Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

समाजरत्न पुरस्काराचे आज होणार वितरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
कै. कोंडाजी नामदेव दुधारे बहुउद्देशीय मंडळातर्फे गुरुवारी (दि. १७) रोजी सकाळी साडेदहाला हॉटेल पंचवटी प्राइड, दिंडोरी रोड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डा. कालिदास चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येईल.
डॉ. पियूष जैन (दिल्ली), कैलाश कोते (शिर्डी), प्रल्हाद सावंत (पुणे), डॉ. डी. डी. धामणे (औरंगाबाद), पंडितराव नेरे (नाशिक), डॉ. धारणे (अहमदनगर), कैलास जैन (धुळे), आनंदगोपालसिंह (उत्तर प्रदेश), राजेंद्र देशमुख (नाशिक), डॉ. नरेंद्र शर्मा (पतियाला), दत्तात्रय घुगरे (कोल्हापूर), नारायणसिंह (मुज्जफरनगर), रुपाल गुप्ता (नागपूर), सतीश अग्रवाल (मूर्तिजापूर), एस. अनिलकुमार अद्वार (कर्नाटक), डॉ. संजय रोडगे (परभणी), एन. आर. राजकुमार (चेन्नई), सुरेश हरकुट (सोलापूर) या समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
मविप्र संस्थेचे संचालक नाना महाले, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, डॉ. बलवंतसिंह, आनंद खरे, माजी नगरसेवक दत्ता पाटील, स्वप्नील तोरणे आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस उपनिरीक्षक माळी, पोतदारांना राष्ट्रपती पदक

$
0
0

धुळे : राज्यातील ४९ पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी व प्रकाश पोतदार यांचा समावेश आहे. याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपपोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षण गृहातून पुन्हा पळाली मुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी परिसरातील बालनिरीक्षण गृहातून सोमवारी मध्यरात्री नऊ मुले खिडकीचे गज वाकवून पळून गेली. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. या नऊ जणांमध्ये जून महिन्यात पळून गेलेल्या मात्र नंतर पुन्हा शोधून ताब्यात घेतल्या गेलेल्या पाच मुलांचाही समावेश आहे. अवघ्या अडीच महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मुले पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे.

उंटवाडी परिसरात बाल निरीक्षण गृहात सध्या अनाथ आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणारी दोन वर्गातील साधारणत: १४ ते १८ वयोगटातील मुले आहेत. सोमवारी मध्यरात्री पळालेल्या नऊ जणांपैकी ८ जण नाशिकमधील तर एक जण मालेगावचा रहिवासी आहे. पळालेल्या मुलांपैकी काही जणांवर खुनाचा प्रयत्न, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही आरोप आहे. या नऊ मुलांपैकी ५ जण ७ जूनच्या घटनेत या पूर्वीही पळाले होते. त्यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेण्यात यश मिळविले होते.

याबाबत निरीक्षण गृहाचे सचिव चंदूलाल शाह यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निरीक्षणगृहास समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. रात्री सर्व जण झोपी गेल्यानंतर या मुलांनी खिडकीचे गज वाकविण्यात यश मिळविले. सद्यस्थितीत येथे ८० मुले आणि मुली आहेत. येथे दाखल सर्व मुली या अनाथ असल्याने त्यांचा सांभाळ करणे तितकेसे आव्हानात्मक नाही. मात्र, दाखल मुलांपैकी काहींना गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी असल्याने पुरेशा मनुष्यबळाशिवाय त्यांच्यावर देखरेख ठेवणे तितकेसे सोपे ठरत नाही.

यासारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केअर टेकर्सची संख्या पुरेशा प्रमाणात वाढवावी, या मागणीचे पत्रही राज्य बालकल्याण विभागास निरीक्षणगृहाने पत्र लिहीले आहे. आतापर्यंत या मागणीवर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आता चार जणांची संख्या येथे मंजूर असताना केवळ दोन केअर टेकर येथील केंद्रात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जल्लोषपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन शहरासह ‌परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजारोहण समारंभ विभागीय आयुक्तालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हाधिऱ्यांसह सर्व प्रमुख सरकारी अधिकारी उपस्थित होते. महापालिका, पोलिस आयुक्तालय, विविध पोलिस स्टेशन, महापालिकेची विभागीय कार्यालये, सर्व सरकारी, खासगी, जिल्हा परिषदेच्या शाळा, वाचनालये, सार्वजनिक संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पोलिसांच्या वतीने नागरिकांमध्ये हेल्मेट जागृतीसाठी शहरातून हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. अनेक सामाजिक संस्थांनी विविध शाळा, गरीब मुलांना भेटवस्तू दिल्या. पर्यावरणमित्र, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गिर्यारोहक संस्थांनी रामशेज, पांडवलेणे, चामरलेणे, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर यांसह जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवर मोहिमा काढून किल्ल्यांची स्‍वच्छता केली. वृक्षारोपणाचेही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


सुकाणू समिती सदस्य नजरकैदेत

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणास विरोध करणाऱ्या शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्यांचा प्रशासनाने धसका घेतल्याचे दिसून आले. स्वातंत्र्यदिनी शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्यांना तब्बल १९ तास पोलिसांच्या नजरकैदेत ठेवल्याने या सदस्यांना स्वातंत्र्यदिनीच ध्वजास मानवंदनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. स्वातंत्र्यदिनीच नजरकैदेत राहण्याची वेळ आल्याने सरकारची ही हुकुमशाही असल्याचा आरोप समितीचे सदस्य गणेश कदम व कॉ. राजू देसले यांनी केला. विशेष म्हणजे कॉ. राजू देसले यांना तर स्थानिक प्रशासनाने नेहमीप्रमाणे ध्वजारोहणाचे लेखी निमंत्रण आगोदरच दिलेले होते. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय ध्वजारोहणास शेतकरी सुकाणू समितीने तीव्र विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीच (१४) शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्यांना त्यांच्या निवास्थानीच नजरकैदेत ठेवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकवर स्मार्ट’करभार!

