Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...अन् ‘एका दिलाची कहाणी’ आले यू-ट्यूबवर

$
0
0

नयनच्या संघर्षाला अखेर लाभला किनारा

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

‘त्याला’ नाटक आणि चित्रपटांचे भलतेच वेड. कोणतेही नाटक किंवा चित्रपट असो ‘तो’ पहायला जाणार व त्यातूनच त्याच्या आत एका रोपट्याने अंकुर धरला. आपल्यालाही गाणे तयार करायचे. परंतु जगरहाटीत त्याला कळले हे किती अवघड असते मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा यांच्या बळावर त्याने गाणे तयार करून दाखवले. आज हे गाणे यू-ट्युबवर झळकत असून, त्याला चांगल्या लाइक्सही मिळत आहेत.

ही कहाणी आहे, नाशिकच्या नयन कल्पना अभय जाधवची. नयन मविप्र संस्थेच्या केटीएचएम कॉलेजला द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकतो. त्याने सुरुवातीला लेख लिहिले, लावण्या लिहिल्या गाणीही लिहिली परंतु, या त्यातील ‘एका दिलाची कहाणी’ हे गाणे त्याला खूपच भावले. ते पडद्यावर आले पाहिजे, अशी इच्छा त्याच्या मनात जागृत झाली आणि मग सुरू झाला संघर्ष.

जगरहाटीमध्ये एखादे गाणे पडद्यावर येणे म्हणजे किती अवघड असते हे त्याला कळून चुकले मात्र त्याने हार मानली नाही. त्याला नाशकातील पहिला ऑफबिट साँग अल्बम तयार करायचाच होता. नयन नाशकातील अनेक दिग्गजांना भेटला, अनेकांचे सल्ले घेतले आणि एक दिवस त्याला आर्थिक मदत करणारा हात सापडला. नाशिक वेध व संवेद या टीम नयनच्या मदतीला धावून आली आणि त्याचे गाणे रेकॉर्डिंग झाले. रितेश मोरे यांनी त्याला मार्गदर्शन केले. हळूहळू कामाने वेग घेतला, नाशिकच्या आनंद ओक, अभिषेक दांडेकर यांच्या डी. जी. बिट्स या म्युझिक स्टुडिओत अवघ्या दोनच दिवसात गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. हे त्रिवेणी संगम असलेले गीत प्रांजली बिरारी-नेवासकर हिने गायले. गीताचे संपूर्ण चित्रीकरण नाशिकमध्येच पार पडले.

हे गाणे साडे सात मिनिटांचे असून हेमंत ठोके आणि प्रीती देवरे या नवीन चेहऱ्यांवर चित्रित झालेले आहे. प्रसाद आंबेकर, आकाश ठाकूर, वैभव पाटील, अनुजा वाणी यांनी छायाचित्रिकरण केले असून, प्रथमेष गायधनी याने संपूर्ण गीताच्या चित्रीकरणाच्या आठवणी कॅमेराबद्ध केल्या आहेत. शुभम घमंडी याने गीतासाठी डबिंग केले.

नवपदार्पण गीतासाठी ५ नामांकने

या गीताचे ६ राष्ट्रीय आणि १ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला रजिस्ट्रेशन केले असताना या गीताला नाशिकमध्ये झालेल्या फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट नवपदार्पण गीतासाठी पुरस्कारही मिळाला. मुंबईच्या फेस्टिवलमध्ये या गीताला नवपदार्पण गीतासाठी ५ नामांकने मिळाली. नयनला या कामी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके, डॉ. सरिता पगार, पुष्पाताई जोशी, सचिन मराठे, किशोर दलाल, डॉ. अमोल कुलकर्णी, गायधनी, प्रा. योगेश जोशी यांनी मोलाची मदत केली.

एका दिलाची कहाणी

एका दिलाची कहाणी हे गीत कॉलेजियन जीवनातील प्रेमाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे आहे. आजकालच्या मुलांना नात्याच्या गंभीरतेचा विचारच नाही. असंख्य वेळा नात्यात फूट पडूनही त्यांच्यात सुधारणा होत नाही. ज्यांनी इतिहासात आपल्या रक्ताने प्रेमाच्या नात्याला अजरामर केले त्याच सर्वांना आज ही मुल शरमेने माना खाली घालायला लावताय. याच विषयाला हात घालत त्याने गद्य न् पद्य या दोन सुरेख भावनांचा मेळ घालत हे गीत लिहिलंय. गाण्यात काही ठिकाणी स्वगतही आहे. हे संपूर्ण गीत म्हणजे गद्य, पद्य न् स्वगत यांचा त्रिवेणी संगमच आहे.

कोट००

अनेक अडचणींचा सामना करत आज हा दिवस पहायला मिळाल्याने खूप आनंद होतोय. मी तयार केलेल्या या छोट्याशा गीताच्या निर्मितीला वाव मिळावा एवढीच इच्छा आहे. माझ्यातील या कलेला एक व्यासपीठ मिळावे म्हणून ही निर्मिती आहे.

-नयन जाधव, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांचे नदीत आंदोलन

$
0
0

तालुक्यात शेतकरी आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावे. यासाठी शिवसेनेतर्फे शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावानजीक तापी नदीच्या पात्रात पाण्यात उभे राहून आंदोलन केले. तसेच ६ जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. अन्यथा दि. ७ जूनपासून तापी नदीच्या पाण्यात उभे राहून बेमुदत उपोषण करण्यासह जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी शानाभाऊ सोनवणे, राजू रगडे, मयूर निकम, गणेश भदाने, ईश्वर महाले, साहूर येथील शेतकरी विलास कोळी, लोटन दंगल, ज्ञानेश्वर कुवर, शानाभाऊ शिरसाठ, कैलास शिरसाठ, ईश्वर वाकडे, रमेश सोनवणे, सुकदेव वाघ, हौदास शिरसाठ, हरचंद शिरसाठ, योगेश वाघ, योगेश सोनवणे, गंगाराम शिरसाठ, दयाराम सोनवणे, दुर्योधन सोनवणे, कैलास सोनवणे, बाळकृष्ण चित्ते, महेंद्र सोनवणे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे शक्य होत नसल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यासाठी नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन करण्यात आले.


