Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जेलमध्ये गुंजणार चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील मध्यवर्ती कारागृहात आता बंदिवानांच्या चिमुकल्यांच्या तोंडून बाराखडी अन् ए-बी-सी-डी, बडबडगीते अन् कवितांचे स्वर गुंजणार आहेत. राज्य शासनाचा महिला व बालकल्याण विकास विभाग आणि नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या मदतीने कारागृहाच्या आवारात अंगणवाडीचा श्रीगणेशा झाल्याने हे शक्य झाले आहे.

उच्च न्यायालयाने कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिकरोड कारागृहाच्या आवारातील छोट्या इमारतीत अंगणवाडी सुरू झाली आहे. जेलरोडच्या पवारवाडीतील सेविका भारती पवार आणि भारती जाधव लहान मुलांना अऩौपचारिक शिक्षण देणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी एक अशी अंगणवाडीची वेळ आहे. कैद्यांबरोबरच कारागृह कर्मचाऱ्यांची मुलेही येथे शिकणार आहेत. कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी अंगणवाडीचे उद्घाटन झाले. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, उपअधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस. ए. गिते, बी. एन. मुलानी, एन. वाय. गुजराथी, सोमय्या सय्यद, वामन निमजे, बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता जोशी, मुख्य सेविका सुज्ञा खरे, भारती पवार, एस. पी. जाधव, नानाजी सावंत, भारती पवार, भारती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुण्याच्या येरवड्यासह प्रमुख मध्यवर्ती कारागृहांत अंगणवाडी सुरू झाल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने कोर्टाच्या आदेशानुसार सरकारकडे प्रस्ताव पाठविला असला, तरी अद्याप पूर्तता बाकी आहे. त्यामुळे अंगणवाडीत कर्मचारी नेमता येत नसल्याने परिसरातील अंगणवाडीचे कर्मचारी जेलच्या अंगणवाडीसाठी देण्यात आले आहेत. नाशिकरोड जेलच्या अंगणवाडीत मुलांसाठी खेळणी आहेत. आता हिरवळ व अन्य झाडे लावण्यात येणार आहेत.

--

आकार अभ्यासक्रम लवकरच

बालविकास प्रकल्पप्रमुख योगिता जोशींनी ‘मटा’ला सांगितले, की कैद्यांच्या तीन ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आकार अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. त्यातून या मुलांच्या प्रशिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास केला जाणार आहे. काही कारागृहांत हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. अंगणवाडी सेविकाच हे प्रशिक्षण देणार आहेत. या मुलांना आरोग्य व अन्य सुविधाही दिल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये खेळासाठी सर्वोतोपरी मदत करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये खेळाचे टॅलेंट असून, संघटनांचे कामकाजही उत्तम आहे. येथील क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये व्यक्त‌शिः लक्ष घालून क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्वसान भारतीय ऑलिम्पिक क्रीडा महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी दिले.
भारतीय ऑलिम्पिक क्रीडा महासंघाचे सरचिटणीस आणि भारतीय खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष राजीव मेहता हे २८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी नाशिकमध्ये असल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकच्या विविध क्रीडा संघटना आणि क्रीडा संस्थांतर्फे कालिका मंद‌रि येथे त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कालिका देवी मंदिर ट्रस्टचे संचालक सुभाष तळाजिया आणि दत्ता पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी अशोक दुधारे आणि राजू शिंदे (तलवारबाजी), आनंद खरे आणि मनोज म्हस्के (व्हॉल‌बिॉल, कॅरम, टेनिस व्हॉल‌बिॉल, यशवंत व्यायामशाळा ) प्रशांत भाबड, शरद पाटील, विलास पाटील, (कबड्डी), विक्रम दुधारे, बाळासाहेब रणशूर, चिन्मय देशपांडे (चॉकबॉल), नितीन हिंगमिरे (मोटर स्पोर्टस आणि कंपनी स्पोर्टस), हेमंत पाटील, कैलास लव्हाड (क्रीडा संचालक), मीनाक्षी गिरी (टेनिस बॉल क्रिकेट), निर्मला चौधरी (क्रीडा शिक्षिका), छत्रपती पुरस्कारार्थी स्नेहल विधाते, मनोज कनोजिया (फुटबॉल ), भाविक भिडे (रॅकेट बॉल), कुणाल अहिरे (सेपक टकरा), मधुकर देशमुख (कार्फ बॉल), शशांक वझे (शिवसत्य क्रीडा मंडळ ), तसेच विविध खेळांचे राष्ट्रीय खेळाडू जय शर्मा, तन्मय कुलकर्णी, आयुष्य मानकर, शंतनू पाटील, राहुल फडोळ, साकेत परदेशी, विजय बनसोडे, शशांक साखला, अजय सोनवणे, मनोज खैरनार आदींचा गौरव करण्यात आला.
नाशिकमधील सर्व क्रीडा संघटना आणि संस्थांनी असेच काम करत रहावे, असे मेहता यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये आयोजित खो-खो स्पर्धांच्या आयोजनाचे कौतुकही केले. त्यांच्या समवेत भारतीय खो -खो असोसिएशनचे सचिव सुरेश शर्मा हेही उपस्थित होते. त्यांनीही नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात
काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही घडलो, तुम्ही केव्हा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप विविध प्रकारच्या सार्वजनिक समस्या सोडविण्याचे अतिशय प्रभावी साधन असून, याद्वारे मोठे समाधानही आम्हाला लाभत आहे. त्यामुळे आम्ही सिटिझन रिपोर्टर म्हणून घडलो आहोत, तुम्ही केव्हा सिटिझन रिपोर्टर होणार, असा सवाल सिटिझन रिपोर्टर्सनी नाशिककरांना केला.

दर आठवड्याप्रमाणे यंदाही मटा सिटिझन रिपोर्टर्सचा मटा कार्यालयात गौरव करण्यात आला. मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, या अॅपद्वारे सार्वजनिक समस्या, तक्रारी, अडी-अडचणी मांडण्याची सुविधा उपलब्ध आहे. मराठीतूनही समस्या पाठविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोटो आणि त्यासंबंधीची माहिती चुटकीसरशी पाठविणे या अॅपद्वारे शक्य होते. या सर्वसमस्यांना नाशिक प्लस पुरवणीत दररोज प्रसिद्धी दिली जाते. दर आठवड्याला निवडक सिटिझन रिपोर्टर्सला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. यंदा चंद्रकांत महाले, बाळासाहेब साळवे, विलास थोरात आणि प्रथमेश फाटक यांना ‘मटा’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.

