Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वावीजवळ अपघातात लष्करी जवानासह २ ठार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी गावाच्यापुढे शिंदेवस्तीजवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक होऊन लष्करी जवानासह दोन जण ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवपूर येथून मामाकडून आमरसाचे जेवण करून वरझडीकडे मोटारसायकलवरून (एमएच १ एचए ४४६) घरी जात असताना सिन्नरकडे जाणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकल (एमएच १५ पी ९७८८) यांची सद्गुरू पेट्रोल पंपाच्यापुढे शिंदेवस्तीजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात सुटीवर आलेले लष्करी जवान बाळासाहेब अशोक वाजे (२७, रा. डुबेरे ता. सिन्नर) आणि विशाल चंद्रभान वेताळ (वय २०, रा. वरझडी ता. संगमनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता चंद्रभान वेताळ या गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच किरण पाटील यांच्यासह वावी पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त गाड्या बाजुला करीत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी वावी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे, दशरथ मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज ठाकरेंचा १५ पासून दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून शहराची उपेक्षा सुरू असतांना मनसे प्रमुख राज ठाकरे १५ जुलैपासून तीन दिवस नाशिक भेटीवर येत आहेत. या काळात मुक्कामी थांबून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विकासकामांचाही आढावा घेणार आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे करणाऱ्या मनसेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांनी महापालिका निवडणुकीत नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या राज यांनी नाशिककडे पाठ फिरवली होती. पाच वर्षाच्या मनसेच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणावर सीएसआर फंडातून विकासकामे झाली. सोबतच भ्रष्टाचाराला आळा बसला. परंतु, महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी भाजपला निवडून दिले. मुख्यमंत्र्यानी नाशिकच दत्तक घेण्याची घोषणा केल्याने मनसे भूईसपाट झाली. विकासकामे करूनही नाशिककरांनी नाकारल्याने राज ठाकरे व्यथित झाले होते. पैशांवर निवडणुका जिंकल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परंतु नाशिककरांवरची नाराजी आता कमी झाली आहे. राज आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पक्षाची नव्याने बांधणी करणार असून विविध आघाड्यांचा आढावा घेणार आहेत.

विकासकामांचे पोस्टमार्टम
मनसेच्या काळात नाशिकमध्ये उभ्या राहिलेल्या विकासकामांचे पोस्टमार्टमही करणार आहेत. मनसेच्या काळात सुरू झालेल्या बॉटनिकल गार्डनकडे भाजपने दुर्लक्ष केले. या मुद्यावरून ते भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तसेच ‘दत्तक नाशिक’बाबत मुख्यमंत्र्यानी केलेल्या घुमजावावरून ते भाजपला जाब विचारण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोडला गोळीबार; तरुण गंभीर जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोड परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एकावर गावठी कट्ट्याने केलेल्या गोळीबारात कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब बाजारात काम करणारा एक जण गंभीर जखमी झाला आहे. संदीप अशोक लाड (रा. भराडवाडी, फुलेनगर, पंचवटी) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबाराच्या प्रकरणात नाशिकरोडला महिनाभरापूर्वी झालेल्या खून प्रकरणातील संशयितांचे नावे समोर आले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सूरज रमेश बोडके यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. जखमी संदीप लाड हा पेठरोड येथील शरदचंद्र मार्केटमध्ये डाळिंबाच्या गाड्या भरून देण्याचे काम करतो. एप्रिल महिन्यात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अगोदर सराईत गुन्हेगार शेखर निकम हा डाळिंब मार्केट येथे येऊन संदीपला भेटला होता. त्यावेळी निकम याने लाडकडे हप्त्यापोटी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी लाडने दोन दिवसांनी पैसे देतो, असे म्हणून वेळ मारून नेली होती. १५ दिवसांनी पुन्हा निकमने लाडकडे पाच हजार रुपयांची मागणी केली, तेव्हाही दोन दिवसानंतर पैसे देतो असे सांगून दोन दिवसांनी निकम याला पाच हजार रुपये दिले होते.

संदीप लाड, तात्या पिंगळे आणि लखन राथड हे तिघे गुरुवार (दि. २९) रोजी दुपारी तीनच्या सुमारास पेठरोड येथील मच्छिबाजारातून बच्छाव हॉस्पिटलजवळील हॉटेलमधून चहा पिऊन बाहेर पडत असताना संशयित शेखर निकम व त्याचा भाऊ केतन निकम (रा. खंडेराव मंदिर, पेठरोड) हे दोघे आले. त्यांनी लाडला तू दहा हजार रुपयांचा हप्ता दिला नाही, असे म्हणत भांडणाची कुरापत काढून शिवागाळ करू लागले. त्याचवेळी केतनने गावठी पिस्तूल काढून लाडवर गोळीबार केला. गोळी छातीच्या उजव्या बाजूला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल अकाउंट हॅकर्सकडून लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या काही तासात शहरातील २८ पेक्षा अधिक व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी लागलीच हालचाली करून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून, यामुळे सोशल मीड‌यिाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. २८ पैकी २६ अकाउंट महिलांचे असून, महिलांनी अकाउंटच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरसह देशभरात एखाद दुसरे व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक अकाउंट हॅक होण्याचा प्रकार नवीन नाही. मात्र, नाशिकमध्ये तब्बल २८ व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक हॅक झाले आहेत. हॅकरने हॅक केलेल्या अकाउंटद्वारे अश्ल‌लि मेसेज पाठवण्याचा सपाटा लावला. एक एक करीत अकाउंटधारकांना माहिती मिळाली, तशी सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदारांची रीघ लागली. याबाबत बोलताना सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले की, वनटाइम पासवर्ड वापरून हॅकरने हा उद्योग केला आहे. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक रिइन्स्‍टॉल करताना संबंध‌ति कंपनीकडून एक ओटीपी पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेचे आपण संबंध‌ति अॅप्लिकेशन वापरू शकतो. या प्रकरणात हॅकरने या पद्धतीने त्याच्याच परिच‌तिांपैकी एकाचे व्हॉट्सअॅप हॅक केले. नंतर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोहचून इतरांचे मोबाइल हॅक करण्याचा सपाटा सुरू केला. व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून रिइन्स्टॉल करताना नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपी आला. त्याचवेळी हॅकरने हॅक केलेल्या अकाउंटवरून ओटीपी पाठवण्याबाबत विनंती केली. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंध‌तिांनी तो मॅसेज फॉरवर्ड केला. परिणामी, हॅकरला सहजतेने आपला कार्यभार उरकता आला असे, पोलिस निरीक्षक पवार यांनी स्पष्ट केले. यापुढे जाऊन संशयित आरोपीने काहींचे फेसबुक अकाउंटदेखील हॅक केले. बुधवारपासून सायबर पोलिस स्टेशनमध्ये २८ तक्रारदार आले असून, हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे.

महिला अकाउंटस् टार्गेट
संशयित हॅकरने महिलांना टार्गेट केले आहे. २८ पैकी २६ अकाउंटस् महिलांचे आहेत. अकाउंट हॅक केल्यानंतर तो फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींशी, विशेषतः महिलांशी अश्लिल चॅटींग सुरू करतो. आपल्या परिच‌ति किंवा जवळच्या नातेवाईकांकडून असे अश्लिल एसएमएस किंवा फोटोग्राफ्स आल्यास महिलांनी संबंध‌ति व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधावा. त्याचे अकाउंट हॅक झाले असल्यास त्याला हा प्रकार माहितीही नसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या सिडकोतील तरुणास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमनानुसार (पोस्को) अन्वये गुन्हा तरुणाविरोधात दाखल करण्यात आला आहे.

संदीप बबन खैरे (रा. प्रतापचौक, हॉटेल फॉर्मुलाजवळ, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रामवाडी परिसरातील अल्पवयीन युवती रविवारी रात्री अशोकस्तंभाकडून घराकडे जात असतांना संशयिताने तिचा पाठलाग केला. त्यानंतर रामवाडी पुलाजवळ रस्ता अडवित त्याने युवतीचा विनयभंग केला. ही घटना पीडित युवतीने घरी आल्यानंतर पालकांना सांगितली. त्यानुसार त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. संशयिताविरोधात विनयभंगासह पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जी. एम. जाधव करीत आहेत.

महिलेची पर्स पळविली
घराचे प्रवेशद्वार उघडणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पल्सरवरील चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना बॉईज टाऊन पब्लिक स्कूल परिसरातील आनंदवन कॉलनीत घडली. पर्समध्ये मोबाइल, सोन्याचे दागिने असा सुमारे ४३ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजली प्रमोद कुलकर्णी (रा. आनंदवन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, कुलकर्णी या बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. साडेअकरा वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार घडला. कुलकर्णी बंगल्याचे प्रवेशद्वार उघडत असताना पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावली. कुलकर्णी यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे भरधाव वेगात दुचाकीवर पसार झाले. पर्समध्ये मोबाइल, सोन्याच्या रिंगा, घराच्या व लॉकरच्या चाव्या असा सुमारे ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या
म्हसरूळ परिसरातील गायत्रीनगर भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. समाधान अशोक जेजुरकर (१८, रा. साईसेवा पार्क गायत्रीनगर, म्हसरूळ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात कारणातून समाधानने बुधवारी घरात गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात आली.

