Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नदीत कचरा टाकल्यास दंड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेने हागणदारीमुक्त अभियानानंतर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाई व स्वच्‍छतेबाबत नागरिकांकडून उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत दक्ष राहून होणार मनपास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संगिता धायगुडे यांनी केले आहे.

पालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाई व स्वच्छतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या जुलैमध्ये झालेल्या महासभेत याबाबत ठराव करण्यात आला आहे. पालिकेने नेमून दिलेल्या जागे व्यतीरिक्त केरकचरा, मलमूत्र विसर्जन केले तर दंडात्मक रक्कम वसूल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानुसार पालिका क्षेत्रात स्वच्छतेबाबत उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या आदेशानुसार रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, प्रशासकीय कार्यालय, उद्याने इत्यादी ठिकाणी थुंकल्यास, तसेच मोसम नदीत कचरा टाकलस पाच हजार हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे. पालिकेने शहर स्वच्छतेबाबत कारवाईचा बडगा उगारला असून, शहरवासीयांनीच स्वच्छतेबाबत दक्ष राहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोषण आहारात आढळली कीड

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबत हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला. जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी या शाळेला भेट दिली असता हा प्रकार समोर आला. मुदतबाह्य वस्तू पोषण आहारात वापरल्या जात असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

पवार यांनी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, तालुका आहार अधीक्षक व्ही. एस. बैसाणे यांना फोन करून बोलाविले. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. शिंदे गैरहजर होते. गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह अमृता पवार यांनी या शाळेची पाहणी केली. तेव्हा लोकवर्गणीतून साकारलेल्या इ-लर्निंग प्रोजेक्ट रुममध्ये अस्वच्छता आढळली. तालुका आहार निरीक्षक बैसाणे यांना ग्रामस्थांनी फैलावर घेतले. दर महिन्याला पोषण आहार तपासण्याची जबाबदारी असतांनाही बैसाणे यांची नियुक्ती झाल्यापासून ते दीड वर्षांत प्रथमच शाळेत आले. मुख्याध्यापक शिंदे हे कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर असल्याचे केंद्रप्रमुख जनार्दन पगारे यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधितांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मुदत संपलेले खाद्य पदार्थ

शाळेच्या चार रूममध्ये पोषण आहारासाठी असलेल्या वस्तू होत्या. यात हळदीची पावडर, जिरे, मोहरी, मीठ, गोडेतेल मुदतबाह्य झाले होते. तर मटकीला कीड लागली होती. या सर्व वस्तूंचा पंचनामा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांना तीन आठवड्यांपासून पोषण आहार दिला जात नसल्याची बाब समोर आली. रेकॉर्डपेक्षा अधिक पोषण आहाराचा साठा आढळला. याचा अर्थ विद्यार्थ्यांना नियमित आहार दिला जात नाही, असे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूजी द्या हो, गुरूजी...

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील देवळाणे येथील बोंबले वस्ती जिल्हा परिषद शाळेत केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी गुरुवारी येवला पंचायत समितीतच चिमुकल्यांना आणून बसविले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरूजी द्या हो गुरूजी, अशा घोषणा देत पंचायत समिती कार्यालय दणाणून सोडले. या शाळेतील २४ चिमुकल्यांनी या अनोख्या आंदोलनात सहभाग घेतला.

तालुक्यातील देवळाणे बोंबले वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, एकूण पटसंख्या २४ आहे. मात्र, शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते. त्यातील परमेश्वर दासरे या शिक्षकाची केंद्रप्रमुख सुदाम हरिचंद्रे यांनी तोंडी सूचना देवून दुगलगाव शाळेवर बदली केली आहे. त्यामुळे बोंबले वस्ती शाळेच्या चार वर्गासाठी गणेश आतकरे हे एकमेव गुरूजी आहेत.

दुगलगाव येथे बदली झालेले दासरे या शिक्षकाचे वेतन बोंबले वस्ती शाळेत निघते. शाळेत एकच शिक्षक असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुगलगाव शाळेवर पाठविलेले शिक्षक परत देण्याची मागणी बोंबले वस्ती शाळेतील मुलांच्या पालकांनी केली आहे. सातत्याने मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने सर्व पालकांनी गुरुवारी मुलांना येवला पंचायत समितीमध्ये आणून
शाळा भरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् ती बोलली, ‘अम्मी वो देख शिवाजी!’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

आपल्या अप्रतिम अन् कलात्मक फोटोग्राफीने या क्षेत्रात आजवर आपला आगळावेगळा ठसा उमटवत नावलौकिक प्राप्त केलेल्या येवला शहरातील संजीव सोनवणे या छायाचित्रकार तरुणाने नुकतीच तयार केलेली ‘अम्मी वो देख शिवाजी’ ही शॉर्ट फिल्म सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. जाती-धर्मातील तेढ दूर होतानाच जातीय सलोखा वृद्ध‌िंगत व्हावा या दृष्टीकोणातून सोनवणे यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेल्या या शॉर्ट फिल्ममधून सामाजिक सदभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

