Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उपनगरला महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर नाक्यावरील अपघातप्रवण वळणावर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसच्या धडकेने कष्टकरी महिला जागीच ठार झाली. त्यामुळे वाहतूक दीड तास विस्कळीत झाली. पोलिसांनी पाठलाग करून बसचालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिस व घटना पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास आंध्र प्रदेश, सोलापूर व अकलूजच्या भाविकांना देवदर्शनाला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने (एमएच १५ एएक्स ०९०३) उपनगर नाक्यावरील चौकात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने ही महिला जागीच ठार झाली. तिचा मृतदेह तासभर पडून असल्याने गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या महिलेचे नाव कमलबाई सुपडू कुमावत (४६, सुंदरनगर, देवळालीगाव) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या पश्चात तीन मुले आहेत. ही महिला विवाह समारंभात केटरर्सकडे काम करत असे. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने तीच मुलांना सांभाळत होती. तिला घेण्यासाठी आलेल्या मुलाच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला. त्यामुळे त्यालाही भोवळ आली. थोड्यावेळाने त्याचे कुटुंबीय तसेच देवळालीगावातील रहिवाशी घटनास्थळी आले. बसचालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाइकांनी घेतली. उपनिरीक्षक ए. ए. येवले, उपनिरीक्षक काळे, सहाय्यक निरीक्षक कडभाने, हवालदार गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. तासभराने अॅम्ब्युलन्स आली व कमलाबाई यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.

मृत्यूचा सापळा

उपनगर नाका व परिसरात अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. तीन वर्षापूर्वी बसखाली महिला तर ट्रकखाली जवान ठार झाला होता. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर सिग्नल बसविण्यात आला. मात्र, अडथळा ठरणारा बसथांबा अजूनही हलविण्यात आलेला नाही. त्यामुळे अपघात होत असतात. हा परिसर अपघातप्रवण असूनही वाहतूक पोलिस नसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. बसथांबा त्वरित हलविण्याची मागणी होत आहे.

मटा भूमिका

उपनगर नाक्यावरील बेधुंद वाहतुकीने आणखी एक बळी घेतला. गेल्या वर्षभरात येथे काही बळींसह अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. अत्यंत वर्दळीच्या नाशिक-पुणे रस्त्यावर आडनीड जागेवर सिग्नल, रस्त्यातच आडवी झाडे, मधोमध बस थांबा अन् उलट्या दिशेने जाणारे वाहनधारक असा विचित्र गुंता झाला आहे. या समस्येची तीव्रता सामान्य नागरिकांनी वारंवार दाखवून दिली होती. आंदोलनादी उपायही करून झाले; पण गेंड्याच्या कातडीच्या मंडळींवर काहीच परिणाम झाला नाही. किमान आता तरी आणखी बळी जाण्याची वाट न पाहाता संबंधित शासकीय विभागांनी संयुक्तपणे या प्रश्नी उपाय शोधायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरजूंना मिळाले ‘घरकुल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत ६४ कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. नाशिक-पेठ मार्गावरील करंजाळीपासून ३ किलोमीटरवर असलेल्या या आदिवासी गावात एकूण ३३० कुटुंब राहतात. गावात ६५ टक्के कुटुंब भूमीहीन असल्याने तुटपुंज्या कमाईतून घराचे स्वप्न साकार करणे त्यांना शक्य नव्हते.

खरीपाचा हंगाम संपल्यावर मजुरीसाठी भटकंती ठरलेली आणि त्यामुळे स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक दीपक कोतवाल यांनी गटविकास अधिकारी बी. बी. बहिरम यांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या मनात घराविषयी आशा निर्माण केली. अनेकांचे घराचे स्वप्न इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून पूर्णही केले.

गावातील गरीब नागरिकांची घरे मातीची, प्लास्टिकचे आच्छादन असलेली आणि काही ठिकाणी जुन्या कौलांची होती. पावसाळा आला की त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे. तात्पुरती डागडुजी करून दिवस पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. शासकीय योजना तर होती मात्र अंमलबजावणीत अडचणी होत्या. कोतवाल यांनी पुढाकार घेत अडचणींवर चर्चा केली.

वीटांची समस्या दूर करण्यासाठी काही लाभार्थ्यांनी शेतात वीटभट्टी तयार केली. सरपंच उषा गवळी यांनी दुकानदारांना विनंती करून उधारीवर सिमेंट मिळवून दिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने मजुरी केल्यास त्याला १८ हजारापर्यंत मजुरी देण्यात आली. त्यामुळे मजुरी आणि घर असा दुहेरी लाभ त्याला झाला. गावातील अकुशल मजुरांना रोजगार मिळण्याबरोबर रोहयो अंतर्गत पाच हजार ६६० मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. गावात शबरी आवास योजनेअंतर्गत तीन घरांचे बांधकाम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक घराचे बांधकाम सुरू आहे. गावात पक्की घरे आणि समोर सिमेंटचे रस्ते यामुळे गावातील राहणीमानही बदललेले चटकन जाणवते ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान या योजनेचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

असे मिळाले अनुदान

इंदिरा आवास योजनेअंतर्गत काम सुरू करताना ३५ हजार, पायाचे बांधकाम झाल्यावर ३५ हजार आणि काम पूर्ण झाल्यावर २५ हजार असे तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम देण्यात आली. लाभार्थ्याचा हिस्सा केवळ ५ हजार होता. त्याला साधारण मिळालेली मजुरी लक्षात घेता एक लाख १८ हजारात पक्के घर तयार झाले.

जुने घर गळायचे, त्यामुळे पावसाळ्यात खूप त्रास होत असे. आता शौचालय असलेले नवे घर मिळाल्याने समाधान आहे. जागाही मोठी आहे.
- हनुमंत गाढवे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रास प्रणालीमध्ये सुरगाणा पिछाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य वितरणात पारदर्शकतेसाठी सुरगाणा तालुक्यात ग्रास प्रणाली अवलंबिण्यात आली तरी तिची अवस्था बिकट बनली आहे. परिणामी दुकानदारांना चलन फाडण्यासाठी थेट वणी अथवा दिंडोरीलाच पोहोचावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होऊ लागली आहे.

