Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दैव बलवत्तर म्हणून बचावले दोघे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील स्टेट बँक नजीक बारा बंगला परिसरात शुक्रवारी दुपारी भरधाव येणारी चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबास जोरदार धडक देत समोर असलेल्या सलून दुकानात खुसल्याने सलून दुकानाचा चेंदामेंदा झाला. दुकान मालक व दाढी करण्यासाठी आलेले गृहस्थ मात्र सुदैवाने बचावले. दोघांना किरकोळ दुखापत झाली. यामुळे बारा बंगला परिसरात मोठी गर्दी झाली होती.
शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्टेट बँकेच्याकडून साठफुटी रोडच्या दिशेने काळ्या रंगांची झायलो कार (एमएच १२ जी. झेड. ६२३८) वाहनचालक रोहित (वय २५ रा. पुणे) हा अत्यंत भरधाव वेगाने चालवत येत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या विजेच्या खांबावर ही गाडी जोरदार धडकली. धडक इतकी जोरदार होती की विजेचा खांब क्षणार्धात कोसळला. त्यानंतरही त्याला गाडीवर ताबा न मिळवता आल्याने समोर असलेल्या सलून टपरीवरीत कार घुसली. तेव्हा दुकानात मालक जयराम चित्ते हे एका गृहस्थची दाढी करीत होते. बेभान वेगाने आलेली ती गाडी टपरीवर जोरदार आदळली. दोघांनी टपरीतून बाहेर उडी घेत स्वतःचा जीव वाचवला.

या जबर धडकेने टपरीचा चेंदामेंदा झाला. तसेच बाजूला उभे असलेली दुकाचाकीचेदेखील नुकसान झाले. काही क्षणात हा भीषण अपघात झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या दोघांना तत्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच छावणी पोल‌िस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालक चालक व मालक यांना ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत छावणी पोल‌िस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कारवाई सुरू होती. मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लष्करी जवानाच्या चिठ्ठीने वाढला संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रकरण हाताबाहेर जाईल असे वाटले नव्हते. मॅडम कपडे धुवायला द्यायच्या इतकेच बोललो. तुम्हाला त्रास देण्याचा उद्देश नव्हता. सर्वांची माफी मागतो. कोर्ट मार्शलपेक्षा मरण परवडले, असे शेवटचे शब्द आहेत देवळाली कॅम्पमधील स्कूल ऑफ आर्टिलरीत आत्महत्या केलेल्या डी. एस. रॉय मॅथ्यू (वय ३५) याचे. मॅथ्यूच्या आत्महत्येमुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रक्षा राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहेत.

स्कूल ऑफ अर्टीलरीतील मॅथ्यू (वय ३५) या जवानाने आत्महत्या केल्याची बाब गुरुवारी दुपारी समोर आली. चालक म्हणून नियुक्ती असलेला मॅथ्यू रॉकेट बॅटरी, बॅचलर बॅरेक येथे राहत होता. डिमोलेशन क्वार्टरमध्ये साधारणतः चार ते पाच दिवसांपूर्वी त्याने गळफास लावून घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी मॅथ्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यात मॅथ्यूने वरिष्ठांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत आवाज उठवल्याचे समोर येत आहे. या व्हिडीओबाबत लष्करात चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे त्याला सतत कारवाईची भीती होती. त्यानंतर तो बेपत्ता होता. तसा रिपोर्ट लष्कराने त्याच्या मूळ गावी केरळ राज्यातील कोल्लम येथील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी मॅथ्यूचा भाऊ जॉन मॅथ्यू याने केली आहे. ज्या व्हिडीओवरून हा प्रकार घडला, त्याच्या खोलात जाऊन आम्ही तपास करणार असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी मटाशी बोलताना सांगितले.

आत्महत्या करणारा जवानाचा कुठल्या तरी साइटवरील स्टिंग आपॅरेशनमध्ये सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी समजते. तेव्हापासून तो अस्वस्थ होता. त्याने त्याच्या व्यथा वरिष्ठांना सांगितल्या नाहीत. २५ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.

- सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या शाहीमार्गावर सर्वाधिक हरकती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहर विकास योजनाच्या हरकती सुनावणी दरम्यान तीन दिवसांत २९० हरकत अर्जांवर सुनावणी झाली. तसेच समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी ६० अर्जदार आलेच नाहीत. एकूण ४०० अर्ज दाखल झाले होते. सर्वाधिक हरकती सूचना शहरातील अंतर्गत रस्ते शाहीमार्ग रुंदीकरणावर घेण्यात आल्या.

शहराच्या विकास आराखड्यावर गेल्या तीन दिवसांपासनू विशेष समितीसमोर हरकतींवर सुनावणी सुरू होती. नागरिकांचे घरे, सार्वजनिक रस्त्यांवर आरक्षण टाकण्यात आल्यामुळे या आराखड्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिंहस्थ पर्वकाळात अवघ्या ७२ तासांचा सोहळा असतो. त्याकरिता नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आणू नका, अशी मागणी बहुतांश नागरिकांकडून करण्यात आली आहे. नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी आलेल्या सम‌ितीने अभिप्राय द्यावयाचा आहे. त्यानंतर नगररचना खाते पुढील अमलंबजावणी करणार आहे. सम‌ितीने काही जागेवर जाऊन पाहणी केली आहे.

नगराध्यक्षांचे आवाहन

सुनावनी दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या मतांचा विचार होईल आणि शासनाकडे पाठपुरावा करून कोणाचेही नुकसान होणार नाही याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. अधिकाध‌िक आरक्षणे शासकीय जागेवरच होतील याकरिता प्रयत्न केले आहेत, असे आवाहन नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी केले आहे.