शिवसेनेकडून रास्ता रोको

धुळे : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा शिवसेनेच्यावतीने शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प केली होती. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून काही वेळाने सुटका केली.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातला शेतकरी संपावर गेला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे, दुधाला योग्य तो भाव मिळावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांनी संप केला आहे. यात विविध सामाजिक राजकीय संघटनांचा शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा मिळत आहे. त्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेदेखील शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरालगत असलेल्या चाळीसगाव चौफुलीवर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलनात जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संजय गुजराथी, किरण जोंधळे, पंकज गोरे, सिद्धार्थ करनकाळ, नरेंद्र अहिरे, रामदास कानकाटे, प्रफुल्ल पाटील, गंगाधर माळी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत रणरागिनी रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

सरकारने शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध म्हणून तालुक्यातील शेतकरी महिलांनी सकाळी ९ वाजता नाशिक गुजरात राज्यमार्ग पालखेड चौफुली येथे रोखून धरला. शेतकरी संपाच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला.

पालखेड चौफुली येथे आंबे, टोमॅटो ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी साक्षी राजे यांनी सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे असे सांगितले. हे सरकार आश्वासनांचे गाजर दाखवत असून आता शेतकरी

फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, अशा शब्दात संगीता सातपुते यांनी निषेध केला.

ज्योती देशमुख, चारुशिला राजे, नगरसेविका मालती जाधव, सविता देशमुख, क्षीतिजा राजे, संगीता देशमुख, पुष्पा देशमुख, माया कुलकर्णी, मीरा जाधव, जयश्री सातपुते आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालखेड चौफुलीवर सकाळी नऊ वाजता हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे नाशिक, कळवण, वणी, सापुतारा, सुरत येथे ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सुमारे एक तास आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे काहीवेळासाठी वाहतूक खोळंबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांची शेतकरी विरोधी खेळी यशस्वी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

संप मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर आंदोलन सुरू ठेवणे अवघड असते. त्यातून आणखी गुन्हे अंगावर घेण्याशिवाय काही पदरात पडणार नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी दूध-भाजीपाला अडवणे आता बंद करावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. शुक्रवारी उशिरा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्याची चलाखी व शेतकरी विरोधी खेळी यशस्वी झाली, असे दुर्दैवाने म्हणावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.

घनवट यांनी निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. आपली धोरणात्मक लढाई चालूच राहणार आहे, यासाठी शरद जोशी प्लानवर आधारित आपले पुढील मुद्दे कायम राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे. एक जूनपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला होता. तथापि कर्जमुक्ती सोडता किसान क्रांतीची इतर कोणतीही मागणी संघटनेला पूर्णत: मान्य नव्हती. तरीही पाठिंबा दिला. शेतकरी संपाची डोळे दिपवणारी ताकद पहायला मिळाली. सरकार दोन-तीन दिवसात शरण आले असते. योग्य तोडगा काढता आला असता. परंतु किसान क्रांतीच्या काही नेत्यांनी वैचारिक दौर्बल्य व कचखाऊ रणनीती दाखवून एकूण शेतकरी चळवळीला खाली पाहायला लावले, असे आम्ही म्हणतो. शासनाने काहीही न देता मोठा संप मोडून दाखवला. मुख्यमंत्र्याची चलाखी व शेतकरी विरोधी खेळी यशस्वी झाली, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हीच सर्व प्रथम घोषणा व नंतरच चर्चा अशी रणनीती असायला हवी होती. परंतु तसे झाले नाही.

मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज चार महिन्यात माफ, २० जूननंतर दुधाची दरवाढ करणार, नाशवंत मालासाठी शीतगृह व प्रक्रियाउद्योग शेतकऱ्यांच्या कंपन्यांमार्फत उभारणार, आंदोलनातील गुन्हे मागे घेणार, कृषिमूल्य आयोग, हमी भावाखाली खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे अशी किरकोळ व हास्यास्पद आश्वासने दिली आहेत.

संप सर्व शेतकऱ्यानी पुकारला होता व मूठभर नेत्यांनी मागे घेतला, हे संघटनेला मान्य नाही. शेतकरी प्रश्न व शेतकरी आंदोलन यशाच्या शिखरावर असताना या नेत्यांनी किरकोळ मुद्यांवर तडजोड करत माघार घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री म्हणतात, आंदोलनात गुन्हेगारही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून राज्य सरकारने जवळपास ७० टक्के मागण्या मान्य केल्यामुळे संघटनांनी संप मागे घेतला आहे. परंतु आता काही राजकीय पक्षांनी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी संप चिघळव‌िण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. शेतकरी आंदोलन करू शकत नाही, असा दावा करत या आंदोलनात आता राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सराईत गुन्हेगार सक्रीय झाल्याची मुक्ताफळेही महाजन यांनी उधळली.

