Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लासलगाव कृउबातील व्यवहार ठप्पच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकरी संपाच्या सलग पाचव्या दिवशी लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समिती बंद असल्याने जवळपास ५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज २४०० ते २५०० वाहनातून सुमारे ५० हजार क्विंटलच्या आसपास कांद्याची आवक होत होती. मात्र, गुरुवार (दि. १ जून)पासून शेतकऱ्यांनी संप केल्याने कांद्याचे लिलाव बंद असल्याने व्यापारी व मजूर हे शांत बसून आहेत.

सध्या कांद्याला किरकोळ बाजारात किलोला १० ते १५ रुपये भाव आहे. मात्र संप असाच सुरू राहिला आणि कांद्याची आवक झाली नाही तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. यामुळे संतप्त शेतकरी आणि कांद्याची भाववाढ झाल्यास ग्राहक अशा दोन्ही घटकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लासलगाव बाजार समितीत रोज भरणारा धान्य बाजारही बंद असल्याने त्यांचेही भाव भडकण्याची चिन्हे आहेत. उपबाजार आवार निफाड, पिंपळगाव बाजार समितीचे उपबाजार आवार सायखेडा, पालखेड हेही बंदच असल्याने या ठिकाणी काम करणारे मजूर, हमाल, मापारी यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कडवा पाणी योजनेला गती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेली कडवा पाणी योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. योजनेसाठी कमी पडत असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांपैकी ३२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात नगरपालिका पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे या योजनेतील अपूर्ण कामे मार्गी लागली असून, येत्या नोव्हेंबरपर्यंत ही योजना कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे.

कडवा पाणी योजनेचे निधीमुळे अपूर्ण असलेल्या इंटकवेलच्या मुख्य कामास गती मिळाली असून, पुलाचे अर्धवट कामही पूर्णत्वास गेले आहे. मार्च महिन्यात केंद्र व राज्य शासनाकडून २३ कोटी, १४ व्या वित्त आयोगातून पाच कोटी, तर नगरपालिकेकडून पडून असलेला विविध योजनांचा निधी, त्यावरील व्याजाचे ४.५० कोटी असे ३२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जमवण्यात आला आहे. कमी पडणारा सात कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने नाममात्र व्याजदराने उपलब्ध करून देण्याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यात चर्चा झाली आहे.

जलशुद्धीकरण केंद्राचे अर्धवट राहिलेले काम सुरू झाले असून, शुद्धीकरण यंत्र लवकरच बसवण्यात येणार आहेत. गत सत्ताधाऱ्यांनी ६२ कोटींच्या मंजूर किमतीहून अधिक २३.९२ टक्के जादादराने निविदा मंजूर करण्यात आल्याने योजनेचे किंमत ८२ कोटी ५६ लाखांवर पोहोचल्याने शासनाकडून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.

नुकसानीचे पंचनामे होणार

कडवा धरणापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १० किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीतून वाहिनी टाकताना शेतमालाचे नुकसान होणार असून, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना तलाठ्यांना केल्या असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक यांनी दिली.

इंटकवेलचे काम पूर्ण करण्याचे आव्हान

धरणातील मध्यभागी सुरू असलेले इंटकवेलचे मुख्य काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. पाऊस पडल्यास पुन्हा अडचण निर्माण होऊ नये यासाठी इंटकवेलच्या कामाला गती देण्यात आली आहे. याप्रसंगी नगरसेवक पंकज मोरे, गोविंद लोखंडे, रूपेश मुठे, बाळासाहेब उगले, सोमनाथ पावसे, मंगला शिंदे, ज्योती वामने, विजया बर्डे, गीता वरंदळ, प्रतिभा नरोटे, प्रभाकर गोळेसर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृह, गटनेत्यांचा ‘विस्तार’ खुंटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही भाजपने महापालिकेत भराभर निर्माण केलेल्या पदांचा भार आता प्रशासनाला सोसवेनासा झाला आहे. नव्याने निर्माण झालेल्या तीन विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतींना बसण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने प्रशासन पेचात पडले आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे गटनेते आणि सभागृह नेत्यांनी कार्यालयांचा अवाढव्य विस्तार केला असून, या कार्यालयांचेच विभाजन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सभागृह नेते दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरुस्कर यांच्याकडील कार्यालयांचे विभाजन करून तीन सभापतींची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. दरम्यान, नव्या सभापतींसह उपसभापतींनाही वाहने देण्याचा अट्टाहास भाजपकडून केला जात असल्याने प्रशासन पेचात सापडले आहे.

महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. त्यातच महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांना वेगवेगळी पदे देऊन त्यांचे पुनर्वसन केेले जात आहे. प्रभाग समित्यांसोबतच भाजपने आता विधी, शहर सुधार आणि आरोग्य अशा तीन नवीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात सभापती आणि उपसभापती राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेत या तीन नवीन सभापती व उपसभापतींना दालने उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. अगोदरच महापालिकेत कमी जागा असल्याने या नव्या पदाधिकाऱ्यांना कुठे जागा द्यायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधात असलेल्या शिवसेनेने पूर्ण एक एक लेन सांभाळली आहे. त्यात सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी मोठी दालने सांभाळली आहे. सभागृह नेते यांच्या दालनात पूर्वी विरोधी पक्षनेता आणि शिवसेना गटनेता बसत असे. आता मात्र सभागृह नेत्यांनी दोन्ही दालने एकत्र केली आहेत. गटनेत्यांनीही तशीच व्यवस्था केली आहे. त्यामुळे या तीन सभापतींना जागा कुठे द्यायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. या तीन सभापतींना सभागृह नेते आणि गटनेत्यांना दिलेल्या कार्यालयाचेच विभाजन करून जागा द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाकडून दिला जाणार आहे. महापौरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उपसभापतींसाठीही वाहने

दरम्यान, भाजपने सत्तेत येण्यापासून विकासकामांऐवजी पदाधिकाऱ्यांच्या पुनर्वसनावर भर दिला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असतानाही सभागृह नेत्यांसह तीन नवीन सभापतींसाठी नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत. त्यात आता या विषय समित्यांच्या उपसभापतींसाठीही वाहने खरेदी करावीत, असा प्रस्ताव एका पदाधिकाऱ्याने दिला आहे. त्यामुळे जवळपास दहाच्या वर नवीन वाहनांची खरेदी करावी लागणार आहे. डामाडोल आर्थिक परिस्थितीत उपसभापतींची वाहने कशी खरेदी करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


अधिकारी झालेत त्रस्त

भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेत दररोज नवनवी सत्तास्थाने निर्माण होत आहेत. महापौर उपमहापौरांपाठोपाठ स्थायी समिती सभापतींचा शब्द प्रमाण मानला जातो. परंतु, आता नव्याने सभागृह नेते आणि गटनेत्यांचे केंद्र तयार झाले आहे. सध्या या सर्वांकडूनच अधिकाऱ्यांना बोलावणे येत असल्याने अधिकारीच त्रस्त झाले आहेत. नेमका कुणाचा आदेश ऐकावा अशी स्थिती अधिकाऱ्यांची झाली आहे. प्रत्येक जणाकडून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अधिकाऱ्यांची मात्र कोंडी होताना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दोन स्पेशल’ नाटकाची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणसाच्या जगण्यातील व्यक्तिगत तत्त्वे आणि व्यावसायिक जीवनातील संघर्षाचा नाजूक टप्पा बोलका करणारे, संवेदनांना नकळत हात घालणारे ‘दोन स्पेशल’ हे नाटक शुक्रवारी (९ जून) खास ‘मटा’च्या वाचकांसाठी सादर होणार आहे. कल्चर क्लब सदस्यांसह सर्व रसिकांसाठी या नाटकाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