संजीव सोनवणे यांना लहानपणापासून फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी आपलं करियर देखील छायाचित्रकार म्हणूनच घडवलं. त्यांनी आजवर विविध विषयांना हात घालत तयार केलेल्या अनेक शॉर्ट फिल्म मोठ्या प्रशंसेचा विषय ठरलेल्या. सध्या सोनवणे यांनी आपल्या ‘नम्रता फिल्म’च्या बॅनरखाली स्वतःच्याच अप्रतिम दिग्दर्शनातून साकारलेली ‘अम्मी वो देख शिवाजी’ ही शॉर्ट फिल्म सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. हिंदू-मुस्लिम धर्मियांमध्ये एकजुटीचा संदेश जावा, सामाजिक एकोपा व जातीय सलोखा वृद्ध‌िंगत व्हावा या भावनेतून स्थानिक कलाकारांना घेवुन सोनवणे यांनी तयार केलेली हि शॉर्ट फिल्म सध्या ‘यु-ट्यूब’वर झळकली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज देखील समाजमनाला समजावेत यासाठीचा देखील हा एक प्रयत्न असून या फिल्मचे सर्वांकडून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे सोनवणे यांनी या शॉर्ट फिल्मचे सर्व शुटींग येवला शहरातील मुस्लिम मोहल्यात, या भागातील आयना मशीद व कोर्ट रोडवरील वलीबाबा दर्गा या ठिकाणी केले आहे. येवला शहरातील रिद्धी पहिलवान (छोटी मुलगी), सीमा पहिलवान (आई) व मनमाड येथील दत्ता शिंदे (शिवाजी महाराज) यांनी या चार मिनिटाच्या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

अशी आहे शॉर्ट ‘फिल्म’

एक मुस्ल‌मि दाम्पत्य आपल्या एका छोट्याशा मुलीबरोबर दुचाकीवर चाललेले असताना काही गुंडाचा प्राणघातक हमला होतो. यात या मुलीचे वडील तिच्या डोळ्यासमोर मरण पावतात. त्यामुळे मुलीची वाच्या जाते. मुलीची आई विवंचनेत पडते. उर्दू शाळेत शिकणाऱ्या या मुलीला उर्दू भाषेतील इतिहाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांप्रती आदर व आकर्षण निर्माण होते. एके दिवशी ही मुलगी आई समवेत दर्ग्यावर जाते. तेथे काही गुंड तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात समोरून काही युवक येतात. या मुलीला त्यातील एक युवक हा शिवाजी महाराजांच्या रुपात दिसतो. त्यामुळे वाच्या गेलेल्या मुलीच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ते म्हणजेच ‘अम्मी वो देख शिवाजी’. मुलीची वाचा परत आल्याने आई आई आंनदीत होते. यादरम्यान, मुलीच्या अपहरणाच्या इराद्याने आलेले गुंड हे युवक येत असल्याचे पाहताच घाबरून पलायन करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रंथालये म्हणजे माणूस बनवणारी केंद्रे’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

ग्रंथालये ही माणूस बनवणारी केंद्र आहेत. वाचनातून लहानपणापासून काव्य, शास्त्र, विनोदाच्या जाणिवा समृद्ध होतात. ग्रंथ हे गंगेसारखे असतात. ग्रंथांच्या गंगेत स्नान केल्याने चित्त, मन शुद्ध होते. वाचनानेच वाचनसंकृतीचा विकास होतो, असे प्रतिपादन डॉ. विनोद गोरवाडकर यांनी केले.

येथील डॉ. बी. व्ही. हिरे सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या वाग्विलासिनी व्याख्यानमालेत डॉ. गोरवाडकर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष नीळकंठ देसले होते. यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव देसाई, माजी उपाध्यक्ष भिकन वामन भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोरवाडकर पुढे म्हणाले, वाचनाने वैफल्यावर मात करता येते. पुस्तक खऱ्या अर्थाने जीवनयोगी बनवतात. पुस्तकांच्या वाचनातून, सहवासातून वाचणाऱ्याचे व्यक्तिमत्व रसिक बनत जाते. कवी कमलाकर देसले यांनी गुलजार आणि सफदर हश्मी यांच्या पुस्तकांवरील कवितांचे वाचन केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष शैलेंद्र सोनजे यांनी प्रास्ताविक आणि परिचय करून दिला.

छायाचित्रांचे प्रदर्शन

वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या आयोजनासोबत सुप्रसिद्ध छायाचित्रकार मुकुंद थोरात यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व धार्मिक ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन वाचनालयाच्या ' शारदा हॉल ' मध्ये आयोजित करण्यात आले.

