Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चुकीच्या उपचाराचे आरोग्यावर दुष्परिणाम

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
आजारावर चुकीचे उपचार केले जात असल्याने व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागतात, असे प्रतिपादन मर्क्युरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत चौधरी यांनी केले. दुर्गा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यातर्फे झालेल्या ‘जल्लोष स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. चौधरी म्हणाले, की सध्याच्या या धकाधकीच्या युगात कोणताही माणूस ताण तणावाशिवाय जगू शकत नाही. ताण तणावामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते, त्यात माणसांचा स्वभावही अनेक आजारांना आमंत्रण देतो. कंबरदुखी, मणक्याचे दुखणे, गुडघेदुखी अशा प्रकारच्या दुखण्याला स्त्रियांना समोर जावे लागते. त्यामुळे आहार आणि व्यायाम यांना जीवनात महत्त्व दिले पाहिजे. तणावामुळे ऍसिडिटीत ९० टक्के वाद होत असते. आहाराद्वारे केवळ १० टक्के अॅसेडिटी वाढू शकते. दुधयुक्त चहा पिणे हेदेखील अॅ‌सेडिटी वाढविण्यास कारणीभूत ठरते. निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीतून आहार संतुलित करून आरोग्य चांगले ठेवता येते.
डॉ. मनोज मोरे यांनी चांगले आरोग्य राहण्यासाठी सर्व प्रकारच्या आहाराचा नियमितपणे समावेश करण्याचा सल्ला दिला. गायिका गीता माळी आणि मोहित माळी यांनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गीता माळी प्रस्तुत श्रावणसरींनी भरलेल्या गीतांचा कार्यक्रम झाला त्यात त्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेरगिलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पंचवटीतील सराईत अल्पवयीन गुन्हेगार हृतिक शेरगिल उर्फ पाप्या शेरगिलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चेतन पवारवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी सहा संशयितावर गुन्हा दाखल केला असून, यात शेरगिलच्या भावाचासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शेरगिलच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चेतनवर शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गजबजलेल्या तिबेटियन मार्केट परिसरात जीवघेणा हल्ला झाला होता. संजय रामलाल पवार (३८, रा. शनिमंदिराशेजारी, रामनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी विक्की बाळू जाधव उर्फ काळ्या तोतऱ्या, पाप्याचा भाऊ हरीश उर्फ हऱ्या शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललीत उर्फ लल्या सुरेश राऊत आणि अजय भईटा यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला.

पंचवटीतील उन्नती शाळेजवळ ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाप्या शेरगिलची तीन ते चार शाळकरी विद्यार्थ्यांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पवारला ताब्यात घेतले. याच संदर्भांत चेतन आपल्या आई-वडिलांसमवेत शनिवारी बाल न्यायालयात गेला. तेथील काम आटोपल्यानंतर कपडे खरेदीसाठी तो तिबेटियन मार्केटमध्ये गेला. तिथे त्याच्यावर तिघा चौघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्याच्यावर सध्या पंचवटी पोलिस स्टेशन जवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हत्येनेच न्याय
पंचवटी परिसरात सध्या गँगवॉर रंगले आहे. यातून एकमेकांना संपविण्यासाठी टवाळखोरांचे प्रयत्न सुरू आहे. दिवे, मोरे, कोष्टी अशा अनेक सराईतच्या सोबतीला शेरगिल व त्याच्या विरोधातील शाळकरी मुलेही एक दुसऱ्या टोळ्यातील सदस्यांचा जीव घेऊन जणू न्याय मिळाल्याचा आनंद साजरा करू लागले आहेत. या गंभीर बाबीकडे शहर पोलिस लक्ष कधी देणार असा प्रश्न पंचवटीतील नागरिकांना सतावू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइनमनला धक्काबुक्की

