Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्फूर्तिगीतांनी नाशिकरोड चैतन्यमय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असे वर्णन असलेल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन व कामगार दिन शहरातील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, महाराष्ट्रगीताने परिसर दुमदुमला होता. ध्वजवंदनासह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांनाही अभिवादन करण्यात आले.

--

विभागीय आयुक्तालय

येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या आवारात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, उन्मेष महाजन, सुखदेव बनकर, नृसिंह मित्रगोत्री, प्रकाश वाघमोडे, तहसीलदार एस. डी. मोहिते, मंजूषा घाडगे यांच्यासह शिक्षण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, भूजल सर्वेक्षण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

--

महापालिका विभागीय कार्यालय

महापालिकेच्या विभागीय कार्यालयात नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरसेविका ज्योती खोले, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, श्याम खोले आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

--

समाजकल्याण कार्यालय

नाशिकरोड ः समाजकल्याण विभागाच्या नंदिनी पुलाजवळील मुख्य कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त काशीनाथ गवळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेंद्र कलाल, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर, नंदलाल पाटील, एस. बी. त्रिभुवन, आर. डी. देवरे, अनिल पाटील, गणेश पवार, नंदा रायते, सविता गवारे, सरिता रेड्डी आदी उपस्थित होते.

--

नाशिकरोड पोलिस ठाणे

येथे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सहाय्यक निरीक्षक सुदाम भुजबळ, मंगेश मजगर, उपनिरीक्षक राकेश शेवाळे, भीमराज गायकवाड आदींसह अन्य कर्मचारी, तसेच निवृत्त पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

--

आदर्श विद्यामंदिर

येथील समता समाज विकास संस्था संचालित आदर्श विद्यामंदिर या शाळेत संस्थेच्या ऑनररी सेक्रेटरी प्राचार्या मनीषा विसपुते यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थापक रमेशचंद्र औटे, शालेय सन्वयक रविकिरण औटे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

---

बिटको कॉलेज

नाशिकरोड ः येथे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, प्रा. सुरेंद्र घाटपांडे, प्रा. डॉ. सुनील जोशी, डॉ. दिलीप लोंढे, प्रा. विजय सुकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिकरोड केंद्रातील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर व सीनिअर कॉलेजांतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांना उन्मेष या वार्षिक विशेषाकांचे वितरण करण्यात आले.

--

दराडे यांचा सत्कार

नाशिकरोड ः महापालिकेचे नाशिकरोडचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल महाराष्ट्र दिनी गौरविण्यात आले. महापालिकेतील कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. आरोग्य विभागातील सर्वांच्या सहकार्याने नाशिकरोडला स्वच्छतेचे काम सुरू राहील, असे दराडे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत्यूनंतरही बळीराजाची सरकार दफ्तरी परवड

$
0
0

आत्महत्या महिलेची, दाखवली पुरुषाची

नाशिक : शेतकरी आत्महत्यांबाबत सरकारी यंत्रणा किती संवेदनशील आहे, याचा ‘आदर्श` वस्तुपाठच महसूल विभागाने राज्यासमोर उभा केला आहे. शेतकरी कुटुंबातील एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असताना चक्क पुरुषाने आत्महत्या केल्याचा अजब अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांच्या या कुचेष्ठेची जिल्हा प्रशासन काय दखल घेते याकडे आता लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात चालू वर्षात ३० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. करंजगाव (ता. निफाड) येथे २७ एप्रिल २०१७ रोजी अनिता अंबादास चव्हाण (वय ४३) या महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. चालू वर्षातील पहिलीच महिला शेतकरी आत्महत्या म्हणून तिची नोंद होणे अपेक्षित होते. परंतु, अनिता यांच्या नावाऐवजी चक्क अनिल अंबादास चव्हाण या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा अहवाल तलाठ्याकडून पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शेतकरी आत्महत्येची घटना घडली की तलाठी त्याबाबतची माहिती घेऊन प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयाला पाठवितो. हाच अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. या अहवालामध्ये अनिता ऐवजी अनिल असा नामोल्लेख केल्याने त्याच नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई शाखेतही करण्यात आली आहे. महिलेऐवजी पुरुषाच्या नावाची नोंद होत असेल, तर महसूलमधील यंत्रणा अशा प्रकरणांबाबत किती संवेदनशील आहे याचाच प्रत्यय येतो. या महिलेच्या एकत्रित कुटुंबाकडे सव्वा एकर जमीन आहे. महिलेच्या पतीचा दीड वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला असून, तिच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मटाने चूक आणून दिली निदर्शनास

जिल्हा प्रशासनाच्या नोंदीमध्ये झालेली ही चूक महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीच्या लक्षात आली. टंचाई शाखेतून अनिल अंबादास चव्हाण असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती मिळविण्यासाठी तहसीलदार विनोद भामरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला. परंतु, भामरे यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. करंजगाव येथील सरपंचांकडून माहिती घेतली असता महिलेचे नाव पुढे आले. ही बाब निफाड तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्याबाबत खातरजमा केली. त्यानंतर तशी दुरुस्ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.

चार दिवस अनभिज्ञच!

अनिता चव्हाण यांची आत्महत्या २७ एप्रिलला झाली. घटना उघडकीस आल्यानंतर सहा ते १२ तासांत त्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेला प्राप्त होणे गरजेचे आहे. परंतु, चव्हाण यांच्या आत्महत्येची माहिती तब्बल चार दिवसांनतर जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली. या चार दिवसांतही आत्महत्या पुरुषाची की महिलेची हे प्रशासनाच्या लक्षात येऊ नये, यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय असू शकते?

शेतकरी आत्महत्या (मे पर्यंतच्या)

२०१७ - ३०, २०१६- ४१, २०१५- १९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णांसाठी साहित्याचे वर्षश्राद्धानिमित्त वाटप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिडको

वर्षाश्रद्धाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्यापेक्षा त्या पैशातून रुग्णांना उपयोगी ठरू शकणाऱ्या सिडकोतील जनकल्याण येथे रुग्णांसाठी विविध वस्तूंचे वाटप केले. मालेगाव तालुक्यात पिंपळगाव (दाभाडी) येथील कै. भास्करराव वसंतराव पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला.

भास्कर पवार यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रमात धार्मिक विधीसाठी जेवणावळी करून पैसा खर्च करण्यापेक्षा रुग्णांसाठी काही मदत करता येते का? याचा विचार पवार कुटुंबीयांनी केला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण येथे रुग्णांसाठी पाच व्हीलचेअर, पाच वॉकर, पाच कमोड चेअर या वस्तू देवून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. आयुर्वेदाचार्य डॉ. दिनेश पवार, त्याचे भावंडे व कुटुंबीय यांनी मिळून प. पू. देवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबिवला. या रुग्णोपयोगी वस्तू आपल्या वडिलांचे स्मरणार्थ भेट दिल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी श्याम अहिरे, दत्ताजी राळेगावकर यांनी वस्तू केंद्राच्या वतीने स्वीकारल्या. डॉ. पवार यांचा ‘बिल्वपत्र’ पुस्तक देऊन जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह मदन भंदुरे यांनी सत्कार केला. अनिल चांदवडकर यांनी पवार कुटुंबीयांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी चंद्रशेखर विंचूरकर, अशोक काकती, किरण क्षत्रिय, अभ्यासिकेच्या सुशीला आंदोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ भारत अभियानाला बँकांचा ठेंगा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिल्याने सर्वच वर्गातून त्याचे स्वागत झाले. यात हगणदारीमुक्त शहर, गाव अशी संकल्पनाच सरकारकडून राबविण्यावर भर दिला गेला. परंतु, या महत्त्वाकांक्षी अभियानाशी बँकांना काहीही देणेघेणे नाही, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