$
0
0

मालमत्ता करात १८ टक्के; तर पाणीपट्टीत दुपटीपेक्षा अधिक वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपने नाशिककरांवर अवघ्या सहा महिन्यांतच करवाढ लादली आहे. स्मार्ट सिटी, अमृत योजनांसह विविध योजनांचे दायित्व वाढत असल्याने प्रशासनाने सुचविलेल्या मालमत्ता करातील १८ टक्के, तर पाणीपट्टीत दुप्पट करवाढीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पाणीपट्टीत पंचवार्षिक वाढ सुचविण्यात आली असून, दरहजारी दर पाच रुपयांवरून ११ रुपये करण्यात आल्याने नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे.

पुढील वर्षांपासून नाशिककरांवर करवाढीचा बोझा पडणार असून, महापालिकेला मालमत्ता करातून १३ कोटी, तर पाणीपट्टीतून पाच वर्षांत १६१ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. तब्बल २६ वर्षांनंतर शहरात प्रथमच मालमत्ता करांत वाढ होणार आहे. नाशिकचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्यानंतर कर सुधारणा करण्याची महत्त्वाची अट त्यात आहे. त्यानुसार मालमत्ता व पाणीपुरवठा दरांत वाढ करण्याचा प्रस्ताव यापूर्वी महापालिका प्रशासनाने स्थायी समितीवर सादर केला होता. जानेवारी २०१७ मध्ये मागील पंचवार्षिक काळात तत्कालीन स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी घर व पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर, महापालिकेत निवडणूक होऊन भाजप सत्तारूढ झाला. स्थायी समितीच्या सभापतिपदी शिवाजी गांगुर्डे विराजमान झाले. घर व पाणीपट्टी दरवाढीबाबत भाजप अनुकूल असल्याचे लक्षात येताच महापालिका प्रशासनाने जून २०१७ मध्ये घरपट्टीत १४ टक्के, तर पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केला. मात्र, स्थायी समितीने सदरचा प्रस्ताव पुन्हा दुरुस्तीसाठी प्रशासनाला माघारी पाठविला होता. त्यानंतर स्थायी समितीसह महासभेने आयुक्तांनी सुचविलेली दरवाढ फेटाळून लावली होती. परंतु, जीएसटी लागू झाल्यानंतर तिजोरीला लागलेली ओहोटी आणि ७५ लाखांच्या नगरसेवक निधीसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनासमोर गुडघे टेकले होते. प्रशासनाने मालमत्ता करात १८ टक्के दरवाढीचा तर पाणीपट्टी करात चक्रिय पद्धतीने पाच वर्षांत दुपटीपेक्षा जास्त दरवाढीचा प्रस्ताव स्थायीवर पाठविला होता. या दरवाढीच्या प्रस्तावाला शिवसेना, मनसे व काँग्रेसने तीव्र विरोध केला. परंतु, दरवाढीला भाजप अनुकूल असल्याने त्यांचा विरोध तोकडा पडला. शिवसेनेचे डी. जी, सूर्यवंशी, सूर्यकांत लवटे, प्रवीण तिदमे, मनसेचे सह्योगी सदस्य मुशीर सैय्यद, काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी नवीन मालमत्ता शोधण्याची व पाणीपट्टीतील गळती दूर करण्याची मागणी करीत विरोध केला. परंतु, भाजपच्या शशिकांत जाधव यांनी करवाढीचे समर्थन केले. त्यामुळे सभापतींनी करवाढीला हिरवा कंदील दाखवला आहे.

भाजपकडून जोरदार समर्थन

प्रशासनाने सुचविलेल्या करवाढीचा अभ्यास न करताच भाजपच्या नगरसेवकांनी करवाढीचे समर्थन केले. शशिकांत जाधव यांनी प्रशासनाची सुचविलेली करवाढ ही कमीच असल्याचा दावा करीत आणखी वाढ करायला हवी, असे सुचविले. जाधव यांच्या या भाषणामुळे अधिकारीही चक्रावले. यावरून अजूनही करांत वाढ करण्याच्या परिस्थितीत भाजप असल्याचे सूचित होत आहे.