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घराची सर्व्हिस वायर बदलण्यासाठी गेलेल्या लाइनमनला धक्काबुक्की केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
भगवान एकनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी इस्माईल शहा (रा. सुंदरनगर डीपीजवळ, देवळाली गाव) याच्या घरी सर्व्हिस वायर दुरुस्त करण्यासाठी पवार, अमोल जाधव, सुभाष रिंजड तसेच लाइनमन सुरेश उगले आदी गेले होते. सर्व्हिस वायर दुरुस्ती सुरू असताना शहा याच्या शेजारी राहणाऱ्या तिघांनी वाद सुरू केला. यास शहा यानेही साथ देत लाइनमन उगले यांना मारहाण करीत धक्काबुक्की केली. तसेच तुम्ही देवळाली गावात नोकरी कशी करता, हेच पाहतो अशी धमकी दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भडीकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर तलवारीने वार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुचाकीवर जाणाऱ्या तरूणावर तलवारीने वार करून दगडाने मारहाण केल्याची घटना एक्स्लो पॉइंट कॉर्नरवर घडली. अनिल राजेंद्र काळे (२८, फडोळ अर्पाट. मारूती चौक, दत्तनगर, अंबड) यांनी फिर्याद दिली.
काळे हे शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास क्लासला गेलेल्या भाचीला आणण्यासाठी गेले होते. तेथून हे दोघे घराकडे परतत असताना एक्स्लो पॉइंट येथे संशयित आरोपी विकी दोंदे, दिलीप ठाकूर आणि आदर्श (पूर्ण नाव नाही) अशा तिघांनी थेट तलवारीने हल्ला केला. यामुळे काळेसह त्याची भाची दुचाकीवरून खाली पडले. यानंतर तिघांनी काळेला लाथबुक्यासह दगडाने मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार के. एन. आडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रानेच चोरले मंगळसूत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरात आलेल्या मित्रानेच कपाटातील ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी करून नेल्याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीलाल दगुजी अढांगळे (५८, रा. गुरूप्रसाद बिल्डींग, डोंबवली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी व मुलगा प्रगती रो हाऊस, लोटस हॉटेलसमोर, लॅमरोड येथे राहतात. शनिवारी (दि. १९) सकाळी ७ वाजता अढांगळे यांचा मुलगा मयूर याचा १७ वर्षीय अल्पवयीन मित्र घरात आला. त्याने कपाटाच्या आतील कप्प्यात ठेवलेले ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी केले. तसेच हे मंगळसूत्र आपल्या आईवडिलांकडे पोहच केले. घटनेचा अधिक तपास पीएसआय जी. आर. जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची चेन तोडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुचाकीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी तोडण्याची घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊ ते पाऊणे दहा वाजेच्या सुमारास बॉईज टाऊन स्कूलसमोरील सिध्दार्थनगर येथील वळणावर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मंगला रमेश वनसे (३४, रा. पांडवनगरी, रघुत्तम सोसा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री दुचाकीने घराकडे परतत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन चोरटे त्यांच्या पाठीमागून आले. यावेळी वनसे यांच्या गळ्यातील साडेसतरा ग्रॅमची आणि ३० हजार रुपयांची सोन्याची पोत तोडून चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. यानंतर चोरटे भरधाव वेगात त्र्यंबकरोडच्या दिशेने फरार झाले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवड यादी फाडणाऱ्यांविरूध्द गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास भवन येथे नोटीस बोर्डावर लावलेली विद्यार्थ्यांची यादी फाडणाऱ्या लकी जाधव आणि त्याच्या तिघा साथिदारांविरोधात मुंबई नाका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी काशिनाथ रावजी चव्हाण (५०, रा. वणी, ता. दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे. आदिवासी विकास कार्यालयात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठी २०५ विद्यार्थ्यांची विनड यादी तयार करण्यात आली. ही यादी नोटीस बोर्डावर लावण्यात आली. मात्र, संशयितांनी हरकत असल्याचे सांगत दहशत निर्माण करण्यासाठी नोटीस बोर्डावरील यादी फाडून टाकत विद्रुपीकरण केले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. एस. आवारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथडा मार्केटमधील दुकान फोडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील तब्बल ६३ हजार ५०० रुपये चोरट्यांनी चोरी केले. ही घटना द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या जवळील कथडा मार्केट येथे शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणी शेख शकिल रेहमान (४७, रा. साईदर्शन अपार्ट, पखालरोड) यांनी फिर्याद दिली. रेहमान यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे कथडा मार्केटमध्ये शॉप क्रमांक १२ आणि १३ मध्ये गोदावरी अॅटो एजन्सीज नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून रेहमान घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच, दुकानाच्या गल्लात असलेली ६३ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय काळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन मोबाइलची घरामधून चोरी

