Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कॅमल हाऊससमोर घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. द्वारका भागातील कॅमल हॉऊससमोर ही घटना घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित भिकाजी जाधव (रा. आशियाना पार्क) यांनी तक्रार दिली आहे.

शुक्रवारी सकाळी जाधव कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे सात तोळे वजनाचे व दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक रमेश पवार करीत आहेत.

बदनामी प्रकरणी अटक

मैत्र‌णिी समवेत काढलेल्या सेल्फीचा अश्लिल फोटो तयार करून युवतीची बदनामी केल्याप्रकरणी मखमलाबाद राजवाड्या शेजारी राहणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये वियनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक संजय कटारे (रा.मोरेश्वर बिल्डींग, रॉयल अपार्ट.) असे संशयित युवकाचे नाव आहे. माणेकशानगर भागातील १९ वर्षीय युवतीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. युवतीच्या तक्रारीनसार युवक आणि पीडीत युवती एकाच संस्थेत शिक्षण घेत आहे. त्याच्यात मैत्री होती. याकाळात संशयिताने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने फोटो काढले होते. या फोटोंची मिक्स‌िंग करीत त्याने अश्लिल फोटो तयार केले व मित्र मंडळी आणि मुलीच्या नातेवाईकांना सोशल मीडकयाच्या माध्यमातून पाठविले. तसेच त्याने मुलीशी मोबाईलवर अश्लील भाषा वापरून वांरवार पाठलाग करून मारहाण करीत विनयभंग केल्याचे युवतीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल लांबविला

रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या पर्समधील मोबाइल भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना मेहर सिग्नल ते सांगली बँक दरम्यान घडली. या प्रकरणी स्वाती संजय जोशी (रा.अंजनीनगर, पाइपलाइन रोड) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्या नोंदविला.गुरुवारी दुपारी जोशी मेहर सिग्नलकडून पायी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या पर्समधून मोबाइल पळविला.

जॉर्ज साळवे जेरबंद

हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणाऱ्या जॉर्ज संजय साळवे (रा. रचना विद्यालय मागे, हिल्स कॉलनी, शरणपूररोड) यास पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली. महिनाभरापूर्वीच पोलिसांनी त्यास याच कारणास्तव अटक केली होती. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठपोलिसांकडून गस्त सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास क्राईम ब्रँच युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे आपल्या पथकासह गस्तीवर असताना त्यांना जार्जबाबत माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्लब हाऊसची दैना संपेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेची स्थापना होण्याअगोदर दिवंगत नगराध्यक्ष रामचंद्र निगळ यांनी क्लब हाऊसची संकल्पना मांडली होती. महापालिकेची स्थापना झाल्यावर माजी नगरसेवक तथा सभापती दिलीप निगळ यांनी सातपूर क्लब हाऊसची उभारणी केली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले क्लब हाऊस धूळखात पडून आहे. यामुळे क्लब हाऊसची दैना कधी संपणार, असा सवाल खेळाडूंकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने पडून असलेली क्लब हाऊसची इमारत योग्य कामासाठी द्यावी अशी मागणी खेळाडूंनी केली आहे.

सातपूर भागात व्‍यायामासाठी महापालिकेने भव्य असे क्लब हाऊस उभारले आहे. गेल्या काही वर्षांपासून धूळखात पडून असलेल्या सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, इमारतीचा मात्र वापर होत नसल्याने तिचा योग्य कामासाठी वापर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

क्लब हाऊसची उभारणी करताना महापालिकेने दोन जिम बांधल्या होत्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा राखून महिला व पुरुषांसाठी जिमची उभारणी करण्यात आली होती. तसेच टेबल टेनिस व बॅडमिंटन हॉलही तयार करण्यात आले होते.

शूटिंग रेंजसाठी हॉल

सध्या केवळ नाममात्र दराने शूट‌िंगसाठी एक्सएल क्लबला हॉल देण्यात आला आहे. माजी महापौर तथा आमदार बाळासाहेब सानप यांनीदेखील लाखो रुपयांचा निधी शूटिंग क्लबला दिला होता. महापालिकेने ५० मीटर

शूटिंगसाठी रेंज तयार केली होती. शूटिंग क्लबसाठी लागणारा हॉल नाममात्र दराने दिला गेला असताना उर्वरित जागा इतर खेळांसाठी महापालिकेने द्यावी, अशी मागणी खेळांडूनी केली आहे. सातपूर क्लबमध्ये उभारण्यात आलेल्या

वास्तूंपैकी केवळ जलतरण तलावाकडूनच महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे टेनिससाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून कोर्ट उभारले होते. त्याचा योग्य वापर होत नसल्याने टेनिस कोर्टही धूळखात पडून असल्याचे चित्र आहे.