शहरात असलेल्या अनेक सरकारी व खासगी बँकांमध्ये शौचालयांचीच व्यवस्था नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. विशेष म्हणजे सरकारी बँकांमध्ये पेन्शनधारकांना शौचालय उपलब्ध होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाचा आदेश सर्वच बँकांना लागू करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियनाची सुरूवात पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर सर्वच क्षेत्रातून स्वागत करण्यात आले होते. यामुळे मेट्रोसिटीचे वेध लागलेल्या शहरांमध्ये आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणीसाठी यंत्रणा जोमाने कामाला लागली. त्यात शहर व ग्रामीण भागातही शासकीय यंत्रणा हगणदारीमुक्त परिसर करण्यासाठी अथक प्रयत्न करतांना दिसत आहेत. असे असतांना मात्र सरकारी व खासगी बँकांना स्वच्छ भारत अभियान लागू नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात सरकारी व खासगी बँकांच्या अनेक शाखा आहेत. सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोन ग्राहकांचा बदलल्याने सरकारी बँकांमध्ये रोजच गर्दी होत असते. परंतु, ग्राहकांना सरकारी बँकांमध्ये अधिक वेळ द्यावा लागत असतांना शौचालयाची व्यवस्थाच नसल्याने मनस्ताप सहन करण्याची वेळ येत असते. विशेष म्हणजे पेन्शनधारकांना अचानक शौचलयाची गरज पडल्यावर तात्काळ उपलब्ध होत नसल्याने अशा प्रसंगी जावे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे.

ज्येष्ठांची सर्वाधिक कोंडी

बहुतांश शासकीय योजनांसाठी सरकारी बँकांमध्ये खाते उघडणे अनिर्वाय झाले आहे. यामुळे सरकारी बँक ग्राहकांची संख्या वेगाने वाढली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यातील ज्येष्ठ नागरिकांना किमान नैसर्गिक विधीसाठी शौचालयांची सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र, या गंभीर मुद्याकडे सरकारी बँकांची यंत्रणा लक्ष देत नसल्याने अनेकांना नैसर्गिक विधीसाठी वेळ काढण्यापलिकडे पर्यायच राहत नसल्याने त्यांची परवड होते. हगणदारीमुक्त शहर किंवा गाव योजना राबवितांना बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारी तसेच खासगी बँकांमध्ये ग्राहकांसाठी सुलभ शौचालयांची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करण्याची वेळे येते. शासकीय यंत्रणेने या प्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे.
- महेश कुलकर्णी, सरकारी बँकग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाकिस्तानची संपूर्ण जगाला डोकेदुखी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाकिस्तानच्या कारवाया लक्षात घेऊन भारताने सतर्क राहणे गरजेचे आहे. केवळ भारतालाच नव्हेतर अन्य देशांनीही पाकिस्तानच्या कुरापतीचा त्रास होत आहे. १९४७ पूर्वी काहीही नसलेला पाकिस्तान आता संपूर्ण जगाला डोकेदुखी ठरत आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी यांनी केले. माजी सैनिक संघातर्फे झालेल्या माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते.

भारतीय माजी सैनिक संघाचे अध्यक्ष फुलचंद पाटील, इंद्रेशकुमार, गोविंदराव बस्ते, विजय पवार, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. चतुर्वेदी म्हणाले, की भारताला पाकिस्तान आणि चीनकडून अधिक धोका आहे. चीनने उत्पादित केलेल्या ५८ टक्के वस्तूंची भारतात विक्री होते. त्यामुळे चीनची ताकद कमी करायची असले तर ही बाजारपेठ चीनला मिळू देऊ नये. पाकिस्तानकडून अवैध धंदे, हरकती कायम सुरू असून त्यांच्या या हरकती कधीच थांबणार नाहीत, असे चिन्ह आहे.

इंद्रेशकुमार म्हणाले, माजी सैनिकांना येणाऱ्या अडचणी, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक पातळीवर त्यांचा सुरू असलेला संघर्ष यावर त्यांनी भाष्य केले. संघाच्या मान्यवरांनी माजी सैनिकांना येत असलेल्या अडचणी मांडल्या. राजलक्ष्मी चौधरी व दीपाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. मेघश्याम सोनवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनाने आडगावकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावठाण व मळे परिसरामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने मध्यरात्री १२ ते पहाटे ५.३० या वेळेत भारनियमन केले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा असल्याने नागरिक अगोदरच उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. शिवाय मध्यरात्रीच्या वेळी चोऱ्या होण्याची भीती असते. त्यामुळे मध्यरात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने कामकाज सुरु आहे. महापालिका हद्दीत २४ तास वीजपुरवठा देण्याचे ध्येय असतांना आडगावमध्ये मात्र महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. पण हे भारनियमन सुरू असतांना सोमवार, मंगळवार, बुधवारी रात्री १२ ते पहाटे ५.३० या यावेळेत वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आलेला असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

वीज नसल्याने नागरिकांना घरात झोपणे कठीण झाले आहे. अनेक नागरिक रात्री झोपण्यापूर्वी घरात फरशीवर थंड पाण्याचा शिडकावा करतात. त्यानंतर आंथरूण टाकून झोपतात. काही नागरिक घराच्या गच्ची किंवा गॅलरीत झोपतात. मात्र, अशा घरांमध्ये चोरट्यांकडून दरोडे टाकले जाण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.

भारनियमनाच्या वेळा ठरलेल्या

याबाबत परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या आडगाव कार्यालयात विचारणा केली. त्यावर ‘भारनियमनाच्या वेळा आमच्या वरिष्ठांनी निश्चित केलेल्या आहेत, त्यात आम्ही कोणताही बदल करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, महावितरणने रात्रीचे भारनियमन बंद करण्याची मागणी आडगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आडगावात रात्री सुरू असलेल्या भारनियमनामुळे सर्वच रहिवाशी त्रस्त झाले आहेत. रात्री अंधाराचा गैरफायदा घेत चोऱ्या, दरोडे यासारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. भारनियमनाला विरोध नाही पण ते मध्यरात्री करू नये.
- रवींद्र धारबळे, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिलांना कमी लेखू नका’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलांना कोणीही कमी लेखू नका, महिलांमध्ये प्रचंड शक्ती असते. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करण्यास प्रेरणा द्या, प्रवृत्त करा, असे सांगत जैन साध्वी प. पू. प्रमुख गणिनी आर्यिका शिरोमणी श्री ज्ञानमती माताजी यांनी महिला सबलीकरणावर भाष्य करत महिलांना प्रोत्साहन दिले.

नाशिकमधील आपल्या दोन दिवसांच्या वास्तव्यात विविध कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पु‍ढील प्रवासासाठी प्रयाण केले. मी ५२ वर्षांपूर्वी नाशिकला आले होते, तेव्हापासून आजपर्यंत येथे बरीच प्रगती झाली आहे. अशीच प्रगती निरंतर होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करीत त्यांनी यावेळी नाशिकचे कौतुक केले.

१०८ फूट उंच भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीचे निर्माण करुन नाशिक जिल्ह्याचे नाव अधोरेखित करणाऱ्या ज्ञानमती माताजी यांच्यासोबत प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी कर्मयोगी पीठाधीश रवींद्रकीर्तीजी स्वामीजी सहित आठ साधू संत उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांचा जगातील सर्वात उंच भगवान ऋषभदेवांची प्रतिमा निर्माण केल्याबद्दल सकल जैन समाजातर्फे सम्मान करण्यात आला. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेल्या मीराधा फिल्ममधील सिनेकलाकार व्हिनस जैन तर्फे निलांजना नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १०८ फूट उंच मांगीतुगी येथील भगवान ऋषभदेवांची ३० फुट उंच प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. जैन धर्मातील २४ तीर्थंकरांच्या जन्मभूमींचा देखावा ही सादर करण्यात आला. सुप्रसिध्द गीतकार राजीव जैन यांच्याद्वारे भजन संध्या सादर करण्यात आली. उपस्थित भक्तांच्या शंकेचे साधू संताद्वारे निरसन करण्यात आले.

