता मोहिमेवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आरोग्य विभागाने दहा दिवस राबविलेल्या मोहिमेतील कचरा संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात दहा दिवसांत ५२० टन कचरा संकलन केल्याचा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीत स्वच्छता मोहीम ही फक्त प्रारंभ व समारोपाच्या दिवशीच यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अन्य आठ दिवसांत आठ ते दहा टन सरासरी कचरा जमा केल्याचा दावा केला गेला आहे. महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत शहरात दररोज सरासरी पाचशे टन कचरा संकलित केला जातो. त्यामुळे या मोहिमेतून महापालिकेच्या हाती फारसे काही हाती लागले नसल्याचे चित्र आहे. परिणामी महापालिकेची कोंडी झाली आहे.

दोन दिवसांत ३९९ टन

शहरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू आणि रोगराईने डोके वर काढल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभाच्या दिवशी ३५२ टन कचरा शहरात गोळा करण्यात आला, तर समारोपाच्या दिवशी ४७ टन कचरा जमा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छतेवरून महापौरांकडून झाडाझडती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेले दहा दिवस राबविण्यात आलेल्या स्वच्छता महाअभियानाचा महापौरांनी मंगळवारी आढावा घेतला असून यात अस्वच्छतेवरून महापौरांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अस्वच्छतेवरुन किती जणांना नोट‌िसा बजावल्या, याबाबत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. दहा दिवस स्वच्छता मोहीम चांगली राबवली असली तरी, शहरात कचरा कायम असल्याचे सांगत, आता प्रभागानुसार स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी औषध फवारणी, घंटागाडीचे नियोजन करण्याचे सांगून, नगरसेवकांच्या तक्रारींचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचला.

शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूसह साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढल्यानंतर पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार शहरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान महापालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले होते. दहा दिवस स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असला तरी, शुभारंभ आणि समारोपाच्या दिवशीच स्वच्छता मोहीम प्रभावी ठरली. अनेक ठिकाणी या मोह‌िमेचा कार्यभाग हा फोटोसेशनपुरताच मर्यादीत राह‌िला. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कायम राहून साथीच्या आजारांसह डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ग्राफ कायम आहे. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी सर्व विभागप्रमुख, विभागीय अधिकारी यांच्यासह आरोग्य व वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

महापौरांनी स्वच्छतेसदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या उपाययोजना व राबविलेल्या मोह‌िमेसंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर सतीश कुलकर्णी यांनी पालिकेडे कर्मचारी कमी असल्याचे सांगत, स्वच्छता कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. दिनकर पाटील सफाई कर्मचाऱ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासह ३१ प्रभागांत अजूनही समान कर्मचारी वाटप केले नसल्याबद्दल जाब विचारला. तसेच उद्योग व व्यापारी संस्थांच्या मदतीने त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी केल्या. महापौर भानसी यांनी अस्वच्छतेवरून आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना जाब विचारत, अस्वच्छता आणि रोगराईप्रकरणी किती जणांना नोट‌िसा बजावल्या याचा जाब विचारला. यावेळी बुकाने यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता, महापौरांनी मात्र तुम्ही काय केले, हे आधी सांगा असे म्हणून कानउघडणी केली. गोदावरी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. निर्माल्यासाठी कलश ठेवले असतानाही, कलशाभोवतीच अस्वच्छता पसरली आहे. असे असताना आरोग्य विभाग काय काम करतो, असा जाब विचारला. शहरात पालापाचोळा उचलला जात नाही, घंटागाडीचे नियोजन नाही, नगरसेवकांच्या तक्रारी आहेत, असे सांगत त्यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले.

सणासुदीत काळजी घ्या!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे तसेच घंटागाडीचे नियोजन करण्याचे आदेश महापौरांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. घरातील साफ-सफाईमुळे जास्तीचा कचरा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकचा कचरा उचलण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिलेत. विद्युत, पाणीपुरवठा व आरोग्यासंदर्भात तक्रारी वाढायला नको, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

पदाधिकाऱ्यांच्या सूचना

-मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे यांचा बंदोबस्त करा.

-अनधिकृत गोठ्यांवर कारवाई व्हावी

- डुकरे पाळणाऱ्यांना नोट‌िसा द्या

- अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा

- उघड्यावरील मांसविक्री बंद करा

- गोदावरीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करा

- घंटागाडीचे नियोजन करा

- गार्डनची स्वच्छता दररोज व्हावी

- रस्त्यावरील गवत, घाण तातडीने हटवा

- डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाडे गोठविणारी मोहीम मितेशने केली फत्ते

$
0
0

नाशिक ः हाडे गोठविणारी थंडी, टप्प्याटप्प्यावर होणारा हिमवर्षाव आणि खोल दऱ्यांमधून जाणारा खडतर रस्ता अशी अत्यंत कठीण हिमालयीन राइड बुलेटवर पूर्ण करण्याचा मान नाशिकच्या मितेश वैश्य याने मिळवला आहे. ‘हिमालयन ओडिसी एक्सप्लोर ऑफ रोड राइड’ असे या खडतर मोहिमेचे नाव आहे. समुद्रसपाटीपासून ४,५८७ मीटर उंचीवर असलेली ही मोहीम भारतातल्या केवळ पाच रायडर्सने पूर्ण केली असून, त्यापैकी एक मितेश आहेत.

