Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हतबल शेतकऱ्याने जाळला अडीच एकर कांदा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कांद्याने नोटाबंदीचा फटका काळ्या पैसेवाल्यांऐवजी सामान्य शेतकऱ्यांना बसल्यानंतर आता कांद्याच्या घसरत्या भावाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा विक्री झाला तरी त्याचे चेक बँकेमध्ये महिना-महिना वटत नाही. त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या नगरसूल येथील शेतकऱ्याने पाच एकरवरील कांदा जाळला. कांदा काढण्यासाठी पैसे नाही आणि तो काढला तरी मजुराला द्यावे लागणारे पैसेही या पिकातून मिळत नसल्याच्या उद्विग्नतेतून त्याने हा निर्णय घेतल्याचे वास्तव समोर आले आहे.

नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पाच एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती. नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनटंचाईचा फटका त्याच्यासह अनेक शेतकऱ्यांना बसला. पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांनी त्यातील अडीच एकर कांदे सोडून दिले. उर्वरित अडीच एकर कांद्याचे उत्पादन करूनही त्याचा उत्पादन खर्च तर सोडा, साधा काढणी व बाजारात नेण्याचा खर्चही कांदा विक्रीत पुरा होऊ शकत नसल्याने त्यांनी हे पीकच जाळण्याचा निर्णय घेतला. आधीच वाळून पक्व झालेल्या कांद्याच्या पातीवर उसाचे पाचट पसरवून त्यांनी हा तयार कांदा जाळला. सरकारकडे विविध संघटना व बाजार समित्यांनी या प्रश्नावर वेळोवळी उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र, सरकारने या प्रश्नाकडे डोळेझाक करीत दुर्लक्ष केले. आता शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. कांद्यावर खर्च अडीच-तीन लाख रुपये झाला. त्यात काढणीचा खर्च पन्नास हजार रुपये. एवढे करूनही मार्केटमध्ये कांद्याला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे, असे डोंगरे यांनी सांगितले.

मी पाच एकर कांदे लावले होते. नोटाबंदीचा फटका बसल्याने त्यातले निम्मे कांदे सोडून दिले. माझे आज रोजी शंभर टक्के माल काढणीवर आला आहे. कांद्यावर माझा अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, मार्केटमध्ये त्याचे ६० हजार रुपयेसुद्धा मिळणार नाही. शेतमजुराला देण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत. मग या कांद्याचे मी काय करू?

- कृष्णा डोंगरे, शेतकरी, नगरसूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांगुर्डे की कुटे? प्रभाग १२ ड मध्ये रंगतदार लढत

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांना टक्कर देण्यासाठी अन्य पक्षांबरोबरच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक शैलेश कुटे यांनी दंड थोपटले आहेत. एकीकडे अनुभव संपन्न गांगुर्डे तर दुसरीकडे वारसा लाभलेले पण नवखे कुटे असे चित्र आहे. प्रभाग १२ मधील सर्वसाधारण खुला गटात एकूण सात उमेदवार असून, येथील सामना अतिशय चुरशीचा होणार असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महात्मानगरपासून ते कालिका मंदिरापर्यंत असलेला प्रभाग १२ सध्या विशेष चर्चेत आहे. विद्यमान नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते गेल्या २० वर्षांपासून महापालिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. काँग्रेसचे निष्ठावान अशीही त्यांची ओळख होती. मात्र, त्यांनी आता पक्षनिष्ठा बाजूला ठेवून ते भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. उच्चभ्रू वस्तीपासून झोपडपट्टीचा भागही या प्रभागात आहे. या प्रभागात सूज्ञ मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गांगुर्डे हे विद्यमान नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर ते गेल्यावेळी निवडून आले होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. स्थायी समितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. महात्मानगर परिसरात त्यांचा वरचष्मा आहे. तर, पहिल्यांदाच निवडणूक लढविणारे कुटे हे मातब्बर उमेदवार आहेत. त्यांची आई निर्मलाताई कुटे आणि बहीण सुजाता डेरे यांनी महापालिकेत लोकप्रतिनिधीत्व केले आहे. तसेच, शहराचे पहिले महापौर शांताराम बापू वावरे हे शैलेश यांचे मामा आहेत. त्यामुळे कुटे यांच्या बाजूने वारसा आहे. तिडके कॉलनी परिसरात त्यांचा दबदबा आहे. ते स्वतः व्यावसायिक आणि त्यांची पत्नी डॉक्टर आहे. कुटे कुटुंबीयांनी या परिसराचे प्रतिनिधीत्व महापालिकेत केले आहे. याच प्रभागात शिवसेनेच्यावतीने कुणाल भोसले, मनसेच्यावतीने मिलिंद ढिकले, बसपाच्यावतीने देविदास सरकटे, अपक्ष उमेदवार प्रकाश दीक्षित आणि संतोष आढाव हे सुद्धा रिंगणात आहेत.