उसाच्या रसाचे वाटप

जैन धर्मपध्दतीनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी उसाचा रस पिण्यास विशेष महत्त्व असते. त्यानुसार, महावीर इंटरनॅशनल, जीवो नाशिक, जेएसजी ग्रेपसिटी, जेएसजी नाशिक व जेएसजी प्लॅटिनम ग्रुप यांच्यातर्फे उपस्थितांना ऊसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाचे प्रसारण पारस टीव्हीद्वारे संपूर्ण भारतात झाले. प्रवीण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा काले, मंजूषा पहाडे, सुजाता कासलीवाल, अनिल गंगवाल, ममता काला, वैशाली गंगवाल, हर्षवर्धन गांधी, प्रदीप पहाडे, वर्षा कासलीवाल आदिंनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावतानगरात लवकरच उभारणार ग्रीन जीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावतानगर येथील विद्यानिकेतन शाळेजवळील राजे संभाजी मैदानावर वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी म्युझिक सिस्टमचे उद्‍घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित नुकतेच झाले. येथे लवकरच खासदार निधीमधून ग्रीन जीम बसवून देऊ, अशी ग्वाही गोडसे यांनी नागरिकांना दिली.

नागेश्वर महादेव मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या सहकार्याने नागेश्वर महादेव मंदिराजवळ वर्तमानपत्र सेवा वाचनालयाचे उद्‍घाटन झाले. या कार्यक्रमाला गोडसे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे नगरसेवक बडगुजर, हर्षा बडगुजर, अंबड पोलिस स्टेशनचे निरीक्षक मधुकर कड, माजी प्राचार्य डॉ. किशोर पवार आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गोडसे यांनी मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. परिसरातील आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी लवकरच खासदार निधीमधून ग्रीन जीम बसवून देऊ, अशी घोषणा गोडसे यांनी यावेळी केली. दैनंदिन घडामोडींची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी नागेश्वर महादेव मंदिरात वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंपानगरीतील भूखंडावर कचरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगरला जाणाऱ्या जेलरोड-सायखेडा रोडवरील चंपानगरीतील राखीव भूखंडावर कचरा साचला असून त्यात भर पडत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेने हा कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

येथील नागरिकांचे म्हणणे असे, की सार्वजनिक संस्थेसाठी हा भूखंड राखीव होता. सार्वजनिक वाचनालय, शासकीय रुग्णालय, बालवाडी आदी कारणासाठी या भूखंडाचा वापर होणे अपेक्षित होते. कालांतराने हा भूखंड खासगी व्यक्तीच्या नावावर झाला आहे. त्यांच्या नावाचा फलक तेथे लावण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. सार्वजनिक कामासाठीचा हा भूखंडा खासगी मालकीचा कसा झाला, याबाबत नागरिकांनाही प्रश्न पडला आहे.

आता या भूखंडाला सुमारे आठ फूट उंचीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. भूखंडाकडे मालक फिरकत नसल्याने त्यामध्ये कचरा, डबर टाकण्यात येते. कचऱ्याचे ढिग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. डास, माशांचा उपद्रव वाढला आहे. उघड्यावर कचरा जाळणे हा गुन्हा असतानाही या भूखंडात कचरा जाळला जात आहे. संरक्षक भिंतीची उंची जास्त असल्यामुळे कालनी रस्त्यावरील वळणावरून आलेली वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. ही भिंत काही ठिकाणी तोडण्यात आली आहे, असेही नागरिकांनी सांगितले.

फांद्यांची छाटणी हवी

भूखंडात नीलगिरीची १५ ते २० जुनी उंच झाडे आहेत. नीलगिरी बाग म्हणून हा परिसर ओळखला जात असे. सध्या या झाडांचा पालापाचोळा पडून कचऱ्यात भरच पडत आहे. काही झाडांच्या फांद्या खाली आल्या असून त्या धोकादायक झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांची छाटणी करणे गरजेचे आहे.

चंपानगरीतील या भूखंडाकडे मालकाबरोबरच महापालिकेचेही दुर्लक्ष झाले आहे. कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तापमान वाढल्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेने योग्य कारवाई करावी.
- तुळशीदास इंगळे, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांचे फेरनियोजन

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून सध्या विभागवार केलेले सफाई कर्मचाऱ्यांचे असमतोल नियोजन असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्यातच आता वॉर्डऐवजी चार सदस्यीय प्रभाग झाल्याने कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेने आता सफाई कर्मचाऱ्यांचे नव्याने फेरनियोजन सुरू केले आहे.

नव्या नियोजनानुसार, प्रत्येक प्रभागाला सुमारे ४७ कर्मचाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा असमतोल दूर होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली आहे.

शहराची लोकसंख्या वाढली असली तरी, महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या मात्र ‘जैसे थे’च आहे. सध्या महापालिकेत १९७३ सफाई कर्मचारी असून त्यापैकी तीनशे कर्मचारी हे महापालिकेत लिपिक पदाचे काम करतात. तर सुमारे २०० कर्मचारी हे पदाधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयांमध्येच काम करतात. त्यामुळे महापालिकेकडे असलेल्या जेमतेम १४५० कर्मचाऱ्यांकडूनच सफाईचे काम केले जात आहे. त्यातच या कर्मचाऱ्यांचे समान वाटप नसल्याने प्रभागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्यातच काही सफाई कर्मचारी हे आपल्या नेमून दिलेल्या ठिकाणी स्वच्छतेचे काम करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या तक्रारींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आता शिल्लक राहिलेल्या १४५० सफाई कर्मचाऱ्यांचे फेरनियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, आरोग्य विभागाने ३१ प्रभागासाठी फेरनियोजन केले असून प्रत्येक प्रभागाला आता ४७ सफाई कर्मचारी दिले जाणार आहेत. त्यामुळे नियुक्त केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या नियुक्त प्रभागात काम करावे लागणार आहे. शहरातील अनेक भागात अस्वच्छतेचा कळस झाला आहे. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नगरसेवकांची खडाजंगी

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये घंडागाडीसह सफाई कर्मचारीही येत नसल्याचा आरोप नगरसेवक दिनकर पाटील व वर्षा भालेराव यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे दोन वेळा पाठपुरावा केला. परंतु, तरीही सफाई कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने पाटील यांच्यासह प्रभागातील नगरसेवकांची अतिरिक्त आयुक्तां सोबत खडाजंगी झाली. यापूर्वी नियुक्त केलेले कर्मचारी तरी द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आरोग्याधिकारी व अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने त्यांना २५ कर्मचारी उपलब्ध करून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहार प्रकरणातील आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेत ५० लाखांचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या माजी अध्यक्ष मधुकर मैंद आणि जनरल सेक्रेटरी संतोष महाले यांना अटक होऊन रविवार सात मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वरच्या सामाजिक जीवनात नरहरी मंदिर संस्थेस महत्त्वपूर्ण स्थान आहे. पूर्वी येथे शहरातील मंगलकार्य होत असत. या संस्थेबाबत झालेल्या गैरव्यवहारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था क्षेत्र त्र्यंबकेश्वर या संस्थेला देणगी व भाडे तत्वाच्या स्वरूपात मिळत असलेल्या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून सुमारे ५० लाख रुपयांचा संस्थेच्या माजी अध्यक्ष मधुकर मैंद व माजी जनरल सेक्रेटरी संतोष प्रभाकर महाले व इतर पदाधिकारी यांनी संगनमत करून अपहार केल्याचा आरोप आहे. कोर्टाच्या आदेशाने सुनील मधुकर माळवे यांच्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण करत आहेत. तसेच सहायक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पण तक्रार अर्ज दिलेला आहे.