ग्राहक पंचायत आक्रमक

नागरिकांनी वैयक्त‌िक हरकती घेतल्या तशा सामाज‌िक संघटनांनीदेखील आपले मत नोंदवले आहे. शहरात नागरिकांना नाहक वेठीस धरले जाऊ नये, असे म्हणणे ग्राहक पंचायतीने मांडले आहे. जिल्हा चिटणीस नरेंद्र पेंडोळे, तालुका संघटक अमर सोनवणे यांनी समितीसमोर लेखी सादर केले. यामध्ये शहरात रस्ते रुंदीकरण, नदी पात्राची पूररेषा, पुरातत्व विभागाचे १०० ते ३०० मीटर नियम यामुळे संपूर्ण नागरी जीवन अडचणीत आले आहे. शहराची हजार वर्षाची परंपरा असेली वस्ती उठविण्याची वेळ आणू नका, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांना भरावा लागणार निवडणूक खर्च

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. येत्या एप्रिलच्या अखेरीस या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मनपा प्रशासन तयारीला लागले आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारांचा निवडणूक खर्च भरण्याकरिता ‘ट्रु वोटर’ हे मोबाइल अॅप्लिकेशन वापरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना या अॅप्लिकेशनच्या वापरासंबधी माहिती व्हावी यासाठी येथील शिवाजी टाऊन हॉल येथे शनिवारी (दि. ५) दुपारी तीन वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणूक खर्चाबाबतचा तपशील या अॅप्लिकेशनद्वारे सादर करावा लागणार आहे. यात दैनंदिन निवडणूक खर्च, एकूण निवडणूक खर्च, शपथ पत्र, निधीचे स्त्रोत आदी माहिती सादर करण्यासाठी या अॅपचा वापर करता येणार आहे. उमेदवारांना हा ऑनलाइन खर्च सादर करणे सोपे व्हावे यासाठी ‘ट्रु वोटर’मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवाराने सादर करावयाचा खर्च याच अॅप्सच्या माध्यमातून सादर करावयाचा असल्याने त्या अनुषंगाने सर्व संभाव्य उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी शनिवारी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त जगताप यांनी केले आहे.

उमेदवारांची माहिती एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘ट्रु वोटर’ अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरून मतदारांना डाउनलोड करता येऊ शकते. या अॅपद्वारे आगामी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची शैक्षणिक माहिती, संपत्ती, गुन्हेविषयक नोंदी तसेच निवडणुकीच्या दैनंदिन खर्च सहज पाहता येईल. तसेच त्यावर हरकत देखील घेता येणार आहे. सोबतच मतदारांना आपले मतदार यादीतील नावदेखील या अॅपद्वारे शोधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बळीराम शिंदेचा जेलमध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान व अनैसर्गिकरीत्या गर्भपात करण्याच्या आरोपाखाली नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला डॉ. बळीराम निंबा शिंदे (वय ५३) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. डॉ. शिंदे याच्या अचानक झालेल्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, त्याच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. डॉ. शिंदेचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे कारागृह प्रशासनाने कारागृह रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले. त्यामुळे डॉ. शिंदेचा मृत्यू हा आत्महत्या असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

डॉ. बळीराम शिंदे याला बेकायदा व अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केल्याच्या आरोपाखाली मुंबई नाका पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात डॉ. शिंदे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने २८ फेब्रुवारी रोजी त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. डॉ. शिंदे याने अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्हाभरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. डॉ. शिंदे याला नाशिकरोड कारागृहात येऊन अवघे तीनच दिवस झाले होते.

रात्री १.४० ला मृत्यू

डॉ. शिंदे याची तब्येत गुरुवारी रात्री दीड वाजेच्या दरम्यान अचानक बिघडली. त्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. आर. ससाणे यांनी त्याला रात्री १.४० वाजता मृत घोषित केले. तशी माहिती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली असून, नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

धुळ्यात शवविच्छेदन

कारागृहात डॉ. शिंदे याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाने त्याच्या पुतण्यास तातडीने दिली. डॉ. शिंदे याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धुळे येथील गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच डॉ. शिंदे याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरातील घंटागाड्यांना जीपीएस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

‍नगर परिषदेच्यावतीने स्वच्छ व सुंदर सटाणा शहाराची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शहरातील नववसाहतीतील वाढलेले झुडपे, गवत काढून मैदाने व भूखंड स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील घंटा गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

निवडणुकीत दिलेल्या वचनाचा शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यात प्रभाग एक आणि तीनमधील कामांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोरे म्हणाले, स्वच्छ व सुंदर सटाणा शहराची संकल्पना ही पूर्णतः साकार करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील नागरिकांची देखील आम्हास मदत लागणार आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रत्येक घरनिहाय शौचालयांच्या पाइपांना जाळी बसविण्यात येणार आहे. गटारींची स्वच्छता करण्यात येवून वाहत्या गटारी करण्यात येतील. घरातील कचरा, घाण वाहून नेण्यासाठी घंटागाडी कार्यरत असली तरीही प्रशासनाकडून आगामी काळात या गाड्यांना जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. नागरिकांची तक्रार आल्यास हे अ‍ॅप मदत करेल असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, शहर विकास आघाडीचे गटनेते संदीप सोनवणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिज‌िधन मेळ्यात इंटरनेट गायब!

