Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लाखलगाव येथे एकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विषारी औषध प्राशन केलेल्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मागील चार दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

संतू महादू कांडेकर (५५, रा. गौरव पेट्रोल पंपासमोर, लाखलगाव) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. कांडेकर यांनी शनिवारी (दि. ६) रात्री अज्ञात कारणातून आपल्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात येताच मुलगा समाधान यांनी त्यांना तात्काळ दिंडोरीनाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचा बुधवारी (दि. १०) दुपारी चार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

युवतीचे अपहरण

आई समवेत कामावर गेलेली १५ वर्षीय युवती बेपत्ता झाली असून, तिचे अपहरण करण्यात आल्याच्या संशयावरून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पूजा शंकर कडू (रा. आंबेडकरनगर, वरचे चुंचाळे) असे युवतीचे नाव आहे. बुधवारी सकाळी (दि. १०) आईसमवेत पूजा अंबड एमआयडीसीतील एका कंपनीत कामासाठी गेली होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हात धुवून येते, असे सांगून गेली. मात्र, ती परतलीच नाही. तिचे अपहरण झाल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.

हिंगणवेढे येथून शेळ्यांची चोरी

शेळ्यांच्या कळपातील तीन बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्यात. ही घटना हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष निवृत्ती धात्रक, यांनी फिर्याद दिली. धात्रक हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांनी देशी-विदेशी शेळ्यांचे पालन केले आहे. शनिवारी रात्री त्यांच्या शेळ्यांच्या कळपातील उस्मानाबादी जातीच्या तीन बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. प्रत्येक तीन ते चार हजार रुपये किंमतीच्या या शेळ्या असून, घटनेचा अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इच्छाशक्तीअभावी खुंटला ‘आयटी’चा विकास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे नाशिकमध्ये आयटी क्षेत्र वाढू शकले नाही, अशी भूमिका मांडून आयटी कंपन्यांच्या संचालकांनी विमानसेवेपासून इन्र्फास्ट्रक्चरसंदर्भातील समस्यांचा पाढाच खासदारांसमोर विशेष बैठकीत वाचला. खासदार गोडसे यांनी गुरुवारी आयटी कंपन्यांची बैठक निमा सभागृहात आयोजित केली होती. यावेळी त्यांना आयटी उद्योजकांसाठी एकाच ठिकाणी सहाय्य व माहिती मिळावी, अशी व्यवस्था करून स्टार्टअपला नाशिकमध्ये प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन देत समस्या जाणून घेतल्या.

नाशिकमधील आयटी क्षेत्रातील कंपन्या असंघटित आहेत. त्यांनी संघटितपणे काम करून नाशिकला आयटी हब होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, आयुक्त अभिषेक कृष्णा, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, ‘निटा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक अनिल पवार आदी सहभागी झाले होते.

एचआेएच टेक लॅब्स कंपनीच्या सीईआे राधिका मलिक यांनी प्रास्ताविकात नवीन आयटी कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच ज्या आयटी कंपन्या सध्या नाशिकमध्ये आहेत त्यांना चालना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. निमाचे अध्यक्ष बॅनर्जी यांनी ३० व ३१ मे रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मेक इन नाशिकमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार गोडसे यांनी निमा, आयमा व चेंबर्स आॅफ काॅमर्स या संघटनांनी या उद्योगांना संघटित करून या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी आयटी बिल्डिंग एमआयडीसीला नाममात्र दरात भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविल्याचे सांगितले.

--

महापालिकेत स्वतंत्र समिती

आयटी कंपन्यांना सहाय्य करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या आयटी कंपन्यांना काही समस्या भेडसावत असेल, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केले.

--

सात वर्षांत आयटी हब

शासनाने पायाभूत सुविधांवर लक्ष दिल्यास व त्याचे चांगले ब्रँडिंग झाल्यास पुढील सात वर्षांत नाशिक आयटी हब होईल, अशी भावना इएसडीएस सीईआे राजीव पपनेजा यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी विविध मुद्देही मांडत आयटी कंपन्यांच्या अडचणी व त्यातील आव्हाने याबाबत सविस्तर माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात १८ वऱ्हाडी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शिलापूर (ता. जि. नाशिक) येथून विवाहसोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडींचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात १८ जण जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी सव्वा वाजता घडली. जखमींपैकी १३ जणांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघात लाखलगाव ते हिंगणवेढे दरम्यान धात्रक मळा येथील नागमोडी वळणावर झाला.

शिलापूर येथील समाजमंदिरात अशोक तुकाराम धात्रक (रा. हिंगणेवेढे, ता. नाशिक) यांचा मुलगा विष्णू याचा सुदाम घुटे (रा. साढगाव, परळी) यांची मुलगी जयश्री हिच्याशी गुरुवारी विवाह झाला. विवाहानंतर हिंगणवेढे येथील वऱ्हाडी टेम्पोतून (एमएच १२ एफए ८१४०) माघारी परतले. गंगापाडळी गावातून पुढे निघाल्यावर धात्रक मळा परिसरातील नागमोडी वळणावर रस्ता ओलांडणाऱ्या लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पोचालक लहू विष्णू कुंवर (२४, रा. हिंगणवेढे) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावरच उलटला. गाडीच्या आत बसलेले स्त्री-पुरुष वऱ्हाडी बाहेर फेकले गेले. तर काहीजण टेम्पोखाली दाबले गेले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत मदतकार्याला सुरूवात केली. जखमींना तात्काळ नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुमन सोनवणे (३८), अलका पवार (४१), कमळाबाई विंचू (५८), मीरा मोरे (४५), राधाकृष्ण पवार (२८), भागुजी धात्रक (६५), योगेश मोरे(१८), कमळाबाई पवार (६०), करिना पवार (११), भागाबाई मोरे (६५), निवृत्ती वाघ (७०), कारभारी धात्रक (५५), दीपक खेताडे (१८), अर्जुन पवार (१२), गंगू पवार (४३), जयश्री सोनवणे (१०), सुधीर कापसे (११), मंगल पवार (१२) अशी जखमींची नावे आहेत. यातील पाच जणांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.

