Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोणी कॅश देता का कॅश?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहर परिसरातील बहुतांश एटीएममध्ये पुन्हा एकदा खडखडाट झाल्याने कोणी कॅश देता का कॅश, अशी भावना हतबल नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून बहुतांश एटीएममध्ये कॅशचे शॉर्टेज झालेले आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएममधून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. नाशिकसह अन्य शहरांतही असेच चित्र असून, रिझर्व्ह बँकेने हात आखडता घेतल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप याप्रश्नी केला जात आहे.

--

करन्सी चेस्ट खाली

रिझर्व्ह बँकेकडून बँकांना कॅशचा सप्लाय होतो, त्याला करन्सी चेस्ट म्हणतात. बँकेची गरज बघून महिना-दोन महिन्यांनी करन्सी चेस्टला सप्लाय होतो. मात्र, पंधरा दिवसांपासून करन्सी चेस्टला रिझर्व्ह बँकेकडून पैसे येणेच बंद झाले आहे. त्यामुळे बँका एटीएम पूर्ण क्षमतेने चालवू शकत नसल्याची स्थिती आहे.

--

स्टेट बँकही हतबल

नोटाबंदीच्या काळात अनेक बँकांचे एटीएम बंद असायचे. मात्र, स्टेट बँकेचे एटीएम सुरूच असायचे. पण, गेल्या दहा दिवसांपासून स्टेट बँकेच्या एटीएममध्येही कॅश नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. स्टेट बँकेच्या नाशिकरोड, पंचवटी, सीबीएस, सिडको आणि सातपूर या शाखा करन्सी चेस्ट आहेत. म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडून या शाखांना थेट रोकड येते. या शाखा नंतर आपल्या छोट्या शाखांना कॅश पुरवतात. स्टेट बँकेच्या या करन्सी चेस्टलाच पैसे येणे बंद झाल्याने एटीएमवर परिणाम झाला आहे.

--

दोन तासांत संपतेय कॅश

स्टेट बँकेच्या नाशिकरोड शाखेत नागरिक, व्यावसायिकांकडून कॅश भरणा होतो. रिझर्व्ह बँकेकडून रोकड येणेच बंद झाल्याने आपल्या भरण्यातूनच स्टेट बँक एटीएममध्ये पैसे भरत आहे. नाशिकरोड शाखेतील दोन एटीएममध्ये एक कोटी रुपये २४ तासाला भरले जातात. तेही लवकर संपत आहेत. एटीएमची क्षमता सुमारे ६५ लाखांची असते. महाराष्ट्र बॅँकेच्या नाशिक जिल्हा व शहरात ९० शाखा आहेत. या बँकेची शहरात वीस, तर नाशिकरोडला तीन एटीएम आहेत. जी कॅश एटीएममध्ये भरली जाते, ती दोन तासात संपत आहे.

--

ब्लॅक मनी शक्य

एका बँकेच्या सूत्रांनी सांगितले, की लोक बँकेतून पैसे काढत आहेत. मात्र, भरणाच आश्चर्यकारकरीत्या कमी होत आहे. रोटेशन व्यवस्थित होत नाही. याचा अर्थ ब्लॅकमनीसाठी पैसे वेगळे पडत असावेत, असाही होऊ शकतो. घरकुल व अन्य सरकारी योजनांचे लाभार्थी, रोजचे ग्राहक यांनाही कॅश द्यावी लागते. त्यातच करन्सी चेस्टला पैसे येत नाहीत. त्यामुळे एटीएमवर परिणाम होत आहे.

--

समस्या सर्वत्र

नाशिकरोड प्रेस कामगार राजू नागरे देवदर्शनासाठी नांदेडला गेले होते. जवळील रोकड संपल्याने सायंकाळी ते सर्व एटीएम फिरून आले. पण, पैसे मिळाले नाहीत. शेवटी एका सराफी पेढीकडे कार्ड स्वॅप करून त्यांनी पाच हजार रुपये मिळविले. त्यासाठी एक टक्का ‘व्हॅट’ त्यांना भरावा लागला. त्यानंतर एका पेट्रोलपंपावरून त्यांना आणखी कॅश घ्यावी लागली.

--

काल मी बोधलेनगर, अशोका मार्ग, इंदिरानगर, नाशिकरोड आदी ठिकाणच्या दहा-बारा एटीएममध्ये गेलो. मात्र, सगळीकडेच खडखडाट होता. बँकाही नीट उत्तर देत नाहीत.

-सागर कुलकर्णी, त्रस्त नागरिक

--

रिझर्व्ह बँकेकडून करन्सी चेस्टला होणारा सप्लायच बंद झाला आहे. सरकारी योजनांचे लाभार्थी, रोजच्या ग्राहकांसाठी कॅश द्यावी लागते. त्यामुळे कॅशची टंचाई झाली आहे.

-विक्रांत पाटील, व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिकरोड शाखा

--

करन्सी चेस्टचा दर्जा असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखांकडून आमच्यासारख्या छोट्या शाखांना कॅश मिळते. तथापि, हे पैसेच येत नसल्याने रोकड कमी पडत आहे.

-चंद्रशेखर हेडावू, व्यवस्थापक, स्टेट बँक, जेलरोड शाखा

--

नोटाबंदीच्या दिवसांप्रमाणेच सध्याही नाशिकरोड प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशेच्या नोटांची छपाई अखंड सुरू आहे. कॅश शॉर्टेजचे कारण रिझर्व्ह बॅँकच सांगू शकते.

-जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरात मंगल दिन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैशाख बुद्ध पौर्णिमा म्हणजे जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती. हा मंगल दिन बौद्धधम्मावर प्रेम आणि आस्था ठेवणाऱ्यांसाठी महापर्व समजला जातो. वैशाख पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. जगातील कोणत्याच महापुरुषाच्या बाबत अशा घटना घडल्या नाहीत. शाक्यमुनी तथागत बुद्ध जगाला प्रकाश देणारे तेजस्वी सूर्यच असल्याने हा दिवस नाशिकमध्ये मंगल दिन म्हणून उत्साहपूर्ण पध्दतीने साजरा केला जाणार आहे.

गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून वेदकालीन यज्ञक्रियेतल्या पशुहत्यांना, जन्मजात उच्च-नीचतेला लगाम घालण्याचे काम करत समाजाला योग्य दिशा दाखविली. त्यामुळेच समाजात बहुजनांना दिलासा मिळाला आणि ते नव मानवतावादी धर्माकडे आकृष्ट झाले. दया, अहिंसा, शांती, मानवतावाद आणि समानता या चिरंतन तत्त्वांनी जीवनातल्या खडतरतेवर आणि दु:खावर मात करता येते हे त्यांना समजल्यावर पुढची ४५ वर्षे भिक्षूसंघाची स्थापना करून या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. भिक्षूकी संघाची स्थापना, कर्माधारित उच्च-नीचतेचा पुरस्कार बहुमतांनी संघांचे निर्णय घेणे आणि सर्वसामान्यांच्या पाली भाषेत धार्मिक ग्रंथांचे लेखन ही त्यांची कृतिशील पावले होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्माची निवड केली.
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी जाऊन सामूहिक प्रार्थना करण्याची पद्धत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातांत ९ ठार, १७ गंभीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत नऊ जण ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. साक्री तालुक्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील धाडणे गावाच्या फाट्याजवळ विचित्र असा तिहेरी अपघात झाला. यात चार जण ठार झाले. तर धुळ्याजवळील गुरुद्वाराजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी पिंपळनेरहून साक्री जात असताना रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळली. त्याचवेळी पिकअपच्या मागून भरधाव वेगाने आलेली मोटारसायकल आदळली. त्या धडकेने मोटारसायकलच्या टाकीतून पेट्रोल पडून आग लागली. या आगीमु‍ळे मोटारसायकल व पिकअप गाडी जळाली. तर दुसरा अपघात टाटा सुमो ट्रकवर आदळल्याने झाला. या अपघातात सुमो वाहनातील पाच जण जागीच ठार झाले. यात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनशे करबुडव्या व्यापाऱ्यांवर खटले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जीएसटी लागू होण्यापूर्वी महापालिकेने एलबीटीची विवरणपत्रे वेळेत सादर न करणाऱ्या पंधराशे व्यापाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली आहे.

महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून कारवाईची नोटीस होवूनही तीन वर्षापासून विवरण पत्रे सादर न करणाऱ्या तीनशे व्यापाऱ्यांविरोधात पालिकेने जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. तर जवळपास पंधराशे व्यापाऱ्यांना नव्याने अंत‌िम नोट‌िसा काढल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, त्यामुळे जीएसटी लागू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
राज्यसरकारने सन २०१२ पासून जकात रद्द करत स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू केला.

जकात नाक्‍यावर गाड्या थांबविण्यापेक्षा व्यापाऱ्यांची नोंदणी करून विक्री झालेल्या मालावर कर आकारणी केली जात होती. मात्र, २०१५ पासून ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योग व व्यापाऱ्यांच्या एलबीटीचा भार राज्य शासनाने स्वतःच्या अंगावर घेऊन अनुदानस्वरुपात महापालिकांना निधी देण्यास सुरुवात केली. ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या संस्थांकडून कर वसूल करण्याची जबाबदारी मात्र महापालिकेकडेच ठेवण्यात आली. त्यामुळे महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांची नोंदणी केली. शहरात वीस हजारांहून अधिक व्यापाऱ्यांची नोंदणी झाली होती. या सर्व व्यापाऱ्यांना एलबीटी विभागाकडे विवरण पत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले. बहुतांश व्यावसायिक करपात्र नसले तरी त्यांनासुध्दा विवरण पत्र दाखल करणे बंधनकारक होते. परंतु, आपण करपात्र नसल्याने विवरणपत्र दाखल करण्याची आवश्यकता नाही, असा समज करून दीड हजार व्यापाऱ्यांनी विवरणपत्रेच दाखल केली नाहीत.

आधीचा ‘हिशेब’ ‌क्लीअर करणार
केंद्र सरकारने ‘एक देश, एक कर’ धोरणाचा भाग म्हणून जीएसटी कर प्रणाली अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या थकबाकी, कायदेशीर मुद्दे तसेच नोट‌िसा निकाली काढण्यासाठी पालिकेचा एलबीटी विभाग सरसावला आहे. सन २०१४ ते २०१६ या तीन वर्षाच्या कालखंडात या पंधराशे व्यापाऱ्यांनी विवरणपत्रेच दाखल केलेली नाहीत. महापालिकेने अशा दीड हजारांहून अधिक व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटीस काढल्या आहेत. तसेच विवरण पत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंड व शिक्षेची तरतूद असलेल्या नोट‌िशीला दाद न मिळाल्याने आता महापालिकेने दीड हजारपैकी तीनशे व्यापाऱ्यांना न्यायालयात खेचले आहे. त्यांच्या‌ विरोधात जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टची डेडलाइन