0
0

नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या घरातून तीन मोबाइलची चोरी झाली. नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स सिनेमाजवळील विद्युत कॉलनीतील रहिवासी अरबाज अलाउद्दीन शेख यांच्या घरातून चोरट्यांनी तीन मोबाइल लांबवले. शेख बाहेरगावी गेले होते. परतल्यावर त्यांना घराच्या खिडकीजवळ असलेले मोबाइल चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यात मायक्रोमॅक्स, ऍसूस व रेडमी कंपनीचे १४ हजार रुपयांचे तीन मोबाइल होते. त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारुविक्रीला चाप

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधात १५ दिवसात तब्बल ७५ गुन्हे दाखल करून ५४ जणांना गजाआड केले. या कारवाईत दोन दुचाकींसह चार चारचाकी वाहने जप्त केली. तसेच सुमारे ३२ लाख ७९ हजार ३८९ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात देशी विदेशीसह गावठी दारुसह ताडी आणि रसायनांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत व उपअधीक्षक जी. व्ही. बारगजे यांनी बेकायदा दारू व्यवसाय रोखण्यासाठी जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात भरारी पथकांनी शहर व जिल्ह्यात छापासत्र सुरू केले. गेल्या पाच दिवसात या पथकाने सुमारे तीस लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त केला. भरारी पथक १ च्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) शहरानजिकच्या पेठरोडवरील हॉटेल ढोलकी छापा टाकून व्यवस्थापकासह मद्यप्राशन करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. शासकीय परवाना नसताना तेथे मद्यविक्री सुरू होती. तर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस केलेल्या कारवाईत चार मोठ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. भरारी पथकाच्या क्रमांक १ च्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीत मद्यवाहतूक करणारी दोन चारचाकी वाहने पकडले. या कारवाईत वाहनांसह तब्बल २० लाख ३८ हजार ९६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

बनावट ताडी जप्त
कळवण कार्यालयाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली. यात वाहनासह ७ लाख ९७ हजार ६६० किमतीचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी वाहनचालकास अटक झाली. तर निरीक्षक ब विभागाने इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे ४२ लिटर तर निरीक्षक अ विभागाने नांदूरनाका येथे छापा टाकून २६ लिटर बनावट ताडी जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलचोरांचा धुमाकूळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरासमोर रस्त्याने पायी फिरत असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी हातातील मोबाइल हिसकावला. मोबाइलमधील सीमकार्ड तरी द्या, अशी विनवणी करणाऱ्याच्या हात व पायावर थेट कोयत्याने हल्ला केला. दहशत निर्माण करणारी ही घटना पंचवटीत घडली. चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणी गणेश रामचंद्र राऊत (२७, रा. लेणी दर्शन सोसा. साईनगर, अमृतधाम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. राऊत हे शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊ ते पाऊणे दहा वाजेच्या दरम्यान आपल्या घराबाहेर रस्त्यावर चक्कर मारत होते. यावेळी तिथे पल्सर दुचाकीवर तिघे चोरटे आले. त्यांनी राऊतकडे मोबाइल मागितला. तसेच आराडाओरड केला तर जीव ठार मारण्याची धमकी दिली. साडेसात हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी हिसकवला. मात्र, मोबाइलमधील सीमकार्ड आणि मेमरी कार्ड द्या असे म्हणताच चोरट्यांनी आपल्याकडील कोयता काढून राऊत यांच्या हातावर तसेच पायावर वार केला. घटनेचा अधिक तपास एस. के. म्हात्रे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितांसाठी झटणारा देवदूत हरपला