करवाढ कमीच

महापालिकेचे विविध योजनांमधील दायित्व वाढते आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत आपल्या येथे असलेली करवाढ कमीच असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. त्यामुळे करसुधारणा करणे आवश्यक असल्याचा दावा करतानाच करवाढ कमी असल्याचे सांगितले. मालमत्तेच्या सर्वसाधारण करांमध्ये २६ वर्षांपासून तसेच स्वच्छता, जललाभ, पथकर, मनपा शिक्षण कर यामध्ये गेल्या २२ वर्षांपासून वाढच झाली नसल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

अन्य करांतही वाढ

टँकर्स, नळजोडणी, रस्‍तादुरुस्ती शुल्कातही भरघोस वाढ करण्यात आली आहे. टँकर्सचे शुल्क दोनशेपासून ते १०५० रुपयांपर्यत करण्यात आले आहे. नळजोडणी, रस्‍तादुरुस्ती शुल्क सोळाशे वरून ३२०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. नळजोडणी शुल्क आणि अनामत रकमेतही दुपटीने वाढ करण्यात आल्याने नवीन कनेक्शन घेणाऱ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९० कोटींच्या पीककर्जाचे वितरण

$
0
0

धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना १९० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. याप्रसंगी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, खासदार हिना गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगरपालिका नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, गोरक्ष गाडीलकर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नंदुरबार दाखल्यात अग्रेसर

जिल्ह्यात २.७३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात सरासरी शंभर टक्के खरीप हंगामाचा पेरा झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री रावल यांनी दिली. तळोद्यासह शहादा तालुक्यातील काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर त्यावर कृषी विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला मालमत्ता संदर्भात आवश्यक कागदपत्रे सहज व तत्काळ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सरकारने ऑनलाइन ७/१२ संगणकीकरणाचे काम सुरू केले असून, नंदुरबार जिल्ह्यात ९९ टक्के सातबारा संगणकीकृत झाले आहेत. नंदुरबार जिल्हा हा नाशिक विभागात प्रत्येक टप्प्यावर अग्रेसर राहिलेला आहे, असेही रावल यावेळी बोलतांना म्हणाले.

यावेळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सविता गावीत, सभापती पंचायत समिती, नवापूर व एन. डी. वाळेकर गटविकास अधिकारी नवापूर, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम-पुरस्कार सरपंच ज्योतीबेन पाटील, द्वितीय पुरस्कार सरपंच शकुंतला गावीत व तृतीय पुरस्कार बेबीबाई पाडवी, सार्वजनिक बांधकाम विभागातील लेखा शाखेचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल बी. एल. मोरे, जिल्हा क्रीडा पुरस्कार राजेश परदेशी, यांना मिळाल्याबद्दल त्यांनाही सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरक्षकांच्या हल्ल्याचा निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशभरात गोरक्षणाच्या नावाखाली अल्पसंख्याक समुदायाला लक्ष केले जात आहे. अनेकांची हत्याही करण्यात आली आहे. त्यामुळे या हल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार असिफ शेख यांच्या नेतृत्त्वाखाली ‘इन्सानियत बचाव संघर्ष समिती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनी मालेगाव ते नाशिक अशी पदयात्रा काढण्यात आली आहे.

मंगळवारी शहरातील शहीदो की यादगार या चौकापासून पदयात्रेला सुरुवात झाली. १९ ऑगस्ट रोजी नाशिक येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

शहीदो की यादगार या चौकात शेख म्हणाले, गो-रक्षणाच्या नावाने काही समाजकंठकांनी कायदा हातात घेण्याचे काम सुरू केले आहे. केंद्र व राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेवून कठोर उपाय योजना कराव्यात. कथित गो-रक्षकांच्या हल्ल्याबाबत कायदा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे. याप्रसंगी शहरातील हजारो मुस्ल‌मि बांधव आमदार अशिफ शेख यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित होते. शहरातून सुरू झालेली ही पदयात्रा मुंबई आग्रा महामार्गे नाशिककडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्वीन्स’नं जिंकलं!

$
0
0

नाशिक प्लस टीम

‘विजेती नसताना तुला विजेती घोषित केले व दुसऱ्याच मिनिटात दुसरी कोणी विजेती असल्याचं सांगितलं तर तुझं मत काय असेल?’ वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय सोनी पैठणी स्पर्धेतील मुकुट मिळवून देणारा प्रश्न. एका मिनिटात अगदी मोजक्या शब्दांमध्ये मनातलं उत्तरं लिहून आपली भावना व्यक्त करण्याचा तो क्षण. टेन्शन, धडधड, उत्कंठा, चुरस पण तरीही चेहऱ्यावर जाणवणारा आनंद. अंतिम फेरीतील ‘पायल वारे, श्रुती पिसोळकर, तन्वी खर्डे, चैताली टिपरे आणि पूजा चंद’ या पाचही जणींची अवस्था अगदी सारखीच आणि उत्तराने परीक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन स्पर्धेच्या सातव्या वर्षी ‘पायल वारे' हिने या चुरशीच्या लढतीत बाजी मारली अन् श्रावणक्वीनचा झळाळता मुकुट पटकावला.

अभिनय, सोशल, फॅशन, मेकअप अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. अभिनेत्री पल्लवी पाटील, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री राधिका कुलकर्णी व सिनेदिग्दर्शक अजय नाईक असे दिग्गज परीक्षक म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर हॉटेल एक्स्प्रेस इन येथे पार पडलेल्या अंतिम फेरीत ‘तन्वी खर्डे’ पहिली उपविजेती तर ‘चैताली टिपरे’ दुसरी उपविजेती ठरली.