नाट्य व चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी-कणेकर यांची निर्मिती असलेल्या 'दोन स्पेशल' या नाटकात माणसाच्या व्यक्तिगत जीवनातील तत्वे आणि व्यावसायिक गरजा, यातील संघर्षाचे चित्रण पत्रकारितेतील स्थित्यंतराचे प्रातिनिधीक उदाहरण घेऊन मांडले आहे. घरातून संस्कार आणि ध्येयवाद घेऊन बाहेर पडणारी पिढी जेव्हा व्यावसायिक वर्तुळातील वास्तव स्वरूप अनुभवते, त्यावेळी मानवी जीवनातील संघर्षाचे वळण आणि त्याची तत्त्वे की व्यावसायिकता या प्रश्नाचे उत्तर शोधताना होणारी तारेवरची कसरत, या मुद्द्यांवर या नाटकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

ह. मो. मराठे यांच्या मूळ ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारीत हे नाटक आहे. महाकावी कालिदा कलामंदिरात शुक्रवारी (९ जून) रात्री ९.३० वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकात जितेंद्र जोशी, अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले आणि रोहीत हळदीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांसाठी ३०० रुपयांच्या एका तिकिटावर आणखी एक तिकीट मोफत देण्यात येणार आहे. तर जे नव्याने कल्चर क्लबचे सदस्य बनतील त्यांच्यासाठी एक कपल तिकीट मोफत देण्यात येणार आहे. ही तिक‌िटे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत ‘महाराष्ट्र टाइम्स’, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथे उपलब्ध असतील किंवा महाकवी कालिदास कलामंदिर येथेही तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध असतील. नाटक बघण्याची इच्छा आहे. मात्र, जे वाचक कल्चर क्लबचे सदस्य नाहीत, अशां वाचकांसाठी तिकीट बुकिंगची व्यवस्था कालिदास कलामंदिरात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहूर ग्रामस्थांचे जल आंदोलन सुरू

$
0
0

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावातील शेतकरी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन शेतकऱ्यांच्या संपादरम्यान बुधवारी (दि. ७) सकाळी तापी नदीत जल आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे जल आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील साहूर गावालगत असलेल्या तापी नदीत उभे राहून शेतकरी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत जल आंदोलनाला बुधवारी सुरुवात केली. जोपर्यंत आमच्या मागण्यांची सरकार दखल घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, ईश्वर वाकडे, विलास कोळी, लोटन दंगल, ज्ञानेश्वर कुंवर, शानाभाऊ शिरसाठ यांचा सहभाग आहे. बुधवारी उशीरापर्यंत हे आंदोलन सुरू असल्याची माहिती शानाभाऊ सोनवणे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याच्या ‘समृध्दी’ चा महामार्ग

$
0
0

- राधेशाम मोपलवार, उपाध्यक्ष, राज्य रस्ते विकास महामंडळ

कोणत्याही प्रकल्पासाठी भूसंपादनाचा विषय पुढे येतो तेव्हा त्याला विरोध होणारच ही काळ्या दगडावरची रेघ असते. आपल्या मालकीची जमीन सरकार नावाच्या व्यवस्थेच्या हाती का सुपूर्द करावी, असा विचार कुठलाही आम आदमी करणारच. तो रास्तही आहे. परंतु, आपण ही जमीन कशासाठी देत आहोत, त्यातून काय फलित मिळणार याचा प्रत्येकाने व्यक्त‌िगत पातळीवर अंतर्मुख होऊन विचार करायलाच हवा. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाच्या बाबतीत असा विचार सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी केला असता तर एव्हाना त्यांना योग्य मोबदला मिळून महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली असती. विरोधाला विरोधामुळे शेतकरी स्वत:च्याच पायावर धोंडा तर पाडून घेत नाहीत ना याचाही प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा. समृध्दी महामार्गासाठी जमिनीच्या मोजणीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना उशिरा का होईना या महामार्गाचे फायदे समजू लागल्याने ते जमिनी देण्यास तयार आहेत. चला तर मग महाराष्ट्राच्या, बळीराजाच्या विकासाची, त्याच्या उज्वल भविष्याची अन समृध्दीची पायाभरणी करूया.

प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या आण‌ि विविध क्षेत्रांमध्ये गरूड भरारी घेणाऱ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबापुरी आणि उपराजधानी अर्थात संत्रानगरी म्हणून परिचित असलेले नागपूर यांना वेगवान रस्त्याने जोडणारा रस्ता म्हणून समृध्दी महामार्ग विकसित करण्याचे स्वप्न राज्य सरकारने पाह‌िले आहे. रस्ते खऱ्या अर्थाने विकासाचे वाहक असतात याची ग्वाही देण्यास हा महामार्ग प्रेरक ठरेल असा विश्वास वाटतो.

चिरंतन ग्रामीण विकास, शेती व्यवसायाला मिळणारा नवा आयाम आणि नव-नवे उपप्रकल्प यांमुळे हे जिल्हे विकासाने उजळून निघणार आहेत. महामार्गामुळे कृषी विकासाला चालना मिळेलच शिवाय पर्यटनालाही नवे पंख लाभणार आहेत. राज्याच्या पूर्व भागाला राजधानी मुंबईशी अतिवेगवान मार्गाने जोडण्यासाठी तसेच या मार्गावरील संपूर्ण भागाचा सामाजिक-आर्थिक विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै २०१६ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प म्हणजे नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे (एनएमएससीई). ७०० किलोमीटर अंतराच्या या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील १० जिल्हे, २४ तालुके आणि ३९१ गावे जोडली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हा महामार्ग विकसित करणार असून त्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवासासाठीचा कालावधी सोळा तासांवरून सात ते आठ तासांवर येऊ शकणार आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्याचे मोठे भाग थेट आतंरराष्ट्रीय आयात निर्यातीचे केंद्र असणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी (जेएनपीटी) जोडले जाणार आहेत. शेतमालाच्या वाहतुकीचा कालावधी आणि खर्च वाढत असल्यानेच दर्जेदार मालालाही योग्य भाव मिळत नाही. परंतु, या महामार्गामुळे शेतमालासह अन्य उत्पादनांची वाहतूकही जलद गतीने होऊ शकणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी ४६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

इंजिनीअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन अशा ईपीसी मॉडेलद्वारे हा प्रकल्प उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी राज्य सरकार एकूण २० हजार ८२० हेक्टर जमीन अधिग्रहीत करणार आहे. त्यापैकी ३९९ हेक्टर वनजम‌िनी आहेत. काही जमिनी सरकारी मालकीच्या असून आवश्यक त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या जम‌िनी अधिग्रहीत कराव्या लागणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला देण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. शेतकरी त्यांची जमीन थेट विक्री करू शकतात किंवा लँड पूलिंग प्रक्रियेद्वारे या महामार्गाच्या उभारणीत ते सरकारचे भागीदार म्हणून सहभागी होऊ शकतात. परंतु शेतकऱ्यांना लँड पुलिंग पध्दती रूचत नसल्यास थेट खरेदीचा पर्याय सरकारकडे उपलब्ध आहे. जमीन खरेदी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या आश्वासनावर सरकार ठाम असून त्याच्या अंमलबजावणीसही बांधील आहे. हे पैसे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

संपादीत जमिनींना मोबदला देतांना कुणावर अन्याय होऊ नये किंवा जमिनीच्या मालकी हक्कानुसार प्रत्येकाला मोबदला मिळावा याची काळजी सरकार घेते आहे. प्रत्येक जिल्ह्यात शेतीचा मालक आणि त्या जमिनीच्या सीमा बघण्यासाठी अधिकाऱ्यांच्या वतीने जॉइंट मेजरमेंट सर्व्हे घेतला जातो आहे. नेमका मालक कोण हे ७/१२ दस्तऐवजावर नसल्याने हा सर्व्हे कायदेशीर तरतुदींनुसार केला जातो आहे. मालकी जाणून घेण्याशिवाय आवश्यक असलेल्या जमिनीवर कोणते पीक घेतले जात आहे आणि त्या जमिनीवर कोणते बांधकाम आहे याचीही पाहाणी सर्व्हेअंतर्गत प्राधान्याने केली जाते आहे. पाच महसूल विभागांमध्ये जॉइंट मेजरमेंट सर्व्हेचे ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी जमीन अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही ठिकाणी मोजणीला विरोध होतोय ही वस्तुस्थ‌िती आहे. परंतु या शेतकऱ्यांचे देखील मनपरिवर्तन होईल अशी आम्हाला खात्री आहे. उरलेली सर्व प्रक्रिया सप्टेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून १ ऑक्टोबर २०१७ पासून महामार्गाच्या प्रत्यक्ष निर्मितीचे काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला गतिमान विकासाच्या प्रक्रीयेशी जोडणारा आणि राज्याला समृध्दीचा साज चढविणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या विकासाचीही मुहुर्तमेढ रोवणार यात शंका नाही.