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अनेक पाऊले राज्य सरकारने उचलली आहेत. सप्लाय मॅनेजमेंट चेन, एसएमएस सुविधा, धान्य गोदामापासून ते दुकानदारापर्यंत पोहचताना प्रत्येक स्तरावर होणारी तपासणी अशा नवनवीन उपाययोजनांद्वारे गैरप्रकार रोखण्याचे प्रयत्न सरकार आणि प्रशासनाकडून सुरू आहेत. रेशनपात्र लाभार्थींची आधार सिडिंग केल्याने दुबार नावे आणि खोट्या लाभार्थींना पायबंद बसणे शक्य होऊ लागले आहे. आता कुठल्या गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला किती धान्याचा पुरवठा करायला हवा याची नेमकी माहिती समोर येऊ लागली आहे. दुकानदारांना वितरणासाठी किती धान्याची गरज आहे, त्यांच्याकडे गत महिन्याचे किती धान्य शिल्लक आहे. नव्याने किती धान्याची उचल करावी लागणार आहे अशी संपूर्ण माहिती देणारी ऑनलाइन प्रणाली पुरवठा विभागाने विकसित केली आहे. त्यानुसार दुकानदारांची चलनेदेखील ऑनलाइनच कार्यप्रवण केली जात आहे. त्याचे पैसेही ऑनलाइन भरणे शक्य होत असून चलन भरल्यानंतर परमीट ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहे. तर गोदामातून माल उचलण्यासाठीही गोदामपालाला ऑनलाइनच माहिती उपलब्ध होत आहे. संपूर्ण यंत्रणाच ऑनलाइन झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी जलाशये आसुसली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सूनपूर्व पावसाने नाशिकमध्ये हजेरी लावली असली तरी नाशिककरांना आता मान्सूनचे वेध लागले आहेत. रिती होऊ पाहणारी जलाशये पाण्यासाठी आसुसली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून टँकरवाऱ्या थांबविण्यासाठीही पाऊस आवश्यक आहे.

शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यावर ढगाळ वातावरणाने मांडव धरला असून त्यामुळे उन्हाच्या त्रासापासून नाशिककर काहीसे मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील गावे आणि वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असून रहिवाशांची तहान भागविण्यासाठी टँकरचा पारंपरिक उपाय अवलंबिण्यात येत आहे. जिल्ह्यात २४ धरणे असून ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट एवढी पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, आजमितीस या सर्व धरणांमध्ये आठ हजार ३८५ दशलक्ष घनफुट एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये तीन हजार ५६ दलघफू म्हणजेच एकूण क्षमतेच्या पाच टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. हाच साठा २०१५ मध्ये १२ टक्के म्हणजेच सात हजार ७३१ दलघफू एवढा होता. यंदा धरणांमध्ये पुरेसे पाणी असून ७ जूनच्या दरम्यान मान्सूनला सुरुवात झाली तर तळ गाठलेली धरणेही पुन्हा भरण्यास मदत होऊ शकेल.

गंगापूर धरणात २४ टक्के पाणी

शहर आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सद्यस्थ‌तिीत २४ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गतवर्षी याचकाळात जिल्ह्यातील धरणांमध्ये २२ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. तेवढाच पाणीसाठा आताही उपलब्ध असून मान्सून सुरू झाल्यास टँकरचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

१६ धरणांनी गाठला तळ

एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील २४ पैकी १६ धरणांनी तळ गाठला आहे. चणकापूर धरण वगळता एकाही धरणात २५ टक्क्यांवर पाणीसाठा नाही. तर १६ धरणे अशी आहेत की ज्यामध्ये १० टक्क्यांहूनही कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. आळंदी, वाघाड, पुणेगाव, भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर,नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे पूर्णत: कोरडी पडली आहेत. तर गौतमी गोदावरी, करंजवण, तिसगाव, दारणा, कडवा, हरणबारी, केळझर या धरणांमध्ये एक ते पाच टक्केच पाणी शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास पाणीची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या दारी प्रमाणपत्रांचे वाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांच्या पुढाकाराने मालेगाव शहरातील आदिवासी वस्तीवर जाऊन ४८० नागरिकांना आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत विविध शाळांमधून तसेच सेतू केंद्राच्या माध्यमातून जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. १ ऑगस्ट २०१६ पासून एप्रिलअखरेपर्यंत १ लाख ६४ हजार ४८९ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यात २४ हजार ४०१ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत शाळांमधून प्रमाणपत्र वाटप करत असताना शालेय प्रवेश असणाऱ्यालाच याचा लाभ मिळत असे. आदिवासी जमातींच्या वस्तीत याबाबत फारशी जागरुकता नसल्याने ते जात प्रमाणपत्रापासून आणि परिणामत: सरकारच्या विविध योजनांच्या लाभापासनू वंचित राहतात. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीत ही बाब अडचणीची ठरत होती. हे लक्षात घेऊन स्वामी यांनी मालेगावमधील गोंड आदिवासी समाजाच्या वस्तीत जाऊन प्रमाणपत्र वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला.

मालेगावमध्ये गोंड आदिवासी समाजाची सुमारे ४०० कुटुंबे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देण्यात अनेक अडचणी होत्या. उपविभागीय अधिकारी मोरे यांनी आदिवासी कार्यालयात जाऊन मूळ गोंड आदिवासींच्या स्थानांतरणाबाबत गॅझेटमधून माहिती एकत्र केली. हे नागरिक १९१५ नंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथून मनमाड व मालेगाव येथे स्थलांतरित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जातप्रमाणपत्र नसल्याने त्यांना कोणतेच लाभ मिळत नव्हते. या समाजाच्या वस्तीत कोणीच पदवीधर नसल्याचे मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एका प्राध्यापकांच्या मदतीने अधिक माहिती घेऊन या समाजाच्या राहणीमानात बदल घडवून आणण्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांना जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला.

