Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रत्येक जिल्ह्यात २० गाइड्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्यात पर्यटन वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित २० गाइड्स असणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, पर्यटकांना त्या-त्या जिल्ह्याची माहिती या गाइडमार्फत उपलब्ध होईल व त्यातून पर्यटकांना दिलासा मिळेल. तसेच महामार्गावरील १० ठिकाणी राज्यात वे साइड अॅमेनिटीज पार्क उभे केले जाणार असून त्यात मॉल व करमणुकीपासून इतर साधणे असणार आहे. त्यामुळे प्रवासात विरुंगळा मिळणार आहे.

नाशिक परिसरातील पर्यटनाचे ब्रँडिंग व्हावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनने हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित तीन दिवशीय ट्रॅव्हल मार्टच्या कार्यक्रमात स्टॉलचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की व्हिजिट महाराष्ट्र हा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला असून त्यामाध्यमातून पर्यटन वाढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. पर्यटन वाढीसाठी राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका सह इतर संस्थांची मदत घेवून पर्यटन कसे वाढवता येईल याबाबत काम सुरू आहे.

इगतपुरीला वेलनेस हब
जगभरातून वेलनेस टुरिझमला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी इगतपुरीच्या ‘वेलनेस हब’ म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन जयकुमार रावल यांनी केले. जिल्ह्यात निसर्ग, कृषी, पर्यटन, ऐतिहासिक गड-किल्ले, पक्षी अभयारण्य, पावसाळी पर्यटन आणि वाइनरीज असे पर्यटनासाठी आवश्यक विविध घटक उपलब्ध आहेत. मुंबईशी असणारी समिपताही पर्यटनासाठी पूरक आहे. आदरातिथ्याच्या चांगल्या सुविधा नाशिकमध्ये आहेत. या सर्व बाबींचा लाभ घेत नाशिकमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. जपान येथील गव्हर्नर निसाका यांची लवकरच नाशिक भेट आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अतिथी देवो भव
‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती रुजविण्यास प्राधान्य देण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरातील सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न पर्यटन महामंडळामार्फत होत आहे. क्रूझ पर्यटनासारख्या नव्या संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत. देशाबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्यासह देशांतर्गत पर्यटकही राज्यात यावेत, यासाठी विविध तीर्थस्थळांचे सर्कीट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे करीत असतांना पर्यटनस्थळांचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. नाशिक ट्रॅव्हल मार्ट त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राला द्यावी पसंती
भारतात जगातील पर्यटनस्थळांपेक्षा अधिक चांगली स्थळे असल्याचे नमूद करून जयकुमार रावल यांनी महाराष्ट्रातही सुंदर समुद्र किनारा, ४५० गड-किल्ले, अभयारण्ये, युनेस्कोने वारसा घोषित केलेली पाच पर्यटनस्थळे, पश्चिम घाटावरील जैवविविधता, तीर्थस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटकांनी या स्थळांना भेटी दिल्यानंतर त्यांना अधिक आनंद लुटता यावा यासाठी विविध सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, सरकार त्यांना सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. टूर ऑपरेटर्सने राज्याला पसंती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाइन फेस्टिवल महिनाभर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकच्या वाइन ब्रॅण्डिंगसाठी इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिवल २०१८ हा उपक्रम महिनाभर राबवला जाणार आहे. नाशिक व्हॅली वाइन क्लस्टर, एमटीडीसी वाइन टूरिझम सल्लागार समिती आणि एमटीडीसी यांच्यातर्फे २ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१८ दरम्यान नाशिकमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलची घोषणा हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आली.

आतापर्यंत एक किंवा तीन दिवसांचा वाइन फेस्टिवल यापूर्वी करण्यात येत होता. पण आता तो महिनाभर असणार आहे. दोन फेब्रुवारीपासून हा वाइन महोत्सव सुरू होणार असून त्याचे स्वरुपही बदलण्यात आले आहे. ११ मार्चपर्यंत चालणाया या उपक्रमात जिल्हाभरातील वेगवेगळ्या विनयार्डसमध्ये शुक्रवार ते रविवार असे आठवड्याचे तीन दिवस महोत्सव असेल. त्यात पर्यटकांना द्राक्ष खुडणीपासून वाइन तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता घेता येणार आहे. या बरोबरच मनोरंजनाचे विविध कार्यक्रमचेही होणार आहेत.