रस्त्याशी संबंधित समस्या मी पाठविली होती. ती तातडीने प्रसिद्ध झाली. हे अॅप अतिशय चांगले आहे. इतरांनीही त्याचा उपयोग करावा.

- चंद्रकांत महाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट रुग्णालयातील शस्त्रक्रिया महागणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयातील गेल्या सात वर्षापासून असलेल्या विविध दरांत वाढ करण्यात आली. त्यात प्रामुख्याने छोट्या शस्त्रक्रियेसाठी ४०० ऐवजी ८००, मोठ्या शस्त्रक्रियेसाठी १५०० ऐवजी २५०० तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीसाठी ७५० ऐवजी एक हजार रुपये दर ठरविण्यात आले असून, याशिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शालेय विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच गणवेश पहिल्याच आठवड्यात देण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.

बोर्डाची सभा कॅन्टोन्मेंट कायदा २००६ च्या कलम ३९ अन्वये पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांच्या अनुपस्थित उपाध्यक्ष दिनकर आढाव यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सभेस नगरसेवक प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, कावेरी कासार, बाबुराव मोजाड, मीना करंजकर यांसह लष्कर नियुक्त सदस्य ब्रिगेडियर एस. एम. सुदुंबरेकर, मेजर पीयूष जैन, कर्नल संजय कपूर, कमलेश चव्हाण, सीईओ विलास पवार आदी उपस्थित होते.

यावेळी प्रथमच शालेय विद्यार्थ्यांच्या विषयावर बोर्डाने गांभीर्याने चर्चा करताना कॅन्टोन्मेंट शाळेच्या बालवाडी ते दहावीपर्यंतच्या २१०० विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, बॅग, ड्रेस, बुट आदी साहित्य शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याशिवाय देवळालीतील रुग्णालयातील समस्या लक्षात घेऊन नवीन कर्मचारी व डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासह त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वेतन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोर्डाच्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती करताना सुरक्षारक्षक मंडळाऐवजी ई-टेंडर पद्धतीने स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावा. सेफ्टी टँकच्या स्वच्छतेसाठी असलेले दर बदलण्यात आले असून त्यात एका घरासाठी १६०० रुपये तर दोन ते दहा घरांच्या सोसायटीसाठी २ हजार रुपये, ११ ते २० घरांसाठी ४ हजार व त्यापुढील घरांसाठी ५ हजार रुपये याशिवाय व्यावसायिकांसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये दर ठरविण्यात आले असून त्यात हॉटेल, सलून, लॉन्स आदींचा समावेश आहे. बोर्डाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी महत्वपुर्ण विषयावर सभेत चर्चा करण्यात आली. गत वर्षी बोर्डाने ४४ कोटीचा अर्थसंकल्प तयार केला होता. चालू वर्षी तो ६४ कोटींचा राहणार असून यामध्ये नगरसेवकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यासाठी वेळ देण्यात येणार असून तदनंतर अंतिम अर्थसंकल्प प्रिन्स‌िपल डायरेक्टर यांच्यामार्फत ‘जीओसी इन चीफ’ यांच्याकडे पाठविला जाणार असून त्या ठिकाणी दक्षिण विभागाच्या १९ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मंजूर केला जाणार आहे. बोर्डाची सभा आता लागोपाठ होऊ लागल्याने शहर विकासाच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. कालच्या सभेत उपाध्यक्ष आढाव यांच्यासह नगरसेवक कटारिया, ठाकरे व मोजाड यांनी महत्वपुर्ण मुद्दे मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावची आयुषी राज्यात प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाचा इयत्ता दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात ९८ टक्के गुण मिळवत नाशिक शहरातून सिम्बायसिस स्कूलचे तीन विद्यार्थी शहरात टॉपर ठरले आहेत. तर, आयुषी राजेंद्र पायघन ही रूस्तूमजी विद्यालय, जळगावची विद्यार्थिनी राज्यात ९९.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तिने ५०० पैकी ४९८ गुण मिळवून उच्चांक प्रस्थापित केला आहे.

अनेक शाळांनी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचे टॉपर विद्यार्थी जाहीर केले नसले तरीही हाती मिळालेल्या माहितीनुसार सिम्बायसिस स्कूलचे तीन विद्यार्थी शहरात टॉपर ठरले आहेत. यामध्ये सार्थक भट, दिव्यश्री तांबडे आणि रिया गुळवे या तीनही विद्यार्थ्यांनी ९८ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या पाठोपाठ शंतनु देसले व अलिशा काळे यांनी ९७.४ टक्के गुण मिळवित दुसरा क्रमांक पटकाविला. तेजल जाधव हिने ९७.२ टक्के गुण मिळवित तिसरा क्रमांक मिळविला. दर्शन प्रमोद गायकवाड याने सीजीपीए १० पैकी १० गुण मिळविले. त्याला ९५ टक्के गुण मिळाले. सिम्बायसिस स्कूलचे सर्व १२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दिल्ली पब्लिक स्कूलमधून चारू सिंग प्रथम

दिल्ली पब्लिक स्कूलमधून चारू सिंग या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९५ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. रचना शिंदे व अनिरिध्द केंगे यांनी ४९१ गुण मिळवून ‌व्दितीय क्रमांत, तर त्रिधा अय्यर हिने ४९० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला. या शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे.

सूर्यवंशी स्कूलमधून अमरिक सिंग प्रथम

किशोर सूर्यवंशी स्कूलमधून ३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. याही शाळेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. ३८ पैकी ३४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्याची माहिती स्कूलने दिली. या शाळेतून अमरिक सिंग हा विद्यार्थी १० सीजीपीए गुण मिळवून प्रथम आला. ओजस्वीनी सूर्यवंशी हिने ९.८ सीजीपीए गुण मिळवून व्दितीय आक्रमांक पटकाविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० वर्षांत प्रथमच सटाण्याचा बाजार बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शेतकरी संपात सहभागी होत शनिवारी सटाणा शहरात अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. शहरातील आठवडेबाजार तब्बल ८० वर्षांनंतर प्रथमच बंद ठेवण्यात आला.