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर पहाटे संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी, नाशिकमधील शेतकरी संपावर ठाम आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे केंद्र आता पुणतांब्याऐवजी नाशिक बनले आहे. त्यामुळे भाजपची त्रेधातिरपाट उडाली असून, भाजप नेत्यांनी हा संप मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सकाळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि आमदार बाळासाहेब सानप यांना संपकऱ्यांनी हसकावून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना तातडीने नाशिकला पाठवले. शनिवारी दुपारी महाजन यांनी आढावा घेतला. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, काही राजकिय पक्षांनी हे आंदोलन हाती घेतले आहे. शेतकऱ्याचे मुले शेतमालाचे ट्रक लुटू शकत नाही. त्यामुळे आंदोलनात शेतकरी नव्हे तर सराईत गुन्हेगारच शेतकऱ्यांच्या नावाखाली संपाला हिंसक वळण देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैताळे, रुईत सदाभाऊंचा निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांचा संप मिटला असे जाहीर झाले असले तरी निफाड तालुक्यातील शेतकरी व संपकरी आंदोलक संप मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. शनिवारी नैताळे, रुई या गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. नैताळे येथे पोलिसांना चकमा देत गनिमी काव्याने आंदोलन सुरूच आहे.

नैताळे येथे शनिवारी सकाळी बटाट्याच्या गोण्या रस्त्यावर फेकून आंदोलन करण्यात आले. येथील ग्रामदैवत मतोबा महाराज यांच्या यात्रेच्या वेळी पोलिसांना मदत करण्यासाठी गावातील तरुणांना पोल‌सि मित्र म्हणवून घेत त्यांना टी शर्ट देण्यात आले होते. गुरुवार व शनिवारी पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी आंदोलकांवर केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून पोल‌सि मित्रांनी या टी शर्टची होळी केली.

पुतळा जाळला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असून, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असर आरोप रुई येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शनिवारी येथील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून थेट भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड टोलनाक्यावर ट्रकने घेतला पेट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

मुंबई-आग्रा महार्गावर असलेल्या चांदवडच्या मंगळूर टोल नाक्यावर एका ट्रकला भीषण आग लागली असून या घटनेमुळे महार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या ट्रकचा टायर फुटल्याने घडली दुर्घटना घडली. हा ट्रक नाशिकहून धुळ्याकडे निघाला होता. ट्रक टोलनाक्याकडे येताच ट्रकचा टायर फुटला आणि ट्रकने पेट घेतला. आगीच्या ज्वाळांमुळे टोलनाक्याच्या छतालाही झळ बसली. धुरामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. मनमाड, मालेगाव, पिंपळगाव, ओझर भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. या ट्रकमध्ये यूरिया प्लास्टिक तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल होता, त्यामुळे आग जास्त भडकली होती. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र वाहतुकीची कोंडी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा अचानक रद्द

$
0
0

म. टा. ऑनलाइन वृत्त, नाशिकरोड

स्टाफ सिलेक्शन कमिशन (मुंबई) द्वारा आयोजित मल्टी टास्कींगची परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. परीक्षा रद्द झाल्याचे कळविण्यात न आल्यामुळे नाशिकसह नाशिकरोडच्या सेंटरवर सकाळी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी संयोजकांचा तीव्र निषेध केला.

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे ८,३०० जागांसाठी परिक्षा घेण्यात येत आहे.२४ आणि २८ मे रोजी वेगवेगळ्या ग्रेडसाठी परीक्षा झाली. ४ तारखेला रविवारी मल्टी टास्कींगची परीक्षा होती. दुपारी दोन ते चार दरम्यान दीडशे गुणांचा पेपर होता. परीक्षा दुपारी दोनला असली तरी केंद्रावर एक वाजताच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आंदोलन सुरु आहे. तसेच काल गारांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परीक्षा चुकू नये म्हणून नाशिक, नंदुरबार, धुळे आदी जिल्ह्यातील विद्यार्थी सकाळी आठपासूनच केंद्रावर हजर झाले होते.

विद्यार्थ्यांना अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी स्टाफ सिलेक्शनने हालतिकीटावर हेल्पलाईन फोन नंबर ( ०७७३८४२२७०५ आणि ९८६९७३०७०० ) दिले आहेत. परीक्षा आज अचानक रद्द झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी या नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बंद असल्याने विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली. रद्द झालेला पेपर कधी आहे ते देखील समजण्यास मार्ग नसल्याने उपाशीपोटी आलेले शेकडो विद्यार्थी बस, रेल्वे, ऱिक्षापोटी झालेला भुर्दंड सोसून परीक्षा न देताच आपआपल्या गावी परतले.

स्टाफ सिलेक्शनची ४ जून रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती उमेदवारांना मेल किंवा एसएमएस द्वारे कळविने हे संबंधितांचे काम होते. 'आम्हाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'वर शेतकरी ठाम

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्यातील सर्व शेतकरी संघटना उद्या, ५ जून रोजी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'वर ठाम असून आज नाशिक येथे शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अडते, व्यापारी, वाहतूकदार आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, पुढचा निर्णय होईपर्यंत संप कायम ठेवण्यावरही बैठकीत एकमत झाले.

बाजार समिती आवारात रघुनाथदादा पाटील, बुधाजीराव मुळीक, डॉ. गिरधर पाटील, गोकुळ काकड, वासुदेव काठे, चंद्रकांत बनकर, करण गायकर, हंसराज वडघुले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीला जिल्ह्यासह राज्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने हजर होते.

