Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

१७ शिक्षकांना ‘आई सन्मान पुरस्कार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आई प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारे ‘आई सन्मान पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे व सचिव गिरीष सूर्यवंशी यांनी जाहीर केले. जिल्ह्यातून एकूण १७ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील उपक्रमशील व शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक योगदान देणाऱ्या संस्कारशील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांचा यंदापासून आई प्रतिष्ठान गौरव करणार आहे. यात मालेगावातील दोन शिक्षकांचा समावेश असून, अन्य तालुक्यातील एक उपक्रमशील शिक्षकाची यासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारार्थिंना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्यामची आई पुस्तक या स्वरुपात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत गौरवारार्थिंना गौरविण्यात येईल, असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष निवृत्ती सावंत, कोषाध्यक्ष प्रवीण शिंदे, छाया पाटील, वैशाली भामरे, सीमा कासार यांनी सांगितले.

यांच्या होणार सन्मान

निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये शेखर ठाकुर (मालेगाव), सुरेश सलादे (दिंडोरी), रामदास शिंदे (पेठ), जगन्नाथ बिरारी (इगतपुरी), वैशाली भामरे (येवला), पंकज जाधव (देवळा), शिवाजी शिंदे (चांदवड), चारुलता धोंडगे (नांदगाव), गजानन उदार (निफाड), विवेक

घोलप (नाशिक), भास्कर भामरे (कळवण), प्रशांत बैरागी (सटाणा), प्रा. लता पवार (नाशिक), सोनाली पाटील (सुरगाणा), सुनील आहेर, सुहास शेवाळे व कुमुद पाटील (मालेगाव) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतीत विद्युत व्यवस्थापक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०३० पर्यंत नाशिकला विजेची कमतरता पडू नये यासाठी आराखडा करा. जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचातीमध्ये विद्युत व्यवस्थापकाची महिनभरात नेमणूक करा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छामणी लॉन्स येथे घेतलेल्या जनता दरबारात दिले. तसेच ग्राहकांचा मेळावा ३० तारखेला झालाच पाहिजे व जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी सौरउर्जेवर करा अशा सूचनाही केली.

इच्छामणी मंगल कार्यालयात आयोजित १० वीज उपकेंद्राचे लोकार्पण व सात वीज उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, जयंतराव जाधव, अपूर्व हिरे, सीमा हिरे, उपमहापौर एस. जी. गीते, सभापती शिवाजी गांगुर्डे, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे संचालकसतीश करपे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता सुनील पावडे उपस्थित होते.

ग्राहक संवाद वाढविण्याच्या सूचना

शासनाने दिलेल्या निधीतून सुरू असलेली कामे तपासणे व जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण येथे आलो आहोत. प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या व जाहीर केलेल्या तारखेला शाखा अभियंत्यांनी ग्राहक मेळावा घेऊन ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात. ग्राहकांचे मोबाइल क्रमांक शंभर टक्के नोंदवून त्यांच्याशी संवाद वाढवा, अशा सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या.

वीज अपघातातून मुक्तता

नाशिक शहरातील अपघाताचा धोका ओळखून हे टाळण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. त्यामुळे शहर वीज अपघातातून मुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शाश्वत व दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून राज्यातील ४० लाख शेतकरी सौर ऊर्जेशी जोडण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४०० ते ५०० शेतकऱ्यांचा त्यात समावेश असणार आहे.

यंत्रणा सक्षमीकरणावर भर

ग्रामविद्युत व्यवस्थापकामुळे ग्रामीण भागातील लाइनमनची अडचण दूर होणार आहे. विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीतून शाखा अभियंत्यांचे काम सोपे होणार असून, शाखा अभियंत्यांनी त्यांच्या नियुक्तीसाठी जबाबदारीने काम करावे. नाशिक जिल्ह्यातील विजेची ५५० कोटींची कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहेत. आगामी काळात २०३० पर्यंत नाशिकची विजेची गरज लक्षात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी शासन आराखडा बनवत आहे. भविष्यात जवळपास ४० हजार मेगाव्हॅट विजेचे पारेषण राज्यात करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा सक्षम व अद्ययावत करण्यात येत आहे.

सहकार्याचे आवाहन

ग्राहकांनी वीज कंपनीच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे. जादूच्या कांडीप्रमाणे कामे होत नाही. तर काही चांगल्या कामांसाठी दीर्घ काळही लागतो. प्रत्येक अभियंत्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार असून, ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही याची आमची भूमिका आहे. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोकार्पण व भूमिपूजन

जिल्ह्यातील वडझिरे, इगतपुरी, करंजाळी, उंबरठाण, कोऱ्हाटे, जानोरी, जळगाव निघोज, कुपखेडा, मालदे आणि साकोरा याठिकाणच्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण तर डहाळेवाडी, वडनेर वीराने, सावरगाव यासह विजयनगर, शरदवाडी रोड (ता. सिन्नर), सायने टेक्सटाईल पार्क आणि सायने म्हाडा (ता. मालेगाव) येथील ३३/११ उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