ओडीसी एक्सप्लोर ऑफ रोड राइड ही मोहीम दरवर्षी आयोजित करण्यात येते. जास्तीत जास्त रायडर्सना टू व्हीलर्सच्या साहसी मोहिमेची आवड निर्माण व्हावी व हिमालयातील प्रचलित नसलेले मार्ग माहीत व्हावेत हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. या मोहिमेसाठी संपूर्ण भारतातून प्राथमिक फेरीसाठी २० रायडर्सची निवड करण्यात आली. त्यांना अत्यंत कठीण प्रशिक्षण देण्यात आले. हे खडतर प्रशिक्षण केवळ १२ लोकांनी पूर्ण केले. त्यात मितेश अग्रस्थानी होते. शिमला येथून मोहिमेला सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात शिमला ते सांगला हे अंतर पार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वेळी प्रचंड बर्फ व उणे तापमान अशा वातावरणात त्यांनी हे अंतर पार केले. दोन्ही बाजूंना खोल दरी असलेला रस्ता व अनेकदा होणारा हिमवर्षाव यामुळे मार्गही धूसर होता. तरीही दिलेल्या वेळेत अंतर कापणे महत्त्वाचे होते. दुसऱ्या टप्प्यात सांगला ते कागा हे अंतर देण्यात आले होते. दगड, चिखल, कधी बर्फ, तर कधी खोल दरी असा खडतर प्रवासाचा दुसरा टप्पा त्यांनी पार केला. या मार्गात हिंस्र प्राण्यांचा मुक्त वावरही पाहायला मिळाला. तिसऱ्या टप्प्यात कागा ते चंद्रताल अशी मोहीम होती. जगातील सर्वांत उंचीवरच्या खेड्यात त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत कमी असल्याने अन्नपदार्थ शिजवून खाता येत नव्हते. बरोबर असलेल्या ड्रायफ्रूटवर त्यांना दोन दिवस काढावे लागले. केवळ ११४ लोकांची वस्ती असलेल्या खेड्यात उणे २० अंश सेल्सिअस वातावरणात त्यांनी गाडी चालवली. या वेळी गाडीतील ऑइल गोठू नये म्हणून रात्रीच्या वेळीही गाडी सुरूच ठेवावी लागत होती. चंद्रतालपासून किलॉँग, किलॉँग ते पांगी, पांगी ते सचपास, सचपास ते डलहौसी, डलहौसी ते पालमपूर असा ३,५११ किलोमीटरचा प्रवास त्यांनी ११ दिवसांत पूर्ण केला. मोहिमेला सुरुवात करताना १२ लोकांनी सुरुवात केली. मात्र, येणाऱ्या अडथळ्यांना खंबीरपणे तोंड न देऊ शकल्याने सात जणांनी या मोहिमेतून माघार घेतली. ही संपूर्ण मोहीम पाच रायडर्सने पूर्ण केली. त्यात साउथचे व नॉर्थचे प्रत्येकी १, पुण्यातील २ व नाशिकचा मितेश यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अव्वल कारकुनांचे बढतीप्रश्नी ‘लेखणीबंद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरवठा निरीक्षकाचे पद सरळ सेवेने भरले जात असल्याने अव्वल कारकुनांवर अन्याय होत आहे. हे पद सरळ सेवेने न भरता अव्वल कारकुनांना बढती द्यावी, या मागणीसाठी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखनीबंद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १० ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.

पुरवठा निरीक्षक पद हे सरळ सेवेने भरावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. परंतु, हा निर्णय अंमलात आल्यास बढतीकडे आस लावून बसलेल्या महसूल विभागातील अव्वल कारकुनांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मंगळवारी केवळ पुरवठा विभागाने कामकाज बंद ठेवले असले, तरी मागणी मान्य न झाल्यास १० ऑक्टोबरपासून महसूल विभाग कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील २५, तर जिल्हाभरातील १४३ कर्मचारी लेखणीबंद आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू

$
0
0

धुळे : शहरातील देवपुरात बोरसे नगरात राहणारा डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या हेमंत विजय पाटील (वय १७) याला शनिवारी (दि. ३०) अचानक ताप आला. त्यामुळे हेमंतला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीअंती त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र हेमंतची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हेमंत पाटील तालुक्यातील नगाव येथील मूळ रहिवाशी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता हा शिस्तीचाच भाग’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

प्रत्येक माणसाने जीवनात स्वतःच्या कर्तव्यासह सामाजिक निष्ठा व शिस्त जोपासणे गरजेचे अाहे. स्वच्छता हा शिस्तीचाच भाग असून, त्याप्रति प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर लेफ्टनंट जनरल एस. आर. सलारिया यांनी स्वच्छता पंधरवडा अभियानाच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी केले.