$
0
0

नाशिकः देशातील ६७वा डिज‌िधन मेळा पार पडल्याचा सुस्कारा जिल्हा प्रशासनाने सोडला असला तरी, प्रत्यक्षात या मेळ्यामध्ये इंटरनेटचेच धन गायब असल्याची बाब पुढे आली आहे. इंटरनेट कनेक्शनअभावी मेळ्याच्या ठिकाणी अनेक व्यवहार आणि सादरीकरणही होऊ शकले नाहीत. तर अनेक नागरिकांना कॅशलेस कारभार कसा करायचा याची माहितीही प्राप्त झाली नाही. त्यामुळे नाशिकमधील मेळ्याची हेतूपूर्तीच झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नागरिकांनी कॅशलेस व्यवहारांकडे वळावे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी, या उद्देशाने नीती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार देशभरामध्ये डिज‌िधन मेळे आयोजित केले जात आहेत. त्यानुसारच ६७वा डिज‌िधन मेळा नाशिक जिल्हा प्रशासनानेही आयोजित केला. ठक्कर डोम येथे होणाऱ्या या मेळ्यासाठी दोन केंद्रीय राज्यमंत्रीही आले. नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्रीही उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी स्टॉलधारकांना सर्वाधिक क्षमतेचे इंटरनेट कनेक्शन आणि भेट देणाऱ्यांना मोफत वायफाय अशी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निश्चय आयोजकांनी केला होता. तशी घोषणाही केली. प्रत्यक्षात मोफत वायफाय तर सोडाच पण याठिकाणी साधे इंटरनेट कनेक्शनही स्टॉलधारकांना लाभू शकले नाही.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेळ्याच्या ठिकाणी मोफत फोरजी इंटरनेट आणि वायफाय सेवा देण्याची तयारी एका टेलिकॉम कंपनीने दर्शविली. मात्र, जिल्हा प्रशासनाने अन्य टेलिकॉम कंपनीची त्यासाठी निवड केली. कंपनीच्यावतीने मेळ्याच्या ठिकाणी १८ राऊटर्स लावण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणास्तव इंटरनेट कनेक्शन बंद झाले. याठिकाणी दोन्ही कंपन्यांचे प्रत्येकी १८ राऊटर्स लावले तर त्याचा अधिक फायदा होईल, असे जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले होते. त्याकडे काणाडोळा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवे सहावर कामबंद पाडणार

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा सरकारने योग्यरितीने दिला नसल्याचे वृत्त ‘मटा’ने दि. २८ फेब्रूवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामार्गालगत चौपदरीकरणासाठी भूसंपादन जमीन केलेल्या जमिनीचे मालक व शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला न मिळाल्याने शेतकरी दि. २४ मार्चपासून कामबंद पाडणार असून त्याठिकाणी कुटुंबासह बेमुदत आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यानंतर अखेर ‘मटा’चे भाकित खरे ठरले असून, शेतकऱ्यांनी नवापूर ते धुळे तालुक्यातील मुकटीपर्यंतच्या तब्बल साठ गावांतील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची सविस्तर माहिती तालुक्यातील संग्राम पाटील व शिष्टमंडळाने ‘मटा’शी बोलताना दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्यालगत जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून सरकारकडून मोबदला देण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी जमीन भूसंपादित करण्यात आल्या त्यानुसार काही शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला एकपट मिळाला. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला नवीन कायद्यानुसार चारपट देण्यात आला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला न देता शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रिय रस्ते विकास व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. याप्रसंगी संग्राम पाटील, शामकांत शिंदे, शेतकरी संघटनेचे बाळू सोनवणे, गोकूळ खिवसरा, संजय शिंदे, फकिरा चौधरी, पंकज खैरनार, विलास पाटील उपस्थित होते.



पोलिस कारवाईस सामोरे जाण्यास तयार

जवळपास १५० किलोमिटरच्या अंतरावरील ६० ते ७० छोटे-मोठ्या गावातील शेतकरी कुटुंबासह ज्या-ज्या ठिकाणी महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी शेतकरी कुटुंबासह आंदोलनाला बसणार आहेत. आंदोलनात काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही वाहन न अडवत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये ज्याठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत त्याठिकाणीच आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. पोलिस कारवाई जरी झाली तरी त्यास सामोरे जाण्यास शेतकऱ्यांची तयारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा वसतोय भंगार बाजार...

$
0
0

महापालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी; मोहीम केवळ नावालाच

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने मोठ्या अथक प्रयत्नानंतर सातपूर अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटवला आहे. परंतु, भंगार बाजार हटविल्यावर पुन्हा भंगाराची दुकाने वसली आहेत. यामुळे अनधिकृत भंगार बाजार हटवला असताना पुन्हा भंगाराची दुकाने जैसे थे कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्वतः याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींच्या अगदी मध्यभागी भंगार बाजाराची दुकाने थाटली होती. ही दुकाने अंबड-लिंकरोडवर होताना बोटावर मोजण्याइतकीच संख्या होती. परंतु, कालांतराने शेकडोच्या घरात भंगाराची दुकाने झाली. यानंतर भंगार बाजारात अनेक व्यवसायच सुरू झाले होते. त्यातच तब्बल तीस वर्षांपासून अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत कारवाई सुरू झाली. महापालिकेनेदेखील अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत आदेशीत केले होते.

