Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नेत्याला दंडाचा दम

0
0
सतत विविध कारणांनी चर्चेत राहणारे व अबालवृध्दांमध्ये क्रेझ असलेले लालूजी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आदल्या दिवशी आपला वाढदिवस साजरा करुन देवदेव करण्यासाठी लालूजी परिवारासह नाशिक मुक्कामी आले होते.

साठ लाखांचा मद्यसाठा जप्त

0
0
पंजाबहून नाशिककडे नेण्यात येणारा ६० लाख रुपयांचा बनावट मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे पथकाने जप्त केला आहे. संशयावरून केलेल्या ट्रकच्या तपासणीत विविध कंपन्यांचे लेबल लावलेला हा मद्यसाठा आढळून आला.

सांगा काम कसं करायचं?

0
0
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबविण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी मटेरियल मिळत नसल्याने कामात अडचणी निर्माण झाल्या आहे.

सीटूचा उद्या ‘जवाब दो’ मोर्चा

0
0
किमान वेतन दहा हजार रुपये करावे यासह विविध मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियनतर्फे (सीटू) शनिवारी (१५ जून) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

हॉटेलच्या वेटरला जिवंत जाळले

0
0
श्रीरामपूरजवळ एका हॉटेलमध्ये काम करणा-या दोघा वेटरमध्ये झालेल्या भांडणात एका वेटरने डिझेल टाकून दुस-याला जिवंत जाळले. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी वेटर फरार आहे.

पायाभूत सुविधांचे ‘उड्डाण’!

0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील बहुप्रतिक्षित असलेला सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल वाहतुकदारांसाठी खुला होतानाच प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले द्वारका ते नाशिकरोड या मार्गाचे सहापदरीकरण आणि नाशिकरोड ते सिन्नर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

अपहृत बिपीन बाफनाचा खून

0
0
एक कोटी रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ओझर येथील बिपीन बाफणा याचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. आडगाव येथील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह सापडला. दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या विपीनचे अपहरणकर्ते ना​शिक शहरात असल्याचे स्पष्ट होऊनही पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच त्याचा बळी गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पशु व मत्स्य विद्यापीठाचे नाशिक विभागाला प्राधान्य

0
0
आगामी कालावधीत कृषी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या मुबलक संधी आणि तोकडे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ लक्षात घेऊन नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला महाराष्ट्र पिंजून काढावा लागतो आहे. कृषीपुरक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्यासाठी नागपूरच्या या विद्यापीठाने कृषी डिप्लोमाच्या प्रसारासाठी नाशिक विभागाला प्राधान्य दिले आहे.

राज्य ग्राहक आयोग अध्यक्षाविना ‘पोरका’

0
0
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच त्यांना विनाविलंब न्याय मिळावा यासाठी शासनाने ग्राहक मंचाची स्थापना केली. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र, सध्या राज्य ग्राहक आयोगालाच अध्यक्ष नसल्यामुळे हा आयोग अध्यक्षाविना ‘पोरका’ झाला आहे.

हॉस्पिटल्स परवान्याचे नूतनीकरण करा

0
0
हॉस्पिटल्समधील फायर सेफ्टीच्या अटी पूर्ण करू न शकणाऱ्या हॉस्पिटल्सचे परवाने नूतनीकरणाचे काम महापालिकेने रोखून धरले आहे. परिणामी २०१३-१४ या वर्षासाठी परवाने नूतनीकरणाचे काम पूर्णतः थंडावले असून डॉक्टरांनी फायर सेफ्टीच्या नियमांची पूर्तता करून लवकरात लवकर परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

‘फ्रावशी’च्या शार्दुलची क्रिकेटमध्ये चमक

0
0
फ्रावशी अकॅडमीच्या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या शार्दुल दिवाण या विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनमार्फत त्याला यावर्षीचा उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले.

निवृत्तीनाथ पालखीसाठी मदत करण्याचे आवाहन

0
0
जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकला येत आहे. रविवार, २३ जून रोजी वीर सावरकर तरणतलाव येथे सकाळी नऊ वाजता ही पालखी येणार असून त्यासाठी महापालिकेतर्फे योग्य ती मदत करावी, अशी विनंती संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समिती नाशिकतर्फे निवेदनाने करण्यात आली आहे.

पाठवा तुमच्या लेन्समधील फुलपाखरू

0
0
पावसाळा म्हणजे धमाल. त्यामुळे या बहरणाऱ्या सिझनमध्ये आपले फोटोग्राफीसारखे अनेक छंद डोकं वर काढतात. याच सिझनमध्ये असतो तो फुलपाखरू दिन (१९ जून). त्यानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘टकले बंधू सराफ’ यांच्यामार्फत ‘माझ्या लेन्समधील फुलपाखरू’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सध्या आहे त्याला बळकटी द्या’

0
0
‘रायगड जिल्ह्यात कार्यान्वीत असलेल्या तंत्रशिक्षण विद्यापीठाला सध्या बळकटी द्या’, असे वक्तव्य कृषीमंत्री शरद पवार यांनी के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी येथे शुक्रवारी केले. मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रात नव्या तंत्रशिक्षण विद्यापीठाची स्थापना होणे शक्य आहे काय? या प्रश्नाचा धांडोळा घेणाऱ्या दिग्गजांसाठी हे सूचक वक्तव्य नव्या विद्यापीठाची परिस्थिती सध्यातरी ‘जैसे थे’च राहणार असल्याचेच सुचवून गेले.

गांगवन शिवारात आढळला बेशुद्धावस्थेतील बिबट्याचा बछडा

0
0
तालुक्यातील गांगवन शिवारात गुरुवारी दुपारी बिबट्याचा एक बछडा बेशुद्धावस्थेत आढळला. बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. अहिरराव यांनी या बछड्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी त्याला नाशिक येथे हलवले.

जळगाव महापालिका निवडणूक देवकरांच्या नेतृत्वाखालीच

0
0
आगामी जळगाव महापालिकेची निवडणूक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे जिल्ह्याचे नूतन मंत्री संजय सावकारे यांनी आज भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

‘मटा’तर्फे वैद्य विक्रांत जाधव यांचे व्याख्यान

0
0
पावसाळा म्हटले की चमचमीत खाण्यासाठी मन आतूर झालेले असते. मग पाऊस पडत असताना खावीशी वाटणारी कांदाभजी असो किंवा गरमागरम वडापाव. हे पदार्थ खाताना आपण पावसाळा लागलाय याचा मात्र आपण विचारच करीत नाही.

ब्रह्मा व्हॅलीत एआरसी सेंटरला मान्यता

0
0
ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन पॉलिटेक्निक व कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयाकडून इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एआरसी सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

जेष्ठ पत्रकार निवृत्ती वेतन राज्यस्तरीय लढा समिती स्थापन

0
0
जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विजय बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

कम्प्युटर आले खरे, पण करायचे काय?

0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वादग्रस्त ठरलेल्या खरेदीतील कम्प्युटर बँकेत येऊन ठेपले असले तरी त्यांचे करायचे काय, अशा विवंचनेत प्रशासक सापडले आहेत. सहकार आयुक्तांनी ही खरेदी बेकायदा ठरवत ती स्थगित करण्याचे आदेश दिल्यामुळे आता काय करावे, यासाठीचे मार्गदर्शनच प्रशासकांनी आयुक्तांकडे मागविले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images