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनासह येथील नागरिक व विविध संस्थांनी केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय असून, याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून आपण प्रभावित झालो असल्याचे कमांडर सलारिया यांनी सांगितले. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल, उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, कावेरी कासार, मीना करंजकर, सीईओ विलास पवार, कर्नल विवेक शर्मा, कर्नल आर. एन. सिंग, कर्नल पी. सुब्रमण्यम, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक पोपट खंडिझोड यांनी अभियानादरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक उमेश गोरवाडकर, आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे, राजिंदर ठाकूर, युवराज मगर, हंसानंद निहलानी, सुभाष बोराडे, चंद्रप्रीती मोरे, हेमंत मोजाड, गोवर्धनदास मनवानी, मुख्याध्यापिका नलिनी लोखंडे, माधुरी कुलकर्णी आदींसह सर्व शिक्षक व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी उपस्थित होते. सुवर्णा गिते, विजयालक्ष्मी पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

--

यांनी स्वीकारला सन्मान

आदर्श कार्य करणारे कामगार व शाळा, विविध स्पर्धांमधून यश मिळविणारे विद्यार्थी यांच्यासह प्रथम क्रमांकाचा स्वच्छतेचा पुरस्कार नगरसेविका मीना करंजकर यांनी, द्वितीय पुरस्कार आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे यांनी, तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नगरसेवक सचिन ठाकरे यांच्या वतीने स्वच्छतादूत सतीश कांडेकर यांनी स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या प्रवेशद्वारावर सुखोई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळीजवळील महापालिकेच्या प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठी येथील उपलब्ध जागेचा विकास करून देण्याची तयारी ओझरस्थित हिंदुस्तान एअरोनॉट‌िक्स लिम‌िटेडने (एचएएल) दर्शवली आहे. विल्होळी जंक्शनवर दोन लढाऊ सुखोई विमानाच्या प्रतिकृती बसविण्याची तयारी एचएएलने दर्शवली आहे. सुखोई लढाऊ विमानाच्या प्रतिकृतीसह या ठिकाणी उपलब्ध जागेच्या सुशोभिकरणासाठी लागणारा तीस लाखांचा खर्चही एचएएल करणार आहे. महापालिका आणि एचएएलमधील करार अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मनसेच्या कार्यकाळात शहरातील चौक, रस्ते, प्रवेशद्वार सुशोभिकरणाची कामे सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. परंतु, भाजपची सत्ता येताच या कामांत खंड पडला होता. यापूर्वीच महापालिकेने मुंबई आग्रा रोडवरील आडगाव ट्रक टर्मिनस आणि विल्होळी येथील प्रवेशद्वार सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासंदर्भातील कारवाई सुरू असतानाच विल्होळी प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाचे काम करून देण्याची तयारी एचएएलने दर्शवली आहे. त्यासंदर्भात महापालिका आणि एचएएलमध्ये मह‌िनाभरापासून बोलणी सुरू होती. त्याला आता अंत‌िम स्वरुप आले आहे.

एचएएलकडून विल्होळी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेली पालिकेची अडीच एकर जागा सुशोभित करून दिली जाणार आहे. त्यासाठी लागणारा ३० लाखांचा खर्चही एचएएलकडून उचलला जाणार असून, सीएसआर फंडातून हे काम केले जाणार आहे. प्रवेशद्वार व जागेच्या सुशोभिकरणासोबतच या ठिकाणी एचएएलकडून दोन लढाऊ सुखोई विमानाच्या प्रतिकृती उभ्या केल्या जाणार आहेत. या प्रतिकृतींच्या उभारणीचा व दहा वर्षांच्या देखभालीचा खर्च एचएएल करणार आहे. त्यासंदर्भातील महापालिका व एचएएलमधील करार हा अंतिम टप्प्यात असून, त्याला स्थायी समितीने अगोदरच मान्यता दिली आहे. त्यामुळे विल्होळी प्रवेशद्वाराला आगळे वेगळे रुप येणार आहे.

सीएसआर फंडातून दुभाजक

मनसेच्या काळात सीएसआर फंडातून शहरातील रस्ते, दुभाजक व चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु, भाजपच्या काळात सीएसआर फंडातून चौक, रस्ते व दुभाजकांच्या सुशोभिकरणाचे थंड झालेले काम नव्याने सुरू होणार आहे. सुला, सोमा वायनरिजने गंगापूर रोडवरील काही रस्त्यांचे सुशोभिकरण करून देण्याचे प्रस्ताव पालिकेसमोर ठेवले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद, युनानी डॉक्टरही रस्त्यावर

$
0
0

नवीन विधेयकाविरोधात शुक्रवारी मूक मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुर्वेदासह युनानी डॉक्टर्स प्रचलित कायद्यानुसार त्यांच्या मूळ पॅथीसह अॅलोपॅथीचा पूरक वापर करत देशभरात रुग्णसेवा देत आहेत. मात्र, या दोन्हीही पॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या वापरास निर्बंध घालण्याची तरतूद असलेले नवीन विधेयक नीती आयोगाने केंद्र सरकारकडे सादर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभरासह शहर-जिल्ह्यातील बीएएमएस आणि युनानी डॉक्टर्स शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहेत.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेच्या वतीने या आंदोलनासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला प्रारंभ होईल. शालिमार, एम. जी. रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. संघटनेचे एक शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील बीएएमएस (आयुर्वेद) व युनानी पदवीधर डॉक्टर्स हे त्यांच्या औषधांसोबतच अॅलोपॅथीची औषधे कायद्याने वापरू शकतात. केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद कायदा १९७० व महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ मधील तरतुदींनुसार अॅलोपॅथीची औषधे वापरण्यास कायद्याने परवानगी असली तरीही, विधेयकाच्या माध्यमातून त्यावर बंदी आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्राच्या या भूमिकेकडे लक्ष वेधून घेतानाच शांततेच्या मार्गाने या विधेयकाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय संघर्ष समिती संयोजक डॉ. शैलेश निकम यांनी दिली.