$
0
0

कचरा विलगीकरणावर आयुक्त अधिकाऱ्यांवर कडाडले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात एक मेपासून सुक्या व ओल्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचा मुहूर्त टळल्याच्या प्रकाराची आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोग्य विभागासह स्वच्छता निरीक्षकांची मंगळवारी बैठक घेवून ऑगस्ट अखेरपर्यंत संपूर्ण शहरात कचरा विलगीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मे अखेरपर्यत सहा विभागांतील प्रत्येकी एक प्रभागात घनकचरा विलगीकरणाचे टार्गेट पूर्ण केले जाणार आहे. यासाठी क्रेडाईसह विविध संस्थांचीही मदत घेतली जाणार असून, नव्या गृहप्रकल्पांमध्ये घनकचरा विलगीकरणाची व्यवस्था बिल्डरांमार्फतच केली जाणार आहे. नाशिक हे घनकचरा विलगीकरण करणारे राज्यातील पहिले शहर बनवण्याचा मानस आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आता शहरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. महापालिकेचा खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असून, नवीन २०६ घंटागाड्या दाखल आता झाल्या आहेत. या घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्याची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. परंतु, नागरिकांकडूनच ओला व सुका कचरा वेगवेगळा येत नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेने आता १ मेपासून नागरिकांनीच ओला व सुका कचरा घंटागाड्यांमध्ये टाकावा, असे फर्मान काढले होते. प्रत्येक घरात नागरिकांनी दोन डस्टब‌नि ठेवावेत, त्यातच ओला व सुका असा कचरा स्वतंत्र करावा. त्यानंतर सोसायटीच्या दोन डस्टबिनमध्ये तो जमा करावा आणि नंतरच घंटागाडीत ओला व सुका कचरा टाकावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. परंतु पालिकेचा हा मुहर्त हूकला आहे.

मुंबईत अमृत योजनेची बैठक झाली असून, त्यात महापालिकेच्या स्वच्छतेच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. ऑगस्ट अखेरपर्यंत नाशिकमध्ये कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेवून स्वच्छता उपयायोजनांचा आढावा घेतला. महापालिकेच्या घंटागाड्यांमध्येच अटी व शर्ती असतांनाही कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्याबद्दल आयुक्तांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यांनतर ऑगस्ट अखेरपर्यंत शहरात ओला व सुखा कचरा विलगीकरण पूर्ण करण्याचे टागरेट आरोग्य विभागाला देण्यात आले. त्यानुसार मे च्या अखेरीस सहा विभागातील प्रत्येकी एक प्रभागात कचरा विलगीकरण सक्तीचे पूर्ण केले जाणार आहे त्यानंतर जून मध्ये ५० टक्के शहरात घनकचरा विलगीकरण पूर्ण केले जाणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत ही डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत संपूर्ण शहरात घनकचरा विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


ऑगस्ट अखेरपर्यंत कचरा विलगीकरणाची प्रक्रिया शहरात पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी क्रेडाईसह इतर संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नाशिक हे राज्यातील पहिले घनकचरा विलगीकरण करणारे शहर म्हणून उदयास येणार आहे.
-अभिषेक कृष्णा, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ला मिळणार चाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी निधी येऊन पडला असतानाही, केवळ सीईओंसह प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीअभावी स्मार्ट सिटीची रुतलेली गाडी आता मे अखेरपर्यंत मार्गी लागण्याची शक्यता आहे.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी असलेल्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या सीईओ पदासाठी प्रशासन उपायुक्त विजय पगार यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पीएमसी, सीईओ या पदांसह स्मार्ट सिटीतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असा दावा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे.

महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी १३७ कोटींचा निधी येऊन पडला आहे. परंतु, स्मार्ट सिटीच्या कामांसाठी आवश्यक असलेले प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनी (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) आणि सीईओ या पदाची अद्याप नियुक्ती झालेली नाही. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पदासाठी महापालिकेने आतापर्यंत दोनदा निविदा काढल्या आहेत. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत पीएमसीच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तिसऱ्या निविदेला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सीईओच्या रिक्त पदासाठी अनुभवी व्यक्ती असावा, म्हणून प्रशासन उपायुक्त विजय पगार यांची नियुक्ती करावी अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विजय डेकाटेंना निलंबनाची नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना घंटागाडी ठेकेदारांवरील मेहेरबानी प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची सोय करण्याचे करारात नमूद असतानाही डॉ. डेकाटे यांनी ठेकेदारांना पाठीशी घातले. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी डॉ. डेकाटे यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून सद्यस्थितीत घंटागाड्यांमधील वर्गीकरणाचा अहवाल मागविण्यात आला असून, दोषी आढळल्यास डॉ. डेकाटे यांचे निलंबन होऊ शकते.

घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असावी असे करारात नमूद करण्यात आले आहे. परंतु, डिसेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत सहा महिने उलटले तरी घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची सोय झालेली नाही. काही ठेकेदारांनी या अटी व शर्तीचे पालन केले आहे. सोबतच याबाबतीत ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची सुध्दा तरतूद होती. परंतु, आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी नियमांची अंमलबजावणी केली नाही. तसेच ठेकेदारांनाच वेळोवेळी पाठीशी घातल्याचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरमतमोजणीवर २७ जूनला सुनावणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक कार्यकारी मंडळातील धनंजय बेळे यांच्यासंदर्भातील फेरमतमोजणीबाबतच्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी आता २७ जून ही तारीख देण्यात आली आहे.