वाइन फेस्टिवलच्या करटेन रायझिंग कार्यक्रमात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, एमटी डीसीचे आशुतोष राठोड, नितीन मुंडावरे, जगदीश होळकर, केसरी टूर्सचे सुदीप पाटील, शिवाजी आहेर, राजेश जाधव, नीरज अग्रवाल, प्रदीप पाचपाटील, ‘तान’चे दत्ता भालेराव, हेमंत वाळुंज, सदाशिव नाठे, मनोज जगताप, किरण चव्हाण, सुनील भायबंग, माणिक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

२०१८ मध्ये होत असलेला इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिवल नाशिकच्या ब्रॅण्डिंगसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देश विदेशातील असंख्य पर्यटकांना याकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे नाशिकच्या सर्वच उद्योग व्यवसायिकांना हा फेस्टिवल फायदेशीर ठरणार आहे.
- जगदीश होळकर
अध्यक्ष, नाशिक व्हॅली वाइन क्लस्टर

द्राक्ष व वाईन फेस्टिवलच्या माध्यमातून नाशिकमधील सर्वच क्षेत्राला चालना मिळणार असून, पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होणार आहे. त्यामुळे नाशिक व्हॅली वाइन क्लस्टरच्या या उपक्रमाकडे सर्वच घटकांनी रोजगाराची व उद्योग व्यवसायाची उत्तम संधी म्हणून बघावे.
- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणबारी धरणात दहीकुटेसाठी आरक्षण!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दहीकुटे धरणाच्या पाणीप्रश्नावरून गुरुवारी आंदोलन झाल्यानंतर धरण संघर्ष समितीची शुक्रवारी प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थित पाटबंधारे विभाग, पंचायत समितीचे अधिकारी व समितीसदस्य यांच्यात बैठक घेण्यात आली. दहीकुटे धरण भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरणबारी धरणातून दहीकुटे धरणास पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचा तोडगा या बैठकीत काढण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. प्रांत मोरे यांच्यासह तहसीलदार डॉ सुरेश कोळी, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, कार्यकारी अभियंता वसंत इंगळे, संघर्ष समितीचे अनिल पाटील, विजय पठाडे उपस्थित होते. पठाडे यांनी प्रांत मोरे यांच्याकडे धरणक्षेत्रातील गावांना पाणी मिळावे अशी विनंती केली. हरणबारी धरणाचे स्थिती, पूरपाण्याची स्थिती, दहीकुटे धरणात पाणी पोहचवण्याबाबतच्या अडचणी आदी विषयांवर अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आला. मोसममध्ये पूर पाणी नसल्याने धरणात पाणी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र हरणबारी धरणातून कालव्याद्वारे येणारे पाणी या कालव्याला गळती असल्याने दहीकुटे धरणापर्यंत पोहचत नाही. हा कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांचेकडे पाठवला असे मोरे यांनी सांगितले. १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी आरक्षणाबाबत होणाऱ्या बैठकीत हरणबारी धरणातून दहीकुटे धरण भरण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मोर यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोमुळे जगणे अवघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील वडगाव बल्हे शिवारातील येवला नगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे गावातील ग्रामस्थांसमोर अनंत अडचणी आहेत. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेने हा कचरा डेपो इतरत्र हलवावा, अशी मागणी करत वडगाव बल्हे येथील ग्रामस्थांनी गुरुवारपासून येवला पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

वडगाव बल्हे येथील येवला नगरपालिका मालकीच्या गट नं. १९ मधील कचरा डेपोवर नगरपालिकेच्या वतीने येवला शहरात जमा झालेला कचरा बऱ्याच वर्षांपासून टाकला जातो. मात्र, या कचऱ्यापासून वडगाव बल्हे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येवला नगरपालिका या जागेव्यतिरिक्त गायरान जमिनीतही कचरा टाकत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण, जणावरांचे मांस उघड्यावर मोठ्या प्रमाणात टाकले जाते. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत वारंवार ठराव, निवेदन दिले आहे. तरी कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषणात सरपंच मिराबाई कापसे, उपसरपंच हर्षदा पगारे, अनिल मोरे, छाया मोरे, अशा जाधव, अशोक पैठणकर, हेमलता

सोमासे, रेखा जमधडे, कृष्णदास जमधडे, बाळासाहेब वाल्हेकर, अशोक जाधव, रविंद्र जमधडे, बाळकृष्ण कापसे, जितेश पगारे, रंजन संसारे, भास्कर संसारे, नितीन संसारे, संजय पवार आदींसह येथील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