नाशिकच्या प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेल्या पंधरा सौंदर्यवतींनी आपली कला, बुद्धीमत्ता यांच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं. गेले सात दिवस विविध तज्ज्ञांनी दिलेलं प्रशिक्षण, मार्गदर्शन यांचा साक्षात्कार या पंधरा स्पर्धकांनी श्रावणक्वीनच्या ग्रँड फिनालेत घडवला. या सोहळ्याची सुरुवात पंरपरेला साजेशी अशा गणेशवंदनाने झाली. नाशिकच्या प्रसिध्द कथक नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी गणेश प्रार्थना करून कला, बुद्धी, सौंदर्य यांचा मिलाप असलेल्या स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धकांच्या पहिल्या रॅम्पवॉकची थीम होती ‘रेशमी धाग्यांची नक्षीदार पैठणी’. अस्सल मराठमोळा मेकअप अन् सौंदर्यवतींवर शोभून दिसणाऱ्या सोनेरी पैठणीने पहिल्या रॅम्पवॉक राउंडची शोभा वाढवली. यानंतर स्पर्धकांनी स्वतःचे कलागुण परीक्षकांसमोर सादर केले. विविध नृत्याविष्कार, एकपात्रीमधून दाखवलेले अभिनयाचे कौशल्य यामुळे टॅलेंट राउंडची फेरी रंगत गेली. यावेळी परीक्षकांनी चातुर्य आणि वैचारिक भूमिका जाणणारे प्रश्न स्पर्धकांना विचारले. सामान्य ज्ञानासोबतच सामाजिक समस्या, राजकारण, शिक्षण, सौंदर्य, अभिनय या स्तरावर स्पर्धकांना पडताळले गेले. या फेरीतून निवडून आलेल्या पाच स्पर्धकांनी श्रावणक्वीनच्या मुकुटापर्यंतचा प्रवास केला.

श्रावणक्वीनसाठी कोरिओग्राफी नवीन तोलानी यांनी केली होती, तर ड्रेस, साडी नेसून देण्याची जबाबदारी आयएनआयएफडी इन्स्टिट्यूटने पार पाडली. स्पर्धकांचा मेकअप जॉय एन जॉय ब्युटी केअर यांच्याकडून करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी स्पर्धेचे सर्व स्पॉन्सर्स उपस्थित होते. या बहारदार सोहळ्याचं तितकचं धमाकेदार रुप आणि प्रेक्षकांना सौंदर्य स्पर्धेच्या कार्यक्रमात बांधून ठेवणारं सूत्रसंचालन अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री धनश्री क्षीरसागर यांनी केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पादुका मंदिरास अतिक्रमणाचा विळखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळवाडे फाटा येथे असलेल्या श्री संत निवृत्त‌निाथ महाराज यांच्या पादुका मंदिरास अतिक्रमणाचा विळखा पडला असून, तो तातडीने हटविण्यात यावा या मागणीसाठी अंजनेरी ग्रामपंचायत उपसरपंच पंड‌ति चव्हाण, सदस्य गणेश चव्हाण आदींसह सदस्य व ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

या परिसरात बांधकामे झालेली नव्हती तोपर्यंत हे मंदिर दूर अंतरावरून दृष्टिक्षेपात येत असे. तथापि पाच वर्षांपासून परिसरात अत‌क्रिमण झाल्यामुळे मंदिर झाकले गेले आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा सोमवारी उपसरपंच पंड‌ति चव्हाण सदस्य गणेश चव्हाण आदींसह उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे आधुनिकीकरण करावे'

$
0
0

धुळे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

२८६२६ शेतकऱ्यांना २४८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी व प्रकाश पोतदार यांचा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात दि. २९ व ३० ऑगस्टला अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री भुसेंनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंतांचा उद्या कौतुकसोहळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ज्यांनी दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून दाखविले, त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात, योग्य दिशा, भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जमा झालेले धनादेश गुणवंतांना हस्तांतरीत करण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉलेजरोडवरील एचपीटी कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉल, तिसरा मजला येथे शुक्रवारी (दि. १८) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांची तर अध्यक्ष म्हणून सर डॉ. मो. स. गोसावी यांची उपस्थिती राहणार आहे. गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव हेच ते ‘मटा’ने हेरलेले दहा हिरे आहेत.

‘मटा’ने हे दहाजण हेरलेत, आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना ‘त्यांनी’ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर येण्यासाठी ‘ते’ प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे. पण त्यासाठी त्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. अशांसाठी ‘मटा’तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपूर्व असे यशही लाभले. नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखविली, कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू, असा हट्ट धरला तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू असे सांगितले.

नाशिककरांचे स्वागत

‘मटा हेल्पलाइन’ उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातून ओढला जावा, असा हेतू होता. नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णही झाला आहे. हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच; पण नाशिककरांनीही या हृद्य सोहळ्याला उपस्थित रहावे, अशी विनंती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी प्रॅक्ट‌िस करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सेवेत कार्यरत असतानाही, डॉक्टर्स खासगी व्यवसाय करत असल्याचे प्रकरण सदस्य मुशीर सैय्यद यांनी स्थायी समितीत चव्हाट्यावर आणले आहे. बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जयंत फुलकर यांचे पुरावेच त्यांनी स्थायीत सादर केले असून, त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यावर पालिका सेवेत कार्यरत सर्व डॉक्टरांची चौकशी करून पुढील स्थायीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले आहेत. त्यामुळे पालिका सेवेत असूनही खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या डॉक्टरांची अडचण होणार आहे.