दरम्यान, सकाळी बंदचे आवाहन करण्यासाठी उतरलेल्या सुमारे १२ ते १५ युवकांवर सटाणा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, तालुक्यातील नामपूर येथेही कडकडीत बंद ठेवून ५०० किलो केशर आंबा वाहून नेणाऱ्या वाहनाचे नुकसान करून आंबा रस्त्यावर फेकण्यात आला.

शेतकरी संपाला साथ देण्यासाठी आठवडेबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार होते. मात्र तरीही व्यापाऱ्यांनी शनिवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळला. परिणामी बाहेरगावाहून येणारे भाजीपाला विक्रेते तसेच अन्य किरकोळ विक्रेते आले नाही. पोलिसांनी सकाळपासून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे भूमिका घेतली. दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करणाऱ्या पंधरा युवकांवर पोल‌िसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन लग्नसराईत फुलबाजार ठप्प

0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्या लग्नसराई सुरू असल्याने फुलांना प्रचंड मागणी आहे. पण शेतकऱ्यांच्या संपामुळे फुलांची आवक पूर्णतः बंद झाली असून, फुलांचे दरांमध्ये तब्बल दुप्पट ते चौपट वाढ झालेली पहायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आवक ठप्प झाल्याने फुल विक्रेत्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

फुलांच्या विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सराफ बाजारामध्ये शनिवारी (दि. ३) शुकशुकाट पहायला मिळाला. शेतकरी संप मिटला असला तरीही आवक ठप्प झाली असून, याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थेट शेतावर जाऊन माल खरेदी करत फुलांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली. व्यापारी थेट शेतकऱ्याच्या दारात जाऊन माल खरेदी करत आहे. मांडसांगवी, येवला, ओझर, दिंडोरी, निफाड या ठिकाणी व्यापारी माल खरेदी करण्यास प्राधान्य देत असून, किरकोळ फुल विक्रेत्यांनाही आपल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी नाइलाजास्तव चढ्या किमतीने फुले खरेदी करावी लागत आहे.

जून महिन्याच्या पंधरवड्यात अनेकांचा वाढदिवस असतो. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी वाढदिवसाच्या ऑर्डर घेतल्या होत्या, पण आवक बंद असल्याने त्यांना चढ्या दराने फुले विकत घ्यावी लागत असून, ना नफा ना तोटा या तत्त्वावर व्यवसाय करण्याची वेळ फूल विक्रेत्यांवर आली आहे. टाटा गुलाब, जरबेरा, झेंडू, मोगरा यांसह सर्वच फुलांच्या दरात दुप्पट ते चौपट वाढ झाली आहे. लग्नसराई आणि वाढदिवस यांमुळे फुलांना प्रचंड मागणी असूनही पुरवठा नसल्याने ग्राहक व विक्रेते मात्र हवालदिल झाले आहे.

झेंडू चौपटीने वधारला

नेहमी ५० ते ६० रूपये दराने मिळणारे झेंडूचे कॅरेट सध्या २०० ते २५० रुपयांना मिळत आहे. सर्व फुलांमध्ये झेंडू सर्वात जास्त मागणी असते. कुठलाही सण-उत्सव नसूनही झेंडूने दोनशेचा भाव गाठला आहे. आपल्या पूर्व नियोजित ऑर्डर पूर्ण करण्यासाठी विक्रेत्यांना

मात्र चढ्या दराने झेंडू खरेदी करावा लागत आहे.

--------------------

शेतकऱ्यांच्या संपामुळे आवक पूर्ण बंद झाली असून, तोटा सहन करून फुलविक्रीचा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. शेतकरी संप मिटला असली तरीही आवक कधी पूर्ववत होईल याविषयी संभ्रम आहे.

- विक्रम मंडलिक, फुल विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमालासाठी कॉरिडोर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी संप लोकशाही मार्गाने करावा. पण, जर कोणी कायदा हातात घेतला व हिंसक पद्धतीचे आंदोलन केले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिला. ज्यांना शेतमाल बाहेरगावी पाठवायचा आहे त्यांच्यासाठी सुरक्षा कॉरिडोर तयार करण्यात आला असून, त्यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात संपाच्या वेळी मालेगाव येथील राहुड घाटात दूध रस्त्यावर फेकत असताना पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल चार पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचे, तसेच तलाठी व एका पोलिसपाटलावर कारवाई केल्याचेही सांगितले. या संपात हिंसक घटना करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या रविवारी उघड्या ठेवण्याचे निर्देश दिले असून, वाशी येथील बाजार समितीसुद्धा सुरू राहणार आहे.

या संपकाळात जिल्ह्याबाहेर शेतमाल व दुधाचे १९४ ट्रक पोलिस संरक्षणात बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुधाची टंचाई निर्माण झाल्यानंतर ११ टँकर शहरात दाखल झाले आहे. ज्यांच्याकडे स्टोअरेज नाही व त्यांना शेतमाल विकायचा आहे, त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधल्यास त्यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे. ही सेवा २४ तास सुरू राहणार असून, त्यासाठी कंट्रोल रूमची व्यवस्था आहे. ज्यांना माल विकायचा नाही त्यांच्यावर आम्ही बळजबरी करणार नाही. गेले दोन दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होती. पण, आवक नव्हती. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. पण, आता सर्व सुरळीत असल्याचेही ते म्हणाले. शेतमाल विक्रीसाठी पाठवण्यासाठी व्यापारी, शेतकरी व मालवाहतूकदारांची बैठक घेतली असून, त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. कोणीही घाबरू नये. ज्यांचा माल तयार असेल त्यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे. पण, त्यांनी शाॅर्टकटचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हा पोलिसप्रमुख अंकुश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांनी संपाबाबत सकारात्मक निर्णय घेतले असून, बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. पण, त्याबाबत कोणी संमत नसेल, तर त्यांच्या संपर्कात आम्ही राहणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

--

मध्यरात्री १२ वाजता बैठक

व्यापारी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. त्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आम्ही चांदवडसह इतर भागातही पाहणी केली. पोलिसांची रात्रीची गस्त वाढवली आहे. त्यामुळे कोणतेही गालबोट लागू नये याची खबरदारी घेतली जात आहे.