प्रभागाची लोकसंख्या ५० हजार २५७ एवढी आहे. यात अनुसूचित जातीच्या ६,४५४ तर अनुसूचित जमातीच्या ३,३२३ लोकसंख्येचा समावेश आहे. त्यामुळे प्रभागात जातीय समीकरणेही महत्त्वाची आहेत. प्रभागात एकूण ३५ हजार ८४२ मतदार आहेत. शरणपूररोडला लागून असलेली तसेच कालिका मंदिराच्या मागील बाजूस असलेली झोपडपट्टी या प्रभागात येते. त्यामुळे त्या मतदारांचा कौलही महत्त्वाचा आहे. शरणपूर रोड परिसरात काँग्रेसचे नगरसेवक उत्तम कांबळे यांचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा कुटे यांना होणार का, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून कुटे हे महापालिका निवडणूक रिंगणात नव्हते. पण, पक्षाने यंदा त्यांना गळ घातल्याने ते उमेदवारी करीत आहेत. मनसे आणि शिवसेनेला या प्रभागातून मतदानाची अपेक्षा आहे. कसमान्देश म्हणजेच, कसमा आणि खान्देश या परिसरातील नागरिक या प्रभागात आहेत. त्यामुळे त्यांची मतेही महत्त्वाची ठरणार आहेत. अपक्ष आणि अन्य उमेदवारांचा थेट फायदा कुटे यांना होणार की गांगुर्डे यांना हे अधिक महत्त्वाचे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोघांनीही प्रभागात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. तसे पाहता काँग्रेसचे निष्ठावान नेते एकमेकांसमोर या प्रभागात एकमेकाला आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोघांपैकी कुणाच्या बाजूने मतदार उभे राहतात हे निकालातून स्पष्ट होणार आहे.


वीज, पाणी आणि स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांना निर्देश दिल्याची माहिती शंभरकर यांनी दिली. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी वाहने, साधने, साहित्य, कर्मचारी याबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षकांकडून निवडणुकीचा आढावा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका सार्वत्रिक निडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर यांनी मंगळवारी महापालिकेला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शक सुचना केल्या.

महापालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत एकूण मतदान केंद्रांची संख्या, कर्मचारी संख्या, निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची संख्या, संवेदनशील अतिसंवेदनशील आणि क्रिटीकल मतदान केंद्रे, त्याच प्रमाणे मतमोजणीचीही माहिती घेऊन मतदान यंत्रांची संख्या, मतमोजणीची तयारी, या ठिकाणी असणारा बंदोबस्त, आचारसंहिता भंगाबाबत काय कारवाई करण्यात आली. त्याच्या किती केसेस दाखल झाल्या, त्याबाबत काय कार्यवाही करण्यात आली. याची माह‌िती घेतली त्याच प्रमाणे मतदारांना कक्षाचे कामकाज, मतदान जनजागृती मोहीम व वाहतूक आराखडा इत्यादी विषयाचा सविस्तर आढावा घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.

उमेदवारंकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश आयकर विभागाचे अधिकारी व विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तसेच जे उमेदवार दुपारी २ वाजेपर्यंत आदल्या दिवशीच्या खर्चाचा तपशील देणार नाही व ट्रू व्होटर या अॅपवर खर्च टाकाणार नाहीत, अशा उमेदवारांवर कारावाई करा असेही आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे, त्याच प्रमाणे कायदा व सुव्यवस्था याचे कठोर पालन करावे, असे देखील आदेश दिले. शहरातील अवैध मद्य विक्री-साठे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती घेण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त, निवडणूक निरिक्षक, पोलिस उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, आचारसंहिता कक्ष प्रमुख, निवडणूक खर्च निरीक्षक, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.