महापालिकेने सातपूरकरांसाठी अतिशय सुंदर अशी क्लब हाऊसची वास्तू उभारली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून क्लब हाऊसची इमारत धूळखात पडून असल्याने ती खेळांडूसाठी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. स्थानिक

नगरसेवक व महापालिकेकडे यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- ज्ञानेश्वर निगळ, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी संवर्धन कक्षालच कुलूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे नागरिकांना थेट उच्च न्यायालयात जाऊन हा प्रश्न मांडण्याची वेळ आली. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी गोदावरी प्रदूषणाच्या बाबतीत महापालिकेला आदेश काढल्यानंतर महापालिकेने गोदावरी संवर्धन कक्षाची मोठ्या थाटात स्थापना केली. या कक्षाचे कार्यालय रामकुंड येथील वस्त्रांतर गृहात सुरू केले. मात्र, थोड्याच दिवसांत या कार्यालयाला कुलूपबंद अवस्थेत ठेवण्यात आले आहे.

केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिध्द असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या भागातील गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेने या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे याविषयी दाद मागण्यासाठी गोदाप्रेमी देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेला आदेश काढल्यानंतर गोदावरी संवर्धन कक्षाची महापालिकेने स्थापना केली. गोदावरी नदीच्या पात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली.

गोदावरी संवर्धन कक्षाचे कामकाज सुरुवातीला पंचवटी विभागीय कार्यालयातून करण्यात आले. त्यानंतर रामकुंडावरील वस्त्रातंर गृहात हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात फर्निचर बनविण्याच्या निविदाही काढण्यात आल्या. काही दिवस येथून स्वच्छतेच्या बाबतीतील कामकाजाची नोंदही केली गेली. गोदावरीच्या स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याचे महापालिकेने ठरविले होते. गेल्या महिनाभरापासून या कार्यालयास कुलूप लावण्यात आलेले आहे. गोदावरी नागरी सेवा समितीचे पदाधिकाऱ्यांच्या ही बाब गुरुवारी लक्षात आली. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी थेट राजीव गांधी भवनात जाण्याची वेळ आली.


रामकुंड येथील गोदावरी संवर्धन कक्षाचे नाशिक महापालिका प्रशासनाने मोठ्या थाटात उद््घाटन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. गोदावरी संवर्धन कक्षातून गोदावरी नदी व उपनद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न होणार होता. पण याच कक्षाच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आलेले आहे.

- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किनो सोसायटीतर्फे शिक्षा पुरस्कार जाहीर

$
0
0

प्रदीप भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण व उपक्रमशील कार्य करणाऱ्या शिक्षक व शाळांना किनो शिक्षा गौरव जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतो. यंदा प्रदीप भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला असून, उत्कृष्ट शाळा म्हणून फांगदर प्राथमिक शाळेस पुरस्कार जाहीर केला आहे.

किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे एकूण पंधरा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येत असून, राज्यस्तरीय पुरस्कार प्रदीप भोसले यांना तर उर्दूसाठी मोह. फारूक यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट शाळा म्हणून फांगदर प्राथमिक शाळा (देवळा) तर तालुकास्तरीय उत्कृष्ट शाळा म्हणून खडकी प्राथमिक शाळा (ता. मालेगाव) यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव रईस शेख यांनी दिली.

शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील असलेल्या शिक्षकांचा किनो दोन वर्षांपासून गौरव करते. यावर्षी जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांत तीन शिक्षक मालेगाव तालुक्यातील आहेत. तसेच राज्यातील एक शिक्षक तसेच दोन शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि ८ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या अल कबीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.


जिल्हास्तरीय पुरस्कारार्थी शिक्षक

देवीदास कदम (सटाणा), विलास गवळे (नाशिक), प्रकाश चव्हाण (निफाड), ज्ञानदेव नवसरे(पेठ), वर्षा चौधरी (इगतपुरी), नीलेश भामरे (कळवण), प्रदीप देवरे (चांदवड), नामदेव बेलदार (त्र्यंबकेश्वर), विलास जमदाडे (दिंडोरी), देविदास शेवाळे (देवळा), हनुमंत काळे (येवला), गोरक्ष सोनवणे, (सिन्नर), वैशाली भामरे , दीपक हिरे, नीलेश नाहिरे (मालेगाव).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृतची नियुक्ती पुन्हा लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांचीही निवड होणे अपेक्षित असतांना तब्बल सहा मह‌िने उलटूनही स्वीकृतच्या निवडीला मुहूर्त लागत नाही. प्रशासनाने सुरू केलेल्या स्वीकृतच्या नियुक्ती प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ही निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून, त्यासाठी आता मह‌िनाभराचा अवधी देण्यात आला आहे. निवडीसाठी आता सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. भाजपच्या कोट्यात तीन जागा असताना इच्छुकांची संख्या मात्र दीडशेच्या वर आहे. त्यामुळे भाजपकडूनच या निवडीसाठी चालढकल केली जात आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. पालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे आहेत. सद्यःस्थितीतील तौलनिक संख्याबळानुसार २४ः४० चा कोटा असून, त्यानुसार भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ सदस्य स्वीकृत सदस्यांची निवड होऊ शकते. कमी संख्याबळामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला स्वीकृत पदासाठी संधी नाही. परंतु, भाजप व शिवसेनेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठी स्पर्धा आहे. विशेषतः सत्तेत असलेल्या भाजपला तर स्वीकृतची मोठी डोकेदुखीच झाली आहे. पक्षाकडे तीन जागांसाठी जवळपास दीडशे जण इच्छुक असल्याने भाजपकडून ही निवड लांबणीवर टाकली जात आहे.