--

कर्जाची स्थिती

जिल्ह्यात सहा लाख ७७ हजार ६८८ शेतकरी खातेदार आहेत. त्यात विविध कार्यकारी सोसायटीचे ६ लाख ३७ हजार ४९९ सभासद आहेत. त्यातून ३ लाख ८४ हजार ५२० शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. २ लाख १७ हजार ६३० शेतकऱ्यांनी मागील वर्षात कर्ज घेतले. पण, भरले नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संस्कृतिसंवर्धन अन् आनंदोत्सवाची लयलूट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीचा सहावा वर्धापन दिन येत्या गुरुवारी (दि. ८ जून) साजरा होत आहे. त्यानिमित्त ‘मटा’तर्फे वाचकांसाठी विविध सांस्कृतिक आणि अन्य भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निष्पक्ष वृत्तपत्र’ अशी वाचकांच्या पसंतीची पावती मिळविणारा ‘मटा’ नाशिकमध्ये ८ जून रोजी सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त ८ जून ते १३ जून या कालावधीत विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे.

--
बहारदार नाट्यप्रयोग ९ जून

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘दोन स्पेशल’ हे बहारदार नाटक होणार आहे. ह. मो. मराठे यांच्या न्यूज स्टोरी कथेवर आधारित अथर्व थिएटर्सचे हे नाटक असून, लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, निर्माता संतोष भरत काणेकर, जितेंद्र जोशी आहेत. या नाटकात गिरिजा ओक-गोडबोले, रोहित हळदीकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रात्री ९ वाजता हे नाटक होणार असून, कल्चर क्लब मेंबरसाठी ३०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे. जे कल्चर क्लबचे नवीन मेंबर होतील त्यांच्यासाठी एक कपल पास मोफत देण्यात येईल. ज्यांना नाटक बघावयाचे आहे, परंतु मेंबर नाही, अशा वाचकांसाठी तिकीट बुकिंगची स्वतंत्र व्यवस्था कालिदास कलामंदिर येथे राहील.

स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर

दिनांक : ९ जून

वेळ : रात्री ९ वाजता

-------------------------

मटा आर्ट फेस्टची रंगत १० व ११ जून

मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. मटा वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये होणार आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदितांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, हा या मटा आर्ट फेस्टचा उद्देश आहे.

दिनांक : १० व ११ जून

स्थळ : मविप्र अार्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ

वेळ : सकाळी ९ पासून

--------------------------

बच्चेकंपनीसाठी चित्रकला स्पर्धा १२ जून

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पहिला गट ५ वी ते ७ वी व दुसरा गट ८ वी ते १० वी असे विभाग करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी स्मार्ट सिटी हा विषय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे.

दिनांक : १२ जून

स्थळ : मते लॉन्स, सावरकरनगर

वेळ : सकाळी ९ ते ११

-----------------------------

झुम्बा वर्कशॉपद्वारे थिरकण्याची संधी १३ जून

अखिल भारतीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या हॉलमध्ये झुम्बा वर्कशॉप होणार आहे. या वर्कशॉपमध्ये प्रतीक हिंगमिरे मार्गदर्शन करणार असून, वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनसाठी कमलेश घरटे (मोबाइल- ७०४०७६२२५४) यांच्याशी संपर्क साधावा.

दिनांक : १३ जून

स्थळ : अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण संस्था हॉल, पाण्याच्या टाकीजवळ, त्र्यंबकरोड

वेळ : सायंकाळी ५ ते ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस थांबा ‘मौत का कुआँ’

0
0

थांबा हटविण्याची मागणी असतानाही दुसऱ्याचे काम सुरू

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर चौकात शुक्रवारी (दि. २) सायंकाळी एका गरीब महिलेचा खासगी प्रवाशी बसच्या धडकेने मृत्यू झाला. या आधीही येथे अनेक मृत्यू झाले असून, यानिमित्ताने उपनगर चौकाचा तसेच बस थांब्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बस थांबा हटविण्याची मागणी असताना शेजारी दुसरा बस थांबा तयार केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी हा उपनगरचा मौत का कुआँ झाल्याचे चित्र समोर येत आहे.

उपनगरचा चौक महामार्गावर असल्याने रात्रंदिवस येथे वाहतूक सुरू असते. बस, ट्रकबरोबरच अवजड वाहनेही लोकांच्या जिवाची परवा न करता चौकातून वेगाने धावत असतात. दुचाकीवर कुटुंबीयांसह जाणाऱ्या जवानाचा अडीच वर्षांपूर्वी ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला होता. त्या अगोदर पतीबरोबर स्कुटरवर जाणारी महिला बस खाली ठार झाली होती. या चौकात असे अनेक अपघात झाले आहेत. किरकोळ अपघात तर नियमित होतच असतात. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देत त्याची दखल घेणे आवश्यक झाले आहे. अपघातांची संख्या वाढल्यानंतर तीन वर्षांपूर्वी चौकात सिग्नल कार्यान्वित करण्यात आला. अपघातावर नियंत्रण येईल अशी अपेक्षा होती. परंतु, वाहनचालक सिग्नलचे नियम पायदळी तुडवून वाहने दामटतात. पादचारीही घाईत रस्ता ओलांडतात. उपनगरहून जय भवानीरोडकडे जाण्यासाठी आता जेतवननगरजवळून जावे लागते. हे अंतर टाळण्यासाठी रिक्षा व दुचाकी चालक जिवाशी खेळत बस स्टॉपशेजारील प्रतिबंध असलेल्या मार्गाने जय भवानीरोडकडे जातात. त्यातच पोलिस नसल्यामुळे कोणालाच धाक राहिलेला नाही. त्यामुळे अपघात होत आहेत.