मुशायराचे आयोजन

मालेगाव ः येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाने रविवार (दि.१०) सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मराठी गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांनी ही माहिती दिली. मुंबई येथील ब्रह्मकमळ साहित्य समूह या संस्थेतर्फे मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी कवी खलील मोमिन असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यात पडून तरुणीचा अंत

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
चांदवड तालुक्यात माशांना खाद्य टाकण्यासाठी गेलेल्या तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ६) सकाळी घडली. या प्रकरणी चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
चांदवड तालुक्यातील डोंगरगाव येथील शिल्पा जनार्दन शिंदे ही तरुणी आपल्या घरासमोरील शेततळ्यातील माशांना खाद्य टाकण्यासाठी बुधवारी सकाळी गेली. माशांना खाद्य टाकताना प्लास्टिकच्या कागदावरून पाय घसरून ती शेततळ्यात पडली. पोहता येत नसल्याने शिल्पाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बराच काळ उलटूनही शिल्पा घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. ती शेततळ्यात पडलेल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शेजारील व्यक्तींच्या मदतीने तिला बाहेर काढत चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक फुलमाळी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामाच्या कार्यालयाला टाळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गुरुवारी कुलूप ठोकले. यावेळी सतत गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आदिवासी भागातील जामनेमाळ, भिंतीघर, चावडीचापाडा या बरोबरच तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते जागोजागी उखडले आहेत. रस्त्यात गुडघाभर खड्डे पडले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनाद्वारे तसेच फोनवरून माहिती देऊनही दुर्लक्ष करण्यात येते. पावसामुळे जामनेमाळ येथील नाल्यात मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहने जाऊ शकत नाही. आजारी माणसाला डोली बांधून दवाखान्यात आणावे लागते. या कामात भ्रष्टाचार झाला असून रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पवार यांनी केला. या निवेदनावर खंडू वाघमारे, केशव निकुळे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गणेशोत्सव काळात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. तब्बल १७ संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. संशयितांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील १८ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १३ लाख १२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गणेशोत्सवादरम्यान समाजकंटक, अवैधधंदे आणि गुन्हेगारी कारवाया टाळण्यासाठी अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्यात. गत गणेशोत्सवांचा आणि तपास न लागलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत पोलिसांनी कारवाई केली. एलसीबीचे निरीक्षक अशोक करपे यांनी विविध तपास पथके तयार करून जिल्ह्यातील सिमाभागासह परजिल्ह्यात शोध मोहीम राबवली.
पोलिस तपासात संशयितांच्या ताब्यातून ५५ मोबाइल, १० मोटारसायकली, दोन चारचाकी वाहने, एक लॅपटॉप, एक एलईडी टीव्ही, दोन इलेक्ट्रिक मोटारी व केबल वायर असा सुमारे १३ लाख १२ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयितांनी सिन्नर, सिन्नर एमआयडीसी, घोटी, इगतपुरी, वाडिवऱ्हे, येवला शहर, येवला तालुका, मालेगाव शहर, मालेगाव, आयेशानगर, पवारवाडी, मालेगाव किल्ला, सटाणा आदी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. संशयितांच्या अटकेने त्यांच्या साथीदारांची नावे पोलिसांना मिळाली. त्या व्यक्ती अटक झाल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येतील. ही कारवाई अपर अधीक्षक विशाल गायकवाड, मालेगावचे अप्पर अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, उपनिरीक्षक मालचे आदींच्या पथकांनी केली.

१८ गुन्हे उघडकीस
जिल्ह्यातील मालेगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर आदी तालुक्यांबरोबरच अहमदनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, पुणे, शिरूर, औरंगाबाद, पैठण, वैजापूर आदी ठिकाणी सराईतांचा शोध घेण्यात आला. विविध पोलिस स्टेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या १७ गुन्हेगारांच्या मुसक्या या कारवाईदरम्यान आवळण्यात आल्या. संशयितांच्या माध्यमातून घरफोडीचे सात, चोरीचे नऊ व जबरी चोरीचे दोन गुन्हे असे १८ गुन्हे उघडकीस आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रास्तारोकोनंतर गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्यानजिक वाहनाने धडक दिल्याने धनराज गावित या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गावितच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केल्यानंतर अखेर संशयितांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश गावित उर्फ बंटी आणि भगवान भोये अशी संशयितांची नावे आहेत.
करंजखेड फाट्यानजिक तीन दिवसापूर्वी वाहनाने धडक दिल्याने धनराज गावित याचा मृत्यू झाला होता. मात्र, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत कुटुंबीयांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सदर गुन्ह्याची घटना वणी की सुरगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या बाबतीत पोलिस यंत्रणेच्या तपासाबाबत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला होता. वणी पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन न पाळल्याने पोलिसांविषयी रोष व्यक्त केला होता. त्यामुळेच करंजखेड फाट्यावर नागरिकांनी अडीच तास वाहतूक ठप्प केली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने दंगा नियंत्रण पथकास व राज्य राखीव दलाच्या तुकडीस घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. याबाबत वृत प्रसिद्ध होताच याची गंभीर दखल घेत वरिष्ठ स्तरावरून तात्काळ दखल घेत सदर घटना वणी ऐवजी सुरगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हा गुन्हा सुरगाणा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी धनराजची पत्नी संगीता गावित यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सराड शिवारात नागझरी फाटा ते हरण टेकडी रस्त्यावर रविवारी (दि. ३) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नीलेश गावित आणि त्याचा साथीदार भगवान भोये यांनी धनराज गावित जीवघेणी मारहाण केली. पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला, अशी फिर्याद धनराजची पत्नी संगीता गावित यांनी दिली. त्यावरून दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वणी पोलिस कोणाच्या दबावाखाली कामकाज करतात? गुन्हा दाखल का करून घेतला नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