सार्वजनिक वाचनालयात आधी झालेल्या निर्णयाप्रमाणे तीस दिवसांनंतर फेरमतमोजणी ठेवण्यात येणार होती. त्यासाठी धनंजय बेळे आणि बी. जी. वाघ यांना चर्चेसाठी पत्रही पाठविण्यात आले होते. परंतु, पत्र मिळताच बेळे यांनी त्यावर आक्षेप घेत धर्मादाय आयुक्त व दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली. बेळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात दिवाणी न्यायालय आणि धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली असल्याचे पत्रही माधवराव भणगे यांना दिले. याच तक्रारीवर मंगळवारी, (दि. ९) सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, आता २७ जून तारीख मिळाली आहे.

सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक २ एप्रिल रोजी झाली, तर मतमोजणी ३ एप्रिलला झाली होती. या निवडणुकीत जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांना ८९५, तर ग्रंथमित्र पॅनलचे बी. जी. वाघ यांना ८९४ मते मिळाली. वाघ यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र, ४ एप्रिलला रामनवमी, तर ५ एप्रिलला सावानाला साप्ताहिक सुटी असल्याचे कारण देत भणगे यांनी तो कार्यक्रम पुढे ढकलला. यावर बेळे यांनी आक्षेप घेत घटनेनुसार २४ तासांत फेरमतमोजणी करायला हवी, असे सांगितले. त्यावेळी भणगे यांनी दोघांना कायदेशीर पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. या ३० दिवसांमध्ये काहीही न होऊ शकल्याने निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी ५ मे रोजी बेळे व वाघ यांना पत्र पाठवले. बेळेंनी पत्र प्राप्त होताच भणगे आता निवडणूक निर्णय अधिकारीच नाहीत, असा पवित्रा घेत दिवाणी न्यायालयात रिट याचिका आणि धर्मादाय आयुक्तांकडे या सर्व प्र्रकरणाविषयी तक्रार केली. निवडणुकीसंदर्भात कोणतीही सुनावणी, कोणताही निर्णय, फेरमतमोजणी, पत्रव्यवहार करण्याचा अधिकार राहिलेला नसल्याने आता मतपत्रिका बाहेर काढल्या, तर फौजदारी दाखल करू, असे बेळे यांनी म्हटले आहे.

--

‘म्हणणे मांडण्यासाठी वेळ द्या’

मंगळवारी सुनावणीसाठी आलेल्या सावाना प्रतिनिधींनी प्रथम आम्हाला तक्रार काय दाखल केली आहे ते दाखवा, त्यानंतर आम्ही वकील द्यायचा की नाही ते ठरवू, असे सांगितल्याने त्यांना तक्रारीची प्रत देण्यात आली. आमचे म्हणणे मांडण्यासाठी आम्हाला वेळ द्या, असे सावानाच्या प्रतिनिधींनी सांगितल्याने त्यांना जून महिन्याच्या २७ तारखेपर्यंत वेळ देण्यात आला असून, आता पुढील सुनावणी त्या दिवशीच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसंग्रामचा इशारा

$
0
0

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा उधळून लावणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी निवेदन देऊन दिला. तसेच शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसंग्राम पक्षाने प्रसिद्धपत्रक काढून राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. कोणाला व्यासपीठावर बसवायचे हा आमचा निर्णय असल्याचे त्यात म्ह‌टले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी (दि. ८) जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आमदार गोटेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुंडाला व्यासपीठावर बसविल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. याला उत्तर म्हणून लोकसंग्राम पक्षाने एक प्रसिद्धपत्रक काढले आहे. यात व्यासपीठावर कोणाला बसवायचे हा आमचा अधिकार आहे. तुमचा काय संबंध? असे म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोरेंवर निशाणा साधला आहे. ‘सभा उधळायला दोन पायावर याल आणि जाताना कशावर जाल?’ याचा विचार करा, असेही यात म्हटले आहे. पत्रकावर दिलीप साळूंखे, अमोल सूर्यवंशी, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविकसित भूखंडांची अनेकांना धास्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांसाठी भूखंडांचे वाटप केलेले आहे. परंतु, अनेक वर्षांपासून असंख्य भूखंड वापराविना पडून आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीच्या नाशिक विभागाच्या प्रादेक्षिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी अशा अविकसित भूखंडांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अविकसित भूखंडधारक चांगलेच धास्तावले आहेत. सातपूर एमआयडीसीत तब्बल दहा वर्षांहून अधिक काळापासून वापराविना पडून असलेल्या कारखान्यांच्या भिंतींना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या कारवाईचा हा परिणाम असल्याचे मत तरुण उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

नाशिक शहरात सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींची स्थापना झाल्यावर शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनींवर आरक्षण पडले होते. शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनींवर कारखान्यांचे मोठे जाळे सातपूर व अंबड एमआयडीसीत पसरले आहे. परंतु, त्यात एमआयडीसीकडून उद्योगांसाठी घेतलेले अनेक भूखंड वापराविना पडून असल्याचे चित्र होते. यासंदर्भात ‘मटा’ने वेळोवेळी उद्योगांसाठी पडून असलेल्या भूखंडांचे वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, शासनाच्या आदेशावरून एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी अविकसित भूखंडच ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईने धाबे दणाणलेल्या संबंधित भूखंडधारकांकडून सातपूर एमआयडीसीत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून पडून असलेल्या कारखान्याचे काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. काराखान्याचे पत्रे बदलण्यासह रंगरंगोटीचे काम व्यवस्थापने हाती घेतल्याने कारवाईचा इम्पॅक्ट दिसून येत आहे.

