Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘वाहन’ प्रणाली कार्यान्वित

$
0
0
‌प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अद्ययावत ‘वाहन’ प्रणाली बुधवारपासून कार्या‌न्वित झाली. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून खोळंबलेल्या कमर्शियल वाहनांशी संबंधित कामांना गती आली आहे.

गाठला ११-१२-१३ चा मुहूर्त

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवायचा की नाही यावरू रंगलेल्या चर्चेनंतर अखेर तेथे सीसीटीव्ही बसविण्यात आले. मात्र, ते सुरू कधी होणार यावरही चर्चा रंगू लागली.

प्राध्यापकांना हवाय हक्काचा अॅरिअर्स

$
0
0
सहाव्या वेतन आयोगाच्या अॅरिअर्ससह आंदोलन काळातील पगार आण‌ि व‌िव‌िध समस्यांना तोंड देताना प्राध्यापकांच्या नाकी नऊ आले आहेत. उच्च श‌िक्षणाचा डोलारा सांभाळणाऱ्या प्राध्यापकांच्या मागण्यांच्या वाट्याला केवळ आश्वासनांची खैरातच येत आहे.

पुस्तक वाचा अन् पैसे मिळवा

$
0
0
आपल्याला हवे ते आवडीचे पुस्तक खरेदी करा, पुस्तक वाचून होईपर्यंत आपल्याकडेच ठेवा व वाचून झाल्यानंतर ते सार्वजनिक वाचनालयाकडे खरेदीच्या पावतीसह जमा करा आणि वाचनालयाकडून पुस्तकाचे पैसे घेऊन जा.

‘त्याची’ लग्नपत्रिकाही फिल्मीच

$
0
0
लग्नपत्रिका म्हटल्यावर 'आमचे येथे श्री कृपेने...' सुरू होणारा व आमच्या... च्या लग्नाला यायचं हं'ने संपणारा मजकूर अपेक्षित असतो. मात्र चित्रपट दिग्दर्शक असलेल्या नाशिककर नितीन गायकवाड या तरूणाने चित्रपटाच्या स्टाईलने छापलेली स्वत:ची लग्नपत्रिका चर्चेची ठरते आहे.

भरतीवर प्रतिज्ञापत्राचा उतारा

$
0
0
महसूल विभागात यापुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह परीक्षार्थींचे प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेत लवकरच भरती ?

$
0
0
महापालिका प्रशासनाला तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे. सध्या रोस्टर तपासण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रियेचा विचार होऊ शकतो असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये तापमानाचा निच्चांक

$
0
0
राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद बुधवारी अहमदनगरमध्ये झाली असली तरी त्याखालोखाल तापमान नाशिकचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच, या वर्षातील सर्वात कमी तापमानाची म्हणजेच ७.९ अंश सेल्सिअस एवढी नोंद नाशकात झाली आहे.

मधुमक्षिका पालनासाठी क्लस्टर योजना

$
0
0
पूर्वी कोठेही पाहिले की मधमाश्यांचे पोळे दिसायचे, मात्र आता पर्यावरणाचा ढासळता आलेख यातून मधाचे उत्पादन घटत चालले आहे. औषधी गुणधर्म असलेल्या मधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मधुमक्षिकापालन हा पर्याय पुढे आला आहे.

औद्योगिक भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी आग्रही

$
0
0
केंद्र सरकारने केलेला नवा भूसंपादन कायदा येत्या जानेवारीपासून लागू होण्याची चिन्हे असल्याने जिल्ह्यातील औद्योगिक भूसंपादनासाठी आग्रही असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दिंडोरी तालुक्यातील जवळपास एक हजार हेक्टर जागेच्या संपादनाबाबत गुरुवारी बैठक होणार आहे.

अन् त्यांचा जीव पडला भांड्यात

$
0
0
डोक्याचे केस खांद्याच्याही खालपर्यंत वाढलेले. कानांमध्ये बाळी. आडदांड देहयष्टीची माणसे मोटारीतून खाली उतरली. यश मैदानावर खेळत होता. त्याला चॉकलेटचे आमीष दाखवून बोलावले.