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
बेरड, रामोशी आणि देवदासी या समाजातील वंचित घटकांसाठी अहोरात्र कार्य करणारा देवदूत हरपला, असे मत समता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पतंगे यांनी डॉ. भीमराव गस्ती यांच्या शोकसभेप्रसंगी व्यक्त केले.
समरसता साहित्य परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक शाखा यांच्या वतीने डॉ. गस्ती यांची शोकसभा शंकराचार्य न्यास येथील नानाराव ढोबळे सभागृहात झाली. यावेळी भावना व्यक्त करतांना पतंगे यांनी डॉ. गस्ती यांना त्यांच्या स्मृतीनिमित्त समरसता साहित्य पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन केले.
सार्वजनिक काम करणारी संस्था ही व्यक्ती केंद्रित नसते. ती नेहमी सार्वजनिक काम करत असते, याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे गरजेचे आहे. समाजातील प्रश्न हे समाजातील क्षमता असलेल्या व्यक्तीने कोणावरही अवलंबून न राहता सोडविले पाहिजे, हे डॉ. गस्ती यांच्या निमित्ताने जाणवते, असे मत पतंगे यांनी व्यक्त केले.
देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था डॉ. गस्ती यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी मोठं काम केलं. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात १८ महिने तुरुंगात होते. त्यांना कुसुमाग्रज स्मारक यांच्यावतीने २००६ मध्ये गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते, असे मुक्तेश्वर मुनशेट्टीवर यांनी सांगितले.
रवी सहस्रबुद्धे, वसंत खैरनार, एस. एच. मोरे, राजाभाऊ मोगल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेस साहित्य परिषद महाराष्ट्र पश्चिम प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. भास्कर म्हरसाळे, संघाच्या नाशिक शाखेचे विजय कदम आदी मंचावर उपस्थित होते. नाना बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजात मुलगा मुलगी भेद व्हावा नष्ट!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपला देश आज अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करतो आहे. या प्रगतीशील भारताचे आधारस्तंभ असणारे आजचे मुले मुलीही अभ्यासाबरोबर विविध क्षेत्रात यश मिळवत आहे. अशी प्रगती होत असताना मुलामुलींमधील भेद नष्ट झाले पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा समितीतर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी झाला. यावेळी मृणाल कुलकर्णी बोलत होत्या. मुलगा मुलगी यांच्याकडे समानतेने पाहिल्यास त्याचा फायदा समाजाला, देशाला होणार आहे. ही समानता आपल्या देशाचा विकास करण्यास लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप म्हणाले, की शहराच्या जडणघडणीत वीरशैव समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाला जाणवत असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की आजच्या स्पर्धेच्या युगातही या समाजाने आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाचेही नाव मोठे केले आहे. येत्या पिढीनेही असे कार्य करावे तसेच पालकांनी मुलांवर निर्णय न लादता मार्गदर्शन करावे असे आवाहनही केले. प्रमोद वेरुळे यांनी प्रास्ताविक केले. गिरीश निकम यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश्वर दंदणे यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान
अनिल चौघुले (राजकीय व सामाजिक), डॉ. राज नगरकर (वैद्यकीय), प्रदीप पाचपाटील (उद्योजक), सुनील लोहारकर (उद्योजक व सामाजिक), सुनील भायभंग (सामाजिक व्यावसायिक) यांना वीरशैव लिंगायत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा, डिग्री, विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छायाचित्रांमध्ये उमटले नाशिकचे प्रतिबिंब

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जागतिक छायाचित्र दिन व नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास नाशिकचे प्र्रतिबिंब उमटले आहे. प्राचीन आणि आधुनिकता यांचा समन्वय साधणाऱ्या या शहराची प्रतिमा जतन करण्यात छायाचित्रकारांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.