यांनी केले मोलाचे सहकार्य
उपसरपंच संतोष धात्रक, संपत धात्रक, भास्कर कराड, वाल्मिक धात्रक, नाना शिंदे, वाळू विंचू, अरुण धात्रक, संजय वाघ, अमोल गिते, संतोष आव्हाड, विशाल क्षिरसागर आदींनी वऱ्हाडी मंडळींना बाहेर काढून उपचारासाठी नाशिकरोडला नेले. दरम्यान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंच्या मुद्देमालावर सुपरवायझरचा डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात कोणी नसल्याची संधी तब्बल सहा लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालावर डल्ला मारणाऱ्या सुपरवायझरला क्राइम ब्रँचच्या युनिट दोनने बेड्या ठोकल्या.

सिध्दार्थ हरिकिशोर सिंग (रा. होलाराम कॉलनी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बाइज टाऊन स्कूलजवळील दत्तात्रय दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रशांत कांतीलाल साखला यांच्या घरात २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास चोरी झाली. चोरट्याने घरातील महागडे घड्याळे, सोन्या-चांदिचे दागिने, मोबाइल व इतर साहित्य असा तब्बल सहा लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. या घटनेचा तपास क्राइम ब्रँचच्या युनिट दोनने सुरू केला. पोलिस निरीक्षक एस. के. तांदुळवाडकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, हवालदार रमेश घडवजे, ललिता अहेर, राहुल सोळसे, योगेश सानप, बाळा नंद्रे, मधुकर साबळे या पथकाने संशयितांबाबत क्लू शोधला. संशयित आरोपी सिंग हा साखला यांच्याकडेच सुपरवायझर म्हणून काम करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी डॉ. हेडगेवार नगर जॉगिंग ट्रॅकजवळ सापळा रचून संशयितास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडील सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. कोर्टाने संशयितास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याने यापूर्वी असे काही कृत्य केले आहे काय, याचा तपास पोलिस करीत आहे.

संशयितांकडून ३१ तोळे हस्तगत

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अंबड पोलिसांनी नुकतेच अटक केलेल्या गोपाळ जगन्नाथ पाटील, सागर दिलीप वाघ आणि कुणाल विशाल सूर्यवंशी या त्रिकुटाने सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीत चार ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांतील ३१ तोळे सोने संशयितांकडून पोलिसांनी हस्तगत केले. वरील संशयितांकडून एक लाख २८ हजार रुपयांचे सहा मोबाइलदेखील अंबड पोलिसांनी जप्त केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर लैंगिक अत्याचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

फरसाण बनविण्याच्या कारखाना मालकाने आपल्याकडे कामाला असलेल्या महिला कामगाराच्या चार वर्षांच्या बालिकेवर आईस्क्रिम खाण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला. सिन्नर फाटा परिसरातील नेहे मळा येथे बुधवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली. संतप्त नागरिकांनी संबंधित कारखाना मालकाला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुभाष झंवर (५१, रा. वृंदावन सोसायटी, जुना ओढा रोड, सिन्नर फाटा, नाशिकरोड) असे पीडित चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. सुभाषने बालिकेच्या गुप्तांगासह शरीराच्या विविध भागावर चावेही घेतले आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी सुभाषला बिटको चौकात चोप दिला. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. पोलिसांनी जमावाला शांत करीत कारवाईत कोणतीही कोणतीही दिरंगाई केली जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, या घटनेबाबत नेहे मळा येथेच वास्तव्यास असणाऱ्या पीडितेच्या आईने नाशिकरोड पोलिसांत शुक्रवारी सकाळी सुभाष विरोधात तक्रार दाखल केली. नाशिकरोड पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पीडितेवर बालिकेवर बिटको हॉस्पिटल तर सुभाष झवर याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

‘माऊली’ नावला कलंक

संशयित सुभाष झंवर याचे माऊली गृहोद्योग नावाचा प्रकल्प आहे. एका पत्र्याच्या शेडमध्ये फरसाण बनविले जाते. पीडित बालिकेची आई याच माऊली गृहोद्योगात काही महिन्यांपासून काम करते. चार वर्षांची मुलगीही तिच्यासोबत जात असे. सुभाष या बालिकेचे लाड पुरवत असे. नेहमीप्रमाणे सुभाषने या बालिकेला बुधवारी सायंकाळी घरी आईस्क्रिम खाऊ घालण्याच्या बहाण्याने नेले. रात्री ८ वाजेच्या दरम्यान त्याने तिला पुन्हा कामाच्या ठिकाणी आईकडे सोडून दिले. बालिका अस्वस्थ व घाबरलेली जाणवल्याने आईने तिला तात्काळ घरी नेले. आईला बालिकेवर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. या नराधमाने तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडल्याचे बघून तिच्या आईने या प्रकाराला वाचा फोडली.

निर्लज्जपणाचा कळस

पीडित बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिची आई जाब विचारण्यासाठी सुभाषच्या घरी गेली. परंतु, त्याने तिला दाद दिली नाही. त्यानंतर पीडितेला तिच्या आई-वडिलांनी जवळच्याच डॉ. बोरसे यांच्या क्लिनिकमध्ये नेले. परंतु तेथे डॉक्टर नव्हते. पाठीमागून आलेल्या सुभाषने प‌ीडित बालिकेला जेलरोडला त्याच्या ओळखीच्या डॉ. मंत्री यांच्या दवाखान्यात घेऊन जाण्याचा आग्रह केला. यातून पीडितेच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याने त्यांना बळजबरीने जेलरोडला नेले. परंतु, तिथे डॉक्टर उपस्थित नसल्याने त्याचा नाईलाज झाला. शेवटी वेदनांना विव्हळणाऱ्या बालिकेला तिच्या आई-वडिलांनी महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये आणले. तिथे डॉक्टरांनी झाला प्रकार तिच्या आईला सांगितला. तोपर्यंत सुभाषने बिटको हॉस्पिटलमधून पोबारा केला. एव्हाना गोळा झालेल्या नागरिकांनी सुभाषचा पाठलाग करीत त्याला चोप देत बिटको पोलिस चौकीत नेले.