महापालिका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स खासगी प्रॅक्ट‌िस करत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. महापालिका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले काही डॉक्टर्स ही औषधेही घरी नेत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जातो. आतापर्यंत डॉक्टरांचा रुग्णांशी व्यवहार आणि पालिका रुग्णालयातील औषधांच्या वापरासंदर्भातील वाद हा आरोप-प्रत्यारोपांपर्यंत मर्यादीत होता. परंतु, बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य मुशीर सैय्यद यांनी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्ट‌िसचे पुरावेच सादर करून वैद्यकीय विभागाच्या कारभाराचा भंडाफोड केला. बिटको रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांच्या खासगी प्रॅक्ट‌िसचे पुरावेच सादर केले. फुलकर हे नगरसेवकांसह रुग्णांशी असभ्य वर्तन करतात, असा आरोप करत शासकीय सेवेत कार्यरत असताना खासगी व्यवसाय करता येतो का, असा सवाल त्यांनी वैद्यकीय विभागाला केला.

फुलकर यांच्या खासगी क्लिनिकचे आणि पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचे पुरावेच सैय्यद यांनी स्थायी समितीत सादर केले. आपण फुलकर यांच्याकडे बनावट पेशंट पाठवून तपासणी केली असता ते खासगी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यांनी स्वतःच्या नावाचे क्लिन‌िकच सुरू केले असून, महापालिका सेवेत कार्यरत असताना खासगी व्यवसाय केला म्हणून त्यांच्यावर काय कारवाई केली, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे संबंधित डॉक्टरला निलंबित करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सैय्यद यांनी केली. डॉ. सीमा ताजणे यांनीही बिटकोच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यामुळे सभापती गांगुर्डे यांनी पालिका सेवेत असूनही खासगी प्रॅक्ट‌िस करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करून अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश वैद्यकीय विभागाला दिले आहेत.

गोरखपूरसारखी स्थिती

उत्तर प्रदेशात नुकत्यात झालेल्या मेड‌िकल कॉलेजमधील बालकांच्या मृत्यू प्रकरणावरून सदस्यांनी वैद्यकीय विभागाला धारेवर धरले. गोरखपूर मेडिकल कॉलेजसारखीच अवस्था महापालिका रुग्णालयांची असताना प्रशासन झोपेत असल्याचा आरोप सैय्यद यांनी केला. अशी दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. अन्य सदस्यांनीही महापालिका रुग्णालयांच्या कारभारावर टीका केली.

डॉ. डेकाटे यांची विभागीय चौकशी

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यापुर्वीच घंटागाडी ठेकेदाराला अनामत रक्कम अदा करणे तत्कालीन आरोग्य अधिकारी व सध्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना महागात पडणार आहे. मे. समिक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला बिल अदा केल्याप्रकरणी व अप्रत्यक्ष मदत केल्याप्रकरणी डॉ. डेकाटे यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात डॉ. डेकाटे यांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली असून, त्याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. डॉ. डेकाटे यांची बदली झाली असली तरी विभागीय चौकशी झाल्यानंतरच त्यांना पालिका सेवेतून मुक्त केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणसरींनी नाशिककर चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे,
बालकवींच्या कवितेतील या ओळींप्रमाणेच चित्र सध्या दिसून येत आहे. ऊन व श्रावणसरी असा दुहेरी आनंद नाशिककरांना घेता येत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाची उघडझाप शहरवासीयांना अनुभवण्यास मिळाली होती.
काही दिवसात मात्र श्रावणसरींनी शहरात पुन्हा हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली तर बुधवारीही सकाळी पावसाचा शिडकावा अधूनमधून सुरू होता. मुसळधार नसला तरी हलक्याशा श्रावणसरींमध्ये यामुळे नाशिककर चिंब झाले. जुलैमध्ये धुवाधार हजेरी लावत नाशिकच्या पावसाने यंदाही नाशिककरांना तृप्त केले. ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. श्रावण महिन्याच्या मध्यावर येत असलेल्या रिमझिम सरींनी निसर्ग बहरला आहे. त्यामुळे नाशिककरांमध्येही चैतन्याचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या अनेक वर्षांपासून शहरासह उपनगरातील येथील महिला व मुलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, आरोग्य विभागाकडून त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून दादा भुसे यांनी याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. येथे सद्यस्थितीत २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू आहे. सदर रुग्णालयात मालेगाव शहर, तालुक्यासह पंचकृषीतून मोठ्याप्रमाणावर महिला रुग्ण येत असतात. त्यामुळे मालेगाव शहर व तालुक्यातील महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शहरात स्वतंत्र महिला रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता होती.

यासंदर्भात गेल्या अनेक वर्षातील तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्या समवेत बैठक, विधिमंडळात तारांकीत प्रश्न, लक्षवेधी याद्वारे भुसे यांनी महिला रुग्णालयाबाबत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचेसमवेत गेल्या वर्षी व यंदा ९ मे रोजी झालेल्या बैठकीत महिला रुग्णालय तातडीने सुरू करण्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती. यास शासनाने मान्यता दिल्याने येथे विशेष बाब म्हणून १०० खाटांचे महिला व मुलांचे रुग्णालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवीन पदभरती होणार

येथे जुन्या बंद अवस्थेत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी १०० खाटांचे स्वतंत्र महिला व मुलांचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार असून, येणाऱ्या कालावधीत सटाणा रस्त्यावरील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथे महिला रुग्णालय सुरू होणार आहे. महिला व मुलांच्या रुग्णालयासाठी आवश्यक ती पदे निर्मिती व निधी शासनाकडून स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मालेगावी महिलांसाठी १०० खाटांच्या स्वतंत्र रुग्णालयाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला.शासनाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यास मान्यता दिल्याने मालेगाव शहर व तालुक्यातील महिलांना मोठी अनमोल भेट दिली आहे.

- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्या बापाला बेड्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
घरात कुणी नसल्याची संधी साधत पोटच्या मुलीचाच बापाने विनयभंग केला आहे. बजरंगवाडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईनेच पतीविरोधात तक्रार दिल्यानंतर मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी (१४ ऑगस्ट) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. १७ वर्षीय युवती घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्या बापाने अंगलट करीत मुलीचा विनयभंग केला. बाहेरून घरी परतलेल्या आईस ही घटना मुलीने सांगितली. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

तोतया पोलिस अटकेत
ठाणे पोलिस दलातील कर्मचारी असल्याचे भासवून लष्करी छावणीत बिनदिक्कत फिरणाऱ्या तोतया पोलिसाला जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. लष्करी जवानाने संशयितास पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शांताराम परशराम कांगणे (४२, रा. दोनवाडे, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडनेर रोडवरील मिलिटरी पोस्ट नाका नं. ४ येथे लष्करी जवान भरत वराळ सेवा बजावत होते. लष्करी छावणीत प्रवेशापूर्वी या ठिकाणी तपासणी केली जाते. यावेळी संशयीताने प्रवेश करण्यासाठी आपण पोलिस दलात कार्यरत असल्याचे भासवून ठाणे शहर पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले. मात्र, हवालदार वराळ यांना ओळखपत्राचा संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्फत तात्काळ पडताळणी केले असता संशयित कांगणे तोतया असल्याचे उघड झाले. कांगणे याने दाखविलेले ओळखपत्र बनावट असल्याचे समोर येताच त्यास देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पोटे करीत आहेत.

टोळक्याची एकास मारहाण
जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सातपूर एमआयडीसीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी चार संशयितांविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की लोणकर, प्रवीण गांगुर्डे, प्रवीणचा भाऊ व संतोष कोरडे (रा. सर्व धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. बिटू पवनसिंह (१९ रा. शिवशक्तीचौक, शिवाजीनगर) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

बिटू व सागर गांगुर्डे आणि संकेत गायकर हे तिघे मित्र मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धर्माजी कॉलनीतील हनुमान मंदिराजवळून पायी जात असतांना ही घटना घडली. संशयितांनी तिघा मित्रांना गाठून विक्की लोणकर याने बिटूस प्रवीण गांगुर्डे याच्या वडिलांना सात दिवसांपूर्वी का शिवीगाळ केली. याचा जाब विचारत लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी उर्वरित संशयितांनीही शिवीगाळ व दमदाटी करीत दगडाने मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.

अपघातात तरुणी जखमी
भरधाव वेगातील दुचाकीने अ‍ॅक्टिव्हाला दिलेल्या धडकेत पिंपळगाव खांब येथील तरुणी जखमी झाल्याची घटना पाथर्डी गाव परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अज्ञात दुचाकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री बहिरू साहणे (२३, रा. गणेशनगर, पिंपळगाव खांब) असे जखमी तरुणीचे नाव आहे. गायत्री गुरूवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून आपल्या घराकडे अ‍ॅक्टिव्हावर (एमएच १५ ईवाय ८५५३) प्रवास करीत असताना हा अपघात झाला.

पाथर्डी गाव येथील गंगा हाइट्स समोरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने (एमएच १५ बीएच १७६९) अ‍ॅक्टिव्हाला धडक दिली. या अपघातात गायत्री गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी तिची आई मीराबाई सहाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्प्लेडर मोटारसायकलवरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पगारे करीत आहेत.

पैशाच्या कारणातून रिक्षा पेटविली
हात उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकाने अ‍ॅटोरिक्षा पेटवून दिल्याची घटना वडाळागावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली आहे. शहाबाज उर्फ चिऱ्या असे रिक्षा पेटवून देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. अमजद मुस्ताक सय्यद (रा. साठेनगर, वडाळागाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सय्यद यांनी चिऱ्यास काही दिवसांपूर्वी हात उसनवार पैसे दिले होते. त्या पैश्यांची मागणी केल्याने सोमवारी रात्री संशयिताने सय्यद यांच्या घरासमोर पार्क केलेली त्यांची रिक्षा (एमएच १५ झेड ८५८९) पेटवून दिल्याचा संशय आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.

ट्रकमधून बॅटऱ्या चोरी
पार्क केलेल्या मालट्रकमधील लोखंडी जॅकसह चोरट्यांनी सुमारे २३ हजार ५०० रुपयांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक संपतराव चव्हाण (६५, रा. आवटेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांचे मालट्रक मंगळवारी रात्री सिन्नर फाटा भागातील मोकळ्या जागेत पार्क केलेले असताना ही घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चव्हाण यांचे मालट्रक मोकळ्या जागेत उभे असतांना अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधील लोखंडी जॅक व मालट्रकच्या बॅटऱ्या असा २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार दळवी करीत आहेत.

