Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गैरहजर पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील पंचायत समितीच्या सभांना तीन महिन्यांपासून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा निकाल नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयाने दिला आहे. दि. २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना हे सदस्य गैरहजर राहिल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत नुकताच निकाल देण्यात आला असून, या सदस्यांमध्ये विद्यमान सभापतींचा समावेश असल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

धडगाव येथील पंचायत समितीचे सदस्य तथा विद्यमान सभापती काळूसिंग सुन्या पाडवी, सदस्या मिसरीबाई गोविंद पाडवी, कविता तानाजी पावरा, देवजी पारशी वळवी, गौतम दशरथ वसावे हे पाच सदस्य २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना वारंवार गैरहजर राहिले होते. याबाबत सदस्य रवींद्र पराडके यांनी सदस्यांविरुद्ध अपात्र करण्यात यावे, या मागणीची तक्रार नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. नुकतीच याबाबत सुनावणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात घेण्यात आली. सभांना गैरहजर राहिल्यामुळे या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. हा निकाल नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या न्यायालयाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हायवेचे मनपाकडे हस्तांतरण करू नये

$
0
0

शिवसेनेच्या सतीश महालेंचे धुळे महापौरांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे मनपाकडे हस्तांतरण करू नये, असा महापालिकेने महासभेत ठराव पारित करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नुकतेच महापौर कल्पना महाले यांना दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बहुतांश दारू विक्रीची दुकाने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. मात्र, आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्ग हा शहरातील जाणारे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मोठ्या प्रमाणात सपाटा लागलेला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. परंतु, धुळे महानगरामध्ये कुठल्याही परिस्थितीत नवीन दारू दुकाने उघडण्यात येऊ नये. याची दक्षता म्हणून धुळे महानगरातून जाणारे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मुंबई-आग्रा व सुरत-नागपूर महामार्ग हे धुळे महापालिकेकडे वर्ग करण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात तातडीने महासभेत ठराव करून सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी यात केली आहे. जेणेकरून धुळे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच कायम राहतील. त्यामुळे महापालिकेला या दोन्हीही महामार्गांवर वर्षाकाठी येणारा ५ ते ६ कोटी रुपयांचा नूतनीकरणाचा खर्च पेलावा लागणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी गंगाधर माळी, सुनील बैसाणे, दिनेश पाटील, डॉ. माधुरी बाफना, संजय गुजराथी, प्रशांत श्रीखंडे, अॅड. राजू गुजराथी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नवीन रेल्वे द्यावा

$
0
0

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील रेल्वेविषयक प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भुसावळ-सुरत-मुंबई या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. शिवाय मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याबद्दल रावल यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

रावल हे दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी नुकतीच याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली आहे. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी रावल यांनी जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यात भुसावळ-नंदुरबार-सुरत-मुंबई या मार्गावर ‘साने गुरुजी एक्स्प्रेस’ ही नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. तसेच अमृतसर-सीएसटी एक्स्प्रेसला धुळ्यासाठी टू-टायर वातानुकूलित डबा जोडण्यात यावा. डेक्कन ओडिसी या विशेष गाडीत काय सुधारणा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या वाढीसाठी महाराजा एक्स्प्रेसच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी गाडी सुरू करता येईल काय? याबाबत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना अडचण येता कामा नये

$
0
0

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, मोहीम अधिकारी आर. एम. नेतनराव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक आर. डी. पाटील व तालुका स्तरावरील सर्व निरीक्षक उपस्थित होते. या वेळी पेरणी क्षेत्र नियोजन, बी-बियाणे पुरवठा नियोजन, रासायनिक खते पुरवठा नियोजन व खत विक्रीचे नियोजन याबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सांगळे यांनी, जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७५ हजार ६०० हेक्टर असून, येत्या खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४ लाख ५८ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी कापूस, ज्वारी, बाजरी, भात, मका, मूग, सोयाबीन, उडीद, तूर व भुईमूग या प्रमुख पिकांसाठी एकूण ४७ हजार २४३ क्विंटल विविध पिकांचे व ९.८५ लाख कापूस बियाणे पाकिटे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाबीज संस्थेकडून १८ हजार ४२ क्विंटल विविध पिकांचे व खासगी कंपनीमार्फत २८८१६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कापूस बियाण्याच्या एकूण ९.८५ लाख पाकिटांची आवश्यकता असून, यामध्ये महाबीजकडून दहा हजार तर खासगी कंपनीकडून ९.७५ लाख पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन आहे, याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबीर आजपासून