करार केल्यामुळे कोंडी

वडगाव बल्हे हगणदारीमुक्त असून या ग्रामपंचायतीस नुकताच संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार मिळालेला आहे. या गावातील लोकांनी १९८० साली करार करून दिला आहे. त्यावेळेस कचऱ्याचे प्रमाण फार कमी होते. मात्र दिवसेंदिवस कचरा वाढत असून, समस्या गंभीर झाली आहे. नगरपालिकेस गावकऱ्यांनी गेल्या ३७ वर्षापासून सहकार्य केले आहे. परंतु आता हा त्रास सहन होत नसल्यामुळे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी रोखल्या बसेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एसटी महामंडळाने एसटी बससेवा फेऱ्या कमी केल्याने गिरणारे भागातील बसफेऱ्या कमी झाल्या. परिणामी शालेय विद्यार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, तसेच अनियमिय बससेवा व दुगाव फाट्यावर बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दुगाव फाट्यावर दोन तास बस रोखल्या. एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थी यांना नियमित बस देण्याचे आश्वासन दिल्यावरच आंदोलन थांबले.
एसटी महामंडळाच्या दिरंगाईमुळे गिरणारे दुगाव भागातील शहर बस फेऱ्या कमी केल्या गेल्या. नादुरुस्त बस त्यात एसटी अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे बससेवा अडचणीत आणण्याचा प्रकार घडत आहे. एसटी महामंडळाच्या कारभाराचा बोजा केवळ वाहक चालकांवर टाकल्याने ते नागरिक प्रवाशी, विद्यार्थी यांच्या संतापाचे बळी ठरत होते. या सर्व घटनाचा उद्रेक दुगाव (ता. नाशिक) विद्यार्थ्यांकडून घडला. एसटी महामंडळाला निवेदने देऊनही लक्ष दिले जात नव्हते.

स्थानिकांची साथ
वारंवार अनियमित येणाऱ्या बस, दुगाव फाट्यावर बस थांबत नसल्याने दोन तास बस रोखून विद्यार्थ्यांनी थेट रास्ता रोको केला. या रास्ता रोकोला स्थानिक नागरिकांनी साथ दिली. एसटी विभागाचे वाहतुक आगर व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ यांच्याशी बससेवा नियमित देण्याच्या आश्वासनावर सकारात्मक चर्चा झाल्यावर विद्यार्थ्यांनी बस सोडल्या आणि आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोटरी क्लब’तर्फे शिक्षकांचा गौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने शहर व तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड या प्रोजेक्टअंतर्गत ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ दिला जाणार आहे. यासाठी उपक्रमशील व सामाजिक, शैक्षणिक काम उत्कृष्ट असणाऱ्या बारा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ९) हे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती प्रेसिडेंट प्रमोद देवरे व सेक्रेटरी राजेंद्र दिघे यांनी दिली.

शनिवारी सासंकाळी चार वाजता पंचायत समिती सभागृहात सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा, प्रांतपाल राजेंद्र भामरेयांंच्या उपस्थितीत या शिक्षकांना गौरव‌ण्यिात येणार आहे.

या शिक्षकांचा सन्मान

आशा सोनवणे (चौफाटा), घनश्याम अहिरे (माध्यमिक विद्यालय साकुरी), प्रवीण शिंदे (दापुरे), सुनील देशमुख (जळगाव गा.), स्मिता पाटील (काकाणी), प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे (निमगाव), भरत पाटील (माळीनगर), शरद ठाकुर (जि.प. शाळा वऱ्हाणे), राजेंद्र देवरे (सरस्वती विद्यालय), सचिन लिंगायत (केबीएच विद्यालय कॅम्प), उदय पाटील (राजीव गांधी इंटरनॅशनल) लता सूर्यवंशी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौदाणे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधक ठरताहेत अपघातास कारण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
कळवण ते नाशिक या राज्यमार्ग क्रमांक १७ वर ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तर अनावश्यक गतिरोधकांमुळे वाहनधारकांना अपघातांशी सामना करावा लागत आहे.

कळवण, नांदुरी, वणी, दिंडोरी मार्गे येतांनाचा नाशिक प्रवास धोकादायक बनला आहे. अपघातांच्या संख्येत घट व वाहनांच्या गतीवर नियंत्रण म्हणून कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक टाकले जातात. वाहनचालकांकडून टोलवसुली केली जात होती तोपर्यंत कळवण-नाशिक मार्गाची स्थिती बरी होती. रस्त्याची वेळेवर डागडुजी केली जात होती. मात्र राज्य सरकारने टोल बंद केल्यानंतर वाहनचालकांची डोकेदुखी वाढली. मार्गाच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सवड मिळते की नाही, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वाहनधारकांनी दिला आहे.
टोल बंद करून राज्य सरकारने वाहनधारक व नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र, खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत पुन्हा टोल वसुलीला प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न आहे का? असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहने चालविणे जिकरीचे झाले आहे. अपघाताना जणू निमंत्रणच मिळत आहे.