प्रतिज्ञापत्रांसाठी स्वखर्च

प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राचा खर्चदेखील अधिकाऱ्यांनी स्वत: केला. त्यासाठी ‘सेतू’चे सहकार्यदेखील घेण्यात आले. आदिवासी समाजात प्रमाणपत्राचे महत्त्व पोहोचविण्यासाठी त्यांच्याच वस्तीत कार्यक्रम घेण्यात आला. एकूण ४८० व्यक्तींना लॅमिनेटेड आदिवासी जमातीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्राचा उपयोग करून मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींची माहिती देण्यात आली आणि मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलिंग क्षेत्रात असंख्य संधी

$
0
0

स्वप्निल देवकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

लवकर प्रगतीसाठी आणि अनेक प्रकारचे पर्याय असणारे हॉटेल मॅनेजमेंट असे करिअर आहे तसेच प्रशिक्षित लोकांची या क्षेत्रात उणीव भासत असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंटकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे, असे प्रतिपादन पंचवटी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य एन. आर. जाधव यांनी केले.

मटा प्लॅनेट कॅम्पस आणि महात्मा गांधी विद्यामंदिर यांच्यातर्फे आयोजित चर्चासत्राप्रसंगी ‘हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करियर संधी’ या विषयावर ते बोलत होते. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी बारावीनंतर तनी वर्षांची डिग्री करावी लागते. दहावीनंतरही आपण या क्षेत्रात डिप्लोमा करू शकतो, यात पुढे एमबीए करणाऱ्यांसाठी खूप वाव आहे. कुकरी व बेकरी हे नवीन शॉर्ट कोर्सेस आता उपलब्ध झाल्याने तरुणांना या क्षेत्रात व्यवसायिक संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत, असेही प्रा. जाधव यांनी सांगितले. हॉटेलिंग क्षेत्रात मुलींसाठी हाऊसकिपिंग हा उत्तम पर्याय आहे. मोठ्या हॉटेल्सकडून सुरक्षेच्या दृष्टीने मुलींसाठी कामाची वेळ ७-८ तास इतकीच असते. घरापर्यत पिकअप आणि डॉप सुविधादेखील पुरविली जाते. ‘डिप्लोमा इन ऑपरेशन्स’ हा दोन वर्षांचा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केल्यानंतर लगेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परदेशी क्रुझ लायनर्सवरसुद्धा अनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेल मॅनेजमेंटमधील नवनवीन संधींची माहिती करिअर सेमिनारमधून मिळाली. दहावीनंतर मॅनेजमेंट हा उत्तम पर्याय ‘मटा’मुळेच समजला.
- संगीता पाटील, पालक

करिअर निवडतांना घ्यायची काळजी आणि पालकांनी करावयाची तयारी याची माहिती मिळाली. उपक्रम प्रेरणादायी ठरला.
- धर्मेश गाडेकर, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉ, मॅनेजमेंट उत्तम पर्याय

$
0
0

प्रतिक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर

वेगळे करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी लॉ आणि मॅनेजमेंट हे क्षेत्र उपयुक्त आहे. लीगल अॅडव्हायझर होण्यासह एखादी कंपनीची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याची संधी निश्चित मिळू शकते. त्यामुळे लॉ आणि मॅनेजमेंट या दोन्ही क्षेत्रांचा विचार विद्यार्थ्यांनी आवर्जून करावा, असा सल्ला प्राचार्य वर्धमान अहिवले आणि प्राचार्य दीप्ती भुतडा यांनी दिला.

महाराष्ट्र टाइम्स आणि महात्मा गांधी विद्यामंदिर यांच्यातर्फे आयोजित मटा प्लॅनेट कॅम्पसच्या दुसऱ्या सत्रात मालेगाव येथील के. बी. एच. लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. वर्धमान अहिवले यांनी ‘कायदे आणि कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, की लॉमध्ये बारावीनंतर पाच वर्षात तर डिग्रीनंतर तीन वर्षांत आपण वकील बनू शकतो. याशिवाय सायबर लॉ, लेबर लॉ यासारखे एक वर्षांचे डिप्लोमा कोर्सेस करून उत्तम करियर करता येते. सरकारी नोकरीमध्ये सुद्धा लॉच्या सर्वच फिल्डमध्ये नोकरीच्या संधी आहेत. विशेष म्हणजे सध्या अनेक प्रायव्हेट कंपन्या लीगल ऍडव्हायझर म्हणून उत्तम पगारावर नेमणूक करतात. परिणामी उज्ज्वल भविष्यासाठी आणि वेगळी वाट निवडायची असेल तर लॉमध्ये अनेक संधी आहेत. फक्त मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.

कृषी क्षेत्रात पदवीसाठी बारावीनंतर बारा वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. अॅग्री इंजिनीयरिंग, अॅग्रीकल्चरल सायन्स, अॅग्री इकॉनॉमिक्स, डेअरी फार्मिंग, हॉर्टिकल्चर सारखे अनेक कोर्सेस करिअरसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रासोबत परदेशात नोकरी व शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. राज्य सरकारकडून खास शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासंदर्भात सरकारी आणि शैक्षणिक वेबसाइटवर वेळोवेळी माहिती दिली जाते. त्यामुळे योग्य करिअर निवडून मुलांनी अपडेट रहावे, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना केले.

झटपट नोकरीच्या संधी

तिसऱ्या सत्रात पंचवटी मॅनेजमेंट अॅण्ड कॅम्युटर सायन्स कॉलेजच्या प्राचार्या दीप्ती भुतडा यांनी ‘बारावीनंतर मॅनेजमेंटच्या करिअरसंधी’ याविषयी मार्गदर्शन केले. बारावीनंतर इंजिनीयरिंग किंवा मेडिकल सोबतच मॅनेजमेंटमध्ये अनेक संधी असून ज्यामुळे आपण उत्तम करिअर करू शकतो. यामध्ये बीबीए, बीबीएम, बीबीए इन सीए (BCA) या तीन वर्षाच्या डिग्री कोर्सेस करून कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये झटपट नोकरी मिळवू शकतो. यासाठी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कुठल्याही स्ट्रीममधील मुले प्रवेश घेऊ शकता, या कोर्सेससाठी सध्या तरी कुठलीही प्रवेश परीक्षा नाही.