आंदोलने निरुपयोगी

उपनगर चौकात खासदार निधीतून बस थांबा उभारण्यात आला आहे. द्वारकेकडे जाणाऱ्या बस या थांब्यावर थांबतात. त्यामुळे हिरवा सिग्नल असतानाही वाहतूक ठप्प होते. अपघात झाल्यानंतर मोठी कोंडी होते. हा थांबा हटविण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. निवेदने देण्यात आली. मात्र, खासदार निधीतील हा थांबा असल्याने प्रशासनाने तो हटविण्यास असमर्थता दर्शवली. उलट हा बसथांबा कायम ठेऊन आता शेजारी दुसरा थांबा उभारण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर नाशिकरोडच्या टिळकपथाचे डांबरीकरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोरून बिटको हॉस्पिटलकडे जाणाऱ्या टिळकपथाचे अखेर डांबरीकरण झाल्याने नागरिक आणि व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, त्याचबरोबर रस्ता रुंद न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या समोर उड्डाणपूल असून, तो ओलांडल्यावर जो रस्ता आहे तो आहे टिळक पथ. या मार्गे बिटको हॉस्पिटल, वास्को चौक येथे जाता येते. या मार्गावर व्यावसायिकांची दुकाने असून, अनेक वर्षांपासून टिळक पथावर खूप खड्डे पडलेले होते. रस्ताही उखडलेला होता. त्यामुळे अपघात होत होते. वाहन रस्त्यावरून गेल्यास धूळ व्यावसायिकांच्या दुकानात यायची. पादचारी व ग्राहकांनाही त्याचा त्रास व्हायचा. आता रस्ता तयार झाल्याने हा त्रास कमी होणार आहे.


टिळक पथाचे काम थातूरमातूर केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डांबरीकरण अपेक्षित दर्जाचे झालेले नाही तसेच रस्ता रुंद न केल्यामुळे वाहन चालवणे अवघड होते. त्यातच व्यावसायिकांकडे आलेले ग्राहक वाहने टिळक पथावर उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. रस्ता डांबरीकरण उपयोग नाही तर रुंदीकरण गरजेचे असल्याचे व्यावसायिक व वाहन चालकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची जोरदार सलामी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळवाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गारांसह झालेल्या या मुसळधार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. मुंबई नाका, काठे गल्ली, आयटीआय सिग्नलसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर इंदिरानगर येथे मोबाइल टॉवर कोसळल्याची घटना घडली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. नेहमीप्रमाणे अनेक चौकांत पाणी तुंबले. या पावसामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले. तब्बल अर्धा तास झालेल्या या पावसाची ४८ मिमी नोंद झाली आहे. या पहिल्याच पावसामुळे विद्युत वितरण कंपनीच्या मान्सूनपूर्व कामाचेही पितळ उघडे पडले. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंड‌ति झाला, तर सिडको भागात विद्युत उपकरणे जळाल्याच्या घटना घडल्या.
दुपारी सुरू झालेल्या या पावसामुळे चौकात पाणी साचल्यामुळे महानगरपालिकेने काही ठिकाणी कामे तातडीने या पाण्याला वाट मोकळी करुन दिली. अचानक आलेल्या या पावसाने दुचाकीस्वाराचे चांगलेच हाल झाले. चारचाकी वाहनांनाही या पावसामुळे आपला वेग कमी करावा लागला. पावसाच्या माऱ्यामुळे अनेकांनी झाडांचा आश्रय घेतला. कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोक स्तंभ, घारपुरे घाटासह ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. शहरातील मैदानांवरही पाणी साचले. तरुणांनी आणि बच्चे कंपनीने या पावसाचा मनसोक्त आनंद घेत घेतला.
पंचवटीत गारा
पंचवटीः पंचवटीसह म्हसरुळ, मखमलाबाद परिसरात दुपारी अडीचच्या सुमारात गारांसह पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली. जोरदार वाऱ्यासह गाराही पडल्या. पंचवटी परिसरातील अनेक रस्त्यांवर तसेच मोकळ्या मैदानांमध्ये पाणी साचले होते. गारा पडल्याने द्राक्षाच्या काड्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

वीज कोसळून पाहुणा युवक ठार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात शनिवारी (दि.३) दुपारी झालेल्या पावसादरम्यान लघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या पाहुण्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना मुंबई-आग्रा हायवेवरील रायगडनगर येथे घडली.
विठू कमळू उघडे (२५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव देवाची वाडी येथील रहिवासी असलेले उघडे दोन दिवसांपूर्वी रघुनाथ किसन शिंदे यांच्याकडे पाहुणचारासाठी आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रायगडनगर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पाऊस बंद झाल्यानंतर उघडे लघुशंकेसाठी घराबाहेर पडले. यावेळी मोठ्या कडकडाटासह अचानक विजेचा लोळ त्यांच्या अंगावर कोसळला. विजेचा प्रचंड धक्का बसल्याने उघडे यांच्या अंगावरील कपड्यांच्या चिंधड्या झाल्या. तसेच ते गंभीर भाजले. सोनू शिंदे यांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाहतुकीचा बोजवारा

नाशिक ः पहिल्याच पावसानंतर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसच नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
शहराबाहेर शेतकरी आंदोलन आणि शहरात पावसाचा जोर यामुळे दिवसभर वाहतूक विस्कळीत राहिली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गडकरी चौकात सीटू संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी द्वारकाकडून गडकरी चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी एकेरी मार्गाचा पर्याय वापरण्यात आला. मात्र, यामुळे मुंबई नाका ते अशोक स्तंभ या रस्त्यावरील सर्व ट्रॅफिक सिग्नल विस्कळीत झाले. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. दुपारनंतर शहरात मेघांनी गर्दी केली. सर्वत्र काळोख दाटून आला आणि वाऱ्याचा वेग जोरात होता. यामुळे बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडली. उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल चौकातील सिग्नल दिवसभर बंदच होते. बराच वेळ वाहतूक पोलिस हजर नसल्याने काही वेळ स्थानिक नागरिकांनी वाहतूक नियमनाचे काम केले. मात्र, वाहनचालकांना पुढे जाण्याची घाई असल्याने गोंधळ उडत होता. चार वाजेच्या सुमारास द्वारका सर्कल येथेही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. तब्बल तासाभरापेक्षा अधिक वेळ येथे वाहने अडकून पडली. शहरातील इतर ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती बघण्यास मिळाली. या बाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्याच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. नवीन कर्मचारी हजर होत असून, जुन्या कर्मचाऱ्यांना टप्प्या टप्प्याने रिल‌व्हि करण्यात येत आहे. शहर तसेच शहराबाहेर सुरू असलेल्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्यात बरेच कर्मचारी अडकून पडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन होणार आणखी तीव्र