महापालिका आयुक्त कृष्णा यांनी पोलिसांची मदत घेत भंगार बाजाराचे अतिक्रमण जमीनदोस्त केले होते. परंतु, अनधिकृत भंगार बाजार हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी उभा राहत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

रहिवाशी भागासाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी पुन्हा भंगार बाजार जैसे थे कसा, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविल्यानंतर दुकाने थाटलेल्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शेड उभारणीचे कामे जोरात

अनधिकृत हटविण्यात आलेल्या भंगार बाजारात पुन्हा शेड उभारणीचे कामे जोरावर असल्याचे पाहायला मिळत आहे. जागेची मोजणी केल्यावर महापालिकेच्या नगररचना

विभागाकडून परवानगी भंगार व्यावसायिकाला दिली जाणार आहे. त्यातच रहिवाशी असलेल्या जागेवर भंगाराचे दुकान नसणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले गेले आहे. असे असतानाही हटविण्यात आलेल्या भंगार बाजाराच्या जागेवर पुन्हा शेडची उभारणी कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे हटविण्यात आलेल्या भंगार बाजाराची अतिक्रमण मोहीम केवळ नावालाच का असाही प्रश्न निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत नविन घंटागाड्या दाखल झाल्यानंतर किमान वेतनही कर्मचाऱ्यांना लागू झाले होते. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली होती. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत ‘मटा’ने लक्ष वेधल्यानंतर महापालिका ठेकेदाराने तात्काळ शनिवारी (दि. ४) १ महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना अदा केला आहे. उर्वरित दोन महिन्यांचा पगारदेखील लवकर ठेकेदार देणार असल्याचे घंटागाडी कामगार संघटनेचे म्हणणे आहे. परंतु, अति महत्त्वाची सेवा करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिकेने वेळेवर अदा करावे, अशी सार्थ अपेक्षा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

‘घंटागाडी येता घरा कचरा टाका भरा-भरा’ असे ब्रीदवाक्य घेत महापालिकेने यशस्वीरित्या घंटागाडीची अभिनव योजना राबविली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून घंटागाड्याच नादुरूस्त झाल्याने महापालिकेने नवीन घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. या घंटागाड्यांनादेखील मुहूर्त लागायला उशीर झाल्याने त्याचा रोष नगरसेवक व अधिकाऱ्यांना सहन करावा लागला. आता घंटागाड्या सुरळीत सुरू झाल्या असताना घंटागाडी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतनच ठेकेदाराने दिले नसल्याने उपासमारीचे संकट ओढवले होते.

काही दिवसांपूर्वी ‘मटा’ने कैफियत मांडली होती. यानंतर यंत्रणा जागी होत ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले.

ठेकेदाराने शनिवारी, एक महिन्याचे वेतन घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकल्याने सर्व कामगारांनी ‘मटा’चे आभार मानले. उर्वरित दोन महिन्यांचे वेतन लवकरच देण्यात येणार असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. गल्लीबोळात जाऊन वेळेवर रहिवाशांचा कचरा गोळा करणाऱ्या अतिमहत्त्वाची सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा करावे, अशी अपेक्षाही

त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांनी अर्जांसाठी शनिवारची सुटी घालवली रांगेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला शनिवारी सुट्टी असल्याने सिडको व सातपूर महापालिकेच्या कार्यालयात कामगारांची घरकुलाचे अर्ज घेण्यासाठी तोबा गर्दी वाढली होती. शनिवारी (दि. ४) सुट्टीने अर्ज घेताना महापालिकेच्या कार्यालयात रांगा लागल्या होत्या. उन्हात उभे राहत कामगारांनी अर्ज घेण्यासाठी धडपड सुरू होती.

एकीकडे महापालिका पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज ग्राहकांना देताना दुसरीकडे अनेकांनी महा ई-सेवा केंद्रावर ऑनलाइन घरकुलांच्या अर्जांची नोंदणी केली आहे. यामुळे साहजिकच ज्यांनी घरकुलांची नोंदणी केली असेल त्यांना अतिरिक्त २० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. याबाबत महापालिकेने जनजागृती करावी, अशी अपेक्षा महा ई-सेवा केंद्र चालकांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातच ही योजना लागू केली होती. यानंतर गरजूंनी तसेच महिलांनी महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी केली होती. यामध्ये केंद्रांकडून तब्बल दोन लाख घरकुलांच्या अर्जांची नोंदणी केली असल्याचे ‘मटा’ला सांगितले होते. परंतु, यानंतर गेल्या चार दिवसांपासून महापालिकेनेदेखील पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज सहा विभागात विक्रीसाठी ठेवले. यामुळे महापालिकेच्या सहाही विभागात अर्ज घेण्यासाठी गर्दी झालेली पहायला मिळाली. त्यातच शनिवार हा औद्योगिक कामगारांचा सुट्टीचा दिवस असतो. सिडको व सातपूर भागात बहुतांश कामगार भाड्याने खोली घेऊन राहत असतात. सुट्टीचा दिवस असल्याने या भागातीन महापालिका कार्यालयांमध्ये घरकुलांचे अर्ज घेण्यासाठी कामगारांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.


पंचवटीत रेटारेटी, झुंबड

पंचवटी : पंतप्रधान आवास योजनेअर्तंगत पंचवटी विभागीय कार्यालयात अर्ज घेण्यासाठी शनिवारीही प्रचंड गर्दी झाली. अर्ज घेण्यासाठी बेशिस्तपणे केलेल्या रांगांमुळे अडचणी येत होत्या. महिलांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्यामुळे नेमकी रांग कोणती आहे हे कळत नव्हते. रेटारेटी व धक्काबुक्की मुळे अर्ज वितरण करण्याच्या कामाला अडचणी येत होत्या. व्यवस्थित रांगा लावण्यात आल्या तर अर्ज वितरण सोपे होईल असे वारंवार सांगूनही महिला ऐकत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे अर्ज मिळण्यास विलंब होत होता.