गेल्या मह‌िन्यात प्रशासनानेच या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी आता सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी क्षेत्रातील अनुभव ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यासाठी अटी-शर्तींचीही निश्चिती करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपर्यंत इच्छुकांकडून अर्जही मागविण्यात आले होते. परंतु, दिलेल्या मुदतीत पालिकेकडे अर्ज आले नाहीत. परिणमी, प्रशासनाला पुन्हा अर्जांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार असून, आता निवडीसाठी सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. स्वीकृतचे राजकारण मह‌िनाभर तरी थंड बस्त्यात जाऊन भाजपची डोकेदुखी कमी होणार आहे.

एक वर्षाचा प्रस्ताव?

नियमानुसार, स्वीकृत नगरसेवकाचा कालावधी पाच वर्षांसाठी असतो. परंतु, भाजप तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी एकेक वर्ष करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत भाजप व सेनेकडून चाचपणी सुरू आहे. त्यामुळे मुद्दाम ही निवड लांबणीवर टाकली जात असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

$
0
0

गेल्या वर्षापेक्षा यंदा आत्महत्यांत वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हृदय पिळवटून टाकणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ७६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, गतवर्षी याच कालावधीत ६५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली होती. विशेष म्हणजे गतवर्षी निफाडसारख्या सधन तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. यंदा आत्महत्येचे लोन मालेगाव आणि नांदगावकडे सरकले आहे.

नैसर्गिक अरिष्टांचे दृष्टचक्र, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे मानसिक दडपण यासारख्या अनेक कारणांमुळे बळीराजा मनाने खचू लागला आहे. समस्यांवर मात करण्याचा आत्मविश्वासच गमावून बसल्याने आणि संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दिसत नसल्याने तो मृत्यूला कवटाळत असल्याचे अशा आत्महत्यांच्या घटनांमधून स्पष्ट होते. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यातही पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येच्या घटनेची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यातही एका महिलेने आत्महत्या करून आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला.

जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी सर्वाधिक १९ आत्महत्या जुलै महिन्यात म्हणजेच ऐन पावसाळ्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल मे मध्ये १६, एप्र‌लिमध्ये ११ आणि ऑगस्टमध्ये नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारली. विशष म्हणजे एकही महिना आत्महत्येच्या घटनेशिवाय रिता गेलेला नाही. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ६५ घटना घडल्या होत्या. तर २०१५ मध्ये ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तुलनेने यंदा प्रमाण अधिक वाढले आहे.

मालेगावात आघाडीवर

गतवर्षी निफाड या बागायतदारांच्या तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना अधिक घडल्या होत्या. यंदा मात्र मालेगाव तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत १३ शेतकऱ्यांनी गळफास किंवा विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल नांदगाव तालुक्यात ११ आत्महत्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले तुंबले, चेंबर फुटले...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘नाले तुंबले, चेंबर फुटले, गंगाजल नासले, आरोग्य बिघडले...एवढे सारे अनर्थ पालिकेच्या एका बेपर्वाइने केले’, असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. शहरातील विविध भागांतील नाल्यांतून वाहणारे गटारीचे पाणी गोदावरी व दारणा या दोन्ही प्रमुख नद्यांच्या पात्रात सर्रासपणे मिसळत आहे. भुयारी गटार योजनेचेही कित्येक चेंबर्स फुटून त्यातील खराब पाणीही या दोन्ही नद्यांच्या पात्रात मिसळत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात दिसून येत आहे.

गोदावरी आणि दारणा या दोन्ही प्रमुख नद्या गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची तृष्णा भागविण्याचे काम करीत आहेत. मात्र, या दोन्ही नद्यांच्या पात्रातील प्रदूषणाकडे पालिका प्रशासन अजूनही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागांतून वाहणारे नैसर्गिक नाले सध्या गटारगंगाच बनलेले आहेत. या नाल्यांतून वाहणारे गटारीचे पाणी सध्या सर्रास गोदा व दारणेच्या पात्रात सोडले जात आहे. परिणामी, या दोन्ही नद्यांच्या पात्रातील पाणी दूषित होऊन त्याची दुर्गंधी वाढली आहे.

