Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान

$
0
0
निफाड तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने कांदा व द्राक्ष बागांवर भुरी व करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.

​नाशिकरोडच्या नद्यांचा जीव धोक्यात

$
0
0
नाशिकरोडला गोदावरी, नासर्डी, दारणा व वालदेवी या चार नद्या लाभल्या आहेत; पण, या नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने नदीपात्रांना गटारींचे रूप आले आहे. यामुळे परिसरात डासांचा त्रास वाढला असून साथीच्या आजार पसरल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वीज पडून महिला ठार

$
0
0
हरसूल व परिसरात मंगळवारी पडलेल्या विजांसह झालेल्या पावसाने एक बळी घेतला आहे. गोलदरी येथील जनाबाई रावजी मिरका या शेतात वीज पडून दगावल्या. त्यांचा मृतदेह बुधवारी शेतात सापडला. जनाबाई या मंगळवारी सकाळी गावाजवळच्या साई डोंगरी शिवारात शेतात कामासाठी गेल्या होत्या.

तांत्रिक अडसर नव्हे; करिअरमधला बॅरिअर

$
0
0
एमबीएच्या परीक्षेसाठी सज्ज अशा ऑनलाइन यंत्रणेपुढे पुणे विद्यापीठाने गुडघे टेकल्याच्या पाठोपाठ इंजिनीअरिंगच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी गोंधळ अनुभवला. विद्यापीठाचा तांत्र‌िक अडसर विद्यार्थ्यांच्या करिअरमधला बॅरिअर ठरत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

झूम बैठकीचे तातडीने नियोजन

$
0
0
औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली जिल्हा उद्योग मित्रची बैठक (झूम) गेल्या चार महिन्यांत झाली नसल्याबाबत ‘मटा’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राला खडबडून जाग आली आहे.

दरोड्यातील सोने खरेदी : सराफ ताब्यात

$
0
0
पाथर्डी शिवारातील दरोड्यात लुटलेले सोने कोपरगाव येथील सराफास विकण्यात आल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मनोज सुधाकर विसपुते या सराफाला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घरकुल लोकार्पण : आघाडीत जुंपली

$
0
0
केंद्र व राज्याच्या सत्तेत सहभागी असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीत चालणाऱ्या शीतयुद्धाची झलक बुधवारी झालेल्या घरकुल लोकार्पण सोहळ्यात दिसून आली. ज्या प्रभागात हा प्रकल्प आहे तिथे राष्ट्रवादीचे नगरसेवक असतानाही केवळ श्रेय मिळविण्यासाठी काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या हस्ते लोकार्पण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.

कुंभमेळ्याचे आव्हान नियोजनातून पेलणार

$
0
0
तुमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान कोणते, या प्रश्नावर अनंत मुंडीवाले यांचे एकाच शब्दात उत्तर आहे ‘कुंभमेळा’. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे नियंत्रक म्हणून त्यांनी नुकतेच पदभार स्वीकारला.

गुंतवणुकीविना नाही उद्धार

$
0
0
राज्यातील सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. किंबहुना सहकारी बँका आणि सोसायट्यांमध्ये पैसे गुंतवताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

२७ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

$
0
0
शहरातील एका लॉजवर पोलिसाच्या विशेष पथकाने धाड टाकून एका परप्रांतीय व्यक्तीकडून एक हजाराच्या २७ बनावट नोटा ताब्यात घेतल्या. या व्यक्तीने गेल्या काही दिवसांत अनेक दुकानांत खरेदीसाठी या बनावट नोटा वापरल्याने दुकानदारांमध्ये खळबळ माजली आहे.

उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही

$
0
0
एकतर आधी शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांवर धावून जातात. मग पोलिसांना कारवाई केल्यावर त्या पक्षाच्या अध्यक्षाने, पोलिसांची यादी तयार करू, सत्ता आल्यावर बघून घेऊ हे असे बोलणे योग्य नाही, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

अवकाळी पावसाचा शेतपिकांवर घाला

$
0
0
मंगळवारच्या अवकाळी पावसाने निफाड, सिन्नरमधील शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण ९९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे द्राक्ष बागा आणि नुकत्याच काढण्यात आलेल्या कांद्याला मोठा फटका बसला आहे.

मदतीसाठी हवी तांत्रिक मान्यता

$
0
0
काझी गढीचा काही भाग कोसळून निराधार झालेल्या २३ कुटुंबाना आठवड्याभरानंतरही आर्थिक मदत मिळालेली नाही. मदत देण्यासाठी महापालिकेच्या तांत्रिक मान्यतेची गरज तहससील प्रशासनाने पुढे केली आहे.

आमदार हिरेंच्या कार्यालयाची तोडफोड

$
0
0
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

डिव्हायडर म्हणजे काय रे भाऊ ?

$
0
0
रस्ते अपघातांना वाहनचालकांसोबतच रस्त्या बनविताना अथवा नंतर त्याचे सुशोभिकरण करताना होणाऱ्या विकास कामातील दोष व त्रूटीही कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यांवर डिव्हायडर करताना ‘डिव्हायडर म्हणजे नेमके काय ?

डाळिंबाच्या भावाची घसरण

$
0
0
डाळिंबाची आवक नसताना भावात मात्र घसरण सुरूच आहे. दोन दिवसांत किलोच्या भावात २५ ते ३० रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात ७५ते ८० रुपये किलोने विकले गेलेले डाळिंब गुरुवारी नामपूर उपबाजारात ४५ ते ५० रुपये किलोने विकले गेले.

नांदुरमध्यमेश्वरमध्ये पक्षी आले

$
0
0
निफाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या परिसरात वेगवेगळे पक्षी आले आहेत. हिवाळ्यात येणारे हे पाहुणे आणखी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

मलेशियन हवाई दलाच्या पंखात ‘एचएएल’चे बळ?

$
0
0
मिग आणि सुखोई विमानांची निर्मिती होणाऱ्या ओझर येथील हिन्दुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) प्रकल्पाचे बळ मलेशियाच्या हवाई दलाला लाभण्याची चिन्हे आहेत.

दिलीप दातीरांना दिलासा

$
0
0
तीन वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी असल्याचा आदेश निवडणूक आयुक्तांनी रद्द ठरविल्याने शिवसेनेचे माजी सभागृहनेते दिलीप दातीर यांना दिलासा मिळाला आहे.

२ कोटींचा करमणूक कर जमा

$
0
0
नाशिक शहरात सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून कर मिळविण्यासाठी असलेला तिढा संपुष्टात येतानाच या विभागाकडे तब्बल २ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images