भरदिवसा घरफोडी
अंबड लिंक रोडवरील केवलपार्क भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीला जगन्नाथ रायते (रा. आकृती अपार्टमेंट, केवलपार्क ) यांच्या तक्रारीनुसार, रायते या बुधवारी सायंकाळी घराजवळ योगाच्या सरावासाठी गेल्या. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमध्ये सोप्यावर ठेवलेला मोबाइल, कपाटात ठेवलेला सोन्याचा राणीहार व रोख रक्कम असा सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

कॉलेजरोडला घरफोडी
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लॅपटॉप, रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना कॉलेजरोड भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरती राजेश राऊळकर (रा. सन्मित्रा अपार्ट. आरवायके कॉलेजजवळ) यांच्या तक्रारीनुसार, राऊळकर कुटुंबीय १० ते १४ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता घरफोडीचा प्रकार घडला. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील डेल कंपनीचा लॅपटॉप, कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोकडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहातील हॉलमध्ये प्रमुख शासकीय विभागाचा आढावा घेत गुरुवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

गेल्या वेळी पुरेशी माहिती नसल्याने या समितीने दौरा अर्धवट सोडला होता. आता ही समिती पुन्हा चार दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात समिती आढावा घेणार होती; पण जागेत बदल करीत शासकीय विश्रामगृहातच या समितीने अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. समिती २ जुलै रोजी आढावा घेऊन परतणार आहे. ‘भिवंडी पूर्व’चे शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीने सकाळी जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर महसूल विभागासह पोलिस विभागाचा आढावा, महावितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ विभाग, उत्पादन शुल्क, आदिवासी विकास विभाग यांचा या समितीने आढावा घेतला.

समिती शुक्रवारी (दि. ३०) आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठला भेट शनिवारी (दि. १ जुलै) दिवसभर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह यांना भेटी देऊन तपासणी करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (दि. २ जुलै) जाऊन आढावा बैठक घेणार आहे.

सात जण उपस्थित
समितीमार्फत आदिवासींच्या विविध योजनांचा व निधींचा आढावा दरवर्षी घेतला जातो. या समितीत अध्यक्ष म्हात्रे यांच्यासह आमदार सदस्य वैभव पिचड, प्रा. चंद्रकात सोनवणे, प्रभुदास भिलावेकर, काशिराम पावरा, आंनद ठाकूर, पांडूरंग बरोरा, चंद्रकांत रघुवंशी यांची उपस्थिती आहे.

‘झेडपी’ची आज बैठक
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना हे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे अनुसूचित जमाती कल्याण समितीसोबतची त्यांची बैठक शुक्रवारी (दि. ३०) होणार आहे. गुरुवारी सकाळी मीना उपस्थित होते. मात्र, नंतर बैठकीची वेळ आल्यानंतर ते नव्हते. त्यामुळे ही बैठक गुरुवारी होऊ शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेसिक्स पक्के करा; आव्हाने सोपे बनतील’

$
0
0

इंजिनीअरिंगमध्ये मूळ संकल्पना पक्क्या करून कुणाच्या आधाराशिवाय निरीक्षणाने उभे राहू शकले तर यश तुमच्या मागे येईल, असा संदेश महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. जयंत पत्तीवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रत्येक संस्थेचे वेगळे असे वैशिष्ट्य असते. आपल्या संस्थेबद्दल काय सांगाल?
- संस्थेला दिशा देणाऱ्या व्यवस्थापनाचा दृष्टीकोन या वाटचालीसाठी महत्त्वाचा मानला जातो. उद्योग वर्तुळात काम करताना प्रत्यक्षात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाचा जाणवणारा अभाव दूर करण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून या संस्थेचा उदय झाला. प्रत्यक्षात उद्योग वर्तुळात कार्यरत व्यवस्थापन असल्याने या विद्यार्थ्यांच्या हाती शाश्वत भविष्य कसे देता येईल, या दृष्टीने व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येते. परिणामी, येथील विद्यार्थी उत्पादकतेच्या बाबतीत कमी भरत नाही.

ग्रामीण विद्यार्थ्यांना अनेकदा पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही, पण त्यांच्यात क्षमता उत्तम असते...
- आमच्याकडे शिक्षण घेणारे विद्यार्थी शहरी, निमशहरी आणि ग्रामीण, दुर्गम असे संमिश्र भागातून येतात. सरतेशेवटी ते सर्व एकाच मंचावर येत असल्याने त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड किंवा त्यांच्या अध्ययन, विकास प्रक्रियेत अडसर येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे विद्यार्थी प्रत्यक्षात व्यावसायिक वर्तुळात कमालीचे यशस्वी ठरतात. तशी तपशीलवार नोंदही आमच्याकडे आहे.

इंजिनीअरिंग कॉलेजेसची वाढती संख्या आणि घसरता दर्जा हे प्रमाण चिंताग्रस्त करते...
- हे एकंदरीत बाहेरचे चित्र असले तरीही आमच्या संस्थेच्या वतीने यात बदलण्यासाठी अॅकॅडमिक्सच्या पलिकडे जाऊन आम्ही प्रयोग करतो आहोत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही ‘झिरो वायडी’ (म्हणजे शून्य टक्के इयर ड्रॉप) या मथळ्याखाली उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पदवीस प्रथम वर्षी प्रवेश घेतल्यापासून अखेरच्या वर्षापर्यंत एकाही विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये, यादृष्टीने सर्व बाजूने परिश्रम घेतले जात आहेत. यासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत शैक्षणिक प्रगतीवर फॅकल्टी व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. प्रसंगी समुपदेशन, संवाद आणि मार्गदर्शन या तंत्राने शैक्षणिक गुणवत्ता वधारण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.

अलिकडील नवीन अचिव्हमेंट काय आहे?
- इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना या विद्याशाखेची क्षमता आणि व्याप्ती समजावी व सामाजिक जबाबदारीचे भान रहावे, यादृष्टीने काही प्रकल्प त्यांना कॉलेजकडून दिले जातात. हे प्रकल्प विद्यार्थी मन लावून पूर्ण करतात. अलिकडेच एका विद्यार्थिनीने महिला सुरक्षेसंदर्भात व्हर्च्युअल चेंज रूम प्रोजेक्ट, केंद्राच्या स्वच्छता अभियानाशी तंत्रज्ञानाच्या अविष्काराने जोडणारा असाच एक प्रकल्प राज्यभर गाजला. नवनव्या प्रयोगांचे सुमारे १४ पेटंट शोधकर्त्या विद्यार्थ्यांच्या नावे मिळविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. याशिवाय १०० टक्के प्लेसमेंट ही सुध्दा एक अचिव्हमेंट सांगता येईल.

इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असा काही आपल्याकडील उपक्रम?
- आमच्याकडे ग्रामीण आणि दुर्गम भागातूनही विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर येतात. या सर्व विद्यार्थिनींनी पदवीच्या चार वर्षांसाठी दररोज कॉलेज ते त्यांचे गाव या मार्गावर मोफत बससेवा देण्यात येते. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने काय वाटतात?
- तंत्रज्ञानात दरदिवशी नवीन भर पडते आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांना कायम अपडेट रहावे लागेल. पण जगातले कुठलेही नवे तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या मूळ संकल्पनांवर आधारित आहे. त्यामुळे यापासून तुटून त्यांना चालणार नाही.

विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
- आपल्या बौद्धिक क्षमता, अभिरूची इत्यादी कल तपासून योग्य विद्याशाखेत व योग्य कॉलेजातच प्रवेश घ्या. इंजिनीअरिंगमध्ये कुणाच्या अनुकरणाने तग धरता येणार नाही त्यासाठी तुमची स्वत:ची निरीक्षण क्षमता आणि प्रचंड आत्मविश्वास हवा. पदवीची ही चार वर्षे खडतर परिश्रमाची आहे हे स्वीकारल्यास जीवनातील आव्हाने जड जाणार नाहीत.
•शब्दांकन : जितेंद्र तरटे
Jitendra.tarte@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक संकट झुगारून शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

घरची हलाखीची परिस्थिती, ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारातून बाहेर आलेले वडील सायकलच्या दुकानात काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात... वडिलांबरोबरच आजोबांवर होणारा औषधोपचाराचा खर्च... अशा अनेक संकटांवर मात करीत आदित्यने देवळाली कॅम्पच्या सुभाष गुजर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये दहावीत ९५.०४ टक्के गुण मिळवत यशाला गवसणी घातली. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे अल्बर्ट आइनस्टाइन यांना आपले रोल मॉडेल मानणाऱ्या आदित्यला भौतिक विषयात शास्त्रज्ञ बनायचंय. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असूनही परिस्थितीचा बाऊ न करता आदित्यने जीव तोडून अभ्यास करून सुवर्णयश प्राप्त केलं आहे. मात्र, यापुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

‘‘मुलगा खूप कष्टाळू आहे हो! पण परिस्थितीने पुरता गांजलाय. त्याला शिकून खूप मोठं होण्याची इच्छा आहे. त्याला शास्त्रज्ञ का काय म्हणता ते व्हायचंय. कुठून आणू एवढा पैसा? पोरांची स्वप्न झाली मोठी अन् आम्ही झालो खुजे, अशी आमची अवस्था झालीय बघा! कोण शिकवल हो माझ्या पोराला? कसं होईल त्याचं शिक्षण?’’ आदित्य नाईकच्या आईचा हा काळजीयुक्त सूर. तिला वाटतं, आदित्यने शिकावं, मोठं व्हावं आणि या दारिद्रयातून बाहेर काढावं. कष्टाळू आईवडील व ध्येयवादी आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जिद्दी व हुशार आदित्यने संशोधक होण्याचा निर्धार पक्का केला आहे.