$
0
0

धुळे : राज्य सरकारतर्फे नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर आज, रविवारी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिरात दोन हजार तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत. शनिवारी शिबिरस्थळी सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील कुसूंबा गावालगत असलेल्या भवानी माता मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत गावातील आठ तरुण शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी सागर उर्फ धर्मराज सूर्यकांत शिंदे (वय २०, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) आणि कमलेश पंडित चौधरी (वय १९, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) हे दोन्ही विहिरीत बुडून मृत झाले आहेत. मात्र, विजेचा शॉक लागल्याचा प्राथमिक अंदाज सोबत पोहत असलेल्या मित्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारला लवकरच वैद्यकीय कॉलेज

$
0
0

महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पहिल्या दिवशी विक्रमी गर्दीचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात लवकरच शासकीय वैद्यकीय कॉलेज कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे महाआरोग्य शिबिर ऐतिहासिक असून, नंदुरबार जिल्ह्यातील या शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्याकडून वीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येत असून, केंद्राच्या माध्यमातून पन्नास खाटांचे रुग्णालयदेखील सुरू होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांना आता मुंबई, पुण्यात उपचार घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

खान्देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, तसेच आदिवासी भागातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी दि. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत तीनदिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मोदी मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघूवंशी, माजी वैद्यकीय मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, राज्यात आतापर्यंत झालेल्या महाआरोग्य शिबीरांपैकी नंदुरबार शहरातील आरोग्य शिबिर हे ऐतिहासिक झाले आहे. शिबिरात ज्या रुग्णांनी तपासणी केली आहे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक, मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांची आवश्यकता असल्यास सरकारकडून मोफत उपचार देऊन बरे केले जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नागरिकांनी महाशिबीरात तपासणीसाठी हजेरी लावली आहे. या जिल्ह्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘संख्यात्मक आणि गुणात्मक आघाड्यांवर सर्वोत्तम’

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर हे संख्यात्मक आणि गुणात्मक या आघाड्यावर सर्वोत्तम ठरल्याचा दावा वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना केला. त्यांनी सांगितले की, महाआरोग्य शिबिरात सकाळपासूनच गर्दी झालेली दिसून आली. आतापर्यंत राज्यात वीस जिल्ह्यांमध्ये असे शिबिरे घेण्यात आली मात्र सर्वात जास्त्‍ा प्रतिसाद हा सातपुडा भागातील लोकांनी दिला आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी अकरा वाजेपर्यंत शिबिरात एक लाखांहून अधिक नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली. तर दोन लाख रुग्णांपेक्षा जास्त तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गर्दीचा अंदाज लावणे कठीण होत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याशेजारी असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशातूनदेखील हजारो नागरिक शिबिरात तपासणीसाठी आले होते.