बैठकीतील ठराव -

१) संपकाळात शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे.
2) मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन नको, थेट अंमलबजावणी हवी.
४) ७ तारखेला मुंबईत कोर कमिटीची बैठक होणार
> ८ तारखेला नाशिकमधे राज्यव्यापी परिषद घेऊन त्यात आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होणार.
> राज्यव्यापी परिषदेला राजू शेट्टीसह सगळ्या संघटनांचे नेते उपस्थित राहणार

पुणतांबे येथील शेतकऱ्यांचाही पाठिंबा

नगर: पुणतांबे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत उद्या (५ जून) होणाऱ्या 'महाराष्ट्र बंद' आंदोलनात सहभागाचा निर्णय घेण्यात आला. किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले उद्या पुणतांब्यात येऊन आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत. तसेच येत्या दोन दिवसांत नवीन कोअर कमिटीही निवडली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा करणारे पुणतांब्यातील शेतकरी अद्याप गावात परतलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीनंतरच्या पर्यायवाटा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, एमसीव्हीसी, डिप्लोमा यांसारख्या अनेक शाखा समोर असतात. पण यातून नेमकं कोणतं शिक्षण घ्यावं हा प्रश्न विद्यार्थ्यांना असतो. याचं गमक उलगडण्यासाठी सोमवारी (दि. ५) ‘अकरावीत कोणती शाखा निवडाल?’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत मानसशास्त्र विषयांच्या दृष्टिकोनातून फॅक्लटी नेमकी कशी चॉईस करावी, याचे समुपदेश करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत अनेक विषयांवर करिअरची वाट सोपी करून देण्यासाठी करिअर गाइडन्सचे सेमिनार नाशिकच्या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना करिअर चॉईस करतांना चांगले सखोल मार्गदर्शन महत्त्वाचे असते. याच दृष्टीकोनातून प्रत्येक शाखेच्या विषय तज्ज्ञांचे करिअर मार्गदर्शन नाशिकच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लॅनेट उपक्रमाच्या माध्यमातून दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ५) एचपीटी आर्टस् अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये अकरावीत शाखा निवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मानसशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. चुडामण बडगुजर हे दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधतील. दहावीतले गुण तसेच बौद्धिक क्षमता तसेच विद्यार्थ्यांचा कल स्वतः ओळखून त्यांनी कोणत्या निकषांवर अकरावीत शाखा निवडावी याचे सखोल मार्गदर्शन या सेमिनारमध्ये करण्यात येणार आहे. एज्युकेशन सायकॉलॉजी बेसिसवर समुपदेशनाच्या (काउन्सलिंग) आधारे हे मार्गदर्शन होणार असल्याने विद्यार्थ्यांचा याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. यावेळी विद्यार्थी आपल्या मनातील शंकांचे निरसन करू शकतात. तसेच अकरावीतील शाखा निवडीबाबतचे समज-गैरसमज यावेळी समजावून घेऊ शकतात. शहरातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी हा करिअर गाइडन्स सेमिनार खुला असणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सेमिनार महत्त्वाचा असणार आहे.

कलचाचणीवर होणार शिक्कामोर्तब

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने यंदा पहिल्यांदाच कलचाचणीद्वारे विद्यार्थ्यांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या चाचणीमुळे विद्यार्थ्यांची साधारण आवड आणि शैक्षणिक कल कोणत्या क्षेत्रात याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या चाचणीचा निकाल घेऊन मटा प्लॅनेट कॅम्पसच्या सत्रातून अधिक सखोल मार्गदर्शन मिळविणे विद्यार्थ्यांसह पालकांना शक्य होणार आहे. उदा. एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेत रस असेल तर त्याला कला क्षेत्रातील विविध पर्यायांची माहिती मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदरमोड करून ते साकारताहेत हिरवं स्वप्न!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ असा वसा घेऊन शहरात सुशिक्षित आणि सुजाण नागरिकांचा एक मोठा समूह हरित क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपडतो आहे.

चुंचाळे टेकडी हिरवीगार करणाऱ्या या समुहाने आता त्र्यंबक रोडकडे मोर्चा वळविला असून ‘ग्रीन रिव्हॉल्युशन’ची मुळे आता कळवण, सिन्नर, इगतपुरीपर्यंत घट्ट रोवली जात आहेत. शहरात पाच हजारांहून अधिक झाडे जगविण्यात आणि वाढविण्यात या समूहाला यश आले असून नाशिकला हिरवेगार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक अशा उच्चशिक्षितांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा वापर अनेकजण केवळ टाइमपाससाठी करीत असताना ग्रीन रिव्हॉल्युशन चळवळीला या व्हॉट्सअॅपमुळेच बळ मिळत आहे. दीड वर्षांपूर्वी अवघ्या आठ-दहा जणांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या पर्यावरण संवर्धनाचा वेलू आता खऱ्या अर्थाने गगनाकडे झेपावू लागला आहे. अत्यंत रूक्ष, भकास चुंचाळे टेकडीवर वृक्षारोपण करण्याचा निर्धार काही डॉक्टर्स मंडळींनी केला. खड्डे खोदण्यापासून ते झाडांना खते आणि पाणी टाकण्यापर्यंतची सर्व कामे या मंडळींनी केली. साडेसहा हजार खड्डे खोदून त्यामध्ये रोपे लावण्यात आली. त्यापैकी ८० टक्के रोपे जगली आहेत. समूहातील सदस्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवसही वृक्षारोपणानेच साजरे केले जात असून, वर्षभर खते, पाणी पुरविण्याचा खर्च हा समूह स्वयंस्फूर्तीने करीत आहे. झाडांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी येथे पगारी वॉचमन नेमण्यात आला आहे. कळवण, अभोणा, सिन्नर, इगतपुरी तालुक्यातही ही चळवळ पुढे नेणाऱ्या सक्रीय लोकांची फळी निर्माण झाली असून, ती उल्लेखनीय काम करू लागली आहे. त्र्यंबक रोडवरील मोकळ्या जागेत यंदाच्या वर्षी वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून, ही मोहीम जोमाने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प विविध क्षेत्रातील या एज्युकेटेड पिपल्सने केला आहे.