भाजपची फसलेली ‘युनिटी’

$
0
0
गुजरातमध्ये साकारण्यात येणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या माध्यमातून राजकीय प्रतिष्ठा मिळविण्यासाठी भाजपकडून जोरदार कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून १५ डिसेंबरला देशभरात ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या या उपक्रमासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

विभागप्रमुखांचा पत्ता कट

$
0
0
महसूल विभागातील प्रमुख ४० अधिकाऱ्यांना टॅब देण्याच्या संकल्पनेतून विभागप्रमुखांची गच्छंती करण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांनाच टॅबचा लाभ मिळणार आहे.

एलईडीचा फैसला कोर्टाच्या निकालानंतर

$
0
0
वादात सापडलेल्या एलईडी फिटिंग्जचा तिढा कोर्टाच्या निकालानंतरच सुटण्याची चिन्हे आहेत. एलईडीवर सध्या स्थगिती नसली तरी पुढील कार्यवाही थांबवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.

५५ विद्यार्थ्यांना विषबाधा

$
0
0
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीजवळ असलेल्या पिंपरीहवेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५५ विद्यार्थ्यांना बुधवारी अचानक दुपारी अकराच्या सुमारास मळमळ, डोळ्यांची आग व उलट्या होऊ लागल्या. त्यांना त्वरित न्यायडोंगरी आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

'आप'तर्फे नाशकात टार्गेट मनसे

$
0
0
दिल्लीतील यशानंतर स्फुरण चढलेल्या आम आदमी पार्टीतर्फे (आप) मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. नाशिकमध्ये लढताना मनसेला टार्गेट करण्यात येणार असून यात मनसेच्या आमदारांसह नगरसेवकांच्या कारभाराचा लेखाजोखा 'आप'तर्फे मांडण्यात येणार आहे.

आडगावच्या उड्डाणपुलाला जर्नादन स्वामींचे नाव द्या

$
0
0
आडगाव फाटा चौफुली ते दत्तमंदिर दरम्यान साकारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला 'जगदगुरू श्री संत जनार्दन स्वामी महाराज' नाव देण्याची मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी ‘छावा’चे रेलरोको

$
0
0
हिवाळी अधिवेशनात राणे समितीने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा या मागणीसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर छावा मराठा संघटनेतर्फे गुरुवारी रेलरोको करण्यात आले. यावेळी भुसावळकडे जाणारी पॅसेंजर अडवण्यात आली होती.

नॅबच्या व‌िद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर

$
0
0
नाश‌िक - सातपूर येथील नॅब युन‌िट महाराष्ट्र संचल‌ित महानॅब स्कूल फॉर द ब्लाईंड संस्थेतील अंध व‌िद्यार्थिनींनी मदुराई येथे पार पडलेल्या डान्स कॉम्प‌िटीशनमध्ये पहिल्या क्रमांक पटकाविला. ‘ऑल इंड‌िया डान्स कॉम्प‌िटीशन फॉर द‌ि ब्लाईंड’ या स्पर्धेमध्ये बेंगलोर, स‌िकंदराबाद, गुजतरात, पश्च‌िम बंगाल, हैदराबाद, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओड‌िसा व महाराष्ट्रातील शाळांमधून व‌िद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महानॅबच्या व‌िद्यार्थिनींच्या सादरीकरणातील नृत्यासाठी पर्यावरण हा व‌िषय न‌िवडण्यात आला होता. या नृत्यासाठी या मुलींना राष्ट्रीय स्तरावरील पह‌िले बक्ष‌ीस म‌िळाले.

धरणग्रस्तांच्या प्रश्नावर मार्मिक भाष्य

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आयोजित नाट्यस्पर्धेत कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार विषयांचे यशस्वी सादरीकरण सुरू आहे. ‘डॉक्टर तुम्हीसुध्दा’ आणि ‘व्याकरण’ या नाटकांमधून आयुष्याला भोवणारी गंभीर चूक आणि धरणग्रस्तांचा ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे करून रसिकांना अंर्तमुख करण्यात आले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images