आदित्यला लहान बहीण असून, ती नववीत आहे. आजही त्याचे कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीचा संस्कार जपतेय. आदित्यच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आणि त्याच वेळी कुटुंबावर नवा आघात झाला. आदित्यचे वडील मिलिंद यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील सर्व किडुकमिडुक विकून वडिलांना वाचविण्यासाठी त्याची आई व आजोबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्यात त्यांना यश आले. मात्र, वडिलांच्या कामावर परिणाम झाला. आजही दर महिन्याला त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च येतोय. अशाही परिस्थितीत आदित्य त्यांच्या सेवेत कधी खंड पडू देत नाही.

आदित्यचे वडील पाथर्डी फाटा येथे एका दुकानात काम करतात. खर्चात बचत करून कुटुंब सावरण्यासाठी २५ वर्षांपासून ते २८ किलोमीटरचा प्रवास सायकलनेच करीत आहेत. यातून झालेल्या बचतीतून ते आदित्यच्या शिक्षणावर खर्च करतात. घरात आदित्यचे आजोबाही आजारी आहेत. आदित्यची आई त्यांच्या आजारपणातही सेवा करतेय. घरखर्च सांभाळताना त्यांची मोठी तारांबळ होतेय. आदित्यच्या शिक्षणाचा खर्च आजवर कसा तरी पेलला असला तरी पुढील उच्च शिक्षणासाठीच्या खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा असा यक्ष प्रश्न आदित्यच्या आई-वडिलांपुढे आहे.

आदित्य खूप हुशार आहे. मात्र, आम्ही त्याला सोयी-सुविधा पुरविण्यात कमी पडू लागलो असल्याची खंत व्यक्त करताना आदित्यच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. आदित्य आठवीत गेला तेव्हा वडिलांचा आजार पुन्हा बळावला. खर्च वाढला. शाळेतील सविता अडवानी या शिक्षिका देवासारख्या धावून आल्या. त्यांचा मदतीचा हात ऐनवेळी मिळाल्याने आदित्यची नौका दहावीच्या किनाऱ्याला लागली. या काळात त्याने अविश्रांत मेहनत घेतली. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असूनही आदित्यने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पुस्तकांचा अभ्यास केला. सिजनप्रमाणे सौरऊर्जेवर चालणारे पथदीप बनविणारा आदित्य सातवीच्या वर्गातच इन्स्पायर अॅवॉर्डचा मानकरी ठरला. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही सहभागी झाला. कबड्डी, क्रिकेट व चेस या खेळांत व एनटीएस व एमटीएस या परीक्षांतही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कष्टाळू आईवडील व ध्येयवादी आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जिद्दी व हुशार आदित्यने संशोधक होण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्याचा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आदित्य दानशूरांच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पुढील शैक्षणिक वाट सुकर होण्यासाठी त्याला नाशिककरांच्या मदतीची गरज आहे.

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळवणाऱ्या, पण पुढील शैक्षणिक वाटचालीत आर्थिक समस्या उभी ठाकलेल्या विद्यार्थ्यांना बळ देणारा ‘महाराष्ट्र टाइम्स’चा उपक्रम म्हणजे ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाचे यंदा सातवे वर्षे आहे. खडतर परिस्थितीशी झगडून मिळवलेल्या यशाचा आणि या मदतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास आम्ही या उपक्रमांतर्गत मांडणार आहोत. या प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असला तरी त्यांच्या डोळ्यांत स्वप्न एकच आहे... शैक्षणिक भरारीचे. हे स्वप्न साकार करण्यासाठी ‘मटा’चे संवेदनशील व सुजाण वाचक या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गेल्या सहा वर्षांप्रमाणेच यंदाही उभे राहतील, ही खात्री आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवीस टक्के माता मारकुट्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलांवर होणाऱ्या हिंसाचारात २५ टक्के माता सहभागी असल्याचा निष्कर्ष युनिसेफची महाराष्ट्र शाखा, नाइन इज माइन, आणि मुंबई स्माइल्स या संस्थांनी काढला आहे. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे स्वरुप कसे असते याचा मागोवा घेण्यासाठी या तीनही संस्थांच्या वतीने राज्यव्यापी संशोधन हाती घेण्यात आले होते. या संशोधनात आठ जिल्ह्यांतील १३ ते १७ वयोगटातील पाच हजार मुलामुलींनी भाग घेतला. याबाबतचा अहवाल युनिसेफच्या अलका गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी प्रसिद्ध केला.

या अहवालात म्हटले आहे की, हातात जे असेल ते फेकून मारणे, लाथाबुक्क्यांनी तुडवणे, गरम पळीचा डाग देणे, असे अत्याचार घरातच होतात. घरात होणाऱ्या हिंसेबद्दल मुले बोलत नाहीत. पण मुलांच्या मनावर त्याचे खोलवर परिणाम होतात. सर्वात जास्त २५ टक्के हिंसा ही आईकडून होते. २१ टक्के हिंसा वडिलांकडून, १७ टक्के हिंसा दुसऱ्यांच्या मारहाणीतून तर २ टक्के मुलांना चटके देऊन हिंसा केली जाते. मुलांना घरात कसे वाटते याबाबत देखील सर्वेक्षण करण्यात आले. ६८.२७ टक्के मुलांनी सांगितले की, आम्ही आमच्या घरात सुरक्ष‌ित आहोत ११.१६ टक्के मुलांनी सांगितले की आम्ही आमच्याच घरात दुःखी आहोत. ६.७३ टक्के मुले म्हटली, घरी जायला भीती वाटते तर ६.३५ टक्के मुले म्हटली की, घरच्यांचा आम्हाला राग येतो.

या तीनही संस्थांनी केवळ निष्कर्ष काढला नाही तर त्याबाबत उपायदेखील सुचवले आहेत. या मुलांना मुलभूत सुविधा पोहचविणे आवश्यक आहे. मुलांच्या संवेदनांचे रिपोर्टिंग झाले पाहिजे. मुलांची देखभाल करणाऱ्यांना सूचना द्यायला हव्यात. कोणताही अन्याय सहन न करता त्यावर आवाज उठविला पाहिजे. मानसिक दृष्ट्या अपंग व्यक्ती जास्त होरपळल्या जातात. त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे असेदेखील म्हटले आहे.

लैंगिक अत्याचाराचे धक्कादायक निष्कर्ष

यावेळी लैंगिक अत्याचाराबद्दलदेखील मुले बोलली. याबाबतचा निष्कर्षदेखील धक्कादायक होता. १० टक्के अत्याचार हे वड‌िलांकडून होतात. ८.५ टक्के अत्याचार भावांकडून, ७ टक्के काकांकडून तर ६ टक्के आत्याचार आजोबांकडून होत असल्याचे उघडकीस आले आहे. अत्याचार झाल्यानंतर २४ टक्के मुलांनी कुणाला सांगितले नाही. १६ टक्के मुलांनी त्याला विरोध केला. ११ टक्के मुलांना सांगण्यात आले की त्याची पर्वा करू नका, याबाबत कुठेही वाच्यता करू नये असे ४ टक्के मुलांना सांगण्यात आले. ३.५ टक्के मुलांच्या अत्याचाराबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. या गोष्टींची पर्वा करू नये असे ६२ टक्के मुलांना वाटते. ६० टक्के मुले म्हणतात, ही सामान्य बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आऊटसोर्सिंगने ३० व्हॉल्व्हमनची नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची अत्यावश्यक सेवा असलेल्या दैनंदिन पाणीपुरवठ्याची मदारही आता ठेकेदाराच्या हाती राहणार आहे. पाणीपुरवठा विभागात व्हॉल्व्हमनची संख्या कमी असल्याने पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. या व्हॉल्व्हमनची नियुक्ती आऊटसोर्सिंगने करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जवळपास ३० व्हॉल्व्हमनची सेवा देण्यासाठी पालिकेने पावणेदोन कोटी रुपये खर्च खासगी एजन्सीला देण्याची तयारी दर्शवली आहे. सोबतच अतिरिक्त ३० व्हॉल्व्हमनची गरज असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांनी नोकरभरतीला नकार देत, आऊटसोर्सिंगद्वारे कामे करण्याचा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवांचेही खासगीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. त्याची सुरुवात पाणीपुरवठा विभागातून झाली आहे. शहराचा वाढता विस्तार बघता पाणीपुरवठा विभागात व्हॉल्व्हमनची पदे रिक्त आहेत. तर जवळपास ४२ व्हॉल्व्हमन रिटायर होत असल्याचा दावा विभागाने केला आहे. पालिकेला २६३ व्हॉल्व्हमनची आवश्यकता असताना सध्या ५८ व्हॉल्व्हमन कार्यरत आहेत. त्यामुळे आऊटसोर्सिंगद्वारे ३० व्हॉल्व्हमन भरण्याचा प्रस्ताव स्थायीला सादर करण्यात आला. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मे. गायत्री इलेक्ट्रिक अॅण्‍ड एंटरप्रायजेस या कंपनीला त्यासाठी एक कोटी ७९ लाख ७१ हजार रुपये वर्षाकाठी दिले जाणार आहेत. सोबतच सभापतींच्या सूचनेनुसार अधिक ३० व्हॉल्व्हमनची गरज असल्याचे विभागाने सांग‌ितले. उपसूचनेद्वारे त्यालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेची अत्यावश्यक असलेली पाणीपुरवठ्याची सुविधाही आता ठेकेदाराच्या हाती गेली आहे.