सुरुवातीला आठ-दहा लोकांनी पर्यावरण संवर्धनाची ही मोहीम हाती घेतली. आता शहरात ३०० हून अधिक लोक या चळवळीशी जोडले गेले आहेत. आर्थिक, शारीरिक तसेच अमूल्य वेळेद्वारे सर्वच सदस्य योगदान देत आहेत.
- डॉ. संदीप आहेर, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर्स एज बोट क्लबच्या २४ खेळाडूंची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोलकाता येथे होणाऱ्या विसाव्या सब ज्युनिअर व खुल्या राष्ट्रीय नौकानयन (रोर्इंग) स्पर्धेसाठी वॉटर्स एज बोट क्लबच्या २४ खेळाडूंची निवड झाली आहे.
५ ते ११ जून दरम्यान भारतीय नौकानयन संघटनेच्या मान्यतेने पश्चिम बंगाल नौकानयन संघटनेने कोलकाता येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे. याअगोदर झालेल्या स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंचे सराव शिब‌रि प्रशिक्षक अंबादास तांबे व अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे ते ३ जूनदरम्यान वॉटर्स एज बोट क्लब येथे झाले. या सराव शि‌बिराच्या तयारीवरून संघनायक पूजा जाधव व मयूर म्हसाळ यांनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघास पदक मिळवून देऊ अशी आशा व्यक्त केली.
संघास शुभेच्छा देताना माजी महापौर प्रकाश मते यांनी नियम‌ति सराव व मेहनतीच्या जोरावर या स्पर्धेत खेळाडू उज्वल यश संपादन करून यशाची परपंरा कायम ठेवतील, अशी अशा व्यक्त केली. यावेळी बोटक्लबचे संस्थापक माजी नगरसेवक विक्रांत मते, प्रशिक्षक अंबादास तांबे, अविनाश देशमुख, अनिल काकड, बापू मानकर, प्रताप देशमुख, मिल‌िंद कदम, रमेश मते, तुषार ठाकरे, शशिकांत टर्ले आदिंसह खेळाडू उपस्थित होते.

निवड झालेले खेळाडू
मुले डबल स्कल : अनिकेत कानमहाले, अक्षय कानमहाले
सब ज्युनिअर डबल स्कल : शंतनू पाटील, रोशन तांबे
सिंगल स्कल : सोमनाथ अहिरे
फोर : अनिकेत तांबे, वैभव माळी, चंद्रकांत काकड, मयूर म्हसाळ
मुली डबल स्कल : आर्या भोसले, सानिका तांबे
सब ज्युनिअर फोर मुली : वैष्णवी गलांडे, गायत्री गलांडे, निधी भोसले, वैष्णवी गाडेकर, सिद्धी खैरे, सिंगल स्कल मुली : पूजा सानप डबल स्कल मुली : जागृती शहारे, पल्लवी तांबे चॅलेंजर फोर मुली : पूजा जाधव, ऐश्वर्या शिंदे, धनश्री गोवर्धने, पूजा तांबे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्जाचे भूत गाडून टाका’

$
0
0

पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांनो कर्ज मुक्ती आंदोलनाचा वणवा आता पटला आहे. कोणत्याही नेत्याची वाट पाहू नका, कर्ज हाच तुमचा नेता आहे. याक्षणी कर्ज मुक्ती आंदोलन निर्णायक वळणावर पोहचले असून, आता माघारी फिरू नका. माघारी काहीही शिल्लक नाही. म्हणूनच सरकारच्या विरोधात पेटून उठा, ऐतिहासिक लढा उभारा आणि पिढ्यानपिढ्या छळणारे कर्जाचे भूत एकदाचे गाडून टाका, असा मौलिक आणि आक्रमक कानमंत्र शेतकरी संघटनेची मुलुखमैदान तोफ ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांनी दिला आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यात कर्ज मुक्ती, शेत मालाचा हमीभाव आदी मागण्यासाठी शेतकरी पोलिसांच्या लाठ्या खात आंदोलनाला धार देत आहेत. अशावेळी तथाकथित शेतकरी नेत्यांनी मांडवली करून संप थांबविण्याचे अपशकुनी पातक केले. त्यावर आक्रमकतेने नानांनी आपले विचार मांडले. शेतकऱ्यांनी यापुढे बँकेचे अधिकारी वसुली, जप्तीला आले तर शेतकरी महिला भगिनींनी त्यांना सामोरे जा. त्यावेळी एका हातात विळा कोयता घ्या तर दुसऱ्या हातात विषाची बाटली ठेवा, असे ते म्हणाले. कारण कर्ज मुक्ती मिळणे आणि सात बारा उतारा होणे हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. शेतकऱ्यांनो खबरदार! आत्महत्येचा विचारही मनात आणाल तर, असा वडिलकीचा इशाराही नानांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणार्कनगर थांब्यावर तिहेरी अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर बसथांब्याजवळ हॉटेल सयाजी पॅलेस येथे सिटी बस, मारुती वॅगनआर, रिक्षा असा तिहेरी अपघात झाला. अपघातात जीवितहानी झाली नसली तरी सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे.