५५० कोटींची कामे

नाशिक शहर व जिल्ह्यातील वीज समस्या सोडविणे व नवीन यंत्रणा बसविणे आदी कामांसाठी शासनाने ५५० कोटी रुपये दिले आहेत. जनतेसह उद्योगांनाही वीज कमी पडणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महावितरण देशातील सर्वाधिक वीज वितरण करणारी कंपनी ठरली आहे. गेल्या ३० मार्चला २४ हजार ४०० मेगावॅट विजेचे यशस्वी पारेषण व वितरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले असून नवीन वीज वितरणातील नवीन विक्रम घडला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीकडूनच पत्नीची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
त्र्यंबकरोडवरील विद्यामंदिर परिसरात संशयास्पद अवस्थेत आढळलेला महिलेचा मृतदेह ही खूनाचीच घटना असल्याच्या निष्कर्षापर्यंत सातपूर पोलिस पोहोचले आहे. या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा खून केल्याची माहिती अटक आरोपीने दिली असून कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चारीत एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता.
सरस्वती शहेंद्रकुमार गुप्ता (२७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ती पतीसह मुंबईत वास्तव्यास होती. काही महिन्यांपूर्वी पती शहेंद्रकुमार गोविंद गुप्ता (३२) याचा भाऊ शेखर हादेखील मुंबईला राहण्यासाठी आला होता. शेखर व सरस्वती यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यावरून शहेंद्रकुमारचे सरस्वतीशी वाद होत. त्याने शेखरला नाशिकमधील अंबड लिंकरोडवरील केवल पार्क येथे वास्तव्यास असलेल्या मावस भावाकडे कामाला पाठविले. परंतु, शेखर सरस्वतीला भेटण्यासाठी मुंबईला वारंवार येत असे. यावरून सरस्वती व शहेंद्रकुमार यांच्यात जोरदार भांडण झाले. शेखरची समजूत काढण्यासाठी शहेंद्रकुमार पाच सप्टेंबरला नाशिकला आला होता. यावेळी त्यांचा आपापसात वाद झाला. शेखरने सरस्वतीला शहेंद्रकुमार भांडण करत असल्याचे सांगत नाशिकला बोलावून घेतले. पुन्हा जोरदार वाद झाला. यानंतर ७ सप्टेंबर रोजी शेखर आणि मावस भाऊ दुसरीकडे निघून गेले. रात्री झोपेत असताना शहेंद्रकुमारने सरस्वतीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर तिला हातगाडीवर टाकून तो भर पावसात मध्यरात्री विद्यामंदिर परिसरात आला. बांधकाम विभागाच्या चारीत सरस्वतीचा मृतदेह फेकून त्याने पोबारा केला. गुप्ता दाम्पत्याला चार अपत्य आहेत. एक मुलगी व तीन मुले असून ती उघड्यावर पडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये अंधाराचे राज्य!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
मुसळधार पाऊस झाल्यावर वीजपुरवठा खंडित होणे फारसे विशेष मानले जात नाही. मात्र, पाऊस नसताना दररोज सायंकाळी पाच ते आठ दरम्यान वीज महावितरण कंपनीकडून केल्या जाणाऱ्या अतिरिक्त भारनियमनाने निफाड शहर अंधारात आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत असून व्याव‌सायिकांना मोठा फटका बसत आहे.
येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा, दिवाळी असे सण येऊ घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी पाच ते आठ असे तब्बल सहा तास व दिवसभरात चार ते पाच वेळा सरासरी १५ मिनिटे ते अर्धा तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शाळा, क्लास सायंकाळी सुटतात. त्यामुळे मुले अंधारात घरी कसे येणार याची पालकांना चिंता लागते. नियमित भाजीबाजारातील खरेदी, दुकानांमध्ये खरेदीसाठी बाहेर पडायला शहरातील नागरिकांनी सध्या बंद केले आहे. याचा परिणाम निफडमधील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर होत आहे. पीठ गिरणी, इलेक्ट्रॉनिक दुकाने आदी ठिकाणी वीज नसल्याने सायंकाळी ग्राहक येत नाहीत. शिवाय इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या प्रश्नी बोलण्यास किंवा निवेदन वा आंदोलनाचा इशारा देण्याचे धाडस अद्याप कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, यांनी का दाखविले नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कोळश्याची उपलब्धता कमी
वीजनिर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या काररानुसार महावितरण महानिर्मिती कंपनीकडून सुमारे सात हजार मेगावॅट आणि अदानी पॉवर कंपनीकडून तीन हजार ८५ मेगावॅट वीज मिळणे अपेक्षित आहे. कोळशाची उपलब्धता आणि पुरवठ्यात येणाऱ्या अडचणीमुळे महानिर्मितीकडून सुमारे साडेचार हजार तर अदानीकडून सतराशे ते दोन हजार मेगावॅट इतकीच वीज मिळत असल्याची माहिती महावितरणचे निफाड येथील उपअभियंता बी. ए. सुरवसे यांनी दिली आहे. त्यामुळे वीजतुटवडा निर्माण झाला आहे. लघु निविदेतून खुल्या बाजारातून ३९५ मेगावॅट वीजखरेदी केली आहे. शिवाय पॉवर एक्स्चेंजची वीज खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. ती वीज दोन-तीन दिवसात उपलब्ध झाल्यानंतर पुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत ईएफजी या गटातील वाहिन्यांवर आपात्कालीन व तात्पुरते भारनियमन केले जात आहे. ग्राहकांनी काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही सुरवसे यांनी केले आहे.