शेतकऱ्यांना नोट‌िसा बजावणे, सुनावणीसाठी बोलावणे या सर्व भानगडी शेतकऱ्यांनाही मनस्ताप देणाऱ्या ठरतात. म्हणूनच सरकारने या महामार्गासाठी जमिनी संपादीत करताना २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढीव मोबदला देण्याची तयारी ठेवली आहे. पूर्वीच्या प्रकल्पांना जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे परताव्याबाबतचे अनुभव वेदनादायी असू शकतात. त्यामुळेच सरकार नावाच्या व्यवस्थेवर ते सहजासहजी विश्वास टाकण्यास तयार नाहीत हे देखील समजू शकते. परंतु या प्रकल्पात शेतकऱ्यांना मोबदला प्राप्तीबाबत साशंकता राहू नये याची काळजी सरकार घेते आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि त्यांना काम सुरू करण्यापुर्वीच मोबदला देऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणूनच दहा जिल्ह्यांत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या एक हजार ५०० हून अधिक बैठका घेण्यात आल्या. या महामार्गामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे त्यांना समजावून सांगण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांचा विरोध हळूहळू मावळू लागला आहे.

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गामुळे पुण्याच्या विकासाला प्रचंड चालना मिळाली. पिंपरी चिंचवड शहर असो किंवा तळेगाव, चाकण सारख्या औद्योगिक वसाहती, हिंजवडी आयटी पार्क याचा शब्दश: कायापालट झाला. अनेक उद्योजकांनी येथे उद्योग स्थापनेस पसंती दिली. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या हजारो संधी निर्माण झाल्या. या महामार्गाच्या निर्मितीमध्ये राह‌िलेल्या त्रुटी कालांतराने लक्षात आल्या. नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग बनविताना अशा कोणत्याच त्रुटी राहणार नाहीत, याचीही पुरेपुर काळजी उभारणीपूर्वीच घेतली जाते आहे.

जिल्ह्यात येणार १५०० कोटी

नाशिक जिल्ह्यातून १०१ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांचे वडीलोपार्जित किंवा स्वकष्टाने कमावलेले क्षेत्र तसेच बागायती क्षेत्र जाते याचे दु:ख आम्ही समजू शकतो. म्हणूनच असे कमीत कमी क्षेत्र जावे असा आमचा प्रयत्न आहे. जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही. त्याचा मोबदला म्हणून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या हाती १२०० ते १५०० कोटी रुपये पडू शकणार आहेत. याचाच अर्थ एवढा पैसा नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होण्यास त्यामुळे मदत होईल. प्राप्त मोबदल्यातून शेतकऱ्यांना इतरत्र मोठे क्षेत्र खरेदी करण्याची संधी मिळेल. शेतकऱ्याचे कुटुंब वाढते तसे जमिनीचे वाटेकरी वाढतात. जमीन मात्र आहे तेवढीच राहाते. म्हणूनच शेतकऱ्यांची मुले नॉन फार्म अॅक्टीविटीजकडे वळायला हवीत. शेतीला पुरक व्यवसायांमध्ये नवीन पिढ्या जाणीवपूर्वक उतरविल्या तर त्यातून शेतकरी कुटुंबांना अर्थार्जनाचे नवीन मार्ग सापडू शकतात.

आहे त्या महामार्गाचे रुंदीकरण का नको?

नवीन महामार्ग बनविण्याऐवजी आहे त्याच महामार्गाचे रुंदीकरण करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आताचा रस्ता २४ ते ३० मीटरचा आहे. एक्सप्रेस महामार्ग किमान ९० ते १२० मीटरचा असायला हवा. आहे त्या महामार्गाचे रुंदीकरण केले तरी त्यामुळे गती वाढणार नाही. गती वाढविणे हाच नवीन महामार्गाचा मूळ उद्देश आहे. रुंदीकरण अधिक महागडे ठरेल हे देखील अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. रुंदीकरणासाठी आहे त्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी ४५ मीटर रस्ता घ्यावा लागेल. या महामार्गावरील ह्युमन डिस्प्लेसमेंट अधिक त्रासदायक ठरेल. त्यावरच अधिक पैसे खर्च करावे लागतील. आपल्याकडे सध्याच्या मार्गाने माल वाहतुकीला किमान ३६ तासांचा कालावधी लागतो. परंतु या महामार्गामुळे जास्तीत जास्त १२ तासात माल जेनपीटीपर्यंत पोहाचणार आहे. जुन्या रस्त्यावर १८४ ठिकाणी बायपास द्यावे लागणार होते. पाण्याचा स्त्रोत असलेल्या विह‌िरी या महामार्गात येत असल्या तरी त्या बुजविण्यात येणार नाहीत. या विह‌िरींना कॅपिंग करण्यात येणार असून विहीरींमधील पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. पाइपलाइनद्वारे विहीरींमधील पाणी काढता येणार असून त्यासाठी दोन्ही बाजूला डक्ट सोडण्यात येणार आहे. महामार्गात अशा १७१ विहीरी येणार असून त्यांना धक्कासुध्दा लावला जाणार नाही. मार्गावर प्रत्येक ४० ते ४४ किलोमीटरवर लॉज‌िस्टीक हब तयार करण्यात येणार आहेत. गोदामे असली तर माल सुरक्षित ठेवता येतो. कोल्ड स्टोअरेजेस, वेअर हाऊसिंग, फुड प्रोसेसिंग यांसारख्या पूरक गोष्टींमुळे विकासाला चालना मिळेल.

नवनगरांत रोजगाराच्या हजारो संधी

या महामार्गावर २४ ठिकाणी नवनगरे विकसित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नवनगरात किमान ३० हजार ११० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. या महामार्गामुळे राज्यात पाच लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. येथे सरकारी जमिनींवर फायर ब्र‌िगेड, पोलिस स्टेशन, हॉस्प‌िटल्स यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानिक रहिवाशांनाच त्याचा लाभ मिळणार आहे.

नाशिकची समृद्धी

या महामार्गामुळे नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवा वेग मिळणार आहे. नवीन आणि चांगली ‘कनेक्टिव्हिटी’ या जिल्ह्याला मिळेल. त्यामुळे शेतमाल, औद्योगिक उत्पादन आणि इतर कोणताही माल राज्यातील कोणत्याही भागात कमी वेळेत पोहोचव‌िता येईल. शिवाय नाशिक जिल्ह्यात कृषी समृद्धी केंद्रही उभारले जाणार आहेत. हे केंद्र जिल्ह्यातील शेती आणि शेतीशी निगडीत कामांना नवे बूस्ट देणारे ठरेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. या महामार्गाद्वारे शेतक-यांना विकासाच्या मार्गावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेलच शिवाय शेती व्यवसाय करणेही फायद्याचे ठरेल. केवळ अल्पकालिन फायदा न होता या भागातील शेतकऱ्यांचा आणि गावांचा चिरंतन विकास होत राहावा, हा यामागचा हेतू आहे. मुंबईत कायद्याने उद्योग सुरू करता येत नाही. बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, तळोजा, बोईसर, महाड, रोहा, बेलापूर येथे उद्योगांसाठी जमिनी शिल्लक नाहीत. पुण्यामध्येही सुप्यापर्यंत उद्योग पोहाचले आहेत. त्यामुळे आता उद्योगवाढीसाठी नाशिक हाच सर्वात्तम पर्याय ठरणार आहे. पुण्यातील चाकण आणि तळेगाव दाभाडे एमआयडीसीप्रमाणे नाशिकमध्ये मुसळगाव एमआयडीसी वेगाने विकसित होऊ शकणार आहे.

