Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फाळके चित्रपटसृष्टीला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता लवकरच सांस्कृतिक कार्य, तसेच महसूल व वन विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार जयवंतराव जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नांवर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी हे उत्तर दिले.

नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी निर्माण करण्याकरिता नाशिक विकास कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपये नियतव्यय निश्चित केल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सविस्तर अहवाल सादर केला आहे. या प्रकल्पासाठी मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जागा सांस्कृतिक कार्य विभागाच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता प्रस्तावही पाठविण्यात आला. सरकारने चित्रपटसृष्टीसाठी सांस्कृतिक कार्य विभागास जमीन हस्तांतरण करून या चित्रपटसृष्टीचे काम सुरू करण्याबाबत अद्याप कार्यवाही केली नाही. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव तपासण्यात येत असून, लवकरच सांस्कृतिक कार्य विभागासोबत महसूल व वन विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या कामाला एकप्रकारे हिरवा कंदीलच मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मविप्र निवडणुकीसाठी मेळाव्यांवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लवादाकडील अपिलांवर अंतिम सुनावणी पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी आता अवघे बारा दिवस हाती आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त सभासदांपर्यंत भूमिका पोहोचविण्यासाठी प्रतिस्पर्धी पॅनल्सकडून मेळाव्यांच्या आयोजनावर भर देण्यात येत आहे. मेळाव्यांच्या माध्यमातून सामूहिक गाठीभेटीचे प्रचारतंत्र प्रगती पॅनल आणि मविप्र समाज विकास पॅनल या दोन्हीही पॅनलकडून अवलंबले जात आहे. दोन्हीही पॅनलकडून उमेदवारांची अंतिम घोषणा होईपर्यंत कुणाच्या गटात कोण उपस्थिती लावतो, यावरून चर्चेला उधाण आले आहे. मात्र, प्रत्यक्षात पॅनलनिर्मितीनंतर गटातटांचे चित्र अधिक स्पष्ट होत जाणार आहे.

‘प्रगती’चा सिन्नर, इगतपुरीला मेळावा

सत्ताधाऱ्यांच्या प्रगती पॅनलच्या वतीने सोमवारी सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात मेळावे घेण्यात आले. सिन्नरमधील मेळाव्यात बोलताना सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभासदांना विश्वास जपण्याची ग्वाही दिली, तर संस्थेचे कार्य हे देवकार्य म्हणून स्वीकारले असल्याचेही त्या म्हणाल्या. या वेळी त्यांनी पाच वर्षांतील कारकिर्दीचा आढावा मांडला. या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष प्रकाश वाजे, रंगनाथ खुळे, कृष्णाजी भगत, राजेंद्र नवले, अशोक दळवी, राजाभाऊ ढोली, राहुल कचरे, नारायणशेठ वाजे, रामदास ढोक, दिलीप शिंदे, भास्कर गिते, सुरेश नाना निकम, माणिकराव बोरस्ते, मनोहर देवरे, डॉ. तुषार शेवाळे, सुनील ढिकले, श्रीराम शेटे, अॅड. विलास गिते, शांताराम ढोकणे, राजेंद्र चव्हाणके आदी उपस्थित होते. सिन्नरपाठोपाठ इगतपुरी तालुक्यातही प्रगती पॅनलचा मेळावा झाला.

‘समाज विकास’चा निफाडमध्ये मेळावा

समाज विकास पॅनलने निफाड तालुक्यातील कोठुरे येथील वात्सल्य लॉन्सवर मेळावा घेतला. या वेळी पॅनलचे नेते अॅड. नितीन ठाकरे, खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी मविप्रच्या कारभारावर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची मुस्काटदाबी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी करताना निसाकामध्ये भ्रष्टाचारासही सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केला. या वेळी अॅड. नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनवणे, दिलीप मोरे, बाळासाहेब कोल्हे, निर्मलाताई खर्डे, डी. बी. मोगल, यतीन कदम, राजेंद्र मोगल, रवींद्र पगार, मोहन पिंगळे यांची भाषणे झाली. या वेळी पोपटराव रायते, बाजीराव भंडारे, संपतराव गावले, सुरेश दाते, नारायण कोर, विलास बच्छाव, विजय पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीत डिझेलने ‘दाह’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रॉकेलची तीव्र टंचाई असल्यामुळे नाशिकरोडसह शहरातील अनेक स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारांसाठी डिझेलचा वापर करावा लागत आहे. जेलरोड येथील स्मशानभूमीतील वखारीला शेडच नसल्यामुळे ओली लाकडे दिली जात असून, त्यातच रॉकेलचा अभाव असल्यामुळे अंत्यसंस्कारांप्रसंगी गैरसोय होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

नाशिकरोडला विहितगाव, देवळालीगावात मिळून चार स्मशानभूमी आहेत. जेलरोडला दसक, पंचक, नांदूर येथे मिळून तीन स्मशानभूमी आहेत. शिंदे, पळसे, टाकळीतही स्मशानभूमी आहेत. यांसह शहरातील विविध भागांतील स्मशानभूमींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रॉकेलच उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यातच आता रेशन दुकानदारांचा संप सुरू असल्याने रॉकेल मिळणे दुरापास्त झाले आहे.