निफाडमध्ये लोक सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात; मात्र सध्या वीज नसल्याने लोकांना घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे शहरातील उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण तोंडावर असताना असे अतिरिक्त भारनियमन करू नये.
- नंदलाल चोरडिया, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांचा’ आवाज वाढलाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वाढलेला आवाज २८ गणेश मंडळांना महाग पडला आहे. मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी कक्षेत ८० डेसिबलपेक्षा अधिक डीजे आवाज करणाऱ्या गणेश मंडळांसह डीजे मालकांना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रक्रियेनुसार मंडळ अध्यक्ष व डीजे मालकांचे म्हणणे ६० दिवसाच्या आत ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांच्या आदेशान्वये डीजेचा आवाज मोजण्यासाठी आवाज मोजमाप यंत्रे पोलिस ठाण्याला देण्यात आली होती. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजेचे आवाज मोजण्यात आले. त्यात मनमाड विभागात २८ मंडळांच्या डीजेचा आवाज १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. यात येवला शहरातील १०, येवला तालुक्यातील पाच, मनमाड परिसरातील पाच, चांदवडमधील चार आणि वडनेर भैरव येथील चार अशा एकूण १८ गणेशमंडळांचा समावेश आहे

जिल्ह्यातील मोठी कारवाई
सदर मंडळाचे अध्यक्ष व संबंधित डीजे मालक अशा ५६ जणांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. डीजेचा आवाज जास्त असलेल्या मंडळांना पुरस्कार योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच डीजेसंदर्भात ही जिल्ह्यातील मोठी कारवाई मनमाड विभागात झाल्याचेही डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

अशी आहेत मंडळे
पोलिस स्टेशन.......गणेश मंडळे
येवला शहर.......१०
येवला तालुका........५
मनमाड........५
चांदवड........ ४
वडनेर भैरव........ ४
एकूण ........ १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हसरूळ, उपनगरला तरुणांची आत्महत्या

$
0
0

नाशिक : शहरातील म्हसरूळ आणि उपनगर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत तरुणीसह दोन जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
म्हसरूळमधील किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात एका तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नागेश केदारनाथ पगारे (२४, रा. शिवतीर्थ सोसायटी) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
उपनगरजवळील गंधर्व नगरी परिसरातील एका तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शिवानी सोमनाथ चव्हाण (१८) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी मृत्युची नोंद केली आहे. मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तिने विषारी औषध सेवन केले. उपचारापूर्वी तिचे मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखाची चोरी

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
तरुणाला बोलण्यात गुंतवित तिघांनी दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे दीड लाखाची रोकड लांबविली. पुणे महामार्गावरील तरण तलाव परिसराजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
जिजामातानगर परिसरातील उदय मनसुख भगत (१७, रा. महाभक्ती अपा.) याने फिर्याद दिली आहे. उदय मंगळवारी (दि. १२) सकाळी पैसे काढण्यासाठी बँकेत गेला होता. दीड लाखाची रोकड काढून तो घराकडे परतत असताना हा प्रकार घडला. तरण तलावासमोरील साई पूजा स्विट दुकानासमोर अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ सिजी ११७८) उभी करून तो समोसे घेण्यासाठी गेला. त्यावेळी तिघा तरुणांनी त्याला गाठले. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील रोकड हातोहात लांबविली.

रेणुकानगरला घरफोडी
नानेगाव रोडवरील रेणुकानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुह्याची नोंद केली आहे.
निवृत्ती केदू बत्ताशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, रेणुकानगर) यांनी फिर्याद दिली आहे. बत्ताशे कुटुंबीय ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, नथ, गोफ असा सुमारे ६१ हजाराचा ऐवज चोरून नेला.

सव्वादोन लाख लंपास
नाशिक : शरणपूररोडवरील टिळकवाडीत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यानी रोकडसह सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. बिपीन रमेश बुझरूक (रा. जयंत सोसायटी, प्राईड हॉटेल शेजारी टिळकवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बुझरूक कुटुंबीय मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले होते. चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी गेटचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख ३५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत पोलिसाला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
हेल्मेट विरोधी कारवाई करून दंड आकारल्याने तीन तरुणांनी एका पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. सिडकोतील महापालिका हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी या युवकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
सचिन शिवाजी चंद्रमोरे आणि सुनील पोपट भरीत अशी अटक केलेल्या संशय‌ितांची नावे आहेत. त्यांच्यासोबत अन्य एक आरोपी आहे. अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी अनिरुध्द येवले यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास अंबड पोलिस नाकाबंदी करीत होते. त्यावेळी सिडकोतील महापालिका हॉस्पिटलसमोर दुचाकी (एमएच ४१ के ८१६६) पोलिसांनी अडविली. त्यावरील दुचाकीचालक विनाहेल्मेट प्रवास करीत होता. पोलिसांनी वाहन अडविताच संशय‌ित दंडाची रक्कम भरून निघून गेले. मात्र, काही वेळाने येऊन ते महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालू लागले. येवले यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. वर्दी उतरविण्याची धमकी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायकल वारीचे नवरात्रात आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या वारीत २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध शक्तीपीठांना भेट देण्यात येणार आहे.

