Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

माहेरवाशिणीला जड अंत:करणाने निरोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या!’ असा गजर करत गणेशभक्तांनी दोन दिवसांची माहेरवाशीण आलेल्या गौराईंना व सात दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. या निमित्ताने गोदाघाटावर तसेच नदीच्या कडेकडेने विसर्जनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

गुरुवारी गौरी विसर्जनाचा दिवस होता. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरी म्हणजे माहेरवाशिण घरी येते, अशी आख्यायिका आहे. गौरी साधारणपणे तीन दिवस असतात. पहिला दिवस आगमनाचा, दुसरा पूजनाचा आणि तिसरा विसर्जनाचा. गौरींचे विसर्जन जिथे केले जाते, त्या नदी तलावातील काही दगड आणून ते घरी ठेवण्याची पद्धत आहे. सुखसमृद्धी आणि पिकांची भरघोस वाढ व्हावी, ही त्यामागची श्रद्धा आहे. गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आलेल्या माहेरवासिनी गौरींना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. गौरी पूजनाला केलेला लाडू, चिवडा, शंकरपाळे असा फराळ भाविकांना प्रसाद म्हणूनही ठिकठिकाणी वाटण्यात येत होता. दुपारी गौराईंची पूजा केल्यानंतर बाजरीची भाकरी, गोडधोड पदार्थाचा नैवेद्य असलेली शिदोरी बांधली. या शिदोरीचे गौराईसोबत विसर्जन करण्यात आले. माहेरवाशीण आलेल्या गौराईंचे कौतुक करताना महिलांचे डोळे पाणावले होते. गौरी विसर्जनासाठी परंपरेनुसार केवळ महिलाच येतात. परंतु, काहीजण सहकुटुंब आले होते. गणपती बाप्पा, गौराईंसोबत सेल्फी काढून घेताना गणेशभक्त दिसत होते. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गोदाघाटावर भक्तांची मांदियाळी होती. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, घाटावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वाहतूक पोल‌िस, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज होते.

सात दिवसांच्या गणेशमूर्तींसोबत गौरींनाही गोदाघाट, चोपडा लॉन्स, सोमेश्वर या ठिकाणी भक्तिभावात निरोप देण्यात आला. दुपारच्या दरम्यान गणपती व गौरी विसर्जनासाठी गर्दी वाढू लागली. घरगुती गौरी-गणेशमूर्तींसोबत काही ठिकाणच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचेही सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदक मेकिंग अन् चित्रकलेची रंगत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘मटा कल्चर क्लब’तर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तसेच खास महिलांसाठी मोदक मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सात हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, द्वितीय क्रमांकास चार हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे.

विजेत्यांना दिले जाणारे हे गिफ्ट व्हाउचर्स योगेश इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून दिले जातील. या सर्व विजेत्यांना सह्याद्री हॉस्पिटलतर्फे फॅमिली हेल्थ चेकअप व्हाउचरसुद्धा दिले जातील. दहा झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले असून, या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर जिंकण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. ३ सप्टेंबर रोजी पार्कसाइड होम, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलसमोर, बळी मंदिराजवळ, हनुमाननगर, मुंबई-आग्रा हायवे, पंचवटी या ठिकाणी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात झटपट तयार होतील अशा विविध पाककृती कशा तयार करायच्या याविषयी डेमो वर्कशॉपसुद्धा दुपारी ३ वाजता पार्कसाइड होम या ठिकाणी होणार आहे. कोमल सूर्यवंशी या व्हेजी नगेट, इन्स्टंट चोको लावा केक, इन्स्टंट ब्रेड दहीवडा या आणि अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपी करून दाखविणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा आणि वर्कशॉपसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

त्याचप्रमाणे १० झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे. सायंकाळी ५ वाजता चित्रकला स्पर्धा, आणि मोदक मेकिंग कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना बक्षिसे दिले जातील. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क- ६६३७९८७, ७०४०७६२२५४.

--

नियम व अटी पुढीलप्रमाणे

--

चित्रकला स्पर्धा ः पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धेचा विषय गणेशोत्सव हा आहे. रविवारी, दि. ३ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी २ वाजता ही स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेचा कालावधी २ तासांचा राहील. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य घरून आणावयाचे आहे. फक्त ड्रॉइंग पेपर स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध होतील. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

--

मोदक मेकिंग कॉम्पिटिशन ः स्पर्धेला येताना स्पर्धकांनी मोदक बनवून आणावेत. मोदक स्पर्धकांनी स्वतः बनविलेले असावेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही. स्पर्धेसाठी मोदक तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचे चालतील. ही स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असून, परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकारी हरवले आहेत!

$
0
0

येवला पालिकेतील अपक्ष नगरसेवकांनी चिकटवले दालनावर पोस्टर

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणारे मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर हे येवल्यासाठी वेळच देत नाहीत. याकडे लक्ष वेधत मुख्याधिकारी मेनकर यांच्या दालनासमोर पालिकेतील अपक्ष नगरसेवकांनी बुधवारी (दि. ३०) पुन्हा मेनकर यांच्याविरोधात पवित्रा घेतला. या नगरसेवकांनी चक्क मुख्याधिकाऱ्यांच्या पालिकेतील दालनास ‘मुख्याधिकारी साहेब हरवले आहेत, सापडल्यास किंवा दिसल्यास त्वरित संपर्क साधावा’ या आशयाचे पोस्टर चिकटवले आहे.

येवला पालिकेचे यापूर्वीचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची बदली झाल्यानंतर येथील पालिकेसाठी शासनाने श्रीमती पाटील या महिला मुख्याधिकाऱ्यांची नियुक्तीचा आदेश काढला होता. मात्र, त्यांनी हजर न होता वैद्यकीय रजा टाकल्याने प्रभारी कार्यभार मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्याकडे आहे. परंतु, डॉ. मेनकर हे येवला पालिकेसाठी वेळच देत नसल्याचा आरोप पालिकेतील अपक्ष नगरसेवकांनी केला आहे.