संतप्त नागरिकांचा मोर्चा

संतप्त नागरिकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत संशयित आरोपी सुभाषला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. सुभाषला बेदम चोप देण्याची तसेच कठोर शासन करण्याची जमावाने मागणी केली. याप्रसंगी नगरसेविका सत्यभामा गाडेकर, संतोश साळवे, माजी नगरसेवक हरीश भडांगे, शिवाजी भागवत, जगन गवळी, बबन गवळी, बापू निस्ताणे, संजय घुले, योगेश झारखंडे आदींसह शेकडो महिला-पुरुष उपस्थित होते. नाशिकरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे अशोक भगत यांनी संतप्त जमावाला शांत केले. तसेच कारवाईत कोणतीही दिरंगाई केली जाणार नाही, याची माहिती दिली. घटनेनंतर नागरिकांनी सुभाषला फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक कलमांखाली गुन्हे दाखल करण्याचे लेखी निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगणातून १६० जणांची माघार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिका निवडणुकीसाठी गुरवारी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. सकाळी ११ ते ३ या वेळेत शहरातील सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माघारीची प्रक्रिया पार पडली . यात एकूण १६० उमेदवारांनी माघारी घेतली. आता महापालिकेच्या ८४ जागांसाठी २१ प्रभागांमधून ३७४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने गुरुवारी अपक्ष, बंडखोर उमेदवारांची माघारीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, अधिकृत उमेदवार यांनी सकाळपासूनच मनधरणी सुरू केल्याचे दिसून आले. सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसल्याने एकाच प्रभागातून दहापेक्षा अधिक उमेदवार मैदानात उतरले होते. अनेकांनी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अपक्षांच्या माघारीचे नाट्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केंद्राबाहेर पाहावयास मिळाले.

सकाळी ११ वाजेपासून माघारीची वेळ असली तरी दुपारी २ नंतरच माघारीसाठी गर्दी दिसून आली. त्यातही प्रभाग एक, दोन, आठ, नऊ, १०, ११ या पश्चिम भागातील प्रभागातून शिवसेना भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरल्याने येथील माघारीकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.

शिर्केंची उमेदवारी कायम

गोरक्षा समितीचे मच्छीद्र शिर्के यांनीदेखील प्रभाग ११ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या माघारीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी शिर्केंची मनधरणी सुरू होती. मात्र, त्यांनी माघार न घेता अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे प्रभाग ११ मधील लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे मानले जात आहे.

तक्रार निवारण कक्ष

महापालिका निवडणुकीसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिताभंगाची तक्रार स्वीकारण्यासाठी (०२५५४) २३१९५० हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लक्षवेधी माघार

शहराच्या पश्चिम भागात भाजप शिवसेना दोन्ही पक्षांना बंडखोरांनी घाम फोडला. दोन्ही पक्षांना या बंडखोरांचे मन वळवण्यात काही अंशी यश आले. यात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विद्यामान नगरसेविका संगीता चव्हाण, बाळासाहेब आहिरे, संगीता गवळी, माजी नगरसेवक सुरेश गवळी, प्रकाश भडांगे, निलेश काकडे, भारत चव्हाण यांनी माघार घेतली. तर भाजप बंडखोर भिका कोतकर, प्रेम माळी, सुरेश पवार, रेखा चौधरी, तृप्ती जाधव यांनी माघार घेतली आहे.

काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध

माघारीनंतर प्रभाग १९ क मधून तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेस उमेदवार किशवारी अशरफ कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रभागातून बेग मेराज बी रशीद, सैय्यद शाहेदाबानो अशफाक आणि शहेनाज बी शेख खलील या तिघांनी माघार घेतली. माघारीनाट्यच्या दिवशीच काँग्रेसला लॉटरी लागल्याचे म्हटले जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावसाहेब दानवेंविरोधात जिल्हाभरात निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या शेतकरीविरोधी विधानाचे तीव्र पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. गुरुवारी (दि. ११) सकाळी जिल्ह्यातील येवला, सटाणा, मालेगाव, त्र्यंबकेश्वरला शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून दहन करण्यात आले.

येवल्यात जोडेमारो आंदोलन

येवला : शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलाहार घातला. यावेळी संभाजी पवार, जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे सहभागी झाले होते.

कारवाईची मागणी

मालेगाव : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रमोद शुक्ला, नथू देसले, शंकर बोरसे, प्रवीण देसले यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

सटाण्यात निषेध

सटाणा : शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ बागलाण तालुका शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नाशिक : महानगरच्या वतीने दानवे यांच्या प्रतीमेला जोडेमारा आंदोलन मध्यवर्ती कार्यालय शालीमार येथे करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.

राजीनाम्याची मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील शिवनेरी चौकात शिवसैनिकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळेस भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी निवृत्ती लांबे, समाधान बोडके, भूषण अडसरे, शाम भुतडा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

पंचवटीत आंदोलन

पंचवटी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी, सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दानवे यांची अंतयात्रा काढून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी े प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, शरद लभडे, नितीन रोटेपाटील आदी उपस्थित होते. मानूर येथील शेतकरी प्रकाश माळोदे यांनीही जाहीर निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडकरांची उत्सुकता शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या हॅप्पी स्ट्रीट (सिझन ३)मध्ये काय असेल याची उत्सुकता नाशिकरोडकरांमध्ये वाढली असून, त्यांना मनोरंजनाची मेजवानी देण्यास ‘महाराष्ट्र टाइम्स’ही सज्ज झाले आहे. हा उपक्रम शहराच्या विविध भागांत व्हावा, अशी नागरिकांची इच्छा असल्याने कॉलेजरोडच्या यशस्वी आयोजनानंतर नाशिकचा अविभाज्य घटक असलेल्या नाशिकरोडमध्ये येत्या १४ मे रोजी रविवारी सकाळी सात वाजता हॅप्पी स्ट्रीटची धमाल होणार आहे.