येत्या २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सर्वच स्तरावर जोरदार सुरू आहे. नाशिक सायकलिस्टत असोसिएशनर्फेही भगूर, कोटमगाव, वणी, चांदवड या ठिकाणी सायकलवारी करत आदिशक्तींचे दर्शन घेतले जाणार आहे. नवरात्र सायकलवारीत नाशिक शहरासह चांदवड, मालेगाव, सिन्नर, सायखेडा, येवला, पिंपळगाव येथील सायकलिस्टसही सहभाग नोंदविणार आहेत. अधिकाधिक नाशिककरांनी या वारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रवीण खाबियांनी केले आहे. वारींची जबाबदारी डॉ. मनीषा रौदळ, मोहन देसाई, डॉ. आबा पाटील, नाना फड यांच्याकडे देण्यात आली आहे.

अशी होणार वारी
नवरात्र सायकल वारी दरम्यान २२ सप्टेंबर रोजी पहिली वारी भगूर येथील रेणुका देवी मंदिरापर्यंत केली जाणार आहे. २३ सप्टेंबर रोजी वणी येथील श्री सप्तशृंगी देवी संस्थान, २४ सप्टेंबर रोजी कोटमगाव येथील श्रीक्षेत्र जगदंबा संस्थान तर २६ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक श्रीक्षेत्र चांदवड रेणुका देवी संस्थान येथे भेट देण्यात येईल. अधिक माहिती व सहभागासाठी ०२५३-२५०२६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार रोखल्याने विरोधक दुखावले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीत मी सतत भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला. माझ्या या पारदर्शक कार्यशैलीमुळे विरोधक दुखावले आहेत. विरोधकांनी अविश्वास ठरावा आणावा. त्याने उलट माझी प्रतिमा अधिक उजळेल, असे परखड मत सभापती प्रसाद हिरे यांनी ‘मटा’कडे मांडले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांनी सभापती प्रसाद हिरे यांचे अधिकार काढून घेण्याबाबतचे पत्र बुधवारी दिले होते. याबाबत सभापती प्रसाद हिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सभा संपल्यानंतर अद्वय हिरे यांनी काही संचालकांना हाताशी धरून सचिवांना पत्र देऊन सचिवांनी ते वाचण्यापूर्वीच त्याची घाईघाईने पोच घेतली आणि माध्यमांना पाठवून सभेत जे घडलेच नाही, त्या विषयी खोटी महितो दिली. मी शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने उपसभापतींना अधिकार देण्याबाबतचे पत्र सभापती म्हणून माझ्या नावाने असताना ते मला न देता सभा संपल्यानंतर सचिवांना कसे काय दिले गेले? असा प्रश्न हिरे यांनी उपस्थित केला आहे.

...ही तर अद्वय हिरे यांची खेळी

बुधवारी घडलेल्या प्रकरणात भाजप नेते अद्वय हिरे यांचा हात असल्याचे प्रसाद हिरे यांनी म्हंटले आहे. बाजार समितीत जे काही घडले त्यामागे अद्वय हिरे यांची राजकीय खेळी आहे, दुर्दैवाने त्याला काही संचालक बळी पडले आहेत. मी शेतकऱ्यांच्या या संस्थेत एक रुपयाही कुणाला खाऊ देणार नाही. ही सारी पोटदुखी अर्थजनासाठी आहे. त्यामुळे अशा प्रस्तावाला मी घाबरत नाही. दोनचार दिवसांपूर्वी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे आज एक कसे झाले, हे सामान्य माणसालाही ठाऊक आहे. शिवसेनेच्या संचालकांनी अद्वय हिरे यांच्या राजकीय खेळीला बळी पडू नये. कारण यात माझे नव्हे, तर त्यांचेच भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. हिंमत असेल तर माझ्याविरुद्ध अविश्वास ठराव आणावा. कारण तालुक्यातील जनतेलाही खरे काय आहे ते कळेल. त्यामुळे सत्य समजल्याने माझी प्रतिमा अधिक उजळून निघेल असे सभापती प्रसाद हिरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमापन अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यास मिळकत नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद घेऊन उतारा देणेसाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचप विभागाने (एसीबी) बुधवारी रंगे हात पकडले. अरुणदास नथूदास वैरागी असे लाच स्वीकारणाऱ्या नगर भूमापन अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या आजोबांचे नावे मालेगाव कॅम्प सिटी सर्व्हे नंबर ८११ अ आणि ८१२ अ ही मिळकत होण्याबाबत येथील दिवाणी न्यायाधीशांनी आदेश दिले होते. या आदेशानुसार सदरची मिळकत तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्वेला नोंद होऊन उतारा देणेसाठी कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथूदास वैरागी यांनी तक्रादाराकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी ‘एसीबी’च्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी करून बुधवारी सापळा रचला आणि बैरागी याला सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कॅम्प भागातील नगर भूमापन कार्यालयात रंगेहात पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागवत कथा म्हणजे दु:ख नष्ट करणारे अमृत

