Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सेट’ परीक्षेचे हॉलतिकीट वेबसाइटवर

$
0
0
१ डिसेंबर रोजी होणा-या ‘सेट’ परीक्षेचे हॉलतिकीट पुणे विद्यापीठाच्या वेबासाइटवर उपलब्ध झाले असून ते परीक्षार्थींना डाऊनलोड करून घेता येईल.

३.५ लाख किमतीच्या बॅगांची चोरी

$
0
0
ट्रकमधून पुण्याकडे पाठविलेल्या व्हीआयपी कंपनीच्या बॅगांपैकी साडेतीन लाख रुपये किमतीच्या बॅगांची ट्रकचालकानेच परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ध्यानातून जीवनाचा विकास शक्य

$
0
0
ध्यानात प्रचंड शक्ती असते. ध्यानातून एकाग्रता वाढते आणि त्यामुळे आत्मबलात वाढ होऊन जीवनाचा विकास होतो, असे प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे संत देवानंद महाराज यांनी केले.

उड्डाणपूल सोय की गैरसोय

$
0
0
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई-धुळ्याकडे जाणाऱ्यांसह शहरवासियांच्या सोयीसाठी उभारलेले उड्डाणपूल आता शहरवासियांसाठीच डोकेदुखी ठरू लागले आहेत.

पाचशे विद्यार्थिनींना सायकल

$
0
0
महापालिकेच्या शाळांमध्ये ​शिक्षण घेणाऱ्या ५०० विद्यार्थिंनीना लवकरच त्यांच्या हक्काची सायकल मिळणार आहे.

व्यापाऱ्यांची एलबीटीला अजूनही नकारघंटा

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) भरण्यास २३ हजार ५०० व्यापारी तसेच उद्योजक रजिस्टर झाले असले तरी त्यापैकी अवघे नऊ हजार व्यापारी प्रामाणिकपणे महापालिकेकडे एलबीटी जमा करीत आहेत. एलबीटीकडे पाठ फिरवणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होतो आहे.

अन्यथा फाळके स्मारक बंद करा

$
0
0
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था असल्याने एकतर त्याची योग्य काळजी घ्या, अन्यथा ते बंद तरी करा, म्हणजे दादासाहेबांच्या आत्म्याला सुख लाभेल, असा आर्त टाहो दादासाहेब फाळके यांचे नातू शेखर पुसाळकर यांनी फोडला आहे.

परमानंट नोकरी; टेम्पररी कंपनी

$
0
0
प्रत्येक आठवड्यात शहराच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यात न्याय हक्कांच्या जागृतीसाठी कर्मचाऱ्यांची अध‌िवेशने अल‌िकडच्या काळात अध‌िक संख्येने व्हायला लागली आहेत. हक्कांसाठी हळूहळू पसरणारी सजगता हे च‌ित्र सकारात्मक आहे.

एसटीचा ग्रुप बुकिंग करारही महागला

$
0
0
घरी लग्नकार्य असो वा धार्मिक सोहळ्यासाठी ग्रुपने जायचे असो... यासाठी एसटीबस मिळेल का? असे प्रश्न बसस्थानकांत सातत्याने विचारला जातो. तसेच पर्यटन आणि तत्सम अनेक कारणांसाठी देखिल एसटीच्या ग्रुप बुकींगला पसंती दिली जाते.

नगरसेवकांना महासभेची प्रतिक्षा

$
0
0
एलईडी, जाहिरात धोरण, डेंग्यू तसेच काझीगडीसारख्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वच नगरसेवकांना महासभेची प्रतिक्षा लागली आहे. यापुर्वीच्या दोन महासभा तहकूब झाल्याने अनेक विषयांवर चर्चा होऊ शकली नव्हती.

सिंहस्थात स्टेशनला दुप्पट बंदोबस्त

$
0
0
सिंहस्थात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून त्यासाठी पोलिसांच्या पाच तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मागील सिंहस्थाच्या तुलनेत यंदा रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तात दुपटीने वाढ येणार आहे.

विनयभंग करणाऱ्यास अटक

$
0
0
पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या घरापर्यंत पोहोचून तिचा विनयभंग करणाऱ्यास उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.

खड्डयाने घेतला बळी

$
0
0
खड्ड्यात मोटरसायकल आदळल्याने जबर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. कृष्णा बाळू चव्हाण (१६) असे त्याचे नाव आहे.

बैठकांचा ‘उद्योग’ थंडावला!

$
0
0
औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली ‘जिल्हा उद्योग मित्र’ची बैठक (झूम) गेल्या चार महिन्यांत न झाल्याने उद्योगांच्या समस्या मिटल्या की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

महापालिका १२८ कोटींमध्ये ६ हजार घरे बांधणार

$
0
0
घरकुल योजनेतील अकरा हजार २०० घरांपैकी २ हजार ५० घरे जानेवारी २०१४ पर्यंत लाभार्थींना देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तर आणखी २ हजार ८४८ घरे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने कोर्टात सादर केले आहे. या ४ हजार ८९८ घरांसाठी आतापर्यंत योजनेतील २४८ कोटींपैकी १३० कोटी रूपये खर्च झाला आहे. तर उरलेल्या ६ हजार २९२ घरे १२८ कोटींमध्ये कशी होणार या कोंडीत महापालिका सापडली असून घरकुलाचे हे ओझे कसे पेलायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘महिंद्रा’त कंत्राटी कामगारांचे ‘कामबंद’

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कंत्राटी कामगारांनी वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले. याप्रकरणी कामगार अधिकाऱ्यांबरोबर सोमवारी झालेली बैठक यशस्वी होऊनही कामगारांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे.

‘एलबीटी’ही भरता येणार ऑनलाइन !

$
0
0
घरपट्टी आणि पाणीपट्टी ब‌िले भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर महापालिकेने आता लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी)चा भरणा देखील ऑनलाइन करता यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठीचे सॉफ्टवेअर विकस‌ित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील पाच ते सहा दिवसात ही सुविधा कार्यन्वित होईल अशी अपेक्षा संबंधीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कोर्टात जाणाऱ्यांची केबल बंद

$
0
0
सरकारी निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात जाणाऱ्या आणि जिल्हा प्रशासनाकडे कर भरण्याऐवजी कोर्टात कर भरणाऱ्या ३० लोकल केबल ऑपरेटरला चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाला संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे या ३० केबलचालकांचे प्रक्षेपण थांबविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढले आहेत.

नाशिकमधील घुसखोरीवर करडी नजर

$
0
0
शहरवासियांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेणारे पोलिस स्वत:च्या आणि आपल्या आस्थापनांच्या सुरक्षेसाठी पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाले आहेत. पोलिस आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येकाची कटाक्षाने नोंद घेतली जात असून काहीवेळा दिवसभरात १ हजारांपर्यंत लोक येथे व्हिजिट करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

स्टेशनवर हवे बहुमजली पार्किंग

$
0
0
रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या प्रवाशांना वाहने लावण्यास जागा नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या देवी चौकातील पार्किंग अपुरे पडत असल्याने प्रवासी आपली वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे. रेल्वे प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगसाठी बहुमजली पार्कींगची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images