प्लॅनेट कॅम्पसबद्दल ऐकून होतो. हे सेमिनार्स अटेंड केल्यानंतर करिअरसंदर्भात विचार स्पष्ट झाले. मला कृषी क्षेत्रात करिअर करायचे आहे. आ‌तापर्यंत योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. मटाच्या सेमिनारमधून पूर्ण माहिती मिळाली.
- मानव विजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा नवउद्योजक करतोय ‘मुद्रा’चे ब्रँडिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरात उद्योग-व्यवसाय आले पाहिजेत, या हेतूने मुंबईत आयोजित केलेल्या ‘मेक इन नाशिक’ला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता नाशिकच्या नवउद्योजकाची यशोगाथा मुद्रा बँकेच्या जाहिरातीद्वारे झळकत आहे. पंतप्रधान कार्यालयाने ‘मुद्रा’चा खरा लाभ मिळालेल्या व्यक्‍तींचा शोध घेऊन नाशिकच्या या उद्योजकाची या जाहिरातीसाठी निवड केली. विशेष म्हणजे कामगारापासून उद्योजक होण्याचे स्वप्न हे मुद्रा बँकेच्या कर्जामुळेच पूर्ण झाल्याचे या उद्योजकाचे म्हणणे आहे.

नाशिकचा योगेश रणधीर हा कामगार असलेला तरुण मुद्रा योजनेच्या लाभानंतर उद्योजक झाल्याने त्याची निवड या जाहिरातीसाठी करण्यात आली. बारावी सायन्सचे शिक्षण झाल्यावर घरच्या परिस्थितीमुळे योगेश पुढचे शिक्षण घेऊ शकला नाही. त्याने एका बड्या कंपनीसह अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींत अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यावर स्वतःची कंपनी स्थापण्याचा विचार केला. त्यासाठी लागणाऱ्या कर्जासाठी त्याने बँकांचे खेटेही सुरू केले. मात्र, त्याच वेळी मुद्रा बँकेची माहिती मिळाल्याने त्याने सरकारी बँकेतून या योजनेचा लाभ घेऊन स्वतःची मशिनरी घेऊन थाटात व्यवसाय सुरू केला आहे. मुद्रा योजनेच्या जाहिरातीसाठी कोणत्याही ब्रँड अॅम्बॅसिडरची निवड न करता नाशिकच्या उद्योजकाची निवड केल्याने नाशिककरांच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे.

मुद्रा योजनेची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने पंतप्रधान कार्यालयाने माहिती व प्रसारण विभागाला मुद्राचा खरा लाभार्थी असलेलाच उद्योजक घेऊन जाहिरात करण्याची सूचना केली. त्यानुसार मुद्राचे सर्वाधिक लाभार्थी असलेल्या महाराष्ट्रातील काही उद्योजकांशी संपर्क साधला गेला. उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांचे नाव समोर आल्यावर नाशिकमधील काही लाभार्थी उद्योजकांशी याबाबत संपर्क साधण्यात आला. त्यानंतर योगेश रणधीरची निवड करण्यात आली. या जाहिरातीचे प्रसारणही सुरू झाले असून, सर्व भाषांमध्ये ही जाहिरात करण्यात आली आहे.

शासकीय योजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाने बदलला पाहिजे. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होत नसून, खऱ्या उद्योजकांना सहज लाभ मिळू शकतो. बँकांची भूमिकाही सकारात्मक आहे. ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.

- योगेश रणधीर, नवउद्योजक

--

मुद्राच्या जाहिरातीत नाशिकच्या उद्याेजकाचा सहभाग झाल्याने आनंद झाला आहे. महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होत नाही, हे यावरून सिद्ध झाले आहे.

- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, उद्योग आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिंडोरीरोडवर अपघात; चार भाविक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडवर म्हसरूळ शिवारातील मेटाफोर्स कंपनीसमोरील रस्त्यावरील वडाच्या झाडावर चारचाकी आदळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाले. राजस्थान येथे राहणारे हे सर्व पंचवटीतील नातेवाईकांकडे येत असताना सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

राजस्थान येथील पाच जण टाटा व्हेंचर या गाडीने नाशिकला येत होते. ही गाडी (आर. जे. २३ यू. बी. ४२४०) दिंडोरी रोडवरील मोटाफार्स या कंपनीसमोरील झाडावर आदळली. रामअवतार सुरजसिंग कुमावत (वय ५२), गुडीया रामअवतार कुमावत (वय १५), वाहनचालक मनोहर दुर्गाराम जंगिड (वय ५७), संतोषदेवी मनोहर जंगिड (वय ५२) (सर्व रा. साकेत, ता. जि. शिखर, राजस्थान) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. संतोषी रामअवतार कुमावत (वय ५१) ही महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. वाहनात प्रसादाचे पुडे आढळल्याने देवदर्शन घेऊन ते नाशिकला येत असावेत तसेच, वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. दरम्यान, उपनगरच्या अपघातप्रवण नाक्यावर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसच्या धडकेने कष्टकरी महिला जागीच ठार झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे आजपासून राज्यव्यापी संगीत संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात वावरणाऱ्या प्रतिभावंत संगीत साधकांचे राज्यव्यापी संगीत संमेलन आजपासून (३ जून) आयोजित करण्यात आले आहे. आज दुपारी तीन वाजता या संमेलनाचे उद््घाटन होईल. गंगापूर रोडवरील कर्मवीर बाबुराव ठाकरे इंज‌िनीअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे संमेलन होणार आहे. ५ जून रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे.

‍या संमेलनस्थळास पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हॉल असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलवादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष मविप्रच्या सरचिटणीस नील‌िमा पवार असतील.

४ जून रोजी दुपारी ४ वाजता जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत शिक्षकांचा व ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान सोहळा होणार आहे. ३ आणि ४ रोजी संध्याकाळी ६ ते ८.३० व ५ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष संगीतसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्यात महाराष्ट्रातील निवडक शिक्षक कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.

या संमेलनात अभ्यासक्रम नियोजन, संगीताचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान, शास्त्रीय संगीत काल व आज, संगीत शिक्षक नियुक्तीसंदर्भात आजपर्यंतचे शासकीय जीआर, पाचवी ते दहावी संगीत विषय गुरू-शिष्य परंपरा आदी विषयांवर चर्चासत्र व मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक शाखेचे आयोजक भाऊसाहेब लोखंडे, प्रशांत महाबळ, दिनकर दांडेकर, तुकाराम तांबे, दिलीप पागेरे, रामेश्वर धोंगडे, अश्विन पाटील, गणेश डोकबाणे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या १३५ पाल्यांना मिळाली रोजगारसंधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर, ग्रामीण पोलिस आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पोलिसांच्या पाल्यांकरिता कौशल्य, उद्योजकता व रोजगार मेळावा झाला. त्यात १३५ जणांना रोजगाराची संधी मिळाली. गंगापूररोडवरील शहर पोलिस मुख्यालयात पार पडलेल्या मेळाव्यात शहरासह नाशिक परिक्षेत्रातील ६५२ उमेदवारांनी सहभाग नोंदवला.

परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल अध्यक्षस्थानी होते. हा रोजगार मेळावा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांकरिता आयोजित करण्यात आला होता.

पोलिसांनी अशा प्रकारे पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. त्यास चांगला प्रतिसाद लाभला. मेळाव्यासाठी नाशिक, धुळे, व नंदुरबार जिल्ह्यातील सध्या कार्यरत असलेले आणि माजी पोलिस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांच्या बेरोजगार पाल्यांनी हजेरी लावली. रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध महामंडळांमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करणे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी यावेळी प्रयत्न झाले. यापुढे इतर मुलांसाठी अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेऊ, असा मनोदय आयुक्त डॉ. सिंगल यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक संपत चाटे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---

१७ कंपन्या, २४ संस्थांचा सहभाग

मेळाव्यात नाशिक एमआयडीसीच्या १७ कंपन्यांनी रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय १२ महामंडळेदेखील सहभागी झाली होती. व्होकेशनल ट्रेनिंग देणाऱ्या २४ संस्थांनीदेखील सहभागी उमेदवारांना मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी सकाळपासून ६५२ उमेदवारांनी हजेरी लावली. संबंधित कंपन्यांनी तब्बल ३४० जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यातील १३५ जागांवर उमेदवारांची निवड करण्यात आली. स्वयंरोजगारासाठी २२७ उमेदवारांनी महामंडळाकडे रजिस्ट्रेशन केले. एकूण ३५० उमेदवारांनी व्होकेशनल ट्रेनिंग घेण्यासाठी रस दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीकडे जिल्ह्यात ४५२ हेक्टर जागा

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

tweet- @SanchetigMT

नाशिक - मेक इन नाशिकमध्ये १८७५ कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची तयारी २९ कंपन्यांनी दाखवली आहे. यातील बहुतांश कंपन्यांना अंबड व सातपूर या नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत जागा हवी आहे. पण या दोन्ही वसाहतींत जागा शिल्लक नाही. पण जिल्ह्यातील येवला, पेठ, मालेगाव, दिंडोरी, विंचूर या औद्योगिक वसाहतींत एमआयडीसीच्या ताब्यात तब्बल ४५२ हेक्टर जागा आहे. त्याचप्रमाणे सिन्नर येथे १५६ व दिंडोरी येथील तळेगाव -अक्राळे शिवारात १५० हेक्टर म्हणजे ३०६ हेक्टर जमीन संपादीत करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई येथील नेहरू सेंटर येथे ‘मेक इन नाशिक’ हा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. त्यानंतर नाशिकच्याच उद्योगांनी नवे उद्योग व विस्तारीकरणाची इच्छा प्रदर्शित करुन आपले प्रपोजल दिले. त्यातील बहुतांश उद्योजकांना नाशिकमध्येच जागा हवी आहे. त्यांनी जिल्ह्यात इतर ठिकाणी तयारी दाखवली तर त्याचा फायदा जिल्ह्याला होऊ शकेल. या प्रस्तावाबरोबर अनेक उद्योगांनी एमआयडीसीकडे अगोदरच उद्योग सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. पण या उद्योजकांची अट अंबड व सातपूर येथील जागेचीच आहे.

नाशिकमध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक होईल या अपेक्षेने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले. पण यातील बोटांवर मोजण्याइतक्याच उद्योगांनी हजेरी लावली. त्यामुळे या कार्यक्रमाचा मूळ हेतू साध्य झाला नसला तरी १८७५ कोटींच्या गुंतवणुकीचा आकडा समोर आला. त्याचबरोबर नाशिकचे ब्रँडिंग राष्ट्रीय व आंततराष्ट्रीय स्तरावर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही पुढे फायदेशीर ठरणार आहे.


अंबड व सातपूर येथे जागा शिल्लक नाही. पण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जागा एमआयडीसीच्या ताब्यात आहे. काही ठिकाणी जमीन संपादीत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अंबड व सातपूरव्यतिरिक्त विचार केल्यास अनेकांना जागा उपलब्ध होऊ शकते.

-हेमांगी पाटील, विभागीय अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही धग कायम

$
0
0

येवल्यात पोल‌िसांकडून आंदोलकांची धरपकड

येवला ः शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाक्यानजीक झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात दरोडा, प्राणघातक हल्ला, रस्ता अडवणूक, लुटमार, मारहाण, बेकायदेशीर जमाव गोळा करणे, सार्वजनिक तसेच इतर मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच सरकारी कामात अडथळा आणणे आदी असंख्य कलमान्वये गुन्हे दाखल केले.

वरिष्ठ पोल‌िस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री येवला शहर पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर याच रात्रीपासून पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्यापपर्यंत ४३ जणांना ताब्यात घेतले असून, पाच जणांना अटक केली आहे.