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून विविध धर्मग्रंथांनी मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे प्रतिपादन साध्वी हरिषाजी यांनी भागवत कथा महायज्ञाच्या समारोप प्रसंगी केले.
सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने श्रीमद भागवत पुराण कथा महायज्ञ पार पडला. नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे श्री हंस कल्याण धाम आश्रमात या सोहळ्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. समारोप समारंभाला उपमहापौर प्रथमेश गिते, साध्वी मैत्रेयीजी, साध्वी पुजीताजी, साध्वी कमलाजी, महात्मा अमरबेलानंदजी, महात्मा चतुरवेदानंदजी आदी मान्यवर उपस्थ‌ित होते.
समारोप प्रसंगी साध्वी हरिषाजी यांनी भागवत कथेचे महत्त्व आणि मानवी जीवनात त्याचे असलेले महत्त्व विषद केले. त्या म्हणाल्या, की ‘भगवतः इदं भागवतम्’ असे म्हटले जाते. भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सुमधुर भक्तगीतांनी चैतन्य
या भागवत कथेप्रसंगी भजन गायक कलाकारांनी सुमधुर भक्तगीते गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. नवीन कुमार यांनी बासरीवर तर प्रकाश कुमार यांनी तबल्यावर साथसंगत केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय भंदुरे, भास्कर भालेराव, प्रशांत काश्म‌िरे, भाऊसाहेब बोराडे, चांगदेव अरिंगळे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

$
0
0

पाच हजाराची लाच घेताना अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात रोजगार हमी या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यांची पिळवणूक पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे गुरूवारी (दि. १४) समोर आले. शिंदखेडा येथील सिंचन विहिरीचे अनुदान काढून देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून ५ हजारांची लाच घेताना तांत्रिक अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याने धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी मंत्रालयाचा कारभार आल्यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्यात तसेच शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विहिरी मंजूर करून आणल्या. या योजनेतंर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ३ लाख रुपयांचे अनुदान सिंचन विहिरींसाठी दिले जाते.

असे आहे प्रकरण

शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी गावातील एका शेतकऱ्याला सिंचन विहीर मंजूर झाली होती. शेत गट नं १२७/२ क क्षेत्र ०.७७ आर या शेत गटावर संबंधित तक्रारदार शेतकरी यांना महात्मा गांधी रोजगार हमी जलसिंचन योजनेमध्ये सिंचन विहिरीचे काम सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी सिंचन विहिरीचे काम गावातील मंजूर करून काम सुरू केले होते. या विहिरीचे काम पूर्ण झाल्याने तक्रारदार हे पंचायत समिती शिंदखेडा येथील तांत्रिक अधिकारी नरेश बोरसे यांना भेटले असता त्यांनी विहिरीचे उर्वरित अनुदान ९२६१६ रुपये रकमेच्या बिलाची मोजमाप पुस्तिकेवर नोंद करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तांत्रिक अधिकारी नरेश बोरसे यांना लाच घेताना गुरूवारी पंचायत समिती शिंदखेडाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. बोरसेंविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबेल का? शेतकऱ्यांना लवकर अनुदान दिले जात नाही. त्यामुळे मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरण्यास अडचण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार विविध अडचणींवर मात करीत जिल्ह्यातील ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांचे अर्ज भरणे बाकी असून, सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने हे शेतकरी हैराण झाले आहेत.

याचबरोबर या सर्व शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत सुरुवातीला आज (दि. १५) मध्यरात्रीपर्यंत दिली असल्यामुळे शेतकऱ्यांकडे काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने त्यांची धावपळ उडाली होती. मात्र गुरूवारी, रात्री राज्य सरकारकडून अर्ज भरण्याची मुदत वाढवून दि. २२ सप्टेंबर करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही रांगेत उभे राहून सर्व्हर डाऊनमुळे कर्जमाफीचा अर्ज भरला जात नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजारांच्या आसपास शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांचे अर्ज भरणे अद्यापही बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना मात्र दिवसभर महा-ईसेवा केंद्राजवळ सर्व्हर सुरू होण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून भारनियमनामुळेदेखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे श्वान, भलतेच गुणवान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात पोलिस श्वानांनी आपले कलागुण सादर केले. या स्पर्धेला बुधवारी (दि. १३) महाराष्ट्र पोलिस अकादमीत सुरुवात झाली.

या मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, कम्प्युटर स्पर्धा, श्वान स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्ह‌िडिओग्राफी, विज्ञानाची तपासास मदत अशा सहा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. वरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची आगामी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड करण्यात येते. गुरुवारी पोलिस श्वान स्पर्धेस सुरुवात झाली. यात राज्यभरातील पोलिस श्वानांनी प्रशिक्षकांसह सहभाग घेतला.

..या घेतल्या चाचण्या

प्रशिक्षकांच्या आज्ञेचे पालन करणे, गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगाराचा माग काढणे, अंमली पदार्थ व स्फोटके शोधणे, मालमत्तेचे रक्षण करणे, अनोळखी व्यक्तीने दिलेल्या अन्नाचा स्वीकार न करणे इत्यादी चाचणी घेण्यात आल्या. श्वानांचे प्रशिक्षण पुणे येथील गुन्हे अन्वेषन विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात घेण्यात येते. प्रशिक्ष‌ित श्वानांची राज्यातील पोलिस घटकांना तपास कामाकरीता नियुक्ती करण्यात येते. अनके संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात श्वान पथकांची मदत घेण्यात येते.