संशयितास कोठडी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी नीलेश गावित यास कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर भगवान भोये यास अटक झाली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, भदाणे, हवालदार आवारे, घुमरे, गोतरणे, गवळी आदी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता झालेल्या महिलेचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
प्रबुद्धनगर (सीपीटूल) येथे राहणारी संगीता शिवाजी लहाने (४०) ही महिला कामगार बेपत्ता झाली होती. हरसूल पोलिसांना ती गंगाम्हाळूंगी परिसरात जखमी अवस्थेत आढळून आली. तिला गिरणारे आरोग्य केंद्रात आणि नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
नाका कामगार असलेल्या संगीता या रविवारी (दि. ३) सातपूरला उभ्य होत्या. बांधकामासाठी हिरामण ठसाळे याने तिला दुचाकीवर बसवून घेत हरसूल घेऊन जात होते. गंगाम्हाळूंगीजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात संगिता यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. यात ठसाळे याने चुकीची माहिती दिल्याने संगीता या बेपत्ता झाल्याची तक्रार सातपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. नंतर ठसाळे याच्यावर हरसूल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक घुगे पुढील तपास करीत आहेत. संगिता यांचे पती चार वर्षांपूर्वी अंध झाले आहेत. एक मुलगी आणि तीन मुले असा त्यांच्यामागे परिवार आहे. लहाने कुटुंबाचा उदरनिर्वाह संगीता यांच्यावरच चालत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलवर बोलाल तर कारवाई!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पक्षकारांना कोर्टात मोबाइल वापरण्यास बंदी आहे. मात्र, कोर्टाचे कर्मचारी वा अधिकारी मात्र मॅसेजिंग, चॅटिंग वा सोशल मीडियावर गुंतलेले असतात. सर्वसामान्य आणि कर्मचारी यांच्यामधील याच तफावतीवर बोट ठेवत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी कार्यालयीन वेळेत मोबाइलचा वापर न करण्याचे आदेश न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
कार्यालयीन वेळेदरम्यान न्यायालयीन कर्मचारी मोबाइलवर बराच वेळ बोलतात किंवा व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियात गुंतलेले असल्याची बाब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश शिंदे यांनी हेरली. कार्यालयीन वेळेत कर्मचारी मोबाइलमध्ये गुंतत असल्याने शासकीय कामात हलगर्जीपणा होतो. तसेच पिठासीन अधिकारी न्यायासनावर गेल्यानंतर त्यांच्या कोर्टातील शिपाई, पहारेकरी कर्मचारी स्टूलवर बसून चॅटिंग सुरू करतात. एकिकडे पक्षकारांना कोर्टात मोबाइल वापरण्यास बंदी असताना दुसरीकडे न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी असे वागणे योग्य दिसत नाही. कार्यालयीन कामाचा बराच वेळ मोबाइलमध्ये व्यतीत होत असल्याचा परिणाम एकूणच कामकाजावर होतो. त्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोबाइल अचानक तपासण्याचा निर्णय जिल्हा न्यायाध‌ीशांनी घेतला. कार्यालयीन कामाच्या वेळेत चॅटिंग केल्याचे निर्दशनास आल्यास सदर कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिला आहे.

सीडीआरची घेणार मदत
जिल्हा कोर्टात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाइल क्रमांक, सीमकार्ड कंपनी इत्यादी स्वरूपाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन होते की कसे याची खातरजमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मोबाइलचा सीडीआर व इतर माहिती सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून मागवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि कॉलिंगमध्ये किती वेळ घालवला, याची खातरजमा करण्यात येईल. त्यात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असे आदेश सूर्यकांत शिंदे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांचे बिल थकले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटांना गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभागाने ब‌लि अदा केली नसल्याचा आरोप सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी यासंदर्भात शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांना पत्र लिहून बचत गटांची ब‌लि तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. दहा महिने बचत गटांची ब‌लि दिले जात नसतील तर शिक्षण विभाग काय करतो, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण समितीकडून चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्यातील बालकांना बचत गटांकडून पोषण आहार दिला जातो. या बचत गटांना दरमहा त्याचा मोबदला दिला जातो. परंतु शिक्षण समितीने शहरातील अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवणाऱ्या अंगणवाड्यांना गेल्या दहा महिन्यांपासून बिलेच मंजूर केली नसल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला आहे. या बचत गटांची ब‌लि दिली नसल्याने त्यांच्यावर कर्ज काढून शालेय पोषण आहार वाटपाची वेळ आली आहे. यांसदर्भात पाटील यांनी शिक्षण समिती प्रमुखांना पत्र देवून ब‌लि का अदा केली नाहीत असा जाब विचारला आहे. तसेच या बचत गटांची बिले तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्ट कामांसाठी १५ लाखांचा निधी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