--

आणखी कारवाईचे संकेत

नाशिक, अहमदनगर व श्रीरामपूर येथील तब्बल ३२१ अविकसित भूखंडधारकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत, तर ३७ पडून असलेले भूखंड एमआयडीसी ताब्यात घेणार असून, गरजू उद्योजकांना ते वितरित केले जाणार आहेत. केवळ जागेच्या किमती वाढविण्यासाठी अडकवून ठेवलेल्या अनेक भूखंडांवरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत एमआयडीसीकडून देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मजूर ते फौजदार’... जनकचा खडतर प्रवास

$
0
0

नाशिक : जन्मत:च वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने मजुरी करीत त्याचं पालन-पोषण केलं. पोटासाठी गावं बदलली. पैशांअभावी वारंवार त्याचं शिक्षणही बंद पडलं. तरीही हार न मानता तो लढत राहिला. शिक्षणासाठी पाठीवर सिमेंटच्या गोण्या उचलत अन् बसथांब्यांवर पाठ टेकवतच कॉन्स्टेबल बनलेला हा जिद्दी तरुण आता फौजदार बनला आहे.

ही कहाणी आहे मूळच्या परभणीतील अन् आता नाशिक पोलिस मुख्यालयात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत जनक ज्ञानदेव वाकणकर यांची ! ३१ वर्षीय जनक कळत्या वयापासूनच परिस्थितीशी दोन हात करतो आहे. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात एका दुर्गम गावचे ते मूळ रहिवासी. त्याच्या जन्मानंतर वडिलांचं महिनाभरातच आजाराने निधन झाले. गावी घरदार किंवा जमीन जुमला काहीच नसल्याने हाताला काम मिळेल तिथे नातेवाईकांच्या आसऱ्यानं आईने जनक अन् त्याच्या बहिणीला हाताशी घेत स्थलांतर केले. दरम्यानच्या प्रवासात मुलीचे जास्त शिक्षण होऊ शकले नाही. पण जनक जिद्दीने अभ्यास करत होता. चौथी पास झाल्यानंतर पैशांअभावी शाळा सुटून शिक्षणात खंड पडला. पण कधी शिक्षकांनी तर कधी घरमालकांनी पुढाकार घेत या मुलांना पुन्हा शाळेची पायरी चढायला लावली. दहावीच्या इयत्तेतही ७५ टक्के गुण मिळविलेला जनक सन २००३ मध्ये हातांना काम शोधत नाशिकमध्ये येऊन पोहचला.

एके ठिकाणी तडजोडीपोटी त्याने पाठीवरुन सिमेंटच्या गोण्या वाहण्याचे हमालीकामही स्वीकारले. काही दिवसांतच त्याने एमआयडीसीतील एका कंपनीत दुसरे काम स्वीकारले. कोवळ्या वयात सुमारे १५०० ड‌िग्री सेल्सिअस तापमानाच्या भट्टीत लोखंड तापविण्याची खडतर ड्यूटी त्याच्याकडे होती. सातपूरच्या जनता कॉलेजमध्ये सकाळी कॉलेज अन् दुपारी एमआयडीसीतील काम अशी दरमजल करत त्याने खडतर कष्टांत फिज‌िक्स या विषयात बी. एस्सी. पदवी मिळविली. याच दरम्यान पोलिस दलातील एका भरतीत तो जिद्दीने कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाला. वडिलांच्या पाठीमागे आई अन् काकांनी अपार मेहनतीने केलेल्या कष्टांच्या जाणीवेने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. सलग सहा वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तो देत होता. अखेरीला २०१६ मध्ये दिलेल्या विभागीय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर होऊन ३५० उमेदवारांमध्ये तो १७८ व्या क्रमांकावर पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने यशाचा झेंडा रोवला आहे. त्याच्या यशाचे श्रेय तो आई, पत्नी अन् काकांना देतो.

परभणीसारख्या दुर्गम भागातून पोटासाठी आईसोबत नाशिकमध्ये आलो होतो. वाट्याला आलेल्या अतिशय खडतर परिस्थितीने मला कतृत्वाचे स्वप्न दाखविले. प्रसंगी मजुरीही केली पण हार मानली नाही. आयोगाच्या आणखी वरच्या पदाच्या परीक्षा देऊन मला ध्येय गाठायचे आहे.
- जनक वाकणकर,
कॉन्स्टेबल, पोलिस मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेव्हेन्यू स्टॅम्प्सचा पोस्टात तुटवडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्य सरकार आणि टपाल खाते यांच्यातील करार संपल्याने एक रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पसची शहरात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गोळे कॉलनीतील पोस्ट ऑफिसमध्ये एक रुपयाचे रेव्हेन्यू स्टॅम्प्स उपलब्ध नसून, नाशिकच्या कोर्टात मिळतील, अशी सूचनाच लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण धावाधाव करावी लागत आहे.