तक्रार अर्जाची सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून सखोल चौकशी होऊन मधुकर मैंद आणि संतोष महाले व कार्यकारी मंडळावर ठपका ठेवत अहवाल दिला. त्या अहवालानुसार ४७ लाख ६० हजार ३३२ रुपयांचा अपहार मागील कार्यकारिणी यांनी केल्याचे तपासात प्रथमदर्शी आढळून आले. सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, मधुकर मैंद, यांनी नाशिक येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टानेही त्यांना जामीन नाकारला. पोलिसांनी मैंद यांना मंगळवारी (दि. २) तर महाले यांना बुधवारी (दि. ३) अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने त्या दोघांना सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याचे आता कालबद्ध वर्गीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून शहरातील ओला व सुका कचरा विलगीकरणाचा एक मे रोजीचा मुहूर्त टळल्यानंतर आता आरोग्य विभागाने कचरा विलगीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार आता एका आठवड्यात चार प्रभागात जनजागृतीसह टप्प्याटप्प्याने ओला व सुका कचऱ्याचे बंधन घातले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी गुरूवारपासून (दि. ४) केली जाणार आहे. ४ मे ते १३ मे दरम्यान प्रभाग क्रमांक १, ७, १८ आणि २४ मध्ये ओला व सुका कचरा विलगीकरणाची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने एक मे रोजीपासून शहरात ओला व सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक केले होते.नागरीकांसह ठेकेदारांनी कचरा विलगीकरण केले नाही तर पाचशे ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात नियोजना अभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी आरोग्य विभागाची कानउघाडणी केल्यानंतर आता आरोग्य विभागाने कचरा विलगीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी मे व जून असे दोन महिन्यांची निवड केली असून एका आठवड्याला चार प्रभागांची निवड करून त्यात जनजागृती करण्यासह कचरा विलगीकरणाची सक्ती नागरिकांसह ठेकेदारांना केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी आता ४ मे रोजीपासूनच आरोग्य विभागाने सुरू केली आहे. ४ मे १३ मे दरम्यान सहा विभागातील प्रभाग क्रमांक १, ७, १८, २४ यांची निवड करण्यात आली आहे. या चार प्रभागात पहिल्या टप्प्यात कचरा विलगीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला चार प्रभाग याप्रमाणे कचरा विलगीकरण हे सक्तीचे केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवाद प्राचीन अध्यात्माचे ध्येय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

ज्या भूमीत आपण जन्मास येतो, जी भूमी आपल्याला आश्रय देऊन आपले जीवन समृध्द करते, जेथे माता पिता अन् गुरूजनांसह भोवतालचे विश्व आपल्याला हरप्रकारे सहाय्य करून जीवन घडविण्यासाठी मदत करतात त्या भूमीचा तन, मन आणि धनाने आदर करण्याचा संदेश या मातीतील प्राचीन अध्यात्मशास्त्र देते. या प्रकारे मांडलेला राष्ट्रवादच हे प्राचीन अध्यात्माचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पुण्यातील वेद वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अजित कृष्ण तुकदेव यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प त्यांनी गुंफले. स्व. अशोकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या व्याख्यान झाले. तुकदेव यांनी ‘अध्यात्मिक राष्ट्रवाद’ या विषयावर विचार मांडले. यावेळी ते म्हणाले, की अध्यात्म आणि राष्ट्रवाद या संकल्पना समजावून घेण्याअगोदर भारतीय तत्वज्ञान समजावून घेणे अगत्याचे आहे. हे तत्वज्ञान ज्या तत्वांवर प्रामुख्याने आधारीत आहे. त्यापैकी कृतज्ञता हे मुख्य तत्वांपैकी एक आहे. माणूस जन्म घेतो त्यावेळी तो पूर्णत: अवलंबून असतो. कालांतरांने त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. त्यावेळी सगुणरूपाने त्याच्या अस्तित्वाचे वलय चोहोबाजुला पसरते. मात्र, हे केवळ त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वाचे संचित नसते तर त्याच्या जडणघडणीत आजवर अनेक पडद्याआड राहिलेली माणसे आणि शक्ती कार्यरत असतात. त्यांच्याच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या पडणाऱ्या प्रभावाने माणसाचे कार्य विशिष्ट विचार आणि विशिष्ट दिशा घेऊन चालत असते. माणसाला घडविणारी ही इतर माणसे आणि शक्ती म्हणजे राष्ट्र अशी संकल्पना भारतीय अध्यात्माला अभिप्रेत आहे. यामुळे राष्ट्र नेहमी स्वार्थबुध्दीऐवजी परिवार अन् परकल्याणाचा संदेश देते. यामुळे व्यक्तिपूजेपेक्षा किंवा केवळ देवपूजेपेक्षाही या देशात राष्ट्राची पूजा श्रेष्ठ आहे, असा विचार वेद आणि उपनिषीदांनीही आजवर मांडला. अभ्यासादाखल या वेद वाङमयातील साहित्याचे रसग्रहण केल्यास पदोपदी राष्ट्रच बलवान आणि सशक्त करण्याचा संकल्प, कामना केल्याचे या साहित्यातून प्रकर्षाने निदर्शनास येईल, असेही तुकदेव म्हणाले.

हिंदू धर्मात राष्ट्रवादाचे महत्त्व

अध्यात्माच्या संकल्पनेला मानवी देह व मनात येणारे सर्व विकल्प अन् दोष त्यागणे अपेक्षित आहे. यानंत निर्लेप झालेल्या मनाने भोवतालच्या विश्वाची म्हणजे राष्ट्राच्या कल्याणाचीच कामना असल्याचे भारतीय अध्यात्म आणि वेद वाङमयातील दाखले सांगतात. स्वामी विवेकानंदांनीही भारतीय अध्यात्मातील राष्ट्रवादाचे महत्त्व आपल्या हिंदू धर्माच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात अभिव्यक्त केले होते, असेही तुकदेव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा क्रीडा विभागाचे अॅप

$
0
0

नाशिक : सरकार खेळाडूंपर्यंत पोहचत नाही, खेळाडूंनी सुविधा मिळत नाही अशी नेहमीच ओरड होते. अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहचता यावे यासाठी नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथमच स्वतःचे अॅप तयार केले असून त्यामाध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या बहुतांश व्यवहार हे मोबाइलच्या माध्यमातून होत असतात. बँकेतून पैसे ट्रान्स्फर करणे असो अथाव रेल्वेचे तिकीट काढणे असो सर्वच व्यवहार मोबाइलच्या माध्यमातून होत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खेळाडूंपर्यंत पोहचण्यासाठी मोबाइलचा वापर करण्याचे निश्चित केले आणि अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून खेळाडूंना हवी ती माहीती मोबाइलच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांची नावनोंदणी करता येणार आहे. या अॅपमध्ये नाशिक विषयी माहिती देण्यात आली असून सरकारतर्फे खेळासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची यादीही प्रसिध्द करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी काय पात्रता हवी व पुरस्काराचा प्रस्ताव कुणाला सादर करायचा याचीही माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार व भारत संरकारतर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराप्राप्त पुरस्कारार्थींची नावेही यात अंतर्भत करण्यात आली आहे.

क्रीडा संघटनांची माहिती

नाशिक शहरातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची नावे देण्यात आली असून त्यांचे संपर्क नंबर देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे कोणत्या खेळाच्या स्पर्धा कधी, कुठे, केव्हा होणार याचा कॅटलॉगही आहे.खेळांच्या स्पर्धांचे वर्षभराचे वेळापत्रक देण्यात आले आहे. फोटो गॅलरीमध्ये शहरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांचे फोटो आहेत. खेळाडूंना आवश्यक असणारे सर्व मेल आयटी या विभागात आहेत. तसेच क्रीडा अधिकारी यांचे पत्ते, फोन नंबर, मेल आयडी देण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या मोबाइलवर स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करता येणार असून सरकारच्या क्रीडा विषयक नव्या घोषणा पहाता येणार आहे.

तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचे कौशल्य

लोक कॉम्प्युटरपेक्षा मोबाइलवर जास्त वेळ घालवतात म्हणून या साधनाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नाशिकपर्यंत येण्याची गरज भासू नये, हादेखील या अॅप मागचा उद्देश आहे. हा अॅप तालुका क्रीडा अधिकरी पल्लवी धात्रक यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी बनविले बहु‘व्यायामी’ यंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावीर पॉलिटेक्निक कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मल्ट‌िपर्पज एक्झरसायझिंग मश‌िनची निर्मिती केली आहे. एकाच मशिनवर अनेक प्रकारचे व्यायाम करण्याची सुविधा विद्यार्थ्यांनी यात निर्माण केली असून, तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात अनिवार्य असलेल्या प्रोजेक्ट्समध्ये विद्यार्थ्यांनी हे केले आहे. या मश‌िनचे पेटंट घेण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करणार असल्याची माहिती कॉलेजच्या वतीने देण्यात आली.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील सुयोग भांबर, प्रतीक गायकवाड, हर्षल वेलाणी आणि विरेंद्र तळेले या विद्यार्थ्यांनी या मशिनची निर्मिती कॉलेजच्या प्रोजेक्टअंतर्गत केली आहे.

क्रॉस ट्रेनिंग म्हणजेच दंडाचे, कंबरेचे, मांड्यांचे व पोटरीचे व्यायाम याद्वारे करता येतात. तसेच स्टॅँडिंग बायसिकल म्हणजेच सायकलसारखे पेडलिंग करुन व्यायाम करता येतो. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या मश‌िनवर रोटेटिंग सीट आणि रोटेटिंग डिस्क लावलेली असल्यामुळे कमरेचे व मणक्यांचे व्यायामही करता येणे शक्य असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. या मश‌िनवर हँड स्ट्रेचर हा व्यायामही करता येतो. या मशिनला कॅलरी मीटर लावण्यात आले असून, मश‌िनद्वारे निर्मित मेकॅनिकल एनर्जीचे रुपांतर विद्युत एनर्जीमध्ये घडवून या उर्जेपासून कॅलरी मीटर चालते. मोबाइल चार्जिंग, एलसीडी टीव्ही, विजेचा दिवा आदी उपकरणे व्यायाम करताना चालू शकतात असे यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी सुयोग भांबर याने सांगितले आहे. प्रत्येक व्यायामासाठी वेगवेगळी मश‌िन विकत न घेता केवळ पाच हजार रुपयात या मश‌िनची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. या मश‌िनचे पेटंट घेण्यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना महावीर पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे विभाग प्रमुख संभाजी सगरे आणि प्रा. राजीव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैलाचं अंतर घोटात गिळणारा उसेन बोल्ट

$
0
0

महेश पठाडे

मुलांनो, तुम्हाला जगातील सर्वांत वेगवान धावपटूची ओळख करून देणार आहे. हो, उसेन बोल्टबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. उसेन बालपणापासूनच बेफाम धावपटू होता. वेस्टइंडिजचे प्रसिद्ध बेट जमैकाचा हा खेळाडू. याच जमैकात मायकेल होल्डिंग आणि कोर्टनी वॉल्शसारखे धडकी भरवणारे वेगवान गोलंदाज अवघ्या क्रिकेटविश्वाला माहीत असतीलच. सध्या ख्रिस गेलची तुफानी फलंदाजी या दोघांची उणीव भरून काढत आहे. याच जमैकाची ओळख खेळ वगळून करायची झाली, तर प्रसिद्ध महान गायक बॉब मार्लीचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आता मात्र हा जमैका देश अवघ्या विश्वात उसेन बोल्टमुळेच ओळखला जात आहे.
उसेन जमैकातील शेरवूड कांटेट या छोट्याशा गावातला रहिवासी. जमैकाची राजधानी किंगस्टनपासून हे गाव साडेतीन तासांवर आहे. या गावात ना रस्ते आहेत, ना दिवे. पाण्याची टंचाई तर पाचवीला पुजलेली. उसेन कितीही वेगवान असला तरी त्याची आई जेनिफर मात्र गमतीने म्हणते, की त्याने फक्त एकदाच उशीर केला होता. उसेनचा जन्म डॉक्टरांच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा दिवस उशिरा झाला होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. उसेनच्या बाबतीतही तसंच होतं. तो अवघा तीन आठवड्यांचा होता तेव्हा त्याला अंथरुणावर झोपवून काही कामानिमित्त त्याची आई बाहेर गेली होती. त्या वेळी तो अंथरुणावरून पडता पडता वाचला. जेव्हा त्याची आई घरी परतली तेव्हा पाहते तर काय, तीन आठवड्यांचा उसेन पडण्यापासून रोखण्यासाठी त्याने कशाला तरी पकडलेले होते. इवल्याशा हातांतही उसेनमध्ये बरीच ताकद होती. वयाच्या १५ व्या वर्षीच उसेनची उंची १.९६ मीटर म्हणजे ६ फूट ५ इंच होती. आता त्याची उंची ६ फूट ८ इंच आहे. हाच उसेन आज १००, २०० आणि ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत विश्वविक्रमवीर आहे. या तिन्ही प्रकारांत त्याने ऑलिम्पिक विक्रमही प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा कार्ल लुईसनंतरचा तो एकमेव धावपटू आहे. कार्ल लुईसने १९८४ मध्ये ही कामगिरी केली होती. उसेनने २००८ मध्ये ही कामगिरी साधली. ऑलिम्पिकमध्ये विक्रम, विश्वविक्रम दोन्ही प्रस्थापित करणारा उसेन एकमेव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाळके स्मारक पालिकेला डोईजड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि ठेकेदार यांच्या वादात भरडल्या जाणाऱ्या व नाशिकचे वैभव असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाची पूर्णता दुरवस्था झाली असून, पर्यटकांनी फाळके स्मारकाकडे पाठ फिरवली आहे. योग्य नियोजनाअभावी पालिकेलाच आता हे स्मारक डोईजड झाले आहे.

महापालिकेकडून फाळके स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीवर तब्बल एक कोटी ५९ लाखांचा खर्च होत असताना प्रत्यक्षात उत्पन्न मात्र नगण्य आहे. फाळके स्मारकाच्या पर्यटनातून महापालिकेला वर्षभरातून केवळ ४३ लाख रुपयांचेच उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे जवळपास एक कोटी १६ लाखांचा तोटा पालिकेला सहन करावा लागत असून, देखभाल व दुरुस्तीचाही खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फाळके स्मारकाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हे स्मारक ‘बीओटी’ तत्त्वावर चालविण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जपण्यासाठी नाशिकमध्ये पांडवलेणीशेजारी भव्य अशा फाळके स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. नाशिककरांना एक दिवसाचे पर्यटन व्हावे व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नाशिकचे वैभव समजावे, यासाठी या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी अॅम्फि थ‌िएटर, कलादालन, नाट्यगृह, लेझर शो, वॉटर पार्क अशा सुविधा पर्यटकांसाठी करण्यात आल्या आहेत. परंतु, योग्य नियोजनाअभावी गेल्या दोन-तीन वर्षांपासून या स्मारकाची पूर्ण दुरवस्था झाली आहे. महापालिकेने स्मारकाचे देखभालीचे व सफाईचे काम खासगी कंत्राटदारांना दिले होते. सफाई कंत्राटदाराने या ठिकाणी ४५ कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आता कायम सेवेत घेण्याचा दावा केला आहे.

पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात महापालिकेने फाळके स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीवर एक कोटी ५९ लाख रुपयांचा खर्च केला आहे. परंतु, खर्चाच्या बदल्यात पालिकेच्या तिजोरीत केवळ ४२ लाख ६३ हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे पालिकेला स्मारकातून तब्बल एक कोटी १६ लाखाचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी पालिकेचे पाच कर्मचारीही नियुक्त असून सफाईसाठी दररोज ४५ कर्मचारी आहेत. अशी परिस्थिती असतानाही स्मारकाची स्थिती चिंताजनक आहे.


कर्मचारीच ठेकेदार

या ठिकाणी नियुक्त केलेले पालिकेचे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणीही कार्यरत राहत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नियुक्त केलेला एक कर्मचारी तर सध्या पालिकेतच ठेकेदार झाल्याने स्मारकाची देखभाल दुरुस्ती पूर्णतः वाऱ्यावर आहे.