पर्यटनवाढीला मिळेल चालना

या महामार्गामुळे १६ तासांचा प्रवास आठ तासांत करणे शक्य होणार आहे. ताशी १५० किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील. मुंबई ते शिर्डी हा प्रवास अवघ्या दीड ते पावणे दोन तासांत होऊ शकणार आहे. लोणावळ्याला तेवढाच भरभक्कम पर्याय म्हणून आता इगतपुरी या निसर्गरम्य तालुक्याकडे पाहीले जाऊ लागले आहे. एज्युकेशन हब आणि क‌म्प्लिट हाऊसिंग म्हणून लोक आता इगतपुरीकडे वळू लागले आहेत. महामार्गाच्या परिसरात शेतीशी निगडीत कामांसाठी कृषी प्रक्रिया प्रकल्प, अन्न प्रक्रिया प्रकल्प, फळ प्रक्रिया प्रकल्प, गोदामे, ड्राय पोर्टस आणि इतर अनेक सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहीत करण्याची जगभरात वापरली जाणारी प्रक्रियाच राज्य सरकार राबवित असून हीच प्रक्रिया दिल्ली-आग्रा हायवे आणि अहमदाबाद वडोदरा हायवे या महामार्गांसाठीही वापरली गेली आहे.

कनेक्ट‌िव्हिटी वाढणार

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची रचना मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुने ३+१ लेन असणार आहे. शिवाय पदपथ असतील तसेच वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी खालून मार्ग असेल. मार्गातील विविध रस्त्यांना जोडण्यासाठी फ्लायओव्हर असणार आहेत. गावा-शहरांमधून हा रस्ता ओलांडण्यासाठी अंडरपास असतील. एवढेच नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या मार्गावर प्रत्येक विभागात विमानही उतरू शकेल. महामार्गावर प्रत्येक पाच किलोमीटरवर टेल‌िफोनची सुविधा असणार आहे. फूड प्लाझा, रेस्टॉरण्ट तथा दुकाने, ट्रॉमा सेंटरही असणार आहे. बस तथा ट्रक थांबण्यासाठी टर्मिनसची सुविधाही येथे असेल. हा महामार्ग देशात पायाभूत विकासाला नवा आयामही ठरणार आहे. कुठल्याही समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी ओपिनियन मेकर्सची भूमिका अत्यंत महत्वाची असते. किंबहुना समाजाला दिशा देण्याचे काम ओपिनियन मेकर्स करीत असतात. परंतु समृध्दी महामार्गाचे फायदे सरकार घसा सुकेपर्यंत सांगत असतानाही समाजाची मते घडविणाऱ्यांपर्यंत ते पोहोचू नये हे खरे र्दुदैव होते. हे वाऱ्याशी भांडण असल्याची प्रचिती पदोपदी आली. एव्हाना समृध्दी महामार्गाचे काम सुरू व्हायला हवे होते. परंतु मोजणीला होत असलेल्या विरोधामूळे या प्रकल्पाची गती मध्यंतरी मंदावली. या महामार्गाची आखणी एर्न्स्ट अ‍ॅण्ड यंग या आघाडीच्या कन्सल्टींग कंपनीने संपूर्ण अभ्यासाअंती केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि कोकण या विभागांमध्ये एक कन्सल्टंट नेमून या महामार्गाची अंतिम आखणी केली. लवकरच मोबदला देऊन जमिनी हस्तांतरणाची प्रक्रीया राबविली जाणार आहे. तेव्हा स्वत:च्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यायलाच हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस वर्षांचे स्मार्ट वाहतूक नियोजन

$
0
0

नाशिक : स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व दळणवळण व्यवस्थाही अधिक स्मार्ट होणार आहे. दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) शहराच्या पुढील वीस वर्षांच्या वाहतुकीचे स्मार्ट नियोजन केले असून वाहतूक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. त्यात लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने शहरात हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्टवर भर देण्यात आला आहे. बसेसची संख्या वाढवणे, ट्रामची व्यवस्था, रिंग रोड पूर्ण करणे आदींचा समावेश आहे. शहरातील रस्ते द्विपदरी करण्यासह मिसिंग पॉइंट जोडण्यावर भर दिला आहे. सोबतच या आराखड्यात बीआरटीएस, मोनोरेल संदर्भातही सूचना करण्यात आली आहे. प्रशासनाने त्यांच्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी केली तर शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

नाशिक शहराची सध्याची लोकसंख्या ही २० लाखांच्या आसपास असून, येत्या २० वर्षांत ती दुपटीने वाढणार आहे. शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असल्याने लोकसंख्यावाढीचा वेगही तेवढाच आहे. त्यातच नाशिकचा समावेश आता केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत झाला असून, नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. सद्यःस्थितीत शहरातील सर्वाधिक समस्या ही वाहतूक आणि पार्किंगची आहे. त्र्यंबकरोड, गंगापूररोड, नाशिकरोड ते शालिमार हे तीन रस्ते सोडले तर इतर रस्त्यांवर वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. महापालिकेसमोरची ही सर्वात मोठी समस्या आहे. मुंबई- आग्रा महामार्गावर साडेआठ किलोमीटरचा उड्डाणपूल झाला असला तरी द्वारका, मुंबई नाका, इंदिरानगर अंडरपास येथे वाहतुकीची समस्या कायम आहे. विशेषतः जुने नाशिक, सीबीएस, अशोक स्तंभ, पंचवटी, या शहराच्या कोअर भागात तर वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर आहे. शहरातील रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतूक आणि पार्किंगच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तत्काल‌िन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट या कंपनीवर शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सोपविले होते.

गेल्या वर्षी एप्र‌िलमध्ये संबंधित कंपनीला शहरातील रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून पुढील वीस वर्षांसाठी शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यात बीआरटीएसच्या चाचपणीसह मोनोरेलसंदर्भातही अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने गेले वर्षभर शहरातील सर्व रस्त्यांचा व पार्किंगच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर आपला अहवाल तयार केला आहे. त्यात रस्ते, पूल यांच्यासह पार्किंगची कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कंपनीच्या वतीने शहरात सद्यःस्थितीतील रस्त्यांची गरज पाहता हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्टवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील बससेवा सक्षम करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करून सन २०३६ मध्ये शहराला १३१९ बसेसची गरज असल्याची सूचना करण्यात आली आहे.

बीआरटीएस, ट्रामचाही विचार

आयटीडीपीने शहरातील तीन रस्त्यांवर बीआरटीएस प्रकल्पाला अनुकूलता दर्शवली होती. यूटीडीपीनेही बीआरटीएसचा अभ्यास केला आहे. सोबतच मेट्रो, मोनोरेल आणि ट्राम बसेसबाबतही त्यांनी आपला अहवाल तयार केला आहे. बसेसची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी बीआरटीएस आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्याचाही विचार केला जात आहे. प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीसाठीचे पावले टाकली जाणार आहेत. त्यामुळे या प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही अंशी फुटण्याची शक्यता आहे.