मुख्याधिकारी कार्यालयात येतच नसल्याचा आरोप करणाऱ्या या चार अपक्षांनी दहा दिवसांपूर्वी पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला होता. गेल्या तीन महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याविना चाललेला येवला नगरपालिकेचा गाडा रुळावर येत नसल्याने शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. नगरसेवकांची कामेदेखील अडून पडल्याचे हे नगरसेवक सांगतात. ठिय्या आंदोलनानंतर प्रभारी मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांनी आठवड्यातील बुधवार अन् गुरुवार हे दोन दिवस देण्याचा शब्द देवूनही ते बुधवारी नगरपालिकेकडे फिरकलेच नाहीत. यानंतर मुख्याधिकारी नसल्याचे लक्षात आल्याने शफिक शेख, रुपेश लोणारी, अमजद शेख व सचिन मोरे या नगरसेवकांनी पालिकेतील मुख्याधिकारी यांच्या कुलूपबंद दालनाला ‘मुख्याधिकारी हरवले आहेत, कोणाला दिसल्यास अथवा सापडल्यास येथे संपर्क साधा’या आशयाचे पोस्टर चिकटवले आहे.

मनमाड नगरपालिकेचा पुर्ण कार्यभार, कळवण नगरपालिकेचा स्वच्छ भारत अभियानाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना डॉ. मेनकर यांचे येवल्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. डॉ. मेनकर यांनी यापूर्वी दोनदा येवला पालिकेचे कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले असून, पालिकेतील त्यांचा कार्यकाळ प्रभावी ठरला होता. त्यामुळेच त्यांच्या अतिरिक्त कार्यभारामुळे का होईना नगरपालिकेचा गाडा सुरळीत चालेल अशी अपेक्षा होती.मात्र, त्यांच्या येवला पालिकेसाठी वेळ न देण्याच्या भूमिकेमुळे ही अपेक्षा फोल ठरल्याचे अपक्ष नगरसेवकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध महिलांना लिफ्ट पडली महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना लूटणाऱ्या चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. चोरट्याने २४ तासांत दोन ठिकाणी महिलांना लुटले. स्नॅचिंगऐवजी चोरट्यांनी नवीनच शक्कल लढवली असून, चोरट्याचा माग काढण्याचे आव्हान आडगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

विठाबाई रघुनाथ मोरे (६६, रा. नंदन स्वीटससमोर, कॉलेजरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे या बुधवारी अमृतधाम भागात राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या मुलीस भेटून पिंपळगाव बसवंत येथे जाण्यासाठी अमृतधाम बसथांबा येथे उभ्या असताना ही घटना घडली. बसच्या प्रतीक्षेत असताना काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना गाठले. चोरट्याने थेट मोरे यांच्याशी ओळख काढत विश्वास संपादन केला. मीदेखील तिकडेच जात असून, तुम्हाला पिंपळगाव बसवंत येथे सोडतो असे सांगून विठाबाई यांना आपल्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. मात्र, संशयिताने महामार्गावरील नवव्या मैलावर निर्जनस्थळी दुचाकी थांबवून लूट केली. विठाबाई यांना त्याने दुचाकीवरून उतरवून देत धक्काबुक्की करीत बळजबरीने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची आणि ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. यानंतर मोरे यांनी आडगाव पोल‌िस ठाणे गाठून आपबिती कथन केल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. दरम्यान, आडगाव पोलिस स्टेशन हद्दीत २४ तासांतील ही दुसरी घटना घडली आहे. पहिल्या गुन्ह्याचा कोणताही धागा मिळालेला नसताना चोरट्याने दुसऱ्या ठिकाणी लूट केल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांनी विशेषतः वृद्ध महिलांनी अनोळखी व्यक्तींच्या वाहनांवर प्रवास करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’च्या दर्जाकडे लक्ष द्या!

$
0
0

जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांचे निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यासाठी कामांचे जीओ टॅगिंग करण्यात यावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत १५ नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले.

मृद व जलसंधारण विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आयोजित विभागीय क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमाचे संचालक डॉ. कैलास मोते, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, आयआयटीचे तज्ज्ञ हेमंत बेलसरे, आयडब्ल्युएमपीचे डॉ. प्रीतम वंजारी, उपायुक्त बाळासाहेब जेजूरकर आदी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. हे अभियान केवळ शासनाचे म्हणून न राबविता प्रत्येक ग्रामस्थांचे अभियान व्हावे यादृष्टीने लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त झगडे यांनी केले. जलयुक्तचा आराखडा गावपातळीवरच ग्रामसभेच्या मान्यतेने अंतिम होत असल्याने योजनेमध्ये प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. पाणी साठविण्याबरोबरच ठिबक सिंचन, तुषार सिंचनसारख्या पद्धतीच्या उपयोगाद्वारे पाण्याची बचत केल्यास पुढच्या पिढीसाठी जलसाठा उपलब्ध राहील.

तांत्रिक माहितीचे सादरीकरण

संचालक डॉ. कैलास मोते यांनी मृदा व जलसंधारण कामांच्या नियोजन, आराखडे व पद्धतींमधील तांत्रिक बाबींचे माहितीपूर्ण सादरीकरण केले. त्यांनी विविध प्रकारच्या जमिनींमध्ये जलसंधारण कामांसाठी बांध बंदिस्त, चर, माती उपचार, शेततळे, विहीर पुनर्भरण, पीक पद्धतीने पाणी वापरातील परिणामकारकता, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांतून असलेली कामे आदींची माहिती दिली. दुपारच्या सत्रात जलसंधारण उपचार दुरुस्ती, तांत्रिक आणि आर्थिक मापदंड या विषयावर कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, दिलीप पांढरपट्टे तसेच विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला उत्साह शिगेला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरातील गणेशोत्सवाचा उत्साह पाऊस उघडल्यामुळे शिगेला पोहोचला असून, खास देखावे पाहण्यासाठी गुरुवारी रात्री नाशिकरोडमध्ये आबालवृद्धांची मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले. परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बनविलेले वैविध्यपूर्ण देखावे गणेशभक्तांची गर्दी खेचत आहेत. काही वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

नाशिकरोडमध्ये यंदा गेल्या वर्षीपेक्षा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांच्या संख्येतही घट झाली आहे. मात्र, आहे त्या देखाव्यांनाही गणेशभक्तांची दाद मिळत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. विविध सामाजिक विषय यंदाही या गणेश मंडळांनी देखाव्यासाठी निवडले आहेत.