श्वानांचे बहुमूल्य कर्तृत्व

१९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपासात बहुमूल्य मदत करणाऱ्या ‘जंजीर’ या श्वानाची तसेच २६/११ च्या स्फोटामधील तपासात मदत करणाऱ्या ‘सुलतान’ या श्वानाची आठवण आजही पोलिस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या श्वानांनी हजारो किलो स्फोटकांचा छडा लावून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत राज्यभरातील श्वान असाच प्रकारे कामगिरी करीत असून, १८ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा समारोप आहे. सदर स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यातील पोलिस दले तसेच केंद्रीय पोलिस संघटना आपले संघ पाठवून आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवतात.


घातपात विरोधी तपासणी

घातपात विरोधी तपासणी स्पर्धे अंतर्गत आणखी एक स्पर्धा घेण्यात आली. पोलिस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू होती. महत्त्वाची व संवेदनशील ठिकाणे, विविध महत्त्वाच्या आस्थापना, महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीची बाह्य व अंतर्गत ठिकाणी अद्यावत उपकरणांनी तपासणी करणे आदी विषयांबाबत यावेळी परीक्षा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चला, शिकूया गरबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीत मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. पण, अनेकांना सर्वसाधारण गरबा अन् गरब्याच्या विविध स्टेप्सदेखील जमत नाहीत. अशा गरबाप्रेमींसाठी मटा कल्चर क्लबतर्फे गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. संजय सोनार हे बॉलिवूड स्टाइल गरबा या वर्कशॉपमध्ये शिकविणार आहेत.

येत्या सोमवारी (दि. १८), मंगळवारी (दि. १९) आणि बुधवारी (दि. २०) असे तीन दिवस शहर परिसरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत हे वर्कशॉप रंगणार आहे. ४५ नीलरत्न बंगला, विसे मळा, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता, विश्वकर्मा गार्डन हॉल, महालक्ष्मीनगर महाराष्ट्र कॉलनी, हिरवाडीरोड पंचवटी या ठिकाणी सकाळी १० ते ११ या वेळेत, के. एन. केला हायस्कूल, करन्सी नोट प्रेसच्या समोर, जेलरोड, नाशिकरोड या ठिकाणी दुपारी ३.३० ते ४. ३० वाजेदरम्यान, तर आर. के. लॉन्स, पाथर्डी फाटा या ठिकाणी दुपारी २.३० ते ३.३० वाजेदरम्यान आयोजित वर्कशॉपमध्ये गरबोली अर्थात, बॉलिवूड स्टाइल गरबा शिकविला जाणार आहे. इच्छुकांनी आपापल्या परिसरातील मटा कल्चर क्लब आयोजित गरबा वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

रजिस्ट्रेशनसाठी साधा संपर्क

या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी २०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या ठिकाणी गरबोली वर्कशॉपचे रजिस्ट्रेशन होईल. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री घेणार समृद्धीबाध‌तिांची बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

समृद्धी महामार्ग संदर्भात सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी पालकमंत्री समृद्धी महामार्गाशी संबंध‌ति सर्व अधिकारी व शेतकऱ्यांची सयुक्तंपणे नाशिकमध्ये स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गासाठी काही शेतकऱ्यांनी जम‌निी दिल्या असल्या, तरी काही शेतकऱ्यांमध्ये मोबदल्यासंदर्भात संभ्रम आहेत. त्यांच्या तक्रारी

ऐकून घेतल्या जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेतील सभागृहनेते पाटील याच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष कचरू पाटील डुकरे, भाजपचे उपाध्यक्ष अनिल भालेराव यांच्यासोबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी समृद्धी महामार्ग संदर्भात सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे विस्तृतपणे समजून घेतले. त्यांच्या तक्रारींबाबत तात्काळ नाशिक जिल्हाधिकारी, समृद्धीचे मुख्य अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नाशिकमध्ये लवकरच समृद्धीच्या विषयातील सर्व मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी, कृती समिती, बाधित शेतकरी यांची बैठक सयुंक्तपणे पालकमंत्रांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिटको’ही व्हेंटिलेटरविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयातदेखील नवजात अर्भकांसाठी आवश्यक असणारे एकही व्हेंटिलेटरच उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत या रुग्णालयात जन्मलेल्या १२,७२६ बाळांपैकी विविध कारणांमुळे रुग्णालयात दाखल करून घ्याव्या लागलेल्या २,८४२ बाळांपैकी तब्बल २३२ बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या रुग्णालयात आजवर शेकडो नवजात अर्भकांचा बळी गेला असला, तरी हॉस्पिटल चालविणे हे महापालिकेचे काम नसते, अशी दर्पोक्ती या रुग्णालयाच्या प्रशासनाने केली आहे. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचा गळा घोटणारी सरकारी व्यवस्था अजूनही किती नवजात बालकांचे जीव घेणार आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. व्हेंटिलेटर्सअभावी शेकडो नवजात अर्भकांचा हकनाक बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उघडकीस आला. त्यामुळे नाशिकच्या सिव्हिलमधील अनागोंदी राज्यात चर्चेचा विषय ठरली. परंतु, महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातही अशीच विदारक स्थिती आहे. गोरगरीब कुटुंबांसाठी हक्काचे रुग्णालय म्हणजे पालिकेचे बिटको रुग्णालय अशी या रुग्णालयाची पंचक्रोशीत ओळख आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यासह शेजारील सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील रुग्णही या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पसंती देतात. सामान्य कुटुंबांकडून डिलिव्हरीसाठी बिटको रुग्णालयालाच प्रथम पसंती मिळते. त्यामुळे या रुग्णालयात डिलिव्हरीचे रुग्ण मोठ्या संख्येने येतात.