काळ्याबाजाराकडे दुर्लक्ष

गेल्या काही महिन्यांपासून रेशनवरून रॉकेल कमी झाले असून, आता तर ब्लॅक मार्केटमध्येही रॉकेल मिळेनासे झाले आहे. रेशनकार्डवर रॉकेल १८ ते २० रुपये प्रतिलिटर दराने मिळते. तेच ब्लॅक मार्केटमध्ये ६० रुपयांना उपलब्ध होते. रॉकेलचा काळाबाजार करून तिप्पट नफा मिळविला जात असतानाही प्रशासनातर्फे कारवाईच होत नाही. आता ब्लॅकनेही रॉकेल मिळत नसल्याने अंत्यसंस्कारांसाठी महागडे डिझेल वापरावे लागत आहे.

वखारींवर शेड नसल्याने लाकडेही होतात ओली

जेलरोड, देवळालीगाव, द्वारका, सिडको आदी स्मशानभूमींत लाकडे उघड्यावरच असतात. कारण, त्यांना शेडच बनविलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात ओल्या लाकडांचा अंत्यसंस्कारांसाठी उपयोग करावा लागत आहे. जेलरोडच्या स्मशनाभूमीतून दसक, पंचक, नांदूर, मानूर येथील स्मशानभूमींत लाकडे पुरविली जातात.

पावसाळ्यात ती ओली असतात. वखारींसाठी शेड बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र, ती पूर्ण होत नाही. महापालिका प्रशासनाकडे शेडसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, कार्यवाही झालेली नाही. नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी रॉकेल आणि शेडचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.


डिझेलमुळे विधीवेळी गैरसोय

डिझेल जड असून, ते लवकर पेट घेत नाही. त्यामुळे भडाग्नी देताना गैरसोय सहन करावी लागते. जेलरोडच्या स्मशानभूमीत दररोज तीन ते चार पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. एका पार्थिवासाठी किमान एक बाटली रॉकेल लागते. मात्र, त्याची टंचाई असल्याने डिझेल वापरावे लागत आहे. त्यातच पावसाळ्यात लाकडे ओली असल्याने जास्त डिझेल टाकूनही उपयोग होत नसल्याच्या तक्रारी होत असून, अंत्यसंस्कारांसाठी रॉकेल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


--

शहरातील स्मशानभूमींमध्ये रॉकेलची टंचाई आहे. त्यामुळे डिझेलचा वापर करावा लागतोय हे खरे आहे. रॉकेलएवजी पटकन पेट घेणाऱ्या कापराचा वापर करावा, डिझेलचा वापर टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीतील वखारींना शेड करण्याबाबत लवकरच टेंडर काढले जाणार आहे.

-डॉ. सुनील बुकाने, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

--

नाशिकरोडसह जेलरोडच्या ज्या स्मशानभूमींमध्ये वखारींना शेड नाही, त्यांना तातडीने शेड करावे, अशी आमची मागणी आहे. शेड व रॉकेल टंचाईची समस्या महापालिका प्रशासनाने त्वरित निकाली काढून नागरिकांना दिलासा द्यावा.

-पंडित सूर्यवंशी, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकी धरण ओव्हर फ्लो

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या धरणापैकी घोटी वैतरना मार्गावर असलेल्या वाकी खापरी नदीवरील वाकी धरणाचे काम याच वर्षी पूर्ण झाले आहे. तालुक्यातील जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पहिल्याच वर्षी हे धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

धरण श्रेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामूळे धरणाचे तिनही धरवाजे उघडण्यात आले झाले. मंगळवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने या भागातील आनंदाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. २६८० दलघफू क्षमता असलेल्या धरणाचे काम या वर्षी पूर्ण झाले. धरणात सध्या १६५५ दलघफू इतका पाणीसाठा आहे. दरम्यान या धरणाच्या निर्मितीसाठी शासनाने कोरपगाव, शिंदेवाडी, वाळविहीर, पिंपळगाव भट्टाटा व भावली या गावांचे पूनर्वसन केलेले आहे. या पाण्यामुळे परिसरातील शेती सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतरांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सन २००० पासून शिक्षकेतरांसाठी आकृतीबंध प्रस्तावित करण्याच्या कारणाखाली शिक्षकेतरांची पदे मंजूर करण्यात येत नाहीत. ती मंजूर करण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य खासगी शाळा व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. यामुळे दीड दशकांनंतरही आकृतीबंधाच्या निश्च‌ितीसाठी आढेवेढे घेतले जात असतील तर पूर्वीच्या निकषांवरच शिक्षकेतरांची पदे मान्य व्हावीत, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

आकृतीबंध निश्चितीसाठी कुठलीही मागणी नसताना कोकणी समिती प्रस्तावित करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. या समितीचे सदस्य, समितीचे कामकाज, कामकाजाचे निष्कर्ष याबाबात शासनस्तरावर कुठलीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबर २००३, २५ नोव्हेंबर २००५ आणि २३ सप्टेंबर २०१३ हे या पूर्वीच्या आघाडी शासनाच्या कालावधीतील शासन निर्णय विधीमंडळात रद्द करण्यात आले आहेत. यामुळे ही बाब आता शासनाची धोरणात्मक बाब होऊ शकत नाही, असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय अलीकडे शिक्षकेतर कामकाजात आलेले संगणकीकरणाचे स्वरूप यासारख्या मुद्द्यांमुळे प्रत्यक्षात कार्यभारात झालेली वाढ आदी मुद्दे शास्त्रीयदृष्ट्या तपासणे गरजेचे आहे. याशिवाय कुठल्याही प्रस्तावित आकृतीबंधात अंमलबजावणी न्याय

होऊ शकत नाही अशी संघटनेची धारणा आहे. यासंदर्भात हायकोर्टात डिसेंबर २०१३ पासून दाखल असलेल्या दाव्यांसंदर्भात शासनाने कोर्टात अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

यामुळे या संदर्भात कार्यभार समिती नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी आहे. जिल्हा परिषदेसमोरच हे आंदोलन असल्यामुळे घोषणांनी परिसर दणाणला होता.