शिफारशी

बससेची संख्या वाढवणे

२२ वाढीव चौकांसाठी सिग्नल बसवणे

पादचाऱ्यांसाठी ९३ किमी पदपथ

५४ किमीचा सायकल ट्रॅक

शहराच्या सीमेवर ट्रक टर्मिनस तयार करणे

रिंगरोडची पूर्तता करणे

रस्त्यांची रुंदी वाढवणे

सिग्नलची संख्या वाढवणे

४० ठिकाणी पे अॅण्‍ड पार्किंग


शहराच्या वाहतूक व पार्किंगचे पुढील २० वर्षासाठीचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी दिल्लीस्थित यूएमटीसी कंपनीला आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा आराखडा सादर होणार असून, शहर विकासासाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉर्डन लावणार ट्रॅफिकला शिस्त

$
0
0

नाशिक: शहर वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडे लवकरच या संदर्भांत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यात शहर पोलिसांसाठी तब्बल ७५ ट्रॅफिक वार्डन मिळू शकतात.

शहर पोलिस दलात २९७ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या फक्त १९७ इतकी होती. वाहतूक विभागाची डिव्ह‌िजननिहाय कार्यालये सुरू होणार असल्याने मनुष्य बळ उपलब्ध करून देण्यात आले. शहरातून अनेक महत्वाचे महामार्ग तसेच राज्यमार्ग जातात. पर्यटकांचा राबता, शाळा तसेच कॉलेजसची वाढती संख्या संख्या, तसेच औद्योगिकीकरणामुळे वाहनांची वाढलेली संख्या याचा ताण शेवटी वाहतूक विभागावर पडतो. शहराच्या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागातदेखील वाहतुकीच्या समस्यांना सर्वांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वार्डन देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी काही महिन्यापूर्वी शहर पोलिसांनी ७५ ट्रॅफिक वार्डनची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयास पाठवला होता. याबाबत मुंबईत अनेकदा बैठका पार पडल्या. याच आठवड्याच्या अखेरीस पोलिस महासंचालकांनी बैठक आयोज‌ित केली आहे. या बैठकीत ट्रॅफिक वार्डनची संख्या निश्चित होऊ शकते. ट्रॅफिक वार्डन म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस गृह विभाग मानधनदेखील देणार आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, शहरातील महत्त्वपूर्ण रस्त्यांचा, तेथील वाहतूक कोंडीचा विचार होतो. मनुष्यबळाचा विचार करूनच नियोजन केले जाते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अनेकदा अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष होते. शाळा-कॉलेजेस, महत्वाची व्यावासायिक अस्थापने येथे होणारी वाहतूक कोंडी तसेच पार्कींगची समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा आवश्यक असून, ट्रॅफिक वार्डन त्यासाठी फायदेशीर ठरू शकतील, असा दावा संबंधीत अधिकाऱ्याने केला. ७५ ट्रॅफिक वार्डन मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी किती जागांना मंजुरी मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल, असे संबंध‌ित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ट्रॅफिक वार्डन नियुक्तीबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो. त्याचा निश्चितच फायदा होऊ शकेल. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक आपआपल्या परीने योगदान देऊ शकतात. इच्छुक नागरिकांनी तसा रस दाखवल्यास त्यांनाही सवडीच्या वेळेनुसार, तसेच जागेवर काम करण्याची संधी देण्यात येऊ शकते.

-डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे स्टेशन होणार मॉलसारखे चकाचक

$
0
0

नाशिकः महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून राज्यातील अनेक रेल्वे मार्ग त्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे भारतातील निवडक रेल्वे स्टेशन ‘स्विस चॅलेंज मेथड’च्या धर्तीवर विकस‌ित केले जाणार असून, त्यात नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. सध्या असलेले स्टेशन बहुमजली होणार असून त्याला मॉलचा दर्जा प्राप्त होणार आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानक हे उत्तर भारताकडे सर्वात जास्त वाहतूक करणारे स्टेशन आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रवासी वाहतूक करणारे केंद्र म्हणूनदेखील याची ख्याती आहे. सिंहस्थाच्या कालावधीत नाशिकरोड रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गाड्या थांबवण्यासाठी जागा नसल्याने ती बासनात गुंडाळण्यात आली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाला पुरेशी जागा नसल्याने त्याचा विकास खुंटला आहे, असेही मानले जाते. परंतु, आता ती अडचण दूर होणार आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून, लवकरच नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या उपक्रमांतर्गत भारतातील चारशे स्टेशनची निवड केली असून, त्यात नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरश‌िपच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यात रेल्वे स्टेशन्सवर असलेली एअर स्पेस विकस‌ित करण्यात येणार असून, ग्राऊंड फ्लोअरवर रेल्वे स्टेशन, पहिल्या मजल्यावर रेल्वेची प्रशासकीय इमारत व प्रतिक्षालय, त्यानंतरचे मजले हे व्यावसायिक वापरासाठी विकासकाला देण्यात येणार आहेत.

या कामाचे पेपरवर्क तयार असून, त्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. यावेळी स्विस चॅलेंज मेथडचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यात टेंडर सिस्ट‌िम नसेल. काय हवे याची माहिती रेल्वे प्रशासन वेबसाइटवर देणार असून, जे विकासक कमी दराने काम पूर्ण करतील त्यांना काम दिले जाणार आहे. यात मध्य रेल्वेचा आणि विकासकांचा दोघांचा फायदा होणार आहे. ४५ वर्षांच्या कराराने ही स्टेशन्स विकसित केली जाणार आहेत.


मध्य रेल्वेचे नाशिक हे एक प्रमुख ठिकाण असल्याने नाशिकचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही योजना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशान्वये अमलात आणण्यात येणार आहे. यासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास लवकरच या कामाला सुरुवात होईल. नाशिककरांना परदेशातील रेल्वे स्टेशनसारखे स्टेशन मिळेल.

-नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्यरेल्वे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ५२५ विद्यार्थ्यांना ‘युगांत’चे वरदान

$
0
0

शैक्षणिक वर्षात आठ शाळांना घेतले दत्तक

नाशिक : हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षणाला प्राधान्य देऊन कुटुंबाच्या भविष्याला उजाळी देऊ पाहणाऱ्या चिमुकल्यांसाठी पुढे येणारे मदतीचे हात हे एखाद्या देवासमान असतात. शिक्षणासाठी लागणारा आर्थिक भार, शैक्षणिक गरजा भागविणाऱ्या अशा काही व्यक्तींची त्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. जिल्हा परिषदेच्या अशा शाळांमधील चिमुकल्यांसाठी युगांत फाउंडेशन वरदान ठरत आहे. शैक्षणिक दत्तक घेऊन या मुलांचे भवितव्य घडविण्याचे प्रयत्न या फाउंडेशनकडून केले जात असून, यंदा जिल्हा परिषदेच्या आठ शाळांमधील ५२५ विद्यार्थ्यांना युगांतचा आधार मिळणार आहे.

एकीकडे खासगी शाळांचे प्रस्थ, तेथील भौतिक सुविधा, लहान लहान मुलांच्या ओठी आलेली अस्खलित इंग्रजी या चित्रापुढे मराठी व त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुले मागे पडलेली दिसतात. शालेय अभ्यासक्रमांची पुस्तके या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात परंतु, वह्या, दप्तरे, रंगपेट्या, पेन, पट्टी अशा आवश्यक वस्तू घेण्यासाठीही येथील मुलांना झगडावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून युगांत फाउंडेशन कार्यरत आहे. जिल्ह्यातील ९७ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक दत्तक घेऊन शिक्षणासाठी त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या आहेत. या शैक्षणिक वर्षातही ते हा उपक्रम राबवित असून, ५२५ विद्यार्थ्यांना यामार्फत दत्तक घेतले जाणार आहे. १७ जूनला जिल्ह्यातील आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील या शाळांचा समावेश

रानमळा १, रानमळा २, वाल्मिकनगर, सुल्तानपूर, विंचूर गवळी, टूंगलदरा, गवळवाडी, देहेरेवाडी

डिजिटलायझेशनसाठी प्रयत्न

डिजिटल स्कूल ही संकल्पना राज्यातील शाळांमध्ये सध्या जोर धरत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शाळा यापासून अद्याप कोसो दूर आहेत. परंतु, काळाबरोबर चालायचे तर या मुलांनाही हे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. हे ओळखत युगांत फाउंडेशनकडून डिजिटल स्कूलसाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आवश्यक कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर आदी साहित्य पुरविण्यावर त्यांचा भर आहे.