१४ व्या वित्त आयोगानुसार कार्यरत न्यायालयाच्या दुरुस्ती, नुतनीकरण या योजनेतंर्गत मनमाड, चांदवड व नांदगाव येथील न्यायालयाला १५ लाख ४० हजार रुपयांची मान्यता विधी व न्याय विभागाने दिली. यात मनमाडसाठी ३ लाख ७० हजार २०६ रुपये, चांदवडसाठी ४ लाख ४८ हजार ४९७ रुपये तर नांदगावसाठी ७ लाख २२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर कामाची निविदा मागवण्यापूर्वी ही कामे मुंबई उच्च न्यायालय यांच्या डेडीकेटेड सेलने निश्चित केलेल्या १३ कामांमधील असल्याची खातरजमा करावी. अंदाजपत्रके सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करण्याची जबाबदारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड जेलमध्ये २८ दहशतवादी

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

मुंबईच्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल गुरुवारी लागला असला तरी या प्रकरणातील नऊ आरोपी नाशिकरोड जेलमध्ये काही वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. त्यामध्ये एक पाकिस्तानी आहे. जेलमध्ये चार बॉम्बस्फोटातील कैदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दहशतवादी कृत्यातील २८ कैदी आहेत.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी शंभरावर लोकांचे प्राण घेतले. अबू सालेम व इतरांना शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणातील नऊ आरोपी नाशिकरोडला शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये मुजमिल उमर कादरी, बशीर अहमद उस्मान गणी, परवेज महंमद झुल्फिकार कुरेशी, नासीर अब्दुल कादर केवल उर्फ नासीर धाकला, फारुख इलियास मोटरवाला, खलील अहमद सैय्यद अली नजीर, अल्ताफ अली मुस्ताक अली सय्यद, फिरोज (अक्रम) अमानी मलिक. हे आठ कैदी मुंबई, रायगडचे राहणार आहेत. तर नववा अब्दुल रशीद उर्फ राज अब्दुल गनी हा पाकिस्तानचा कैदी आहे. जेल रेकॉर्डवर त्याची सात-आठ नावे आहेत.

वेगळी कोठडी नाही

सूत्रांनी सांगितले, की या कैद्यांची वर्तणूक व शिस्त चांगली असून लेटमार्क व अन्य शेरे नाहीत. त्यामुळे त्यांना अंडा जेलएवजी सामान्य कैद्यांमध्येच ठेवण्यात आले आहे. इतरांप्रमाणेच त्यांना संचित व पॅरोल रजेसह इतर हक्क मिळत आहेत. सुरुवातीला त्यांना काम नव्हते. आता त्यांना कामही देण्यात आले आहे. मुंबई साखळी स्फोटातील कैद्यांना टाडा कलमाखाली जन्मठेपेच्या विविध प्रकारच्या शिक्षा झालेल्या आहेत.

अन्य स्फोटातील आरोपी

नाशिकरोड जेलमध्ये पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील हिमायत बेग शिक्षा भोगत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील जलीस अन्सारी रफिउल्ला (अजमेर) आणि मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपीही आहेत. नक्षलवादी व दहशतवादी कृत्यातील २८ कैदी आहेत. मुंबई साखळी स्फोटातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींना नाशिकरोड जेलमध्ये पाठवायचे की अन्य जेलमध्ये, याचा निर्णय अप्पर पोलिस महासंचालक घेणार आहेत. सप्टेंबरमध्ये कैद्यांची ट्रान्सफर होते. त्यामुळे नाशिकरोड जेलमधील बॉम्बस्फोटातील कैद्यांची संख्या वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

जेल ओव्हरफ्लो

१९२७ मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या आणि सव्वादोनशे एकरावर परिसर असलेल्या नाशिकरोड जेलचा महसूल सहा कोटीपेक्षा जास्त आहे. जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ३ हजार ३३१ कैदी आहेत. त्यामध्ये ११६ महिला तर नऊ परदेशी कैदी आहेत. कैद्यांची संख्या वाढतच आहे. त्यांच्या तुलनेत मनुष्यबळ तोकडे आहे. सहा कैद्यांमागे एक शिपाई असला पाहिजे असा नियम आहे. या जेलमधील सव्वी तीन हजारावर कैद्यांसाठी फक्त २१० कर्मचारी आहेत. त्यातून रजा सुटी वगळता १८० कर्मचारी उपलब्ध होतात. त्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांच्यावरील ताण वाढतच आहे. त्यातून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेल परिसरात ११३ एकरमध्ये खुले जेल साकरण्यासाठी दहा कोटी २१ लाखाचे बजेट सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहे. महिला कैद्यांसाठीही वेगळे जेल बांधले जाणार आहे.