आयुक्तांची समयसूचकता

व्हॉल्व्हमनच्या आऊटसोर्सिंगच्या प्रस्तावावर चर्चा करताना सभापती गांगुर्डे यांनी अजून व्हॉल्व्हमनची आवश्यकता आहे काय, अशी विचारणा केली. त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने चव्हाणके यांनी रिक्त पदांचा पाढा वाचला. पूर्वी पालिकेत २६३ व्हॉल्व्हमन असल्याचा दावा करत ठेकेदाराकडून अधिकची माणसे हवी असल्याचे स्पष्टीकरण दिले. पाणीपुरवठा विभागाची अवास्तव मागणी लक्षात येताच आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गरज आहे तेवढीच मागणी करा असे सांगत पाणीपुरवठ्याच्या अवास्तव मागणीला लगाम घातला. निव्वळ ठेकेदाराकडून माणसे घ्यायची म्हणून वाढ करण्याच्या विभागाच्या प्रयत्नांना आयुक्तांनी समयसूचकता दाखवून ब्रेक लावला.


मुदतवाढीला मंजुरी

महापालिकेच्या एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रजनन व बालकल्याण कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या ३३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी नियुक्तीला स्थायीने मान्यता दिली आहे. सोबतच चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीलाही समितीने मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात हे सर्व प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम. जी.रोडवर ‘चक्का जाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दुपारी एम. जी. रोडसह परिसरात अचानक कारवाई करीत जवळपास ६० चारचाकी वाहनांना जॅमर बसविले. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे मांडण्यात आली होती.

एम. जी. रोडवर पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे मोठा रस्ता अडला जातो. त्यातच रस्त्यावरून एखादी बस अथवा मोठे वाहन गेल्यास रस्त्यावर जागाच उरत नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी मध्यतंरी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या काही जागेचा वापर करण्याचे नियोजन आखले. मात्र, ही योजना मार्गी लागली नाही. त्यामुळे एम. जी. रोडवरील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक आंदोलन झाले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक थांबली. पर्यायी रस्ता असलेल्या एम. जी. रोडवर अगोदरच वाहने पार्क झालेली असल्याने मोठी वाहतूक कोंडी उद्भवली. यावेळी उपस्थित पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अजय देवरे यांनी लागलीच कर्मचाऱ्यांना सूचना करीत कारवाई करण्याचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पार्क झालेल्या जवळपास ६० वाहनांच्या चाकांना जॅमर बसविले. एम. जी. रोडवरील बहुतांश इमारतींना पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे सर्व वाहने रस्त्यावर पार्क होतात. या कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे चांगलेच दणाणले.

--

हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई

हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांवरही गुरुवारी कॉलेजरोडसह शहराच्या इतर भागात कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाईला गती देण्यात आली असून, मागील दोन दिवसांतच जवळपास २७५ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली आहे. गुरुवारी हा आकडा शंभरच्या पुढे सरकण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर सेंटरसाठी ४५ कोटींचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शालीमार येथील संदर्भसेवा रुग्णालयातील टर्शरी कॅन्सर सेंटरसाठी ४५ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

या रुग्णालयावर उत्तर महाराष्ट्रातील शेकडो रुग्ण अवलंबून आहेत. नऊ वर्षापूर्वी या रुग्णालयाचे हस्तांतरण करण्यात आले. स्थापनेपासून रुग्णालयातील गैरसुविधांबाबत तक्रारी होत्या. नवीन कर्करोग व किडनी प्रत्यारोपणाचे विभाग प्रस्तावित आहेत. गोडसे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेतली. रुग्णालयाच्या टर्शरी कॅन्सर केअर सेंटरच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव देण्याचे ठरवले आहे. केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राज्य कॅन्सर सोसायटीतर्फे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालयात टर्शरी कॅन्सर केअर सेंटर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. गोडसे यांनी हे मंत्र्यांच्या निर्दशनास आणले. संदर्भ सेवा रुग्णालयात सध्या कॅन्सर रुग्णांसाठी वीस खाटा व अधिकाच्या तीस खाटांचे नियोजन करुन तेथे वरीलप्रमाणे प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. भविष्यात सध्याच्या इमारतीवर दोन मजले बांधून तेथे वाढीव शंभर खाटांचे नियोजन केले जाणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.


नवीन मशिनरी

या रुग्णालयात २००८ पासून आतापर्यंत २६,१७४ कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये शस्त्रक्रिया झालेले ३४६३, केमोथेरपी घेतलेले ७९११ व रेडिओथेरपी घेतलेले ७९१ रुग्ण आहेत. गोडसे यांनी सांगितले की, प्रस्तावित प्रकल्पातंर्गत आधुनिक मशिनरीची मागणी केली आहे. त्यामध्ये साडेवीस कोटींच्या किरणोपचार मशिनचा समावेश आहे. या मशिनने साइडइफेक्टस होत नाहीत. इतर रुग्णांना किरणोत्साराचा संसर्ग होऊ नये म्हणून जमिनीखाली दीड कोटींचा आधुनिक बंकर बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात ५० लाखांची वैद्यकीय आँकोलाजी किंवा पॅलिएटिव्ह केअर यंत्रणा व बोनमॅरो ट्रान्सप्लान्टसाठी ५० लाखांच्या ऑपरेशन थिएटरच्या सुविधा झाल्यास कॅन्सर रुग्णांना वरदान ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दोन अपघात; डॉक्टर, जवानासह सहा ठार

$
0
0

टीम मटा, नाशिक

नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत गुरुवारी लष्करी जवान, तरुण महिला डॉक्टरसह सहा जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली. वावी गावाजवळ झालेल्या अपघातात दोन, तर मालेगाव येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दहा महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे.

वावीजवळ शिंदे वस्तीवर झालेल्या दोन मोटारसायकलींच्या धडकेत लष्करी जवान बाळासाहेब अशोक वाजे (वय २७, रा. डुबेरे, ता. सिन्नर) आणि विशाल चंद्रभान वेताळ (२०, रा. वरझडी ता. संगमनेर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर संगीता चंद्रभान वेताळ गंभीर जखमी झाल्या.

बालिकेचा करुण अंत

मालेगाव ः मालेगाव-मुंबई आग्रा महामार्गावरील पाटणे फाट्यावर गुरुवारी झालेल्या अपघातात धुळ्यातील चार जण ठार झाले. नाशिकहून धुळ्याकडे जाणाऱ्या कारच्या (एमएच१८/व्हीव्ही ८८)चालकाने पाटणे फाट्याजवळ गतिरोधकावर कारचा वेग कमी केला. त्याच वेळी मागून स्विफ्ट कार (एमएच १६/ एजे ०४३५) धुळ्याकडे जात होती. पुढच्या कारने गती कमी केल्यावर स्विफ्ट कारचालक शफिक रसूल अहमद (रा. नाशिक) याने ऐनवेळी ब्रेक लावला. त्यामुळे कार गोलाकार फिरून पुढच्या कारवर आदळली. त्याच वेळी या कारमागे असलेला कंटेनर स्विफ्ट कारवर आदळल्याने कारचा चक्काचूर झाला. अपघातात स्विफ्ट कारचालक अहमद जागीच ठार झाला, तर डॉ. रुची शहा (वय २६), प्राची चिंतन दवे (२३), चिंतन दवे (वय १० महिने) यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त कार ताब्यात घेतल्या असून, तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतर्कतेने टळेल मास हॅकिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक अकाउंट हॅक होण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे सोशल मीडियावरील महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा अधोरेरखीत झाला आहे. सायबर पोलिसांनी सतर्कता राखत संशयिताला शोधून काढले असून, लवकरच त्यास बेड्या पडणार आहेत. मात्र, सोशल मीडिया यूजर्सने पुरेशी सतर्कता बाळगल्यास असे प्रकार टळू शकतील, ही बाब या घटनेमुळे स्पष्ट झाली आहे.

एखाद्-दुसरे अकाउंट हॅक होण्याचा प्रकार शहरात नवीन नाही. मात्र, २८ किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट्सवर हॅकरने पहिल्यांदाच डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत माहिती देताना सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक हॅक करण्यासाठी हॅकरला फारतर काही मिनिटांचा वेळ लागतो. असे प्रकार टाळण्यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. आपण सजग असू तरच हॅकरला रोखता येऊ शकते. ओटीपी पासवर्ड कोणीही मागितला तरी देऊ नये. अगदी कुटुंबातील एखाद्या सदस्याने तो मेसेज करून मागितला असला तरीही. अशा वेळी संबंधितांशी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष बोलून खात्री करावी. शक्यतो, मोबाइलमध्ये आलेला ओटीपी हा पासवर्ड बदलण्यासाठी किंवा एखाद्या व्यवहारासाठी वापरला जातो, हे लक्षात घ्या.