बीओटीचा विचार

दुर्लक्षामुळे या ठिकाणी अवैध धंदेही सुरू असल्याचे महापालिकेच्या लक्षात आले आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी एक रेस्टॉरंट सुरू करण्यात आले होते. परंतु, त्याचीही अवस्था बिकट आहे. त्यामुळे नाशिकसह अन्य राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांनी फाळके स्मारकाकडे पाठ फिरविली आहे. संगीत कारंजा बंद पडलेला आहे. त्यामुळे या स्मारकाचा विकास हा ‘बीओटी’ तत्त्वावर करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. स्मारक ‘बीओटी’ तत्वावर दिल्यास स्मारकाचा वनवास संपण्याची शक्यता असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईच्या २७९४ जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत चार फेऱ्यांनंतरही २७९४ जागा रिक्त आहेत. जिल्ह्यात ६ हजार २४८ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून ३ हजार ४५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या प्रक्रियेची चौथी फेरी बुधवारी काढण्यात आली. त्यामध्ये १३४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चौथ्या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांची संख्या काहीशी कमी होणार असली तरी त्यात फारसा फरक पडणार नाही.

फेब्रुवारी महिन्यापासून आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. यंदा जिल्हाभरात ४५८ शाळांमध्ये ६ हजार २४८ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वंचित घटकातील अधिकाधिक बालकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाही इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने, काही विद्यार्थी निवड होऊनदेखील शाळेपर्यंत न पोहोचल्याने, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने अशा अनेक कारणांमुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिली आहे. चौथ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८ मेपर्यंत प्रवेश घ्यायचे असून ९ मे रोजी मुख्याध्यापकांनी आतापर्यंतच्या प्रवेशाचे ऑनलाइन स्टेटस अपडेट करायचे आहे. पुढील आठवड्यात पाचवी फेरी राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ!

$
0
0

जिल्हा बँकेच्या संचालकांना तारीख पे तारीख

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘आई जेऊ घालीना अन् बाप भीक मागू देईना’ अशी जिल्हा बँक संचालकांची अवस्‍था झाली आहे. आर्थिक कोंडीत सापडल्यामुळे मार्ग काढण्यासाठी संचालक मंडळाला मुख्यमंत्री तारीख पे तारीख देत रिकाम्या हातीच माघारी धाडत आहेत. आतापर्यंत दोन वेळा संचालक मंडळ हात हलवतच परतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या असंवेदनशीलतेचा मात्र शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आता पुन्हा भेटीसाठी दोन दिवस थांबण्याचे आश्वासन दिले आहे.

जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाईही निष्फळ ठरत आहे. सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज थकल्याने नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज देण्यासाठी बँकेकडे दमडीही शिल्लक नाही. कर्जबाजारीपणा, अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला खरिपाच्या एकमेव कर्जाचा आधार आहे. परंतु, बँक डबघाईला गेल्याने संचालक मंडळाने मदतीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु, आता शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असताना मुख्यमंत्रीच असंवेदनशील झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडल्याने जीवनयात्रा संपवत असताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीही वेळ मिळत नसल्याने संचालक हतबल झाले आहेत.

पालकमंत्र्यांची शिष्टाई निष्फळ

राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन प्रयत्नशील असून, त्यांनी जिल्हा बँक संचालक मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, आठ दिवस झाले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संचालक मंडळाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना वेळ नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संचालक मंडळाला बुधवारी पाचारण करण्यात आले. मात्र भेट होऊ शकली नसल्याने संचालक मंडळाला रिकाम्या हातीच परतावे लागले. आतापर्यंत दोनदा संचालक मंडळ परत फिरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्रे नव्हेत हे भटके दहशतवादीच!

$
0
0

टीम मटा

सिडकोतील उत्तमनगर परिसरात भटक्या कुत्र्याने तब्बल पंधराहून अधिक बालकांना चावा घेतल्याच्या घटनेने संपूर्ण नाशिकमध्येच याबाबत हळहळ आणि चिंता व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, महापालिकेचा हलगर्जीपणा आणि अतिरेकी श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला नाशिककरांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडूनही पालिकेकडून फारशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येबद्दल टीम मटाने घेतलेला हा आढावा

पंचवटी -अपघातांचे प्रमाण वाढले

महापालिकेने थांबवलेली निर्बीजीकरणाची मोहीम आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पंचवटी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना पंचवटी परिसरात घडलेल्या आहेत. कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. महापालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबविली होती. ती थंडावल्यानंतर कुत्र्यांच्यी संख्या वाढल्याचे दिसत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने शहर परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. पंचवटीतील सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या पाचशेच्यावर भरले असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पंचवटीत नांदूर, मानूर, आडगाव, मखमलाबाद आणि म्हसरुळ या पाच गावांच्या परिसरात अजूनही शेती पिकते. या गावांच्या बहुतांशी रस्त्यावर नॉनव्हेज खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्स आहेत. या हॉटेलच्या भोवताली कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. तसेच गोठ्यांच्या भोवताली कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसते. वाढलेल्या प‌िकांमध्ये कुत्र्यांचा मोकाट वावर होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उन्हाळ्यात पाणी दिलेल्या पिकांच्या शेतात गारव्याला बसण्यासाठी येणाऱ्या या कुत्र्यांमुळे पिके तुडविली जात आहेत.

पंचवटीत गांधी तलाव, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, गणेशवाडी, तपोवन, मखमलाबाद नाका, म्हसरुळ, मखमलाबाद, अमृतधाम, नांदूर, मानूर आदी भागात तसेच कचरा साचणाऱ्या रस्त्यांवरच्या ठिकाणांवर हमखास मोकाट कुत्री दिसतात.


कुत्र्यांची संख्या वाढण्यास रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे हे प्रमुख कारण आहे. या कचऱ्यात खाद्यपदार्थही असल्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकणे बंद केल्यास कुत्र्यांच्या संख्येवर निश्चित आळा बसू शकेल

- कैलास पोटे

मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

- शशिकांत निमसे

उघड्यावर होणारी मांसाची विक्री आणि काही हॉटेलच्या आजूबाजूची अस्वच्छता यांच्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. अमृतधाम आणि हनुमान नगर परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना ताज्या आहेत. महापालिकेने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे अधिकाऱ्यांना सांगूनही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत.

- सुरेश खेताडे, नगरसेवक


महापालिकेची श्वान निर्बीजीकरणाची मोहीम थंडावल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करायला हवा.

- अरुण पवार, नगरसेवक

आडगाव- रस्त्यावरील मांसविक्रीची लालूच

आडगाव परिसरातील सागर व्हिलेज कॉलनी, मेट होस्टेल,कोणार्कनगर, श्रीरामनगर, आडगाव गावठाणामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले, वयोवृध्द नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरात रस्त्यावर होणारी मांस विक्री, हॉस्टेल, हॉटेल आणि घरगुती शिळ्या अन्नपदार्थांची नागरिक व व्यावसायिक आजूबाजूच्या परिसरात विल्हेवाट लावतात. त्यामुळे कुत्र्यांनादेखील अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागत नाही.

सकाळी ७ ते १० आणि रात्रीच्या वेळी या मोकाट कुत्र्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वेळेत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्याच फिरत असतात. त्यामुळे वॉकला, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणारे व लहान मुले, वृध्द, महिला, मोटारसायकल चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा कुत्रे पाठलाग करून चावा घेतात.

मागील वर्षी वसंतदादा नगरमधील एका घटनेमध्ये एक महिन्याच्या लहान मुलाला आई पाणी भरण्यासाठी गेली असता घरातून ओढून नेऊन लचके तोडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिवाय परिसरातील अनेक लोकांना चावा घेतला आहे. पण प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.

आमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. लहान मुलांना बाहेर खेळणे मुश्क‌िल झाले आहे. परिसरातून जाताना-येताना लहान मुले, वृध्द, महिलांना या कुत्र्यांची भीती असते. अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील प्रशासन कोणतीही कारवाई केली जात नाही.