रेव्हेन्यू स्टॅम्प एक रुपयाचा असला, तरी त्याच्यावाचून अनेक कायदेशीर कामे खोळंबतात. विविध सरकारी कामांसाठी एक रुपयाच्या स्टॅम्पची गरज भासते. ते पोस्टात उपलब्ध नसल्याने कोर्टात जाऊन रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. शहरातील छोट्या-मोठ्या दुकानांमध्येही रेव्हेन्यू स्टॅम्प्स नाहीत. मोठी पायपीट करून एखाद्या दुकानात रेव्हेन्यू स्टॅम्प मिळाल्यास एक रुपयाचा स्टॅम्प दोन रुपयाला घ्यावा लागत आहे. म्हणजेच सरकार व पोस्टाच्या गैरकारभारामुळे नागरिकांची भर उन्हात पायपीट तर होत आहेच, परंतु वेळ व पैशाचाही अपव्यय होत आहे. एवढ्या नागरिकांना परत पाठविण्याएवजी पोस्टानेच कोर्टातून रेव्हेन्यू स्टॅम्प आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

--

नाशिकरोडला दिलासा

नाशिकरोड टपाल कार्यालयातही रेव्हेन्यू स्टॅम्प्सची टंचाई होती. मात्र, सोमवारी (दि. ८) दुपारनंतर एक लाखावर रेव्हेन्यू स्टॅम्प्स नाशिक कोशागारातून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. हे स्टॅम्प्स नाशिकरोड टपाल कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील २५ टपाल कार्यालयांत उपलब्ध केले. रेव्हेन्यू स्टॅम्प्सची गरज भासल्यावर टपाल खाते कोर्टाच्या कोशागार विभागाला पत्र देते. त्यानंतर कोशागार विभाग मुख्य टपाल कार्यालयाला पुरवठा करतो. तेथून अन्य कार्यालयांना पुरवठा करता येतो, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती नामदार गोखलेंची, अभिवादन लोकमान्यांना!

$
0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंकडून चूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या जयंती दिनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना अभिवादन करण्याचा प्रताप देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केला आहे. घडला प्रकार लक्षात आल्यानंतर हे वादग्रस्त ट्विट डॉ. भामरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हटविण्यात आले.

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक असलेले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी झाला. अहिंसेचा लढा देऊन भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा असलेले मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांनी गोखले यांच्या विचारांचाच आधार घेतला.

परिणामी, महात्मा गांधी हे गोखले यांचे शिष्य असल्याचे आजही समजले जाते. गोखले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी दिवसभर विविध लोकप्रतिनिधीं-कडून अभिवादन केले जात होते. देशाचे संरक्षण राज्यमंत्री तसेच धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास एक ट्विट केले. यात म्हटले होते की, Tribute to great freedom fighter Gopal Krishna Gokhleji on his Jayanti विशेष म्हणजे, या ट्विटसोबत गोखले यांच्याऐवजी चक्क लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा फोटो देण्यात आला होता. डॉ. भामरे यांच्या @DrSubhashMoS या अधिकृत ट्विटर हँडलचे पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स असल्याने या वादग्रस्त ट्विटची देशभरात चर्चा सुरू झाली. हा सारा प्रकार दुपारच्या सुमारास डॉ. भामरे यांना निदर्शनास आला. त्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हे ट्विट डीलीट करण्यात आले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर मीटर हद्दीसंदर्भात शिवसेनेचे आयुक्तांना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लष्करी हद्दीपासून शंभर मीटर अंतरावर बांधकामे करण्यास महापालिकेने तत्काळ परवानगी द्यावी तसेच महापालिका प्रशासनाने लष्करी विभागाशी संपर्क साधून यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. खासदार हेमंत गोडसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवाजी सहाणे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.

खासदार गोडसे, अजय बोरस्ते यांनी आयुक्तांची भेट घेतली. लष्करी हद्दीला लागून बांधकाम करायचे झाल्यास त्यापूर्वी पालिकेने स्थानिक लष्करी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. तीस दिवसांमध्ये बांधकाम करण्याबाबत ना हरकत दाखला प्राप्त न झाल्यास लष्करी आस्थापनाची बांधकामास परवानगी आहे, असे गृहीत धरून महापालिकेने परवानगी द्यावी असा नियम आहे. महापालिकेने यापूर्वीच प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यावर उत्तर आलेले नाही. त्यामुळे नगररचना विभागाकडे अडकलेल्या बांधकामांच्या प्रकल्पांना परवानगी देण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिबेटियन मार्केटमध्ये आयटी सेंटर करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात आयटीला प्रोत्साहन देण्यासाठी तिबेटियन मार्केटची जागा आयटी पार्कसाठी द्यावी, अशी मागणी आयटी उद्योजकांनी महापौरांकडे केली आहे. निपमचे श्रीधर व्यवहारे यांनी महापौर रंजना भानसी यांना प्रस्ताव दिला असून, ठाणे येथील वागळे इस्टेटच्या धर्तीवर महापालिकेने आयटी उद्योगांसाठी सवलती द्याव्यात अशी मागणी केली आहे.

शहरात उद्योग स्थिरावण्यासाठी महापालिका हवे ते सहकार्य करेल, असे आश्वासन महापौरांनी दिले आहे. दरम्यान व्यवहारे यांच्या मागणीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एमआयडीसीतील आयटी उद्योजकांनी पालिका मुख्यालयात भानसी यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आयटी विभागाचे प्रमुख प्रशांत मगर, निपमचे श्रीधर व्यवहारे, मुक्त विद्यापीठाचे आयटी विभागाचे माजी संचालक डॉ. आर. एस. तिवारी, चेतना कामळसकर आदी उपस्थित होते.