या योजनेअंतर्गत मोफत घरकुले मिळणार असल्याची अफवा पसरली असल्याने अर्ज मिळाला म्हणजे घर मिळाले असा अनेक झोपडपट्टीवासीयांचा समज झालेला आहे. त्यामुळे घाईघाईत कोणत्याही प्रकारे अर्ज मिळविण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली आहे. विभागीय कार्यालयात या रांगा व्यवस्थित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी लावलेले असतानाही त्यांनाही महिला दाद देत नसल्याचे दिसत होते. लांबवर लागलेल्या अस्ताव्यस्त रांगामुळे अर्ज मिळणे मुश्किल होत होते. गडबड, रेटारेटी, आरडाओरडा, वादविवाद यांच्यामुळे गोंधळ वाढत होता. पुरुषांची रांग शिस्तबद्धपणे असल्याने त्यांच्या अर्ज वितरणाचे काम सोपे झाले होते. सकाळपासून उपाशी रांगांमध्ये असलेल्या महिला आणि पुरुष तसेच त्यांच्यासोबत असलेली लहान मुले तहान व भूकेने कासाविस होत होते. पाववडे विक्रेते त्यांची भूक भागविण्याचे काम करीत होते.

महिलांचा उत्साह

सिन्नर फाटा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी सर्वेक्षण मागणी अर्ज खरेदीसाठी शनिवारीही मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी, ४०० अर्जांची विक्री झाल्याने नाशिकरोड कार्यालयातून आतापर्यंत नेलेल्या अर्जांची संख्या १४६५ वर पोहचली आहे. शनिवारी दिवसभर अर्ज घेण्यासाठी महिला रांगेत उभ्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी १३७ कोटी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटीसाठी पहिला हफ्ता महापालिकेला आता मिळणार आहे. केंद्र सरकारने आपल्या हिश्श्यातील ९० कोटी आणि राज्य सरकारने ४५ कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हा निधी आता नाशिक म्युनसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीच्या कामांचा श्रीगणेशा होणार आहे. दरम्यान, महापालिकेला आपल्या हिश्श्यातील ४५ कोटी रुपये मार्चपर्यंत उभे करावे लागणार आहेत. सध्या आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा निधी उभे करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकची निवड झाली होती. या निवडीमुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार होती. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्ही ही स्थापन करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी निधीची प्रतीक्षा असल्याने पाच महिन्यांपासून कामकाज ठप्प होते. महापालिका निवडणुका संपताच केंद्र व राज्य सरकारने स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी निधी रिलीज केला आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील आपल्या हिश्श्यातील ९० कोटी, तर राज्य सरकारचा ४५ कोटींचा हिस्सा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजासाठी दोन कोटींचा निधीही वितरित केला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी पालिकेला तब्बल १३७ कोटी रुपये मिळणार असून, स्मार्ट सिटीच्या विकासकामांचा श्रीगणेशा होणार आहे. हा निधी फक्त स्मार्ट सिटीच्या कामांसाठी वापरावा लागणार आहे. हा निधी स्मार्ट सिटी वगळता अन्य कामांसाठी वापरला, तर थेट आयुक्तांवरच कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.

४५ कोटींची कसोटी

दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने आपला हिस्सा दिल्यानंतर महापालिकेलाही आपला ४५ कोटी रुपयांचा हिस्सा मार्चपर्यंत जमा करावा लागणार आहे. मात्र, सध्याची पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यातच विविध योजनांचा भारही महापालिकेवर असून, ४५ कोटी रुपये ३१ मार्चपर्यंत उभे करण्यासाठी पालिकेची कसोटी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगट अधिक सक्षम करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ई-पोर्टलच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच बचतगटांसाठी विभागीय आणि फिरत्या विक्री केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढीत तीन वर्षांत राज्याच्या प्रत्येक घरात एक तरी सदस्या महिला बचतगटाची सदस्य असेल. महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असून, बचतगटांच्या सक्षमीकरणाचे कार्य सातत्याने करत राहणार आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्रीला प्रशिक्षित करून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांतर्फे विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचतसमूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव, तसेच विभागीय महिला मेळावा शनिवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर झाला. त्याचे उद््घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, की आतापर्यंत महिलांनी बचतगटासांठी घेतलेले एकही कर्ज बुडवले नाही. त्याची त्यांनी परतफेड केली. त्यामुळे शून्य व्याजदराची योजना सरकारने सुरू केली असून, त्यालाही प्रतिसाद मिळत आहे. बचत गटासाठी असलेल्या महिलांच्या हातात बांगडी असली तरी मनगट बळकट आहे. पायात पैंजण असले तरी तिचे पाऊल प्रगतीकडे जाण्यासाठी तिला सर्वांनी मदत केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये आता कॅशलेस दान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आता कॅशलेस दान करता येणार आहे. ऑनलाइन देणगीची सुविधा यापूर्वीच सुरू करण्यात आली असून, मंदिरात आता शनिवारपासून ई-हुंडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते या ई-हुंडीचे उद््घाटन झाले. भट्टाचार्य यांनी स्वतःचे डेबिट कार्ड स्वाइप करून १०१ रुपये देवस्थानला देणगी म्हणून दिले व त्याची प्रिंटेड पावती घेतली.