सध्या पाऊस सुरू असल्याने शहरातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांतून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी वाहत आहे. यातील बहुतांश नाल्यांतील घाण पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. गोदावरीसह दारणा, नंदिनी व वालदेवी या नद्यांतही अशीच स्थिती बघायला मिळत आहे. या नाल्यांतील पाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखण्यासाठी पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

..येथे मिसळते घाण पाणी

गोदावरी नदीपात्रात पंचवटी, तपोवन, नांदूर नाका, दसक, नासर्डीला सिटी सेंटर मॉल, भाभानगर, म्हाडा वसाहत, वडाळा, द्वारका, वालदेवी नदीला पिंपळगाव खांब, वडनेर गेट, पाथर्डी, रोकडोबा वाडी, आर्टिलरी सेंटर, देवळालीगाव, विहीतगाव, बागूलनगर, देवळालीगाव राजवाडा, तर दारणा नदीपात्रात भगूर, देवळाली कॅम्प, चेहेडी, चाडेगाव या भागांत नैसर्गिक नाल्यांतून वाहणारे दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळताना दिसून येत आहे.

शेकडो चेंबर्स फुटले

पालिकेच्या भुयारी गटार योजनेअंतर्गत नदी काठावर उभारण्यात आलेले शेकडो चेंबर्स ठिकठिकाणी फुटले आहेत. या फुटलेल्या चेंबर्समधूनही गटारींचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्यानेही नद्यांचे आरोग्य बिघडले आहे. फुटलेल्या चेंबर्सची दुरुस्ती करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मलनिस्सारण केंद्रांचे पाणीही नदीत

गोदावरी काठावरील टाकळी व दारणा काठावरील चेहेडी येथील पालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातूनही मोठ्या प्रमाणात खराब पाणी नदीपात्रात सोडणे सुरूच आहे. या पाण्यानेही गोदा व दारणाचे आरोग्य बिघडण्यास हातभार लागत आहे. वालदेवी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहणारे गटारीचे पाणी वर्षभर चेहेडी पंपिंग येथील पाण्याच्या साठवण बंधाऱ्यात मिसळत असूनही पालिका प्रशासनाला अद्याप या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना काढण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही.

पालिका हद्दीतून वाहणारे नैसर्गिक नाले सध्या गटारगंगाच बनलेले आहेत. यातील बहुतांश नाल्यांतील खराब पाणी थेट शहरातून वाहणाऱ्या नद्यांना मिळत आहे. परिणामी नद्यांचे आरोग्य बिघडले आहे. नागरिकांनाही पिण्यासाठी प्रदूषित पाण्याचाच वापर करावा लागत आहे. पालिकेकडून चेंबर्सची दुरुस्ती केली जात नसल्याने फुटलेल्या चेंबर्समधूनही नदीपात्रात दूषित पाणी मिसळत आहे.

- पांडुरंग गुरव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या प्रकल्पांना गती

$
0
0

पहिल्या टप्प्यात ५८ कोटी निधी वर्ग; संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील रखडलेल्या असलेल्या हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जवळपास ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहितीही संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंनी दिली. याबाबत नुकतीच बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉ. भामरेंची धुळ्यात भेट घेतली. त्यावेळी याबाबत माहिती दिली. या निधीमुळे बागलाण तालुक्यातील चौदा गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

धुळ्यात जाऊन बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेत याविषयावर चर्चा केली. त्यावेळी बागलाण तालुक्यातील प्रलंबित असलेल्या हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्यासाठी जवळपास ५८ कोटी निधी पहिल्या टप्प्यात वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय मुंबईत झालेल्या वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. भामरेंनी दिली. यासाठी एकूण १०० कोटींची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापैकी हा ५८ कोटींचा निधी सुरुवातीला वर्ग करण्यात आला आहे.

बागलाण तालुक्यातील विविध प्रलंबित सिंचनाच्या कामांना गती मिळावी म्हणून नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार, वित्त विभागाचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आपण बागलाणमधील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गावांची पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रलंबित सिंचन प्रकल्पांना निधी वाटपात प्राधान्य देण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

याप्रसंगी टेभे सरपंच भाऊसाहेब अहिरे, संजय सोनवणे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, डॉ. सुधीर सोनवणे, रवींद्र सोनवणे, नितीन वाघ, अनिल पाटील, विजय काकडे, केवळ देवरे, राकेश देवरे, पंडित देवरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चला, करूया ‘उत्सवमूर्ती सन्मान’साठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नांचे सावट दूर करून मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. गणेशाच्या या उत्सवाचा जल्लोष आणखी रंगतदार करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ यंदाही ‘उत्सवमूर्ती सन्मान’ हा अनोखा उपक्रम घेऊन आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात नाशिक ढोलने आपला दबदबा कायम राखला आहे. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मांगल्यपूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे करून सार्वजनिक मंडळे या उत्सवाची शान वाढवितात. त्यामुळे आपले वैशिष्ट्य जपण्यासाठी मंडळांचाही खास प्रयत्न असतो. मंडळांना व्यापक व्यासपीठ देण्यासह त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने खास मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेलाही मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

‘उत्सवमूर्ती सन्मान’मध्ये सर्वोत्तम गणेशमूर्ती, इको फ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या उपक्रमासाठी सोमवारपासून नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘मटा’च्या कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करावी.