शालिमार येथक्षल बी. डी. भालेकर मैदानावर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महापौर भानसी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे रविवारी उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, पोपटराव भानसी, अध्यक्ष नीलेश तांबे आदी उपस्थित होते
यावेळी भानसी म्हणाल्या, नाशिकचे छायाचित्र प्रदर्शनाच्या आयोजनासाठी महापालिकेच्या वतीने सहकार्य केले जाईल. छायाचित्रकार हा जीव धोक्यात टाकून क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. हजारो शब्दांतून जे व्यक्त करता येत नाही ते एका छायाचित्रतून मांडण्याचे काम छायाचित्रकार करतो, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
नगरेसवक शाहू खैरे म्हणाले, की पुरातन वास्तूचा ठेवा जतन करून त्याची आठवण करून देण्याचे काम छायाचित्र करते, शहराच्या जडणघडणीत छायाचित्रकारांचा मोठा वाटा आहे. शरद आहेर म्हणाले, की छायाचित्रातील अचूक कला भाव टिपण्याचे काम छायाचित्रकार करतो.
संस्थापक सोमनाथ कोकरे यांनी सूत्रसंचलन केले. सल्लागार प्रशातं खरोटे यांनी आभार मानले. संयोजन उपाध्यक्ष विवेक बोकील, सरचिटणीस हेमंत घोरपडे, खजिनदार पंकज चांडोले, कार्यकारणी सदस्य अंबादास शिंदे, सतीश काळे, भूषण पाटील , मयूर बरगजे, आदित्य वायकुळ, केशव मते, अशोक गवळी, राजू ठाकरे, सतीश देवगिरे, गणेश खिरकाडे, विजय चव्हाण, अमन शेख, यातिन भानू, प्रदीप मोरे, कृपेश पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलपोळ्याचा आज उत्साह

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावण अमावस्या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलपोळा सोमवारी (दि. २१) जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये पोळ्याचे साहित्य खरेदीसाठी सुरू असलेली लगबगीवरुन हे चित्र स्पष्ट झाले.

कृषिक्षेत्रात नाशिक आघाडीवर असल्याने शेतकरी कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोळ्याचे महत्त्वही शहरात अबाधित आहे. वर्षभर शेतकऱ्यांबरोबर घाम गाळणाऱ्या बैलांप्रती आदर या सणानिमित्त व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे बळीराजा बैलाची पूजा करतो, बैलांना अंघोळ घातली जाते, शाल झालर, त्याच्या शिगांना रंगांची सजावट केली जाते. गळ्यात हार घातले जातात, त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी सजवलेल्या बैलांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारीच बैलांची सजावट करण्यासाठी शहराबाहेरील काही शेतकरी कुटुंबात लगबग दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारमधून मद्यसाठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहनातून तस्करी करण्यात येणारा मद्यसाठा पिंपळगाव बसंवत पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी दिंडोरी येथील दोघा जणांवर कारवाई करण्यात आली असून, संशयितांची कार आणि मद्यसाठा असा आठ लाख ३० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपळगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले यांना सदर तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी सांयकाळी वाहतूक कर्मचारी रवींद्र चिने तसेच कॉन्स्टेबल वडघुले, अमोल आहेर यांनी वणी चौफुली येथे वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एक कार (एमएच १५ इपी ७२६८) बसवंत पिंपळगावातून वणीच्या दिशेने संशयास्पद पध्दतीने जाताना दिसली. पोलिसांनी ही कार अडवून तपासणी केली असता त्यात विविध कंपनीचे ११ बियरचे खोके आढळून आले. या प्रकरणी सुरेश शंकर खोडे (३२, खेडगाव, ता. दिंडोरी) आणि गणेश मधुकर मौले (रा. खेडगाव, ता. दिंडोरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीतील मालाची भंगार बाजारात विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिन्नरजवळील मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीतील चोरी केलेल्या साहित्याची अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात विक्री झाल्याचे ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघे फरार आहेत.
संशयितांकडून तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुसळगाव एमआयडीसीतील सुपर इंडस्ट्रीज या कंपनीत १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीस चोरी झाली होती. सीसीटीव्ही किंवा सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कंपनीच्या गेटवरून उडी मारून मेन स्टोअर रुमचे लॉक तोडले. यानंतर, तेथील गॅस सिलिंडरचे पितळी वॉल आणि त्यास लावलेले प्लास्टिकच्या पांढऱ्या कॅप असा तब्बल १० लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी स्टोअर किपर हरिचंद्र राधू गुरूळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक मोतीराम वसावे, हवालदार तुळशीराम कदम, नंदु कुऱ्हाडे, नाईक तुषार मरसाळे, गौरव सानप, सुनील ढाकणे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची मदतीने अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात छापा टाकण्यात आला. तिथे पाच लाख १७ हजार ४४० रुपयांचा चोरी गेलेला माल आढळून आला. या प्रकरणी संतोष बाबासाहेब जाधव (२८, रा. शंकरनगर, मुसळगाव) आणि अभयसिंग लालसिंग चुंडावत (३४, मंगलमूर्ती अपार्ट., कृष्णनगर, कामटवाडा) यांना अटक करण्यात आली. यांचे तीन साथिदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती वाहन (एमएच १५ डीके ६१५२) हे देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅनकार्ड क्लबवर अखेर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह राज्यभरातील २५ लाख गुंतवणूकदारांकडून तब्बल तीन हजार १०० कोटी रुपये जमा करणाऱ्या आणि गुंतवणुकीवरील आकर्षक परताव्यासह तारांकित हॉटेलमधील खान-पानसह निवासाचीही सुविधा देणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’वर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल झाला. या कंपनीच्या गैरकामामुळे २०१४मध्ये सेबीने निर्बंध टाकले होते.