दर वर्षी काही तरी नवीन विषयावर सामाजिक जनजागृती करणाऱ्या येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने यंदाही संत तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाचा भव्य देखावा उभारला आहे. या देखाव्यातून या मंडळाने वैज्ञानिक दृष्टिकोन मांडण्याचा केलेला प्रयत्न गणेशभक्तांना चांगलाच भावला आहे. आर्टिलरी सेंटररोडवरील ईगल स्पोर्टस अॅण्ड सोशल क्लबने संतोषीमातेच्या २५ फुटी मूर्तीपुढे चलत आरतीचा देखावा साकारला असून, यांत्रिकी कौशल्याचा वापर केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयरोडवर प्रेस वेल्फेअर फंड कमिटीने दर वर्षीप्रमाणे यंदाही भव्य गणेशमूर्तीची स्थापना केली असून, दररोज रात्री सांस्कृतिक मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शिवाजी पुतळा येथे श्रमिक सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेटीचा ऐतिहासिक देखावा उभारून स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. दर वर्षी सामाजिक विषयावर देखावा सादर करणाऱ्या गाडेकर मळ्यातील मातोश्री फ्रेंड सर्कलने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावरील देखावा साकारला दिले आहे. राजधानी सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रेजिमेंटल प्लाझाजवळील बालाजी सोशल फाउंडेशनने यंदा म्युझिकल लाइट शो साकारला आहे. विशेष म्हणजे या मंडळाच्या गणेशाच्या मूर्तीवर तब्बल ३६ किलो चांदी व १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आहेत. याशिवाय विविध उपनगरांतील छोट्या-मोठ्या गणेश मंडळांनीही पर्यावरणपूरक देखावे साकारले आहेत.

--

खेळ, स्पर्धांमुळे रंगत

मोठ्या सोसायट्यांसह काही उपनगरांतील गणेश मंडळांमार्फत स्थानिक नागरिकासांठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. गाण्यांच्या स्पर्धेबरोबरच महिलांसाठीही खास खेळांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे सोसायट्यांतील नागरिकांसह बच्चेकंपनीत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आजपासून राष्ट्रीय योगा स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योगा क्लचरल असोसिएशन व महाराष्ट्र योगा कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत शहरात राष्ट्रीय योगा स्पर्धा होणार आहे. नक्षत्र लॉन्स, गंगापूररोड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वाढते औद्योगिकीकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण यामुळे शहरवासीयांचे शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. शारीरिक व मानसिक संतुलन चांगले ठेवण्याकरिता योगा हे वरदान ठरत आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय फेडरेशनच्या मान्यतेने होणार असून, स्पर्धेच्या उद्घाटनास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच खासदार, महापौर, उपमहापौर, विधानसभा सदस्य, केंद्र व राज्य सरकारी अधिकारी, तसेच नामवंत उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेकरिता हजार स्पर्धक, परीक्षक, योग पंच, राष्ट्रीय सचिव व पालक अादींची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेत ६ ते ८० वर्षे वयोगटातील महिला व पुरुष सहभागी होणार आहेत. आजच्या युगात हेल्थ इज वेल्थचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने योगा कल्चर असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉ. यू. के. शर्मा, उपाध्यक्ष व्हीनस वाणी, सेक्रेटरी प्रज्ञा पाटील यांनी या स्पर्धेची माहिती दिली. स्पर्धेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, स्पर्धेचे नियोजन पूर्णत्वास आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिलच्या आर्थो विभागात पुन्हा ड्रेनेजचे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत ड्रेनेजचे पाणी घुसल्याने पेशंटसह कर्मचाऱ्यांना रात्रभर त्रास सहन करावा लागला. सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी साफसफाई केल्यानंतर पेशंटसह त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ड्रेनेज तुंबून घाण पाणी थेट वॉर्डात येण्याचा हा प्रकार नवीन नाही. सार्वजन‌िक बांधकाम विभाग आणि सिव्हिल प्रशासन मात्र एकमेंकाकडे बोट दाखवत असून, दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीच्या दुरावस्थेस जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिव्हिलसाठी नवीन इमारत बांधण्यात आली. इमारत एकदम चांगली असताना तिथे ड्रेनेजचा पुरता बोजवरा उडालेला दिसतो. काही दिवसांच्या अंतराने ड्रेनेज चोकअप होऊन सर्व पाणी थेट वार्डात पसरते. बुधवारी रात्री पाणी येण्यास सुरुवात झाल्याने आर्थो विभागातील पेशंट, नातेवाईकांसह हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. हे पाणी गुरूवारी सकाळी सफाई कर्मचाऱ्यांनी हटवले. दरम्यान, या इमारतीच्या मेन्टेनन्सचे काम सार्वजन‌िक बांधकाम खात्याकडे असून, वेळीच देखभाल दुरुस्ती झाल्यास हे प्रसंग उद्भवणार नाहीत, असा दावा सिव्हिल कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर फाटा व आगरटाकळी भागात पोलिसांनी छापा टाकून दहा जुगारींच्या मुसक्या आवळल्या. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवाईत साडेसात हजार रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी नाशिकरोड आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगरटाकळी येथील समतानगर भागात एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि. ३०) दौलत शिंदे यांच्या घरावर छापा टाकला असता रऊफ शेख व त्याचे तीन साथीदार तेथे पत्यांच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत होते. संशयितांच्या ताब्यातून एक हजार ६३० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. दुसरी कारवाई सिन्नर फाटा परिसरातील सिकलकर झोपडपट्टीत केली. बुधवारी दुपारी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता अमरसिंग पटेल याच्यासह सात जुगारी आकड्यावर जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून पाच हजार ९१० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

मोबाइल लंपास

किराणा दुकानातून खरेदी करून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील भामट्यांनी हिसकावून पोबारा केला. ही घटना विसेमळा भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विद्या पाटील (रा. रामदास कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. २९) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पाटील नजिकच्या दुकानात किराणा घेण्यासाठी गेल्या होत्या. खरेदी आटोपून मोबाइलवर बोलत त्या घराकडे पायी परत येत असताना त्यांच्या पाठीमागून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवर तिघे युवक आले. त्यापैकी एकाने त्यांच्या डोक्यात चापट मारली तर दुसऱ्याने पाटील यांच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पोबारा केला.