या शाळांमधील ९९ टक्के मुले आर्थिकदृष्ट्या अतिशय मागास आहेत. स्थलांतरीत होऊन आलेली, हातावर पोट असलेल्यांची ही मुले आहेत. त्यांना शैक्षणिक आधार देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कार्य यामार्फत करीत आहोत.

- प्राजक्ता देशमुख, अध्यक्ष, युगांत फाउंडेशन

पुस्तके सरकारकडून पुरविली जात असली तरी इतर शैक्षणिक साहित्याची गरज भागविणे या विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते. या उपक्रमामुळे ते शक्य झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली. शिवाय, कॉम्प्युटर हाताळायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते.

- देवेंद्र पाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, साप्ते, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन, घोषणाबाजी

$
0
0

पोलिस बंदोबस्तात सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीने निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ७) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीने दोन्ही जिल्ह्यातील खासदार, आमदारांच्या घराजवळ शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच खासदार व आमदारांच्या घरी त्यांच्या प्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील खासदारांच्या घराच्या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही जिल्ह्यात शेतकरी कष्टकरी सभेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

धुळे शहरात बुधवारी सकाळी शेतकरी कष्टकरी सभेचे किशोर ढमाले व शेतकरी संघटनेचे रवी देवांग यांच्या नेतृत्वाखाली साक्री तालुक्यासह ठिकठिकाणाहून आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांची कामगार कल्याण भवन येथे बैठक घेण्यात आली. त्यानंतर पायी चालत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारोळा रोडवरील निवासस्थानी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून त्यांचे प्रतिनिधी शांताराम पाटील यांना निवेदन दिले. त्यानंतर पुढे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या खोल गल्लीतील निवासस्थानी मोर्चेकरी पोहोचले. त्याठिकाणीदेखील आमदार गोटे उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नी हेमा गोटे व मुलगा तेजस गोटे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात याव्या, असे सांगितले. शहरातील देवपूर परिसरात राहणारे धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील, साक्री तालुका आमदार डी. एस. अहिरे, तसेच मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानीही जाऊन निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. रामसिंग गावित, कॉ. करणसिंग कोकणी, कॉ. साजूबाई गावित, कॉ. पवित्राबाई सोनवणे, कॉ. वंजी गायकवाड, कॉ. निंबाबाई ब्राम्हणे यांच्यासह महिला व पुरुषांचा मोर्चामध्ये सहभाग होता. जिल्हा पोलिसांकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांच्या कार्यालय व निवासस्थानाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

००

नंदुरबारलाही निवेदन

नंदुरबार जिल्ह्यातदेखील सत्यशोधक कष्टकरी सभेच्यावतीने खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घर आणि कार्यालयाबाहेर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. सोबतच शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले.

००

शिरूड चौफुलीवर रास्ता रोको

शेतकरी संपाला धुळे जिल्हा राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. ७) तालुक्यातील शिरूड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करून शेतीमाल महामार्गावर फेकण्यात आला. यावेळी किरण शिंदे, किरण पाटील, प्रभाकर पाटील, अंकुश देवरे, अमोल पाटील, विनोद बच्छाव, निंबा पाटील आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृध्दीचा मार्ग धोत्रेत मोकळा

$
0
0

नाशिक ः समृध्दी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या धोत्रे गावातील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यास सहमती दर्शविली असून नुकतेच येथील जमिनींची मोजणी करण्यात आली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील १०० टक्के मोजणी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. समृध्दीचे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात येत असून, नाशिक जिल्ह्यातील विरोधही लवकरच शमेल आणि शेतकऱ्यांचा नकार होकारात बदलेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे.

नाशिकमधील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारला समृध्दी महामार्गासाठी हव्या आहेत. परंतु, वडिलोपार्जित जमिनी सहजासहजी सरकारला देण्यास शेतकरी तयार नाहीत. याउलट विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, पाथरे, डुबेरे यांसारख्या काही गावांमधील शेतकऱ्यांनी अजूनही विरोधाचे निशाण फडकावत ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही १०० टक्के मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. अशीच परिस्थ‌िती काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात होती. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील शेतकऱ्यांकडून समृध्दी महामार्गाला प्रखर विरोध होता. तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे, घारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे या नऊ गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली. परंतु, धोत्रे गावातून तीव्र विरोध असल्याने नगर जिल्ह्यातील पुढील कार्यवाहीला ब्रेक लागला होता. आमच्या जमिनी सोडून अन्य कोठूनही या महामार्गासाठी जमिनी संपादीत करा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रशासनाने अलाइनमेंट बदलण्याचे प्रयत्न केले. परंतु, ते व्यवहार्य ठरत नसल्याचे ग्रामस्थांना पटवून देण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रदीप चव्हाण या शेतकऱ्यासारखे जे लोक महामार्गाला तीव्र व‌िरोध करीत होते, ते आता प्रशासनाला मदत करू लागल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. हा विरोध मावळला असून, राज्यातील अन्य काही भागांतदेखील समृध्दीचे महत्व शेतकऱ्यांना पटू लागल्याचा दावा प्रशासनातील अधिकारी करीत आहेत.

४९ हेक्टर जमीन होणार संपादीत

धोत्रे गावातून ४.८८ किलोमीटरचा महामार्ग जातो. त्यासाठी सुमारे ४९ हेक्टर जमिनीची गरज आहे. शेतकऱ्यांची मनधरणी करून ही जमीन संपादीत करावी लागणार होती. सात-बारा नोंदींनुसार २९७ शेतकऱ्यांची जमीन या महामार्गामध्ये जात असून, शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी, शिर्डीचे प्रांताधिकारी, कोपरगावचे तहसीलदार, समृध्दी महामार्गाचे कामकाज पाहणारे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी धोत्रे ग्रामस्थांना समृध्दी महामार्गासाठी राजी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर शेळ्या जाणार परदेशी

$
0
0

नाशिक - गेल्या वर्षी १४ हजार शेळ्या-मेंढ्यांची ओझरहून आखाती देशात यशस्वी निर्यात झाल्यानंतर यंदा तब्बल एक लाख शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. जिवंत प्राणी निर्यातीसाठीचे अत्याधुनिक स्वरुपाच्या कार्गो विमानाची उपलब्धता केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून या शेळ्या-मेंढ्यांची खरेदी होणार असल्याने नजिकच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

ओझर येथील सुसज्ज विमानतळाच्या ठिकाणाहून आखाती देशामध्ये शेळ्यांची निर्यात करण्याचा यशस्वी प्रयोग गेल्या वर्षी झाला. कॉनकॉर ही कार्गो सेवा कंपनी, सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने ही निर्यात झाली होती. हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे महाव्यवस्थापक, हॅलकॉनचे सीईओ सुधाकर सेन, सानप प्रा. लि.चे संचालक जयंत सानप, शिवाजी सानप, अमिगो लॉजिस्टिकचे एमडी साजिद खान, सोव्हिका लॉजिस्टिकचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट एन. एस. हंस या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतातून प्रथमच हवाईमार्गे शेळ्यांची निर्यात होऊ शकली. भारतातून समुद्रमार्गे आखाती देशात शेळ्या-मेंढ्यांसह ज‌िवंत प्राण्यांची वाहतूक केली जाते. मात्र, जून ते सप्टेंबर या काळात भारतामध्ये पावसाळा असल्याने समुद्रातील वाहतूक बंद असते. याच काळात आखाती देशांमध्ये शेळ्या-मेंढ्यांचा मोठा तुटवडा असतो. हीच बाब ओळखून गेल्यावर्षी थेट हवाईमार्गे शेळ्यांची निर्यात करण्यात आली. ८ कार्गो विमानांद्वारे एकूण १४ हजार शेळ्या-मेंढ्या दुबई येथे निर्यात झाल्या होत्या. २५हजारांहून अधिक शेळ्यांच्या निर्यातीचे उद्द‌िष्ट ठेवण्यात आले होते. गतवर्षीचा यशस्वी अनुभव लक्षात घेता यंदा तब्बल एक लाख शेळ्यांच्या निर्यातीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. या महिन्याच्या अखेरीसच ही निर्यात ओझरहून सुरू होणार आहे. जिवंत प्राण्यांच्या वाहतुकीसाठी अत्याधुनिक स्वरुपाचे कार्गो विमान उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या कार्गो विमानात एका वेळी हजारो शेळ्यांची निर्यात यशस्वी होऊ शकणार आहे. निर्यात होणाऱ्या या शेळ्यांची खरेदी ग्रामीण भागातून केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, दुबईहून ओझरला कार्गो विमान गेल्यावेळी रिकामेच येत असल्याने निर्यातीचा खर्च अधिक होता. यंदा आखाती फळे किंवा अन्य उत्पादने ओझरला आयात करण्याच्याही हालचाली गतिमान झाल्याने ओझरची कार्गो सेवा कात टाकणार असल्याचे कार्गो क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ घातला दातृत्वाचा आदर्श