रुग्ण तपासणीचे नऊ डोम

याप्रसंगी २० प्रमुख आजारांबरोबरच ‘आयुष’मधील उपचार येथे असल्याने रुग्णांना आपल्या गरजेनुसार उपचार घेण्यासाठी त्या-त्या डोममध्ये गर्दी करत होते. आयुषसाठी असलेल्या डोममध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना उपचार करत होते. यासाठी कर्मवीर व्यं. ता. रणधीर आयुर्वेद कॉलेज, शिरपूर, श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक कॉलेज आणि आर. डी. चोरडिया हॉस्पिटल, चांदवड (नाशिक) येथील डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येक डोममध्ये प्रामुख्याने ग्रंथीविकार, मेंदुविकार, मनोविकारर, बीएमडी (हाडाचाठिसूळपणा) श्वसनविकार, हृद्यविकार, कर्करोग त्वचाविकार, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, मॅमोग्राफी, कान-नाक-घसा यासह शस्त्रक्रियासाठीच्या विविध आजारांसाठीच्या तपासणी करण्यात येत होत्या. यासाठी मुंबई मधील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, केईएम, जे. जे. हॉस्पिटल, हिंदुजा, लीलावती, पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथील नामांकित डॉक्टर, विविध जिल्हा रुग्णालयांची वैद्यकिय तज्ज्ञांचे पथक हजर राहून उपचार करत होते. कोट्यवधी रुपयांची औषधे कंपन्या व रुग्णालयांनी

उपलब्ध केल्याचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले. शस्त्रक्रिया नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे व त्याद्वारे कोणत्याही गंभीर व मोठ्या आजारांची निश्चिती झालेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्याचा संगणकीय डाटा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दंतरुग्णांसाठी मोबाइल व्हॅन

येथील दंतरोग कॉलेज, धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे, एसएमबीटी डेन्टल हॉस्पिटल संगमनेर (अहमदनगर) यांचे पथक दंत रुग्णांसाठी सज्ज होते. त्यासाठी विश्वास पाटील ओरल हेल्थ मोबाइल युनिट हजर होते. येथील ३ मोबाइल व्हॅनमधील दंत चिकित्सायंत्रणेद्वारे जवळपास २८ डेन्टीस्टचे पथक तात्काळ तपासणी व उपचार करत होते. याचबरोबर नेत्ररुग्ण तपासणीची व रुग्णांना मोफत चष्मा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोनशे किलो भांग जप्त

$
0
0

धुळे : इंदूरकडून धुळ्याकडे खासगी कारमधून भांगची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वाहनाची तपासणी केली असता सोमवारी (दि. १) सायंकाळी एका इंडिगो (क्र. एमएच ३९ जे १४७८) कारमधून कोरड्या भांगची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गाडीतून दोनशे किलो कोरडी भांग जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांकडून गाडीसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ रवींद्र राणा (रा. माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे प्रेमराज पाटील यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर लिपिक बेडसेंचे निलंबन

$
0
0

शिक्षण उपसंचालकांकडून कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी गेल्या काही वर्षापासून खासगी व्यक्तीची कार्यालयातील कामांसाठी नियुक्ती केली होती. तर गेल्या काही वर्षांपासून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव मंजूर केले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक कागदपत्रांची अफरातफर करून आर्थिक फायदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘मटा’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच बेडसे यांच्याविरोधात आमदार अनिल गोटेंसह शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी लिपिक रवींद्र बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात लाच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कार्यालयातील लिपिक रवींद्र बेडसे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलेली तक्रार तसेच अनुसूचित जाती जमाती संघटना, नारायण पाटील, परशुराम पाकळे, संग्राम पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत लिपीक बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमण्यात आले आहे.

बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जयहिंद शाळेतील शिक्षिका पुष्पा पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणदेखील सुरू केले होते. याप्रकरणी बेडसे यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत

$
0
0

धुळे : सरकार निर्णयानुसार ४२ खेळांव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा प्रशासनाला खेळाडूंनी दिले आहे.

निवेदनात, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले आहे. सरावासाठी अभ्यासाचा वेळ खर्च केला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर इतर मुले आमची अवहेलना करतील, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

यावेळी निवेदन देतांना जिल्ह्यातील खेळाडू ममता फटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदीश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर नगर परिषदेला ३ कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असून, सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलला नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याबाबत पहिल्या

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदांमधून शिरपूर वरवाडे नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मुंबईला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याबद्दल शिरपूर शहरातील समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि. १०) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळ्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह पांझरा नदी काठावरील दुतर्फा रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. याशिवाय इतरही कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

साक्री रोडलगत सिंचन भवनामागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच ७५ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या पांझरा काठावरील दोन्ही बाजूच्या रस्ते कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी लुटली ‘सही रे सही’ची मजा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ७) ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाची मजा लुटली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी नाटकाचे आयोजन केले. कालिदास कलामंदिर येथे दुपारी नाटक पार पडले.