साऊंड सिस्टिम चोरी

रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोव्हाची काच फोडून चोरट्यांनी सुमारे १५ हजार रुपये किमतीची म्युझिक सिस्टिम चोरून नेली. ही घटना चौक मंडईत घडली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मसुज जमिर शेख (रा. नुरी चौक, चौक मंडई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेख यांची इनोव्हा (एमएच ०४ एफ झेड ८८२०) बुधवारी दुपारी नुरी चौकात पार्क केलेली असताना हा प्रकार घडला. अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून म्युझिक सिस्टिम चोरून नेली.

मंगळसूत्र खेचले

जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या सेवानिवृत्त महिलेच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र पल्सरवरील चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना अशोका मार्गावर घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शमा श्रीकांत घोलप (६६ रा. शिवाजीनगर, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बुधवारी (दि. ३०) रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण आटोपून घोलप अशोका मार्गावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधली. पुष्पराग अपार्टमेंट समोरून घोलप पायी जात असताना पाठीमागून लाल रंगाच्या पल्सरवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय नेतेही चौकशी फेऱ्यात?

$
0
0

सातपूर : कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात जगताप वाडीत अंडारोल विक्रेता कुणाल परदेशी याचा खून त्याच्याच मित्रांनी केला असल्याची घटना रविवारी उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी चार आरोपी चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले होते. अधिक तपास केल्यावर परदेशी खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी मालेगावपर्यंत गेला आहे. सातपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश आखाडे व सहकारी तपासाकरिता मालेगावला गेले होते. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी पोलिसांनी नकार दिला.

याबाबत राजकीय नेत्यांचीही चौकशी होणार केली जाणार असून, शिवसेना नगरसेवकांच्या जाहिरात फलकावर आरोपींचे फोटो झळकले होते. जगताप वाडीत माजी नगरसेवकांचे कार्यालय असल्याने खुटवड नगर येथे राहणारे खून करण्यासाठी आलेच कसे याचाही तपास पोलिस करत आहेत. तरी याबाबत आजी-माजी नगरसेवकांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती-पत्नीचे वाद कुटुंब कल्याण समितीसमोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेण्याचा प्रकार रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कुटुंब कल्याण समिती नेमली आहे. यापुढे कोर्टात तक्रार दाखल होण्यापूर्वी या समितीसमोर सुनावणी होईल. समितीने सकारात्मक अहवाल दिल्यानंतरच पोलिसांना संशयितास अटक करता येणार आहे.

कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली दाखल खटल्याच्या निकालावेळी सुप्रीम कोर्टाने प्रत्येक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कुटुंब कल्याण समितीची स्थापना करण्याबाबत निर्देश दिलेत. २७ जुलै रोजी कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा कोर्टाने ताबडतोब ही समिती नेमली केली. सदर समितीचे कामकाज जिल्हा कोर्टातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीमधूनच चालणार आहे. गुरुवारी सायंकाळी समितीच्या नाम फलकाचे अनावरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एन. पाठक, हेमा पटवर्धन, ललिता कमोद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पती-पत्नीचे म्हणणे ऐकणार

विवाहितेच्या पती व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाबाबत कलम ४९८ अ नुसार पोलिसांकडे किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात तक्रार करण्यात येते. मात्र, यापुढे आता दोन्ही बाजुंच्या पक्षकारांना कुटुंब कल्याण समितीसमोर हजर रहावे लागणार आहे. समिती सदस्य दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करतील. विशेष म्हणजे सदस्य आपले निरीक्षण देखील अहवालात नोंदवणार आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत पोलिसांना गुन्ह्यातील संशयितांना अटक करता येणार नाही. या समितीने आपला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, पूर्वावलोकन करणे, तसेच पुनर्गठण करण्याचे अधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या अध्यक्षांना असणार आहेत. सदर समितीच्या उद््घाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के आणि मुख्य न्यादंडाधिकारी एस. टी. डोके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोल ‘अनकंट्रोल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूसह रोगराई फैलावत असतानाही पेस्ट कंट्रोल ठेकेदार धूर फवारणी व औषध फवारणी करीत नसल्याचा आरोप स्थायी समितीच्या सदस्यांनी गुरुवारी केला. ठेकेदाराने अटी व शर्तींचा भंग केल्याचा आरोप करीत ठेका रद्द करण्याची मागणी सदस्यांनी एकमुखाने केली.

संबंधित ठेेकेदाराला आतापर्यंत १४ लाखांचा दंड अटीचा भंग केला म्हणून झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. विभागाने ठेकेदारांची बाजू घेतल्याने सदस्य संतप्त झाले. त्यामुळे सभापतींनी सदरील ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याचे आदेश दिले, तर अतिरिक्त आयुक्तांनी ठेकेदाराला तात्काळ नोटीस बजावली जाईल, असे आश्वासन दिले.

शहरात रोगराईचे साम्राज्य पसरले असतानाही धूर फवारणी, तसेच औषध फवारणी होत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी बैठकीत उपस्थित केला. स्थायीच्या सर्व सदस्यांनी सभापतींना पत्र देऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर मलेरिया विभागाने ठेकेदाराला आतापर्यंत १४ लाख ३८ हजार रुपयांचा दंड झाल्याचा आरोप केला. फवारणी वेळेत न करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन थकविणे, पूर्ण वेळ काम करणे अशा तक्रारींप्रकरणी कारवाई केल्याचा दावा केला. त्यावर सदस्यांनी हे अटी व शर्तींचेच उल्लंघन असल्याचे सांगत ठेका रद्दची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, तरीही विभागाने ठेकेदाराचे काम चांगले असल्याचा दाखला दिला. त्यावर सभापतींनी ठेकेदाराची बाजू घेणाऱ्या विभागाला झापले. औषधे पुरविण्यावरही सदस्यांनी आक्षेप घेतला. जगदीश पाटील यांनी औषधे कोण पुरविते आणि त्याची तपासणी केली जाते का, याबाबत जाब विचारला. त्यावर सभापतींनी सदस्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करता येईल का, याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याचा आदेश दिला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून ठेकेदाराला तात्काळ नोटीस बजावली जाईल, असे सांगितले.

---

बिनकामाचे वकील बदला!