$
0
0

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला महिन्याभराचा पगार

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना केवळ त्यावर दुःख व्यक्त करीत सांत्वन करणाऱ्या राजकीय पक्षांपुढे आदर्श निर्माण केला आहे, तो एका नोकरदार माणसाने. त्यांनी आपला एक महिन्याचा पगार ५१ हजार रुपये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

राज्यात रोजच शेतकरी आत्महत्या होत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात राजकीय नेते धन्य मानतात. मात्र आपला खिसा कधीही रिता करीत नाहीत. मात्र एका नोकरदार माणसाने आपल्या महिनाभराचा पगार एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन नक्कीच समाजाचे मन जिंकले आहे. कुंदेवाडीचे (ता. निफाड) भूमिपुत्र लक्ष्मण विनायक बेलदार (सहायक अभियंता महावितरण कंपनी, पंचवटी, नाशिक) असे या दातृत्वशील व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण बेलदार यांनी नुकताच आपला एक महिन्याचा पगार रानवड येथील जितेंद्र तुकाराम वाघ या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास दिला. ५१ हजार रुपयांचा मदतनिधी देऊन समाजात एक शेतकरी कुटुंबाचा वारसा म्हणनू एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मी ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या झळा विद्यार्थीदशेत मलाही बसल्या आहेत. शेतकरी आत्महत्येवर फक्त सांत्वन करण्यापेक्षा त्या कुटुंबाला सर्वप्रथम आधार द्यायचा असतो. म्हणून मी वाघ कुटुंबाला एक महिन्याचा पगार दिला असून, पुढील महिन्याचा पगारही एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देणार आहे.

- लक्ष्मण बेलदार, सहाय्यक अभियंता, महावितरण कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर अनुभवणार आर्ट फेस्टची रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १० व ११ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून मविप्र आर्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगलकार्यालयाजवळ आर्ट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट फेस्टचे उद्‍घाटन प्रसिध्द व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल उपस्थित रहाणार आहेत.

या फेस्टमध्ये नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे. नाशिकचे नामवंत शिल्पकार नीलेश ढेरे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे, भूषण कोंबडे सहभागी होणार असून, ११ ते १ याकालवधीत त्यांचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार आहे. दुपारी १ वाजेपासून चित्रकारांच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात होणार असून, यात संजय दुर्गावाड, बाळ नगरकर, कैलास परदेशी हे चित्रकार सहभागी होणार आहेत. हे प्रात्यक्षिक २.३० वाजेपर्यंत चालणार आहे. दुपारी ३ ते ४ याकालावधीत प्रभाकर झळके हे आपल्या कुंचल्याने कार्टून्सची मजा दाखवणार आहेत. श्रध्दा कारळे या ४ ते ५ या कालावधीत वारली पेंटिंग सादर करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता प्रफुल्ल सावंत हे लॅन्डस्केप पेंटिंग तर राजेश सावंत हे क्रिएटीव्ह पेंटिंग सादर करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता प्रसाद पवार, समीर बोंदार्डे, संजय अमृतकर हे फोटोग्राफीविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता नंदू गवांदे हे कॅलिग्राफी सादर करणार आहेत. तेव्हा नाशिककरांनी या आर्ट फेस्टला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन मटाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन प्रयोग मिळणार पहायला

नाशिकमधील परफॉर्मिंग आर्ट सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी हा या आर्ट फेस्टचा उद्देश आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी आंदोलनाची आज ठरणार दिशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची निश्चित दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी सुकाणू समितीची बैठक नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीला खासदार राजू शेट्टींसह डॉ. बुधाजी मुळीक, अजित नवले, डॉ. गिरीधर पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, बाबा आढावांसह दिग्गज हजेरी लावणार आहेत. दुपारी बारा वाजता तुपसाखरे लॉन्सला ही बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीवर सरकारी यंत्रणाचे बारीक लक्ष राहणार आहे. सुकाणू समितीत राजू अनिल धनवट, हंसराज वडघुले, संतोष वाडेकर, संजय पाटील, बच्चू कडू, विजय जावंधिया, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, शिवाजी नानखिले, डॉ. बुधाजी मुळीक, गणेश कदम, करण गायकर, अमृता पवार, रामचंद्र बापू पाटील यांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दरबारी शेतकऱ्यांचे ‘लोटांगण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव मिळावा, शेतकऱ्यांना पेन्शन मिळावे, दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा आदी मागण्यांसाठी वडाळी नजीक (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत आणि लोटांगण घालत पिंपळगाव पोलिस ठाण्यात यांना निवेदन सादर केले. शेतकरी कर्जमाफीसाठी गेल्या आठ दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. मात्र वडळी नजीक येथील शेतकऱ्यांनी कैलास होळकर यांच्या नेतृत्त्वाखाली केलेले या लोटांगण आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

पोलिसांना या अनोख्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी एक दिवस आधीच सूचना दिली होती. तरीही या आंदोलनामुळे स्वरूप आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा लक्षात घेता पिंपळगाव पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक यावेळी सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने भजन करत व लोटांगण घालत पोलिस निरीक्षक देसले यांन निवेदन दिले. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येथील ऋचा हॉटेलपासून कैलास होळकर यांनी लोटांगण घालण्यास सुरुवात केली. पोलिस स्टेशनपर्यंत लोटांगण घालत टाळ मृदूंग आणि भजनाच्या गजरात आंदोलन पोहोचले. यावेळी कैलास होळकर यांच्यासह बाळासाहेब झाल्टे, गोकूळ झाल्टे, किरण पगार, सोमनाथ झाल्टे, शिवाजी घोलप, केशव कडलग आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगावात निषेध दिंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकरी संपाच्या बुधवारच्या सातव्या दिवशी येवला तालुक्यात पूर्वीच्या सहा दिवसांच्या तुलनेत विविध आक्रमक आंदोलनांची धार काहीसी कमी झालेली दिसली. तालुक्यातील सायगांवसह इतर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन केले. संपात सहभागी गावोगावच्या शेतकऱ्यांनी बुधवारीही दूध संकलन केंद्रांवर दूध घातले नाही. शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने येवला बाजार समिती मुख्य बाजार आवार, अंदरसूल उपबाजार आवार सातव्या दिवशीही ठप्पच होते.

तालुक्यातील सायगांवमध्ये हाती काळे झेंडे नाचवत तसेच गळ्यात कांदा आणि भाजीपाल्याच्या माळा घालत निषेध दिंडी निघाली. शेतकऱ्यांच्या सहभाग असलेल्या या दिंडी आंदोलनात प्रत्येकाच्या मुखी गजर होत होता तो शासनाच्या निषेधाचा.