या मोर्चात जिल्ह्यातील सर्व संबंधित अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यार्थी, १०८ अॅम्ब्युलन्सवर कार्यरत वैद्यकीय पथक, राष्ट्रीय बालशिशू सुरक्षा कार्यक्रम, शासकीय व अशासकीय वैद्यकीय अधिकारी, जनरल प्रॅक्टिशनर्स यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निमाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी यांनी केले आहे. हे विधेयक आहे तसेच लागू झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडणार असल्याची भीती राज्य शाखेचे प्रचार व प्रसिद्धीप्रमुख डॉ. अनिल निकम यांनी व्यक्त केली.

या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे राज्य विभागीय सचिव डॉ. आशिष सूर्यवंशी, सेक्रेटरी ललित जाधव, डॉ. देवेंद्र बच्छाव, कोषाध्यक्ष तुषार निकम, संघटक डॉ. व्यंकटेश पाटील, माजी अध्यक्ष डॉ. भूषण वाणी, सहसंघटक राजेंद्र खरात, वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. मनिष हिरे यांनी केले आहे.

आरोग्यव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दर ७०० रुग्णांसाठी एक डॉक्टर असावा असे अभिप्रेत आहे. मात्र भारतात केवळ अॅलोपॅथी डॉक्टरांचे प्रमाण बघता १४०० पेक्षा जास्त रुग्णांसाठी एक डॉक्टर आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथी वापरण्याची परवानगी देऊनही १००० लोकसंख्येला एक असे डॉक्टरांचे प्रमाण आहे. ही संख्या बघता सदर विधेयक लागू झालेच तर ग्रामीण किवा शहरी भागात सेवा देत असलेली संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वानंद’ अधिक नावारुपाला यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकरोड येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था वैद्यकीय, अध्यात्मिक, धार्मिक व वैचारिक कार्यक्रम नियमित राबविणारी नामांकित संस्था आहे. ज्येष्ठांसाठी झटणारी ही संस्था अधिक नावारुपाला यावी, असे सदिच्छा नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी व्यक्त केली.
संस्थेची नववी सर्वसाधारण सभा स्वयंसिद्धा महिला विकास संस्थेच्या सभागृहात नुकतीच झाली. यावेळी ते बोलत होते. संस्थेच्या वतीने सदस्यांचे वाढदिवस, नामवंत, अभ्यासू व्यक्तींची व्याख्याने होतात, हे अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहेत. या संस्थेस सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन मोरुस्कर यांनी दिले. सभेत सचिव अविनाश गोसावी यांनी गेल्या वर्षीच्या इतिवृत्त व वार्षिक अहवालाचे वाचन केले. कोषाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी २०१६ ते २०१७ जमाखर्च व ऑडिट अहवाल, अंदाजपत्रकाचे वाचन केले. अध्यक्ष जे. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते कामताप्रसाद, जी. के. नेभनांनी, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, मृदुलकुमार सोनकर व जी. डी. शिरसाट यांचा सत्कार केला. तसेच ७५ ते ८० वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांना गौरविण्यात आले.
आरती पुरी, ज्योस्त्ना पालकर, विमल एदलाबादकर, मंगला मोहरली, दीपाली भिंगारकर, वैदेही कुलकर्णी, कुंदा पंडित, अनघा जोशी यांनी पसायदानाचे गायन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. एम. भुरे, एस. जी. गाडे, पी. ए. बेंडाळे, दिलीप भिंगारकर, एस. व्ही. देशपांडे, अरुण देशपांडे, अनिल कुलकर्णी, एस. जी. पंडित आदींनी परिश्रम घेतले.

स्मरणिकेचे प्रकाशन
संस्थेतर्फे यंदा प्रथमच ‘स्मरणिका २०१७’चे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिका निर्मितीसाठी दत्ता कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, श्रीकांत मोहरील, दीपाली भिंगारकर यांचे योगदान लाभले. भगवंत मोहरील, मृदुलकुमार सोनकर, जी. के. नेभनांनी यांनी संस्थेस देणग्या दिल्या. वय वर्षे ९५ असलेल्या मोहरील यांचा जे. डी. कुलकर्णी यांनी सत्कार केला. एस. आर. दैठणकर यांनी बहारदार बासरीवादन केले. डी. व्ही. मुळे यांनी सूत्रसंचालन केले. उपसचिव आर. पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या माथी ४० लाखांचा खर्च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) आणि वाहतूक पोलिसांनी नवा वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी ४० लाखांचा खर्च येणार आहे. मात्र, हा खर्च आता महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी या दोन्ही विभागांनी केली असून तसा प्रस्तावच महापालिकेला दिला आहे.