महापालिकेच्या पॅनलवर वकिलांच्या मानधनावरील नियुक्तीचा विषय ठेवण्यात आला होता. परंतु, सदस्यांनी वकिलांच्या कामावर आक्षेप घेतला. काही वकील वर्षानुवर्षे खटले रखडवीत असल्याचा आरोप सूर्यकांत लवटे यांनी केला. नाशिकरोड येथील एक केस १५ वर्षे रखडल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी निष्क्रिय वकिलांना पॅनलमधून वगळा, असा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसम नदी प्रदूषणप्रकरणी वॉरंट

$
0
0

हरित लवादाकडून नगरविकासच्या सचिवांना तंबी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहराच्या मोसम नदीपात्रात गटारीचे पाणी मिसळून होणारे प्रदुषण, शहरातील अस्वच्छता तसेच कचरा डेपोची देखभाल व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यात होत असलेला विलंब याप्रकरणी हरित लवादाकडे येथील शेख रशीद चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी (दि. २८) सुनावणी झाली. याप्रकरणी हरित लवादाने राज्याच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना वॉरंट जारी केला आहे. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शहरातील अस्वच्छता भूमिगत गटारींच्या अभावामुळे सांडपाणी मोसम नदीपात्रात मिसळते. तसेच म्हाळदे शिवारातील कचरा डेपोतील निचराही थेट गिरणा नदीपात्रात होवून थेट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात येऊन मिळते. परिणामी मालेगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शहरातील शेख रशीद चॅरिटेबल ट्रस्टने हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल केली होती.

या दाखल याचिकेवर लवादाने महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, शहर विकास मंत्रालय, दिल्ली यांच्यावर मोसम व गिरणा नदीच्या जलप्रदूषणाची जबाबदारी निश्चित करून याबाबत दि. ८ ऑगस्ट रोजी खुलासा करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सोमवारी (दि. २८) रोजी झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायाधीश यु. डी. साळवी व तज्ञ प्रतिनिधी डॉ. पी. सी. मिश्रा यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला. त्यांनी या सुनावणीला राज्याचे नगरविकास विभागाचे सचिव उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होणार असल्याचेही लवादाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशभक्तांनी फुलले रस्ते

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सिडकोतील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असून, त्यामुळे परिसरातील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून जात आहेत. सिडकोतील मंडळांकडून यंदा धार्मिक देखाव्यांबरोबरच प्रबोधनपर देखाव्यांवर भर दिल्याचे दिसून येत आहे.

सिडको भागात दर वर्षीप्रमाणे शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांनी देखावे साकारून गणरायांची प्रतिष्ठापना केली आहे. पाथर्डी, अंबड या नव्याने विकसित होत असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणावर देखावे साकारण्यात आले आहेत.

स्वामी विवेकानंदनगर येथील मैदानावर साकारण्यात आलेल्या राजवाड्याचा देखावा हा सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. शुभम पार्क येथे शिवराज युवक मित्रमंडळातर्फे कुंभकर्णाचा देखावा साकारण्यात आला आहे. शिवसेनाप्रणीत व्यंकटेश फाउंडेशनतर्फे, तसेच अंबड पोलिस ठाणे परिसरातील शिवसाई मित्रमंडळानेही आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सावतानगर येथील श्री साई समर्थ युवामित्र मंडळातर्फे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

सिडकोतील बहुतांश मंडळांकडून यंदा प्रबोधनपर देखावे साकारण्यासह नियमांचेही काटेकोर पालन केल्याचे दिसून आले आहे. महापालिका आणि पोलिसांच्या अटी व नियमांचे बहुतांश मंडळांनी योग्य पालन केल्याने, तसेच पोलिस बंदोबस्तामुळे वाहतुकीस अडथळा होत नसल्याची स्थिती आहे. मात्र, भाविकांच्या गर्दीमुळे वाहनतळाचा प्रश्न निर्माण झाल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.

--

प्रबोधनपर देखाव्यांवर भर

सिडको परिसरातील मंडळांनी यंदा धार्मिक देखाव्यांसह समाजप्रबोधनपर देखाव्यांवरही भर दिसल्याचे चित्र आहे. वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक होण्यासाठी नागरिकांनी काय करावे, शहरातील नद्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी काेणत्या उपाययोजना कराव्यात आदी संदेश देणारे देखावे अनेक मंडळांनी साकारले आहेत. या देखाव्यांबरोबरच मंडळांच्या परिसरातील विविध खेळण्यांचेही भाविकांमध्ये आकर्षण दिसून येत आहे. बच्चेकंपनीसह पालकही त्याचा आनंद लुटत आहेत आहे.

--

इंदिरानगरला अवतरली जत्रा

इंदिरानगर ः दर वर्षीप्रमाणे यंदाही इंदिरानगर भागात गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांनी गणेश आरास करण्याबरोबरच विविध खेळणी उभारल्याने इंदिरानगर परिसराला जणू जत्रेचे स्वरूप आले आहे. देखावे पाहण्यासह तेथील खेळण्यांचा आनंद लुटण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

राजीवनगर येथे युनिक ग्रुपतर्फे आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, मंडळाच्या जागेत विविध प्रकारची खेळणी उभारण्यात आली आहेत. परिसरात विविध बचतगट व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंचे स्टॉल उभारल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. कलानगर येथे इंदिरानगर गणेशोत्सव मंडळातर्फेही खेळणी उभारण्यात आली असून, मुले, मुली व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना बक्षिसांचेही वाटप करण्यात येत आहे. विनयनगर येथे वाहतूक व्यवस्थापनाची माहिती देणारा देखावा साकारण्यात आला आहे. रथचक्र चौकात अजय मित्रमंडळातर्फे आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. इंदिरानगर भागात कोणत्याही मंडळाने भव्य देखावा उभारला नसला, तरी छोट देखावे व आकर्षक मूर्ती आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेसेवा अखेर ‘रुळावर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही विस्कळीतच होती. कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याने तसेच प्रवाशांचीही गैरसोय होत असल्याने अपघातग्रस्त भागात सिंगल लाइनवरुन रेल्वेगाड्या चालवण्याचा धोका रेल्वेने पत्करला. त्यामुळे पंचवटीसह प्रमुख गाड्या दोन दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर मुंबईला पोहचू शकल्या. गुरुवारी मुंबईकडून नाशिकच्या दिशेने (डाऊन) वाहतूक सुरू झाली असली, तरी मुंबईच्या दिशेने (अप) वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. शुक्रवारपर्यंत अपलाइनही सुरळीत होण्याची शक्यता आहे.