येत्या पाच दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवण ते नाशिक रस्त्यांसह तालुक्यातील सर्वच रस्त्यांची डागडुजी न केल्यास शिवसेनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
- जितेंद्र वाघ,
शिवसेना, तालुकाप्रमुख, कळवण

कळवण, वणी, दिंडोरी ते नाशिक रस्त्यावर वाहन चालवणे म्हणजे ‘मौत का कुँवा’ ठरत आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे सरकारच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण करणारी बाब ठरत आहे.
- पंकज निकम, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला खड्ड्यांचा वाढदिवस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेल्या काही दिवसांपासून चांदवड-मनमाड रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सांगूनही या समस्येकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे चांदवड-मनमाड मार्गावर चांदवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गांधीगिरी करत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. केक कापून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

चांदवड-मनमाड रस्ता खड्डेमय झाल्याने अपघाताला निमंत्रण देणारा मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार विनंती करून, प्रसंगी निवेदन देवूनही उपयोग होत नसल्याने गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चांदवड-मनमाड रस्त्यावर गुरुवारी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर केक कापण्यात आला. मनसैनिकांनी केलेल्या या आंदोलनांने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

यावेळी नाना विसपुते, दिगंबर राऊत, नितीन थोरे, परवेज पठाण, रवींद्र बागुल आदी उपस्थित होते.

तोंडी आश्वासन

दरम्यान मनसैनिकांनी यानंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली असता येत्या २० सप्टेंबरपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल असे तोंडी आश्‍वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ वाहनचालकाविरोधात अखेर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत धूर फवारणी करत असताना एक बालिका भाजून गंभीर जखमी झाल्याप्रकरणी अखेर १३ दिवसांनी महापालिकेच्या वाहन चालकाविरूध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती.
योगेश संजय कमळकर (रा. मेहरधाम) असे चालकाचे नाव आहे. पेठरोडवरील नवनाथनगर भागात घटनेच्या दिवशी धूर फवारणी सुरू असताना हा प्रकार घडला होता. धूर फवारणी सुरू असताना अंगणात खेळणाऱ्या धनश्री संदीप चौधरी (५) या बालिकेस धूर फवारणी करणाऱ्या गरम पाइपाचा धक्का लागला. यात बालिका भाजली गेली. चालकाने निष्काळजीपणे काम केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी जखमी मुलीची आई विद्या चौधरी यांच्या तक्रारीवरून चालकाविरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.

मित्रांची तरुणीस मारहाण
मोबाइलच्या किरकोळ कारणातून वाद होऊन तिघांनी मिळून एका तरुणीस बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना गंगापूररोडवरील खतीब दूध डेअरी परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव जवंजाळ (रा. कस्तुरबानगर) व त्याच्या तीन साथिदारांनी हे कृत्य केल्याचा आरोप पीडित तरुणीने फिर्यादीत केला आहे. विद्या विकास सर्कलनगर भागात २२ वर्षीय पीडित तरुणी राहते. संशयित आणि तरुणी एकमेकांचे मित्र आहेत. पीडित तरुणी बुधवारी (दि. ६) रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आपल्या घराकडे जात होती. वैभवने तिला अडवून मोबाइलच्या किरकोळ कारणातून वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. संतप्त संशयिताने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक धात्रक करीत आहेत.

गायकवाड मळ्यात तरुणाची आत्महत्या
गायकवाड मळा भागात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने पडक्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरूवारी सांयकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अनिल पुंडलिक टर्ले (२७, रा. माहूर सोसा. गायकवाड मळा) असे या तरुणाचे नाव आहे. अनिलने गुरूवारी (दि. ७) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोरील पडक्या घरामध्ये गळफास लावून घेतला. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

सर्पदंशाने बालिकेचा मृत्यू
अंगणात खेळत असलेल्या संपदर्श झाल्याने १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना दसक गावात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस सेटशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूनम बाळू पवार (१०, रा. दसक, नाशिकरोड) असे सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. पूनम गुरूवारी (दि. ७) सकाळी अंगणात खेळत असताना विषारी सापाने तिला चावा घेतला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मालेगाव येथील सर सैय्यद अहमदखान प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक आमिन अली शब्बीर अली यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली. अस्थायी स्वरुपात काम करीत असलेल्या शिक्षिकेला कायम करण्याच्या बहाण्याने ही रक्कम मागण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) स्पष्ट केले आहे.
‘एसीबी’चे पोलिस उपायुक्त विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या पत्नी सर सैय्यद अहमदखान प्रायमरी स्कूल मालेगाव या शाळेत अस्थायी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सेवेत कायम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याच्या नावाखाली मुख्याध्यापक आलोसे आमिन अली शब्बीर अली यांनी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपये लाच मागितली. यातील वीस हजार रुपये लाचेची रक्कम या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या कक्षात स्वीकारली असता त्यांना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन
कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये कोणी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्त लाचेची मागणी करत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाने केले आहे. कार्यालयीन वेळेनंतर या सुट्टीच्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यप्रणालीबाबत वा तक्रारीबाबत माहिती हवी असल्यास ०२५३ २५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावरदेखील नागरिकांना संपर्क साधता येणार असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या रूग्णालयात व्हेंटिलेटरचा अभाव

$
0
0

नाशिक :