एकच मत प्रत्रिका द्या

निरिक्षकांनी घेतली पक्ष प्रतिनिधींची बैठकीत मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरिक्षक दिपक कपुर यांनी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची नाशिक महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. दरम्यान, बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी एकच मत पत्रिका द्यावी, अशी मागणी झाली.

या बैठकीस मनपा आयुक्त, निवडणूक निरिक्षक, पोलिस उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक, आचारसंहिता कक्ष प्रमुख इत्यादी अधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी इत्यादी विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता मा. मुख्य निवडणूक निरिक्षक यांनी शहरातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीत मतदान करण्याची पध्दती, मतदान केंद्र याबाबत काही शंका उपस्थित केल्या. निवडणूक निरिक्षक यांनी संबंधितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी एकच मत पत्रिका द्यावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् तरळले त्यांच्या नेत्रातून अश्रू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘तिलाही त्याला भेटायचं होतं... त्याच्यापाशी मन उलगडायचं होतं... झालं गेलं विसरून त्याला पुन्हा आपलं म्हणायचं होतं... त्याचीही अवस्था वेगळी नव्हती... पण पुढाकार कुणी घ्यावा उमगत नव्हतं ,’ कधी काळी विवाहबंधन स्वीकारलेल्या, पण विभक्त झालेल्या अन् होऊ पाहणाऱ्या अनेक पती-पत्नींना खाकी वर्दीआडच्या पोलिसांनी व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत चक्क एकत्र आणले. त्यावेळी भव‌िष्यातील सुखी संसाराची स्वप्ने नव्याने रंगव‌िताना काहींच्या नेत्रांमधून अश्रू पाझरले.

आपल्या आयुष्याच्या जोडीदाराशी कधी नात्यातल्या तर कधी मैत्रीतल्या मध्यस्थाद्वारे अन् कधी थेट कायद्याच्या नोटिशीद्वांरे संवाद साधू पाहणाऱ्या जोडप्यांमध्ये नाशिकचे पोलिस आयुक्तालय

मंगळवारी व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत दुवा बनले. पोलिसांच्या माध्यमातून नाशिकमध्ये पार पडलेला हा राज्यातील पहिलाच प्रेरक प्रयोग असावा, असा दावाही पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केला.

तंत्रज्ञान, पैसा अन् शिक्षणाने समृद्ध बनत चाललेल्या समाजात नाती मात्र कमकुवत होत आहेत. पोलिसांमध्ये रोजच दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांच्या संख्येचा मोठा हिस्सा पती-पत्नीच्या नात्यातील मतभेदांनी व्यापल्याची आकडेवारी वर्दीमागल्या पोलिसांनाही अस्वस्थ करते आहे. याच अस्वस्थतेमधून पोलिस निरीक्षक सुनील नंदवालकर यांच्या संकल्पनेतून ‘पुन्हा घरी ...’ या उपक्रमांतर्गत ‘संवाद समृद्धी सहजीवनाचा... चला नातं जपू या!’ हा अनोखा कार्यक्रम साकारला गेला. या संकल्पनेस पोलिस आयुक्त सिंघल यांनीही पाठबळ देऊन सोशल पोलिसिंगव्दारे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. त्र्यंबक रोडवरील फ्रावशी अकादमीत पार पडलेल्या या उपक्रमात शेकडो जोडप्यांनी आवर्जून हजेरी लावली.

पावणेदोनशे जोडप्यांचा प्रतिसाद

कौटुंबिक कलहाच्या विविध कारणांमुळे तणावाशी झगडणारी अन् अत्यंत नाजूक अवस्थेत नाते येऊन ठेपलेली तब्बल १७० जोडपी या उपक्रमात हजर झाली. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी समुपदेशन केल्यानंतर दिवसभरात उपस्थितांपैकी सुमारे ७० टक्के जोडप्यांचा प्रतिसाद मिळाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल नंदवालकर यांनी दिली. ही समुपदेशकांनीही या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोरक्षा’ कार्यकर्त्यावर मालेगावात हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील जुना आग्रा रस्त्यावरील नानावटी पेट्रोलपंपानजीक येथील गोरक्षा समितीचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास २५ ते ३० हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यात शिर्के गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरातील कॅम्प रोड, तसेच जुना आग्रा रोड परिसरात तणावाचे वातावरण होते.