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवसापासून दररोजच वेगवेगळी आंदोलने करून शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या येवला तालुक्यातील सायगावात मंगळवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत अर्धनग्न मोर्चा काढला होता. बुधवारीही दिंडी काढून प्रशानावर कोरडे ओढले. शेतकऱ्यांच्या गळ्यातील कांदा व इतर भाजीपाल्यांच्या माळा, हातात निषेधाचे काळे झेंडे लक्षे वेधत होते. गावातील रोकडोबा पारावर सकाळी नऊ वाजता जवळपास दीड ते दोन हजार शेतकरी एकत्र जमले. त्यानंतर गावातून दिंडी काढण्यात आली.

शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव, भागुनाथ उशीर, अॅड. राहूल भालेराव यांच्यासह बबन सूर्यवंशी, विठ्ठल उशीर, सोपान उशीर, विजय खैरनार, छगन उशीर आदी शेतकरी सहभागी झाले होते.

बाजार ठप्पच

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार बुधवारीही ओस पडले होते. कांदा अथवा इतर कुठलाही शेतमाल घेवून एकही शेतकरी बाजारसमितीकडे न फिरकल्याने बाजार समित्यांमध्ये शांतता होती. अंदरसूल आवारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.

दूध संकलन केंद्रेही बंद

तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपाच्या सातव्या दिवशी देखील दुधाचा रतीब बंद ठेवला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी डेअरी अर्थातच दूध संकलन केंद्रासह इतर ठिकाणी आपल्याकडील दररोजचे दूध न घातल्याने अनेक ठिकाणची दुध संकल केंद्रे बंदच दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड ताबा कारवाई फोल

$
0
0

नाशिक ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत तब्बल १७९ उद्योजकांना भूखंड ताब्यात घेण्याच्या नोट‌िसा देऊन मोठी कारवाई केल्याच्या वल्गना केल्यानंतर आता केवळ दोनच भूखंड ताब्यात मिळणार असल्याचे बोलले जात आहे. नोटीस दिलेल्या बहुतांश उद्योजकांनी बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला (बीसीसी) नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या तांत्रिक गोष्टीची पूर्तता करून ते नियमित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

भूखंड ताब्यात घेण्याच्या या कारवाईतून मोठ्या प्रमाणात भूखंड एमआयडीसीला पुन्हा मिळेल अशी अपेक्षा होती तूर्त तरी ती फोल ठरली आहे. भूखंड ताब्यात घेण्याच्या या कारवाईत दोन उद्योजकांनी भूखंड ताब्यात घेतल्यानंतर मात्र कोणताच उद्योग सुरू केला नाही. त्यातील एक भूखंड सातपूर तर दुसरा अंबड येथे आहे. एमआयडीसने मे महिन्यात या उद्योजकांना नोट‌िसा दिल्या होत्या त्यात सातपूर येथील ३६ मोठे तर ८५ लघु उद्योगांचा समावेश होता. या नोटीस दिल्यानंतर बहुतांश उद्योजकांनी एमआयडीकडे धाव घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यात वेगवेगळ्या कारणाने बीसीसी मिळाली नसल्याची बाब पुढे आली आहे. सातपूरप्रमाणे अंबड येथे नोटीस दिलेल्या १९ मोठे तर ३९ लघुउद्योग आहे यातही बीसीसीचाच प्रश्न मोठा आहे.

गेल्या काही महिन्यापासून राज्यभर विनावापर भूखंडाचा प्रश्न चर्चेत आहे. त्यातून एमआयडीसनेही मोठी कारवाई केली. मात्र त्यात त्यांना खूप यश आले नाही. या तांत्रिक गोष्टी पूर्ण का केल्या जात नाही, असाही प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे. ‘मेक इन नाशिक’मध्ये अनेक उद्योजकांनी गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यात बहुतांश उद्योजकांनी नाशिक येथेच जागा असावी, अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे आता या उद्योजकांना एमआयडीसी कोणते प्लॉट देईल असाही प्रश्न पुढे येणार आहे.

उद्योजकांना दिलेल्या भूखंडात बांधण्यात येणाऱ्या बांधकामासाठी अगोदर प्लॅन मंजूर करावा लागतो. त्यानंतर बांधकाम झाल्यानंतर त्याचा पूर्णत्त्वाचा दाखला घेणे गरजेचे आहे. बीसीसी पूर्णत्त्वाचा दाखला नसतांना बँकेने या उद्योगांना कर्ज दिले का? औद्योगिक परवाना कसा दिला? औद्योगिक सुरक्षेत 'बीबीसी'चे महत्त्व किती आहे? नाईस व एमआयडीसीने इतक्या दिवस हा गंभीर विषयावर काय कारवाई केली असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


गेल्या महिन्यात १७९ उद्योजकांना नोट‌िसा दिल्या होत्या. त्यातील बहुतांश जणांना बीसीसीचा प्रश्न आहे. या नोट‌िसा दिल्यानंतर अनेक उद्योजकांनी आपले प्रश्न मांडले. ते सोडवण्याचा प्रयत्न करू. या नोटीसमुळे अवघे दोनच प्लॉट ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे.- हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडचणी वाढल्या...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक,

महापालिकेचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन, माजी अधिक्षक अभियंता आर. के. पवार व विद्युत विभागाचे उपअभियंता नारायण आगरकर यांच्यासंदर्भात झालेल्या तक्रारीत प्राथमिक दृष्ट्या तथ्य आढळून आले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीत कामकाजात चुकारपणा व गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. त्यामुळे या त‌िघांची विभागिय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. विभागीय चौकशीत अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता असल्याने या त‌िघांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महापालिकेतील अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारल्यानंतर अधिकाऱ्यांनी आयुक्तांविरोधात पत्रकबाजी सुरू केली होती. परंतु आयुक्तांनी या प्रकाराला न जुमानता कारवाईचे हत्यार उपसले आहे. पालिकेतील २०२ कोटींच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण आगरकर दोषी आढळले होते. आगरकर सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांची विभागीय चौकशी प्रलंबित होती. तसेच अग्निशमन विभागाकडून रुग्णालये, हॉटेल्ससाठी अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक होते. परंतु दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तो आदेश रद्द करीत अशा प्रकारची परवानगी बंधनकारक नसल्याचे परिपत्रक काढले होते. सदरचे परिपत्रक दोन वर्ष दडवून ठेवल्याचा आरोप महाजन यांच्यावर होता. परंतु आपल्याला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनायाकडून परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचा दावा महाजनांनी केला होता. याप्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी केली होती. त्यात महाजन दोषी आढळल्याने त्यांची विभागिय चौकशी प्रस्तावित केली आहे.

यंत्रे धूळ खात

खतप्रकल्पावरील ६० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. २००७ ते २०१० या कालावधीमध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत खत प्रकल्पासाठी साठ कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली होती. यंत्रे चालविण्यासाठी कर्मचारी नसताना खरेदी झाली व अखेरपर्यंत विनावापर यंत्रे पडून होती. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले होते. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश महासभेत देण्यात आले होते. प्रशासन उपायुक्त, मुख्य लेखा परिक्षक व आरोग्य अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीने जानेवारी २०१६ मध्ये आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला होता. त्यात पवार दोषी आढळल्याने त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

महापौर आयुक्तांच्या पाठ‌िशी

आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संघटनेला महापौर रंजना भानसी यांनी दणका दिला असून, आपण आयुक्तांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयुक्तांनी गेले वर्षभरात शहर विकासासाठी चांगले काम केले असून शहराची प्रथम नागरिक म्हणून मी त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी जाहिर केले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाचं पाहिजे अशी भूमिका घेत महापौरांनी आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेची हवा काढली आहे. पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी नाशिक म्युन्सिपल कार्पोरेशन ऑफ‌िसर्स असोसिएशनकडे धाव घेतली होती. या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, आमदारांना पत्राद्वारे तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images