उत्तर प्रदेशात बालकमृत्यूच्या घटना उघडकीस येत असतानाच, नाशिकमध्येही आरोग्यसेवेच्या दुर्लक्षामुळे बालकांना जीव गमवावा लागत असल्याचे समोर आले आहे. ज्या काचेच्या पेटीत (इन्क्युबेटर) एकच बाळ ठेवायला हवे, तेथे चक्क चार बाळं ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात घडत आहे. नवजात अर्भकांना एकमेकांपासून संसर्गाचा धोका असतानाही प्रशासकीय यंत्रणेतील लालफितीच्या कारभारामुळे अर्भकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातही एकाचवेळी काही बालके दगावल्याच्या घटना अलीकडेच घडल्या आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) सुविधा उपलब्ध आहे. जन्मत:च कावीळ असलेली, श्वसनक्र‌यिेस त्रास होत असलेली तसेच वजन कमी असलेल्या कुपोषित बालकांना काचेच्या पेटीमध्ये ठेवणे अपरिहार्य ठरते. येथील एनआयसीयूमध्ये १८ इन्क्युबेटर असून, एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने एकेका इन्क्युबेटरमध्ये तीन ते चार बालकांना ठेवले जाते. नवजात अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी असते. केवळ ऑगस्ट महिन्यात या विभागात ५५ अर्भकांनी तर एप्रिल, २०१७पासून १८७ बालकांनी जीव गमावला आहे.

व्हेंटिलेटरची सुविधा नाही

जिल्हा रुग्णालयाचा समावेश आरोग्य विभागाच्या लेव्हल दोनमध्ये होत असल्याने येथील नवजात अर्भकांच्या अतिदक्षता कक्षात व्हेंटिलेटरची सुविधाच नाही. लेव्हल दोनच्या सरकारी हॉस्प‌टिलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे गंभीर होणाऱ्या बालकांना उपचारासाठी आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये पाठविले जात आहे. •कर्मचाऱ्यांवर आक्षेप
‘एनआयसीयू’मध्ये दररोज अनेक बाळं दाखल होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तसेच उपचारादरम्यान त्यांची काळजी घेण्यासाठी या विभागात तीन डॉक्टर आणि आठ नर्सेसची नियुक्ती केली आहे. परंतु, या अर्भकांची काळजी घेण्यात त्यांच्याकडूनही कसूर केली जात असल्याचा आरोप नातलगांकडून होऊ लागला आहे. हा अतिदक्षता विभाग असल्याने आई-वडिलांनाही बाळांना भेटू दिले जात नाही. १८ अर्भकांची काळजी घेण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना ५४ बालकांची शुश्रुषा करावी लागत आहे.•उभारणी अडली
रुग्णालय आवारातील १६ झाडे तोडण्यास महापालिकेने मज्जाव केल्याने नवजात अर्भक आणि गर्भवती माता उपचार विभागाच्या बांधकामाचे घोंगडे भिजत पडले आहे. या विभागासाठी केंद्र सरकारने २१ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. प्रशासनाने झाडे तोडण्यासाठी महापालिकेला डिसेंबर, २०१६मध्ये पत्र पाठविण्यात आले. मात्र अजूनही या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही.

जन्मत:च प्रकृती चिंताजनक

ऑगस्ट महिन्यात एनआयसीयूमध्ये बालक मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी या विभागात दाखल झालेल्या बाळांपैकी अनेक बाळांची प्रकृती जन्मत:च चिंताजनक होती. दोन बालकांचे वजन अवघे ५०० ग्रॅम होते. १८ बालकांचे वजन अर्धा ते एक किलो होते, तर २९ बालकांचे वजन एक ते दीड किलोदरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ध्वनिप्रदूषणा'चे उल्लंघन; नगरसेवक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आज, शनिवारी दुपारी राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांना ताब्यात घेतले. मात्र, न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मिळाल्याने दीड तासांत पोलिसांनी त्यांना सोडून दिले. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी अंतिम निर्णय होणार असून, न्यायालयाच्या आदेशानंतरच शेलार यांच्या अटकेवर कारवाई होणार आहे.

ध्वनिप्रदूषण कायद्यासह इतर तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेलार यांच्यासह त्यांच्या दंडे हनुमान मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिसरी कारवाई करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. पहिल्या दोन गुन्ह्यांपैकी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी डीजे चालकासह मंडळाच्या तिघा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर लागलीच सरकारवाडा पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.

या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करू नये यासाठी गजानन शेलार यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. मात्र, सोमवारी न्यायालय निर्णय देणार आहे. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी शेलार यांना भद्रकालीतील घरातून अटक केली. त्यांना भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या मुलाने न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मिळवून तो पोलिस स्टेशनला सादर केला. वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सांगितले, की न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिला असून, सोमवारी न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरात चोरटे सुसाट

$
0
0

रहिवाशी हैराण, पोलिस गस्त वाढवा

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराच्या वाढत्या लोकवस्तीत सातपूरच्या शिवाजी नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. वेगाने वाढलेल्या शिवाजीनगर भागात धृव नगर, धर्माजी कॉलनी, श्रमिक नगर भागात मिळेल ती वस्तू चोरांकडून हातोहात गायब होत असल्याने रहिवाशी हैराण झाले आहेत. दिवसा होत असलेल्या चोऱ्यांमुळे रहिवाशांनी पोलिसांसह नगरसेवक दिनकर पाटील यांची भेट घेत चोरट्यांवर आळा घालण्याची मागणी केली आहे.