‘महाराट्र टाइम्स’ आपल्या वाचकांसाठी सातत्याने नवीन कल्पना घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. ‘मटा’ने सुरू केलेल्या ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमाला नाशिककरांसह महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेऊन भरघोस प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळा जेल रोडवर उपस्थित राहायचं आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िटीजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. या वेळेत बिटको ते कोठारी कन्याशाळा सर्कलदरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

नाशिकरोड येथे होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीट्समध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. या वेळी उपस्थितांना हे प्रकार करून घेता येतील. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बँड शो होणार आहे. या वेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा, याची माह‌िती देणार आहेत. मोहन उपासनी व रवींद्र जोशी बासरीवादन करणार आहेत. हर्षल जाधव ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहेत. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण या वेळीही गिटारवादन करणार असून, जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. नीलेश हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. रुद्र आणि दीप आहेर स्ट्रीट पेंटिंग करणार आहेत. प्रतीक हिंगमिरे आणि अर्चना पेखळे यांचा ग्रुप डान्स सादर होणार असून, या वेळी वेस्टर्न व बॉलिवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिकरोडच्या वाचकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. या वेळीदेखील असाच प्रतिसाद नाशिककरांनी द्यावा, असे आवाहन ‘मटा’तर्फे करण्यात आले आहे.

कलाकारांनी येथे संपर्क साधावा

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फार्मसी कॉलेजकडून दिशाभूल?

$
0
0

‘पीजी’बाबत सीएफएफएसआयइएसची डीटीई संचालकांकडे धाव

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

फार्मसी विद्याशाखेच्या पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमास सरकारचे अनुदान मिळत नसताना प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम सरकारी अनुदानित असल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. राज्यभरातील हे कॉलेजेस त्यांचा फार्मसीचा पीजी अभ्यासक्रम अनुदानित असल्याचे जाहीर करून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करीत असल्याची तक्रार सिटीझन फोरम फॉर सँक्टीटी इन एज्युकेशन सिस्टीम या संस्थेने तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांकडे केली आहे.

वैभव नरवडे यांनी माहितीच्या अधिकारात फार्मसीच्या अनुदानित व विनाअनुदानित कॉलेजची माहिती मागविली होती. याबाबत खुलासा करताना डीटीईने दिलेल्या माहितीनुसार राज्यात तीन विभागातीला पाचही फार्मसी कॉलेज हे केवळ पदवीस्तरापर्यंत अनुदानित असून, पदव्युत्तर स्तरावर ते विनाअनुदानितच असल्याचे उघड झाल्याचे ‘सीएफएफएसआयइएस’ ने म्हटले आहे. फार्मसीच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमास तंत्रशिक्षण संचलनालयाचे अनुदानही मिळत नसल्याची माहितीही मिळाली आहे.

अनुदानित भासवून विनाअनुदानित अभ्यासक्रम चालविणाऱ्या राज्यातील संस्थांमध्ये नाशिकच्या मविप्र फार्मसी कॉलेजसह पुणे विभागातील पुणे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई विभागातील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी आणि सी.यू.शहा कॉलेज ऑफ फार्मसी या पाच कॉलेजचा समावेश असल्याचा दावा सिटीझन फोरमच्या तक्रारीत करण्यात आला आहे. हे कॉलेजेस विनाअनुदानित ठरत असल्याने शिक्षण शुल्क प्राधिकरणाकडे या अभ्यासक्रमासाठी शुल्क ठरवून घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचेही या कॉलेजेसने टाळले आहे. कारण , या सर्व कॉलेजेसमधील एकाच अभ्यासक्रमाच्या फी स्ट्रक्चरमध्ये मोठी तफावत आहे.

मविप्रच्या फार्मसी कॉलेज व्यवस्थापनाशी त्यांची बाजू समजावून घेण्यासाठी संपर्क साधला असता , ‘आमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शंभर टक्के प्रवेश प्रक्रिया ही डीटीईच्या कॅप राऊंडव्दारेच होते. शिवाय, मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशही नसतात. डीटीईकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुदान ‌मिळत नसले तरीही एआयसीटीईकडून ते काही वर्षे मिळत होते. ते बंद केले असे म्हणावे तर एआयसीटीईकडून संस्थांना अद्याप तसे पत्र मिळालेले नाही ,’ अशी बाजू व्यवस्थापनाने मांडली. एआयसीटीईच्या अनुदानासाठी या संस्थांचा पाठपुरावाही सुरू आहे. तसे अधिकृत पत्र मिळाल्याखेरीज अनुदान बंद झाले असे कसे म्हणता येईल, असा या संस्थांचा सवाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीं’ना भावपूर्ण निरोप

$
0
0

दळवटला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जिल्ह्यात आपल्या कर्तृत्व व नेतृत्वाची चुणूक दाखवत सर्वांसमोर आपल्या कामांचा आदर्श ठेवून गेलेले माजी मंत्री अर्जुन तुळशीराम पवार यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात पोलिसांनी दिलेल्या शासकीय मानवंदनेद्वारे कळवण तालुक्यातील दळवट या त्यांच्या मूळगावी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

ज्या गावात जन्म घेतला, वाढलो त्या मातीशी इमान बाळगणाऱ्या या पाणीदार नेतृत्वाची शेवटची इच्छाच होती ती, माझं अखेरचं कार्य या गावातच करण्यात यावे. म्हणून पत्नी शकुंतलाताई, पुत्र नितीन, प्रवीण, स्नुषा जयश्री, डॉ. भारती, कन्या डॉ. विजया, गीतांजली व सर्व कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी ए. टी. पवारांना अखेरचा निरोप दिला.

