Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निवाणेत बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ

$
0
0
निवाणे परिसरातील खालच्या दरी भागात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत पाच शेळ्या व एक बोकड फस्त केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिष्यवृत्तीसाठी सकारात्मक पाऊल

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात श‌िक्षण घेणाऱ्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर श‌िष्यवृत्ती देण्यात यावी, या प्रस्तावाच्या दृष्टीने प्राथम‌िक टप्प्यात सकारात्मक चर्चा झाली.

डेंग्यू प्रकरणामुळे शिवसेनेचे आंदोलन

$
0
0
पंचवटीतील तरूणाचा डेंग्यूसदृश आजाराने निधन झाल्याच्या चर्चेने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राजकीय पक्षांकडून महापालिका सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले...

$
0
0
गोदामाईच्या काठावरची काझी गढी. हातावर पोट भरणारी येथील माणसे. ४० ते ५० वर्ष त्यांनी जेथे संसार केला त्या घरांची डोळ्यादेखत माती झाली. निवारा गेल्याने अश्रूंचा बांधही फुटला. ज्यांचा संसार मोडून पडला त्यांना मदतीचा हात देत रहिवाशी रात्रभर शेजारधर्म जागवित राहीले.

मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार जाहीर

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा ‘विशाखा पुरस्कार २०१३’ गुरूवारी जाहीर करण्यात आला.

‘कट प्रॅ‌क्टिस’ पडणार महागात

$
0
0
शहरात डेंग्यूचे अस्तित्व असले तरी, या आजाराचा जास्तीत जास्त धाक दाखवून पेशंटची लुबाडणूक केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ओळखीच्या लॅबमधून हवे ते रिपोर्ट तयार केले जात असून अशी कट प्रॅक्टिस करणाऱ्या हॉस्पिटल तसेच पॅथॉलॉजिस्टविरोधात कडक कारवाई करण्याची योजना महापालिकेने आखली आहे.

कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगीत

$
0
0
दशकभरापासूनच्या प्रलंब‌ित मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पेटलेले आंदोलन स्थग‌ित करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अज‌ित पवारांनी या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरही विद्यापीठ स्तरावरील मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची भूमिका संद‌िग्ध होती.

केंद्र सरकारचा आदेश

$
0
0
शहरातील स्ट्रीट लाइट बदलून त्याऐवजी एलईडी फिटिंग्ज करण्यावरून गदारोळ सुरू असताना आता केंद्र सरकारनेदेखील एलईडी ‘मस्ट’ असल्याचा जीआर पाठविला आहे.

‘आर्ट फिनि‌क्स फेस्टिव्हल’मध्ये नाशिककरांचा ठसा

$
0
0
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोज‌ित करण्यात आलेल्या ‘आर्ट फ‌िन‌िक्स फेस्टिव्हल’मध्ये नाश‌िककर गुरुश‌िष्यांचा ठसा उमटला आहे. च‌ित्रकार प्रा. संजय साबळे आण‌ि विद्यार्थ्यांच्या च‌ित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता.

राज्यातील बालगृहे संकटात

$
0
0
राज्यातील एक हजार बालगृहातील ८० हजार निराधार बालकांना सांभाळणाऱ्या दहा हजार सेवकांवर सरकारच्या दुर्लक्षामुळे वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. तर बालगृहातील एका बालकाला फक्त २१ रुपये अनुदानावर दिवस काढावा लागत आहे.

दोन वर्षांत वाढले डेंग्यूचे पेशंट

$
0
0
मागील दोन वर्षांत डेंग्यू आजाराच्या संशयित आणि डेंग्यूची लागण झालेल्या पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०११-१२ या कालावधीत शहरात अवघे १२ पेशंट आढळून आले होते. मागील वर्षी हाच आकडा १३१ पर्यंत पोहोचला तर या वर्षी आतापर्यंत २१२ पेशंट आढळून आले आहेत.

पोट धरून हसवणारे ‘मन वढाय वढाय’

$
0
0
विनोदी अंकाचा बाज जपत ओझरच्या एचएईडब्लूआरसी रंगशाखेने सादर केलेल्या ‘मन वढाय वढाय’ या नाटकाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ५३व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सुनील जाधव लिखित हे नाटक सादर झाले.

मोकळ्या प्लॉटधारकांनी स्वच्छता करावी

$
0
0
मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ज्यांचे प्लॉट मोकळे पडले आहेत, अशांनी प्लॉटमधील गवत, झाडे, झुडपे काढून साफसफाई करून वॉल कंपाऊंड करावे, असे आवाहन मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त अजित जाधव यांनी केले आहे.

‘वसाका’ला घरघर; ऊस उत्पादकांत चिंता

$
0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस क्रशिंग होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ‘कसमादे’मधील ऊस उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

राष्ट्रवादीचा मेळावा स्थगित

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवार, २४ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये होणारा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा स्थगित करण्यात आला आहे.

निकालास खंडपीठाची स्थगिती

$
0
0
पोळ कांदा पिकाच्या उत्पादनासाठी पाण्याची नितांत गरज असल्यामुळे पाटबंधारे विभागाने ओझरखेडमधून त्वरित आवर्तन सोडावे, या मागणीसाठी त्र्यंबक रस्त्यावरील वेद मंदिराजवळ एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

वाडकर फसवणूक; ९ जणांवर गुन्हा

$
0
0
गायक सुरेश वाडकर यांची जमीन व्यवहारात खोट्या दस्तऐवजाद्वारे फसवणूक केल्याच्या आरोपावरून उपनगर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुधारित आराखडा मारक!

$
0
0
श‌िक्षण विभागाने ऑक्टोबर मह‌िन्यात मंजूर केलेल्या पदांबाबतच्या सुधारित आराखड्यामुळे राज्यातील प्रामुख्याने श‌िपाई, ग्रंथपाल आण‌ि प्रयोगशाळा सहाय्यक या श‌िक्षकेतर पदांवर टांगती तलवार आली आहे.

सिंगापूरकरांना भुरळ 'नाशिकची'

$
0
0
नाशिकहून हजारो किलोमीटरवर असलेल्या सिंगापूरकरांना सध्या नाशिक स्टाइलने बनवलेल्या कबाबसह खाकरा व तंदुरमधील विविध डिशेसनी भुरळ घातली आहे. ही अनोखी किमया आहे नाशिकचे हॉटेल व्यावसायिक विक्रम उगले यांची.

काझी गढी कोसळली

$
0
0
जुन्या ना‌शकातल्या काझी गढीतील ३० घरे बुधवारी मध्यरात्री खचली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरे भुईसपाट झाल्याने रहिवाशांचे संसार उघड्यावर आले असून मोठे नुकसान झाले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images