फाशी यार्ड अधांतरी

नाशिकरोड जेलमध्ये फाशीयार्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. जेल मंडल क्रमांक सातमध्ये विविध बॅराक आहेत तर मंडल क्रमांक आठमध्ये तीनशेपेक्षा जास्त कोठड्या आहेत. त्यामधील दोन किंवा तीन फाशींच्या कैद्यांसाठी ठेवल्या जाऊ शकतात. सध्या असलेल्या स्वतंत्र यार्डमध्येच फाशी यार्ड तयार केले जाणार आहे. फाशी देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचाही शोध घ्यावा लागणार आहे. फाशीच्या कैद्यांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलच्या गजरात ट्रॅव्हल मार्टचे उद्‍घाटन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक ढोलचा गजर, मराठमोळ्या पद्धतीचे फेटा बांधून स्वागत, मंत्रोच्चारात दीपप्रज्ज्वलन व मराठी संस्कृतीचे दर्शन घडवत गुरुवारी नाशिक टॅव्हल मार्टचे उद्‍घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नाशिक परिसरातील पर्यटनाचे ब्रँडिंग व्हावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनने आयोजित हा कार्यक्रम हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झाला. या कार्यक्रमात खासदार संभाजी राजे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

तीन दिवशीय ट्रॅव्हल मार्टमध्ये देश-विदेशातील ६०० ट्रॅव्हल एजंटस व पर्यटन विषयांवर लिहिणारे लेखक व ब्लॉगर्सही यांच्या उपस्थित सुरू झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातील नाशिकच्या पर्यटनाचे महत्त्व सांगणारी शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. नाशिक दर्शन घडवत असतांना या कार्यक्रमात मंगळगौरीचा खेळ, फुगडी, गाठोडे, भांडण सवतीचे, लाटण्याचा खेळ, सोमू गोमूचे विमान,अशा एकाहून एक पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमातून परराज्यातून आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे, वायनरीज, गड-किल्ले, पक्षी अभयारण्य, पुरातन लेणी, आल्हादायक हवामान याबाबतची माहिती देत हे सर्व नाशिकला असल्याचे सांगितले. ट्रॅव्हल मार्टच्या उद्‍घाटन कार्यक्रमात आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्टॉल्सचेही आकर्षण
कार्यक्रमात देश-विदेशातील ट्रॅव्हल एजंटसना नाशिक परिसरासतील पर्यटन स्थळे, हवामान, हॉटेल्स, गाइड, वाहन पुरवठादार यांची माहिती व्हावी, यासाठी ६०० प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना माहिती व्हावी यासाठी येथे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व विविध ट्रॅव्हल्स कंपनीचे स्टॉलबरोबरच पैठणाची स्टॉलही आहे. या ट्रॅव्हल मार्टचे संयोजन पर्यटन विकास महामंडळाचे व्यवपस्थापीकय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भालेराव हे करणार आहे.

दोन दिवस नाशिक पर्यटन
नाशिक व परिसरातील हॉटेल्स, वाहन पुरवठादार, ट्रॅव्हल एजंटस यांच्या स्टॉल्सना शुक्रवारी (दि. ८) सकाळी ९ ते ४ या काळात सर्व ट्रॅव्हल एजंट्स भेट देतील. तसेच शनिवारी (दि. ९) सकाळी ८ ते सायंकाळी ७ दरम्यान हॉटेल्स व पर्यटन स्थळांना भेट दिली जाईल. अशा प्रकारे आलेल्या ट्रॅव्हल्स एजंटना नाशिक परिसरातील पर्यटनस्थळे व हॉटेल्सबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात पर्यटक पाठवतील, ही यामागची संकल्पना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा खरेदीबाबत आज मुंबईत होणार बैठक

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मध्यंतरी कांद्याची उपलब्धता कमी असल्याने आणि कांद्याचे बाजारभावाने दोन हजारांचा टप्पा पार केल्याने दिल्लीकरांसाठी नाफेड कांदा खरेदी करणार अशी चर्चा झाली होती. मात्र सध्या कांद्याचे दर दोन हजार रुपयांच्या खाली आल्याने नाफेडकडून कांदा खरेदीची शक्यता तूर्तास तरी मावळली आहे. याबाबत शुक्रवारी (दि.८) याबाबत मुंबईत बैठक होणार असून, त्यात याबाबत निर्णय होणार असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांना सांगितले.