तीन झाडांची कत्तल
कुठलीही पूर्वपरवानगी न घेता वृक्षतोड केल्यामुळे एकाविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बबन तुळशीराम कटारे (५१, रा. जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून संशयिताने द्वारका परिसरातील मदर चर्चजवळ असलेले तीन झाडे युसुफ इंकवाला (रा. टाकळी रोड) याने अवैधरित्या तोडली. अधिक तपास सहायक निरीक्षक लोखंडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठेकेदारांचे उपोषणास्त्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा परिषदेने विकास कामापोटी दिलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेक बँकेत वठत नसल्याने ठेकेदारांनी आता २२ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेचे काम करताना उधारीवर आणलेले बांधकाम साहित्यासाठी दुकानदार घरी चकरा मारत असून मजुरांचे ‌थकित वेतनही देता येत नसल्याचे सांगत या ठेकेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पैसे वेळेवर न देता आल्याने आमच्या घरी दुकानदारांसह मजुरांच्या चकरा वाढल्या आहे. त्यामुळे आमची प्रतिमा मलीन झाल्याची ठेकेदारांची तक्रार आहे.
जिल्हा परिषदेचे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची नाशिक जिल्हा मजूर संस्थेच्या सभागृहात नुकतीच बैठक झाली. यात मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व बिल्डर्स असोसिएशन व नोंदणीकृत ठेकदार उपस्थित होते. जिल्हा परिषदेने दिलेले चेक जिल्हा मध्यवर्ती बँकेत वटत नसल्याची तक्रार केली. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याबद्दली नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेने यातून तोडगा काढावा व चेक वटतील यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी या ठेकदारांची आहे. या बैठकीत आर. टी. शिंदे, विनायक माळेकर, संदीप वाजे, चंद्रशेखर डांगे, अजित सकाळे यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांनंतर ठेकेदारांची कोंडी
जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक अडचणीत सापडल्याने शिक्षकांचे असेच पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा असून त्यांना ते मिळत नसल्याच्या तक्रारी अगोदर होत्या. आता त्यात ठेकेदारांची भर पडली आहे. या ठेकेदारांनी काम केल्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांना चेक दिले. पण हे चेक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असल्यामुळे ते वटत नाही. त्यामुळे या ठेकेदारांसमोर आर्थिक अडचण तयारी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉपिंग मॉल्सला गर्दीचा बहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त मॉल्समध्ये दिल्या जात असलेल्या ऑफर्सची यंदाही ग्राहकांना प्रतिक्षा होती. या ऑफर्स जाहीर होताच ग्राहकवर्गा मॉल, शोरुम्सकडे खेचला गेला. कपड्यांपासून खाद्यपदार्थांपर्यंत विविध वस्तूंवर आकर्षक सवलती देण्यात आल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. तसेच मनसोक्त शॉपिंगमधून नाशिककरांनी विकेंडचा आनंद द्विगुणीत केला.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी अशा महत्त्वाच्या दिवसांना मोठमोठे मॉल्स, शोरुम्समध्ये विविध ऑफर्स विक्रेत्यांकडून जाहीर केल्या जातात. या दिवसांमध्ये सुट्या व शॉपिंग करण्यासाठी ऑफर्समुळे ग्राहक आसुसलेले असतात. याच अनुषंगाने स्वातंत्र्यदिनानिमित्त मॉल्समध्ये फ्रिडम सेल्स जाहीर करण्यात आले आहेत. १० टक्क्यांपासून ५० ते ६० टक्क्यांपर्यंत ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. जुना स्टॉक संपवण्यासाठी तसेच नवीन स्टॉकची ग्राहकांना माहिती मिळावी, यासाठी या ऑफर्सची आतषबाजी केली जात आहे. ‘न्यू अरायव्हल्स’ विभागात मात्र कोणतीही ऑफर्स दिली जात नाही. ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी मॉलमध्ये मोठा समूदाय येतो. त्यांच्याकडून ऑफर्स नसलेल्या वस्तुंच्या खरेदीलाही पसंती दिली जात आहे. एरवी ग्राहकांची संख्या कमी असली तरी सेलच्या नावाखाली मॉल्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याचे वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरले जात आहेत. देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक मॉल्समध्ये स्टॉक क्लिअरन्स सेल्स जाहीर करण्यात आले होते. आता स्वातंत्र्यदिनानिमित्त फ्रिडम सेल यामुळे कमी किमतीत खरेदी केल्याचा आनंद ग्राहकांना मिळत आहे.