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढत्या ताणाबाबत सर्वच स्थरातून चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे कामाच्या राहडगाड्यात पिचलेल्या पोलिसांचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हा प्रयोग राबवला जात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. नाटकाच्या सुरुवातील डॉ. सिंगल यांनी एकदंत फिल्मचे अमित कुलकर्णी तसेच अभिनेता भरत जाधव यांचा सिंगल यांनी सत्कार केला. गतवर्षी १८ ऑक्टोबर रोजीदेखील शहर पोलिस दलातील २०० पोलिसांना आरोग्य तपासणीनंतर थेट मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा दाखविण्यासाठी नेण्यात आले होते. यानंतर, पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, या विचारात असताना काही दिवसातच साता समुद्रापार पोहचलेला ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाची मेजवाणी पोलिसांनी लुटली. यानंतर दंगल पिक्चरसह शिर्डी सहलीचा अनुभव पोलिसांनी कुटुंबीयांनी घेतला. कामाचा ताण हलका व्हावा, यादृष्टीने शक्य तितके उपक्रम हाती घेण्यात येतील. मात्र, अशा विरंगुळ्यानंतर पोलिसांच्या एकूण कार्यपध्दतीत सुधारणा होऊन सर्वांनी मन लावून काम करणे अपेक्षित असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक वादातून तिघांना जबर मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव दिंडोरी येथील नितीन स्टोन मेटल या खडीक्रशर प्रकल्पात व्यावसायिक वादातून तिघांना जबर मारहाण झाली. या प्रकरणी ओझर येथील एका महिलेसह पाच जणांवर दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पाथर्डी फाटा परिसरात राहणारे भावेशकुमार कालरिया यांचा बांधकाम साहित्य पुरवठा आणि रस्ते ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तळेगाव शिवारातील गट क्रमांक ३५०-९-१० मध्ये नितीन स्टोन मेटल क्रशरचा नवीन प्रकल्प बसविण्याचा ठेका कालरिया यांनी डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. हे काम एक कोटी ४३ लाख रुपयात ठरले. मात्र, संशयित आरोपींनी काम सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून पैसे दिले नाही. २ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भावेश कालरिया आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार संदीप खंदारे तसेच सागर श्रवण हे तिघे तळेगाव येथील खडी क्रशरवर काम पाहणीसाठी आले. तेथे संशयितासमवेत उर्वरित पैशांबाबत चर्चा सुरू असताना नीता महाजन, पवन भिमराव अवचार, रवी कांबळे (सर्व रा. ओझर) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर संशयितांनी कालरिया यांच्याकडून खडी क्रशरसाठी दिलेले ३५ लाख रुपये, खडी क्रशरचे सामान आणि दोन ट्रक त्यांना देत असल्याचे लेखी लिहून घेत त्यावर बळजबरीने कालरियासहीत दोघांची स्वाक्षरी घेतली. या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, घटनेचा अधिक तपास हेडकॉन्सटेबल अरुण आव्हाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठे गल्लीत दागिन्यांची लूट