--

एकही व्हेंटिलेटर नाही

बिटको रुग्णालयात आजमितीस एकही व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे या रुग्णालयात जन्मलेल्या नवजात अर्भकांपैकी ज्या नवजात अर्भकांना व्हेंटिलेटरची गरज आहे, अशा नवजात अर्भकांच्या पालकांना या रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी संदर्भित केले जाते. मात्र, ज्या कुटुंबांची खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची ऐपत नसते अशी कुटुंबे निराश होतात. त्यापैकी गेल्या पाच वर्षांत तब्बल २३२ बाळांचा मृत्यू या रुग्णालयात झाला आहे. मृत्यू झालेल्या या नवजात अर्भकांत १३३ मुले, तर ९९ मुली होत्या. या रुग्णालयात चार वॉर्मर व चार फोटोथेरपी मशिन्स आहेत. येथून दुसऱ्या रुग्णालयात दाखल झालेल्या १६५ नवजात अर्भकांचे प्राण मात्र वाचले आहेत. या रुग्णालयात जन्मलेल्या बाळांपैकी मुलांचे जन्मप्रमाण जास्त असल्याने शहरात पीसीपीएनडीटी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची दाट शक्यता आहे.

--

‘आयपीएचएस’ला हरताळ

इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्डच्या अटी व शर्तींनुसार रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असताना बिटको रुग्णालयात मात्र या अटी व शर्तींचे या रुग्णालयाच्या उभारणीपासून अद्यापही पालन करण्यात आलेले नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांकडेही या रुग्णालयात दुर्लक्ष होत आहे. या रुग्णालयाचा दर्जा हा प्राथमिक आरोग्य केंद्राचा असल्याचे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे.

--

हॉस्पिटल चालविणे महापालिकेचे काम नसते, तर शासनाचे असते. पालिका केवळ पीएचसी चालवतात. बिटको रुग्णालयाचाही दर्जा पीएचसीचाच आहे. त्यामुळे येथे व्हेंटिलेटर्स नाहीत. व्हेंटिलेटर्सची गरज असलेल्या नवजात अर्भकांना मेडिकल कॉलेजला दाखल करण्याचा सल्ला दिला जातो.

-डॉ. जयंत फुलकर, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय

--

पाच वर्षांतील आकडेवारी..

वर्ष - अॅडमिट - मृत्यू - रेफरल - एकूण डिलिव्हरीज

पुरुष स्त्री एकूण - पुरुष स्त्री एकूण- पुरुष स्त्री एकूण

२०१३-१४ ३५८ २५२ ६१० ३८ १६ ५४ ३१ १८ ४९ ३११२

२०१४-१५ ३८२ २८५ ६६७ ३१ २६ ५७ १७ १३ ३० २६३८

२०१५-१६ ३९७ ३१३ ७१० ३५ ३२ ६७ १९ ११ ३० २८७७

२०१६-१७ ३३७ २६२ ५९९ २२ १७ ३९ २० १६ ३६ २८७७

२०१७-१८ १४३ ११३ २५६ ०७ ०८ १५ १३ ०७ २० १२२२

एकूण १६१७ १२२५ २८४२ १३३ ९९ २३२ १०० ६५ १६५ १२,७२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडो-वेस्टर्न थीमवर ठेका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असून, नवरात्रीचे प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडिया, गरब्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाई वर्कशॉप्सच्या माध्यमातून ठेका धरत सज्ज होताना दिसत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्ती, मंदिरे, मंदिरांचे आवार आदींचे रुपडे पालटत आहे. बहुतांश देवी मंदिरांतील रंगरंगोटीची कामे पूर्णत्वास आली आहेत.

गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच येणाऱ्या नवरात्रोत्सवाकडे अवघ्या तरुण पिढीचे लक्ष लागते. वर्षभरातील नऊ दिवस गरबा, दांडिया खेळत देवीची आराधना करताना वातावरणात चैतन्य निर्माण झालेले असते. यंदाही हा उत्सव जल्लोषात साजरा करण्याची आतुरता शहरात दिसून येत आहे.

ढोलिडा ढोल धिमो, कुकडा तारी बोली, पंखिडा तू उडी जाये… अशा पारंपरिक गीतांबरोबरच बॉलिवूडच्या रिमिक्स गीतांसह इंडो-वेस्टर्न थीमवर थिरकण्यासाठी तरुणाई सज्ज होत आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दहा, पंधरा दिवसीय वर्कशॉपला प्रारंभ झाला असून, गरब्याच्या पारंपरिक स्टेप्सबरोबरच आधुनिक स्टेप्स उत्साहात भर टाकत आहेत. याशिवाय खरेदीचा जोरही वाढला आहे.