- भारत निकम, स्थानिक रहिवासी

सातपूर- वाहनचालकांना कुत्र्यांची धास्ती

न्यायालयाच्या आदेशावरून भटक्या श्वानांना जिंवत मारणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे महापालिकेकडून भटक्या श्वानांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी स्वतंत्र ठेकाच महापालिकेने दिला आहे. असे असतांना देखील भटक्या श्वानांचा त्रास नित्याचाच झाला आहे. भटक्या श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त महापालिकेने केला पाहिजे. रस्त्यावर, उद्यानात अथवा रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची धास्ती वाहनचालकांसह पायी चालणाऱ्या नागरीकांमध्ये असते. नुकतेच सातपूर भागातील जाधव संकुल येथे झालेल्या घटनेत एका भटक्या कुत्र्याने तब्बल १० ते १२ मुलांना चावा घेत जखमी केले होते. जखमी झालेल्या मुलांचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, नेहमीच होणाऱ्या भटक्या श्वानांच्या त्रासाला रहिवाशी वैतागले आहेत.

महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करून पुन्हा सोडून दिले जाते. महापालिकेचा ठेका घेतलेल्यांकडून नसबंदी झाल्यावर खतप्रकल्पाच्या भागातच भटक्या श्वानांना सोडले जाते. मात्र ते पुन्हा आहे त्या परिसरात परत येतात. महापालिकेकडून डॉग व्हॅनही कार्यरत आहे. ही व्हॅन आल्याचे कळताच कुत्री पोबारा करतात. जाधव संकुल भागात गेल्याच आठवड्यात १० ते १२ मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले होते. यानंतर महापालिकेच्या यंत्रणेकडून डॉग व्हॅनही पाठविण्यात आली. परंतु कुत्रे आढळले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुत्र्यांवरून राजकारण

सातपूर कॉलनी भागात एकाच दिवशी अनेक मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर नागरिकांनी त्या कुत्र्याला ठार मारले होते. यानंतर मनसे व भाजपची सत्ता असतांना माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी सातपूर कॉलनी भागात पाहणी दौरा केला होता. याप्रसंगी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सातपूर कॉलनीतील मटनाच्या दुकानांमुळेच भटके कुत्रे वाढत असल्याचा आरोप केला होता. मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मुद्दा खोडत गेल्या अनेक वर्षांत कुत्र्यांचा त्रास झाला नाही, त्यावेळी मटणाची दुकाने नव्हती का असा सवाल उपस्थित केला होता. यावेळी उपमहापौर कुलकर्णी यांनी शांत राहणे पसंत केले होते.

अशोकनगर, श्रमिकनगर भागात सर्वाधिक भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ असतो. याबाबत वेळोवेळी महापालिकेकडे समस्या मांडल्याही आहेत. महापालिकेकडून काही प्रमाणात भटकी कुत्री पकडलीही जातात. परंतु, त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई होणे गरजेचे आहे.

- संदीप भावले

अशोकनगर भागातील जाधव संकुलमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. अनेक लहान मुलांना चावा घेत जखमीही केले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे.

- सुभाष गुंभाडे


सिडको - भाजीबाजाराचा कचरा कारणीभूत

सिडको परिसरात गल्लीबोळात शेकडो मोकाट कुत्री आढळून येतात. दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, तोरणानगर यासारख्या परिसरात उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीच्या ठिकाणी या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. त्याचबरोबर सिडकोतील भाजी बाजारासाठी अद्याप स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था नसल्याने अनेक वेळा उरलेला, सडका भाजीपाला हा भाजीबाजाराच्या आवारातच टाकला जात असतो. त्यामुळे याठिकाणी या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. दुचाकी किंवा चारचाकी वाहने रस्त्याने येजा करताना या कुत्र्यांच्या टोळ्या या गाड्यांच्या मागे धावतात. त्यामुळे अनेकवेळा अपघातही होत असतात. सिडको भागातील उघड्यावरील मांस विक्री व भाजीबाजारांजवळील केरकचरा, सडका भाजीपाला हेच या कुत्र्यांचे केंद्रस्थान असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. सिडकोतील या मोकाट कुत्र्यांबाबत अनेकवेळा नागरिकांनी आंदोलनेसुद्धा केली आहेत. मात्र, महानगर पालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सिडकोतील पेलिकन पार्क हे कुत्र्यांचे मुख्य ठिकाण असून, सिडकोपासून जवळच असलेल्या पाथर्डी फाट्यावरील कचरा डेपोच्या परिसरातूनही अनेक कुत्रे सिडकोत येत असतात. पूर्वी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी शहरातील कुत्री पाथर्डी फाट्याच्या पुढील निर्बीजीकरण केंद्रात आणले जात होते. हीच कुत्री पुन्हा सिडकोतच सोडली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असतो. त्यामुळे शहराच्या तुलनेत सिडकोत मोकाट कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या मोकाट कुत्र्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही तर नगरसेवकही यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे. सिडकोतील भाजीभाजारांच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत हे मोकाट कुत्रे दिसून येतात. त्यामुळे रात्री अपरात्री कंपनीतून घरी जाणाऱ्या कामगारांची खूपच कसरत होत असते.

उघड्यावर मास विक्री बंद केली पाहिजे. काही दुकानदार स्वच्छता ठेवत असले तरी सर्वच जण मांस विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवत नसल्याने याच दुकानांसमोर सर्वाधिक कुत्र्यांची गर्दी दिसून येते.

- प्रकाश पाटील, कामगार


उत्तमनगर भागात अजूनही दोन पिसाळलेले कुत्रे असल्याचा नागरिकांकडून सांगण्यात येते. महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. नवनिर्वाचित नगरसेवकांनीसुद्धा हा महत्वाचा प्रश्न सोडविला पाहिजे.

- डॉ. मंजुषा दराडे

नाशिकरोड - वाहनचालकांचा करतात पाठलाग

नाशिकरोड विभागातही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पायी चालणाऱ्या वाटसरूंसह वाहनचालकांनाही या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्याच आठवड्यात नांदूर नाका येथील एका रिक्षाचालकाच्या दहा वर्षीय मुलाला एका कुत्र्याने चार ठिकाणी चावा घेऊन गंभीर जखमी केले होते.

नाशिकरोड प्रभागातील सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, देवळालीगाव, वडारवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, चेहेडी, रोकडोबावाडी, जेतवननगर, पाण्याची टाकी, कॅनॉलरोड, गोसावीवाडी, चव्हाण मळा या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागात अस्वच्छतेचे प्रमाणही जास्त असल्याने भटके कुत्रे मोठ्या संख्येने आढळून येतात. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांवर दररोज भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ बघायला मिळतो.

रेल्वे स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वेने उतरलेल्या प्रवाशांना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. सिन्नर फाटा प्रवेशद्वाराने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचे कळप बिनधास्त बसलेले दिसतात. बऱ्याचदा हे कुत्रे वाहनांच्या मागे भुंकत धावतात. त्यामुळे घाबरलेल्या वाहनचालकांचे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

ठेकेदार सुस्त, प्रशासन मस्त

मनआने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘नवोदय व्हेट सोसायटी’ या एजन्सीला एक वर्षासाठीचा ठेका दिला आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास अशा भागातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना पालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निर्बीजीकरणाची प्रक्रिया करुन त्यांना पुन्हा मूळ जागेवर सोडून देण्याची, लसीकरणाची जबाबदारी या एजन्सीवर आहे. मात्र, सध्या ही एजन्सी सुस्त तर प्रशासनही मस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षी ८ हजार तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत ६०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले.


भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी असून ते वाहनांच्या मागे धावतात. बऱ्याचदा दुचाकीस्वार घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी रेल्वेने उतरलेल्या प्रवाशांना तर जीव मुठीत धरुनच रस्त्याने प्रवास करावा लागतो.