$
0
0

नाशिक ः वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पती-पत्नीला रस्त्यात अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडील तब्बल तीन लाख १० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. काठेगल्लीत रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी प्रदीपसिंह विठ्ठलसिंह राजपूत (४७, रा. फ्लॅट क्रमांक ४, सागर सुमन अपार्ट. दत्त मंदिराजवळ, काठेगल्ली) यांनी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ५ मे रोजी रात्री मेव्हुणीच्या मुलीच्या वाढदिवस असल्याने राजपूत दाम्पत्य घरातून बाहेर पडले. रात्री आठ वाजेच्या सुमारास शंकरनगरकडे कार्यक्रमासाठी जात असतांना काठेगल्लीतीलच लुनावत यांच्या घरासमोर दोघे चोरटे पल्सरवर आले. चोरट्यांनी राजपूत यांच्या पत्नीच्या ताब्यातील पर्सवर डल्ला मारला. या दाम्पत्याला काही समजायच्या आत चोरटे राजपूत यांची पर्स घेऊन पसार झाले. पर्समध्ये सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे एक ब्रेसलेट, एक लॉकेट, दोन हजार रुयांच्या तीस नोटा, राजपूत दाम्पत्याचे पॅनकार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असा तीन लाख १० हजारांचा मुद्देमाल होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणी डल्ला मारल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्री कोम्बिंग; दिवसा नाकाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी शनिवारी रात्री कोम्बिंग तर रविवारी सकाळी नाकाबंदी मोहीम राबवली. यात, गुन्हेगार तपासणीसह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

घरफोडीसह मालमत्तेच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत दोन पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ३२ अधिकारी आणि १४४ कर्मचारी सहभागी झाले. शहराच्या विविध भागात एकाच वेळी पोलिसांनी गुन्हेगार चेक केले. तब्बल ४७ सराईत गुन्हेगारांची या तपासणी मोहिमेदरम्यान चौकशी झाली. याबरोबर, १४४ रिक्षांची तपासणी करून दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ४८ हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी झाली. सहा तडीपारांचा शोध घेत पोलिसांनी ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. दरम्यान, शनिवारी (दि. ६) रात्री ११ वाजेपर्यंत ही मोहिम सुरू होती. रविवारी (दि. ७) सकाळी पोलिसांनी शहरच्या विविध भागात नाकाबंदी राबवली. प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी नाकाबंदी होती. विशेषतः चेन स्नॅचिंग होणारी ठिकाणांना प्रामुख्याने लक्ष करण्यात आले. या दरम्यान, प्रत्येक पॉइंटवर वाहनांची तपासणी करीत पोलिसांनी ३० हजार रुपयांपेक्षा दंड वसूल करीत एक दुचाकीदेखील जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये जोरदार पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहर व परिसरात रविवारी दुपारी वादळवारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

अचानक आलेल्या पावसाने रविवारच्या आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची त्रेधा उडाली. मनमाडनजीक बुधलवाडी, माधवनगर परिसरात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. तासभर पावसाच्या सरी कोसळल्याने कडाक्याच्या उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नांदगाव व चांदवडमध्ये रविवारी ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरमध्ये दारणाचे पाणी दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदूरमध्यमेश्वर धरणात दारणा नदीतून नगर जिल्ह्यासाठी आवर्तनाचे पाणी रविवारी दुपारी दाखल झाले. दारणाच्या या आवर्तनामुळे नगर जिल्ह्याला पिण्यासाठी पाणी मिळणार आहेच, त्यासोबतच निफाड व सिन्नर तालुक्यातील काही गावांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे.

लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, सिन्नर तालुक्यातील बारा गाव पिंप्रीसह १३ गाव पाणीपुरवठा, सिन्नर औद्योगिक वसाहत, अशा पाणी योजनांतील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा किमान पुढील एक महिन्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्या सोबतच अजूनही काही पक्षी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसापांसून धरण कोरडेठाक झाल्याने या पक्ष्यांच्या अधिवासावरही परिणाम झाला होता. त्या पक्ष्यांचाही पाणीप्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे. दारणा धरणातील या पाण्याच्या आवर्तनावर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूरसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरण सोमवारपर्यंत पूर्ण भरेल. त्यानंतर कालव्यातून नगर जिल्ह्यातील शहरांसाठी पाणी सोडण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेड गटाच्या बैठकीत विकासकामांवर चर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषदेच्या पालखेड गटाची आढावा बैठक नुकतीच झाली. बैठकीत पालखेड गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या मंदाकिनी बनकर यांनी मंजूर विकासकामांची माहिती दिली. या वेळी अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, तसेच प्रभाग सचिव महेश नागपूरकर, माजी आमदार दिलीप बनकर या वेळी उपस्थित होते.