विकासासाठी झटणाऱ्या या सर्वांगीण व निगर्वी नेतृत्वाला कळवणकरांनी तब्बल आठ वेळा प्रतिनिधित्व देत विधानसभेत पाठवले. न बोलता आपल्या कामातून आपली आगळीवेगळी छाप पडणाऱ्या ए. टी. पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, नाशिकच्या महापौर रंजना भानशी, आमदार नरहरी झिरवाळ, सीमा हिरे, जयप्रकाश छाजेड, माजी आमदार अनिल आहेर, शरद आहेर, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, रवींद्र पगार, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, मिलिंद शमभरकर यांच्यासह आयुक्त इंद्रजित भालेराव, प्रांत गंगाधरण उपस्थित होते.

मुंबई येथे बुधवारी (दि. १०) माजी आमदार ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. आपल्या आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. शोकसभेत आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ए. टी. पवारांशी आलेल्या संबंधांचा उहापोह केला. युती शासनात ते मंत्री असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास मला करता आला. विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा असा नेता होणे नाही, अशा भावना व्यक्त केल्या. nashik pharmacy college

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता जप्तीच्या नोटिसांची होळी

$
0
0

शेतकरी संघटनेकडून नोटीस मागे घेण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, येवला

उन्हाळ कांद्यासह इतर शेतमालांचे बाजारभाव सातत्याने ढासळताना एकीकडे शेतकरी मोठ्या अर्थसंकटात सापडला आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा दिल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. या नोटिसा मागे घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ११) दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने नोटिसांची होळी करण्यात आली. नाशिक-औरंगाबाद व नगर-मनमाड राज्य महामार्गावरील येवल्यातील विंचूर चौफुलीवर जोरदार घोषणा देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास खंडित झाली होती.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर काही राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वसुलीसाठी मालमत्ता जप्तीपूर्व नोटिसा पाठविल्या आहेत. याचा विरोध करून शेतकऱ्यांना बँकेने पाठविलेल्या या नोटिसा तत्काळ मागे घेण्याची मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली. तसेच संघटनेच्या वतीने या नोटिसांची होळी करण्याचा इशाराह‌ी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास नोटिसांची होळी आंदोलन केले.

सरकारचे धोरण नाकर्तेपणाचे

यावेळी संतु पा. झांबरे यांनी यावेळी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडत सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशात बँकांनी नोटिसा धाडल्या आहेत, याकडे लक्ष वेधत यावेळी झांबरे यांनी शेतकऱ्यांनी पैसे तरी भरायचे कुठून? असा सवाल उपस्थित केला. बापूसाहेब पगारे, योगेश सोमवंशी आदींनी विचार मांडले. यावेळी संघटनेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार सविता पठारे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संध्या पगारे, निर्मला जगझाप, अरुण जाधव, सुरेश जेजुरकर, सुभाष सोनवणे, अनीस पटेल, बाबासाहेब पाटील, प्रभाकर भोसले आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नांदूरमध्यमेश्वरसह निफाडला निषेध

निफाड : निफाड आणि नांदूरमध्यमेश्वला निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निफाड तहसील कार्यालयात गुरुवारी, या नोटिसांची होळी करून आपला निषेध नोंदवला. सकाळी १० वाजता नांदूरमध्यमेश्वर येथील बाजारतळात शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसाची होळी करण्यात आली. याप्रसंगी लासलगाव कृउबाचे माजी संचालक हरिश्चंद्र भवर, नांदूरमध्यमेश्वरचे सरपंच प्रल्हाद पगारे, शरद शिंदे, सोमनाथ कहाणे, गफूर शेख आदींसह शेतकरी उपस्थित होते. निफाडलाही नोटिसांची होळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलाचा पाण्यासाठी मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील वळवाडी येथील राहुल मांगू पाटील या पंधरावर्षीय मुलाचा पिण्याचे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सातत्याने पाणीटंचाई असून यंदादेखील काटवन भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याच पाण्यासाठी या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाणीटंचाई ही वळवाडी गावाच्या पाचवीला पुजलेली असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून गावाजवळील गावठाण विहिरीवरून नागरिक पाणी आणतात. तलावाजवळील विहिरीत पाणी असून, राहुल हाही गुरुवारी (दि. ११) सकाळी पाणी आणण्यासाठी एकटा गेला होता. त्यामुळे सकाळी याठिकाणी कुणीही नसताना पाणी भरताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. काही वेळानंतर गावातील काही युवक विहिरीवर गेले असता त्यांना ही दुर्दैवी घटना लक्षात आली. यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. वडनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुलला आई नव्हती तर वडील मजुरी करीत असून, त्यास दोन बहिणी आहेत. याच विहिरीत दोन वर्षांपूर्वी एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाला होता. मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्यानेच नाहक बळी जात असल्याचा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपुड्याच्या होळीवर माहितीपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आगळ्या-वेगळ्या संस्कृती आणि परंपरांनी अवघ्या जगाच्या पर्यटन क्षेत्राला भुरळ घालणाऱ्या, नंदुरबारच्या सातपुड्यातील आदिवासी होळीवर जिल्हा माहिती कार्यालायाने माहितीपट तयार केला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शनिवारी (दि. १३) दुपारी दीड वाजता या माहितीपटाचे प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

‘आता बदल दिसतोय, माझा महाराष्ट्र घडतोय’ हे ब्रीदवाक्य... ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ आणि ‘आपले सरकार करू कामगिरी दमदार’ या प्रेरणेतून पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यात सातपुड्याच्या अंगाखांद्यावर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या आदिवासींच्या होळीचाही समावेश आहे. राज्याच्या पर्यटन विकास महामंडळानेही या होळीला हजेरी लावत त्याचे ब्रॅंडिंग केले.

जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी या माहितीपटाच्या संकल्पनेवर संशोधन केले आहे. अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे यांनी संशोधन सहाय्य केले. या माहितीपटाची निर्मिती दूरदर्शनचे व राज्य सरकारचे मान्यताप्राप्त निर्माता जळगाव येथील ब्रिज कम्युनिकेशन यांनी केली आहे. ब्रिज कम्युनिकेशनचे संचालक मिलिंद पाटील यांनी लेखन, दिग्दर्शन केले आहे.