--

हे करा...

-व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करून व्हिरिफिकेशन करून घ्यावे. -फेसबुकसाठीही अनेक सिक्युरिटी फीचर्स असून, त्यांचा वापर करावा.

-सोशल मीडियावर रिप्लाय देताना अनेकदा विचार करावा.

-जवळच्या व्यक्तींकडून अश्लिल मेसेज अथवा चुकीचा फोटो आल्यास त्या व्यक्तीशी फोनवर संपर्क करा.

-अकाउंट हॅक झाल्याची खात्री पटल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

--

हे टाळा...

-स्मॅप लिंक ओपन करणे.

-ओटीपीसह इतर पासवर्ड शेअर करणे.

-अनोळखी व्यक्तींना फ्रेंडलिस्टमध्ये ठेवणे.

-व्हॉट्सअॅप अथवा फेसबुकच्या सिक्युरिटी फीचर्सकडे दुर्लक्ष.

--

या प्रकरणातील संशयिताचा माग काढण्यात आला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल. नागरिकांनी सोशल मीडियाच्या सिक्युरिटीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध बसतो.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीधारकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारी योजनेतून आम्ही राहतो त्याच ठ‌िकाणी घरे बांधून द्या, तेथे मूलभूत सुविधा पुरवून घरपट्टी लागू करा आदी मागण्यांसाठी आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी गुरुवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दुपारी अडीचच्या सुमारास तीन आंदोलकांनी राॅकेल अंगावर आेतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी दोन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच राॅकेल अंगावर आेतून घेतले. एकापाठोपाठ आंदोलक आक्रमक होऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू लागल्यामुळे पोलिसांनी दोन्ही वेळेस हस्तक्षेप करून आंदोलकांच्या हातातून आगपेटी हिसकावून घेतली. त्यानंतर पोलिसांनी जास्तीची कुमक मागवून आंदोलकांवर नियंत्रण आणले.

गौतमनगर, शांतीनगर, साठेनगर आणि रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी गेल्या आठवड्यापासून उपाेषणाला बसले आहेत. त्याची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे त्यांनी अगोदरच आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी हे आंदोलन केले. याअगोदर या आंदोलकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दोन्ही रस्त्यांवर ठ‌िय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ हे आंदोलन सुरू राह‌िल्याने भरपावसात नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर दोनच दिवसांत आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मनसेच्या नेतृत्वाखालील आंदोलन चांगलेच पेटले.

दरम्यान, दुपारी या आंदोलकांनी गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहात आलेल्या आदिवासी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन प्रशासन दखल घेत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर समितीच्या आमदार सदस्यांनी जेवणानंतर आयुक्तांना बोलावण्याचे व सायंकाळी आंदोलनाला भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक थेट उपोषणस्थळी गेले व त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समितीची बैठक असल्यामुळे निम्म्याहून अधिक जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी गोल्फ क्लबच्या शासकीय विश्रामगृहात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात ४० ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वात मोठी समस्या असलेल्या पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ४० ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. या ४० ठिकाणी पार्किंगसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी ५० लाखांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहराच्या पाच विभागांत ऑनस्ट्रीट ३४ ठिकाणी, तर ऑफस्ट्रीट ६ ठिकाणी पार्किंग स्थळे विकस‌ित केली जाणार आहेत. ती खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिली जाणार आहेत. तसेच ‘पे अॅन्ड पार्क’ची स्थळे ही महापालिकेच्या मार्फत विकस‌ित करण्यात येणाऱ्या मोबाइल अॅपद्वारे नियंत्र‌ित केली जाणार असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.

गुरुवारी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जादा विषयांमध्ये शहरातील ‘पे अॅण्‍ड पार्क’साठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. शहरातील वाहतूक नियंत्रणासह पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधकाम विभागाने आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत ४० ठिकाणी ‘पे अॅन्ड पार्क’ स्थळे विकस‌ित केली जाणार आहेत. हा ठेका एकाच ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न पालिकेने केला. परंतु, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या पार्किंग ठिकाणांचे पाच विभाग करण्यात आले असून, पाच स्वतंत्र ठेके दिले जाणार आहेत. पार्किंगचे नियंत्रण हायटेक पद्धतीने केले जाणार असून, मोबाइल अॅपद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठेकेदारांसाठी पालिकेच्या वतीने पार्किंगस्थळावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी २ कोटी ५० लाखांचा खर्च गृहीत धरला असून, त्याला स्थायी समितीने विनाचर्चाच मंजुरी दिली आहे. पाच विभागांत स्वतंत्रपणे ‘पे अॅण्ड पार्क’चे ठेके दिले जाणार आहेत.

ठेकेदाराला थेट मदत?

शहरात उभी केली जाणारी ही पे अॅण्‍ड पार्किंग स्थळे ही खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिला जाणार आहे. पंरतु, त्या ठेकेदाराला पायाभुत सुविधा महापालिका पुरवणार असल्याबददल आश्चर्य व्यक्त केेले जात आहे.या ठिकाणाहून ठेकादार पैसा कमावणार आहे.परंतु त्याच्या पैशांसाठी महापालिकेने सुविधा का उपलब्ध करून द्याव्यात असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे महापालिका थेट ठेकेदारांचेच लाड पुरवत असल्याचे या प्रस्तावावरून समोर आले आहे.तर स्थायीच्या सदस्यांनीही कोणतीही खातरजमा न करताच प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


पार्किंगसाठी कॅशलेस सुविधा

या ४० पार्किंगच्या ठिकाणांवर पेमेंट अदा करण्यासाठी कॅशलेश सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महापालिका स्वतंत्रपणे मोबाइल अॅप तयार करत असून, हे अॅप वापरणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. या अॅपच्या माध्यमातून वाहनधारकाला थेट कॅशलेस पद्धतीने पार्किंगचे बील भरता येणार आहे. या अॅपमुळे किती वाहने आली आणि ठेकेदाराला किती पैसे मिळाले, याचे नियंत्रण होणार आहे. तसेच ठेकेदारावर वॉचही ठेवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता, बिटको हॉस्पिटलचा मुद्दा गाजला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

आरोग्यासह, बिटको रुग्णालय, पथदीपांविषयीच्या प्रश्नांवर नाशिकरोड प्रभाग समितीची पहिली सभा चांगलीच गाजली. मनपाच्या निवडणुकीनंतर गुरुवारी सकाळी झालेल्या पहिल्याच प्रभाग सभेदरम्यान उपस्थित नगरसेवकांनी प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्यासमोरच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरी समस्यांवर लक्ष्य केले. नव्याने निवडून आलेल्या व एक पंचवार्षिक विश्रांती घेतलेल्या नगरसेविकांनी पहिलीच प्रभाग समितीची सभा गाजवली.

नाशिकरोड प्रभाग समितीची सभा गुरुवारी येथील विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या उपस्थितीत झाली. या सभेदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मास्क, ग्लोव्हज, रेनकोट पुरविण्याची मागणी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी लावून धरली. याशिवाय बिटको रुग्णालयातील समस्यांचा त्यांनी या स्भेत पाढाच वाचला. बिटको रुग्णालयातील पाण्याच्या टाक्या वेळच्या स्वच्छ केल्या जात नसल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. रुग्णालयातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने या रुग्णालयात दुर्गंधी पसरली असून बालरुग्ण विभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मलेरिया विभागाच्या थंडावलेल्या कामाबाबत व शहरातील बंद पथदीपांच्या दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेविका सीमा ताजणे यांनी जाब विचारला. बिटको रुग्णालयाच्या समस्यांवर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोज आहिरे यांनी आवाज उठवला. शहरात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असून, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील व्यावसायिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक रमेश धोंगडे यांनी केली. या सभेस विविध विभागांचे अधिकाऱ्यांसह नगरसेवक संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव, मंगला आढाव, रंजना बोराडे, मीरा हांडगे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, केशव पोरजे, संतोष साळवे, पंडित आवारे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते.

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निषेध

बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर या सभेस गैरहजर राहिल्याने या रुग्णालयाविषयीच्या समस्यांवरील चर्चेदरम्यान नगरसेवकांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेवक संतप्त झाले. यावेळी बिटको रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी गैरहजर राहिल्याचा आरोप उपस्थित नगरसेवकांनी करुन त्यांच्या कामकाजाचा निषेध केला. यापुढील प्रभाग समिती सभेत त्याविषयीचा अहवाल सादर करण्याची मागणीही यावेळी उपस्थित नगरसेवकांनी केली.


विषय पत्रिकेवर जुनेच प्रभाग

या प्रभाग समितीच्या सभेच्या विषयपत्रिकेवर मनपा निवडणूक होऊन चार महिने उलटले तरी जुन्याच प्रभाग क्रमांकांचा उल्लेख आढळून आला. गेल्या निवडणुकीत नाशिकरोड प्रभागात प्रभाग क्र. १७ ते २२ असे सहा क्रमांकांचे चार सदस्यीय प्रभाग नव्याने अस्तित्वात आले आहेत. केवळ प्रभाग क्र. १९ मध्येच तीन सदस्य आहेत. असे असूनही विषय पत्रिकेवर मात्र जुन्याच प्रभाग क्रमांकाची नोंद दिसून आली. यावरुन मनपाचे ढिसाळ कामकाज स्प्ष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलासाठी पुन्हा रांगा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्र सरकारने गरजूंना घरकुले मिळावीत यासाठी पंतप्रधान आवास योजनेखाली नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शहरात असलेल्या महा ई-सेवा केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल १५ हजारांहून अधिक नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महा ई-सेवा केंद्रांवर नोंदणी केली होती. परंतु, महा ई-सेवा केंद्रांवर नोंदणी केलेल्यांना महापालिकेत नावनोंदणी करण्याबाबत कळविण्यात आल्याने गुरुवारी पुन्हा महिला व पुरुषांच्या लांबच लांब रांगा महापालिका कार्यालयांत लागल्या होत्या.

शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेची महापालिकेत नोंदणी करणे सक्तीचे असल्याने पुन्हा नव्याने अर्ज भरण्यात येत असल्याचे यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यात मात्र सर्वसामान्य जनतेवरच दिवसभर रांगेत उभे राहून गैरसोय सहन करण्याची वेळ आल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने गरजूंनी नोंदणी करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर शहरातील अनेक महा ई-सेवा केंद्रांवर महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. नोंदणी करताना गर्दी होत असल्याने अखेर महापालिकेने महा ई-सेवा केंद्रे काही दिवस बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला होता. त्यातच सायबर कॅफेचालकांकडूनदेखील पंतप्रधान आवास योजनेचे ऑनलाइन अर्ज अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन भरण्यातही आले होते. महा ई-सेवा केंद्रचालक पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरत असतानाच महापालिकेनेदेखील सहा विभागांत शहरी भागातील अर्ज विक्रीसाठी ठेवले होते. अगोदरच महा ई-सेवा केंद्रात १५ हजारांहून अधिक गरजूंनी पंतप्रधान आवास योजनेची नोंदणी केली होती. त्यातच पुन्हा महापालिकेतदेखील हजारोंनी अर्ज दाखल झाले होते. आता पुन्हा महा ई-सेवा केंद्रांत नोंदणी केलेल्यांना महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरणे सक्तीचे केल्याने सर्वसामान्यांवर पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान आवास योजनेबाबत अगोदरच व्यवस्थित माहिती दिली न गेल्याने अनेकांना त्याचा फटका बसला.

--

भविष्यात वाढणार गुंता

एकाच व्यक्तीने महा ई-सेवा केंद्र व महापालिकेत नोंदणी केल्याने त्याचाही गुंता भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यांची महापालिकेतून अर्ज घेण्यासाठी महापालिकेच्या सर्वच विभागीय कार्यालयांत मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंट्रोल रूमवरही ठेकेदारांचा ताबा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील घंटागाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी जीपीएस यंत्रणेसह कंट्रोल रूम पालिका मुख्यालयात तयार करण्यात आला आहे. पालिकेच्या या कंट्रोल रूमवर मात्र घंटागाडी ठेकेदारांचा ताबा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जीपीएस यंत्रणेच्या उपयोगितेबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. स्थायी समितीच्या सभेत खुद्द आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच माहिती देऊन कंट्रोल रूमचे रहस्य उघड केले आहे. त्यामुळे घंटागाडी ठेकेदारांचे पालिका करत असलेल्या लाडाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या घंडागाडी ठेक्यामागील वादाचे शुल्ककाष्ट संपत नसून, वाद आणि घंटागाडी शब्द आता समानार्थी झाला आहे. वेळेवर घंटागाडी न येणे, कचऱ्याऐवजी दगडमाती भरून वजन वाढविणे, नादुरुस्ती, ठेकेदारांची अरेरावी, कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न देणे यामुळे घंटागाडीचा ठेका बदनाम झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी नव्याने करार करताना घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. घंटागाडीचे मार्ग निश्चित करत ठराविक वेळेत घंटागाडी निश्‍चित ठिकाणी न पोहोचल्यास ठेकेदारांना दंड करण्याचीदेखील तरतूद आहे. कचरा डेपोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून घंटागाडीच्या कामात पारदर्शकता आणण्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला. त्यासाठी महापालिका मुख्यालयात कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात आधुनिक यंत्रणा बसविली असताना त्यावर काम करण्यासाठी महापालिकेचेच कर्मचारी कार्यरत असणे अपेक्षित असताना त्या यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांमार्फतच होत असल्याचे आज स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले. खुद्द आरोग्य अधिकाऱ्यांनीच याबाबत कबुली देऊन घंटागाडीच्या कारभारात पारदर्शकतेचा दावा फोल ठरविला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या गैरकारभाराचे पितळ उघड झाले आहे. दरम्यान, ठेकेदाराचे दोन कर्मचारी आणि पालिकेचे दोन कर्मचारी कार्यरत असल्याची सारवासारव आता अधिकाऱ्यांनी केली आहे.

वर्गीकरणावरून वाद

घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याची व्यवस्था अजूनही नसल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवीण तिदमे आणि भाजपच्या अलका आहेर यांनी केला आहे. या संदर्भातील पुरावेच दोघांनी स्थायीत सादर केले. आयुक्त आणि महापौरांनी कचरा वर्गीकरणासंदर्भात वारंवार प्रशासनाला आदेशित केले, तरीही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. आरोग्य विभागाला काम करायचे नसेल तर आम्हाला सांगा, असा सज्जड इशाराच सदस्यांनी दिल्याने वर्गीकरणाचा वाद पुन्हा उफाळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त, महागाईचा संभ्रम

$
0
0

टीम मटा

देशाच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरू पाहणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) अवघ्या काही तासांनी (दि. १ जुलै) लागू होणार आहे. हा दिवस तसा भारतीयांसाठी ऐतिहासिकच म्हणावा लागेल. ही कर प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर तयारी केली असली, तरी व्यावसायिक, व्यापारी अशा वर्गांसह सामान्य जनतेत त्याबाबत संभ्रम आणि उत्सुकता आहे. नव्या कररचनेमुळे नेमके काय महागणार आणि काय स्वस्त होणार, नेमक्या कुठल्या वस्तूंवर किती कर लागणार, सामान्यांना फायदा होईल की तोटा, जीएसटी प्रणाली लगेचच पूर्ण क्षमतेने अस्तित्वात येईल का, याबाबतही संभ्रम आहे. नाशिकमधील तज्ज्ञ आणि व्यावसायिक चित्रही यापेक्षा वेगळे नाही. काहींनी जीएसटीचे स्वागत केले आहे, तर काहींनी चक्क नाके मुरडत होऊ घातलेल्या महागाईवरून आगपाखड केली आहे.

--
- वातानुकूलित रेस्तराँवर १८ टक्के, तर पंचतारांकित रेस्तराँवर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी

- गोड केलेले एअरिएटेड तसेच विविध स्वादांचे पाणी यांवर ४० टक्क्यांपर्यंत कर

- हेअर ऑइल, टूथपेस्ट, साबण यांच्यावर १८ टक्के

- गूळ, तृणधान्ये, दूध यांसारखा कच्चा माल जीएसटीमुक्त

- आयुर्वेदिक उत्पादनांवर १२ टक्के कर

- होमकेअर उत्पादने व शाम्पू यांवर २८ टक्के कर

--

विमाधारक भरणार कर!

जीएसटी लागू झाल्यामुळे जीवन विमा, आरोग्य विमा व जनरल इन्शुरन्स यावर साधारण २.५ ते ३ टक्क्यांपर्यंत हा कर लागू होणार असल्याची माहिती आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम म्हणजे विमाधारकास हा कर भरावा लागेल. मात्र, त्यामुळे त्याच्या परिपक्वता ( मॅच्युरिटी ) लाभात त्या प्रमाणातील वाढ होणार नाही. परंतु, ही नवी कर प्रणाली राष्ट्रीय स्वरूपाची असल्याचे विमा व्यवसायावर त्याचा सुरुवात वगळता फारसा परिणाम होणार नाही, असे मला वाटते. मात्र, हे ग्राहकांना पटवून देताना कसरत करावी लागेल.

- एस. डी. निकम, विमा प्रतिनिधी

सराफ व्यावसायिक साशंक

सध्या सोन्यावर १.२ टक्के व्हॅट, १ टक्का एक्साइज, ०.५ टक्के एलबीटी असा एकूण २.७ टक्के कर होता. जीएसटी लागू झाल्यानंतर हा ३ टक्के असणार आहे. त्यात अजूनही काही तरतुदी आहेत. जीएसटीच्या बाबतीत सरकारी यंत्रणा कशाप्रकारे कामकाज करेल याविषयी साशंक आहोत. माहिती अपलोड करणे, इंटनेट, सर्व्हर डाउनलोड होणे यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. सराफ असोसिएशनची याबाबतची दोन ते तीन महिन्यांचा कालावधी मिळावा अशी, मागणी आहे. काही कमी-जास्त झाल्यास व्यावसायिकांना सांभाळून घेतले पाहिजे. चुका झाल्यास सरकारने लगेच आसूड घेऊन उभे राहू नये. ऑनलाइन प्रक्रिया करताना दहावी व बारावीच्या निकालानंतर प्रवेशप्रक्रियेच्या वेळी गोंधळ उडाला, तसे याबाबतीत व्हायला नको. संपूर्ण देशभरात ही ऑनलाइन प्रक्रिया उभी करताना ती सुरळीत राहील का, याविषयी साशंकता आहे.