बिलिंगसाठी तासभर वेटिंग
गर्दीने भरलेल्या मॉल्समध्ये आपल्या पसंतीचे कपडे निवडल्यानंतर ते ट्रायलसाठी व बिलिंगसाठी मोठ्या रांगांमध्ये ग्राहकांना उभे राहावे लागत आहे. ट्रायल रुम्स व बिलिंग काउंटर येथे ग्राहकांना तब्बल अर्धा ते एक तास खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून मॉल प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली जात आहे. शिवाय, कॉलेजरोड, उंटवाडी येथे मॉलबाहेर ट्रॅफिक जामची समस्याही निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे उद्यापासून ‘हॅपिनेस प्रोग्राम’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे देशभरात एक लाखाहून अधिक लोकांना १८ ते २० ऑगस्ट या काळात ‘हॅपिनेस प्रोग्राम’ द्वारे आनंदी, उत्साही आणि तणाव मुक्त जीवनाची रहस्ये शिकवणार आहेत. त्यासाठी नाशिक येथे एकूण १८ केंद्रावर आनंदलहरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
‘हॅपिनेस प्रोग्राम’चा मुख्य भाग म्हणजे गुरुदेवांना प्राप्त झालेली सुदर्शन क्रिया ही अतिशय प्रभावी अशी तालबद्ध श्वसन प्रक्रिया आहे. या विशेष श्वसन प्रक्रियेमुळे मानसिक ताण, थकवा निघून जातो. क्रोध, नैराश्य व उदासीनता यासारख्या नकारात्मक भावना नाहीशा होतात. शांत, उत्साही वाटते आणि एकाग्रता वाढते. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिलाँग ते मुंबई आणि जम्मू ते चेन्नई अशा शहरांना जोडत २१०० ठिकाणाहून शिबिरार्थी एकत्र येऊन आनंदी होण्याचे मार्ग शिकणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक व स्वयंसेवक सर्व वेब द्रांवर उपस्थित असतील जिथे वेबकास्टच्या मदतीने थेट प्रक्षेपण केले जाईल.
नाशिकमधील शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी (०२५३) २३७२०२० / २१ या क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे पद्मेश भावसार, संजय बडवर, अनिल फिरके, सुरेश सानप, प्रताप बनकर, दीप्ती ठाकूर, प्रवीण कापडणे, ज्योती गांगुर्डे, खंडू गांगुर्डे, दिनकर काठे, राजेश साळी, संजय मेचकूळ, स्मृती ठाकूर, बाळू कदम, सुनील ठाकरे, स्वप्निल अमृतकर, सुभाष कोल्हे, संजय पिंगळे, विजय नेटके, प्रमिला जमदाडे, बिपिन शिंगाडा, सचिन म्हसणे, दीपक बोरसे, विजय हाके, हेमंत तुपे हे सर्व प्रशिक्षक नाशिकमधील विविध केंद्रांवर शिबिराचे आयोजन करण्यास सज्ज आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

स्वतःबरोबर समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी गुरव समाज बांधवांनी उच्च शिक्षणाची कास धरावी. कष्ट, प्रामाणिकपणा व जिद्दीने वाटचाल करत यश संपादन करावे, असे प्रतिपादन महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनाजीराव गुरव यांनी केले.

शैव गुरव समाज नाशिक या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम तसेच गुणवंतांचा सत्कार समारंभ नाशिक-पुणे मार्गावरील फेम थिएटरमागील क्षत्रिय मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी शिक्षणाधिकारी अरविंद फुलारी, मुंबई येथील संतोष गुरव, माजी न्यायाधीश प्रकाश हरताळकर, न्या. कुमार भक्त, नाशिक जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष रमेश पवार, अशोक भालेकर प्रमुख पाहुणे होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान शंकर तसेच काशीबा महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेचे सचिव नितीन काळे यांनी प्रास्तविक केले. कोषाध्यक्ष मंगेश भांडारे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. अध्यक्ष सुधीर चांदसरकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

अरविंद फुलारी म्हणाले की, समाजातील नीतिमूल्ये हरवत चालली असताना आपण मुलांवर बालपणापासून संस्कार करणे गरजेचे आहे. शिरीष गुरव, डॉ. नागेश गुरव, उमेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले तर एन. पी. तायडे यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाचे पाइप चोरीला

$
0
0

संरक्षक कठडे बसविण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या पुलाच्या संरक्षक कठड्याचे पाइप चोरीला गेल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. येथे त्वरित पाइप लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाशिक-पुणे मार्गावर काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल उभारण्यात आला. हा पूल होण्याअगोदर रेल्वे मार्गावरील जुन्या उड्डाणपुलावरून वाहतूक होत असे. या पुलाने अनेक वर्षे साथ दिल्यानंतर नवा पूल उभारण्यात आला. जुन्या पुलाचा वापर आता सिन्नरहून नाशिकरोडला येणाऱ्या वाहनांसाठीच फक्त केला जात आहे. हा मार्ग एकेरी करण्यात आल्याने वाहने वेगात जात असतात.


वाहने कोसळण्याची भीती

या उड्डाणपुलाखालून रेल्वे मार्ग जातो. तसेच खाली देवी चौकात व्यावसायिक व अन्य लोक राहतात. वाहने खाली कोसळू नये म्हणून पुलाला सुमारे दोनशे मीटरपर्यंत संरक्षक कठडे बसविण्यात आले होते. त्यातील अनेक टप्प्यावरील पाइप कापून नेण्यात आले आहे. येथे पथदीप नसून, या पुलावरून वाहने वेगात धावत असतात. त्यांचे नियंत्रण सुटले तर वाहने खाली रेल्वेवर किंवा लोकवस्तीवर पडून प्राणहानी होऊ शकते. त्यामुळे लोखंडी पाइप बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात गवत वाढले असल्याने पाइप तुटल्याचे वाहनचालकांना लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तरी, या मार्गावर जेथे संरक्षक कठडे नाही तेथे ते बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images