योजनानिहाय करावयाच्या विविध कामांचा जिल्ह्याचा आराखडा मंजूर झाला असून, त्याअंतर्गत जिल्हा परिषद व सरकारच्या इतर विभागांतर्गत विविध विकासकामांची माहिती जिल्हा परिषदेच्या पालखेड गटातील ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंचांना माहीत होणे गरजेचे आहे. कोणत्या योजनेतून कोणकोणती विकासकामे करता येतील, आपल्या गावातून प्राधान्याने कोणती कामे चालू वर्षात घेणे गरजेचे आहे, त्या कामांचे प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन बैठकीपूर्वी जिल्हा परिषदेस सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. माजी आमदार बनकर यांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे, शरद काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी आयुक्तदरबारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड डाव्या कालव्यामार्फत सध्या सोडण्यात आलेल्या आवर्तनातून जिल्हा प्रशासनाने येवला तालुक्यातील अनेक गावे आरक्षणातून वगळल्याने संताप व्यक्त होत आहे. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील अंदरसूलसह परिसरातील गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. पालखेडच्या आवर्तनातून अंदरसूलसह कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरून दिले जावेत, या मागणीसाठी शनिवारी ग्रामस्थांनी अंदरसूल येथे चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल आयुक्त महेश झगडे यांची भेट घेतली. प्रासंगिक आरक्षण करतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येवला तालुक्यातील अनेक गावे वगळून तालुक्यावर अन्याय केल्याची भावना शिष्टमंडळाने झगडे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त झगडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

यंदाच्या हंगामासाठी पालखेडच्या पिण्याच्या पाणी आवर्तनाचे आरक्षण करताना जिल्हाधिकारी कार्यालयाने येवला तालुक्यातील अनेक प्रासंगिक गावे वगळली आहेत. यामुळे तालुक्यावर अन्याय झाला असल्याचे शिष्टमंडळाने शनिवारी महसूल आयुक्त झगडे यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रासंगिक आरक्षण करतेवेळी १६ गावे वगळल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र झाला आहे. गेल्या ३६ वर्षांपासून तालुक्याच्या अंदरसूलसह पूर्व पट्ट्यातील कोळगंगा नदीवरील गावांचे बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून दिले जात होते. त्यातून उन्हाळ्यात या भागातील मुक्या जनावरांचाही पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला जात होता. २०१५ मधील अल्प पावसामुळे करंजवण, पालखेड, ओझरखेड धरणसमूहात पाणीसाठा कमी असल्याने गेल्या वर्षी पालखेडचे पाणी मिळाले नाही. गेल्या वर्षी २०१६ मध्ये धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे यंदा या धरणसमूहात समधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पालखेडचे पाणी देणे शक्य होते. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने पालखेडच्या पाणी आवर्तनातील प्रासंगिक गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षण करताना येवला तालुक्यातील अनेक गावे वगळली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसह पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील गावांनी सादर केलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने विचारात घेतले नाहीत. सादर झालेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रासंगिक आरक्षणाच्या यादीतून गावे वगळली. परिणामी, सध्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. टंचाई परिस्थिती लक्षात घेता पालखेडच्या चालू आवर्तनातून अंदरसूलसह कोळगंगा नदीवरील बंधारे भरून द्यावेत. पालखेडचे सध्या सुरू असलेले आवर्तन पुढील केवळ चार दिवस चालणार असल्याने हे पाणी तत्काळ सोडण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

येवला पंचायत समितीचे माजी सभापती तथा स्थानिक शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे, अरुण काळे, आकाश सोनवणे, किरण दाभाडे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images