सतत डावलल्याचा आरोप

महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना ही एकमेव नोंदणीकृत अधिकृत संघटना असतानाही शासन स्तरावर शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आदी स्तरांवर संघटनेस कायमच डावलले जाते. त्यांना सहविचार सभेला आमंत्रित केले जात नाही. अधिकाऱ्यांकडून संघटनेच्या प्रतिनिधींना भेटही नाकारली जाते. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष सतिश नाडगौडा यांनी मंगळवारपासून महसूल आयुक्त व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. संघटनेने या उपोषणास पाठिंबा दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष अरूण जाधव , कार्याध्यक्ष प्रभाकर कासार आणि सचिव आसिफ शेख यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक जाणार कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सन् २०१२ च्या नंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळालेल्या शिक्षकांची मान्यता रद्द करण्याची भूमिका सरकार घेणार असेल तर मुख्याध्यापक संघ याप्रश्नी कोर्टात दाद मागेल, अशी भूमिका मुख्याध्यापक संघटनेने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत मांडली.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यानी संच मान्यता दुरुस्ती लवकर करून मिळावी , सेमी इंग्रजी वर्गांना त्वरित मान्यता दयावी, गेल्या तीन वर्षापासून प्रस्ताव पूणे येथे पडून आहे. नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच शाळांना अजून आरटीई प्रमाणपत्र मिळालेले नाही , ते त्वरित देण्यात यावे. अंशदायी नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी अशा मागण्या आहेत.

सन् २०१२ पूर्वी सेवेत असणारे व २०१२ नंतर शिक्षणाधिका-यांनी मान्यता दिलेल्या कोणत्याही शिक्षकांच्या मान्यता रद्द करू नये. अन्यथा मुख्याध्यापक संघ कोर्टात जाईल. माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी पद स्थिर करावे.प्रलंबित मेडिकल बिले व पीएफ स्लिपा त्वरित मिळाव्यात.शिक्षकांचे तीन महिन्याचे एनडीसीसी बँकेमध्ये असणारे पैसे त्वरित मिळावे.या विषयावर सकारात्मक चर्चा झाली व हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन जाधव साहेब यांनी मुख्याध्यापक संघाला दिले. यावेळी उपशिक्षणाधिकारी आर.पी.पाटील, एस. डी. शेलार, एस.बी.देशमुख नेरकर उपस्थित होते.