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनी, सुधीर शंकर मोरावेकर, शोभा रत्नाकर बर्डे, उषा अरुण तारी, मनीश कालीदास गांधी, चंद्रसेन गणपतराव भिसे, रामचंद्र रामकृष्ण (सर्व रा. मुंबई) आणि कंपनीचे नाशिक शाखाधिकारी विक्रम अरिंगळे व एजंट बापूराव त्रंबक इंगळे अशी गुन्हा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी गणेश बाबुराव पवार (५२, रा. राणाप्रताप चौक, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, वरील संशयितांनी विविध योजनांचे आमिष दाखवल्याने त्यांनी कंपनीकडे ५० हजार ४०० रुपये गुंतवले. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाही. पंचवटी पोलिसांनी फसवणुकीसह कपंनी कायदा कलम २०१३ च्या ३६, ३७, ७४, ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पीएसआय एम. एम. शेख करीत आहेत.

सेबीकडून निर्बंध कायम
मुंबईस्थित पॅनकार्ड क्लब कंपनीने समूह गुंतवणूक योजनेंतर्गत विविध योजना राबविल्यात. एजंटाचे मजबूत जाळे तयार करून गुंतवणुकदारांना विविध आमिष दाखवण्यात आले. सहा वर्षे आणि नऊ वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मोठा परतावा देण्याचे आमिष कंपनीने दाखवले. एवढेच नव्हे तर कंपनीच्या व्यवसाय भागीदार असलेल्या हॉटेलमध्ये वर्षांतून एकदा चार रात्रीसाठी निवास मोफत मिळते, असे भासवण्यात आले. गुंतवणुकदारांचा मोफत मेडिक्लेम असल्याचे दाखवण्यात आल्याने राज्यभरात २५ लाख गुंतवणुकदारांनी कंपनीकडे पैसे गुंतवले. मात्र गुंतवणूक व त्यावर परतावा तसेच अन्य भेट अशा कोणत्याही व्यवहारासाठी सेबीने परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट करत २०१४ मध्ये कंपनीवर सेबीने निर्बंध घातले.