शिवाजी नगरातील रहिवाशांनी नुकतीच याबाबत पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली. तसेच नगरसेवक दिनकर पाटील यांचीही भेट घेतली. यावेळी पोलिसांकडून योग्य पेट्रोलिंग होत नसल्यानेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप सभागृहनेते पाटील यांनी केली आहे. तर पोलिस आयुक्तांनी गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत धृव नगर भागात पोलिस चौकी उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रहिवाशी भयभित

गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर भागात चोऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. स्थानिक नगरसेवक पाटील यांनी अनेकवेळा चोऱ्यांवर आळा बसवा व टवाळखोरांवर कारवाई व्हावी याकरिता पोलिस आयुक्तांकडे निवेदन सादर केले होते. तसेच याबाबत कार्बन नाक्यावर रास्तारोकोदेखील केला होता. परंतु, चोऱ्यांचे प्रमाण कमी न होता वाढत चालले आहे. तसेच टवाळखोरांची संख्याही वाढली असल्याने रहिवाशी भयभित झाले आहे. तरी येत्या काळात परिसरातील वाढलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस गस्तीची मागणी या परिसरातील नागरिकांनी पोलिसांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल ४० हजार प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात तब्बल ४० हजार प्रकरणे निकाली निघाली आहेत. शहरातील जिल्हा न्यायालयात सर्वाधिक म्हणजे २५ हजार ९०० प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यामुळे हा एक प्रकारचा विक्रमच आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्ह्यामधील न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांपैकी १४ हजार १२ प्रकरणे निपटारा होण्यासाठी ठेवण्यात आली. त्यात पाच हजार ९२ फौजदारी प्रकरणे, चेक बाऊन्स प्रकरणी तीन हजार ३०२ प्रकरणे, २८१ बँकेचे दावे, ८५० मोटार अपघात प्रकरणे, एक हजार १०२ कौटुंबिक वाद असलेली प्रकरणे, एक हजार ६१२ दिवाणी प्रकरणे, एक हजार २०३ महानगरपालिका व इतर प्रकरणे यांचा समावेश होता. सदर प्रकरणांपैकी सुमारे पाच हजार प्रकरणे नाशिक न्यायालयातील होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी लोकअदालतीला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी स्वतः एका पॅनलमध्ये सहभागी झाले. त्यांनी ९ प्रकरणांची सुनावणी घेत निकाली काढले. जिल्हा न्यायालयामध्ये १६ पॅनल्सची स्थापना करण्यात आली होती. या सर्व पॅनल्सद्वारे शनिवारी दिवसभरात एकूण २५ हजार ९०० प्रकरणे निकाली काढण्यात आली. याद्वारे एकूण १६ कोटी रुपयांची भरपाई सामंजस्याद्वारे स्थापित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अॅड. जयंत जायभावे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयांमध्ये मोठ्या संख्येने प्रकरणे निकाली निघाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्यासंबंधीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यात सहभागी झाले.

लोकअदालतीचे महत्त्व ओळखून पक्षकारांनी त्याचा फायदा घेतला आहे. दिवसभरात १६ पॅनल्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही पक्षकारांचे अभिनंदन करतो.

- एस. एस. शिंदे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीतील ‘त्या’ संशयितास पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील रहिवासी व कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या नावाखाली नामदेव रामचंद्र घोलप (वय ५०) याने लष्करी भागातील जंगलात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न शुक्रवारी रोजी केला होता. त्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी घोलपला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याबाबत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यात नमूद करण्यात आले आहे, की शुक्रवारी मुलगी शाळेत गेली असता दुपारी एकनंतर ती घरी पोहोचली नाही. तुमच्या मुलीला एका व्यक्तीने बार्न्स स्कूल रोडने साऊथ एअरफोर्स रोडच्या कडेला झाडाजवळ घेऊन गेल्याचे एका महिलेने मोबाइलवरून सांगितले. तोपर्यंत आरोपीला नागरिकांनी पकडून ठेवले होते. मुलीला विचारले असता, शाळा सुटल्यानंतर आपण झेंडा चौकात रिक्षाची वाट पाहत असताना एक जण मोटारसायकलवरून माझ्याकडे आला. त्याने घरी सोडतो असे सांगून मोटारसायकलवर बसवले. खंडेराव टेकडीमार्गे एअरफोर्स रोडकडे जात असताना रस्त्यालगत असलेल्या झाडाजवळ गाडी उभी करून, चल आपण जंगलात जाऊ, असे म्हणाला. मला आईकडे जायचे असे म्हणून मी ओरडू लागले. याचवेळी एक गुराखी जवळ आला. त्याने आरोपीला विचारणा करत इतरही नागरिकांना बोलावले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वाइन’बाबत जनजागृती करा ॉ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