शिक्षक संघटनांचेही बंड

मे २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या सुमारे ४०० शिक्षकांचे भवितव्य शासनाच्या नोटीसमुळे धोक्यात आहे. शिक्षणाधिकारी, उपसंचालक आणि संचालक यांनी दिलेल्या मान्यता मंजूर नसल्याची सरकारची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाच्या वतीने संबंधित शिक्षकांना नोटीसच्या माध्यमातून तसा इशाराही देण्यात आले आहे. या विरोधात शिक्षक संघटनांनीही बंड पुकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’ उपाध्यक्षपदी डॉ. उदय खरोटे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) उपाध्यक्षपदी डॉ. उदय खरोटे तर मानद सरचिटणीसपदी श्रीकांत बच्छाव यांची निवड करण्यात आली.
सातपूर एमआयडीसीतील निमा हाऊस येथे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या पहिली विशेष कार्यकारिणी सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी मानद सचिव नितीन वागस्कर, मानद सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर हे उपस्थित होते. अध्यक्ष पाटणकर यांनी ‘निमा’च्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर डॉ. खरोटे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच डॉ. खरोटे यांची निवडीमुळे रिक्त झालेल्या मानद सरचिटणीसपदी श्रीकांत बच्छाव यांची निवड झाल्याचे स्पष्ट केले. डॉ. खरोटे व बच्छाव यांचा पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बच्छाव हे ‘निमा’शी अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘मेक इन नाशिक’ या कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘मेक इन नाशिक’च्या आयोजनात सातत्य ठेवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मानद सचिव नितीन वागस्कर यांनी आभार मानले. यावेळी उन्मेश कुलकर्णी, अनिल बाविस्कर, राजेंद्र वडनेरे, कैलास वराडे, गौरव धारकर, मितेश पाटील, अखिल राठी, संदीप सोनार, उदय रकीबे, संदीप भदाणे, एस. के. नायर, किरण जैन, सुधीर बडगुजर, सुनील बाफणा, प्रितम बागुल, उत्तम दोंदे, गजकुमार गांधी, प्रवीण वाबळे व निरज बदलानी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याने गाठला दोन हजाराचा टप्पा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊन १९५१ रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला. चांदवड बाजार समिती आवारावर कांद्याच्या बाजारभावात वाढ झालेली असून, आवक स्थिर आहे, अशी माहिती बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी १४ हजार क्विंटलची कांद्याची आवक झाली. देशातंर्गत व परदेशात कांद्यांस मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे. बाजारभावात सुधारणा झाली असली तरी बाजार समितीचे आवारावरील शेतीमालाची आवक स्थिर आहे. आगामी काळात कांद्याच्या दरात वाढ होईल, असे मत जाणकरांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी चांदवड बाजार समितीत कांद्यासह इतर शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘केटीएचएम’ला उत्कृष्ट पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाद्वारे विद्यार्थी विकास मंडळाचे विविध उपक्रम यशस्वी व नाविन्यपूर्ण राबविल्याबद्दल मविप्रच्या केटीएचएम कॉलेजला २०१६-१७ चा ‘उकृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
सोबतच महाविद्यालयातील उपक्रम पूर्ण क्षमतेने व उकृष्टरीत्या राबविल्याबद्दल महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी व जिल्हा समन्वयक प्राध्यापक डी. एच. शिंदे यांना विभागीय स्तरावर उकृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठ स्तरावर कॉलेजच्या अक्षर नियतकालिकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहीती प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली. पुणे विद्यापीठाचा पारितोषिक प्रदान व गौरव समारंभ शनिवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संत नामदेव सभागृह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मऱ्हळ येथे आज जमिनीची मोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविणाऱ्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीला संमती दर्शविली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पथक गुरूवारी (दि. ३) संयुक्त मोजणीसाठी जाणार आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींचे दर जाहीर करूनही बरेच दिवस शेतकरी जमिनी देण्यास तयार नव्हते. सिन्नर तालुक्यातील मऱ्हळसारख्या काही गावांमध्ये तर अजूनपर्यंत संयुक्त मोजणीही होऊ शकलेली नाही. परंतु, आता काही शेतकरी महामार्गासाठी जमिनी देण्यास संमती देत असून त्यामुळे संयुक्त मोजणीला होणारा विरोधही मावळू लागला आहे. मऱ्हळ बुद्रुक येथील जमिनींची संयुक्त मोजणी करण्यास शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नगरभूमापन लिपिकाद्वारे ही मोजणी केली जाणार आहे. एकूण ५३ गटांची तपासणी करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर मोजणीला विरोध झालाच तर माघारी परतण्याच्या सूचनाही पथकाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, जमिनीच्या संपादनासाठी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील आणखी एका शेतकरी कुटुंबाने परवानगी दिली आहे. या शेतकऱ्याच्या गटाचे संपादन करण्यात आले असून २२ कोटी ४० लाखांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजचा दिवस महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पुढील पाच वर्षांच्या कालखंडासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास गुरुवार (दि. ३) दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण ११ जणांनी अर्ज मागे घेतले गेले आहेत.
अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे. यानंतरच दोन्हीही प्रतिस्पर्ध्यांच्या पॅनल बांधणीस जोरदार वेग येणार आहे. निवडणूक मंडळाकडून लवादाकडे सुनावणीसाठी गेलेल्या अर्जांच्या निमित्ताने ‘मविप्र’च्या वर्तुळातील वातावरण अगोदरच ढवळून निघालेले असताना लवाद मंडळाकडे अपात्र ठरलेल्या चार पैकी तीन सदस्यांनी या अपिलाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टामध्ये दाद मागणाऱ्यांमध्ये समाज विकास पॅनलचे नानासाहेब दाते, नंदा सोनवणे आणि गुलाबराव भामरे यांचा समावेश आहे. या अपिलकर्त्यांना कोर्टाने गुरूवारची (दि. ३) तारीख दिली आहे. दरम्यान, लवादाने दिलेला निर्णय मान्य असल्याची भूमिका निकालाच्या दिवशी प्रगती पॅनलचे मातब्बर उमेदवार श्रीराम शेटे मांडली होती. तरीही शेटे हे हायकोर्टात दाद मागू शकत असल्याची दाट शक्यता लक्षात घेत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सुरेश डोखळे यांनी तत्पूर्वीच हायकोर्टात कॅव्हेट दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे शेटे यांच्यासमोरील आव्हाने वाढल्याची चर्चा आहे.

निवडणुकीची वाटचाल मंचावरून कोर्टाकडे
‘मविप्र’ची निवडणूक जाहीर होताच संभाव्य प्रतिस्पर्धी गटतटाने एकमेकांचे पक्के अन् कच्चे दुवे शोधण्यास आणि त्या संदर्भातील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. निवडणुकीचा बिगूल वाजताच प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांवर वैचारिक आरोप-प्रत्यारोपांचा हल्लाबोल चढवित धुराळा उडवून दिला. या वातावरणात संस्थातर्गंत वादांना मोठे तोंड फुटू नये, यासाठी नेमण्यात आलेल्या लवादापर्यंतच निवडणुकीदरम्याची प्रकरणे मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यास दोन्हीही बाजूंनी प्राधान्य देण्यात आले. मात्र, अर्जांवर आलेले आक्षेप अन् नंतरच्या निकालांनंतर प्रतिस्पर्ध्यांची धाव थेट हायकोर्टापर्यंत गेली आहे. एकीकडे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या हद्दीमध्ये मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यावर भर देत आहेत. दुसरीकडे, शक्य त्या पायरीपर्यंत जाऊन या वैचारिक लढाईतील यश आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी दोन्हीही गटांनी चंग बांधला असल्याचे चित्र आहे. दोन्हीही गट एकमेकांच्या पॅनलमधील संभाव्य उमेदवारांच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास करून त्यांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखत आहेत.

११ जणांचे अर्ज मागे
मविप्र निवडणुकीत आतापर्यंत ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात चंद्रभान बोरस्ते यांनी सरचिटणीसपदासाठीचा अर्ज मागे घेतला. नारायण पवार यांनी चिटणीस आणि उपसभापती पदासाठी, नानाजी देसले यांनी प्राथमिक व माध्यमिक सेवकपदासाठीचा अर्ज मागे घेतला. तर शंकर धनवटे यांनी नाशिक ग्रामीणमधून, आनंदराव घोटेकर, विलास मत्सागर, विनायक खालकर या तिघांनी निफाडमधून, शंकरराव हांडगे यांनी नाशिक ग्रामीणमधून, विशाल सोनवणे व अश्विनी कोतवाल यांनी नाशिक ग्रामीणमधून अर्ज मागे घेतले. आतापर्यंत एकूण ११ अर्जांची माघारी झाली आहे. दुपारपर्यंत अनेक मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी (३ ऑगस्ट) निवडणूक होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे निफाडकरांचे लक्ष लागले आहे. राजाभाऊ शेलार यांनी या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवडणूक होत आहे.

नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्या नगराध्यक्षाची ही निवड होत आहे. निफाड नगरपंचायतीवर भाजपा सेना युतीची सत्ता असून, यूतीकडे बहुमत आहे. काही दिवसांपूर्वी युतीचे बहुतांशी सदस्य परगावी रवाना झाले आहेत. या निवडणूक प्रक्रियेस नगरपंचायत हॉलमध्ये सकाळी सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विनोद भामरे हे काम पाहणार आहेत. दरम्यान, शिवसेना व भाजपने त्यांच्या सर्व नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे त्यानुसार शिवसेनेचे मुकुंद होळकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून, त्यांना सर्व सदस्यांनी मतदान करावे असा आदेश बजावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासशुल्काने पालिका मालामाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून शहरात सुरू असलेली कपाटकोंडी काहीअंशी फुटल्याने पालिकेच्या नगररचना विभागाला सुगीचे दिवस आले आहेत. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत नगररचना विभागाला विकासशुल्कातून तब्बल ३७ कोटी ६६ लाखांची कमाई झाली आहे. गेल्या वर्षी या चार महिन्यांत पालिकेला २१ कोटी रुपये मिळाले होते. परंतु, चालू वर्षी नऊ मीटर रस्त्यांवरील कपाटाचा प्रश्न प्रिमियम भरून सुटल्याने तब्बल १६ कोटी ११ लाख रुपये अधिकचे तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे विकासकांमाना चालना मिळणार आहे.

कपाटकोंडीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदी आली होती. परंतु, तीन महिन्यांपासून ही कपाट कोंडी सोडविण्याचे प्रयत्न झाले असून, टीडीआर धोरण आणि नवीन विकास आराखड्यामुळे यातील काही प्रकरणे मार्गी लावण्याचे प्रयत्न झाले. दोन वर्षांपासून बांधकाम परवानग्याच ठप्प झाल्याने नगररचना विभागाकडे विकासशुल्काचा ओघ आटला होता. त्याचा परिणाम तिजोरीवरही झाला. परंतु क्रेडाई, महापालिका आणि राज्य सरकारने सामजंस्याने नऊ मीटर रस्त्यांवरील कपाट प्रकरणे नियमित करण्यासाठी टीडीआर व प्रिमियम आकारणीचे धोरण स्वीकारले. त्यानुसार बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याने नव्याने अर्ज करून व दंड भरून बांधकाम नियमित केले जात आहे. त्याचा सकारात्मक फायदा नगररचना विभागाला झाला आहे.

तीनशे प्रकरणे मार्गी

नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांना टीडीआर व प्रिमियम अनुज्ञेय केल्याने कपाटामुळे अडकलेली प्रकरणे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे दाखल होत आहेत. जुलै महिन्यात तब्बल साडेसहाशे प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी तीनशे प्रकरणात पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. आणखी प्रकरणे दाखल होत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेचे विकासशुल्कही वाढणार असल्याने विकास कामांसाठी अधिकचा निधी उपलब्ध होणार आहे.

चार महिन्यांत ३७ कोटींची कमाई

गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत पालिकेला विकास शुल्कातून २१ कोटी ५५ लाख रुपये मिळाले होते. चालू वर्षी यात मोठी वाढ होत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल ३७ कोटी ६६ लाख रुपये जमा झाले आहेत. जुलै महिन्यातच २० कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे नगररचना विभागाला सुगीचे दिवस आले आहेत. बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अजूनही प्रकरणे दाखल होत असल्याने हा आकडा शंभर कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाची समिती जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मराठा क्रांती मूक मोर्चाची २१० सदस्यांची पाठपुरावा समिती जाहीर करण्यात आली आहे. येत्या ९ रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या अधिकृत पाठपुरावा समितीची यादी सरकारकडे सादर करण्यात आली आहे. या समितीत नाशिकचे चंद्रकांत बनकर, शरद तुंगार, योगेश नाटकर, सोमनाथ जाधव, विलास पांगारकर आणि माधवी पाटील यांचा समावेश आहे.
कोपर्डी येथील अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर जगभरातील मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटला. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून अभूतपूर्व व ऐतिहासिक, शिस्तबद्ध असे एकूण ५७ मोर्चे काढले. कोपर्डीतील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालास हमीभाव अश २० मागण्यांना वर्षभरानंतरही सत्ताधारी भाजप सरकारने न्याय दिलेला नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड नाराजी व असंतोष धुमसत आहे.
मागण्यांबाबत सरकारकडून होत असलेली हेळसांड व दिरंगाईच्या विरोधात त्यामुळेच सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीदिनी (दि. ९) सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील मराठा गोलमेज परिषद, अमरावती, मुंबई तसेच नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकांमध्ये याबाबत विचारविनिमय करण्यात आला. सर्वानुमते सरकारकडे मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी यंत्रणा असावी यावर १७ जूनच्या नाशिक येथेल झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नाशिकच्या आयोजकांनी पाठपुरावा समिती जाहीर करावी, असा निर्णय सर्वानुमते त्या बैठकीत करण्यात आला होता.
त्या बैठकीतील ठरावानुसार संपूर्ण राज्यातील समाजातील काही अभ्यासक, अनुभवी, तज्ञांसह २१० सदस्यांची पाठपुरावा समितीची यादी बुधवारी नाशिकमध्ये जाहीर करण्यात आली. या समितीत खासदार छत्रपती
उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले मुख्य मार्गदर्शक असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी लेट; कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिककरांची आवडती पंचवटी एक्सप्रेस सातत्याने लेट होत आहे. वैतागलेल्या प्रवाशांनी रेल्वेच्या तक्रार अॅप आणि ट्व‌िटरवर केलेल्या तक्रारीची रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने गंभीर दखल घेत भुसावळ मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे व प्रवाशांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