मच्छिंद्र शिर्के सोमवारी दुपारी टाटा सुमो (एम ३९/३२४) वाहनाने शहरातून गिरणापुलाच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील नानावटी पेट्रोल पंपानजीक कामानिमित्त थांबले होते. त्याचवेळी मोतीबाग नाकाकडून मोटारसायकलवर आलेल्या २५ ते ३० अज्ञात हल्लेखोरांनी शिर्के यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करून ते पसार झाले. या घटनेची माहिती शहरात पसरल्याने घटनास्थळी शिर्के यांचे नातेवाईक, समर्थक व नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण होते. हल्लेखोरांच्या अटकेसाठी जमावाने रास्ता रोको केले. मोसमपूल परिसरात नातेवाइकांनी ठिय्या मांडल्याने पुन्हा दुपारी वाहतूक कोंडी झाली होती.

छावणी पोलिस ठाणे परिसरात शिर्केंचे नातेवाईक, समर्थकांनी गर्दी केली होती, तर मोसमपूल परिसरात नातेवाइकांनी ठिय्या मांडल्याने पुन्हा दुपारी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी त्या नातेवाइकांना हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रुग्णालय परिसरातदेखील गर्दी झाली होती. दिवसभर जुना आग्रा रोड परिसरात तणावाचे वातावरण कायम होते. शहरात मोठी पोलिस कुमक मागवण्यात आली होती. सायंकाळी उशिरा जिल्हा पोलिसप्रमुख अंकुश शिंदे देखील शहरात दाखल झाले. शिर्के यांना जबर मारहाण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचा जबाब घेऊन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, की पोलिसांकडून घटनास्थळावरील दवाखाने, दुकाने यांची सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्याआधारे हल्लेखोरांचा तपास घेण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

वैमनस्यातून हल्ला?

दरम्यान सोमवारी पहाटे मनमाड रोडवरील जळगाव चोंडी गावानजीक गोरक्षा समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मनमाडकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप (एमएच १७/टी ७९०५) अडवून या वाहनावरील चालक शेख फारूक शेख शकील (वय २४, रा. इस्लामपुरा) व शेख फरीद अब्दुल रहीम यांना मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात चालक शेख फारूक यांनी दिली होती. तसेच त्यांच्यावर शहरातील खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. गोरक्षा समितीचे सुभाष मालू यांनीदेखील गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी पहाटे झालेल्या या घटनेनंतर लगेचच शिर्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने वैमनस्यातून हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याला’ सांधायचीय भारत-पोलंडची संस्कृती

$
0
0

पोलंडचे क्षेत्रफळ महाराष्ट्राइतके. पोलंड म्हणजे खुल्या मैदानावर राहणारे लोक. या खुल्या मैदानातल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाला आपल्या देशापेक्षा भिन्न असलेली भारतीय संस्कृती भावली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने येऊन गेलेला हा शिक्षक भारतीय संस्कृतीच्या ओढीने पुन्हा नाशिकमध्ये येणार आहे. पोलंड आणि भारत या दोन्ही देशांच्या संस्कृतीला जोडण्याचा त्याचा ध्यास आहे. हा ध्येयवेडा शिक्षक आहे थॉमस वॅरवर. पोलंडमधील एका शाळेत तो विद्यार्थ्यांना सोशल सायन्सचे धडे देत आहे. त्याला पोलंडची संस्कृती भारताला नि भारताची संस्कृती पोलंडला द्यायची आहे. त्याची ही धडपड दोन देशांमध्ये सांस्कृतिक एकतेचा पूल सांधणारी ठरू पाहत आहे.