एसबीआयचे चीफ जनरल मॅनेजर दीपनकर बोस, जनरल मॅनेजर सलानी नारायण, तसेच इतर अधिकारी आणि त्र्यंबकेश्वर शाखेच्या प्रमुख सीमा पहाडी या वेळी उपस्थित होत्या. मंदिराचे विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, जयंतराव शिखरे, व्यवस्थापक राजाभाऊ जोशी, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य उपस्थित होते. पाचोरकर यांनी मंदिरास कॅश डिपॉझिट मशिन मिळावे म्हणून मागणी केली होती. तांत्रिक कारणास्तव ते मिळाले नाही. मात्र ई-हुंडी देण्यात आली. येथे दोन स्वाइप मशिन दोन वर्षांपासून देणगी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहेत. ऑनलाइन देणगी अकाऊंटदेखील यापूर्वीच सुरू झाले असल्याचे पाचोरकर यांनी सांगितले. सर्व अभ्यागतांचे स्वागत अॅड. श्रीकांत गायधनी आणि विश्वस्तांनी केले.

ग्रामीण भागात कनेक्टीव्हिटी हवी

भट्टाचार्य यांच्याशी संवाद साधला असता, ग्रामीण भागात कॅशेलस होण्यासाठी अगोदर कनेक्टीव्हिटी हवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये डिपॉझिट वाढले आहे. ते कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ते सेव्हिंग खात्याकडे अधिक वर्ग होत असल्याने व्याजासह सर्वच खर्च वाढत असल्याने बँका अडचणीत येत आहेत. ट्रांझॅक्शन चार्जेस आकारावे लागतील. कारण खर्च वाढतो आहे. सरकार नोटा छापणे, त्या वितरित करणे या करिता मोठ्या प्रमाणात खर्च करत असते. हा खर्च ई बँकिंग, कॅशलेस यामुळे कमी होणार आहे. त्यामधून बँकांना सहाय्य मिळाल्यास ग्राहकावरील बोजा टळू शकतो.

बँकांचे एकत्रीकरण अपरिहार्य

बँकांचे एकत्रीकरण आता अपरिहार्य ठरले आहे. बँकांच्या एकत्रीकरणाने अधिक चांगल्या सुविधा देता येणार आहेत. सर्व ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना आपल्या बँकेत सामावले जाईल व त्यांना सुविधा देण्यात येणार आहेत. नव्याने बँकेशी जोडले जाणारे ग्राहक आणि कर्मचारी यांना आपण बाहेरून आलेलो नाही तर एकाच परिवारातील आहोत, अशा प्रकारे सेवासुविधा मिळतील, याची खात्री भट्टाचार्य यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपी साहेब, एक झटका द्याच!

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

‘‘सीपी साहेब, कर्तव्यदक्ष कप्तान अशी तुमच्याबद्दलची प्रतिमा आम्ही अंतःकरणात जपली आहे. आमचा वाढदिवस तुम्हीच आपुलकीने साजरा केलात. तुमच्यामुळेच आम्हाला कुटुंबासह चित्रपट पाहता आला. म्हणूनच तुमच्यातील मानवतेला आमचा सॅल्युट. साहेब, पोलिस दलातील काही महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे तेच ते कर्मचारी गोचिडासारखे चिकटून आहेत. पैशाचा माज आणि पोलिस असल्याची मस्ती त्यांच्या डोक्यात भिणलीय. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होऊन प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास ढेपाळतोय. साहेब, अशा कर्मचाऱ्यांना एक झटका द्याच... ’’ वर्षानुवर्षे साकळलेली ही मनातली खदखद पोलिस कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे व्यक्त केलीय थेट पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडे.

राज्य पोलिस दलातील दमदार वरिष्ठ अधिकारी म्हणून सिंघल यांची ख्याती आहे. शहरात जनरल ड्युटी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी थेट त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडले आहे. एरवी पीएसआयसह सर्वच वरिष्ठांच्या आदेशाला झुकणाऱ्या ‍बापुड्या कर्मचाऱ्यांना अन्याय आता असह्य होऊ लागला आहे. म्हणूनच त्यांनी थेट सीपी साहेबांकडे गाऱ्हाणे मांडण्याची पहिल्यांदाच हिंमत केली आहे.

पोलिस आयुक्तांसारखा वजनदार अधिकारी आपल्या तक्रारींकडे कशासाठी लक्ष देईल, अशी साशंकता असल्याने कर्मचारी आतापर्यंत निमूटपणे अन्याय सहन करीत राहिले. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था होती. मात्र, कर्मचाऱ्यांना सिंघल यांच्यात अन्याय दूर करणारा आशेचा किरण दिसू लागला आहे. वर्षानुवर्षे मलईदार कामांवरच ताव मारणाऱ्या आणि अधिकाऱ्यांचे कान आणि खिसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांची या पत्रातून पोलखोल करण्यात आली आहे. पोलिस दलात प्रामाणिक, कार्यतत्पर आणि जिगरबाज पोलिस कर्मचाऱ्यांची कमी नाही. ते न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची जाणीव सिंघल यांना करून देण्यात आली आहे.

क्राइम राइटर, हजेरी मास्तर, ठाणे अंमलदार, डीबी कर्मचारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे राइटर, बीट मार्शल अशा विशिष्ट जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वर्षानुवर्षे गोंजारण्याचे काम शहरात सुरू आहे. त्यांची लवकर बदलीच होत नाही. झालीच तरी तेथेही त्यांना सुभेदारीच मिळते. यातून अन्य कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखविला जात असल्याची खंत पत्रातून व्यक्त झाली आहे. मुख्यालयातील तीन आणि तांत्रिक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांवर सरकारवाडा आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अलीकडेच गुन्हे दाखल झाले. डोक्यात पैशांची हवा गेल्याने काही कर्मचाऱ्यांना माज आला असून, त्यामुळेच पोलिसांच्या हातून गंभीर गुन्हे घडतात हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न पत्रातून करण्यात आला आहे. चमचेगिरी करणारे आणि त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक झटका द्याच अशी विनंती नाराज कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आता विश्वासाला जागण्याची वेळ