गेल्या २९ जुलैला हावडा-मुंबई दुरान्तो एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने तिला पुढे काढण्यासाठी पंचवटी एक्सप्रेस मनमाड स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. ६:०२ ला सुटणारी पंचवटी एक्सप्रेस ६:२५ ला मनमाड वरून तब्बल २३ मिनिटे उशिराने निघाली. नाशिकरोडला २१ मिनिटे उशिराने पोहोचली. पुढे मुंबईत २० मिनिटे उशिरा पोहोचली. यामुळे नियमित प्रवाशांना व नोकरदारांना त्रास सहन करावा लागला.

रेल्वे प्रशासन नेहमीच पंचवटी एक्सप्रेसला विलंब करते. प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करुनही उपयोग होत नव्हता. अखेर काही प्रवाशांनी रेल्वेच्या सीओएमएस अॅप तसेच ट्वीटद्वारे तक्रार केली. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून संबंधितांना उत्तर प्राप्त झाले. २९ जुलैला पंचवटीला उशीर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.

‘मटा’कडून पाठपुरावा

पंचवटीला रोज होणारा विलंबाचा मुद्दा ‘मटा’ने सातत्याने उचलून धरुन प्रवाशांच्या संतापाला वाट करुन दिली आहे. याआधी पंचवटी लेट झाल्यामुळे प्रवाशांनी आंदोलन केले होते. त्याचे वृत्त ‘मटा’ मध्ये आल्यानंतर जागरुक प्रवाशांनी त्याची कात्रणे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१६ पासून पंचवटी आठ मिनिटे लवकर सोडण्यात येऊ लागली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त‌िला काही ना काही कारणांनी लेट होत आहे.

लेट होण्याची कारणे

पंचवटी विविध कारणांनी लेट होते. नाशिकरोड स्थानकात पंचवटीच्या बोगीत पाणी भरणे, घोटी-कल्याण दरम्यान अन्य गाड्यांचे इंजिन बंद पडणे किंवा घसरणे, इगतपुरी स्थानकात जनता व मंगला एक्सप्रेससाठी पंचवटीला थांबवणे, रुळाखालील मटेरियल वाहून जाणे, दुरांतो अगोदर सोडणे, रुळांना तडे जाणे, मुंबईतील जोरदार पाऊस व सदोष सिग्नल यंत्रणा आदी.

उपेक्षा सुरूच

इंटरसिटीचा दर्जा असलेल्या पंचवटीची घोर उपेक्षा होत आहे. नाशिककरांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या पंचवटीला एक वर्षापासून कायमच उशीर होत असल्याने प्रवाशी प्रचंड नाराज आहेत. पंचवटी वेळेत चालवा नाही तर बंद करा, अशा भावना त्यांनी ‘मटा’कडे व्यक्त केल्या होत्या. रेल्वे मंत्रालयाने ‘मटा’च्या वृत्ताची दखल घेतल्यानंतर १ ऑक्टोबर २०१६ पासून पंचवटी मनमाडहून आठ मिन‌िटे अगोदर सुटत आहे. आता गाडीला विलंब होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, ती नाशिकरोडला वेळेत येत नाही व मुंबईलाही वेळेत पोहचत नाही.


पंचवटी एक्सप्रेसला इंटरसिटीचा दर्जा आहे. इंटरसिटी गाड्यांना लेट करू नये, असे स्पष्ट आदेश मुंबईच्या रेल्वे मुख्यालयाने दिलेले आहेत. तरीही त्याचे पालन होत नाही. भुसावळ मंडळाने २९ जुलैला २३ मिनिटे लेट केली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी मुंबई मुख्यालयाला तक्रार केली. आता तरी संबंधितांनी बोध घेऊन कृती करावी.

- राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळीनगरचे विद्यार्थी झाले स्मार्ट

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी विविध अॅप्स निर्मित्तीच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र शिक्षकांच्या समवेत विद्यार्थीदेखील तंत्रस्नेही झाला पाहिजे, या प्रेरणेतून तालुक्यातील माळीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील अॅप्स निर्मितीचे धडे गिरवीत आहेत. या शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनीने दहा शैक्षणिक अॅप्स तयार केले आहेत.

माळीनगर शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र भदाण व तंत्रस्नेही शिक्षक भरत पाटील यांनी विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावा, या उद्देशाने मुलांना हे अॅप्स निर्मितीचे तंत्र शिकवले आहे. दुसरीतील मानसी बागुल या विद्यार्थिनीने अॅप्स गिझर संकेतस्थळाच्या माध्यमातून आजवर दहापेक्षा अधिक शैक्षणिक अॅप्स तयार केले आहेत. या शाळेतील सर्वच विद्यार्थी टॅब, संगणकाचा अगदी सहज उपयोग करायला शिकले आहेत. मानसीची त्यातील रुची लक्षात घेत शिक्षक पाटील यांनी तिला मार्गदर्शन केले.