कोणार्कनगर येथील सर्व्हिस रोडवर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आडगावकडून येणारी सिटी बस (एमएच ४०/८८६५), वॅगनआर (एमएच १५/ सीटी ८०३४) व रिक्षाचा तिहेरी अपघात झाला. सर्व्हिस रोडवर अनेक व्यावसायिक, रिक्षा थांबे यांनी अतिक्रमण केले आहे. रस्ता विस्तारीकरणात अनेक व्यावसायिकांना पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत शिक्षकांबाबत सरकार सकारात्मक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही संगीत आणि खेळांवर विशेष प्रेम आहे. शैक्षणिक धोरणांमध्ये या विषयांचा समावेश असावा याबाबत ते कायम आग्रही राहिले. भाजप सरकार या धोरणांपासून दूर जाणार नाही. संगीत शिक्षकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. संगीत शिक्षकांना राज्य सरकारही नक्कीच न्याय देईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आयोजित तीन दिवसीय संगीत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. महाजन म्हणाले, की वैयक्तिक जीवनात मलाही संगीत अतिशय आवडते. शालेय जीवनात काही काळ संगीत शिकण्याचाही प्रयत्न केला. संगीताचा सकारात्मक परिणाम मानवी मनावर नक्कीच होतो. यावेळी ज्येष्ठ संगीत साधक आणि संगीत शिक्षकांचा सन्मानही महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, भाजपाचे लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. या संमेलनांतर्गत सकाळच्य सत्रात पुण्यातील पं. विकास कशाळकर, बुलडाण्यातील डॉ. हरिभाऊ खंदारे, मुंबईचे चंद्रशेखर चिंचोले यांची व्याख्याने झाली. दुपारच्या सत्रात अनिल गुंजाळ आणि मिलन देव यांचे व्याख्यान झाले. सायंकाळच्या सत्रात साताऱ्यातील वरदा राजोपाध्ये यांचे गायन, साताऱ्यातील सुनील राजे यांचे तबलावादन, तर परभणी येथील कृष्णराज कलवेकर यांचे गायन पार पडले. त्याला उपस्थितांची उत्स्फूर्त दा लाभली.

दरम्यान, आज (दि. ५) संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सकाळी १० ते ११ या वेळेत संगीत सभेत डॉ. अविराज तायडे यांचे गायन, मिलन देव यांचे तबलावादन व पं. शंकरराव वैरागकर यांचे गायन होणार आहे. दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत रमाकांत पैंजणे व विजय बहाळकर यांचे व्याख्यान होईल. रसिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टाफ सिलेक्शनची परीक्षा ऐनवेळी रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/नाशिकरोड

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेण्यात येणारी मल्ट‌ि-टास्किंगची परीक्षा रद्द झाल्याची माहितीच न मिळाल्याने उमेदवारांना रविवारी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. शेतकरी संपामुळे तणावाचे वातावरण असतानाही जीव धोक्यात घालून परीक्षेसाठी नाशिक शहरात धाव घेणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. स्टाफ सिलेक्शनच्या या नियोजनशून्य कारभाराचा संतप्त उमेदवारांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविला.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने राज्यात आठ हजार ३०० जागांसाठी परीक्षेचे नियोजन केले होते. रविवारी मल्टि-टास्किंगची परीक्षा घेण्यात येणार होती. दुपारी दोन ते चार या वेळेत दीडशे गुणांचा पेपर होणार असल्याचे उमेदवारांना कळविण्यात आले होते. त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स व न्यूमेरिकल अॅप्टिट्यूड टेस्टचे प्रत्येकी २५, तर जनरल इंग्लिश व जनरल अवेअरनेसचे प्रत्येकी ५० गुणांचे पेपर होणार होते. केंद्रावर एक वाजताच हजर राहण्याची सूचनाही उमेदवारांना देण्यात आलेली होती. शेतकरी आंदोलन आणि पावसाचे वातावरण यामुळे रात्री प्रवास करून नाशिकसह, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील उमेदवार सकाळी आठपासूनच केंद्रांवर हजर झाले. परंतु, दुपारपर्यंत केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबतच्या कोणत्याच हालचाली न दिसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. नाशिकरोड आणि शालिमार परिसरातील केंद्रांवर परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी एकमेकांशी संपर्क साधल्यानंतर परीक्षेच्या नियोजनातील सावळा गोंधळ उघडकीस आला.

विद्यार्थ्यांना धक्का

नाशिकरोडच्या के. जे. मेहता हायस्कूल तसेच शालिमार येथील कन्या विद्यामंदिर व अन्य ठिकाणी ग्रामीण विद्यार्थी उपाशीपोटीच हजर झाले. केंद्रावर आल्यावर परीक्षा नसल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी हाल तिकीट दाखवून परीक्षा आजच असल्याचे सांगितले. मात्र, परीक्षाच नसल्याचे समजल्यावर त्यांनी केंद्रांवर आगपाखड केली. तथाप‌ि, शाळेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, आम्ही वर्ग उघडून दिले आहेत. स्टाफ सिलेक्शनचे प्रतिनिधी आलेले नाहीत. तसेच त्यांनी आदल्या दिवशी बेंचेसवर परीक्षा नंबरही टाकलेले नाहीत. अखेर स्टाफ सिलेक्शनकडूनच पेपर रद्द झाल्याचे समजल्यावर विद्यार्थी संतप्त झाले.


हेल्पलाइनच बंद

उमेदवारांना अडचण आल्यास संपर्कासाठी स्टाफ सिलेक्शनने हॉल तिक‌िटावर हेल्पलाइन फोन नंबर दिले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी या नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बंद असल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली. रद्द केलेला पेपर कधी घेतला जाणार हेदेखील समजण्यास मार्ग नव्हता. विद्यार्थ्यांच्या ई-मेल व फोनवर परीक्षा रद्द झाल्याचे कळव‌िता आले असते. परंतु, तसेही न केल्याने उमेदवारांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.


