Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पैशांअभावी महावितरणने पसरली दिल्लीत झोळी

$
0
0
डोक्यावर असलेली​ सात हजार कोटींची देणी आणि त्यामुळे वीज खरेदीत निर्माण झालेल्या अडचणी यावर मात करण्यासाठी महावितरणने अखेर ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाकडून ११ टक्के व्याजाने दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

विमा कर्मचारी सेनेचे आजपासून अधिवेशन

$
0
0
शिवसेना प्रणित भारतीय विमा कर्मचारी सेनेचे तिसरे अखिल भारतीय त्रैवार्षिक अधिवेशन आजपासून नाशिकमध्ये होत आहे. दोन दिवसाय या अधिवेशनाला राज्यभरातील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.

खासगी सचिवांची सेटिंगसाठी तारांबळ

$
0
0
मंत्रिमंडळात अचानक फेरबदल झाल्याने आणि एकाचवेळी सहा मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्याने जुन्या मंत्र्यांकडील खासगी सचिवांची तसेच इतर कर्मचाऱ्यांची आपल्या जागेला धक्का लागू नये यासाठी नव्या मंत्र्यांकडे सेटिंग लावताना तारांबळ उडाली आहे.

बायोलॉजी ऑलम्पियाडमध्ये अमोघ करणार भारताचे नेतृत्त्व

$
0
0
स्वित्झरलॅन्ड येथे १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बायोलॉजी ऑलम्पियाडमध्ये नाशिकचा अमोघ पाठक भारताचे नेत्वृत्व करणार आहे. मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्र येथे झालेल्या बायोलॉजी ऑलम्पीयाडच्या अंतीम फेरीत सर्वोत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून त्याने अव्वल स्थान गाठले.

असाही वशिला...

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील नेतेमंडळी नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांसाठी सतत येत-जात आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. संबंधित पक्षात उत्साह तर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. नेत्यांच्या स्वागतासाठी ते जातील तेथे कार्यकर्त्यांची फौज सतत शहरातून घोंगावत असल्याने रस्त्यावरील वातावरणही ‘व्हीआयपी’ झाले आहे.

अकरावी प्रवेश आजपासून

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे मार्कलीस्ट आज मिळणार असून लगेचच अकरावी प्रवेशाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित शाळेमध्ये दुपारी ३ वाजता हे मार्कलीस्ट वितरीत केले जाणार असून त्यानंतर १५ जून ते ८ जुलैपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

अंबडला रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. सिमन्स कंपनीजवळील रस्त्याचे काम सध्या करण्यात येत आहे. त्यानंतर इतरही रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे उद्योजक आणि कामगारांना पावसाळ्यात दिलासा मिळाला आहे.

संशोधन केले, तर अर्थसहाय्य देऊ!

$
0
0
‘कृषीसारख्या व्यापक क्षेत्रात संशोधनाच्या दृष्टीने भरीव कामगिरी होण्याची गरज आहे. नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये फळबागांच्या संशोधनासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना पुरेशे अर्थसहाय्य देण्यात येईल,’ असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले.

'संधी मिळत नसेल तर हिसकवा!'

$
0
0
‘प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे. संधी मिळाली नाही तर हिसकावून घ्या व पुढे जा, तसे केल्यास यश हमखास मिळेल’, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. ‘यशस्विनी सामाजिक अभियान’तर्फे आयोजित ‘निर्धार’ मेळाव्यातील ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात पवार बोलत होते.

दक्षता समितीत युवतींना स्थान

$
0
0
महिलांना न्याय देण्यासाठी गृहखात्याच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या महिला दक्षता समितींमध्ये महिलाबरोबर युवतींनादेखील स्थान देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केले. सपकाळ नॉलेज हबमध्ये यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

‘फी’वर नियंत्रण सरकारचेच

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून फीबाबत सुरू असलेला पालकांचा आणि शहरातील शाळांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. फी ठरविण्याचा अधिकार स्वत:लाच असल्याचे शाळा ठणकावून सांगत आहेत तर पालक विविध संघटनांच्या मदतीने या अतिरिक्त फी वाढीविरुद्ध आवाज उठवत आहेत.

अॅडमिशन घेताय? सावध रहा!

$
0
0
जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल लागल्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रवेश प्रक्रियेमध्ये बिझी झाले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनधिकृत शिक्षण संस्थांमार्फत विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लसणाच्या नव्या वाणाचा शोध

$
0
0
उत्तर भारतासह महाराष्ट्रात लागवड होईल अशा ‘यमुना सफेद ५’ या लसणाच्या नव्या वाणाचा शोध चितेगाव येथील नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने (एनएचआरडीएफ) लावला आहे. प्रत्येक राज्यात हे वाण उपलब्ध होणार असून या वाणामुळे देशातील लसणाचे उत्पादन वाढण्यात मदत होणार आहे.

पुलाच्या उद्घाटनानंतर अपघात, २ ठार

$
0
0
नाशिकचा नेकलेस म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई-आग्रा महामार्गावरील नव्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर काही तासातच दोन मोटारसायकलींची धडक होऊन दोघांना आपला जीव गमवावा लागला.

‘अमूल्य’ कायम

$
0
0
शहर स्वच्छतेसाठी नेमणूक केलेल्या 'अमूल्य क्लिनअप' या संस्थेविरोधात तक्रारी करूनही महापौर अॅड. यतीन वाघ यांनी 'अमूल्य' कायम राहील अशी घोषणा केली. शनिवारी झालेल्या महासभेत काही सदस्यांनी 'अमूल्य'च्या कार्यपध्दतीचा विरोध करत हा ठेका रद्द करण्याची मागणी केली.

नासाका अखेर पार्टनरशिपमध्ये

$
0
0
नाशिक सहकारी साखर कारखाना पार्टनरशिपमध्ये चालविण्याचा ठराव कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र, कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांनी तीव्र रोष व्यक्त करीत संचालकांना धारेवर धरले.

नासाका, निसाका टॉपर थकबाकीदार

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांची नावे प्रशासक ज्ञानदेव मुकणे यांनी जाहीर केली आहेत. त्यात नाशिक आणि निफाड सहकारी साखर कारखाना यांची नावे टॉपवर असून जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांकडे बँकेचे मोठे येणे बाकी आहे.

नाशिकला गतिमान शहर बनवू

$
0
0
जगातील सर्वाधिक गतिमान शहर म्हणून नाशिकला नावारुपाला आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. नाशिक शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच नाशिकचा गतिमान विकास होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१६ बालकामगारांची सुटका

$
0
0
नाशिक- पुणे महामार्गावरील गोंदे शिवारात आंब्यापासून रस बनविणा-या फुड्स अँण्ड इनस् कंपनीतून शुक्रवारी १३ बालकामगारांची तर आडगाव येथील हॉटेल महाराजा येथून तीन बालकांची शनिवारी सुटका करण्यात आली.

पुण्यापर्यंत रुंदीकरण करा

$
0
0
नाशिक-सिन्नर महामार्गाचे काही दिवसात रुंदीकरण होणार असल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबFत असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. छगन भुजबळांनी सिन्नरपर्यंत रुंदीकरण न करता पुण्यापर्यंत करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images