शिक्षक संमेलनात गौरव

कोकमठाण येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय कृतीशील शिक्षक संमेलनात एन. सी. आर. टी. च्या पदाधिकारी पवन सुधीर यांनी या विद्यार्थ्यांच्या अॅप्स निर्मितीचे कौतुक केले होते. तसेच तेथे त्यांचा सत्कारही केला होता.

असे करा अॅप डाउनलोड

माळीनगर शाळेचे शिक्षक भरत पाटील यांनी शाळेचा ज्ञानज्योती हा ब्लॉग तयार केला असून https://dnyanjoti.blogspot.in/?m=0 या लिंकद्वारे मानसीने

तयार केलेले अॅप्स डाउनलोड करता येवू शकतात. सध्या ती क्विझ टेक्स या अॅप्सवर काम करीत असून, शिक्षकांच्या मदतीने इयत्तानुसार विषयानुरूप विद्यार्थीसाठी शैक्षणिक अॅप तयार करण्याचा तिचा मानस आहे. सध्या ब्लॉगवर उपलब्ध असलेले हे अॅप लवकरच गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध होाणार आहे.

हे अॅप बनविले

दुसरीतील मानसीने वर्ड सर्च, क्रॉस वर्ड, पझल्स, नंबर चॅलेंज असे अॅप तयार केले आहे. तसेच भाषा, गणित, इंग्रजी विषयांचा अभ्यास गमतीशीर करणारे अॅप्सही तिने तयार केले आहेत. आता तिचे वर्गमित्र हर्षल रौंदळ व निशा रौंदळ हे देखील अॅप्स निर्मितीचे धडे गिरवीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलवर अमरनाथ यात्रा

$
0
0

६१ वर्षीय दीपक शिर्के यांची मुशाफिरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिद्दीला मेहनतीची जोड दिली तर अशक्य काहीच नसते. अशीच कामगिरी केली आहे, ती ६१ वर्षे वय असलेल्या दीपक शिर्के यांनी. अमरनाथ यात्रा त्यांनी एकट्यानेच सायकलवर प्रवास करीत पूर्ण केली. आता यानंतर ते दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाणार असून, नाशिक ते रामेश्वरम अशी ही मोहीम पूर्ण करणार आहेत.

निवृत्त बँकर असलेल्या दीपक शिर्के यांनी संपूर्ण चार हजार किमीचे अंतर साध्या सायकलवर पूर्ण केले आहे. संकष्टी चतुर्थीला (दि. १३ जून) काळारामाचे दर्शन घेऊन ते या यात्रेसाठी रवाना झाले होते. जाताना त्यांनी इंदूर, ओमकारेश्वर, शिवपूर, ग्वॉल्हेर, आग्रा, दिल्ली, जम्मू या मार्गाने प्रवास केला. परतीचा प्रवास त्यांनी अमृतसर, गंगानगर, बिकानेर, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, सापुतारा आणि नाशिक असा पूर्ण केला. जम्मू येथे सायकल ठेवत त्यांनी बाबा अमरनाथ मंदिरासह वैष्णोदेवी मंदिर आदी स्थळांना भेट दिली.

आजपर्यंत अनेकांनी मुंबई, पुणेपासून जम्मूपर्यंतचे अंतर सायकलवर पूर्ण केले असेल, मात्र परतीचा प्रवासही शिर्के यांनी पूर्ण केला आहे. रोज सरासरी ७० ते ८० किमीचा प्रवास करीत शिर्के १० जुलै रोजी जम्मू येथे पोहोचले. दिल्ली जम्मू या महामार्ग क्रमांक एकवरून सायकलवर प्रवास केला. संपूर्ण प्रवासात कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता संध्याकाळ होताच मिळेल तिथल्या मंदिर, गुरुद्वारा, ढाबा येथे मुक्काम केला. शिर्के यांनी या आधीही एकूण एक हजार किमी अंतराची अष्टविनायक फेरी, विविध शक्तिपीठे, एवढेच नव्हे तर ११ दिवसांत सर्व १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शनही त्यांनी सायकलवर प्रवास करीत केले आहे. त्याचप्रमाणे ते सेवन सिस्टर्स म्हणजेच ईशान्य भारताची सात राज्ये सायकलवर फिरले आहेत. याबद्दल त्यांच्या टीम सातचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नाव नोंदवले गेले आहे.

हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय आहे. अकल्पित म्हणतात असेच काहीसे मी अनुभवले. प्रवासात असताना मित्र, सहकारी, नाशिक सायकलिस्टचे सदस्य, जसपाल सिंगजी हे सतत संपर्कात होते. या संपूर्ण यात्रेसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च आला. - दीपक शिर्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या सिग्नल्सची ‘नऊ’लाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहरात आणखी नऊ नवीन सिग्नल्स बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. वाहनांचे अपघात, रस्त्यांची परिस्थिती, वाहतूक कोंडी अशा अनेक बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून सदर ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले.
शहर वाहतूक शाखेच्या पाठपुराव्यामुळे आणि महापालिकेच्या तत्परतेमुळे काही दिवसांपूर्वी एबीबी आणि जेहान सर्कल येथे वाहतूक सिग्नल्स बसवण्यात आले. शहर पोलिसांनी मागील वर्षी एकूण २१ ठिकाणी सिग्नल्स बसवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यापैकी या दोन ठिकाणी सिग्नल्स सुरू झाले. याच २१ सिग्नल्सपैकी आता आणखी नऊ सिग्नल्सला मंजुरी मिळाली असून, लवकरच हे सिग्नल्स कार्यन्वित होतील, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. निवडण्यात आलेल्या नऊ ठिकाणी सकाळ व संध्याकाळच्या सुमारास गर्दी होते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी याठिकाणी सिग्नल्स आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