ग्रामीण गुंतवणूकदार अधिक
पॅनकार्ड क्लबच्या अन्य सात योजनांमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यावरही ‘सेबी’कडून मर्यादा घालण्यात आली. यानंतर, कंपनीचे सर्व व्यवहार गोत्यात आले. २०१२ मध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणुकदारांना परतावा मिळत नसल्याने ठिकठिकाणी आंदोलने झाली. नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गुंतवणुकदारांची संख्या मोठी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी बँकांचा संप; खासगी सुरुच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारकडून बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा निषेध व विविध मागण्यांसाठी आज, मंगळवारी देशव्यापी बँक कर्मचारी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील ४३० बँक शाखा बंद राहणार असून, सुमारे चार हजार कर्मचारी व अधिकारी संपावर जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील ७०० कोटींचे व्यवहार ठप्प होतील. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला असून, नाशिक व मालेगाव येथे गेट मिटिंग घेऊन धरणे आंदोलन केले जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून बँकांचे विलीनीकरण करण्यात येत आहे. त्याला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या बँक धोरणाच्या विरोधात देशभरातील बँकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. त्यात नाशिकचाही समावेश आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे गिरीष जहागिरदार, के. एफ. देशमुख, डी. टी. राजगुरू यांनी दिली.

व्यवहार सुरळीत

खासगी व सहकारी बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस व कोटक या खासगी बँकांतील कारभार सुरळीत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात या बँकांच्या १३२ शाखा आहेत.

सहकारी बँका

४४ नागरी सहकारी बँकांच्या ३१० शाखा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३१३ शाखा व ४५० पतसंस्थेच्या एक हजाराहून अधिक शाखा सुरूच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याला’ जीवदानाने पोळा सत्कारणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहर परिसरात सोमवारी बैलांचे औक्षण करून त्यांना गोडधोड नैवेद्य भरवून बैलपोळा साजरा केला जात असतानाच जय भवानीरोडला एका जखमी गोऱ्ह्याला सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. त्यामुळे बैलपोळा खऱ्या अर्थाने सत्कारणी लागल्याची भावना परिसरातून व्यक्त करण्यात आली.

सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जय भवानीरोडच्या कडेला जखमी अवस्थेतील गोऱ्हा मंगेश राठोड या युवकाला अढळून आला. रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा गोऱ्हा तीव्र वेदना आणि तहानेने तडफडत होता. फर्नांडिसवाडीजवळ चिखलामध्ये या तीन वर्षांचा गोऱ्ह्याची उठण्याची धडपड सुरू होती. राठोड यांच्याकडून ही घटना समजताच बीइंग कॉमन संस्थेचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने या जखमी गोऱ्ह्याला वाचविण्याची मोहीम सुरू केली. प्रारंभी त्याला ओंजळीने पाणी पाजण्यात आले. जनावरांच्या डॉक्टरांना बोलावणे धाडले गेले. यावेळी रस्त्यावरचे लोक येऊन बघायचे. काही थांबून फक्त चौकशी करायचे, तर काहींनी मदतीचा हातही दिला. प्रज्ञा कांबळे या युवतीने मदतकार्यास सुरुवात केली.

मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्टचे पुरुषोत्तम आव्हाड दुपारी तीनच्या सुमारास या ठिकाणी आले. त्यांनी टेम्पो बोलावला. उपचारांसाठी गोऱ्हा उचलून गाडीत ठेवावा लागणार असल्याने लाकडी बल्ल्या, दोर जमा करण्यात आले. गोऱ्ह्याचे वजन जास्त असल्याने तीनदा प्रयत्न निष्फळ झाले. शेवटी हातानेच सगळ्यांनी त्याला उचलून ठेवायचे ठरवले. त्यानंतर त्याला शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचारांना सुरुवात करण्यात अाल्यानंतर या गोऱ्ह्यासह संबंधित कार्यकर्त्यांच्याही जिवात जीव आला.


यांनी घेतला पुढाकार

विक्रम कदम, पुरुषोत्तम आव्हाड, प्रज्ञा कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मंगेश राठोड, बंटी गोहर, लकी मेहेरोलिया, वाहनचालक बाळू मेटे आदींच्या प्रयत्नांमुळे या गोऱ्ह्याला जीवदान मिळाले. परिसरातील नागरिकांकडून या युवकांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images