Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लग्नात बादशाही थाळीचा ट्रेंड

0
0
‘अमक्याचे लग्न कसे झाले हो’, ‘लग्न चांगले झाले पण केटरींग काही बरोबर नव्हते’ अशी टोचणी ऐकावी लागू नये यासाठी वधु-वराचे पालक सजग असतात. सध्या नाशिकमध्ये बादशाही कॅटरिंगचा ट्रेंड बहरात आला असून या थाळीची किंमत सातशेपासून पंधराशे रुपयांपर्यंत असल्याचे कॅटरर्सचे म्हणणे आहे.

शाळेची सहल विमानातून

0
0
आता डिसेंबर सुरू झाला असून, शाळांमध्ये गॅदरिंगसह सहलींचे बेत आखले जात आहेत. सहलीच्या आठवणी पुस्तकातील ‘पिंपळपान’ किंवा मोरपिसासारख्या अलगद मनामध्ये जपून राहाव्यात, असेच प्रत्येकाला वाटत असते. हेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी दौलताबादच्या एका शाळेतील विद्यार्थी यंदा दिल्लीच्या सहलीवर जात आहेत आणि तेही थेट विमानातून.

‌बागलाणमध्येही शिवसेनेत खांदेपालट

0
0
शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या फेरबदलानंतर बागलाणमध्येही थेट मातोश्रीवरुन खांदेपालटाचा आदेश आला आहे. या बदलात तालुका प्रमुख पदावरुन अॅड. वसंतराव सोनवणे यांना डच्चू देण्यात आला असून, त्या पदावर ताहाराबादचे शिवसैनिक सुभाष नंदन यांची वर्णी लागली आहे.

वन वे, वाहनतळ निर्माण करण्याची मागणी

0
0
बेशिस्त वाहतूकदारांना चाप लावण्यासाठी वन वे व वाहनतळ निर्माण करण्याची मागणी रिपब्ल‌िकन पक्षाने पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कांद्याच्या राखणीसाठी शेतात बिछाना

0
0
एकीकडे कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले असताना, हा महागडा कांदा सांभाळायचा असा, हा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या राखणीसाठी चक्क शेतातच बिछाना केला असून, डोळ्यात तेल घालून राखण केली जात आहे.

CBSE ची परीक्षा अध‌िक पारदर्शक होणार

0
0
परीक्षांमध्ये अध‌िक पारदर्शकता यावी यासाठी सीबीएसई बोर्डातर्फे नवे पोर्टल तयार करण्यात आले आहे. अगोदरच्या पध्दतीत शाळांना प्रश्नपत्र‌िका संचाची सीडी देण्यात येत होती. आता मात्र परीक्षेच्या अगोदर सीबीएसईच्या शाळांना प्रश्नसंच निवडीचे ऑनलाइन पर्याय उपलब्ध होणार आहेत.

महसूलची जबाबदारी झटकली

0
0
सिन्नर तालुक्यातील टँकर घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा बचाव करीत याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

कपालेश्वराच्या गुरवांकडून तहसीलदार तोंडघशी

0
0
कपालेश्वर मंदिराच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विश्वस्त आणि गुरव यांची एकत्र बैठक घेण्याबाबत कुठलाही संपर्क साधण्यात आला नसल्याचा दावा गुरवांनी केला आहे. यामुळे नाशिक तहसीलदार तोंडघशी पडले आहेत.

अब तक ‘४१०’

0
0
गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या सातपूर-अंबड लिंकरोडस्थित भंगार बाजारातील अनधिकृत दुकांनाची मोजणी अंतिम टप्प्यात असून, सोमवार अखेर ४१० दुकांनावर मार्किंग करण्यात आली आहे. भंगार बाजारातील अनधिकृत दुकाने हटविण्याबाबत हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून अशा दुकांनावर मार्किंग करण्यात येत आहे.