सिग्नलची संख्या
सध्या सुरू असलेले - ३१
ब्लिंकर मोडवरील महामार्गावरील - ८
ब्लिंकरमोडवरील शहरातील - ३
नवीन बसवण्यात येणारे - ९
प्रस्ताव‌ति सिग्नल - १०
नवीन सिग्नलची ठिकाणे
पपया नर्सरी (त्र्यंबकरोड)
मायको सर्कल (त्र्यंबकरोड)
पाइपलाइन चौफुली (आनंदवली)
हॉलमार्क चौक (कॉलेजरोड)
महिंद्रा सर्कल (सातपूर)
मॉडेल चौक (कॉलेज रोड)
प्रसाद सर्कल (गंगापूररोड)
बिग बजार चौफुली (कॉलेजरोड)
एचडीएफएसी सर्कल (गंगापूर रोड)

नवीन सिग्नल सुरू झाल्यानंतर वाहतूक नियमनाचे काम सोपे होईल. आणखी काही प्रलंबीत प्रस्तावांचा पाठपुरावा सुरू आहे. द्वारका सर्कल येथील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महापालिकेशी समन्वय साधून तोडगा काढण्यात येतो आहे.
- लक्ष्मीकांत पाटील,
पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भातील डेडलाइन जवळ येत असल्याने महापालिका आयुक्तांनी बुधवारी बैठक घेऊन सर्व विभागांना कारवाईचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. १५ ऑगस्टपर्यंत पालिका, सिडको, एमआयडीसी या सर्वांनी आपापल्या जागांवर असलेली धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भातील अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतर या बांधकामावर नोव्हेंबर अखेरपर्यंत हातोडा चालविला जाणार आहे. दरम्यान, न्यायालयात प्रकरणे दाखल असलेली धार्मिक स्थळेही हटवली जाणार असून, खासगी जागांवरील धार्मिक स्थळे काढण्यासंदर्भात नोट‌िसा बजावल्या जाणार आहेत.

सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भातील डेडलाइन नोव्हेंबर २०१७ आहे. त्यापूर्वी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार २००९ पूर्वीच्या आणि नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारी करत नोव्हेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात २००९ पूर्वीच्या ६५९ धार्मिक स्थळांची यादी तयार करत त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पालिकेने जवळपास दीडशे धार्मिक स्थळांवर कारवाईदेखील केली होती. परंतु, शिवसेनेसह काही संस्था-संघटनांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोकळ्या भूखंडांवरील देवस्थानांवर कारवाई करू नये, अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी घेतली होती. परंतु, आता आता न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्याने महापालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर पालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याने पालिकेने उर्वरित धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला वेग देण्यासाठी बुधवारी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत धार्मिक स्थळांसदर्भात बैठक झाली. त्यात नोव्हेंबरची डेडलाइन पाळण्यासंदर्भात आणि कारवाईला येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा झाली. त्यात आयुक्तांनी उर्वरित धार्मिक स्थळांबाबत सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून तो १५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विभाग, एमआयडीसी, सिडको यातील सर्व विभागांनी आपापला कृती आराखडा तयार करून तो पालिकेला सादर करायचा आहे. त्यानुसार कारवाईचा अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

खासगी स्थळांना नोटिसा

महापालिका, सिडको, एमआयडीसीच्या जागांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांवर पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे परंतु, खासगी जागांवर विनापरवाना उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या मालकांनाही नोट‌िसा काढल्या जाणार आहेत. त्यांनी आपल्या हाताने ही धार्मिक स्थळे हटवावीत, अशी पालिकेची अपेक्षा आहे. नोट‌िसा देऊनही त्यांनी ही स्थळे हटविली नाही, तर पालिका दंडात्मक कारवाई करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी-सिन्नर मार्ग खुला

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

सिन्नर महामार्गावरील दारणा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावरील बंद करण्यात आली होती. तब्बल २० दिवसांनी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून, दुचाकीसह लहान चारचाकी वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे.

घोटी जवळील दारणा नदीवरील पूल कमकुवत झाला होता. त्याची दुरुस्ती करण्याआधीच १४ जुलै रोजी या पुलाला मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. या महामार्गावरील प्रवासी, साईभक्त व पर्यटकांची चांगलीच गैरसोय होत होती. या पुलाला भगदाड पडल्यामुळे मार्गावरील वाहतूक घोटी-खैरगाव मार्गे तर अवजड वाहतूक घोटी मुंढेगाव-साकुरमार्गे वळविण्यात आली होती.

केवळ लहान वाहनांना प्रवेश

पुलावर खड्डे बुजविणे, पुलाखालून बेरिंग टाकणे ही कामे करत असतानाचा दारणा नदीवरील पुरस्थिती, अत‌िवृष्टीमुळे कामाला विलंब झाला. विशेष म्हणजे देवळे-घोटी या दोन-तीन किलोमीटर अंतरावरून प्रवेश पायी घोटीला येत होते. अखेर बुधवारी सकाळी दुचाकी व लहान चारचाकी वाहनांची या पुलावरून वाहतूक खुली करण्यात आली. यामुळे लहान वाहन चालक व दुचाकी चालकांना काहीसा दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>