साधा फ्ल्यू व स्वाइन फ्ल्यूची प्राथमिक लक्षणे जवळजवळ सारखीच असल्याने स्वाइन फ्ल्यूचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास त्यावर ताबडतोब उपचार घेण्याबाबत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर येथील विभागीय आयुक्तालयात स्वाइन फ्ल्यूसंदर्भात विभाग स्तरावरील तातडीची आढावा बैठक आयुक्त महेश झगडे यांनी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले. शासकीय वा वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वाइन फ्ल्यूच्या निदानात व रुग्णांवरील उपचारांत विलंब केल्यास प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा कडक इशाराही झगडे यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना दिला. या बैठकीत स्वाइन फ्ल्यूबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.

स्वाइन फ्ल्यू या आजारावर प्रतिबंध हेच मुख्य प्रभावी औषध असल्याने या आजाराला रोखण्यासाठी विभागात जनजागृतीचे नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही झगडे यांनी दिले. या बैठकीस सामान्य प्रशासन उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे, जिल्हा परिषदेचे डॉ. उदय बर्वे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, डॉ. प्रदीप काकडे आदी उपस्थित होते.


डॉक्टरांच्या कार्यशाळेची आयुक्त झगडेंची सूचना

स्वाइन फ्ल्यूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी क्लस्टर मॅपिंग करण्यावर भर देऊन महापालिका क्षेत्रातील शासकीय व खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्याची महत्त्वाची सूचना विभागीय आयुक्त झगडे यांनी केली. स्वाइन फ्ल्यूला रोखून त्यामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासह आतापर्यंत या आजाराने झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची कारणे शोधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरीत बिबट्याची बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेल्या महिनाभरापासून पंचवटीतील विविध भागात बिबट्या दिसल्याचे बोलले जात होते. काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसेही दिसले. काही ठिकाणी सीसीटीव्ही फूटेजमध्येही बिबट्या दिसल्याचे लक्षात आले. मात्र, शनिवारी सायंकाळी मेरीच्या हायड्रो प्रकल्पातील भिंतीवर बिबट्या दिसला आणि तो नागरिकांनी मोबाइलमध्ये टिपल्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेरीच्या हायड्रो प्रकल्पात दाट झाडी आहे. या भागात पावसामुळे गवतही वाढलेले आहे. हिरवळीच्या या भागात मोरांचीही संख्या मोठी आहे. नेमक्या याच भागात बिबट्या आढळल्याचे कळताच बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. बिबट्या दिसल्याचे वन विभागाला कळविण्यात आले. मात्र, रात्रीचा अंधार आणि दाट झाडी यामुळे पिंजरा लावणे शक्य नसल्याने येथे रविवारी सकाळी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅट नावावर करून देण्यासाठी अपहरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पहिल्या पत्नीच्या नावावर फ्लॅट करून द्यावा, या मागणीसाठी पत्नीच्या भावाने व त्याच्या साथीदाराने मुजाहीद अहमद खान उर्फ मुकेश गुप्ता यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजाहीद अहमद खान उर्फ मुकेश हरिलाल गुप्ता यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा विवाह रेहाना उर्फ सबाना इजाहार खान हिच्याबरोबर झाला होता. त्यानंतर काही वर्षांतच हे दोघे जण वेगवेगळे राहू लागले. फिर्यादी यांच्या मालकीचे चार फ्लॅट असून, यातील तीन फ्लॅटमध्ये रेहाना व तिच्या नातेवाइकांनी कब्जा केला आहे. फिर्यादीचा पार्क साइट येथे असलेला फ्लॅट रेहानाच्या नावावर करून देण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे. फिर्यादी त्यांच्या मित्रासमवेत पांडवनगरी येथे एका दुकानात उभे असतांना अचानक रेहानाचा भाऊ अयूब इजाहार खान याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादीला गाडीवर बसवून सातपूर येथे नेले. तेथेही मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपींच्या लक्षात आले, की फिर्यादीला पकडले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपल्याला त्रास होईल म्हणून त्यांनी फिर्यादीला दवाखान्यात नेऊन गाडीवरून पडल्याचे सांगण्यास सांगितले. त्याच्यावर दवाखान्यात उपचार झाल्यावर फिर्यादीसह संशयित आरोपी अयूब अंबड पोलिस ठाण्यात आले. तेथे फिर्यादीने विश्वासाने पोलिसांना सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अयूबसह फिर्यादीला इंदिरानगर पोलिस ठाण्यात आणले. त्या वेळी पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार अयूब खान, बबलू खान व त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राडा घालणाऱ्यांना पोलिस कोठडी