गुरुवारी येवल्यातील शेतकरी संपाला हिंसक वळण लागले होते. तालुक्यातील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांनी मार्गावरून धावणारी वाहने अडवत त्यातील अन्नधान्य, फळे, भाजीपाला, किराणा मालाची नासधूस करत रस्त्यावर फेकले. पिंपळगाव जलाल येथे असंख्य समाजकंटकांनी आंदोलनाचा फायदा घेत वाहनातील माल लुटून नेला. हिंसक जमावाने पोल‌िस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक केली. दगडफेकीत पाच पोल‌िस अधिकारी, एसआरपीएफचे १६ कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगव‌िण्यासाठी पोलिसांनी प्रारंभी अग्निशमन बंबाद्वारे पाण्याचा फवारा व नंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडूनही जमाव हटत नसल्याने अखेर पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांचे फायरिंग केले होते. त्यानंतर जमाव मागे हटला. गुरुवारी रात्री उशिरा येवला शहर पोल‌िस स्टेशनमध्ये आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुभाष भिका आहेर (रा. येसगाव तळे, ता. कोपरगाव), भिमा सोनवणे, समाधान सोनवणे, मोहन सोनवणे, ज्ञानेश्वर धिवर (सर्व रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला), धोंडीराम गुंजाळ (उंदीरवाडी, ता. येवला) या पाच जणांना अटक केली आहे. इतर ४३ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पिंपळगाव जलाल, उंदीरवाडी, बोकटे, बाभूळगाव, नाटेगाव परिसरातील जवळपास पंधराशे ते दोन हजार आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीचे मळभ तूर्तास दूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरपट्टी आणि पाणीपट्टीवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने अखेर माघारी पाठवल्याने चालू वर्षातील करवाढ तूर्तास टळली आहे. प्रशासनाने सुचविलेल्या घरपट्टीतील १४, तर पाणीपट्टीतील ५ टक्के करवाढीला स्थायी समितीने विरोध दर्शवला आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढीसाठी नव्याने अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले आहेत. त्यामुळे चालू वर्षात तब्बल १५ कोटींच्या उत्पन्नावर प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे.

महासभा व स्थायी समितीने नगरसेवकांच्या निधीत एकीकडे भरघोस वाढ केली आहे, तर दुसरीकडे करवाढ फेटाळली आहे. त्यामुळे प्रशासनानेही आता करवाढ फेटाळली तर, नगरसेवक निधीही विसरा असा सूर लावला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाची साधने मर्यादीत झाल्याने प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून ठेवला आहे. परंतु, गेल्या वेळी निवडणुकांमुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला होता. चालू वर्षात सत्ताधाऱ्यांनी बजेटमध्ये केलेली करवाढ फेटाळून लावली होती. स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीतील करवाढीस नकार दिला होता. तरीही प्रशासनाकडून पुन्हा नव्याने स्थायीला घरपट्टीत १४ आणि पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायीला सादर केला होता. गेल्या महासभेतही घरपट्टी व पाणीपट्टीच्या वाढीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली होती. महापालिकेला कोणतीही करवाढ करायची असेल तर त्याचा निर्णय फेब्रुवारीच्या अगोदरच घेणे बंधनकारक आहे. तरीही प्रशासनाने बजेटमध्ये केलेल्या तरतुदींवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सत्ताधारी करवाढीवरून आता आस्तेकदमचा निर्णय घेतला आहे.
स्थायी समितीला सादर केलेला घरपट्टी व पाणीपट्टीत करवाढ करण्याचा प्रस्ताव सभापतींनी प्रशासनाला परत पाठविला आहे. चालू वर्षात करात वाढ करणे शक्य नाही. तसेच सध्याचा प्रस्ताव हा खूपच जुना आहे. त्यामुळे प्रशासनाने अभ्यास करून नवीन करवाढीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सभापतींनी दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांवर चालू वर्षात असलेले करवाढीचे संकट तूर्तास टळले आहे. सभापतींच्या या निर्णयामुळे प्रशासनाला करवाढीचे नव्याने डॉकेट तयार करून ते डिसेंबरपर्यंत स्थायी समितीवर सादर करावे लागणर आहे. तोपर्यंत नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

नगरसेवक निधी गोठणार

स्थायी समितीने नगरसेवक निधी हा ४० लाख केला होता. महासभेने त्यात भरघोस अशी ३५ लाखांची वाढ करत तो ७५ लाखांपर्यंत पोहचवला आहे. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत पैसा नाही. त्यातच घरपटट्टी व पाणीपट्टीतील प्रस्ताव‌ति करवाढ सत्ताधाऱ्यांनी रोखली आहे. त्यामुळे प्रशासनाचीच गोची झाली असून निधी कुठून आणायचा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वाढीवरून प्रशासनाची गोची करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही कोंडीत पकडण्याची रणनीत‌ि प्रशासनाने तयार केली आहे. तिजोरीत पैसाच नसल्याने नगरसेवकांना मिळणारा नगरसेवक निधी हा तिजोरीच्या आवकेवरच अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारीच कात्रीत सापडणार आहेत.

करात भरघोस वाढ?

प्रशासनाने चालू वर्षात घरपट्टीत १४ तर पाणीपट्टीत ५ टक्के करवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. यातून पालिकेच्या तिजोरीत १५ कोटींची भर पडणार होती. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून ही वाढ खूप कमी असल्याचे चित्र आहे. वाढ करायची तर चांगली करा, असा अप्रत्यक्ष प्रस्तावच सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला सुचवला आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावात भरघोस करवाढीची टांगती तलवार नाशिककरांवर राहणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरव्याकंच झाडांची कत्तल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

वृक्षतोडीला न्यायालयासह सर्वच स्तरांवरून विरोध असतानाही सिडकोतील रायगड चौक भागातील राम मंदिराच्या चौकातील काही हिरव्याकंच वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. महावितरण कंपनीतर्फे किंवा अन्य कोणी फांद्या कापण्याऐवजी थेट वृक्षांची बेसुमार तोड केल्याने परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.

वृक्ष तोडण्यास न्यायालयाचा विरोध असल्याने सध्या वृक्षांची तोड करण्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, रायगड चौकातील राम मंदिर परिसरातील चौकातील निलगिरीसह काही हिरवीकंच झाडे मनमानी पद्धतीने तोडण्यात आली आहेत. ही झाडे कोणी तोडली याची माहिती मिळत नसली, तरी ही झाडे का तोडण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीकडून अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडण्यात येत असतात. मात्र, या ठिकाणी आख्खी झाडेच तोडून केवळ खोडच शिल्लक ठेवण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

--

यापूर्वीही झाली वृक्षतोड

गेल्या आठवड्यात जुने सिडको भागातही असाच प्रकार घडला असून, या प्रकाराकडे वृक्षप्रेमी किंवा महापालिकेच्या उद्यान विभागाचे काहीही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा विषय प्रलंबित असतानाच सिडकोतील ही झाडे तोडल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

--

चांगल्या झाडांवर घाला

महापालिकेच्या उद्यान विभागाचे सिडको परिसरातील वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे अलीकडच्या प्रकारांवरून स्पष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही झाडे तोडली गेली त्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी उद्यानातील कीड लागलेले झाड तोडले जात नसून, दुसरी चांगली झाडे मात्र सर्रासपणे तोडली जात असल्याचे दिसत आहे. सिडको भागात सर्रासपणे होणाऱ्या या वृक्षतोडीला आळा बसला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाड तालुक्यात लाठीमार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीही शहर व परिसरातील वातावरण संवेदनशील होते. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारचा आठवडेबाजार आणि निफाड शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठा असणारा निफाडचा आठवडेबाजार बंद असल्याने शेतमाल विक्री करणारे, व्यापारी यांना आर्थिक फटका बसला. तालुक्यातील शिवडी येथे रास्तारोको करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्यातील काही जणांना ताब्यातही घेण्यात आले.