येथे साधावा संपर्क

मोबाइल ः ९५५२५६६८४२

वेबसाइट ः

www.mtganeshutsav.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आज पाणी परिषद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे सोमवारी (दि. २८) त्र्यंबक रोडवरील ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पाणी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. यात नाशिक, नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगांव जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर काम करणारे व अभ्यासक व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान होणाऱ्या परिषदेत जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे, मेरीचे माजी महासंचालक डॉ. दि. मा. मोरे, जलसंवाद मासिकाचे संपादक दत्ता देशकर, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे गजानन देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहे‌त. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. यात सर्वांनी सहभाग घेऊन उपस्थित योग्य सूचना व बहुमोल मार्गदर्शन करावे, यामुळे भविष्यात नक्कीच आपणास पाणीटंचाई भासणार नाही आणि ठोस उपाययोजना करणे सहज शक्य होणार असल्याचे भारतीय जलसंस्कृती मंडळाचे सचिव दिलीप आहिरे यांनी सांगितले आहे.

चितळे समिती अहवालावर चर्चा
राज्य सरकारने जलसिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला. जल व सिंचन आयोगाचे अध्यक्ष म्हणून नामवंत जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी काम पाहिले. पाणी, शेती, अर्थ ,कृषी व जलसंपदा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी आयोगाचे सदस्यपद भूषविले आहे. त्यांनी मांडलेल्या अहवालात गोदावरी खोऱ्यात ६६ टीएमसी व गिरणा खोऱ्यात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सिंचन आयोगाने सूचविले. तसेच मुंबईसाठी ४२ टीएमसी पाणी उपलब्ध करू शकतो, असेही दाखविले आहे. वास्तविक गिरणा व गोदावरी या तुटीच्या खोऱ्यांना पाणी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने संपूर्ण ४२ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. नर्मदा प्रकल्पाकडे ३८ टीएमसी पाणी वळविता येईल, असेही आयोगाने सुचविले आहे. राज्यातील गिरणा व गोदावरी तुटीचे खोरे असताना इतर राज्यांकडे पाणी वळविण्याचे प्रयोजन योग्य नाही. डॉ. चितळे समितीने १९९९ मध्ये अहवाल सरकारकडे सादर केला. पण १८ वर्षांत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या विभागातील गोदावरी खोऱ्यातील तुटाची भाग आहे. सदर भागास पाण्याची गरज असताना महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न सूरू आहेत. या कळीच्या मुद्यावर परिषदेत चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड जेलचे दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
कारागृहातील अंडासेलमधील उमेश नागरे या कैद्याकडे मोबाइल सापडल्याप्रकरणी कारागृहाच्या दोन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. रवींद्र महादू मोरे आणि बबन उत्तम राठोड अशी त्यांची नावे आहेत. जेल उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी ही कारवाई केल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांनी दिली.
गेल्या वर्षी पाचशे पेक्षा अधिक मोबाइल कारागृहात सापडले होते. त्यावेळी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. नंतर तत्कालीन अधीक्षक रमेश कांबळे यांचीही बदली करण्यात आली होती. साळी यांनी जेलची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोबाइल सापडण्याच्या घटना नियंत्रणात आल्या. राज्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी जेलला भेट देण्यापूर्वी २० जुलैला रात्री अंडासेलमधील गुंड उमेश नागरे याच्याकडे मोबाइल असल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना मिळाली. कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने नागरेकडील मोबाइल जप्त केला. उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी झाली. त्यात मोरे आणि राठोड दोषी आढळले. त्यामुळे धामणे यांच्या आदेशानुसार या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना २४ जुलैला निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला चिमुकलीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
मोठी बहिण अभ्यासाच्या कारणावरून रागावल्याने जेलरोडला अवघ्या दहा वर्षाच्या मुलीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. धृपदा अशोक खंडारे (रा. प्रकाश आंबेडकरनगर, पाण्याच्या टाकीजवळ, जेलरोड, नाशिकरोड) असे या आत्महत्याग्रस्त मुलीचे नाव आहे.
धृपदा रविवारी (दि. २७) सकाळी साडे नऊच्या सुमारास घरात जेवण करीत असताना तिला अभ्यास करत नाही म्हणून क्लासला जाण्यापूर्वी मोठी बहिण रागावली. मोठी बहिण खेळायला जाण्यास मनाई करते आणि अभ्यासाच्या कारणावरून रागावल्याच्या कारणावरून धृपदाला राग आला. घरातील कॉटवर डबा ठेवून त्यावर उभे राहून तिने घराच्या आढ्याला ओढणीचा गळफास घेतला. घराबाहेर चुलीवर स्वयंपाक करणारी तिची आई लिलाबाई या काही वेळाने घरात आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी धृपदाला महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. मात्र तत्पूर्वीच धृपदाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर आघात
धृपदाचे आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात अवघ्या दहा वर्षाच्या आपल्या मुलीने आत्महत्या केल्याने या गरीब कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. धृपदाच्या आकस्मिक मृत्यूबाबत परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरातून शनिवारी (दि. २६) तीन दुचाकींची चोरी झाली. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय मोहन वाघमारे (रा. माणिकनगर) याची घरापासून बजाज पल्सर दुचाकी ही चोरीस गेली. यासंबंधी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. वाहनचोरीची दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. रतन पंडित खर्जूल (रा. खर्जूल मळा, नाशिकरोड) यांची हिरो होंडा दुचाकी शिवाजी पुतळा, नाशिकरोड येथे पार्क केलेली चोरट्यांनी लांबवली. तिसरी घटना सातपूर येथे घडली असून, जितेंद्र काशीनाथ सूर्यवंशी याने जिंजर हॉटेलजवळ उभी केलेली हिरो होंडा दुचाकी असता चोरीस गेली.