विशेष म्हणजे द्वारका चौकातील वाहतुकीचे विभाजन केले जाणार असून वाहनधारकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी गोल गोल पिंगा घालावा लागणार आहे. उड्डानपुलाच्या त्रुटी दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा खर्च करणाऱ्या ‘न्हाई’ला मात्र ४० लाखांचा खर्च डोईजड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, हा पूलच आता डोकेदुखी ठरला आहे. यातील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. द्वारका चौकातील आराखडा तर वाहतुकीसाठी शाप ठरला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ६५ कोटीपेक्षा अधिकचा निधी मंजूर केला आहे. त्यात द्वारकातील कोंडी फोडण्याचाही समावेश आहे. परंतु, द्वारका चौकातील कोंडी फोडण्याचा खर्च न्हाई आणि शहर वाहतूक शाखेने महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त, आमदार देवयांनी फरांदे आणि ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. यासाठी न्हाई व पोलिसांनी संयुक्त कृती आराखडा तयार केला आहे. यात रस्ते वाहतुकीतील बदलासाठीचा खर्च महापालिकेने करावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता ‘न्हाई’च्या अंतर्गत येत असतांनाही त्याचा खर्च महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महापालिका या खर्चाबाबत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागून आहे.

द्वारका चौकात वाहतुकीचा गोल गोल पिंगा!
न्हाई व पोलिसांनी तयार केलेला आराखडा हा वाहतुकीला गोल-गोल पिंगा घालणारा आहे. नाशिकरोडकडून येणारी वाहने आता द्वारका येथून सरळ सीबीएस आणि धुळ्याकडे जातात. परंतु, नव्या प्रस्तावानुसार ही वाहने वडाळा चौकापर्यंत येऊन तेथून यू-टर्न घेणार आहेत. तर मुंबईकडून नाशिकरोडकडे जाणारी वाहने ही ट्रॅक्टर हाउसकडून यू-टर्न घेत नाशिकरोडकडे जाणार आहेत. सीबीएसकडून नाशिकरोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही टाकळी रोडने वळवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहनांना बाहेर पडण्यासाठी गोल गोल फिरावे लागणार आहे. यातून वाहतूक कोंडी फुटणार की अधिक वाढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या साडेचार हजार जागा रिक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
मुंबई-पुणेच्या धर्तीवर नाशिकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. तब्बल नऊ प्रवेश फेऱ्या राबवूनही अकरावीच्या सर्व शाखा मिळून ४ हजार ५९८ जागा शिल्लक राहिल्या. एकूण २६ हजार ६०० पैकी २२ हजार २ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. ऑनलाइन केंद्रीय प्रवेश पद्धत राबविण्याचा काय उद्देश व तो साध्य झाला का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेसह देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील ५७ कॉलेजेसमध्ये यंदा प्रथमच केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश देण्यात आले. यात विद्यार्थ्यांसह पालकांची फजिती झाली. प्रवेश मिळतो की नाही याची सर्वांनाच धाकधूक होती. मात्र, चार फेऱ्या आटोपल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे दोन विशेष फेऱ्या व त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरही काही प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या. तरीही संपूर्ण प्रवेश पूर्ण होऊ शकले नाही.

प्रक्रिया लांबल्याचा फटका
दहावीचा निकाल जाहीर होताच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया २५ सप्टेंबरपर्यंत लांबली. कित्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या चार फेऱ्यांमध्ये झाले नाही. त्यामुळे पुढे प्रवेश फेऱ्या होण्याची शाश्वती नसल्याने कित्येक विद्यार्थ्यांनी इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांस नाइलाजाने प्रवेश घेतले. परिणामी हजारो जागा रिक्त राहिल्या. ‘कट ऑफ’ही खूपच वर गेल्यानेही विद्यार्थी व पालक धास्तावून गेले होते.

रिक्त जागांमध्ये विज्ञान टॉपवर
रिक्त जागांमध्ये सायन्स शाखेच्या सर्वाधिक २ हजार १७५ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याखालोखाल कॉमर्सच्या १ हजार ५०२ एमसीव्हीसी शाखेच्या ५८६ जागात रिक्त राहिलेल्या आहेत. सर्वांत कमी आर्ट्स शाखेच्या ३२५ इतक्या जागा रिक्त राहिल्या. गेल्या शैक्षणिक वर्षी शहरात अकरावीसाठी ४९ कॉलेजमध्ये २१ हजार ३२० इतक्या जागा होत्या. यंदा कॉलेजेस संख्या व जागांमध्ये वाढ झाली होती.

पसंतीनुसार विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळाले आहेत. परंतु, यंदा आयटीआय व डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे जास्त विद्यार्थ्यांनी ऐनवेळी प्रवेश घेतल्याने इयत्ता अकरावीच्या जागा रिक्त राहिल्या.
- दिलिप गोविंद, सहाय्यक शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पालक, विद्यार्थी व प्राचार्यांना आगाऊ माहिती असायला पाहिजे. नाशिकमध्ये तसे झाले नाही. शिक्षण खात्यातील अधिकारी शिक्षण संस्था, प्राचार्य यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात कमी पडले. पालक व विद्यार्थ्यांना तर ही प्रवेश प्रक्रिया समजलीच नव्हती. सोयीचे कॉलेज न मिळाल्यानेही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश टाळले.
- प्रवीण जोशी,
सचिव, साने गुरुजी शिक्षण मंडळ