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह सहा डबे आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान तीन दिवसांपूर्वी पहाटे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दोन दिवस पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या नाशिककरांच्या गाड्या धावल्याच नाहीत. रेल्वे प्रशासनाने गेले दोन दिवस युद्धपातळीवर प्रयत्न केल्यामुळे या गाड्या सुरू झाल्या. त्यामुळे नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सात ते आठ तास विलंबाने धावत होत्या. जनशताब्दी नाशिकरोडपर्यंतच आली. गुरुवारीही काही गाड्या पुणे-दौंडमार्गे वळवण्यात आल्या.

स्थानकावर गर्दी

रेल्वे गाड्या धावू लागल्याने प्रवाशांनी नाशिकरोड स्थानकावर मोठी गर्दी केली होती. स्थानकाला जत्रेचे स्वरुप आले होते. सर्व गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या संयमाची परीक्षा झाली. गाड्यांची माहिती देण्यासाठी नाशिकरोडसह प्रमुख स्टेशनवर मदतकक्ष उभारण्यात आला होता. पंचवटी धावल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक प्रवाशांनी रेल्वेवर विसंबून न राहता बस व खासगी वाहनांनी मुंबईला जाणे पसंत केले. काही प्रवाशांनी आरक्षण बदलून घेत दोन दिवसांनी प्रवास करण्याचे नियोजन केले.

रद्द केलेल्या गाड्या

१५०६५ गोरखपूर पनवेल, १२०७२ जालना दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, १२५४२ गोरखपूर मुंबई, १५६४६ गुहावटी एक्स्प्रेस.

लेट गाड्या (कंसात उशीर)

११०१६ कुश नगर (१२ तास), १२१८७ जबलपूर गरीबरथ (३ तास), १२६२८ मंगला एक्स्प्रेस (७ तास), १३२०१ पटना एक्स्प्रेस (७ तास), ११०९४ महानगरी (४ तास), १२३२१ हावडा मेल (६ तास), १२१४२ पाटलीपुत्र एक्स्प्रेस (४ तास),११०५६ गोदान एक्स्प्रेस (३ तास).

कर्मचाऱ्यांची मेहनत

मध्यरेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी नाशिकरोड, मनमाड, इगतपुरीसह सर्व प्रमुख स्थानकातील अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यामुळेच तिसऱ्या दिवशीतरी वाहतूक पूर्ववत झाली. मदत कक्षामध्ये प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करणे, गाड्यांची स्थिती सांगणे, तिकिटाचे पैसे परत करणे आदी कामे हे कर्मचारी जागरुकतेने करत होते.

जर्मन कोच वरदान

याच महिन्यात उत्तरप्रदेशात उत्कल एक्सप्रेसचे दहा डबे सदोष रुळामुळे घसरून झालेल्या अपघातात २३ जण ठार झाले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी आसनगावजवळ दुरांतोचे सहा डबे उलटूनही कोणतीही जीव‌ितहानी झाली नाही. याचे श्रेय चालकाबरोबरच जर्मन तंत्राने बनवलेल्या आधुनिक डब्यांनाही जाते. हे डबे हलके असून त्यांचे सप्शेन्शनही अधिक भार पेलणारे व मजबूत आहे. दोन डब्यांतील अंतरही कमी करण्यात आले आहे. यामुळेच अपघातानंतर डबे एकमेकांवर चढले नाहीत.

सर्वांची कळी खुलली

रेल्वे सुरळीत झाल्याने नाशिकरोड स्थानकातील व्यावसायिकांची कळी खुलली. कुली, रिक्षा व टॅक्सीचालकांची रोजीरोटी सुरू झाली. नाशिकरोड बसस्थानकातून दररोज सुमारे पाच हजार प्रवासी प्रवास करतात. सुमारे आठ ते दहा लाखांचा महसूल एसटीला मिळतो. गेल्या दोन दिवसांत प्रवासीसंख्या निम्म्याच्या खाली आली होती. ती गुरुवारी वाढली. याच रेल्वेस्थानकातून दिवसाला सुमारे पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. शंभरावर ट्रेन धावतात. दोन दिवस प्रवासी व मालवाहतूक ठप्प झाल्याने मध्य रेल्वेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला. वाहतूक सुरू झाल्याने रेल्वेसह सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांची कळी खुलली.


दोन दिवसांनी का होईना पंचवटी धावू शकली. रेल्वे प्रशासानाला त्याबद्दल धन्यवाद. विविध कारणांमुळे पंचवटीच्या प्रवाशांवर अन्याय होतो. दुरांतो, जनता व मंगला एक्सप्रेसपेक्षाही पंचवटी महत्वाची गाडी आहे.

- प्रसाद पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेच्या प्रश्नांवरून गोंधळ

$
0
0

धुळे मनपाची सभा वादळी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न, डेंग्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव आणि शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे जोरदार पडसाद गुरुवारी (दि. ३१) महापालिकेच्या महासभेत उमटले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी मनपा प्रशासनावर कठोर शब्दात टीका करीत नागरिक आता नगरसेवकांना शहरातील स्वच्छतेबाबत जाब विचार आहेत, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

धुळे मनपा महासभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली त्यावेळी महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेद अन्सारी, आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसचिव मनोज वाघ, स्थायी सभापती कैलास चौधरी, सभागृह नेता कमलेश देवरे, गंगाधर माळी, इंदूबाई वाघ यांच्यासह सर्व नगरसेवक, सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अमोल मासुळे, संजय गुजराथी यांनी महासभा सुरू झाल्यानंतर उपायुक्त रवींद्र जाधव यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. गेल्या महिन्याभरापासून शहरातील स्वच्छता आणि वाढत्या रोगराईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनेक प्रभागांमध्ये कोणतेही विकासकामे होताना नागरिकांना दिसत नाही. तसेच शहरात ठिकठिकाणी नियमित साफसफाईदेखील केली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी यावेळी केला. त्यात पावसाळ्यानंतर अनेक भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. स्वाईन फ्लू व मलेरिया आजाराने डोके वर काढले आहे. असे असतांना देखील मनपा प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता व डासांचे प्रमाण कमी होण्यासाठी फवारणी केली जावी, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. जर मनपा प्रशासनाने याविषयी गंभीर दखल घेतली नाही तर अधिकाऱ्यांना मनपात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मात्र प्रशासनाने अखेर नगरसेवकांच्या मागण्याकडे लक्ष वेधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्यधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर नगरसेवक शांत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्ट्रीट डिझायनरच्या निविदा वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील रस्त्यांची नियोजनबद्ध रचना करण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या सल्लागार संस्थेच्या निविदेवरच स्थायी समितीने शंका उपस्थित करत, कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या सल्लागार संस्थांनी रिंग केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. सोबतच एकच काम तीन ठेकेदारांना देण्याच्या प्रशासनाच्या अजब प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे स्ट्रीट डिझायनर नियुक्तीची निविदाच वादात सापडली आहे.