-गौतम बागूल, नागरिक


भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीस्वार घसरुन पडल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करुन चावा घेतल्याचे प्रकारही अधूनमधून घडतात. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करुनही उपयोग होत नाही. दुसरीकडील कुत्री येथे आणून सोडली जातात.

- सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. गेल्या वर्षी ८ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले. ज्या भागातील नागरिकांची तक्रार येते त्या भागातील भटके कुत्रे पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जमा करुन त्यांच्यावर निर्बीजीकरणाची प्रक्रिया करुन त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी सोडले जाते. नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये.

-डॉ. प्रमोद सोनवणे, पशु वैद्यकीय अधिकारी, मनपा


जेलरोड - मच्छिमार्केटमध्ये कुत्र्यांचे ठाण

जेलरोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक, बालके जखमी झाल्याच्या घटना गेल्या सहा महिन्यांत घडल्या आहेत. मांस विक्रेत्यांच्या टपऱ्यांजवळ कुत्र्यांची संख्या जास्त असते. जेलरोडच्या इंगळेनगर चौकात पन्नास वर्षे जुने मच्छी मार्केट आहे. येथे मटण आणि चिकन विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असते. दसक, पंचक, सायखेडारोड, टाकळीरोड, उपनगर, जयभवानीरोड, आर्टिलरी सेंटर, विहीतगाव, रोकडोबावाडी आदी ठिकाणी मटणविक्रेत्यांच्या टपऱ्या सुरू झाल्या आहेत. तेथेही कुत्र्यांचा मुक्काम असतो. कॉलन्यामध्ये मांसाहारानंतर त्यातील तुकडे कचऱ्यात टाकले जातात. तेथेही कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.

भटक्या कुत्र्यांचा त्रास हा पहाटे क्लास जाणारे विद्यार्थी, कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दूधवाले, कचरा वेचणारे यांना होतो. सायंकाळी उशिरा क्लासवरुन येणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्या मागे कुत्रे लागतात. जेलरोडला इंगळेनगर, पवारवाडी, जेलरोड-कॅनलरोड तसेच उपनगर पोलिस ठाण्याच्या रोडवर हा त्रास होतो. ही कुत्री धबा धरुन बसलेली असतात. सातपूर, अंबड येथून मध्यरात्री उश‌िरा कामावरुन नाशिकरोडला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर जीव मुठीत धरुनच घरी यावे लागते. द्वारका व डीजीपीनगरपासून कुत्री पाठलाग करायला सुरुवात करतात.

दहशतीच्या घटना

जयभवानी रोडच्या जाचक मळ्यात गेल्या फेब्रुवारीत तीन बालकांसह आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. प्रकाश रहाणे यांचा पावणेतीन वर्षाचा मुलगा सिध्दार्थ शेजाऱ्यांबरोबर फिरायला निघाला असता कुत्र्याने सिध्दार्थला कानाच्या मागे व दंडावर खोलवर चावा घेतला. थोडा वेळाने निवृत्त प्रेस कामगाराच्या कोपऱ्याला आणि नंतर पाच वर्षांच्या मुलाच्या दंडावर चावा घेतला. या कुत्र्याने पाटील कॉम्पलेक्सजवळ प्रथम दीर-भावजयीला चावा घेतला. नंतर लहान मुलीला व नंतर वास्तु पार्कजवळ भाजी विक्रेत्याला ते चावले. कुत्रे पकडण्यासाठी गाडी न आल्याने नागरिकांनी दुपारी साडेतीनपर्यंत वाट पाहून कुत्र्याला मारुन दूरवर नेऊन टाकले. ते उचलण्यासाठीही गाडी आली नाही. जेलरोडच्या ययातीनगर भागात काही महिन्यांपूर्वी चार वर्षांच्या मुलीला, तसेच एका ज्येष्ठाला कुत्र्याने चावा घेतला होता. ते गंभीर जखमी झाले होते. जेलरोडच्याच भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटी येथील नागरिकांना, तसेच दुचाकीसारख्या वाहनांवर जाणाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी अनेकदा हल्ला चढवला आहे.

काही महिन्यांपूर्वी ययातीनगरमध्ये चार वर्षांच्या मुलीला तसेच एका वयस्क व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. रात्री महिला, नोकरदार व नागरिकांना घरी परतणे मुश्क‌िल झाले आहे. कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा.

-किशोर सोनवणे, नागरिक


माझ्या मुलाला फेब्रुवारीत श्वानदंश झाला. उपचारासाठी सहा हजाराची दोन इंजेक्शनची नाशिकहून मागवली. दोन दिवसात १५ हजार खर्च झाला. महापालिकेचे अधिकारी सोनवणे यांना फोन करुनही कुत्रे पकडण्यासाठी गाडी आलीच नाही.

-प्रकाश रहाणे

जेलरोडच्या वर्दळीच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना तसेच दुचाकी चालकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, दूधविक्रेते, पेपरविक्रेते व प्रेस कामगारांचा पाठलाग ही कुत्री करतात.

- गणेश कुलथे, पेपर विक्रेते

देवळाली कॅम्प - महिन्याभरात ५५ जणांना चावा

देवळाली परिसरासह ग्रामीण भागात शेकडोच्या संख्यने भटकी कुत्रे असून, या कुत्र्यांकडून वारंवार नागरिकांसह बालकांना चावण्याचे प्रकार घडत आहेत. याशिवाय रस्त्याने चालणाऱ्या दुचाकीधारकांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. अपघातास कारण ठरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांना आवर घालावा अशी मागणी नेहमीच होते. गेल्या अनेक दिवसांपासून देवळालीसह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यातच येथील जैन बांधवांकडून जीवदया म्हणून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे व चपात्या टाकण्यात येत असल्याने त्यांची संख्या वाढतीच आहे. रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकावर ही कुत्री भुंकून चावा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी तर वाहनचालक घसरून पडतात. ६ नंबर नाका, महालक्ष्मी मंदिर, लामरोड, आनंद रोड, हौसन रोड, स्टेट बँक कॉर्नर, वडनेर रोड, रेस्ट कॅम्प रोड अशा भागात या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कॅन्टोन्मेंट प्रशासनास ही मोकाट कुत्री डोकेदुखी ठरत आहेत. याशिवाय गेल्या सहा महिन्यांपासून कुत्र्यांच्या चावण्याचे प्रकारदेखील वाढीस लागले आहेत. एप्रिल महिन्यात देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलासह दोन खासगी डॉक्टरांकडे साधारणपणे ५५ नागरिकांना १२५ हून अधिक इंजेक्शन देण्यात आली आहेत.

कुत्रे चावण्याच्या घटना

(कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल नोंद)

नोव्हेंबर :- ४७

डिसेंबर :-४६

जानेवारी :- ७३

फेब्रुवारी :- ३९

मार्च :- २२

एप्रिल :- ५५


कुत्रे मारणे व पकडणे दोन्हींवर बंदी

देवळाली कॅम्प परिसरात कॅन्टोन्मेंट हद्दीलगत असलेली कुत्री प्रशासनाने पकडून लष्कराच्या मोकळ्या हद्दीत सोडून दिली होती. मात्र, त्यातील काही कुत्री मेल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच चेन्नईच्या एका खासगी संस्थेने तत्कालीन बोर्ड अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे आरोग्य निरीक्षक भातखळे यांनी सांगितले. याशिवाय कुत्र्यांना मारण्याची अथवा पकडण्याचीदेखील परवानगी नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हतबल झाले आहेत.

निर्बीजीकरणाचा खर्च आवाक्याबाहेर

शहर परिसरातील मोकाट कुत्र्यांना मारू नये, त्याऐवजी त्यांच्या निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करावी, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, निर्बीजीकरणासाठी एका कुत्र्यामागे सुमारे एक हजार रुपये एवढा खर्च होत असतो. तो प्रशासनाला परवडण्यासारखा नसल्याने तीन चार वर्षांपूर्वी असे निर्बीजीकरण करण्यात आले होते. मात्र, आता खर्च वाढल्याने प्रत्येक कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी होणारा खर्च परवडणारा नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images