शांतीनगर चौफुलीवर रास्ता रोकोसाठी जमलेल्या जमावाला पोलसांनी रोखले. पोल‌िस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी हा रास्ता रोको होऊ दिला नाही.

ओझरही बंद

शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून ओझर शहरात बंद पुकारण्यात आला होता. नैताळे येथे गुरुवारी झालेल्या हिंसक आंदोलनामुळे नैताळेत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. शिवडी फाटा येथे नांदूरमध्यमेशवेर, शिवडी येथील आंदोलक शेतकऱ्यांनी शेतमाल वाहून नेणारे काही ट्रक व टेम्पो आडवून त्यातील माल फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करून काहींना ताब्यात घेतले. पिंपळगाव व लासलगाव बाजार समिती व उपबाजार आवार मार्केटमध्ये शुक्रवारीही शुकशुकाट होता.

आठवडे बाजारांवर परिणाम

कळवण : शहरातील दैनंदिन भाजीपाला बाजार व मार्केट कमिटी आवारात शुक्रवारीही शुकशुकाट होता. अभोणा येथील आठवडे बाजारही पूर्णपणे बंद होता. देवळा तालुक्यातील उमराणे येथील शनिवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल शेतकरी वर्गाला आदर आहे. मात्र त्यांनी या आंदोलनात लुडबुड करू नये, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी संताप व्यक्त केला. तालुक्यातील सर्वांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जि. प. सदस्य नितीन पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते हस्तांतरणाबाबत पालिकेने झटकले हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका हद्दीतील दोन रस्त्यांच्या हस्तांतरणाबाबत सुरू असलेल्या वादावर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. दोन रस्ते अवर्गीकृत करण्यात पालिकेचा संबंध नसल्याचा दावा केला असून यासंदर्भातील निर्णय राज्यसरकारनेच घेतल्याचे स्पष्ट केले आहे. हे दोन्ही रस्ते पुन्हा वर्गीकृत करायचे असतील तर त्याचाही निर्णय सरकारनेच घ्यावा असे सांगत, नव्याने चार रस्त्यांच्या हस्तांतरणाला मात्र त्यांनी नकार दिला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने या चार रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती पालिकेला शक्य नाही. त्यामुळे हे रस्ते हस्तांतरीत करायचे असल्यास त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च सरकारनेच उचलावा असे म्हटले आहे. त्यामुळे अन्य रस्ते हस्तांतरीत करण्याच्या काही जणांच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.
महापालिका हद्दीतील नाशिक-दिंडोरी, नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन रस्त्यांचे हस्तांतर सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे केले आहे. या दोन रस्त्यांच्या हस्तांतरणावरुन मोठा वाद निर्माण झाला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीने याबाबत हायकोर्टात जाण्याची तयारी केली आहे. तर भाजपनेही याबाबत आस्तेकदम भूमिका घेतली आहे. या रस्त्यांवरील वादाबाबत आयुक्त कृष्णा यांनी स्पष्टीकरण दिले असून, संबंधित रस्ते हे २००१ पासूनच पालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरीत झाले आहेत. या रस्त्यांची देखभाल पालिकाच करत आहे. तसेच या निर्णयात महापालिकेचा काहीच रोल नाही. केवळ देखभाल व दुरुस्तीची माहिती पालिकेने दिली असून रस्ते अवर्गीकृत करा असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे या निर्णयाशी पालिकेचा कोणताही संबंध नसून तो राज्यसरकारचा निर्णय आहे. त्याच्याशी अधिकाऱ्यांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा कोणताही थेट संबध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांगसौंदाणे, पालखेडमध्ये ‘अंत्ययात्रा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे माजी जि. प. सदस्य संजय सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र व राज्य सरकारची शुक्रवारी प्रतीक‌ात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रतीकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही शेतकऱ्यांना मुंडणही केले. डांगसौंदाणेसह पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवून शासनाचा निषेध केला.

संजय सोनवणे, कैलास केल्हे, उदय सोनवणे, सुधीर सोनवणे, प्रवीण सोनवणे, राजेंद्र सोनवणे आदींसह शेतकरी व व्यापारी संपात सहभागी झाले होते. सटाणा शहरातील दैनिक भाजीपाला बाजार दुसऱ्या दिवशीही बंद असल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल झाले. भाजीपाला विक्रेत्यांसह व्यापारी वर्गाने देखील आपली दुकाने न थाटल्याने मोठी गैरसोय निर्माण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक कार्यक्रमांची नाशिककरांसाठी पर्वणी

$
0
0

म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अल्पावधीतच नाशिककरांच्या मनात आपले स्थान बळकट करणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीचा सहावा वर्धापन दिन येत्या गुरुवारी (दि. ८ जून) साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक, तसेच अन्य भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी घेऊन ‘मटा’ वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘निष्पक्ष वृत्तपत्र’ अशी वाचकांच्या पसंतीची पावती मिळविणारा ‘मटा’ नाशिकमध्ये ८ जून रोजी सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त ६ जून ते १३ जून या कालावधीत विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे.

--

अनोखा हेरिटेज वॉक ६ व ७ जून

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे दि. ६ व ७ जूनदरम्यान सहा ठिकाणच्या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी नाशिककरांना लाभणार असून, ‘मटा’ हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांना ८३८००९८१०७ या क्रमांकावर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या नमूद करून एसएमएस करावा.