मी परीक्षेसाठी नांदगावहून मनमाडपर्यंत खासगी वाहनाने व तेथून नाशिकरोडपर्यंत रेल्वेने आलो. येण्याजाण्याच्या या प्रवासात माझा चारशे रुपये खर्च झाला आहे. परीक्षा रद्द झाल्याचे येथे आल्यावर समजल्याने मी केलेला खर्च वाया गेला. असे शेकडो उमेदवारांबाबत घडले. हा खर्च मला भरून मिळणार का?

- रवींद्र गोरडे, नांदगाव


चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस असतानाही आम्ही सकाळीच परीक्षा केंद्रावर हजर झालो. नाश्ताही केला नाही. पेपर रद्द झाल्याने पैसा, मेहनत, वेळ वाया गेली.

- सुनील गांगुर्डे, पिंपळद (चांदवड)

पेपर रद्द होण्याशी शाळेचा संबंध नाही. आम्ही स्टाफ सिलेक्शन परीक्षेसाठी शाळेचे केंद्र खुले करून दिले. लाइट-पाण्याची व्यवस्थाही केली. परंतु, परीक्षा घेण्यासाठी कोणी फिरकलेच नाही. पेपर रद्द झाल्याचे आम्हाला कळव‌िण्यात आले नव्हते.

- प्रवीण जोशी, सचिव, साने गुरुजी शिक्षण संस्था

स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा प्रक्रिया सुरळीत राबविणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. परीक्षा होणार नसल्याचे आम्हाला कळविण्यात आल्याने आम्ही वर्ग आरक्षित केले नाहीत किंवा कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती केली नाही. स्टाफ सिलेक्शन आयोगाने उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचवली की नाही याबाबत आमच्याकडे माहिती नाही.

- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी



असमन्वयाचा फटका उमेदवारांना

सरकारी नोकरीमधील विविध पदे भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेचे नियोजन करते. उमेदवारांचे अर्ज मागविणे, परीक्षेची दिनांक आणि वेळ निश्च‌ित करणे, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी बनवून त्यांना प्रवेशपत्र पाठविणे यांसारखी कामे स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या यंत्रणेकडून केली जातात. तर जिल्हा प्रशासन परीक्षा प्रक्रीया राबविण्यासाठी शाळा, महाविद्यालये आरक्षित करणे, कर्मचारी, अधिकाऱ्यांची तेथे नेमणूक करणे आणि परीक्षा प्रक्रीया शांततेत आणि अनुचित प्रकारांशिवाय पार पडावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे काम करते. स्टाफ सिलेक्शनची नियोजित परीक्षा ४ जून रोजी होणार नसल्याचे स्टाफ स‌िलेक्शन आयोगाने जिल्हा प्रशासनाला २७ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य ऊत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेपूर्वीच कळविले होते. मग हीच माहिती उमेदवारांपर्यंत का पोहोचली नाही, असा सवाल उपस्थ‌ित होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशननेच ही माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असले तरी जिल्हा प्रशासनह‌ी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ही माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवू शकले नसते का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगरूळ टोलनाक्यावर ट्रकला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मुंबई-आग्रा महार्गावर असणाऱ्या चांदवडनजीक मंगरूळ येथील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला भीषण आग लागून ट्रक जळून खाक झाला. सदर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी (दि. ४) झालेल्या या घटनेमुळे मालेगाव ते नाशिकदरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चांदवडजवळील मंगरूळ टोलनाक्यावर ट्रक (टी. एन. २४, एजी. २१७९) प्लास्टिक तयार करण्याची सामग्री घेऊन नाशिक येथून धुळ्याकडे निघाला होता. हा ट्रक टोलनाक्याजवळ टोल भरण्यासाठी आला असतानाच अचानक या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकने पेट घेतला व भीषण आगीने टोल नाक्यावर धुराचे साम्राज्य निर्माण झाले.

आग विझवण्यासाठी मनमाड, मालेगाव, पिंपळगाव, ओझर भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या ट्रकमध्ये युरिया प्लास्टिक तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल होता, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूविक्रीवर ‘वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५०० मीटर अंतरावर मद्य दुकानांना बंदी केल्यानंतर अधिकृतपणे दारुची विक्री घटली असून, अवैध दारूविक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रितपणे केलेल्या व करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेणार आहे.
याअगोदर राज्य उत्पादक शुल्क विभागाने अवैध दारुविक्रीविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. पण त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. त्याचप्रमाणे शासनाने ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. पण या सर्व उपायांतून अवैध दारूविक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नाशिक जिल्ह्यात १,११६ दुकानांपैकी केवळ ३५३ दुकाने सुरू असल्यामुळे या दुकानांत प्रचंड गर्दी होत आहे. अवैध दारूविक्रीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या दोन वर्षांतील एप्रिल महिन्यात दारूविक्रीचे आकडे याबाबतचे चित्र स्पष्ट करतात. नाशिक जिल्ह्यात या विक्रीत तब्बल ७० टक्क्यांहून अधिक घट झाली असून, त्यामुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा फटका बसला आहे. यामुळे सरकारने या अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी आता कडक पाऊले उचलली आहेत.
नावांसाठी समिती
महापुरुष वा गड-किल्ल्यांची नावे बिअरबार, परवाना कक्ष व दारूविक्री केंद्राला न देण्याबाबत राज्य शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात बदल करुन कायदा करणार आहे. यात १६ सदस्य असतील. त्यात कामगारमंत्री अध्यक्ष असणार आहेत. दुकानाच्या नावांबाबत कायदेशीर तरतूद नसल्याने ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