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सरकारने मूठभर लोकांना हाताशी धरून संप मागे घेण्याची घोषणा केली. हा संप संपूर्ण राज्याचा आहे. बंद खोलीत चर्चा करून संप मागे घेण्याची घोषणा शेतकऱ्यांना मान्य नाही. सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जोपर्यंत सरकार पूर्ण मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा निर्णय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये झालेल्या शेकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

सरकारला जर चर्चा करायची असेल तर त्यांनी आपल्याकडे यावे, आपण त्यांच्याकडे जायचे नाही, ही चर्चा लाइव्ह झाली पाहिजे बंद खोलीत नको. संपाची दिशा ठरविण्यासाठी रविवार (दि. ४) दुपारी चार वाजता नाशिक बाजार समिती बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. शेतकरी एकजुटीचा विजय असो, कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्त तैनात होता. काही पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांना जाब विचारताच पोलिसांनी नरमाइची भूमिका घेतली.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. मात्र, कोणत्या मागण्या मान्य केल्या ते सांगितले जात नाही. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. संप शंभर टक्के यशस्वी होत असल्याने त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून हा संप असाच सुरू ठेवायचे असे ठरविण्यात आले. बैठकीस अमृता पवार, करण गायकर, वसंत ढिकले, चंद्रकांत बनकर, हेमलता पाटील आदी उपस्थित होते. संप मिटला असे समजून बाजार समितीच्या दक्षिणेला असलेल्या काही व्यापाऱ्यांनी डांबर, मिरची आदी शेतमाल विक्रीसाठी ठेवला होता. बैठकीस आलेल्या शेतकऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी अजून संप सुरू आहे, असे सांगून डांबर फेकण्यास सुरवात केली. व्यापाऱ्यांनी विनंती केल्यानंतर हा प्रकार थांबला. पोलिस आणि बाजार समिती संचालक जगदीश अपसुंदे यांनी मध्यस्थी केली.

भाऊ सीमेवर, अन् बाप पोटासाठी मरतो

उच्चभ्रू वर्गातील कुणी देशाच्या संरक्षणासाठी जात नाही. सैन्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले आहेत. एकीकडे देशाच्या सीमेवर आमचा भाऊ मरतो आणि दुसरीकडे लोकांचे पोट भरण्यासाठी आमचा बाप मरतोय. अशा प्रकारच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

लोकप्रतिनिधी परतले...

शेतकरी संप सुरूच ठेवायचा असा निर्धार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, वसंत गिते हे बाजार समितीत आले. मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ते येताच बैठकीच्या ठिकाणाहून शेतकरी बाजूला निघून गेले. लोकप्रतिनिधींचे कुणी काही ऐकून घेत नसल्याचे दिसताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात असंतोष कायम

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चाच्या पुणतांबा येथील कोअर कमिटी सदस्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आल्याचे बोलले जात असले तरी, शनिवारी तालुक्यातील शेतकरी संपाची धग कायम होती. तालुक्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी काढलेला तोडगा मान्य नसल्याचे सांगत शेतकरी संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह गावोगावच्या शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शनिवारी तालुक्यातील भारम येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात येवून भरचौकात या दहन करण्यात आले.

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक आंदोलनामुळे राज्यभर महाचर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात शनिवारीही शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चातील पुणतांबा येथील सदस्यांमध्ये तब्बल चार तास झालेल्या चर्चेअंती सरकारने शेतकऱ्यांच्या संपातील मागण्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याचे सांगत शेतकरी संप मागे घेतला गेल्याचेही बातम्या पुढे आल्या. असे असले तरी शासनाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पुरेशे नसल्याचे सांगत येवल्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी देखील असमाधान व्यक्त केले. पुणतांबा म्हणजे सर्व महाराष्ट्र नव्हे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याची गरज आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.

शनिवारी तालुक्यातील धूळगाव येथे शेतकऱ्यांनी आंबे घेऊन जाणारा एक मालट्रक रस्त्यातच आडविला होता. सायगाव येथे शनिवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी दूध आणि कांदे रस्त्यावर ओतून घोषणा दिल्या. सरकारने शेतकरी आंदोलनाची घोर निराशा केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

भारम येथे शनिवारी मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. मुख्य चौकात या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गावातील शनिवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. शेतकऱ्याचा सात बारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी संप चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

बाजार समितीत शुकशुकाटच

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात देखील शनिवारी शुकशुकाट होता. पिंपळगाव जलाल टोलनाका परिसर शनिवारी शांत होता. प्रांताधिकाऱ्यांनी या परिसरात दिलेला जमावबंदीचा आदेश आणि पोल‌सि अधिकाऱ्यांसह तैनात केला होता. या भागात दिवसभर शांतता होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या डीपीचा बालकांना धोका

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील सावरकरनगरमधील डीपीजवळील उद्यानाची जाळी काढल्यामुळे तेथे खेळणाऱ्या लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना होण्याआधी येथे जाळी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जेलरोडवरील महापालिका उप कार्यालयाशेजारी महापालिकेचे गार्डन आहे. त्याला चोहोबाजूंनी जाळीसह संरक्षक भिंत उभारण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी गार्डनमध्ये प्रवेशासाठी पश्चिम आणि दक्षिणेकडे दरवाजे आहेत. तरीही टवाळ मुलांनी उत्तरेकडील जाळी काढून अनाधिकृत दरवाजा केला आहे. येथेच विजेची डीपी आहे. या दरवाजातून क्रिकेट खेळण्यासाठी ही मुले आत जातात. अन्य मुले रात्री गप्पा मारण्यासाठी या दरवाजाचा वापर करतात. तर मद्यपींनाही या चोर दरवाजाचा उपयोग होतो.