व्यवहारे म्हणाले, की आयटी उद्योगासाठी महापालिकेने सवलत दिल्यास रोजगाराला चालना मिळेल. ठाणे महापालिकेने वागळे इस्टेटमध्ये या उद्योगांसाठी सवलत दिल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. शहरातील तिबेटियन मार्केटमध्ये महापालिका शॉपिंग मॉल उभारत आहे. त्याऐवजी महापालिकेने ही जागा आयटी उद्योजकांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ‘मेक इन नाशिक’ या प्रोजेक्टमध्ये त्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे व्यवहारे यांच्या मागणीवरून शहरात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरामुक्तीसाठी पुढाकार...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छतेच्या बाबतीत देशात १५१ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिकला अग्रस्थानी नेण्यासाठी आता नाशिककरांनीच पुढाकार घेतला आहे. मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे नाशिककरांनी शहराच्या विविध भागातील कचऱ्याच्या ठिकाणांचे सचित्र वृत्त पाठविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी त्याचा प्रत्यय आला.

केंद्र सरकारतर्फे नुकतेच राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात नाशिकचा क्रमांक १५१ वा आहे. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत नाशिककरही आग्रही असून, शहराला स्वच्छ बनविण्याचा निर्धार आता करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागातील आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचऱ्याचे फोटो ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपद्वारे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘मटा’नेच पुढाकार घेत ‘माझं नाशिक, स्वच्छ नाशिक’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. पहिल्याच दिवशी नाशिककरांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला आहे. या अॅपद्वारे पाठविल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणांची माहिती संबंधित सिटिझन रिपोर्टरच्या नावासह ‘मटा’मध्ये प्रसिद्ध केली जात आहे. या ठिकाणांबाबत महापालिकेकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याची ही ठिकाणे गायब होऊन नाशिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे.

--

तुम्हीही पाठवा फोटो...

गुगल प्ले स्टोअरवर ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर आपल्या भागातील कचऱ्याचा फोटो आणि त्याची माहिती अगदी व्हॉट्सअॅपप्रमाणे सहजच पाठविणे शक्य होते. विशेष म्हणजे, ही माहिती मराठीत टाइप करून पाठविण्याची सुविधाही अॅपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा फायदा नाशिककर मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

--

कचऱ्यामुळे डुकरांचा वावर

नाशिकरोड येथील गांधीनगर भागातील मैदानावर कचरा पसरलेला असून, त्यामुळे डुकरांचा वावर वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे.

-तेजस शेरताटे

--

फलकालाच कचऱ्याचा वेढा

स्वारबाबानगर, सातपूर येथील हा फोटो आहे. येथे कचरा टाकू नये असा फलक महापालिकेने या ठिकाणी लावलेला आहे. मात्र, या फलकाभोवतीच कचरा टाकला जात आहे. महापालिका याची दखल घेऊन कारवाई का करीत नाही?

-चंद्रकांत महाले

--

चला करूया शहर स्वच्छ...

स्वच्छ व सुंदर शहराचा नाशिकचा लौकिक कायम राखण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ‘मटा’तर्फे नाशिककरांना केले जात आहे. वाचकांनी ‘मटा सिट‌िझन रिपोर्टर’ या अॅपच्या माध्यमातून शहरातील अस्वच्छतेचे फोटो, त्याचे नेमके ठिकाण व इतर माहितीसह आमच्याकडे पाठवायचे आहेत. हे फोटो, तसेच संबंध‌ित मजकूर ‘मटा’मध्ये प्रसिद्ध केला जाईल. समस्या सोडविण्यासाठीचा पाठपुरावाही महापालिका व संबंध‌ित यंत्रणेकडे केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीनामे घ्या, पण बँक वाचवा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी बँक वाचविण्यासाठी थेट राजीनाम्याची ऑफर पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांपुढे ठेवली आहे. आमचे राजीनामे घ्या, पण काहीही करून जिल्हा बँक वाचवा असे आर्जव त्यांनी पालकमंत्र्यांना केले आहे. पालकमंत्र्यांनीही रात्री उशिरा संचालक मंडळाची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, संचालक पुन्हा भेटीविनाच परतले आहेत.
जिल्हा बँकेला आर्थिक स्वरुपात मदत मिळावी, यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह संचालक हे दोन आठवड्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत तीनदा संचालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीविना माघारी परतले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची बँक वाचविण्यासाठी संचालक मंडळ आता मेटाकुटीला आले असून, त्यांनी आता संचालकपदाचे राजीनामेही देण्याची तयारी पालकमंत्र्यांकडे दर्शवली आहे. आमचे राजीनामे घ्या, पण बँक वाचवा, अशी विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना
केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अध्यक्ष दराडे यांच्यासह माजी आमदार माणिकराव कोकाटे, गणपतराव पाटील, परवेझ कोकणी मुंबईत तळ
ठोकून होते.

मुख्यमंत्री भेटलेच नाहीत

जिल्हा बँक संचालकांना भेट देण्याचे आश्वासन देऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारीही भेटले नाहीत. चौथ्यांदा जिल्हा बँकेचे संचालक रिकाम्या हातीच परतले आहेत. यामुळे शेतकऱ्यांप्रती मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलता दिसून येत आहे. आज, बुधवारी सुटी असल्याने आता गुरुवारी मुख्यमंत्री भेटीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडच्या रस्त्यांवर मनोरंजनाची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ उपक्रम रविवार, १४ मे रोजी नाशिकरोड येथे रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या अनोख्या उपक्रमात डान्स, म्युझिक, खेळ या सगळ्यांची धमाल करता येणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळेपर्यंत तुम्हाला आनंदाचा सर्वोच्च क्षण अनुभवता येणार आहे.