जगातील प्रत्येक देशाची संस्कृती- भाषा वेगवेगळी. भारतात संस्कृतीतले वैविध्य आढळते. ही सामाजिक जडणघडण समजून घेण्यासाठी हाडाचा शिक्षकच हवा. पोलंडमधील थॉमस याच धाटणीचा! भारतीय संस्कृती, येथील विविधेतील एकता त्याला भावते. छायाचित्र, पुस्तके, तसेच मुलाखतींच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान तो पोलंडवासीयांना देतो आहे. दुसरीकडे पोलंडचे समाजमन त्याला भारतीयांना दाखवायचे आहे. यासाठी लवकरच तो भारतात, नाशिकमध्ये येणार आहे.

पोलंड या छोट्याखानी देशात थॉमस एका शाळेत सोशल सायन्सचे धडे विद्यार्थ्यांना देतो. जगाची संस्कृती मुलांना समजण्यासाठी स्वतः परिपूर्ण असावे, अशी थॉमसची धारणा आहे. याच दृष्टिकोनातून त्याने भारताला चार वेळा, तर नाशिकला दोनदा भेट दिली. भारतातील संस्कृतीच्या अंगाने जाणारे प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी तो सोडत नाही. नाशिकमध्ये २०१५ मध्ये त्याने भेट दिली होती. कुंभमेळ्याचे काही क्षण त्याने कॅमेऱ्यात टिपले. या दरम्यान त्याने काही व्यक्तींशी चर्चा केली. पोलंडमध्ये परतल्यानंतर त्याने ‘अलब्लॅग’ या शहरात फोटोचे प्रदर्शने भरवले. तिथे त्याने भारतीय संस्कृती, एकता, समाजव्यवस्था, वाढणारी शहरे याबाबत पोलंडवासीयांना अवगत केले. आता पुन्हा भारतात येण्यासाठी वेगळा प्लॅन आखला आहे. पोलंड देशाची माहिती भारतीय मुलांना समजावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले. तो म्हणाला, ‘‘गेल्या वेळी मी नाशिक शहरातील पंचवटी एज्युकेशन संस्थेच्या शाळेला भेट दिली होती. आता पुन्हा शहरातील काही विद्यार्थ्यांशी, संस्कृती अभ्यासाची आवड असलेल्या व्यक्तींशी संवाद साधाणार आहे. अशा प्रदर्शनासाठी शाळा अथवा इतर संस्था इच्छुक असल्यास त्यांनी twyrwas@poczta.onet.pl या मेलआयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन थॉमसने केले आहे. थॉमसने गेल्या वर्षी पोलंडमध्ये भरवलेल्या चित्रप्रदर्शनची झलक http://inmi.pl/indie/299-wernisaz-wystawy-indyjskie-inspiracje.html या लिंकवर पाहता येऊ शकते.

मी आजवर अनेक देश फिरलो. मात्र, भारतीय समाजातील विविधता खूप भावते. या विविधतेत समाज एकसंध असून, त्याचा फायदा सर्वांना होतो हे महत्त्वाचे आहे. पोलंडमध्ये हा विषय खूप गांभीर्याने घेतला जातो आहे. आता मला पोलंडची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी असे वाटते. त्याला यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- थॉमस वॅरवस, शिक्षक, पोलंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरस्टॉलसाठी सुविधायुक्त जागा द्या

$
0
0

दररोज सकाळी वृत्तपत्र विक्रते हे संपूर्ण शहरात विविध भागात फिरत असतात. या व्यवसायामुळे त्यांचा घरोघरी संपर्क असतो. प्रत्येक भागात फिरत असल्यामुळे त्या भागाचे प्रश्न व समस्याही त्यांच्या तोंडपाठ असतात. इतकेच नाही तर त्यांच्याकडे काही प्रश्न वाचक सहजपणे सांगत असतो. त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून नाशिक शहर कसे असावे व शहराचे नेमके प्रश्न काय आहेत, यावर वृत्तपत्र विक्रेत्यांचे मत ‘मटा जाहीरनामा’तून जाणून घेतले. या विक्रेत्यांनी शहराच्या प्रश्नाबरोबरच त्यांच्या व्यवसायसच्या समस्याही सांगत आपला जाहीरनामा समोर ठेवला.