पोलिस कर्मचाऱ्यांप्रती सिंघल यांनी नेहमीच आपुलकी जपली. कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चित्रपट दाखविणे, नववर्ष सेलिब्रेशन असो किंवा आरोग्य तपासणी त्यांनी विधायक उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे मलाईदार खुर्च्यांवर बसणारे, तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सणसणीत पत्र लिहिण्याचे धाडस या कर्मचाऱ्यांनी दाखविले आहे. सिंघल ही तक्रार गांभीर्याने घेणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकची द्राक्षं आता आंब्यांच्या चवीची!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नाशिक

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील आशावादी गावातील सुभाष तिडके यांच्या शेतातील द्राक्षांना चक्क आंब्यांचा सुगंध येतो. झाडावर पिकलेली द्राक्ष कापणीयोग्य झाली की, त्यातून आंब्यांचा सुगंध येऊ लागतो.

द्राक्षाची नव्या पद्धतीने लागवड केलेले तिडके सांगतात, 'आंब्याच्या चवीच्या द्राक्षांच्या वाइनयार्डमधून जाताना आपण आमराईतूनच जात असल्यासारखे वाटते. द्राक्षांचा सुगंध जसा आंब्यासारखा येतो, तशी त्यांची चवही नेहमीपेक्षा वेगळी आहे. आपण आंबाच खात असल्यासारखे वाटते. जेव्हा द्राक्षे चांगली पिकतात तेव्हा आंब्याचा सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळू लागतो.'

२०१२ मध्ये पुण्यातील राष्ट्रीय संशोधन केंद्रामध्ये शेतीसंशोधकांनी आंब्यांच्या स्वादाच्या द्राक्षाचे मिश्रीत रोप तयार करून त्याची लागवड केली होती. त्यानंतर या पीकाला फळे येईपर्यंत ४ वर्षे लागली. २०१६ मध्ये संशोधकांना यश आले.

यंदा हे लागवडीचे दुसरे वर्ष असून आपल्याकडे आंब्यांच्या स्वादाच्या द्राक्षांचे ५० झाडे असून आणि द्राक्षांच्या मोसमात सुमारे १०० किलो द्राक्षांचे उत्पादन होत असल्याचे तिडके सांगतात. या द्राक्षांना मुंबई, पुणे, अहमदाबाद शहरांमधील मॉल्समधून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचेही ते सांगतात.

सामान्य द्राक्षांचा आकार १८ मीमी असतो पण ही द्राक्षे तुलनेने छोटी असून ८ मीमी आकाराची ती असतात. बाजारात बिया नसलेल्या द्राक्षांना अधिक मागणी असली तरी बिया असलेली द्राक्षे जास्त पौष्टिक असतात. यात आंब्यांच्या स्वादाच्या द्राक्षांमध्ये तर अधिकच पोषकतत्त्वे असतात. या द्राक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड आणि विपणन केले गेले तर ती खूप प्रसिद्ध होऊ शकतात. त्यादृष्टीने लागवड क्षेत्र वाढविण्याचा तिडकेंचा मानस आहे.

राष्ट्रीय संशोधन केंद्रातील द्राक्षांचे संशोधक एस.सावंत सांगतात, 'आंब्यांच्या स्वादाची ही द्राक्षे हिमाचल प्रदेशच्या किन्नूर येथील 'ग्रेप रिसर्च सेंटर ऑफ अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी'तून आमच्याकडे आली. ही द्राक्षं मूळची युरोपातील आहेत. विशेषतः वाइन बनविण्यासाठीच उपयोग केल्या जाणाऱ्या या द्राक्षांना अलफोन्सो लॅवेली म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सॅनिटरी नॅपकिन विक्रीचा प्रस्ताव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या वापरात वाढ व्हावी यासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी अस्मिता योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. बचतगटांच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र असावे, यासाठी विभागीय पातळीवर त्याचे एक मॉडेल नागपूरला प्रायोगिक तत्त्वावर उभारले जाणार असून, त्यानंतर राज्यात सर्वच विभागात ते उभारले जातील. त्याचप्रमाणे या वस्तूंची विक्री करण्यासाठी चीनसारखे कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बचतगटासाठी असलेल्या आपल्या आगामी योजना सांगितल्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांतर्फे विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचतसमूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव, तसेच विभागीय महिला मेळावा शनिवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर झाला. त्याचे उद््घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, उत्तर महाराष्ट्राचे विभागीय महिला मेळाव्यासाठी २५ हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ३ मार्चपासून सुरू झालेल्या बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीमहोत्सव १० मार्चपर्यंत असणार आहे. बचतगटांना व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तर विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी, नाशिक विभागात वीस हजारांपेक्षा जास्त बचतगट असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीनामा सत्रातील मंत्री आले एकत्र

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समितीत मंत्र्यांच्याच मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाकडे राजीनामा देणारे ग्रामविकास खात्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे व राज्यमंत्री दादा भुसे हे बचत गटाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकला एकत्र आले होते. दोन्ही मंत्र्याचे पक्ष वेगवेगळे पण खाते एकच असल्यामुळे त्यांनी बचावात्मक पवित्रा घेत राजकीय भाष्य टाळले.