चोरीचे वाहन जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन साहेबराव झोमन (२८, रा. कुर्णोली ता. दिंडोरी) यास ताब्यात घेत त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त केली. नितीनकडे असलेल्या दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीचे इंजिन नंबर व चेसिजवरून खात्री केली असता सदर दुचाकीचा मूळ क्रमांक एमएच ४१ आर ५०९८ असल्याचे निष्पन्न झाले. ही दुचाकी जुन महिन्यात मनमाड चौफुली, मालेगाव येथून चोरीस गेली होती. तसा गुन्हा देखील दाखल असल्याने संशयितास चोरीच्या दुचकीसह मालेगाव किल्ला पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा जुगारी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १३ जणांना जेरबंद केले. भद्रकाली, पंचवटी आणि इंदिरानगर पोलिसांनी ही कारवाई केली. इंदिरानगर पोलिसांनी भगतसिंग झोपडपट्टीच्या सार्वजनिक शौचालयशेजारी पत्ते खेळणाऱ्या श्रावण अशोक पवार (रा. शहीद भगतसिंग नगर, इंदिरानगर) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. यानंतर, संजयनगर, वाघाडी येथे नाना शांताराम अहिरे (रा. फुलेनगर, पंचवटी) याच्यासह चार साथीदार जुगार खेळताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तलावाडी नर्सिंग होम, जुने नाशिक येथे जुगार खेळणाऱ्या कादीर नजीर शेख (रा. वडाळागाव, खोडेनगर) यास त्याच्या तीन साथीदारांसह जुगार खेळताना पोलिसांनी पकडले. या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा उत्तमनगरला विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी युवकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडित १३ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.
या तक्रारीनुसार, पीडित मुलगी शनिवारी (दि. २६) सायंकाळी वासुदेव पार्क, उत्तमनगर येथून पायी जात असताना, कुंदन नावाच्या युवकाने तिला जबरदस्तीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा विनयभंग करत अत्याचार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक खांडवी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लुटमार करणारे दोन जण जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुळाबाई घाटात लुटमार करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेने शोध घेत त्यापैकी दोघांना जेरबंद करण्यात आले.
गणेश राजेंद्र खैरणार (२७, रा. बैल बाजाररोड, कोपरगाव) आणि मोहन उर्फ बालाजी शंकर गुजरे (२३, रा. बोलकी, ता. कोपरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी सुनील उर्फ मायकल चंद्रकांत कराळे (रा. मोहिनीराजनगर, कोपरगाव) आणि राहुल रवींद्र नागरे (रा. मातुलठाण, येवला) याच्या मदतीने नांदगाव येवला रोडवरील मुळाबाई घाटात दुचाकीवर जाणाऱ्या फहिम शेख आसिफ (रा. नांदगाव) यास रस्त्यात अडवून लुटले होते. पोलिसांनी संशयितांकडून मोबाइल फोन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, संशयितांनी २०१४ मध्ये अशाच पध्दतीने लुटीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. घटनेचा अधिक तपास येवला पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी दारूचे अड्डे उद्‍ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्याच्या वेगवेगळ्या आणि दुर्गम भागात सुरू असलेले गावठी दारू निर्मितीचे अड्डे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी उद्‍ध्वस्त केले. या प्रकरणी अनेक संशयितांची धरपकड झाली असून, तब्बल सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने २६ ऑगस्ट रोजी वाडीवऱ्हे हद्दीतील मुळेगाव रामवाडी शिवारातील फॉरेस्टच्या जागेत बोपरा नाला परिसरात सुरू असलेल्या अड्यावर छापा मारला. या ठिकाणी भोरू महादू शिद (३५, मुळेगाव रामवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे साथिदार सोमा रामा शिद आणि पिंटू चंदू दोरे हे पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले. या ठिकाणाहून दोन हजार लिटर रसायन, ५० लिटर दारू, आणि ड्रम असा एक लाख २८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
एलसीबीच्या दुसऱ्या पथकाने सटाणा तालुक्यातील जुने शेमळी गावाच्या शिवारात भाऊराव पुंजाराम सोनवणे याच्या शेतात छापा मारला. तिथे गावठी दारू करणाऱ्या ताराबाई मुरलीधर निकम या महिलेस जेरबंद केले. तेथून एक हजार ४०० लिटर रसायन, ४० लिटर दारू व ड्रम असा ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सटाणा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी नोंद करण्यात आली. ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नवनाथ गुरूळे, सतीश जाधव, चंद्रभान जाधव, हवालदार राजू दिवटे, दीपक आहिरे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, सुनील पानसरे, अशोक जगताप, नामदेव खैरनार, जालिंदर खराटे, संदिप हांडगे, सचिन पिंगळ, संदीप लगड आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पेशल स्क्वॉडची उपयोगिता सिद्ध!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पुरावे नसल्याने खोळंबलेला तपास पुढे नेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी एक स्पेशल स्क्वॉड तयार केला आहे. सहा महिन्यापूर्वीचा गुन्हा उघडकीस आणत या पथकाने आपले महत्त्व अधोरेखित केले. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी यवतमाळ, उस्मानाबाद येथे असा प्रयोग राबवला होता.
एखादी गंभीर घटना घडल्यानंतर अनेकदा पुरावे मागे राहत नाही. किंबहुना अगदी बारीक पुराव्यांची कडी जोडून आरोपींना गजाआड करण्याचे काम तपासाधिकाऱ्यास शक्य होत नाही. यामुळे अनेक गंभीर गुन्हे तपास पूर्ण होत नसल्याने कोर्टात फायनल केले जातात. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर याच त्रुटीचा अभ्यास करीत स्पेशल स्क्वॉड तयार केला. या पथकात पोलिस महासंचालक पदक विजेते पोलिस उपनिरीक्षक अविनाश गडाख यांच्यासह चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याच पथकाने सहा महिनाभरापासून तपासावर असलेल्या सिन्नर खून प्रकरणाचा यशस्वी छडा लावला. उस्मानाबाद, यवतमाळ या ठिकाणी कार्यरत असताना दराडे यांनी असाच स्क्वॉड तयार करून गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला होता. याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की या विशेष पथकाचा रिझल्ट लगेचच समोर आला आहे. या पथकातील अधिकाऱ्यांना विशेष बाब म्हणून बंदोबस्त अथवा इतर कोणतेही काम दिले जात नाही. ग्रामीण पोलिस दलाकडे नोंद असलेल्या अनाकलनीय गुन्ह्यांचा तपासच या पथकाकडे दिला जातो.