- राजेंद्र ओढेकर, माजी अध्यक्ष, सराफ असोसिएशन

बांधकाम व्यवसायात सुसूत्रता

जीएसटीचा बांधकाम व्यवसाय व ग्राहकांवर फारसा परिणाम होणार नाही. उलट कार्यपद्धतीत सुसूत्रता येईल. ग्राहक, बांधकाम व्यावसायिक आणि सरकार अशा सर्वांनाच जीएसटीचा लाभ होईल. बांधकाम व्यवसायात जीसएसटी १२ टक्के आहे. मात्र, ग्राहकांवर त्याचा फारसा भार पडणार नाही. कारण, त्याचे इनुपट क्रेडिट मिळणार आहे. कराचे दायित्व साडेपाच टक्के होते व जीएसटीनंतरही जवळपास तेवढेच राहील. फक्त ते प्रोजेक्टच्या स्वरूपावर अवलंबून असेल. पूर्वी ग्राहकाने घर विकत घेतल्यानंतर बिल्डर साडेचार टक्के सर्व्हिस टॅक्स आणि एक टक्का व्हॅट आकारायचे. ग्राहकांतर्फे हे पैसे ते सरकारकडे जमा करायचे. आर्किटेक्ट, बांधकाम मटेरियल सप्लायर, कान्ट्रॅक्टर यांनाही सर्व्हिस टॅक्स द्यावा लागायचा. आता असे वेगळे अकौंटिंग राहणार नाही.

- तुषार संकलेचा, बांधकाम व्यावसायिक

इलेक्ट्रॉनिक्सबाबत संमिश्र स्थिती

टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत २ ते ३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज आहे. शिवाय इलेक्ट्रिकल इस्त्री, मिक्सर-ग्राइंडर्स आणि ज्युसर्स यांसारखी छोटी घरगुती उपकरणे एकाच जीएसटी स्लॅबमध्ये आल्याने महागण्याची चिन्हे आहेत. अशा वस्तूंवर पूर्वी २५ ते २६ टक्के असलेला कर आता, २८ टक्के होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्ष कर प्रणाली लागू झाल्यानंतरच सर्व संभ्रम दूर होतील.

- बालाजी चौरे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विक्रेता

पालक, विद्यार्थ्यांनो निर्धास्त राहा

शैक्षणिक साहित्य विक्रीवर जीएसटीचा काहीही परिणाम होणार नाही. कारण जीएसटी कर हा छापील किमतींवर आकारला जाणार नसून, तो त्या वस्तूच्या छापील किमतीमध्येच समाविष्ट केला जाणार आहे. सर्व प्रकारच्या छापील पुस्तकांवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लावण्यात आलेला नाही. मात्र, वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सिल या साहित्याला १२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. ड्राईंग कलर्सला १८ टक्के कर लागणार आहे. या टॅक्समुळे शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. पालक, विद्यार्थ्यांनी निर्धास्त राहावे.

- अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनर्स असोसिएशन

खेळांची साधने महागणार

जीएसटीचा फटका खेळाच्या साहित्यालाही बसणार असून, व्यायामाची व खेळांची साधने महागणार आहेत. व्यायाम व खेळाच्या साधनांचे वर्गीकरण चैनीच्या गोष्टीत केल्याने सामान्यांना झळ पोचणार आहे. एक हजार रुपयांच्या आतील किमतीच्या होजिअरी कपड्यांवर पूर्वी ५ टक्के टॅक्स लागत होत. आता तो ८ टक्के लागणार आहे. होजिअरीच्या ज्या वस्तूंची किंमत एक हजार रुपयांच्या पुढे आहे, अशा कपड्यांना १२ टक्के टॅक्स लागणार आहे. खेळाच्या साहित्यावर १२ टक्केच टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे. परंतु, योगा मॅट, डंबेल्स, लेझिम, घुंगरू काठी या वस्तूंचा समावेश चैनीच्या वस्तूंमध्ये केल्याने त्यांच्यावर २८ टक्के टॅक्स लागणार आहे. अॅथलेटिक्स खेळासाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्यावर २८ टक्के कर आकारणी करण्यात येणार आहे. अॅथलेटिक्स खेळासाठी येणारे खेळाडू हे ग्रामीण भागातून येत असतात. महागडे साहित्य घ्यायला त्यांना परवडत नाही. एकच शूज दोघेमिळून वापरतात. पोलिस भरतीसाठी जाणारे खेळाडूदेखील एकच साहित्य दोघेमिळून वापरतात. अशा खेळाडूंचे मात्र हाल होणार आहेत. प्रत्येक खेळाला वेगळा कर आकारला गेला आहे. खेळाच्या करात सुसूत्रता येणे आवश्यक आहे. सर्व साधनांना एकच कर आकारणी व्हायला पाहिजे. खेळ ही अत्यावश्यक बाब असल्यामुळे कर कमी असावेत.

- अनंत जोशी, संचालक साई स्पोर्टस

छापील किमतीबाबत सामान्यांना मिळणार दिलासा

कारखान्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या स्टील, प्लास्टिकच्या वस्तूंवर अवाजावी किमती दिलेल्या असतात. मात्र, आता प्रत्यक्ष उत्पादन केलेल्या मालाच्या किमतीवर जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन केलेल्या मालाची किंमत मुळातच कमी होणार आहे. त्याचा सर्वसामान्यांना दिलासाच मिळणार आहे. आतापर्यंत होणारी ग्राहकांची फसवणूक यामुळे निश्चितच टळू शकणार आहे. मात्र, आता यासंदर्भातील अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने केली जाते, हे महत्त्वाचे ठरेल.

- आबा देवरे, ग्राहक


पादत्राणे व्यावसायिकांत संभ्रम

जीएसटीविषयी अचूक माहिती उपलब्ध होणे, पुरेस प्रबोधन होणे आवश्यक आहे, तरच त्याची उपयुक्तता कळेल.पादत्राणांवर आधीचा कर १२.५ टक्के होता, तो नव्याने १८.५ टक्क्यांवर जाणार आहे. आधीच्या करापेक्षा ५ ते ६ टक्के वाढीव कर द्यावा लागणार असला, तरी ५०० रुपयांपर्यंतच्या विक्रीला करात चांगली सवलत मिळणार असल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, ५१० रुपयांचा माल विकला, तर अधिक कराचा बोजा, हे धोरण अन्यायकारक वाटते. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळणे व्यावसायिकांसाठी गरजेचे असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने मूल्यमापन करता येईल.

- सलीम शेख, पादत्राणे व्यावसायिक

अवजारांमुळे शेतकऱ्यांवर पडणार बोजा

केंद्र सरकारने ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या कृषी अवजारांवर १२ टक्के कर लावला आहे. जीएसटीपूर्वी सहा टक्के कर होता. मात्र, नवीन कर प्रणालीत तो १२ टक्के केल्याने हा बोजा शेतकरीवर्गावर पडणार आहे. परिणामी शेतकरीवर्गात नाराजीची भावना आहे. मात्र, बैलजोडी अथवा हाताने वापरावयाची साधने जीएसटीमधून वगळली आहेत, ही समाधनाची बाब आहे. एकंदरीतच शेतकरीबांधवांसाठी कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

- यशवंत अमृतकर, कृषी अवजारे व्यावसायिक

कर चुकवेगिरीला बसणार आळा

जीएसटीमुळे कर क्षेत्रात पारदर्शकता येईल. आजवर होत असलेल्या व्यापार, उद्योग, व्यवहारांत मोठा बदल होईल. आपल्या देशात मोठ्या प्रमाणत कर चुकवेगिरी होते. त्याला आळा घालण्यासाठी जीएसटी महत्त्वपूर्ण ठरेल. दप्तर, पर्स, बॅग व्यवसायाला प्रारंभी याचा फटका बसू शकतो, हे खरे आहे. कारण, सध्या या वस्तूंवर ६ ते १४ टक्के कर आकाराला जातो. जीएसटी लागू झाल्यावर मात्र तो २८ टक्के असेल. अर्थात, सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केले आहेत. त्यामुळे महागाई कमी होऊ शकेल. कर व्यवस्थेत सुसूत्रता, पारदर्शकता येण्यासाठी जीएसटी उपयुक्त ठरू शकेल.

- दिलीप सोनग्रा, दप्तर, बॅगविक्रेते

हार्डवेअर व्यवसायाला ठरणार पूरक

थेट ग्राहकांपेक्षा बिल्डर व कॉन्ट्रॅक्टर हेच हार्डवेअर मटेरियलची खरेदी करताना दिसतात. त्यात अधिकाधिक व्यवहार चेक पेमेंटद्वारे होत असतात. प्रत्यक्ष बिल देताना पक्के बिल द्यावे लागते. त्यामुळे सर्व कर लावले जातातच. जीएसटीमुळे व्यवसायावर फारसा परिणाम होणार नसला, तरी सरकारला वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये कर द्यावा लागत होता. आता हा कर एकाच ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चक्कर मारणे कमी होईल. हार्डवेअरसाठी आधी १३.५ टक्के कर दिला जात होता. आता तो २८ टक्के लागणार आहे. त्यामुळे तो फायद्याचाच असणार आहे आणि शासनाला आपण तो देणार असल्याने त्याचे लाभही आपल्यालाच विविध योजना व सरकारी सुविधांमार्फत मिळणार आहेत.