आदिवासी परंपरेवर प्रकाश

सातपुड्याच्या होळीच्या गौरवास्पद संस्कृती व परंपरेची माहिती राज्यासह जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसाला व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने माहितीपट बनविला आहे. यात मोलगी, काठी, सोन, असली, धडगाव, वडछील पुनर्वसन वसाहत, धनाजे आदी ठकाणी होणाऱ्या आदिवासींच्या होळी उत्सवाच्या धार्मिक विधी परंपरांचे, रंगभूषा, आभूषणे, दागिने, आदिवासी पारंपरिक वाद्ये, आदिवासी नृत्य आदींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा नदीत युवक बुडाला

$
0
0

देवळाली कॅम्प : शेणीत परिसरातील दारणा नदीकिनारी हातपाय धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

कौसलेंद्र राघवेंद्रसिंहा गौर हा (१७) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. कौसलेंद्र काही मित्रांसोबत पट्टा किल्ला परिसरात फिरण्यासाठी गेला होता. नदीपात्र दिसल्याने उन्हाच्या हात पाय धुण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी कौसलेंद्र बुडाला. तो राजपूत कॉलनी, रायगड नगर, वडनेर दुमाला येथील रहिवासी आहे. घटनेनंतर जीवरक्षक दलासह कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन यंत्रणेची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, सांयकाळी उशिरापर्यंत कौसलेंद्र आढळून आला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी देवळाली कॅम्प पोलिसांनी नाशिक येथून विशेष बोटदेखील मागविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकच्या माध्यमातून साडेआठ लाखांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकवरील ओळख आणि नंतर सततच्या चॅटिंगमधून विश्वास संपादन करीत वृध्दास स्वस्तात वस्तू देण्याचे अमिष दाखवण्यात आले. फेब्रुवारीपासून चार एप्रिलपर्यंत भामट्यांनी तब्बल साडेआठ लाख रुपये उकळले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून, सोशल मीडियाचा दुरपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पुढे येत आहे.

या प्रकरणी मुंबई नाका परिसरातील कालिका दर्शन सोसायटीत राहणाऱ्या अरुणकुमार जगन्नाथ पाटील (६३) यांनी तक्रार दिली आहे. काही महिन्यापूर्वी पाटील यांची फेसबुकच्या माध्यमातून हॅप्पीनेस डेव्हिड एक्स्प्रेस इलाईट सर्व्हिस या कंपनीच्या एजंटशी संपर्क झाला. कंपनीतील भामट्यांनी पाटील यांच्याशी चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित केला. यात आरोपींनी पाटील यांना स्वस्तात महागड्या वस्तू देण्याचे अमिष दाखविले. रोजच्या संपर्कामुळे पाटील यांनी भामट्यांवर विश्वास ठेवला. तसेच २४ फेब्रुवारी ते १८ एप्रिल २०१७ या काळात कंपनीच्या एजंट, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध बँकांच्या खात्यांमध्ये तब्बल आठ लाख ३२ हजार रुपये जमा केले. डीडी जमा करूनही पुढील काम होत नसल्याने पाटील यांना फसवणूक झाल्याची शक्यता वाटली. त्यानुसार, त्यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. लहाडेंच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैध गर्भपात प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. वर्षा लहाडे यांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने एका दिवसाची वाढ केली. डॉ, लहाडे तपासात सहकार्य करत नसल्याचा मुद्दा सरकारी पक्षातर्फे कोर्टात मांडण्यात आला.

न्यायालयीन कोठडीमुळे सेंट्रल जेलमध्ये असलेल्या डॉ. लहाडे यांना ९ मे रोजी म्हसरूळ पोलिसांनी कोर्टाच्या मंजुरीने ताब्यत घेतले होते. तपासासाठी कोर्टाने डॉ. लहाडेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी लहाडेला कोर्टात हजर करण्यात आले. डॉ. लहाडे तपासात सहकार्य करीत नसल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने कोर्टाने सप्रमाण उपस्थित केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने डॉ. लहाडेच्या कोठडीत एका दिवसाने वाढ केली. डॉ. लहाडेविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी तर म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये बेकायदा हॉस्पिटल सुरू करून प्रॅक्टिस करणे तसेच औषधे व मशिनरी ठेवणे या संदर्भांत गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलिसांनी डॉ. लहाडेकडे चौकशी केली असून, या प्रकरणी कोर्टाने डॉ. लहाडेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या म्हसरूळ पोलिस डॉ. लहाडेकडे चौकशी करीत आहेत. प्रयाग हॉस्पिटलमध्ये कोणत्या डॉक्टरांचा संपर्क येत होता. गर्भपाताच्या औषधांचा वापर कोणावर व कसा झाला तसेच सोनोग्राफी मशिनसह इतर मशिनरींचे गौडबंगाल पोलिसांना शोधून काढायचे आहे.

‘त्या’ भूलतज्ज्ञाच्या चौकशीची मागणी

प्रयाग हॉस्पिटलशी सतत संपर्कात येणाऱ्या डॉ. साहेबराव झिरवाळ यांची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सिव्हिलमध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. लहाडेंना अटक झाली. मात्र, यात मोठे रॅकेट असून, त्यात सहभागी होणाऱ्या इतर पांढरपेशा व्यक्ती समोर येणे आवश्यक आहे. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असले तरी डॉ. झिरवाळ यांचा प्रयाग हॉस्पिटलशी सतत संपर्क येत होता. लहाडे प्रकरण समोर आल्यापासून डॉ. झिरवाळ यांचे वर्तन संशयास्पद आहे. त्यांच्याविराधात अनेक तक्रारी असून, त्यांनी घेतलेल्या पदव्यादेखील संशयास्पद असल्याचा दावा केदार यांनी केला आहे. या प्रकरणी सिव्हील प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केदार यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर ‘मटा’ने सर्वप्रथम प्रकाश टाकला होता. त्यानुसार, सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी एक कमिटी स्थापन केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, डॉ. झिरवाळ यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेनगर परिसरातून सराईत गुंड जेरबंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खूनाच्या गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत संशयितास क्राइम ब्रँचच्या युनिट एकने फुलेनगर येथून जेरबंद केले. या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताच्या माहितीनुसार सदर संशयित पकडण्यात आला. त्याने लासलगाव येथे सोनाराचे दुकान फोडल्याची कबुली दिली. संशयितांकडून गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संशयितास शुक्रवारी कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सागर इश्वर खैरनार, असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्यातील सात जणांच्या टोळक्याने अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून सागर खैरनारच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचवटी हद्दीत २०१४ मध्ये झालेल्या एका खुनातील प्रमुख संशयित म्हणून सागरवर आरोप आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी हायकोर्टाने त्याचा जामीन रद्द केला. मात्र, यानंतर तो फरार झाला. पोलिस त्याच्या मागावर होते.

