Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘राष्ट्रवादी युवक’च्या शहराध्यक्षांवर गुन्हा

$
0
0
पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालण्यासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे यांच्याविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढीव निर्यातमूल्याचा फटका कांदा उत्पादकांना

$
0
0
देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने लादलेले वाढीव निर्यातमूल्य कांद्याच्या निर्यातीला अडसर ठरत आहे. यामुळे कांद्याचे भाव दररोज शंभर-दोनशे रुपयांनी कोसळून १५०० रुपये क्विंटलपर्यंत आले आहे.

हिरेंना आणखी १ दिवसाची पोलिस कोठडी

$
0
0
‘फेसबुक’द्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी अटकेत असलेले नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

पेस्ट कंट्रोल ठेक्यास मुदतवाढ?

$
0
0
निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरून पेस्ट कंट्रोल ठेक्यास आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे. यापूर्वी संबंधित ठेकेदारांना एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.

सीसीटीव्ही शाळांना, भुर्दंड पालकांना?

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली जाऊ लागली आहे. वेतनेतर खर्चाचा भार उचलतानाच हातघाईला आलेल्या शिक्षण संस्थांना सीसीटीव्ही बसविण्याच्या कल्पनेनेच हादरवून टाकले आहे.

डासांनी दिली धोक्याची ‘घंटा’

$
0
0
शहरातील सहा विभागांपैकी तीन विभागात ५ टक्क्यांपेक्षा अधिक डासांची घनता आढळून आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डासांची घनता शोधली जाते.

कट्ट्याच्या जागी सिंहस्थ कक्ष?

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा केंद्राच्या ठिकाणी कट्टा निर्माण केल्यामुळे त्याचा वापर टाइमपास करणाऱ्यांना होत असल्याचे निदर्शनास येत असल्यानेच या जागी सिंहस्थ कक्ष स्थापण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरु केल्या आहेत.

गोदावरीला पुनरुज्जीवित करणार

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचे अस्तित्वच दिसून येत नसून नदीला गटारीचे स्वरूप आल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली असून आगामी सिंहस्थ कामात गोदावरीला पुनरुज्जीवित करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

संजीवनीला रौप्य पदक

$
0
0
नाशिकची धावपटू संजीवनी जाधवने ब्राझील येथील स्कूल ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगळवारी ३००० मीटरमध्ये धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. तर सुवर्णकन्या अंजना ठमकेला ८०० मीटर स्पर्धेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गिरणा खरेदी : भुजबळ बंधूंना नोटीस

$
0
0
मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखाना खरेदीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस बजावल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी दिली.

त्र्यंबक शहराच्या हद्दवाढीला मान्यता

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर शहराच्या हद्दवाढीला मान्यता दिली आहे. त्यामुळे सिंहस्थात विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात त्र्यंबक नगरपालिकेला यश येणार आहे. हद्दवाढीची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

ज्योती स्ट्रक्चरमध्ये वेतनवाढ

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या ज्योती स्ट्रक्चर लिम‌‌िटेडच्या प्लाण्ट २ मध्ये कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार युनियन यांच्यात वेतनवाढ करार करण्यात आला आहे. त्यानुसार सरासरी सहा हजारांची पगारवाढ करण्यात आली आहे.

भास्करगडावर श्रमदान मोहीम

$
0
0
नाशिकच्या शिवकार्य गडकोट मोहिमेचा सातवा टप्पा भास्करगडावरील श्रमदानाने पार पडला. ब्रह्मगिरीच्या पाठीमागील पर्वत रांगेत असलेल्या भास्करगडावरील मोहिमेत युवकांनी पूर्णपणे बुजलेल्या काही शिवकालीन तळ्यांची खोदाई केली.

..मग आळवला राग

$
0
0
कोणताही कार्यक्रम वेळेवर सुरू करणं ही आपली सवय नाही. ‘कार्यक्रम इंडियन टायमिंगवर सुरू होईल’ हा विचार आता प्रेक्षकांमध्ये इतका रूळला आहे की त्याबाबत कुणीही काही शंका घेण्याचे कारणच नाही.

'ती' भिंत ठरली चर्चेची

$
0
0
अनेकदा वरवर सोपा वाटणारा विषय चर्चेला गहण करू शकतो, असा अनुभव बुधवारी झालेल्या महासभेत आला. प्रभाग क्रमांक ३९मध्ये नासर्डीनदीलगत बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या प्रस्तावाने मोठ्या चर्चेला तोंड फोडले.

असा सिहंस्थ काय कामाचा?

$
0
0
सिहंस्थ कुंभमेळा ही नाशिकची ओळख असली तरी, कुंभमेळ्याचे नियोजन करायचे म्हटले की सर्वांत प्रथम जुने नाशिक तसेच पंचवटी भागातील नागरिकांवर कुऱ्हाड कोसळते.

महापालिकेची अशीही खैरात !

$
0
0
एकिकडे विकासकामांना निधी नसल्याची ओरड महापालिकेकडून केली जाते. दुसरीकडे विविध संस्थांना दोन ते तीन लाखाचे अनुदान देताना कुठलीही चर्चा होत नसल्याचे बुधवारच्या महासभेत दिसून आले. त्यामुळे महापालिका जनतेचे पैसे खैरातीत वाटत असल्याची चर्चा रंगते आहे.

महापालिकेतर्फे दिग्दर्शक पुरस्कार

$
0
0
महापालिकेतर्फे यंदापासून राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजीव पाटील यांच्या नावे दिग्दर्शक पुरस्कार देण्यात येणार आहे. नगरसेवक तानाजी जायभावे यांनी याबाबत महापा‌लिकेला पत्र दिले होते. त्यानुसार बुधवारच्या महासभेत हा विषय मंजूर करण्यात आला.

विकासकामांना हिरवा कंदील

$
0
0
रस्ते, मैदाने, पथदीप, शाळा यासह शहरातील विविध विकासकामांना महासभेने मंजुरी दिली असून याकामांसाठी ५० कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी तहकूब करण्यात आलेल्या दोन महासभांचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते.

सर्वाधिक तक्रारी बिल्डरांविरोधात!

$
0
0
ग्राहकांना न्याय मिळावा म्हणून स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा ग्राहक मंचामध्ये आजवर सर्वाधिक तक्रारी बिल्डरांविरोधात आल्या आहेत. बिल्डरांखालोखाल ग्राहकांनी विमा कंपन्यांना मंचात खेचले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images