सर्वाधिक विक्री हायवेवरच

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वाधिक फटका हा हायवेजवळील बारला बसला आहे. त्यामुळे त्यांच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयाची गुंतवणूक केलेल्या अशा बारमधून अवैध पध्दतीने दारूविक्री केली जात आहे. या बारच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले नसताना याठिकाणी दारूविक्री केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवलियांच्या साहसपटांनी नाशिककर थक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जॉर्जियातील काझबेगी पर्वतावरील सायकलवीराचं थक्क करणारं साहस, गंगा नदीच्या उगमाचा थरारक शोध, हजारो फूट उंचावरून केलेली पॅराग्लायडिंग, गोठलेल्या धबधब्यांवर चढाई... अशी एकामागोमाग अनेक साहसपटांची मालिका नाशिककर श्वास रोखून अनुभवत होते. रोमांचित करणाऱ्या प्रसंगांवर ‘बापरे!’ हा शब्द नकळतपणे उमटून जावा, इतकी या साहसपटांची थरारकता होती. मात्र, यशाला गवसणी घातल्यानंतर उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात नाशिककरांनी या अवलियांच्या साहसाला मनसोक्त दादही दिली.

अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या धाडसी फिल्म्सची ही मेजवाणी नाशिककरांनी अनुभवली माऊंटन फिल्म फेस्टिव्हलमधून. वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने झालेल्या या दोन दिवसीय फिल्म फेस्टिव्हलचा समारोप रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात झाला. बाम्फ चित्रपट महोत्सवात निवडल्या गेलेल्या या वर्षातील खऱ्याखुऱ्या साहसावर आधारित २५ पैकी ११ चित्रपट रविवारी नाशिककरांना दाखविण्यात आले. जगातील २० देशांत ३५० हून अधिक शहरांमध्ये हे चित्रपट दाखविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून हा फेस्टिव्हल भरविण्यात येत असून, या फेस्टिव्हलने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हिमालयीन क्लबच्या अधिपत्याखाली या महोत्सववाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, टीजेएसबीचे संचालक योगश कनानी, वैनतेयचे संस्थापक अविनाश जोशी, गिरीश टकले, व‌िजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थ‌ितीत शनिवारी या फेस्टिव्हलचे उद््घाटन झाले.

फेस्टिव्हलमध्ये ‘रुइन अँड रोज’, ‘पौमाका’, ‘द रॉकी माऊंटेन ट्रेव्हर्स’, ‘यंग गन्स’, ‘मेट्रोमिक’, ‘अॅक द डेझर्ट डॉग’, ‘ट्रेल टू काझबेगी’ या फिल्म्स दाखविण्यात आल्या. लेह- लडाख भागातल्या पर्वतरांगा, गोठलेले धबधबे, कोकणकड्याची बेस्ट झेप, लोणावळा ड्युक्स नोजवर चित्रित केलेल्या फिल्म्स यांसारख्या १३ फिल्म्स दाखविण्यात आल्या. या फेस्टिव्हलचे उद््घाटन गोविंद दंडे अँड सन्सचे जनरल मॅनेजर याकूब शेख यांच्या हस्ते झाले. ‘द फॉल’, ‘मलबार कयाकिंग फेस्टीवल’, ‘पिट्टी’, ‘रायडिंग ऑन द एअर’, ‘इम्पॉसिबल इट्स ओन्ली इन युअर माइंड’, ‘गुड डिस्स कमबॅक’, ‘द गंगाज फर्स्ट बॉर्न’, ‘पॅनगाँग रिफ्लेक्शन्स’, ‘बावली बूच’, ‘पार्टनर्स इन क्लाइम्ब’ या फिल्म्सचा थरार उपस्थ‌ितांनी अनुभवला. तरुणांना साहसी खेळांबद्दल प्रोत्साहन मिळावे, हा या फेस्टिव्हलचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. मनोज बाग, राहुल सानवणे, भाऊसाहेब कानमहाले, प्रशांत परदेशी, संध्या बस्ते आणि सुदर्शन कुलथे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नेते आमने-सामने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सुमारे ६१ हजार सभासद असलेल्या नाशिकरोड- देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी व विद्यमान जिल्हाप्रमुख एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सत्तारूढ सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड पंधरा वर्षांपासून करीत आहेत. विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व यंदा शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर करीत आहेत. दोन्ही पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे.

बँकेचे अध्यक्ष गायकवाड आणि राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने गेल्या वेळी दणदणीत विजय मिळवला होता. श्री व्यापारी पॅनलने त्यांची विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. करंजकर यांच्या उपस्थितीत श्री व्यापारी पॅनलची रविवारी बैठक झाली. करंजकर यांनी सांगितले, की ६ जून रोजी भगूरच्या रेणुकादेवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. पॅनलचे नेते राजू लवटे, हेमंत गायकवाड, शंकर धनवटे, सतीश मंडलेचा, राजीव टर्ले, सुनील आडके, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सुनील बोराडे, मुकुंद आढाव, चंद्रकांत विसपुते, अजित गायकवाड, विलास पेखळे, शिरीष लवटे, गंगाधर उगले, शांताराम घंटे, प्रकाश गोहाड, योगेश नागरे, विक्रम खरोटे, श्याम गोहाड, सुदाम ताजनपुरे आदी उपस्थित होते. सहकार पॅनलचे संभाव्य उमेदवार दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, श्याम चाफळकर, सुरेश गायकवाड, सुधाकर जाधव, रामदास सदाफुले, मनोहर कोरडे, डॉ. प्रशांत भुतडा, जगन आगळे, दिनकर आढाव आदींनी नाशिकरोडला सभासदांची भेट घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तिसरे परिवर्तन पॅनल स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images