अपघाताची भीती

डीपीला चिकटूनच ही जाळी होती. ती काढल्याने डीपीची मागील बाजू उघडी पडली आहे. त्या शेजारीच वीजेच जाड वायर आहे. लहान मुलेही या चोर मार्गाचा वापर करु लागली आहेत. डीपीला धरून ते गार्डनमध्ये जातात. अशावेळी विजेचा धक्का लागण्याची भीती आहे. ही डीपी तीन वर्षे उघडी होती. वारंवार तक्रार करूनही तिला दरवाजा बसविण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांनीच तिला प्लॅस्टिकचे झाकण लावले होते. आता महावितरणने दरवाजा लावल्याने डीपी सुरक्षित झाली आहे. तथापि, डीपीच्या मागून लहान मुले, युवक जात असल्याने दुर्घटनेची भीती आहे.

या गार्डनमध्ये मारुती आणि जंगलीदास महाराजांचे मंदिर आहे. शनिवार व गुरुवारी तेथे गर्दी असते. गार्डनमध्ये पूर्वी थोडीफार झाडे व खेळणी होती. तीन-चार वर्षांपासून गार्डनची पार दुरवस्था झाली आहे. येथे बसण्यासाठी बाक नाहीत. खेळणी गायब झाली आहे. पाण्याअभावी झाडे वाळून गेली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅनडा कॉर्नरला चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वालाख रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही धक्कादायक घटना कॅनडा कॉर्नर परिसरातील वसंत मार्केट भागात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालिनी उत्तमराव पाटील (वय ५५, रा. कारवा बिल्डिंग, वसंत मार्केट) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पाटील यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. गल्लीत उभ्या असलेल्या घंटागाडीत कचरा टाकून त्या आपल्या इमारतीकडे परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. भरधाव वेगात आलेल्या पल्सरस्वाराने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडले. पाटील यांनी आरडाओरड केली. मात्र, चोरट्यांनी भरधाव वेगात धूम ठोकली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत.

--

बनावट धनादेशाद्वारे फसवणूक

बनावट धनादेशद्वारे कारखान्याच्या कॅश क्रेडिट खात्यातून परस्पर ८० हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये सुभाष नामक व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इक्बाल नाजीम इनामदार (रा. अशोका मार्ग) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. इनामदार यांच्या तक्रारीनुसार, सुभाष नावाच्या व्यक्तीने अंबड एमआयडीसीतील आयव्हीटी लोपकर्स लिमिटेड या कारखान्याच्या आयडीबीआय बँकेतील कॅश क्रेडिट खाते क्रमांक ०१०३६५८४००००००८२ वरून बनावट धनादेशाद्वारे खोटी साक्षरी करून ७८ हजार २०७ रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. घटनेचा अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

---

तीन संशयित जेरबंद

ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात चोरी करण्याच्या उदेशाने वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी कचरू आहिरे (वय ३८, रा. कांबळेवाडी, स्वारबाबानगर), राहुल अजितसिंग राजपूत (वय ३७, रा. अशोकनगर, सातपूर) व शिवम सतीश जगताप (वय १९, रा. नाग चौक, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री वरील संशयित ठक्कर बाजार परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेले पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने केली.

--

वृद्धाची फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करीत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातून ४० हजार रुपयांची रोकड परस्पर काढून घेतल्याची घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरलीधर कृष्णाजी मंडलिक (वय ६५, रा. स्वामी विवेकानंदनगर) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मंडलिक पैसे काढण्यासाठी सिंहस्थनगर येथील एटीएममध्ये गेले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अज्ञात तरुणाने मदतीचा बहाणा करून त्यांच्या हातात बनावट एटीएम कार्ड ठेवून काढता पाय घेतला. त्यानंतर त्यांच्या खात्यातील सुमारे ४० हजारांची रोकड परस्पर काढण्यात आली. खात्यातील पैसे काढून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर मंडलिक यांनी अंबड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.

--

दोघांची आत्महत्या

शहरात शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड व पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाल्मीक शेकू बेलदार (वय ५७, रा. भगवती चौक, उत्तमनगर) व कमलेश जशूभाई चव्हाण (वय ३०, रा. अंबिका सोसायटा, पेठ फाटा) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. सिडकोत राहणाऱ्या बेलदार यांनी शुक्रवारी दुपारी अज्ञात कारणातून राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत. दरम्यान, पेठ फाटा येथील कमलेश चव्हाण या युवकाने सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

--

दोन लाखांची घरफोडी

नाशिकरोड ः व्यापारी घरी नसताना कपाटातील सोन्याचे पाच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी चोरल्याची घटना उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गंधर्वनगरी परिसरातील बालाजी मंदिरासमोर राहणारे गंगाराम विश्वनाथ पटेल मंगळवारी दुपारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ती संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचा तीन तोळ्यांचा हार, दोन तोळ्यांचे पेंडंट, सोन्याच्या अंगठ्या असे सुमारे पाच तोळ्यांचे दागिने, तसेच ८० हजारांची रोकड असा दोन लाखांचा एेवज लांबवला.

