Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘ग्रीन बिल्डींगसाठी हीच योग्य वेळ’

$
0
0
आजच्या काळासाठी अत्यावश्यक असलेली आणि माझं नाशिक, सुंदर नाशिक ही ओळख टिकविण्यासाठी ग्रीन बिल्डींगची संकल्पना राबविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन इंडिअन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे उपाध्यक्ष शारुख मिस्त्री यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात CCTV

$
0
0
सीसीटीव्ही बसवायचे की नाही यावरून बरीच भवती न भवती झाल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीवर तिसरा डोळा बसविण्याचा मुहूर्त लागला आहे. कार्यालयातील व्हरांड्यांसह महत्त्वाची ठिकाणे सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आली आहेत.

विजेचा धक्का लागून शेतकरी ठार

$
0
0
बागलाण तालुक्यातील अंबासन येथे ट्रान्सफॉर्मरचा डीओ टाकण्यासाठी गेलेल्या शेतकरी विजेचा धक्का लागून जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. अंबासन येथील शेतकरी नानाजी धोंडू सोनवणे हा शिवारातच शेती काम करत होता.

पोलिसाच्या लग्नातच हाणामारी

$
0
0
पोलिसाच्या लग्नामध्येच पोलिस कॉन्स्टेबल आणि तरुणामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सटाणा पोलिस कॉलनीत घडली.

रिक्षा प्रवासात ऐवज लांबविला

$
0
0
रिक्षातून प्रवास करणा-या युवकाच्या गळ्यातील ओम पान लांबविल्याचा प्रकार मेहर सिग्नल ते फुलेनगर मार्गावर घडला. शुभम दीपक पवार (१७, रा. साई गोदावरी अपार्टमेंट, पाटील गल्ली, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रेल परिषदेचे कार्य लाख मोलाचे

$
0
0
रेल प्रशासन व प्रवासी यांच्यात दुवा म्हणून रेल परिषद काम करीत असून हे कार्य लाखमोलाचे आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली ही संस्था भारतातील अनोखे उदाहरण असून परिषद प्रवाशांच्या सेवेसाठी निस्पृहपणे काम करीत असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाचे महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले.

सात दशकांनंतर ‘नाशिक पंचाग’

$
0
0
भारतीय कालमापनाचा आधार असलेल्या पंचागपद्धतीची परंपरा सात दशकांनंतर नाशिकमध्ये नव्याने सुरू झाली आहे. नाशिक पंचांग म्हणून ओळख असलेले हे पंचाग आता ‘महाजन पंचांग’ म्हणून उपलब्ध झाले आहे.

गोदा प्रदूषणात पालिकाही वाटेकरी

$
0
0
गोदावरी प्रदूषणाची जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळासह (एमआयडीसी) अन्य विभागांवर ढकलणारी नाशिक महापालिकादेखील गोदावरीच्या प्रदूषणात वाटेकरी असल्याचे उघड होत आहे.

‘जेंडरबेस’ कायद्यांत काळानुरूप बदल गरजेचे

$
0
0
पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांची होणारी गळचेपी थोपविण्यासाठी त्यांना झुकते माप देणारे कायदे बनविले गेले. महिला सबलीकरणासाठी ते फायद्याचेही ठरले.

जादूटोणा कायद्याविरोधात आंदोलन

$
0
0
राज्य सरकारच्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन, तसेच इतर संस्था-संघटनांतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

नोंदणीला सुटीचा ‘आधार’

$
0
0
आधार कार्ड नोंदणीला दिवाळीची सुटी पावली आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यांत ‘आधार’ नोंदणीमध्ये तब्बल १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील आधार नोंदणीचा टक्का आता ६४ वर जाऊन पोहोचला आहे.

सिंहस्थाला संभाजी ब्रिगेडचा कडाडून विरोध

$
0
0
महाराष्ट्र सरकारतर्फे पारित होणाऱ्या जादुटोणाविरोधी कायद्यास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असून २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाला ब्रिगेडकडून कडाडून विरोध केला जाईल, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.

चोरांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

$
0
0
शेतातील तीनशे किलो डा​ळिंबांची ​चोरी करून ती नेत असताना अडवणाऱ्या शेतकऱ्यालाच रिक्षाची धडक देऊन जबर जखमी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील सोमपूर शिवारात घडली.

डेप्युटी इंजिनीअरला शेतक-यांचा घेराव

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असल्याने शेतकऱ्यांना वीजबिलात सूट मिळावी, या मागणीसाठी बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीचे डेप्युटी इंजिनीअर एस. व्ही. राणे यांना घेराव घातला.

‘प्राधिकरण’च्या कर्मचा-यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू

$
0
0
पाणी पुरवठा आणि स्वच्छता या कामाचे मोठे मोल आहे. सरकारला या बाबी अलीकडे तीव्रतेने जाणवत आहेत.

‘काझीगढी सोडणार नाही’

$
0
0
कोणत्याही परिस्थितीत काझीगढी सोडणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

‘वसाका’ची वीजही कापली

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला लागलेले ग्रहण अधिक गडद होत चालले आहे.

पाथर्डी दरोडा : जखमी वृद्धेचाही मृत्यू

$
0
0
पाथर्डी शिवारात दरोडेखोरांच्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर रविवारी मृत्यू झाला. तीन आठवड्यांहून अधिक काळ तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

नोकरीचे आमिष; १३ जणांची फसवणूक

$
0
0
मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून १३ बेरोजगारांची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

'राउशु' च्या परीक्षार्थींची फरफट

$
0
0
लिपिक आणि टंकलेखक या पदांसाठी महाराष्ट्र सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतही परीक्षार्थींनी फरफट अनुभवली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images