सूप्त पद्धतीने तपास
स्पेशल स्क्वॉड पथकाने एका खूनाच्या गुन्ह्याचा नुकताच उलगडा करून दोघा संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली होती. मृताच्या शरीरावरील शर्टच्या कॉलरवर असलेल्या टेलरच्या पत्त्यावर यापूर्वी तपासी पथकाने दोनदा तिनदा चौकशी केली. मात्र, हाती काहीच लागले नाही. या पथकाने सात-आठ दिवस उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ गावात मुक्काम ठोकला. गावात पोलिस राहत असल्याचा सूगावा गावकऱ्यांनाही लागला नाही. या काळात पथकातील सदस्यांनी एक-एक पुराव्याची कडी जोडत दोघांना जेरबंद केले. अनोळखी मृतदेह, खूनाचे गुढ गुन्हे याशिवाय इतर गंभीर तसेच तपास न झालेल्या गुन्ह्यांवर हे पथक काम करीत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

विशेष पथकाने उघडकीस आणलेला हा पहिलाच गुन्हा आहे. काम करण्यास आणखी बरीच संधी असून, तपासाबाबत माझ्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कल्पना थेट तपासाधिकाऱ्यांपर्यंत पोहचणार आहेत. एक वेगळी बाब म्हणून या पथकाकडे आम्हीही पाहतो आहोत.
- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब, वीजबिल ४० हजार रुपये!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असताना महावितरणने तब्बल ४० हजार रुपयांचे बिल पाठविल्याने पळसे येथील एका शेतकऱ्याची हाय होल्टेजचा शॉक बसल्यासारखी अवस्था झाली आहे. इतरही काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांच्या थकबाकीच्या नावाखाली भरमसाठ वीजबिले पाठविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप केला आहे.