शाखानिहाय प्रवेश
- आर्टस्.......४,६६५
- कॉमर्स.......७,४९८,
- सायन्स.......८,८२५
- एमसीव्हीसी.......१,०१४ असे
एकूण २२,००२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मठेपेच्या कैद्याची वकिलांकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाची कारागृहातच कायद्याचे शिक्षण घेतलेल्या वकिलाने अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंदीवानानेच ‘मटा’ला पत्र पाठवून आपली कैफियत मांडली आहे.
श्रीहरी राजलिंगम गुंटुका असे या बंदीवानाचे नाव आहे. खुनाच्या आरोपात मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत श्रीहरीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, मागील सात वर्षांपासून तो नाशिक सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. श्रीहरीवर १९९२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे दोन महिने होते. श्रीहरीला ३ मार्च १९९३ रोजी जामीन मिळाला. त्यानंतर १२ वर्षे जामीनावर असलेल्या श्रीहरीला २००४ मध्ये कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यानंतर त्याची रवानागी नाशिक सेंट्रल जेलमध्ये झाली. येथे श्रीहरीची ओळख हितेश पी. शहा नावाच्या कैद्याशी झाली. शहालाही खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. दोघांची मैत्री झाली. या दरम्यान शहाने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. शहा याने २०११ मध्ये सुटका झाल्यानंतर वकिली सुरू केली. शहा याने जून २०१६ मध्ये सेंट्रल जेलमध्ये पोहचून श्रीहरीची भेट घेतली. अल्पवयीन असताना गुन्हा झाल्याने सदर खटला पुन्हा सुरू करण्यासाठी शहा यांनी श्रीहरीकडून जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला तसेच ५० हजार रुपये मागितले. सुटका झाली नाही तर सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन त्याने दिले. इतक्या वर्षांची ओळख असल्याने श्रीहरीने पत्नीला फोन करून त्वरित ५० हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार पत्नीने शहा यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर शहा याने श्रीहरीची पुन्हा भेट घेतली. हायकोर्टातून तुझा खटला सत्र न्यायालयात आला असून, त्याची बाल न्यायालयासमोर सुनावणी होणार असल्याचे शहाने सांगितले. तसेच, सर्व बाबी मॅनेज करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. सुटका होण्याच्या अपेक्षेने श्रीहरीसह त्याच्या पत्नीने दोन लाख रुपयांची जुळवाजुळवा करीत पैसे शहाच्या स्वाधीन केले. मात्र, शहा याने मुंबईत कोणत्यातरी एका वकिलाला दहा हजार रुपये देऊन केस सुपूर्द केली. यानंतर परत शहा याने संपर्क ठेवला नाही. शहा आपल्या पत्नीचे फोन स्वीकारत नाही. पाठविलेल्या कोणत्याही पत्राला उत्तर दिले नाही, असे आरोप श्रीहरीने केले आहेत. अल्पवयीन असताना झालेल्या चुकीची शिक्षा कुटुंब भोगत असून, पत्नीने कष्टाने कमावलेल्या पैशांवर डल्ला मारण्यात आल्याची खंत श्रीहरीने पत्राद्वारे व्यक्त केली आहे. पैसे परत मिळण्यासाठी शहा याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी श्रीहरीने केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत हितेश शहा यांच्याशी संपर्क केला असता त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सदर प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यावर वेळेनुसार सुनावणी सुरू होईल. तसेच, काही तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून श्रीहरीशी भेट झालेली नसली तरी त्याचे काही नातेवाईक माझ्या संपर्कात असतात.
- हितेश शहा, वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या मोर्चाला नाशिकमधून बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईत एल्फिस्टन-परळ स्टेशनावर दुर्दैवी घटनेच्या निषेधार्त व बुलेट ट्रेनच्या वतीने येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चात नाशिकचेही मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून त्याची रणनिती मंगळवारी मनसेच्या कार्यालयात ठरवण्यात आली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नाशिकचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांनी दिली आहे.
मनसेने येत्या ५ ऑक्टोबर रोजी चर्चगेट येथील रेल्वेच्या ऑफिसवर धडक महामोर्चा ची हाक दिली आहे. नाशिकमधून हजारो मनसैनिक या मोर्चात सामील होणार आहेत. त्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर पदाधिकारी सहकारी, कार्यकर्ते यांची बैठक मनसे मध्यवर्ती कार्यालय येथे मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे गटनेते सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अॅड.रतनकुमार इचम, नगरसेवक योगेश शेवरे, माजी गटनेते अनिल मटाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शहरातून मोर्चासाठी हजारो मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. त्या संबंधात शहर व जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकीत चर्चा झाली. विभाग अध्यक्ष अनंता सूर्यवंशी, अंकुश पवार, प्रकाश कोरडे, खंडेराव मेढे, रामदास दातीर, सचिन भोसले, नितीन साळवे, भैय्या मणियार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील ५५० तलाठी संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महसूल विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या दाखले वितरणात सुसूत्रता आणावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील तलाठ्यांनी मंगळवारपासून (दि. ३) बेमुदत संपाला सुरुवात केली. त्यामध्ये जिल्ह्यातील ५५० तलाठ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर दाखले वितरणाचे काम खोळंबणार आहे.
महसूल विभागाचा गावपातळीवरील प्रत‌िनिधी असलेल्या तलाठ्याला १ ते २१ गाव नुमन्यांतर्गत विविध दाखले वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या २४ दाखल्यांचा समावेश आहे. बहुतांश दाखले तलाठीच देत असल्याने पोलिस, कृषी, शिक्षण विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांमार्फत अथवा मार्गदर्शन नसलेल्या दाखल्यांची मागणी केली जाते. चाळीसगावचे दिवाणी न्यायाधीश तसेच वाशी येथील पोलीस उपनिरीक्षकांनी कोणत्या आधारावर तुम्ही उत्पन्नाचे दाखले देतात, अशी विचारणा करीत कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यामुळेच तलाठी संतापले असून सरकार दाखल्यांबाबत मार्गदर्शन सूचना काढत नाही तोपर्यंत दाखले वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तलाठ्यांमार्फत जिल्ह्यातील सातबारा तसेच इतर कागदपत्रांचे तसेच ई-फेरफारचे कामकाज सुरू आहे. परंतु, त्यातही सर्व्हर डाउनचा अडथळा येत असून त्रस्त झालेल्या तलाठ्यांनी सर्व्हरचा स्पीड न वाढल्यास बुधवारपासून (दि. ११) सातबारा संगणीकरणाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात दररोज वितरित होणाऱ्या आठ हजार दाखल्यांचे काम थंडावणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एन. वाय. उगले, कार्याध्यक्ष एम. एल. पवार व सरचिटणीस बी. व्ही. खेडकर यांनी दिली.