ग्रामविकास खात्याशी निगडीत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत या नेत्यांना यश मिळणे अपेक्षित असतांना त्यांच्या पक्षाला मात्र पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हे नेते कमालीचे नाराज झाले व

त्यांनी थेट राजीनामा देण्याची घोषणा केली. पण पक्षाने त्यांचे राजीनामे स्विकारले नाही. दोन्ही मंत्र्यांनी शनिवारी डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर हजेरी लावली व कानात गुजगोष्टी केल्या. आता या कानातल्या गोष्टी आपल्या खात्याबद्दल होत्या की शिवसेना-भाजपाच्या सुरु असलेल्या

तणावाबद्दल हे मात्र गुलदस्त्यातच राहिले असले तरी या गुजगोष्टीमुळे कार्यकर्त्यांमध्ये व उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

परळी नगरपरिषदेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीत पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे पंकजा मुंडे कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. विशेष म्हणजे या पराभवापेक्षा धनजंय मुंडे वरचढ ठरल्यामुळे ते त्यांना जिव्हारी लागले होते. तर दादा भुसेंना सुध्दा त्यांचे राजकीय विरोधक असलेले हिरेंचे समर्थक भाजपाच्या साथीने जिंकल्यामुळे ते सुध्दा अस्वस्थ होते. पण नाशिकच्या मेळाव्यात जमलेली गर्दी बघून दोघेही समदु:खी मात्र हरखून गेले.

युतीतील तणावाबाबत बोलणे टाळले

पंकजा मुंडे व दादा भुसे यांनी जाहीर कार्यक्रमात कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. त्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषदेतही त्यावर बोलणे टाळले. पत्रकारांनी त्यांना शिवसेना- भाजपाच्या तणावाबद्दल विचारल्यानंतर त्यांनी कोअर कमिटी निर्णय घेईल. वरिष्ठ नेते बोलतील, असे सांगून वेळ मारुन नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटाच्या उत्पादनांची भूरळ

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर आयोजित केलेल्या महिला बचत गटांच्या महोत्सवात उत्तर महाराष्ट्रातल्या विभागाच्या पाचही जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या बचत गटांतील महिलांनी विक्रीसाठी अनेक वस्तू ठेवल्या आहेत. पाच मोठ्या मंडपात विभागलेल्या या प्रदर्शनात २५० स्टॉल्सची जिल्हानिहाय उभारणी करण्यात आली आहे. लोणचे, पापड, ढोकळा, डोसा आदी पीठ, हातसडीचे तांदूळ, मूग, मटकीसारखे कडधान्यच एवढेच नव्हे तर कपडे, पर्स, चपला आदी साहित्य देखील इथे विक्रीला आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडी वस्तू, दैनंदिन विविध पदार्थ, कपडे आदी खरेदी करण्याची संधीदेखील नागरिकांना आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी शासकीय विभागाच्या स्टॉल्सद्वारे विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.

राज्य ग्रमीण जीवनोन्नती अभियानांतर्गत डोंगरे वसतीगृह मैदान येथे १० मार्चपर्यंत विभागीय बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी आलेल्या बचतगटांमधील महिला सदस्यांमध्ये दिसणारा आत्मविश्वास त्यांचा आर्थिक प्रगतीचा आलेख दर्शवणारा होता. उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून

आलेल्या या महिलांनी बनवून विक्रीसाठी आणलेल्या वस्तू महत्त्वपूर्ण होत्या.

दैनंदिन वापरामधील पदार्थ आणि वस्तूंना विक्रीसाठी ठेवताना गुणात्मक दर्जा आणि कलाकुसरीद्वारे हे प्रदर्शनात सहभागी बचतगट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक प्रगतीची संधी उपलब्ध झाली आहे. खरेदीदारांसाठी ‘पॉस’ मशीन सुविधा, पेटीएमचा वापर करता येईल, असेही येथे स्टॉल आहेत. नाशिकसह मुंबई, नागपूर, पुणे, नंदूरबार, अहमदनगर अशा ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये भाग घेणाऱ्यांनी येथे स्टॉल लावले आहेत.


सेंद्रीय गूळला मागणी

सेंद्रीय गूळही येथे विक्रीला असून, दुधाची साय, एरंड तेल यांचा गूळ बनवण्यासाठी वापर केला जातो पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर होत नसल्याने लोक मोठ्या आवडीने हा गूळ घेत असल्याचे पहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधांतून हमालाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांच्या बाजारात साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत हमालीचे काम करणाऱ्या दीपक दगडू अहिरे (वय २८) या युवकाचा शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खून झाला. बाजार समितीच्या दक्षिणेच्या प्रवेशव्दाराजवळील न्यू उत्तम हिरा या हॉटेलच्या समोर ही घटना घडली. त्याच्या डोक्यात, पाठीवर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झालेला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
विडी कामगार नगरजवळील निलगिरी बाग येथील घरकुलात राहणारे दीपक अहिरे हा रोजच्याप्रमाणे शनिवारी रात्री बाजार समितीतील पालेभाज्यांच्या लिलावानंतरचे हमालीचे काम आटोपून त्याच्या पल्सर (एमएच-१५, सीएच- ६३७३) मोटारसायकलवरून बाहेर जात असताना एकाशी बोलण्यासाठी थांबला. त्यावेळी चार जण तेथे आले. त्यातील एकाने दीपकच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि दुसऱ्यांनी त्याच्या पाठीत, डोक्यावर आणि पोटावर धारधार शस्त्राने वार केले. पाठीत आणि पोटात एकाचवेळी झालेल्या वारामुळे दीपक खाली कोसळला. तो खाली पडताच हल्ला करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दीपकचे वडील दगडू तोलाराम अहिरे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. चार ते पाच जणांनी मिळून हा हल्ला केल्याचा अंदाज असून, तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images