आम्ही रोज प्रश्न सांगू शकतो

आमचे संपूर्ण शहरात सहाशेहून अधिक सदस्य आहेत. आम्ही सकाळपासून वर्तमानपत्र विकण्याच्या निमित्ताने सर्व शहर पादाक्रांत करत असतो. आम्हाला जर महानगरपालिकेने विश्वासात घेतले, तर आम्ही रोज त्यांना त्या भागातील प्रश्न व त्याची गरज सांगू शकतो. याबरोबरच शहरात अनेक विकासकामे झाली, पण सार्वजनिक प्रसाधानगृहाचा प्रश्न हा मोठा आहे. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. शहरातील गार्डन व इतर सार्वजनिक ठिकाणी हे बांधणे सहज शक्य आहे. त्याचप्रमाणे त्याची निगा व स्वच्छता होण्यालाही अग्रक्रम असावा. पार्किंगची समस्या सोडवावी व वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी मनपाने उपक्रम घेणे गरजेचे आहे. त्यातून बरेच प्रश्न सुटतील.

-चंद्रकांत पवार, अध्यक्ष, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना

पाण्याचे वाटप विषम स्वरुपात

शहरात मुबलक पाण्याचे प्रमाणे असले तरी वाटप मात्र विषम स्वरुपात आहे. काही ठिकाणी २४ तास पाणी असते तर काही ठिकाणी फक्त एक तास. त्यामुळे वितरणव्यवस्था सुदृढ करणे व समान वाटप करणे हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. पाणीप्रश्नाबरोबरच कचऱ्याचा विषयसुध्दा गंभीर आहे. वडाळा भागात तर कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो व मनपाही तो उचलते. पण त्यानंतर पुन्हा कचरा टाकला जातो. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी केवळ मनपावर विसंबून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधनही महत्वाचे आहे. कचऱ्यामुळे त्याच भागाचे आरोग्य बिघडते त्यासाठी सर्वांनी या प्रश्नावर जागृत असावे.

-अजय बागूल, सिडको


उघड्यावर मांस विक्री नको

उघड्यार मांस विक्री सर्रास होते. त्यावर निर्बंध असावे. त्यासाठी प्रत्येक भागात सॉल्टर हाऊसची व्यवस्था मनपाने करावी. या मांसविक्रीमुळे दुर्गंधी तर येतेच, पण आरोग्याचेही अनेक प्रश्न उभे राहतात. त्याचप्रमाणे भाजी मार्केट हा सर्व उपनगरात असावे. तशी व्यवस्‍था करण्यात यावी व त्यासाठी पार्किंगची व्यवस्थाही हवी. त्यामुळे रहदारीला त्याचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागेवर निगा राखण्यासाठी रखवालदार असावेत. त्यामुळे जुगारी व इतर जण त्या जागेवर घाण करणार नाहीत.

-विनोद पाटील, सरचिटणीस, शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना


भटक्या कुत्र्यांना आवरा

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मोठा आहे. आम्ही वृत्तपत्र घरोघरी देतो तेव्हा हा प्रश्न किती तीव्र आहे याची आम्हाला नेहमीच जाणीव होते. सामान्य माणसालासुध्दा त्याचा त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नावर महानगरपालिका फारशी गंभीर नाही. जेव्हा हा प्रश्न तीव्र होतो, तेव्हा त्यावर काहीतरी उपाययोजना केली जाते. पण नंतर त्याकडे दुर्लक्षच केले जाते. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल यासाठी सातत्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आम्हाला पाण्याचे लिकेज हा प्रश्नही सकाळी सर्वत्र दिसतो. संपूर्ण रस्ता पाण्याने वाहत असतो. त्यामुळे हे लिकेज कसे बंद करता येईल, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

-दत्तात्रय ठाकरे, अध्यक्ष, सिडको वृतपत्र सेवाभावी संस्था


कव्हरेज नाही

खरं तर सर्व प्रश्न महानगरपालिकेशी संबंध‌ित असतात असे नाही. पण नगरसेवकांनी इतर प्रश्नांकडेसुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे. सातपूर शिवाजीनगर भागात मोबाइलला रेंजच नाही. एकीकडे ड‌िज‌िटल इंडियाचा नारा दिला जातो व खेड्यापाड्यात मोबाइल पोहचत असताना शहरात अशी समस्या असेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पण ही समस्या आहे व त्याचा आम्ही नेहमी पाठपुरावा केला. पण त्यातून मार्ग निघाला नाही. त्याचप्रमाणे ड्रेनेज व कचरा ही मोठी समस्या आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्र्यंबकरोड व सातपूर या रस्त्यावर नेहमी अपघात होतात. त्यावरही कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