शहरातील मोठमोठ्या मंडळांकडून दांडिया उत्सव आयोजित केला जात असतो. अशा नावाजलेल्या ठिकाणीच जाऊन गरबा, दांडिया खेळण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे रीतसर प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी जाण्याकडे गेल्या काही वर्षांत कल वाढला आहे. चौकाचौकांमध्ये पोस्टर्सद्वारे गरबा, दांडिया वर्कशॉपची जाहिरातबाजी करण्यात येत असून, तरुणाईला प्रशिक्षणासाठी आकर्षित केले जात आहे. असे क्लासेस तरुणाईबरोबरच प्रौढांनाही आकर्षित करत असून, तेथे जाऊन शिकण्यावर भर दिला जात आहे. अनेक क्लासेस वेगवेगळ्या स्पर्धांसाठीही प्रशिक्षकांना तयार करत असल्याने एकएका स्टेप्सवर लक्षपूर्वक मार्गदर्शन केले जात आहे.

--

पारंपरिक पोशाखांची चलती

नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी त्याला साजेशी वेशभूषा केली जाते. यासाठी घागरा चोली, धोती अशा पारंपरिक कपड्यांना मागणी मिळत आहे. बाजारपेठाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोशाखांनी सजल्या असून, गुजरात, जयपूर या ठिकाणांहून ते विक्रीस आणले जात आहेत. शिवाय, गेल्या एक-दोन वर्षांपासून इंडो वेस्टर्न थीमलाही मोठी पसंती मिळत असून, जिन्स, टॉपबरोबर बांधणीची ओढणी व ऑक्साइडचे दागिने अशा मिक्स मॅच फॅशनला पसंती दिली जात आहे.

--

दागिन्यांना वाढती मागणी

नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास जाताना वेशभूषेला साजेसे दागिने घालण्याची गरज लक्षात घेत तरुणींचा सिल्व्हर, ऑक्साइडचे दागिने खरेदीकडे कल वाढला आहे. टिका, घुमर, कमरपट्टा, पायल, बाजूबंध, साज, कवड्यांनी तयार केलेले दागिने असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्यावर किंवा ब्यूटिपार्लरमधून भाडेतत्त्वावर मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

--

गरबा शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने उत्साह मोठा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे.

-प्रतीक हिंगमिरे, कोरिओग्राफर

--

मूर्ती, मंदिरे रंगरंगोटीस वेग

शहर परिसरातील देवी मंदिरांतील मूर्ती, मंदिरे, तसेच मंदिरांच्या आवाराची रंगरंगोटी पूर्णत्वास आली आहे. नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी, सांडव्यावरची देवी, नाशिकरोडची दुर्गा देवी, तसेच भगूर येथील रेणुकामाता आदी मंदिरांतील अशी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. विविध मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात असून, अनेक ठिकाणी विविध रुपांतील देवीच्या मूर्तींचे स्टॉल्सदेखील लागले आहेत. त्याचप्रमाणे घट बसविण्यास आवश्यक असलेल्या टोपल्या तयार करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे. भगूर येथील रेणुकामाता देवी मंदिरासमोरील बारवाची शिवशाही फाउंडेशन व शिवसेनेतर्फे स्वच्छता करण्यात आली. बारवेतून सुमारे दोन टन कचरा काढण्यात आला. या मोहिमेत चंद्रकांत कासार, वैभव पाळदे, धर्मेंद्र मल्ल, सुरेश आव्हाड, ऑल्विन स्वामी, युवराज कासार, पप्पू काशिद, सिराज शेख, पावन कासार, रोहित कासार आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृतसाठी भाजप-सेनेत धावपळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या (दि. १६) शेवटचा दिवस असून, अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता कमीच आहे. त्यामुळे स्वीकृतपदावर संधी मिळण्यासाठी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षावर दबाव वाढवला आहे. शनिवारी यासंदर्भातील नावे आयुक्तांना द्यावी लागणार असली, तरी शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी डोकेदुखी नको म्हणून नावांची निवड पक्षश्रेष्ठींवर सोपवली आहे. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठाण मांडले असून, थेट प्रदेशातील नेत्यांमार्फत लॉबिंग लावले आहे.

महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे. पालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे तीन, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक नियुक्त होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संख्याबळ कमी असल्याने त्यांना कोटा मिळालेला नाही. त्यामुळे भाजप आणि सेनेलाच संधी असून, या दोन्ही पक्षांकडून स्वीकृत सदस्यपदावर जाण्यासाठी लॉबिंग केले जात आहे. भाजपमध्ये तीन जागांसाठी तब्बल ३८ जणांमध्ये रस्सीखेच आहे. निष्ठांवतांना संधी द्यायची की पक्षात येऊन पराभूत झालेल्यांना संधी द्यायची यावरून भाजपमध्ये गोंधळ आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपच्या नेत्यांनी ३८ जणांची यादी प्रदेश भाजपकडे पाठवली आहे. पुणे महापालिकेसारखा राडा होऊ नये म्हणून इच्छुकांच्या नावाची निवड आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन करणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आपली डोकेदुखी कमी करून घेतली आहे.

सेनेकडून नवख्यांना संधी

शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा असून, या जागांसाठीही मोठी रस्सीखेच आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनीही नाराजी नको म्हणून मातोश्रीवर निर्णय सोपवला आहे. त्यासाठी इच्छुक १२ जणांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यातील अनेक नावे नवीन परंतु, पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनाच सेनेकडून न्याय दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images