- उमेदभाई गड्डा, हार्डवेअर व्यावसायिक

प्लंबिंग व्यवसायावरील ताण घटणार

प्लंबिंग साहित्यामधील विक्रीवरील कर पूर्वीपेक्षा एक ते दीड टक्क्याने कमी होणार असला, तरी तांत्रिक बाबी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत अडचण जाणवू शकते. याआधी प्रत्येक ग्राहकाला मालविक्री करताना ६ टक्के व्हॅट व १२. ५ टक्के एक्साइज कर भरणा करावा लागत होता. त्यावर २ टक्के सीएसटी कर. आता मात्र ९ टक्के सीजीएसटी व ९ टक्के एसजीएसटी असा एकूण १८ टक्के कर भरणा करावा लागणार आहे. परिणामी व्यवसायावर कोणताही ताण येणार नसला, तरी ग्राहकांना तसे समजावून सांगण्यात बराच वेळ खर्ची करावा लागणार आहे.

- आनंद चोपडा, प्लंबिंग व्यावसायिक

छोट्या स्वरूपातील कपडे व्यापाऱ्यांना दिलासा

जीएसटीत व्यापाऱ्यांसाठी दोन स्कीम आहेत. वीस लाख रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना केवळ पाच टक्के कर असून,

त्यापुढील ७५ लाखांपर्यंतच्या वार्षिक उलाढालीवर १८ टक्के कर राहणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांची जास्त करातून सुटका झाल्याने वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. किमती कमी झाल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. फिरते चलन वाढून बाजारातील चलन तुटवडा भरून निघेल. कररचनेत सुटसुटीतपणा येऊन वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. त्यामुळे छोट्या स्वरूपातील कपडे व्यापारीबांधवांना जीएसटी पायेदशीर ठरणार असून, मोठ्या स्वरूपातील व्यापारीबांधवांना मात्र काहीशी समस्य निर्माण होण्याची स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. अंमलबजावणीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.

- प्रभाकर बडगुजर, रेडीमेड कपडे व्यापारी

काळा पैसा वाढणार

क्रेडिट कार्डच्या वापारावरील सर्व्हिस टॅक्स १५ वरून १८ टक्के करण्यात आला. पुढील महिन्यांपासून हा दर लागू होईल. यापूर्वी तो ११ वरून १५ टक्के करण्यात आला होता. गत दोन ते तीन वर्षांत सर्व्हिस टॅक्समध्ये किमान आठ टक्के वाढ झाली. एकीकडे ऑनलाइन व्यवहारांना चालना द्यायची आणि दुसरीकडे टॅक्स वाढवयचा, असे दुहेरी काम सरकारकडून सुरू आहे. सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ झाल्यानंतर नागरिक पुन्हा कॅश व्यवहारांकडे वळतील. वस्तूंवर टॅक्स द्यायचा आणि वस्तू कार्डवर खरेदी केली म्हणून सर्व्हिस टॅक्स द्यायचा, ही तर सरळ लुटच म्हणावी लागेल. ऑनलाइन व्यवहारांमुळे पारदर्शकता येते. सरकारसाठी ते सोयीचे असताना सर्व्हिस टॅक्स वाढविण्यात आला. यामुळे पुन्हा नगदी व्यवहार तेजीत येऊन काळा पैसा वाढू शकतो.

- अमोल शिंदे, नागरिक

संगीत क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम नाही

नाशिक ही सांस्कृतिक भूमी असल्याने येथे रसिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तानसेन नाही, तर कानसेन तर बनूया, अशा भावनेतून लोक संगीताची मोठ्या प्रमाणात सेवा करताना दिसतात. नाशकात संगीत वाद्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी वाद्यांवर १३.५० टक्के इतका कर होता. आता तो २८ टक्के राहणार आहे. वाद्यांच्या किमतीत किती फरक पडतो, यावर त्याचे होणारे परिणाम अवलंबून राहणार आहेत. तरीही माझ्या अनुभवानुसार याचा फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे वाटते.

- केतन छत्रिसा, संचालक, वाद्य सूरसंगम

व्यवसायात सुटसुटीतपणा येईल

नव्या कर प्रणालीमुळे छोट्या वस्तूंवरील टॅक्स वाढणार आहे. सध्या रेनकोट आणि छत्री यांची असणारी किंमत जीएसटीमुळे वाढणार आहे. सध्या रेनकोट, छत्रीवर ६ टक्के कर आकारला जातो. मात्र, हा दर दुप्पट किंवा तिप्पट म्हणजे १२ ते १८ टक्के वाढणार आहे. ही करप्रणाली समजायला अवघड असली आणि टॅक्सची टक्केवारी वाढणार असली तरी पारदर्शक व्यवहारांकरिता हा निर्णय हितकारक आहे. व्यावसायिकांना ही करप्रणाली समजून घेण्यास अवघड जाईल पण एकदा सवय झाल्यावर हे सगळं सोपं होणार आहे. अपडेटेड व्यवसायासाठी जीएसटी लाभदायक आहे. नोटबंदीचा निर्णय झाल्यावर काही दिवस त्रास सहन करावा लागला, तसा कदाचित काही दिवस जीएसटीनंतर त्रास होऊ शकतो. पण यामुळे छोट्या व्यासायिकांपासून बड्या व्यवसायिकांपर्यंत सर्वांच्या कारभारात सुटसुटीतपणा येईल.

- संदीप मानकर, व्यावसायिक, मानकर बॅग हाऊस

मोबाइलसाठी उपयोगी करप्रणाली

जीएसटीमुळे मोबाइलवरील कर दीड टक्क्याने कमी होणार आहे. अगोदर त्यावर १३.५ टक्के व्हॅट लावला जात होता. पण, आता १२ टक्के कर लागणार आहे. त्यामुळे किमती कमी होतील. कॉम्प्युटरवर मात्र आता ६ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर लागणार आहे. त्यामुळे त्याच्या किमती वाढणार आहेत. पुढील काळात कॉम्प्युटरवरही हा कर कमी होईल, अशी अपेक्षा करूया. या एकाच करामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. भविष्यात ही कर पद्धती सर्वांच्या दृष्टीने उपयोगीच ठरणार आहे. अगोदर थोडा त्रास झाला, तरी त्यानंतर त्याचा

फायदाच आहे.

- तुषार शहाणे, मोबाइल विक्रेते

स्टीलच्या भांडी खरेदीत सुलभता

स्टीलच्या भांडे उत्पादक कारखान्यांकडून बऱ्याच वस्तूंवर अव्वाच्या सव्वा किमती टाकल्या जात असतात. त्यामुळे ग्राहकांकडूनदेखील भांडी घेताना घासाघीस केली जाते. जीएसटी लागू झाल्यावर याला निश्चितच आळा बसणार आहे. उत्पादन केलेल्या वस्तूंवरच तत्काळ कर लागू होणार असल्याचे त्याचा फायदा सर्वासामान्य ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे अशा भांडे खरेदीत ग्राहकांचा फायदा होणार असला, तरी नेमके चित्र लवकरच स्पष्ट होईल.

- पारस दगडे, संचालक, सुमित स्टील सेंटर

ट्रान्स्पोर्ट व्यवसायासंदर्भात भूमिकाच नाही

केंद्र शासनाने ट्रान्स्पोर्टसंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याने मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. अद्यापही कोणतीही भाडेवाढ नसली, तरीही ती अटळ असून, परिणामी महागाईत वाढ होणारच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने तशी मानसिकता ठेवावी. वास्तविक देशभरातील सर्वच वस्तूंच्या दरांवर मोठा प्रभाव टाकणारा ट्रान्स्पोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. मात्र, त्याबाबत फारसा विचार झाल्याचे दिसत नाही.

- विलास दंडगव्हाळ, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक

प्रिंटिंग व्यवसायासाठी सुलभ

जीएसटीमुळे प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायाला एका चाकोरीत काम करता येईल. शासनाने एक करप्रणाली लागू केल्याने व्यवसायात सुलभता येईल. प्रिंटिंग व्यवसायासाठी लागणारे पेपर, इंक व अन्य घटक यांच्या रेटवर हा व्यवसाय अवलंबून असल्याने त्यावर आजच काही सांगता येणार नाही. जीएसटी लागू होणारच आहे, तेव्हा जे नियमानुसार असेल ते होईल. यासंदर्भात आमची तयारी आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा फायदा होणे हे महत्त्वाचे असून, या कर प्रणालीमुळे किमान आमच्या व्यवसायातून तरी सरकारचा हा उद्देश सफल होईल, असे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.

- उमेश सोनवणे, प्रिंटिंग व्यावसायिक

फर्निचर उत्पादकांवर वाढणार करांचे ओझे

फर्निचरच्या किमतीमध्ये सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादनावर लागू होणारा २८ टक्के कर, अधिक नफ्यावर लागू होणारा २८ टक्के कर, अधिक इन्कम टॅक्स अशी गोळाबेरीज केल्यास फर्निचर उत्पादनांची किंमत वाढून जवळपास एकूण ६० टक्क्यांंपेक्षाही अधिक कर फर्निचर व्यावसायिकांकडून वसूल केला जाईल. त्यामुळे किंमत २० ते ३० टक्क्यांंनी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- मनीष हरियाणी, फर्निचर उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images