दाखले वितरण ठप्प
जिल्हाभरातील ५५० तलाठी असून या संपात सहभागी झाले आहेत. एक तलाठी प्रतिदिन सरासरी १५ दाखले वितरित करतो. परंतु, हे काम आ‌ता ठप्प झाले आहे. सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास या संपाचा फटका सर्वसामान्य
नागरिकांना बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयचा निकाल लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सातपूर आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या उशिराने जाहीर झालेल्या निकालात ७०० विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलला शून्य गुण देण्यात आले होते. ही तांत्रिक चूक असण्याची शक्यता होती. यामुळे हा सुधारित निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर केला गेला नाही. सुधारित निकाल आता गुरुवारी (दि. ५) जाहीर होणार आहे. यात नापास होण्याची टांगती तलवार दूर होणार का? याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.
एप्रिल २०१७ मध्ये आयटीआयच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल १५ दिवसांपूर्वी लागला होता. मात्र, पाच महिने उशिरा लागलेल्या या निकालात २२०० पैकी ७०० विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये शून्य गुण देण्यात आले. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी सुधारित निकाल देण्याची मागणी केली. सॉफ्टवेअर संदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे ही चूक झाल्याची शक्यता आयटीआयकडून व्यक्त करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे आयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी ऑगस्ट २०१६ मध्ये वार्षिक परीक्षा नियोजित होती. ती परीक्षा स्वरूपातील बदलांमुळे तब्बल ७ महिने उशिरा म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आली. यानंतर परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत लावणे बंधनकारक असताना तब्बल पाच महिने उशिरा म्हणजे सप्टेंबर २०१७ मध्ये हा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात ड्राफ्ट्समन अॅण्ड मेकॅनिकल या ट्रेंडचेच सर्वाधिक विद्यार्थी भरडले गेले. काही विद्यार्थ्यांनी थिअरीचे पेपर व्यवस्थित देऊनसुद्धा त्यांना चक्क गैरहजर दाखविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरा गावांसाठी शनिवारी मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३८९ उमेदवार तर सरपंचपदासाठी एकूण ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज माघारीनंतर १४ ग्रामपंचायतीत ५७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ७ ऑक्टोबरला मतदान होणार असून, ९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

तालुक्यात २० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी निमगाव वाकडा, थेटाळे, मांजरगाव या तीन ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी व सरपंच पदासाठीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे उर्वरित १७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तालुक्यातील १७ गावांतील निवडणुकीसाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी (दि.४) दुसरा प्रशिक्षण वर्ग निफाड येथील वैनतेय विद्यालयात होणार आहे. ७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत महेश पाटील काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी भंगार बाजार उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजारावर पुन्हा हातोडा चालवण्याची कारवाई सुरू असतानाच महापालिकेने बुधवारी मुंबई नाक्यावरील अनधिकृत मिनी भंगार बाजार उद्ध्वस्त केला. मुंबई नाका ते सारडा सर्कलमध्ये रस्त्यावरच सुरू असलेल्या गाड्यांच्या भंगार बाजारावर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली असून, येथून दहा वाहनांसह भंगाराचे साहित्य जप्त केले. याबरोबरच मुंबई नाक्यावर फुल विक्रेत्यांवरही अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, या ठिकाणी एका ‘झेरॉक्स’ नगरसेवकाने या कारवाईला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

भंगार बाजार हा शहराच्या बाहेर असणे आवश्यक असतांनाही,अंबड लिंक रोडसह मुंबई नाक्यावर सारडा सर्कल रस्त्यावर मिनी भंगार बाजार अनेक वर्षापासून सुरू होती. महापालिकेला अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटवणे अवघड होऊन बसले आहे. हा बाजार हटवल्यानंतर शहरात ठिकठिकाणी मिनी भंगार बाजार उदयास येण्यास सुरुवात झाली होती. मुंबईनाका परिसरात सारडा सर्कल रस्त्यावर असलेल्या भंगार बाजाराने हळू हळू मोठे रुप घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी या भंगार बाजारावर बुलडोझर फिरवला. पालिकेने या ठिकाणी असलेली नादुरस्त व स्क्रॅप अशी दहा वाहने, २६ टायर रिंग, १५ टायर व भंगार साहित्य जप्त केले. पालिकेची सहा अतिक्रमण पथके, सहा ट्रक, चार ट्रॅक्टर, दोन जेसीबी मश‌िनच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईला दुकानदारांनी विरोध केला. परंतु, पोलिसांच्या मदतीने हा विरोध मोडून काढत पालिकेने हा भंगार बाजार उद्ध्वस्त केला. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.