पळसे येथील हरिश्चंद्र गायधनी यांना महावितरणने तब्बल ४० हजार ३० रुपयांचे घरगुती वीज मीटरचे बिल पाठविले आहे. ‘वापर बोटभर अन् बिल हातभर’ अशा अवस्था असलेल्या गायधनी यांयांच्यावर तर बिल हातात पडल्यानंतर बेशुद्ध पडण्याची वेळ आली. असे भरमसाठ बील मिळालेले ते पळसेमधील एकमेव नाहीत. लक्ष्मण प्रभू गायधनी, छबू प्रभू गायधनी, बबन बहिरू गायधनी, कचरू प्रभू गायधनी, हिरामण गायधनी, बाळासाहेब गायधनी आणि तुकाराम गायधनी या शेतकऱ्यांनाही घरगुती वीज वापराबदल्यात तीन ते सात हजार रुपयांदरम्यानचे बिल प्राप्त झाले आहे. मागील किरकोळ बाकी असतानाही महावितरणने अव्वाच्या सव्वा बिले पाठविल्याने या शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

पुरवठा खंडित करण्याची नोटीस
थकबाकीची रक्कम तात्काळ न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस या अवाजवी वीज बिल प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. चुकीचे बिल देण्याचा पायंडा कायम राखणाऱ्या महावितरण कंपनीच्या गलथानपणाचा जबरदस्त शॉक लागलेल्या या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

बिलांची करणार होळी
पळसे येथील शेतकऱ्यांना पाठविलेली अवाजवी बिले दुरुस्त करून देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. वाढीव व चुकीची वीज बिले तात्काळ दुरुस्त करून न दिल्यास बिलांची पळसे येथे होळी करण्याचा इशारा छत्रपती युवा सेनेचे तालुकाप्रमुख विलास गायधनी यांनी दिला आहे. गावात २४ पैकी १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाते. उर्वरित १२ तासांपैकी नऊ ते दहा तास सिंगल फेज वीज असते. दिवसात‌ून सरासरी तीन ते चार तास वीज पुरवठा खंडितही असतो. गावात गेल्या महिन्यापर्यंत पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत बिल मिळत होते. आता अचानक हजारो रुपयांच्या घरात बिल आल्याने शेतकरी थक्क झाले आहेत. महावितरणने यापूर्वीही काही शेतकऱ्यांना अशाच प्रकारे अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठविली होती.

मागील बाकी अगदी किरकोळ आहे. आतापर्यंत पाचशे रुपयांपर्यंत बिल येत असे. मात्र, आता अचानक ४० हजार रुपये बिल आल्याने भोवळ येणेच बाकी राहिले आहे. महावितरण शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत असल्याचे उघड झाले आहे.
- हरिश्चंद्र गायधनी, पीडित शेतकरी

मटा भूमिका
आपण घेत असलेल्या सेवांसाठी किती किंमत मोजावी लागते हे जाणून घेणारी मानसिकता ग्राहकवर्गात वाढत आहे. अशा वेळी पारदर्शकतेवर भर देणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, नेमके याच बाबतीत महावितरण कमी पडत आहे. घरगुती वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवून शॉक देणाऱ्या महावितरणविरोधात संताप उमटणे स्वाभाविकच आहे. सेवेत कमतरता ठेवण्यासह ग्राहकांची जादा बिलांच्या माध्यमातून केली जाणारी लूट वारंवार उघडकीस येत आहे. यात मह‌िवितरणने तातडीने आणि ग्राहकाचे समाधान करणारे पारदर्शक बदल करण्याची नितांत गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखंड पुरवठ्यासाठी ‘गाव दुरुस्ती’ मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
वीज पुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीतून अखंडित वीज मिळण्यास मोठी मदत मिळते. महावितरण कंपनीच्या चांदवड विभागाने ही गरज लक्षात घेऊन प्रत्येक शाखा कार्यालयातील एका गावाची दरमहा निवड करून तेथील वीजपुरवठ्याशी निगडीत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस दुरुस्ती’ हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमात प्रारंभी प्रत्येक शाखा कार्यालयातील एका गावाची निवड करण्यात येते. ठरलेल्या दिवशी सर्व अधिकारी, कर्मचारी दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक साहित्य घेऊन संबंधित गावात जातात. ग्रामस्थांसोबत पाहणी करून खराब झालेले खांब निश्चित करून ते बदलण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. याच महिन्यात ही मोहीम हाती घेण्यात आली असून एकूण ३२ गावांमध्ये हा उपक्रम आतापर्यंत राबविण्यात आला. यापुढे या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्यात एका शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील. देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण व नवीन वीज जोडणीची कामेही या मोहिमेतून केली जात आहेत. चांदवड विभागातील ग्राहकांनी या उपक्रमाचे उत्सफूर्तपणे स्वागत करत या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

ही कामे केली जाणार
जुन्या सर्व्हिस वायर बदलणे, लघुदाब वीज वाहिनीच्या खांबावरील ढिल्या (लूज) पडलेल्या तारांना पुरेसा ताण देणे, या तारा तुटून खाली पडू नये म्हणून तारांमध्ये स्पॅन स्पेसर टाकणे, वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या (गार्डनिंग) हटविणे, रोहित्रातील फ्यूज, किटकॅट यासोबतच जम्पर्स नवीन टाकणे आदी देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images