Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निघाले कलाग्रामचे टेंडर

$
0
0
देशातील चौथे आणि राज्यातील दुसरे कलाग्राम अखेर गोवर्धन येथेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागेच्या प्रश्नावरुन कलाग्रामचे भवितव्य अंधारात होते.

बसस्थानक परिसरात पार्किंगचा फज्जा

$
0
0
एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या ठक्कर बाजार परिसरात वाहनधारकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्यामुळे येथे वाहतुकीचा अक्षरश: फज्जा उडत आहे.

पोषण आहारातील धान्यांना अळ्या, कीड

$
0
0
देवळा तालुक्यातील लोहणेरच्या जनता विद्यालयात ग्रामस्थांनी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मुलांना​ दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अन्नधान्यात अळ्या आणि कीड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

टँकर घोटाळ्यात अधिका-यांना क्लीन चीट?

$
0
0
सिन्नर टँकर घोटाळ्यात महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्लीन चीट देण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

आणखी एका अधिकाऱ्याची बदली

$
0
0
विविध कारणांनी टीकेच्या धनी ठरलेल्या आरोग्यविभागातील आणखी एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी प्रभारी आरोग्याधिकाऱ्यांकडील सूत्रे डॉ. एस. ए. बुकाणे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या सोमनाथ वाडेकर यांची अतिक्रमण विभागात बदली करण्यात आली आहे.

क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्यातील खेळाडू दीर्घकाळापासून ज्याची प्रतीक्षा करीत आहेत, त्या विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या क्रीडा संकुलाला प्रशासकीय मान्यता देऊन हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिले.

‘त्या’ निवेदनाचा ‘युवती काँग्रेस’शी संबंध नाही

$
0
0
माडसांगवी गावातील मंदिराच्या गैरव्यवहारासंदर्भात पोलिस आयुक्तालयासह विविध कार्यालयात निवेदन सादर करणाऱ्या वैशाली पेखळे या राष्ट्रवादी युवतीच्या पदाधिकारी नाहीत, असा खुलासा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

‘तो’ अपहृत मुलगा जिल्हा हॉस्पिटलात

$
0
0
पंचवटीतील अपहृत मुलगा हृषिकेश मा‌णिक आवारे (१३) जिल्हा सरकारी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पतंग पकडताना इमारतीवरून पडून तो जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु तो बेशुद्धावस्थेत असल्याने त्याचे जखमी होण्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

मोटारसायकल चोरास अटक

$
0
0
दारु पिण्यापुरते जेमतेम पैसे मिळावेत यासाठी मोटरसायकली चोरून त्यांची विक्री करणाऱ्या प्रकाश पोपट भांगरे याला गुन्हे शाखा युनिट तीनने जेरबंद केले. तो सिन्नर तालुक्यातल्या मोह येथील रहाणारा आहे.

मविप्र अंतरिम जामिनास मुदतवाढ

$
0
0
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सोमवारी सुनावणी झाली.

जादूटोणा कायदा धर्माच्या विरोधात नाही

$
0
0
जादुटोणा कायदा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. धर्मात असलेल्या अनिष्ठ रुढी, परंपरा दूर व्हाव्यात यासाठी हा कायदा पारित होणे गरजेचे आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले. हुतात्मा स्मारकात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘एअरपोर्ट अॅथॉरिटी’ ओझरसाठी अनुकूल

$
0
0
ओझर येथील विमानतळाची जबाबदारी घेण्यास एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) अनुकूलता दर्शवत यासाठी विस्तृत सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एएआय, एचएएल आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार होण्याची चिन्हे आहेत.

१० वी रिपीटर्सच्या निकालात नाश‌िक आघाडीवर

$
0
0
ऑक्टोबर मह‌िन्यात दहावी आण‌ि बारावीच्या रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत दहावीच्या ‌न‌िकालात नाश‌िक आघाडीवर राहिले आहे. तर, बारावीच्या न‌िकालात नाश‌िक चौथ्या स्थानावर राहिले आहे. या परीक्षांचा न‌िकाल मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

​फुक​फुकट्यांची टोलधाड

$
0
0
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या नियमानुसार तयार करण्यात आलेल्या मुंबई-आग्रा हायवेवरील घोटी टोलनाक्यावर गेल्या वर्षभरात तब्बल ११ लाख ९१ हजार २९० वाहनांना फुकटात (फ्री) सोडण्यात आले.

आणखी एक निकाल ग्रंथपालांच्या बाजूने

$
0
0
‘ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीबाबत आतापर्यंतचे सर्व निकाल हे ग्रंथपालांच्या बाजूने लागले असून त्यावर चर्चा करणे आवश्यक वाटत नाही. सरकारला ही वेतनश्रेणी सर्व फायद्यांसह लागू करावी लागणार आहे’, असे सांगत नागपूर खंडपीठाने नुकताच आणखी एक निकाल ग्रंथपालांच्या बाजूने​ दिला आहे.

चार आण्याची कोंबडी अन्...

$
0
0
राज्याच्या मागास भागातील अनुशेष दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास मंडळांवर राज्य सरकार अक्षरशः कोट्यवधी रुपयांची उधळण करीत आहे.

भारतीय संविधान जगासाठी आदर्श

$
0
0
देशातील जनतेला न्याय व समान हक्क देण्यासंदर्भात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान हे जगासाठी आदर्श ठरल्याचे सांगत सर्वांनी त्याचा सन्मान कायम राखण्याचे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी केले.

नाशिकरोड स्टेशनही वायफाय?

$
0
0
रेल्वे स्टेशनवर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना वायफाय सुविधा मिळण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेकडे हा प्रस्ताव विचाराधीन असून तो स्वीकारला गेल्यास नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरही ही सुविधा कार्यान्वीत होणार आहे. सध्या प्रशासनाने तांत्रिक बाबींची माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे.

अवकाळी जलधारा!

$
0
0
यंदा मनसोक्त मुक्काम ठोकलेला वरुणराजा अजूनही काढता पाय घेण्याची लक्षणे दिसत नाहीत. आता गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिककरांना रविवार रात्रीप्रमाणेच मंगळवारी दुपारीही अवकाळी जलधारांनी चिंब केले. शहराच्या नाशिकरोड भागात दुपारी चार वाजल्यापासून अर्धा तास पाऊस झाला.

कांदा हजार रुपयांनी घसरला

$
0
0
काही दिवसांपूर्वी दरवाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता दर घसरू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणू लागला आहे. मंगळवारी सटाणा बाजार समितीत तसेच नामपूर उपबाजारात कांद्याचे भाव प्रति क्विंटल हजार रुपयांनी घसरले. आवक वाढल्याने भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images