‘बँक बचाव’साठी ४ महिन्यांचा कालावधी

0
0
बुडीत निघालेल्या बँकांच्या संचालकांवरील जबाबदारी येत्या चार महिन्यांत निश्चित करण्याचे तसेच, कर्ज न फेडणाऱ्यांची नावे तसेच फोटो प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिक जिल्हा ठेवीदार कृती समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

..अन् ट्रान्सलेटर आलेच नाहीत!

0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेत परिक्षार्थींनी अजब अनुभव घेतला. अर्थशास्त्र विषयाच्या व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त‌िसऱ्या पेपरमध्ये सुमारे सहा इंग्रजी प्रश्नांचा सामना करावा लागला. परीक्षा न‌ियंत्रकांनी आश्वासन देऊनही परीक्षा होईपर्यंत ट्रान्सलेटर आलेच नाहीत.

दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून

0
0
पतीनेच दारूच्या नशेमध्ये पत्नीच्या डोक्यात दगड घालून त‌िचा खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोल‌िसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

त्र्यंबकचा प्रश्न ग्रीन ट्रिब्युनलमध्ये

0
0
त्र्यंबकेश्वर शहरातील गोदावरी नदीची भयावह परिस्थिती लक्षात घेऊन याप्रश्नी पुण्यातील ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने घेतला आहे. त्यामुळे गोदावरीच्या सद्यस्थितीस जबाबदार असलेल्यांना आगामी काळात धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त NA : २ कर्मचारी निलंबित

0
0
बिनशेती परवान्यासंदर्भात वादग्रस्त कामकाज केल्याप्रकरणी नाशिकचे तत्कालिन प्रांत विनय गोसावी यांच्यानंतर प्रांत कार्यालयातील दोघा अव्वल कारकुनांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कांदा चारशे रुपयांनी घसरला

0
0
सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे लाल कांद्याचे भाव सोमवारी चारशे रुपयांनी कोसळले. शुक्रवारी प्रतिक्विंटल ३,८०० विकला गेलेल्या कांद्याचे भाव १,६०० रुपयांपर्यंत कोसळले. पंधरा दिवसांपूर्वी लाल कांदा प्रतिक्विंटल ३,८०० रुपयांपर्यंत विकला गेला.

भारतीय कुटुंब व्यवस्थेवर पाश्चात्यांचे आक्रमण

0
0
मागील पंचवीस वर्षांत सगळ्याच क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल झाले आहेत. आधुनिक साधने आणि पाश्चात्य संस्कृतीने भारतातील आदर्श कुटुंब व्यवस्थेवर घाला घातला आहे. तरुणांमधील वाढत चाललेल्या चंगळवादी आणि भौतिकवादी जीवनात पैसा सर्वात महत्त्वाचा झाला असून, प्रत्येक जण पैशांच्या मागे बेलगाम धावत आहे.

बिटको कॉलेजवर 'भाविसे'चा मोर्चा

0
0
प्रसाधनगृहाची दुरवस्था, पाण्याच्या टाकीतील अस्वच्छता दूर करण्यासह कॉलेज परिसरात नियमित साफसफाई राबविण्याच्या मागणीने भारतीय विद्यार्थी सेना कार्यकर्त्यांनी बिटको कॉलेज परिसर दणाणून सोडला.

शिक्षणपध्दती सुधारण्यासाठी लढा

0
0
‘सध्याची शिक्षणपध्दती कालबाह्य होत असल्याने कार्यकर्त्यांनी शिक्षणपध्दती सुधारण्यासाठी सतत लढा द्यावा.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केले.

आत्मप्रेरणेने शिस्तीचा स्वीकार

0
0
‘विद्यार्थ्यांनी आत्मप्रेरणेने शिस्त आचरणात आणण्याची गरज आहे. आई-वडिलांशी मनमोकळा संवाद साधा. त्यांच्या अपेक्षांचा आव्हान म्हणून स्वीकार करा, चांगुलपणाचा शोध घ्या,’ असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक व साहित्यिक नरेश महाजन यांनी केले.

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग रेल्वेमंत्र्यांना साकडे

0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे विषयक समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण तसेच इतर समस्यांसाठी त्यांना साकडे घातले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images