लाखलगाव दरोड्यातील संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पंचवटीतील फुलेनगर भागात पोलिसांनी सागरला जेरबंद केले. गावठी कट्टा घेऊन सागर फिरत असल्याच्या माहिती पोलिसांना होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यास पकडले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने शहर तसेच जिल्ह्यात घरफोडी, मोबाइल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग असे अनेक गुन्हे केले असून, यातील एका एका गुन्ह्याची माहिती समोर येते आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त विजय मगर व युनिट एकचे निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एन. एन. मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सुभाष गुंजाळ, संजय पाठक, जाकिर शेख, हवालदार चंद्रकांत सदावर्ते, अनिल दिघोळे, निर्मला हाके, संजय सूर्यवंशी, फरिद शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताच्या कुटुंबीयांना चोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताच्या कुटुंबियास संतप्त जमावाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी जिल्हा कोर्टाच्या आवारात घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे जिल्हा कोर्टात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सिन्नर फाटा येथील फरसाण कारखान्यात कामाला असलेल्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखाना मालकानेच क्रूरपणे अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. मुलीच्या आईला काम सांगून संशयिताने महिलेचे घर गाठले. यानंतर पीडित मुलीला सोबत घेऊन स्वत:च्या घरी अत्याचार केला. ही माहिती समजल्यानंतर संतप्त जमावाने ओढारोड येथील वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुभाष प्रकाशचंद झंवर (५१) या संशयितास बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांनी झंवरला अटक करून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, संशयितास कोर्टात शुक्रवारी हजर करण्याची शक्यता गृहीत पकडून पीडित मुलीच्या नातेवाईकांसह नाशिकरोड परिसरातील काही कार्यकर्ते कोर्टात पोहचले. यात १५ ते २० महिला आणि पुरुषांचा समावेश होता. यावेळी संशयिताची पत्नी, मुलगा आणि भाऊ हेदेखील आले. पीडित मुलीला भेटण्याऐवजी, संशयितास वाचवता काय? असा प्रश्न करीत संतप्त जमावाने झंवरच्या कुटुंबातील या तिघांना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत जमावाला दूर नेले. यामुळे कोर्ट परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पीडित मुलीच्या अंगावर अनेक गंभीर जखमा असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अमानवीय प्रकारामुळे गुरूवारीदेखील कोर्ट परिसरातील मोठा जमाव जमा झाला होता. मात्र, संशयिताला कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. संशयित आरोपीवर उपचार सुरू असून, त्यास शनिवारी (दि. १३) कोर्टात हजर केले जाऊ शकते.

झंवरचा कारखाना लक्ष्य

सिन्नर फाटा : सिन्नर फाटा येथील नेहे मळा परिसरातील चार वर्षीय बालिकेवरील बलात्कार प्रकरणातील संशयित सुभाष झंवर या नराधमाच्या कारखान्याला संतप्त जमावाने लक्ष्य केले. फरसाण बनविले जात असलेल्या शेडची जमावाने तोडफोड केली. बालिकेवरील बलात्कार प्रकरणाची बातमी पसरताच शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नेहे मळा भागातील संतप्त नागरिक कारखान्याकडे चालून आले. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान, बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

फाशीच्या शिक्षेची मागणी

देवळाली कॅम्प : सिन्नर फाटासह मालेदुमाल, तळ्याच्या पाडा (ता. दिंडोरी) अशा घटनांमध्ये चिमुरड्या मुलींसह युवतींवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनांमधील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे. संघटनेतर्फे बलात्काराच्या घटनांचा शुक्रवारी तीव्र निषेध करण्यात आला. नाशिकरोड पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दरम्यान, प्रेरणा बलकवडे व शिष्टमंडळाने पीडित चिमुरडीची बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक, नातेवाईकांची कर्जवसुली करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या संचालकांना सरकारकडून मदत मिळवून घेण्यात अपयश आल्यानंतर संचालक मंडळाने हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याचा व टॉप टेन थकबाकीदारांची यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अधिकाऱ्यांना वसुलीची डेटलाइनही देण्यात आली असून, मुदतीत वसुली केली नाही तर कारवाईचाही इशारा संचालक मंडळाने दिला आहे.
जिल्हा बँक संचालक मंडळाची मासिक बैठक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शेतककऱ्यांना खरीप हंगामासाठी करायवयाच्या कर्जपुरवठ्यावरही चर्चा झाली. बँकेची आर्थिक स्थिती पाहता खरीप कर्जपुरवठ्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांकडे असलेली अडीच हजार कोटींची थकबाकी वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही वसुली वाढविण्याचे निर्देश अध्यक्षांना अधिकाऱ्यांना दिले. येत्या महिनाअखेर बिगर शेती कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई करावी असे निर्देश दिलेत. जिल्हा बँकेला कोणत्याही परिस्थितीतून आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा निर्धार यावेळी संचालक मंडळाने केला. नवीन कर्जवाटप करताना शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच नियम व अटी लागू करा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