पतीसमवेत प्रॉपर्टीसंबंधी सुरू असलेल्या वादात पोलिस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत पोलिस आयुक्तालयात गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या जमावास कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता. रिझवाना खान, रियाज खान, युसूफ खान, शाईस्ता कोकणी, बिस्मिल्ला शेख, शबाना अन्सारी, शहजादी शेख अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

रेहाना खान हिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रेहानाचे पतीसमवेत मालमत्तेसंबंधी वाद आहेत. तिचा पती सध्या दुसरीकडे राहतो. या प्रकरणी पोलिसांनी मदत करून प्रॉपर्टी मिळवून द्यावी, अशी रेहानासह तिच्या काही नातेवाइकांची मागणी होती. यातूनच रेहानासह तिच्या नातेवाइकांनी शुक्रवारी दुपारी इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये यांच्याकडे मदत मागितली. मात्र, सिव्हिल प्रकरण असून, तुम्ही कोर्टात जा, असा सल्ला भोये यांनी दिला. यानंतर सर्वांनी पोलिस आयुक्तालयात पोहोचून तिथे पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. रेहानाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारवाडा पोलिसांनी सर्वांना अटक करून त्यांच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. सर्व संशयितांना आज कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपचा याराना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपासून विळ्या-भोपळ्याचे नाते निभावणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये जिल्हा नियोजन समिती निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा मनोमीलन सुरू झाले आहे. जिल्हा नियोजनाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी एकमेकांच्या दारी जाऊन तब्बल ४० पैकी ३३ जागा बिनविरोध केल्या आहेत.

दररोज एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या नाशिकमधील या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील याराना या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा फुलू लागल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत आपली ताकद दाखविण्याची भाषा वापरणाऱ्या दोन्ही पक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधील नेत्यांचा दिवस हा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही. विधानसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा देत आपली ताकद वाढविण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे राज्यात शिवसेना सत्तेत असली, तरी विरोधकांची स्पेस घेऊन राजकारण करीत आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र ताकद आजमावली. महापालिकेत भाजप, तर जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेत आली. जिल्हा परिषदेत तर शिवसेनेने भाजपची मदत सोडून काँग्रेसची साथ केली. त्यामुळे या पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये वैर निर्माण होऊन नेते व कार्यकर्ते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता दोन्ही पक्ष जिल्ह्यात एकत्र येणार नाहीत, अशीच शक्यता होती.

परंतु, जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना व भाजपमधील नेत्यांमधील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ पुन्हा फुलली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा नियोजन समिती बिनविरोध करण्यासाठी पुन्हा दिलजमाई केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ४० पैकी ३३ जागा बिनविरोध करण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे.

महापालिकेत युती नसली, तरी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मात्र दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मतभेद आणि वाद विसरून एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे ताकदवान असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनमध्ये तळ ठोकून बिनविरोधचा तह केला. नाशिक आणि मालेगाव महापालिकेतील एकूण १४ जागांसाठी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित येऊन १४ पैकी सात जागा बिनविरोध केल्या. जिल्हा परिषद व नगर परिषदेतही हाच फॉर्म्युल्या वापरण्यात आला. शिवसेनेने भाजपशी तह करून महापालिका व जिल्हा परिषदेत आपली ताकद वाढवून घेतली आहे. महापालिकेसाठी २४ मतांचा कोटा असताना शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत.


कार्यकर्ते मात्र संभ्रमात

दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे संबंध पुन्हा फुलल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयात अर्ज माघारीच्या दिवशी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सभागृह नेते दिनकर पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी एकत्रित येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची मनधरणी करीत माघारी करवून घेतल्या. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध घडवून आणल्याने पदाधिकाऱ्यांमधील याराण्याचा परिणाम मात्र कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होणार असून, कोणासाठी भांडावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून निघाला अन् पिंजऱ्यात अडकला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेली बिबट्याची मादी सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे.

शिंगवे येथे शांताराम वाघ हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराजवळच विहीर आहे. शनिवारी सकाळी वाघ हे आपल्या शेतात गेले होते तेव्हा त्यांनी शेतातील विहिरीत डोकावून पहिले असता विहिरीत बिबट्या पडलेला दिसला. याबात त्यांनी येवला वन विभागाला कळव‌िले. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, मनमाडचे वनपाल पी. एस. पाटील, वनरक्षक विजय टेकणर आदींचे पथक शिंगवे येथे दाखल झाले. विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे बिबट्या विहिरीच्या कडेला पाइपचा आधार घेवून बसलेला होता.

वन विभागाच्या पथकाने विहिरीत दोरखंडाच्या साहाय्याने पिंजरा सोडला. त्यानंतर बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images