Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बकाल सिडकोची करूण कहाणी

0
0
लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील सर्वात मोठे उपनगर. महापालिकेच्या महसुल उत्पन्नात महत्त्वाचा वाटा.. शहरातील औद्योगिक वसाहतीचा कणा म्हणजे सिडको वसाहत.

नाशिकरोडचा ‘करोडपती’ टीसी

0
0
मध्य रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून नाशिकरोडचे प्रधान तिकीट निरीक्षक (टीसी) मगनदास शिंदे यांनी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत एक कोटी १ लाख ६८ हजार ३२० रुपयांची वसुली करून करोडपती टीसी होण्याचा मान मिळवला आहे.

जुने ११ वी उत्तीर्णही SEO होणार

0
0
विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही पात्रता कायम असली तरी त्यात काहीप्रमाणात शिथीलता आणण्यात आली आहे. जुनी एसएससी किंवा जुनी अकरावी उत्तीर्ण व्यक्ती देखील या पदावर विराजमान होऊ शकेल, असा निर्णय सरकारने घेतला आहे.

एसटीची ‘चाल’ढकल

0
0
ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या वाहन पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध असूनही मुख्य कार्यालयाची परवानगी आणि टेंडर प्रक्र‌ियेचे कारण देत पार्किंगचा प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिककरांच्या वतीनेही धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सहसंचालकांमुळे खोळंबले एरिअर्स

0
0
सरकारने प्राध्यापकांच्या मागणीनुसार राज्यातील सहसंचालकांकडे अदा केलेली रक्कम केवळ पुण्याच्याच श‌िक्षण संहसंचालकांनी रोखून धरल्याचा आरोप ‘पुक्टो’ (पुणे युन‌िव्हर्स‌िटी अॅण्ड कॉलेज ट‌ीचर्स)ने केला आहे.

महावितरणविरोधात ‘चक्का जाम’

0
0
राज्यात वारंवार होणारी वीज दरवाढ, औद्योगिक ग्राहकांची होणारी पिळवणूक अशा महत्त्वपूर्ण तक्रारींचे निरसन व्हावे यासाठी संपूर्ण राज्यातील ग्राहक संघटनांच्या वतीने १० डिसेंबर रोजी राज्यभरात ‘चक्का जाम’ आंदोलन छेडण्यात येणार आहे.

RTOत वाहनप्रणाली विस्तारणार

0
0
पूर्वी केवळ मोटरसायकल, कार अशा खासगी वाहनांच्या नोंदणीसाठी वापरली जाणारी वाहन प्रणाली आता व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीसाठी देखील उपयोगात आणली जाणार आहे.

तुम्ही कपडे सांभाळा मी लढतो

0
0
'मी मरेपर्यंत शिवसेनेत काम करणार असून, माझी गरज भासल्यास अर्ध्या रात्री फोन करा मी तुमच्यासाठी धावून येईल. मी, तुम लढो हम कपडे सांभाळणाऱ्यापैकी नसून तुम्ही कपडे सांभाळा मी लढेन'

महिलांनी संस्कृती जपावी: सिंधुताई

0
0
महिला व तरुणींनी भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. विज्ञानयुगात वावरत असलो तरीही महिलांनी कुटुंब सांभाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

हृदयाची निगा राखणे आपले कर्तव्य

0
0
‘मानवाचे जीवन सुंदर आहे. त्याला मिळालेले हृदय ही अमूल्य देणगी आहे. त्यामुळे त्याची योग्य निगा राखणे हे आपले कर्तव्य आहे.’ असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहूल कैचे यांनी केले.

‘आरटीओ’चा डेटा अपडेट होतोय !

0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ‘वाहन’ या संगणक प्रणालीत माहिती अद्ययावत करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी कामकाजानिमित्त येताना वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

स्कूलबस चालकांचा संप

0
0
मविप्र समाज संस्थेच्या होरायजन अॅकॅडमीमधील स्कूलबस चालकांनी अचानक संप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता.

येथे होते पैशाचेच खत

0
0
राज्यस्तरीय पुरस्काराचे दान महापालिकेच्या पदरात पाडून देणाऱ्या खतप्रकल्पास अवकळा आली आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होऊनही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणे महापालिकेला शक्य झालेले नाही.

एसटीतर्फे आजपासून नाट्यस्पर्धा

0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारी ४३ व्या आंतरविभागीय नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार (दि. १०) पासून परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरू होत आहे.

नाशकात थंडीची लाट

0
0
गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलेल्या वातावरणाचा परिणाम थंडीवर झाला असून थंडीच्या लाटेचा नाशकातही शिरकाव झाला आहे.

‘थर्टी फर्स्ट’साठी १० पथके

0
0
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी करमणूक कर विभागाकडून दहा भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत.

​लोडशेडिंगविरोधात रास्ता रोको

0
0
भारनियमन व सक्तीची वीजबिलवसुली थांबवावी, या मागणीसाठी कळवण शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

‘अनुराधा’चे बाबुशेठ कलंत्री कालवश

0
0
देवळाली गावातील अनुराधा थिएटरचे मालक व महाराष्ट्र सिनेमा एक्झीबिटर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण ( बाबुशेठ) जगन्नाथ कलंत्री ( ६९) यांचे सोमवारी निवासस्थानी निधन झाले.

एफडीएची नागरिकांसाठी हेल्पलाइन

0
0
राज्यभरातील मेडिकल दुकानांचा येत्या १६ ते १८ डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी संप असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नाशिक विभागाने हेल्पलाइन सुरू केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images