संचालकांचे राजीनामा नाट्य
जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एकीकडे अध्यक्षांसह काही संचालक प्रयत्न करत असताना, भाजपच्या दोन संचालकांनी मात्र राजीनामे देऊन धक्का दिला आहे. डॉ. अपूर्व हिरे व डॉ. अद्वय हिरे या दोन्ही संचालकांनी बँकेचे कामकाज असमाधानकारक असल्याचे सांगत, आपले राजीनामे संचालक मंडळाकडे भिरकावले. संचालक मंडळानेही त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. जिल्हा बँकेबाबत सभासदांमध्ये तीव्र संताप आहे. बँकेच्या ध्येय उद्दिष्टांस हरताळ फासण्याचे काम केल्यानेच बँकेवर ही वेळ आल्याची टीका त्यांनी राजीनामा पत्रात केली आहे. बँकेच्या असमाधानकारक कामकाजामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिरे कुटुंबियांच्या संस्थांकडे बँकेची पाच ते सहा कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे अशा संकटसमयी त्यांच्याकडून बँकेला मदतीची गरज असताना, त्यांनी दिलेल्या राजीनाम्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सहकार मंत्र्यांकडून उपदेशाचे डोस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रशासनाला मदतीऐवजी त्यांच्या उपदेशाचेच डोस एकावे लागले. जिल्हा बँकेला बिकट आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पाचशे कोटींचा कर्जपुरवठा करावा, अशी मागणी बँकेच्या वतीने करण्यात आली. कर्ज पुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, जिल्हा बँकांनी त्यांच्याकडील आपली थकीत पीककर्जाची वसुली तत्काळ करावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पदरीही निराशाच हाती आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोलाविलेल्या राज्यातील अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीस राज्य बँकेचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे, कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड, सहकार सचिव संधू, आयुक्त पाटील यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणसं जोडणारा माणूस

$
0
0

वंदना अत्रे

अनुलोम विलोम प्राणायाम करीत असताना उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन तो फुफ्फुसा पर्यंत पोचलाच नाही तर... तर कदाचित माणसाचा श्वास कायमचा थांबू शकेल.. पण असे घडते ते सामान्य माणसाच्या बाबतीत. जेव्हा भीष्मराज बाम नावाच्या माणसाचा हा श्वास त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोचत नाही तेव्हा काय होते नेमके? तेव्हा अनेक माणस निराधार होतात, त्यांच्या पायाखालचा आधार जातो. कोण आहेत ही माणस? नाशकात मोनाली गोऱ्हे सारखी एखादी शूटर, शंतनू गुणे सारखा एखादा शिक्षणात काम करणारा माणूस, डॉ. भरत केळकरांसारखा एखादा जगभरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी लागणारी हिम्मत मिळवणारा डॉक्टर आणि माझ्यासारखी एखादी सतत कॅन्सरशी लढत असलेली सामान्य स्त्री किंवा तिकडे ह्या सगळ्यांच्या पलीकडे आणि लौकीकाने खूप मोठी असलेली एखादी अंजली भागवत किंवा गगन नारंग ही आणि अशी लाखो...! भारतात आणि बाहेरच्या आडव्या-उभ्या जगात बाम सरांनी जोडलेली.

एकदा भेटल्यावर त्यांना हक्काने भेटणारी, घरी नेणारी, आपले छोटे-मोठे प्रश्न घेऊन भक्तीने त्यांच्याकडे जाणारी... हे प्रश्न कधीच फक्त खेळातील नसत, कोणाच्या मुलीचा घटस्फोट,, कोणाच्या करीयर मध्ये आलेले भांबावलेपण, कोणाला एकाग्रतेचा प्रश्न, योगाचे, अभ्यासाचे, ध्यानाचे, साधनेचे आणि ह्या प्रत्येक प्रश्नाला जोडून असलेल्या जगण्याचे सुद्धा. समोर असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाम सरांकडे मिळेल असा विश्वास कुठून येत होता? ठाऊक नाही पण तो होता. प्रत्येकाला. आणि त्यासाठी वेळी अवेळी सरांकडे जाण्याची, त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलण्याची मुभा कशी होती सर्वांना? ती बाम सर आणि काकूंनीच दिली होती, त्याच्या वागण्यातून, पाया पडतांना डोक्यावर पडणाऱ्या वत्सल आशीर्वादातून आणि त्याच्यामध्ये असलेल्या कमालीच्या, अतिशय दुर्मिळ असलेल्या साधेपणातून.... हा साधेपणा किती? आजारी रुग्णाला भेटण्यासाठी त्याच्या घरी, हॉस्पिटलमध्ये कुठे जाण्यास ते तयार. खेळाच्या, अभ्यासाच्या अगदी पहिल्या पायरीवर असलेल्या नवशिक्या विद्यार्थ्यांना दोनदोन तास बोलण्यास ते जसे तयार तसे भगवद्गीता किंवा उपनिषद ह्यावर बोलता बोलता ज्युलियस सीझर ते हॅरी पॉटर असा मोठा पल्ला सहज पार करणार... कुठे कमवले हे सगळे त्यांनी आणि कधी? ठाऊक नाही. पोलिस दलात काम करता-करता आणि रंगा बिल्ला सारख्या माणसांना हाताळताना बाबा आमटे आणि पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्यामधील मोठेपण जाणून त्यांच्या कामाशी स्वतःला जोडून घेण्याची संवेदनशीलता कशी सांभाळली त्यांनी? ठाऊक नाही... एकाच वेळी अनेक माणसांच्या आयुष्यात राहण्याचे आणि तरीही ह्या जगण्याच्या पलीकडे असलेल्या चैतन्याबद्दल चिंतन करण्याचे दुर्मिळ योग सामर्थ्य त्यांच्या ठायी होते. बाम सर आपल्याशी मनातील बोलतात, जिव्हाळ्याने बोलतात असे त्यांच्याजवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते, ते खरे नव्हते, प्राणायाम करता-करता ते असा झटकन निरोप घेणार हे ठाऊक असते तर ती सभा ठरवलीच गेली नसती... आमचा आक्रोश तुम्हाला ऐकू येतो आहे ना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images