१५ दिवसांपूर्वी कांद्याने चांगलाच उच्चांक गाठला होता. २७०० रुपये क्विंटल असा भाव झाला होता. त्यावेळी कांद्याची आवक कमी होती. त्यामुळे कांद्याची संभाव्य तूट पाहता दिल्लीसाठी नाफेडची कांदा खरेदी करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र खरेदी केलेला कांदा विक्रीसाठी दिल्लीला काउंटर मिळणे, वाहतूक खर्च आणि ग्राहकांपर्यंत माल पोहचवणे अशा सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला जातो, असे नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

त्यातच सध्या कांद्याची आवक पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे नाफेडला दिल्लीसाठी कांदा खरेदी करण्याची आवशक्यता नाही, असे नाफेडच्या सूत्रांनी सांगितले.

इजिप्तचा कांदा आयात होत असल्याची चर्चा प्रसार माध्यमात होत आहे. प्रत्यक्षात याबाबत कोणतीही सत्य परिस्थिती समोर येत नाही मात्र याचा परिणाम ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भोगावा लागत असून, परिणामी कांद्याचे बाजारभाव अवघ्या १५ दिवसांत २४०० वरून १८०० रुपयांपर्यंत कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त

केला आहे.

अजून दिल्लीसाठी कांदा खरेदीचा निर्णय झालेला नाही. शुक्रवारी (दि. ८) सप्टेंबरला मुंबई येथे नाफेडची बैठक आहे. त्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कांदा दीड हजार रुपयांपर्यंत खाली

आला आहे. त्यामुळे याचा काय परिणाम होईल हेही पाहावे लागणार आहे.

- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१२ दारू दुकाने जिल्ह्यात होणार सुरू

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीतील दारुदुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यातील ३१२ च्या आसपास दुकाने शुक्रवारपासून (‌दि. ८) सुरू होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दुकानाच्या परवान्यासाठी दुकानदारांची गर्दी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात वाढली. पण त्यासाठी वरीष्ठ पातळीवरून कोणतेच आदेश न आल्यामुळे ते रखडले होते. पण ५ सप्टेंबरनंतर राज्य सरकारने त्यास संमती दिल्यानंतर आता या दुकाने सुरू होणार आहेत. सुरू होणाऱ्या सर्व दुकानांमध्ये देशी दारू, विदेशी दारू, परमिट रुम, वाइन शॉपी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन महापालिका, नऊ नगरपालिका व सहा नगरपंचायत हद्दीत मार्चच्या अगोदर ५७७ दुकाने होती. मात्र, एक एप्रिलनंतर यातील अवघी २५६ दुकाने सुरू होती. त्यामुळे तब्बल ३१२ दुकाने बंद झाली. मात्र, सुप्रीम कोर्टाने महामार्गावरील पाचशे मीटरपर्यंतचा दारूबंदीचा निर्णय शहराच्या हद्दीत लागू होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर नागपूर खंडपीठाने विदर्भातील पाचशेवर बारमालक व दारू विक्रेत्यांच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३१२ दुकाने सुरू होणार आहेत. मार्च अगोदर वाइन शॉपची ७३ दुकाने होती. पण एप्रिलनंतर त्यातील ४२ सुरू होती. आता उर्वरित ३१ दुकानेही सुरू होणार आहेत. तसेच ३०४ पैकी अवघे १२९ परमिट रुम सुरू होते. आता बंद पडलेले १७५ परमिट रुम पुन्हा सुरू होतील. बीअर शॉपी आधी ६७ होते. मात्र, त्यातील केवळ ४० सुरू होते. आता त्यातील २७ पुन्हा सुरू होणार आहेत. देशी दारुचीही १३३ दुकाने आधी सुरू होती. सरकारच्या निर्णयानंतर त्यातील ५४ राहिली. आता त्यातील ७९ पुन्हा सुरू होणार आहेत.

जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सर्व दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे परवाना शुल्क भरलेली सर्व दुकाने सुरू होणार आहेत.
- सी. बी. राजपूत,
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
आडगाव-म्हसरूळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. अपघात बुधवारी (दि. ६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजपासून एक किलोमीटरवर झाला. रुपेश सुभाष भावसार (३२, रा. कलानगर, म्हाडा कॉलनी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ कार (एमएच १५ बीएन ८५९६) म्हसरूळकडून मुंबई आग्रा महामार्गाकडे जात होती. या दरम्यान रुपेश भावसार आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून (एमएच १५ सीएक्स ३२०९) मेडिकल कॉलेज येथून म्हसरूळकडे जात होते. दुचाकी आणि कारची समोरासमोर जोरात धडक झाली. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओचालक फरार आहे. या प्रकरणी सुभाष भालचंद्र भावसार (७०, रा. घर नं. १४, म्हाडा कॉलनी, कलानगर, दिंडोरी रोड पंचवटी) यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी महालोक अदालत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत शनिवारी (दि. ९) जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाभरातील न्यायालयात दाखल असलेल्यापैकी १४ हजार १२ प्रकरणे निपटारा होण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात पाच हजार ९२ फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्स प्रकरणी तीन हजार ३०२ प्रकरणे, २८१ बँकेचे दावे, ८५० मोटार अपघात प्रकरणे, एक हजार १०२ कौटुंबिक वाद असलेले प्रकरणे, एक हजार ६१२ दिवाणी प्रकरणे, एक हजार २०३ महापालिका व इतर प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. यापैकी सुमारे पाच हजार प्रकरणे नाशिक न्यायालयातील असून त्यात एक हजार ६३० फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची एक हजार २५०, मोटार अपघाताची ७०० प्रकरणे, १९७ कौटुंबिक वाद असलेले प्रकरणे, ५०० दिवाणी प्रकरणे, ३०० महापालिका व इतर प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. दरम्यान, लोकअदालतीत दाखलपूर्व ५० हजार प्रकरणे ठेवण्यात आली आहे. यात नाशिकमधील ३० हजार प्रकरणांचा समावेश आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी यांच्यासह सर्व लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. लोकअदालतीचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन एस. एस. शिंदे यांनी केले आहे.

झटपट निकाल लागणार
लोकअदालतीत मिटलेल्या प्रकरणांना अपिल नसल्याने त्याचा फायदाच होतो. यात दोन्ही पक्षांचा विजय होतो. केसचा झटपट निकाल लागतो. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील नाही. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने कोणाचा विजय किंवा कोणाचा पराजय होत नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. लोक अदालतीचे अनेक फायदे असून, यामुळे न्याय व्यवस्थेवरील ताणही कमी होतो.
- एस. एस. शिंदे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळापत्रक अचानक बदलणे पडले महागात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वेळापत्रक बदलल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेणे खासगी क्लासला महागात पडले. ग्राहक न्यायालयाने कॉलेजरोडवरील एका खासगी क्लासला फीचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. या निकालाची शहरात मोठी चर्चा आहे.
पालकांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल खासगी क्लासने न घेतल्याने जिल्हा ग्राहक न्यायमंचाने कॉलेजरोडवरील आसावरी चेंबर्स येथील विद्यार्थी अॅकॅडमीला विद्यार्थ्याने भरलेले फीचे ९४ हजार ८२२ रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाबरोबरच मानसिक त्रासापोटी पाच हजारा दंड व तक्रार अर्जाचा खर्च तीन हजार रुपये पालकांना अदा करण्याचेही निर्देश दिले आहेत.
पंचवटी येथील माधुरी गुणवंत देवरे या पालकाने केलेल्या तक्रारीवर न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. देवरे यांचा मुलगा अथर्व याच्या अकरावी व बारावी सायन्सच्या शिक्षणासाठी विद्यार्थी अॅकॅडमी या खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला. त्यासाठी ९४ हजार ८२२ ही फी भरली. पण, अॅकडमीने आपल्या सोयीनुसार क्लासच्या वेळापत्रकात बदल केला. पुढे क्लासची आणि कॉलेजची वेळ एकच होत असल्याने अथर्वला क्लासला जाणे शक्य होत नसे. क्लासमध्ये शिक्षक सतत बदलत असल्याने अगोदरच्या शिकवलेल्या अभ्यासाबाबत प्रश्न, शंकाचे निराकरण नवीन शिक्षकांकडून होत नसे. शिक्षक मुंबईहून येत असल्याने अथर्वच्या अभ्यासाबाबत अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर त्याबाबत तक्रार केल्यानंतर त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे अथर्वला ९० हजार रुपये भरून दुसऱ्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा लागला. दरम्यान, या तक्रारीवरून विद्यार्थी अॅकॅडमीने आपली बाजू मांडतांना सांगितले, की अथर्व देवरे याने दहावी आणि अकरावीचे शिक्षण क्लासमध्ये पूर्ण घेऊन सर्व सुविधांचा लाभ घेतला आहे. कोणत्याही कारणास्तव फी परत दिली जाणार नाही. ही अट मान्य करूनच देवरे यांनी मुलाचा क्लासमध्ये प्रवेश घेतला.

तक्रारीत आढळले तथ्य
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने लाख रुपये फी भरुन प्रवेश रद्द करून दुसऱ्या क्लासमध्ये ९० हजार फी देऊन प्रवेश घेण्यामध्ये पालकाला कोणते स्वारस्य असेल? असा प्रश्न उपस्थित केला. देवरे यांची केलेली तक्रारीत तथ्य असल्याचे सांगून अॅकॅडमीने शिक्षण सेवा देताना कमतरता केली असल्याचे मत नोंदवले. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी हा निकाल दिली. देवरे यांच्याकडून अॅड. एस. डी. लोकरे यांनी युक्तीवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images