--

खूनप्रकरणी एकजण ताब्यात

पंचवटी : तीन दिवसांपूर्वी रामवाडीजवळील कोशिरे मळे परिसरात नदीपात्रात महापालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. लूटमार करणाऱ्या दोन ते तीन संशयितांनी अरुण बर्वे यांची लूटमार करीत खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. फरारी मुख्य संशयिताचा शोध सुरू असून, त्यास लवकरच अटक केली जाण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक खर्च प्रकरणी पंधरा उमेदवारांना नोटिसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिकेची निवडणूक लढलेल्या १५ उमेदवारांनी मुदत उलटूनही निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे या १५ उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यासंदर्भातील कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यांच्यावरील कारवाईसंदर्भात बाजू मांडण्यासाठी ६ मे रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी असून उमेदवारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक लढविणाऱ्यांना निवडणूक खर्चाचा हिशेब मह‌निाभरात सादर करणे बंधनकारक असते. परंतु, पालिकेची निवडणूक लढवणाऱ्या पंधरा उमेदवारांनी अद्याप हा खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या उमेदवारांमध्ये कोथमिरे दीपाली सागर (प्रभाग ८अ ), पवार आकाश सुरेश (प्रभाग ९अ), आहेर महेश प्रकाश (प्रभाग ९ड), डगळे पांडुरंग केशव (प्रभाग ११ ब), म्हसे लक्ष्मण पुंडल‌कि (प्रभाग ११ ब), सरकटे रमाबाई संतोष, घोडके विद्या मनोज (प्रभाग १३ अ), तेजाळे संजय मधुकर (प्रभाग १४ क), धराडे अनुजा चेतन (प्रभाग १६ब), फारूकी रझमी इकबाल (प्रभाग २३ क), वर्मा ऋषीकेश गौतम (प्रभाग २३ क), बहोत अनिल चुनीलाल (प्रभाग १७ अ), शेजवळ शांता सिध्दार्थ (प्रभाग १८ अ), बहोत अनिल चुनीलाल (प्रभाग २० अ), आव्हाड महेश झुंजार (प्रभाग २१ ड) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबसाठी ‘दोन स्पेशल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मटा कल्चर कल्बच्या सदस्यांसाठी ‘दोन स्पेशल’ या बहारदार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाकावी काल‌दिास कलामंद‌रि येथे ९ जून रोजी रात्री ९.३० वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. दोन स्पेशल या नाटकात प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले, आणि रोहीत हळदीकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे मटा कल्चर क्लब मेंबरसाठी ३०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे. जे कल्चर क्लबचे नवीन मेंबर होतील, त्यांच्यासाठी एक कपल तिकीट मोफत देण्यात येईल. ही तिक‌टिे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथे व महाकवी काल‌दिास कलामंद‌रि येथेही उपलब्ध असतील.
ज्यांना नाटक बघावयाचे आहे, मात्र मेंबर नाहीत, अशा वाचकांसाठी तिकीट बुकिंगची स्वतंत्र व्यवस्था महाकवी काल‌दिास कलामंदिरात करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात वादळी पाऊस

0
0

४ जनावरे दगावली, दोघांचा वीज पडून मृत्यू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसामुळे १४ जनावरे दगावली, तर मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. या पावसामुळे नुकसानीचा आकडा समोर आला नसला तरी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण व नांदगाव येथे आठ घरांची पडझड झाली आहे. येवला येथे एका पॉलिहाऊसचेही नुकसान झाले आहे.

शनिवारी दुपारी झालेल्या या पावसाची नाशिकमध्ये ४८ मि.मी. नोंद झाली. त्या खालोखाल मालेगाव येथे ४५ मि. मी. पाऊस झाला. मालेगावातील टोकडे येथील समाधान बहादूरसिंग सुमराव (वय २०), गरबड येथील सुनंदा गायकवाड (वय ३२) यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर सावित्री माळी ही महिला जखमी झली. अनेक ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी जोरदार वादळामुळे दैना उडाली. पावसामुळे अनेक छोटी-मोठी बंधारे भरल्याचेही वृत्त आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, नांदगाव, सटाणा, सुरगाणा, देवळा, निफाड, येवला व सिन्नर या तालुक्यात जोरदार पावसान हजेरी लावली. नाशिक शहरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यामुळे नाशिककरांची धांदल उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जे अस्सल होते, ते आईने दिले...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रेकॉर्डिंगला आईचा प्रचंड विरोध होता, ती म्हणायची जे अस्सल आहे ते रसिकांना द्या. रसिकांना हे दाखवू नका, की तुम्ही त्यांना काहीतरी ऐकवायला आला आहात. स्वरांची साधना करा, त्यांचे दर्शन होऊ द्या, मग सादर करा. तिने जे सांगितले ते आयुष्यभर पाळले. जे अस्सल होते ते रसिकांना दिले, असे प्रतिपादन गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे सुपुत्र निहार आमोणकर यांनी केले.

शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागातर्फे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली म्हणून ‘उरली सय मागे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आईविषयी आठवणी जागवताना निहार बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की आईने माईकडेच (मोगूबाई कुर्डीकर) गाणे शिकले. एकदा व्हायरल फीवरमुळे ती आजारी होती आणि दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा होती. तिने प्राचार्यांना जाऊन नंतर परीक्षा घेण्याबाबत रिक्वेस्ट केली. परंतु, एका विद्यार्थ्यासाठी असे करता येणार नाही, असे उत्तर प्राचार्यांनी दिले आणि तो तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. ती घरी आली, माईला सांगितले, की आजपासून कॉलेज बंद, मी गाणे शिकणार आणि रसिकांना किशोरीताई भेटल्या!

आईविषयी आठवणी जागवताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, की एकदा आई, माईला न सांगताच एका चित्रपटात गाणे गाण्याचे ठरवून आली. माईला उत्साहाच्या भरात हे सांगून दिले. तेव्हा माई इतकेच म्हणाली, की नक्की गा, पण आजपासून माझ्या तंबोऱ्याला हात नाही लावायचा. इतक्या परखडपणे माईने तिला शिकवले. दोघीही कमालीच्या शिस्तप्रिय होत्या. माईने तिला कधीच कोणत्या घराण्यापासून शिकण्याला वंचित ठेवले नाही. जेथून मिळेल तेथे शिक, असे ती नेहमी सांगत असे.

प्रारंभी आशिष कुलकर्णी, राजाभाऊ मोगल आणि मोहन भार्गवे यांच्या हस्ते मुलाखतकारांचे स्वागत करण्यात आले. प्रख्यात गायिका मंजिरी असनारे-केळकर यांनी सूत्रसंचालन केले. शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

---

कायमच वेगळेपणाचा शोध

किशोरीताईंची आठवण जागवताना त्यांच्या शिष्या नंदिनी बेडेकर म्हणाल्या, की कोण काय गाते हे बघून त्यांनी कधीच स्वत:चे गाणे ठरवले नाही. त्यांना जे गायचे आहे ते त्या आधी १५ दिवस रियाज करायच्या, त्यातून काय वेगळे देता येईल ते शोधायच्या. सुरुवातीला किशोरीताई आमोणकर यांची १९७० सालातली राग केदारमधील रेकॉर्डिंग ऐकविण्यात आली. त्यानंतर १९८५ मधील भूप आणि २६ मार्च २०१७ मधील दिल्लीच्या कार्यक्रमाची त्यांची शेवटची रेकॉर्डिंगही रसिकांना ऐकविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images