‘हॅप्पी स्ट्रीट्स’ वर सकाळी साडेसहा ते साडेनऊ हे या वेळेत सर्व वयोगटांतील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून तुम्हाला रिलॅक्स करणारी ही ट्रीट ठरणार आहे. नवीन डान्स अॅकेडमीतर्फे झुम्बा सादर केला जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता बिटको पॉइंट येथील स्टेजवर डान्सचे सादरीकरण होईल. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत जेलरोडवर उपस्थित राहायचे आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िट‌िजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. यावेळेत बिटको सर्कल ते कोठारी कन्या शाळेदरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

नाशिकरोड येथे होणाऱ्या हॅपी स्ट्रीटमध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉप‌िंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. या वेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बॅन्ड शो आहे. यावेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत. सध्या कॅलिग्राफीकडेही आकर्षण वाढते आहे. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहे. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्य़ा साधनांचा वापर करायचा, याची माह‌िती देणार आहे. मोहन उपासनी व रवींद्र जोशी हे बासरीवादन करणार आहेत. अनिकेत जाधव रॉक बँड शो सादर करणार आहे. हर्षल जाधव हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहेत. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटार वादन करणार असून यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहे. निलेश हे टॅटू आर्टीस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहे. निधी अग्रवाल व त्यांच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी स्ट्रीट पेन्टींग करणार आहे. नविन तोलानी यांचा ग्रुप ग्रुप डान्स सादर करणार असून यावेळी वेस्टन व बॉल‌िवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रब‌िंदू ठरणार आहे. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिकरोडच्या वाचकांनी नेहमीच भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावेळीदेखील असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ‘मटा’तर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या ऑगस्ट महिन्यात गोदावरीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसराची वाताहत झाली होती. त्यावेळी गोदाकाठ भागातील २० ते २२ गावे आणि सिन्नरला जोडणारा हा गोदावरी नदीवरील सायखेडा येथील पूल खचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तेव्हापासून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र असे असूनही या पुलावरून सध्या मालट्रकसारखे अनेक अवजड वाहने रोज ये-जा करीत आहेत. यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या पुलावरील अवजड वाहतुकीकडे पोलिसही दुर्लक्ष करीत आहेत.

सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम १९६५ साली पूर्ण झाले. तेव्हापासून ५२ वर्ष हा पूल सुरू आहे. अनेक महापूर अंगाखांद्यावर घेणारा हा पूल खचल्याचे वास्तव मागील वर्षी महापुरात समोर आले. महाड दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाने या पुलाची पाहणी केली. त्यानुसार हा पूल धोकादायक असून या पुलाची ९ पैकी ३ गाळे तरंगत्या अवस्थेत आहेत.

तेव्हापासून या पुलावरून जड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. परंतु सायखेडा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने साडेतीन कोटी मंजूर केले आहेत. मागील वर्षी गोदावरीला महापूर आल्यानंतर या पुलाची स्थिती कमकुवत झाली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पुलाचा पाया वाळूखाली ८ मीटर खोल पूर्ण उघडा पडला असून यातील तीन खांब चक्क पाण्यात तरंगत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

या पुलाच्या जागी नवीन पूल व्हावा असा प्रस्ताव सरकार दरबारी पाठव‌िण्यात आला होता. सायखेड्याच्या ग्रामस्थानी या प्रश्नावर अनेक निवेदने दिली. प्रत्यक्ष भेट घेतली या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याकामी जागेच्या प्रचंड अडचणी येत असल्याची बाब सरकार दरबारी निदर्शनास आली आहे त्यामुळे हा जुना पूल अत्यन्त चांगल्या बांधणीने दुरुस्त करून त्यास नवीन रूप देणे हाच पर्याय उभा राहताना दिसत असून या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले असून, पावसाळ्यापूर्वी या कामाला प्रारंभ झाल्यास या पुलाचा धोका टळू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी रंगणार आज माघारनाट्य

$
0
0

आज शेवटचा दिवस; ३० पेक्षा अधिक अर्ज अवैध

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अर्जांच्या छाननी प्रकियेनंतर येथील महापालिकेच्या ८४ जागांसाठी एकूण ५३३ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी उशिरापर्यंत सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे छाननी प्रक्रिया पार पडली. छाननी प्रकियेनंतर ३० पेक्षा अधिक अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणूक रिंगणात एकूण ५३३ उमेदवार राहिले असून बुधवारी (दि.११) होणाऱ्या माघारीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सोमवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्जांवर हरकत घेण्याची मुदत होती. या हरकतींवर सायंकाळी उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. बहुतांश इच्छुकांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरव‌िण्यात आले. तसेच अनेक उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे उमेदवारांनी लेखी दिलेल्या प्रभागातील अर्ज कायम ठेवून अन्य अर्ज बाद करण्यात आले. दुबार अर्जांची संख्या जास्त असल्याने अर्ज छाननी प्रक्रियेला खूप वेळ लागला. तसेच काही हरकतींवर मंगळवारी सुनावणी होवून निर्णय देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images