शहरातील आर्किटेक्ट मोफत काम करायला तयार असताना कन्सल्टंट संस्थेवर कोट्यवधींची उधळण का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने सादर केलेल्या डॉकेटमध्ये कोणत्या रस्त्यांची सुधारणा करणार, याची सविस्तर माहिती दिली नसल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, विषय तहकूब केल्याने प्रशासनाला झटका बसला आहे.

शहरातील महत्वाचे रस्ते सुधारण्यासाठी आवश्यक बाबींचे योग्य नियोजन करण्यासाठी पालिकेकडून स्ट्रीट डिझायनर कन्सल्टंट नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आल्या होत्या.वाढत्या लोकसंख्येनुसार शहरातील रस्त्यांचे डिझाइन कसे असावे, चौक व धोकेदायक पॉइंट काढून देणे व सुशोभिकरण करणे या बाबी कन्सल्टंटमार्फत सुचवल्या जाणार आहेत. त्यासाठी तीन निविदाधारक पात्र ठरवत प्रशासनाने या संस्थांना काम देण्याचा प्रस्ताव स्थायीवर सादर केला होता. अहमदाबादस्थित आर्या आर्किटेक्ट, मुंबईस्थित रतन जे बाटलीबॉय व नाशिकमधील एनव्हारोन प्लॅनर्स या तीन संस्थांना काम देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. १२ मीटर रस्त्याच्या एक किलोमीटरसाठी ६ लाख ते ४५ मीटरच्या रस्त्यांसाठी ७.८५ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव होता.

प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावावर मात्र स्थायीचे सदस्य तुटून पडले. भाजपचे शश‌िकांत जाधव यांनी या प्रस्तावाची चिरफाड करत, किती रस्त्यांचे काम करणार, याची माहिती का दिली नाही असा प्रश्न विचारला. शहरात २७०० किलोमीटर रस्ते असून, त्यापैकी दिलेल्या दरात पाचशे किलोमीटरचे काम केले तरी ४० कोटी रुपये खर्च येतील, असे सांगत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे दोनशे कोटी कुठून येणार, असा सवाल त्यांनी केला. तीन संस्थांना एकाचवेळी काम कसे, असा सवाल त्यांनी केला. मनपाकडे चांगले अभियंते आहेत, तसेच आर्किटेक्टही मोफत काम करायला तयार असताना बाहेरील सल्लागारांची मदत घेण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला. मुशीर सैय्यद यांनी हे भ्रष्टाचाराचे रॅकेट असून, रिंग करून संस्थांनी काम मिळवल्याचा आरोप केला. हा प्रस्ताव भ्रष्टाचाराचा नमुना असून यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप करत त्याची चौकशीची मागणी केली आहे.शहर अभियंता यु.बी.पवार यांनी हा वेगळा प्रयोग असल्याचे ते म्हणाले. आयुक्तांच्या आदेशाने प्रस्ताव सादर केल्याचा खुलासा केला. महत्वाचेच रस्ते केले असल्याचे सांगत त्यांनी प्रस्तावाची बाजू मांडली. परंतु, सभापतींनी त्यांची मागणी फेटाळत सव‌िस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, प्रस्ताव तहकूब ठेवला.

प्रस्तावच गोल गोल

प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावात शहरातील किती किलोमीटरच्या रस्त्यांचे नियोजन करणार, याची माहिती देण्यात आली नव्हती. नऊ कन्सल्टंट नेमणार असतानाही त्याचा सविस्तर उल्लेख नाही. पाच वर्ष काम दिले जाणार असताना एवढी वर्ष का असा सवाल सदस्यांनी केला. ढोबळ मंजुरी दिली तर तुम्ही कोणतेही रस्ते घेऊन कोट्यवधी खर्च करणार असा प्रश्न सभापतींनीच उपस्थित केला. त्यामुळे स्पष्ट डॉकेट सादर केल्यानंतरच विचार करू, असे सांगत स्थायीने प्रशासनाला जोरदार झटका दिला.

रस्त्यांना आरसा लावणार का?

शहरात चांगले रस्ते असतानाही, रस्त्यांची सुधारणा म्हणजे काय, असा सवाल करत सदस्य जगदीश पाटील यांनी तुम्ही या रस्त्यांवर आरसे बसवणार का, असा टोला प्रशासनाला लगावला. एखाद्या ठेकेदाराला पैसे द्यायची घाई कशी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे डॉकेट असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या पॅनलवरील आर्किटेक्टकडूनच काम करून घेतले तर पैसे वाचतील, असे सांगत डॉकेटच गोल-गोल असल्याचा आरोप त्यांनी केला. एकाच वेळी तीन संस्थांना काम देण्याचा अजब निर्णय अन्य निविदांना का लावत नाही, असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० बस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाभरात बदल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य परिवहन महामंडळाने सिटी बसच्या फेऱ्या कमी केल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या ४० ड्रायव्हर व कंडक्टरच्या जिल्ह्यातील इतर ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्यानंतर कामगार संघटनेने विरोध केल्यानंतर प्रशासनाने बदल्या कराव्या लागणार असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर कामगार संघटनेने आठ दिवसात बदली करणाऱ्यांची नावाची आम्ही चर्चा करून नावे देणार असल्याचे सांगितल्यानंतर प्रशासनाने त्याला संमती दिली आहे. या बदल्या झालेल्या कर्मचारीमध्ये २० ड्रायव्हर व २० कंडक्टर आहेत.