कारवाईबद्दल शंका?

भंगार बाजार हटविण्याच्या कारवाईबद्दल स्थानिकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेची भाजपशी संबंधित काही नेत्यांनी खरेदी केल्याची चर्चा आहे. परंतु, या कामात या भंगार बाजाराचा अडथळा ठरत होता. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपल्याकडील अनधिकृत बांधकामांच्या मोठ्या यादीकडे डोळेझाक करत, हा बाजार हटविण्याला प्राधान्य दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईने या ठिकाणच्या जागेला भाव येणार असल्याची चर्चा असून, त्यामुळेच कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

फुलविक्रेत्यांना विरोध

मुंबईनाका चौफुलीवर उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रणावर फुलविक्रेत्यांचा डेरा असतो. याच ठिकाणी फुलमाळा तयार करून विकण्याचे काम लहान मुले व मह‌िला करतात. ही मुले भीकही मागतात. या विक्रेत्यांवरही पालिकेच्या पथकाने कारवाई केली. परंतु, एका झेरॉक्स नगरसेवकाने या कारवाईला विरोध केला. त्यावर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने संबंधित नगरसेविकेच्या पतीला समजावत कारवाई पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीभत्स पार्टी उधळली

$
0
0

इगतपुरीत रिसॉर्टमधून सात तरुणींसह चौदा जण ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅचलर पार्टीमुळे प्रकाशझोतात आलेला इगतपुरी तालुका आता आणखी एका पार्टीने चर्चेत आला आहे. मंगळवारी (दि. 3) रात्री बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये धांगडधिंगा करणाऱ्या सात जणांसह सात तरुणींना इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पार्टीचा मुख्य सूत्रधार फरार झाला असून, पोलिसांनी दोन वाहने व डीजेचे साहित्यही जप्त केले आहे.

इगतपुरी शहराजवळील मिस्टिक व्हॅली येथे सहा महिन्यांपूर्वीच बॅचलर पार्टीत बारबालांसह तरुणांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर मंगळवारच्या बीभत्स पार्टीमुळे इगतपुरीत तालुका पुन्हा चर्चेत आला आहे. रेन फॉरेस्ट हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास काही युवक, युवती अश्लील हावभाव व डान्स करीत असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या पथकाने तेथे छापा मारला. ‌त्यावेळी एका बंदिस्त खोलीमध्ये पाच युवक आणि सात युवती डीजेच्या तालावर अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी प्रशांत काशिनाथ सोंडकर (वय २७, रा. दिडहार, ता. भोर, पुणे) विश्वास विठ्ठल सोंडकर (वय ४५, रा. मांगलेवाडी, कात्रज, पुणे) गंगाधर भाऊसाहेब शिंदे (वय ४२, रा. मानोली ता. संगमनेर, नगर), अनंत हरिहर भाकरे (वय ५१, लिबर्टी हाईटस, कॉलेजरोड, नाशिक) संजय वसंत सोनवणे (वय ३८, रा. पाथर्डी फाटा), प्रथमेश संजय सोनवणे (वय २०), रामकृष्ण एकनाथ सांगळे (वय २० रा. मोरवाडीगाव) नाशिक यांच्यासह सात युवतींना ताब्यात घेतले. जी.एम बायोसाइड्स प्रा.लि. कंपनीचे संचालक उमेश जिभाऊ शेवाळे पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पार्टीसाठी वापरण्यात येणारी साउंड सिस्टिम, एक पिकअप वाहन (क्रमांक एमएच १५, डीके ७७३६), मुलींची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी विनानंबरची नवीकोरी टाटा झेष्ट कार ताब्यात घेतली आहे. हवालदार शिवाजी सखाराम लोहरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सिन डान्स इन हॉटेल्स अॅण्ड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वूमन अॅक्ट, तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या कायद्यान्वये संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक संजय दराडे, उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय शुक्ला, सहायक निरीक्षक महेश मांडवे, महिला सहायक निरीक्षक आर. आर. पांढरे यांच्यासह विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, हेमंत मोरे, मारुती बोराडे आदींन‌ी ही कारवाई केली.

डान्स करणाऱ्या मुली अल्पवयीन

पुणे येथील कीटकनाशके निर्मित करणाऱ्या एका कंपनीच्या डीलर्ससाठी या अलिशान हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीच्या पाच संचालकांनी ही पार्टी ठेवली होती. त्यासाठी नाशिक तसेच मुंबई येथून सात मुली आणण्यात आल्या होत्या. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्या मद्यपान केलेल्या अवस्थेत डान्स करीत असल्याचे आढळून आले.

रेव्ह पार्टीजमध्ये ड्रग्ज व तत्सम अंमली पदार्थांचा प्राधान्याने वापर होतो. परंतु, या पार्टीत असे काही आढळून आले नाही. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे धंदे आढळून आल्यास नागरिकांनी व्हॉट्सअॅपच्या ९१६८५५११०० किंवा ०२५३ - २३०९७१५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images