दिनांक : ६ जून

स्थळ : मेनरोडवरील जयंत गायधनी वाडा, सुंदरनारायण मंदिर, गोदाघाटावरील कुंड

वेळ : सकाळी ८.३० वाजता

--

दिनांक : ७ जून

स्थळ : कपालेश्वर मंदिरशेजारील गोरेराम मंदिर, मुरलीधर मंदिर, नारोशंकर मंदिर

वेळ : सकाळी ८.३० वाजता

-------------

बहारदार नाट्यप्रयोग ९ जून

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘दोन स्पेशल’ हे बहारदार नाटक होणार आहे. ह. मो. मराठे यांच्या न्यूज स्टोरी कथेवर आधारित अथर्व थिएटर्सचे हे नाटक असून, लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, निर्माता संतोष भरत काणेकर, जितेंद्र जोशी आहेत. या नाटकात गिरिजा ओक-गोडबोले, रोहित हळदीकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रात्री ९ वाजता हे नाटक होणार असून, कल्चर क्लब मेंबरसाठी ३०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे. जे कल्चर क्लबचे नवीन मेंबर होतील त्यांच्यासाठी एक कपल पास मोफत देण्यात येईल. ज्यांना नाटक बघावयाचे आहे, परंतु मेंबर नाही, अशा वाचकांसाठी तिकीट बुकिंगची स्वतंत्र व्यवस्था कालिदास कलामंदिर येथे राहील.

स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर

दिनांक : ९ जून

वेळ : रात्री ९ वाजता

----------

मटा आर्ट फेस्टची रंगत १० व ११ जून

मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. मटा वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये होणार आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदितांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, हा या मटा आर्ट फेस्टचा उद्देश आहे.

दिनांक : १० व ११ जून

स्थळ : मविप्र अार्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ

वेळ : सकाळी ९ पासून

-----------

बच्चेकंपनीसाठी चित्रकला स्पर्धा १२ जून

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पहिला गट ५ वी ते ७ वी व दुसरा गट ८ वी ते १० वी असे विभाग करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी स्मार्ट सिटी हा विषय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे.

दिनांक : १२ जून

स्थळ : मते लॉन्स, सावरकरनगर

वेळ : सकाळी ९ ते ११

-------------

झुम्बा वर्कशॉपद्वारे थिरकण्याची संधी १३ जून

अखिल भारतीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या हॉलमध्ये झुम्बा वर्कशॉप होणार आहे. या वर्कशॉपमध्ये प्रतीक हिंगमिरे मार्गदर्शन करणार असून, वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनसाठी कमलेश घरटे (मोबाइल- ७०४०७६२२५४) यांच्याशी संपर्क साधावा.

दिनांक : १३ जून

स्थळ : अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण संस्था हॉल, पाण्याच्या टाकीजवळ, त्र्यंबकरोड

वेळ : सायंकाळी ५ ते ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगररचना विभागात आता पारदर्शक कारभाराला सुरुवात झाली असून, बहुप्रतिक्षित अॅटो-डीसीआर प्रणाली अखेर कार्यान्व‌ति झाली आहे. बांधकाम परवानग्या मिळवण्यासाठी बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज नसून एक जूनपासून बांधकाम परवानग्यांसाठी आता ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या दोन दिवसांत पाच अर्ज ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत.
या अॅटो-डीसीआर प्रणालीमुळे बिल्डर, आर्किटेक्ट आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नगररचना विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला वेसण घातली जाणार आहे. बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आवश्यकतेनुसार टीडीआर करारपत्र घेतल्यावरच बांधकाम परवानगी दिली जाणार आहे.
महापालिका आयुक्त कृष्णा यांनी महापालिकेचे प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, नगररचना विभागातील अनागोंदी थांबवण्यासाठी या विभागात बांधकाम परवानग्यांसाठी ऑनलाइन अॅटो-डीसीआर यंत्रणा सुरू केली आहे. अॅटो-डीसीआर प्रणाली (अॅटो डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स) महापालिकेत कार्यान्वित झाल्याने बिल्डर व आर्किटेक्ट यांना घरबसल्या बिल्ड‌िंग प्लॅन मंजूर करता येणार आहेत. या संगणकीय कार्यप्रणालीचा अवलंब केल्यानंतर नगररचना विभागाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा होणार असून, बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुरळीत होणार आहे. अर्जदाराने बांधकाम परवानगी प्रक्रियेत अर्ज सादर केल्यानंतर मनपाच्या नगररचना विभागामार्फत त्याची प्राथमिक स्तरावर छाननी करून क्षेत्रानुसार किती चटईक्षेत्र (एफएसआय) बांधकाम करता येईल, हे सांगितले जाईल. तितका एफएसआय अर्जदाराकडे शिल्लक असेल तर ठीक, अन्यथा त्यास किती टीडीआरद्वारे एफएसआय मंजूर होईल, हे कळवले जाईल. त्यानंतर संबंधिताने ज्यांच्याकडून टीडीआर घेणार आहे, त्यासोबतचा करारनामा महापालिकेला देणे बंधनकारक ठरणार आहे. हा करारनामा(अग्रीमेंट) प्राप्त झाल्यानंतर मात्र महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा छाननी करून कार्यालयीन प्रत मंजूर करेल. कार्यालयीन प्रत व प्रथम प्रत (एफएसी) अर्जदाराला एकाचवेळी जाणार आहे.

एसएमएस, ई-मेलद्वारे संवाद

विशेष म्हणजे यासाठी कार्यालयात येण्याची गरज नसून पालिकेकडून एसएमएस व ई-मेलद्वारे संवाद साधून संबंधितांना कळविले जाणार आहे. गुरुवार १ जूनपासून नगररचना विभागात ही यंत्रणा कार्यान्व‌ति झाली आहे. नव्या बॉयलॉजप्रमाणे ही प्रकरणे मंजूर केली जाणार आहेत. दोन दिवसांत पाच प्रकरणे दाखल झाली आहेत. गुरुवारी नगररचना विभागाने क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन, इंजिनीअर्स असोशिएशनची बैठक घेऊन त्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली. सोबत बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्या प्रबोधनासाठी नगररचना विभागाने कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराला या प्रणालीमुळे काहीसा चाप बसणार असून, बिल्डरांसह ग्राहकांची पिळवणूक थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images