दहा दिवसांपूर्वीच एसटीच्या वाहक व चालकांनी अचानक संप पुकारला होता. त्यात नादुरुस्त बसेस चालविताना वाटणारा धोका व ऐनवेळी शेड्यूल बदलून चालक व वाहकांना रजेचा अर्ज भरण्यास सांगणे ही दोन कारणे सांगितली होती. पण, त्यानंतर प्रशासने आपली भूमिका स्पष्ट करत फेऱ्या कमी झाल्याने फेब्रुवारीपासूनच या बदल्या करण्याचे निश्चित केले. याबाबत कामगारांना सूचना करून त्यांना इच्छितस्थळांचे अर्ज करण्यासही सांगण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

सिटी बस तोट्यात असल्यामुळे एसटीने अगोदरच अनेक मार्गावरून सेवा बंद केली आहे. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात फक्त १४५ बसेस धावत असल्या तरी त्यातील काही नादुरुस्त आहे. त्यामुळे त्यावरील वाहक व चालकांची संख्या कमी करण्यासाठी या बदल्या केल्या असल्याचे बोलले जात आहे. एसटीला सातत्याने तोटा सहन होत असल्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय त्यांनी याअगोदरच घेतला आहे. त्यात फक्त नाशिक नाही तर राज्यातील सहा ठिकाणी ही बससेवा बंद केली जाणार आहे. त्याची तयारीही एसटीने सुरू केली आहे. त्यात नाशिकमध्ये टप्‍प्या-टप्‍प्याने ही सेवा बंद केली जात आहे.त्यामुळे त्याचा फटका आता कर्मचाऱ्यांनाही बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणी-सापुतारा मार्गाचा नवा वाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वणी-सापुतारा मार्गाच्या विस्तारीकरणाच्या हालचाली सुरू असताना आता या हायवेच्या जमिनीचा वाद समोर आला आहे. रस्त्यासाठी जमीन संपादीत करून त्याचा मोबदला ८० वर्षानंतरही दिला नसल्याचे पिंपळगाव-सापुतारा मार्गावरील जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.
पीडित शेतकऱ्यांनी या नोटिसांमुळे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची थेट भेट घेत आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे अगोदर असलेल्या रस्ताही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असल्याचे या शेतकऱ्यांनी दावा केला आहे.

जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील भूसंपादनाला शेतकरी विरोध करत असताना आता पिंपळगाव-सापुतरा मार्गावरील माळेदुमला, पांडाणे, चौसाळे, पिंप्री अचंला येथील शेतकऱ्यांनी नव्या रस्त्याला विरोध केला आहे. या विरोधासह त्यांनी अगोदर बेकायदेशीर संपादित केलेल्या जमिनीचे पैसे अदा करण्याची मागणी केली आहे. हे पैसे अदा केल्यानंतर नव्या जमीन संपादन करण्याचा विषयावर बोलू असेही त्यांनी सांगितल्यामुळे हा विषयही आता प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहे. अगोदर ७ मीटर असलेला हा नवा रस्ता आता १० मीटर करण्यात येणार आहे. पण या तीन म‌ीटरमध्ये या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा, घरे व दुकाने आहे. त्यामुळे त्यांचा विरोध तीव्र आहे.

जिल्हा प्रशासनासाठी नवी डोकेदुखी
पिंपळगाव बसवंत ते सापुतरा या ६० किलोमीटरवरील राष्ट्रीय मार्गावर पिंपळगाव-वणी-सरड असा ४० किलोमीटरचा क्राँक्रिट मार्ग होणार आहे. त्यासाठी १५३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पण या रस्त्याच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. १९३६ मध्ये झालेल्या या मार्गावर नंतर बदल करण्यात आला. परंतु, त्याची अद्याप फारशी नोंद नाही. त्यामुळे हा रस्ता कोणाच्या शेतीतून गेला किंवा नवीन भूसंपादनात कोणाची जमीन जाते याबाबत मोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा प्रशासन या अगोदर समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनावरून विरोध झेलत असताना हा वाद निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विखे पाटलांची कॅम्पसकडे धाव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यात केवळ कॉलेज कॅम्पस भेटींचेच नियोजन आहे. यामुळे आगामी विद्यापीठ निवडणुकांची पार्श्वभूमी या दौऱ्याच्या आखणीला असावी का, याबाबतची चर्चा शहरातील कॅम्पसमध्ये रंगली आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार यंदा राज्यातील सर्व कॉलेज कॅम्पसमध्ये खुल्या निवडणुका पार पडणे अपेक्षित आहे. यासाठी कॉलेज कॅम्पसला निवडणुकांची ओढ लागली आहे. कॉलेज कॅम्पसमधील खुल्या निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर होत असल्याने निवडणुकांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडूनही विद्यापीठांना वारंवार विचारणा होत आहे. दरम्यान, पुणे विद्यापीठाने सिनेट निवडणुकीची सूचना काढली असून ही निवडणूक ८ ऑक्टोबर रोजी होऊन १० ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. सिनेटच्या रचनेत यंदापासून विद्यार्थ्यांनाही प्रतिनिधित्व असणार आहे. कॅम्पसमधील निवडणूक खुल्या पध्दतीने घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विविध राजकीय पक्ष प्रेरीत विद्यार्थी संघटनांचे या निवडणूकांवर लक्ष आहे. गल्ली ते दिल्ली भाजपच्या वर्चस्वास शह देण्यासाठी कॅम्पस निवडणुकांपासून श्री गणेशा करण्याचे तंत्रही विरोधकांकडून अवलंबिले जाणे शक्य आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (१ सप्टेंबर) सकाळी ८.३० च्या सुमारास सिन्नर तालुक्यातील सर विश्वेश्वरैय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग, चिंचोली येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भेट देणार आहेत. यापाठोपाठ नाशिकमधील ब्रह्मा व्हॅली कॉलेज कॅम्पसमध्येही सुमारे तासभर त्यांची उपस्थिती असणार आहे.

राजकीय घडामोडींचा ट्रेंड
तीन वर्षांपूर्वी केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर देशभरातील शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थी संघटनांमध्येही ठिणग्या उडाल्याचे ‌चित्र आहे. दिल्लीतील जेएनयू प्रकरणापाठोपाठ हैदराबाद महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्येही संघटनांमधील वादाचे प्रतिबिंब उमटले. नुकत्याच झालेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीलाही राजकीय रंग देण्यात आला. शिक्षण संस्थांमध्ये राजकीय घडामोडींचे केंद्र बघण्याचा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा ट्रेंड पाहता आजही कॅम्पसभोवती घुटमळणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांचा दौरा या निमित्ताने चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images