-विनोद कोर, अध्यक्ष, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना


स्पीड ब्रेकर हवे

संपूर्ण शहरात रस्ते करण्यात आले. पण स्पीड ब्रेकर नाही. त्यामुळे सुसाट जाणाऱ्या गाड्या व त्यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने स्पीड ब्रेकर करण्याची गरज आहे. त्यातून अपघाताचे प्रमाण कमी होईल. लहान मुलांना बाहेर पाठवणे यामुळे अवघड झाले आहे. स्पीड ब्रेकरप्रमाणेच स्वच्छतेचा विषयसुध्दा गंभीर आहे. कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यांच्या दांड्याही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अस्वच्छेतेचे प्रमाण वाढले आहे. सातपूर विभागात एटीएम नाही. त्यामुळे आमची प्रचंड गैरसोय होते. त्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करावा.

- राजू अनमोला, सातपूर


मनपाच्या शाळेकडे दुर्लक्ष

शहरात महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात शाळा आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पालक टाकतात. मनपाच्या शाळा जर दर्जेदार केल्या, तर येथे विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढेल व चांगले शिक्षण मिळेल. महानगरपालिकेने या शाळांसाठी स्वतंत्र बजेट करणे गरजेचे आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या तर या शाळांतही स्मार्ट विद्यार्थी तयार होतील. त्यामुळे अशा शाळांना दर्जेदार करणे हे गरजेचे आहे. खासगी शाळांत मोठ्या प्रमाणात देणग्या घेतल्या जातात. त्यातून नागरिकांची पिळवणूकच होते. त्यामुळे बदलत्या काळात या शाळांचे रुपडे बदलण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-भारत माळवे, नाशिकरोड


भरारी पथके हवीत

आम्ही जेवढे फिरतो तेवढे नगरसेवकही फिरत नाहीत. त्यामुळे आमचाच वृत्तपत्र विक्रेता जर नगरसेवक झाला तर तो सर्व प्रश्न चांगले मांडेल. खरंतर नगरसेवकांनासुध्दा जे प्रश्न माहीत नसतात, ते आम्हाला फिरताना पटकन कळतात. नगरसेवकही कधी संपूर्ण प्रभागात फिरत नाही. आमचे विक्रेते मात्र व्यवसाया निमित्ताने सर्वत्र जातात. शहरात आज पाण्याचा प्रचंड प्रमाणात गैरवापर केला जातो. काही ठिकाणी तर गाड्या व रस्ते पिण्याच्या पाण्याने धुतले जातात. त्यामुळे पाणीप्रश्न व पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येते. त्यासाठी महानगरपालिकेने भरारी पथके नेमण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड येथे उड्डाणपुलाच्या खाली भाजी विक्रेते असतात. पण सायंकाळी येथे मोठा कचरा असतो. त्याकडे लक्ष दिले तर अस्वच्छता होणार नाही.

-विजय सोनार, नाशिकरोड


वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल द्य

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल हवे. वृत्तपत्र विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर आमचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. विक्रेत्यांना खूप जागाही लागत नाही. छोट्या जागेत हा व्यवसाय आम्ही करतो. पुणे महानगरपालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल दिले. आयुक्त पुणे येथे असताना त्यांनी याबाबत पुढाकार घेतला, तसाच नाशिक येथेही घ्यावा.

-किशोर सोनवणे, अध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटना, नाशिकरोड


गोदावरीकडे लक्ष देणे गरजेचे

नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक येतात व ते रामकुंडावर जाऊन दर्शन घेतात. पण या तीर्थक्षेत्रात सांडपाण्याचे नियोजन अजूनही महानगरपालिकेला व्यवस्थित करता आले नाही. त्यामुळे नाल्यांचे सांडपाणी गोदावरीत मिळते. त्यातून चुकीचा संदेश जातो. जो प्रश्न सर्वात प्रथम सोडवायला हवा, तोच प्रश्न सुटत नाही. याला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.

- अनिल निंबाळकर


झोपडपट्टीत पाणी नाही

शहरात सर्वत्र मुबलक पाणी आहे. काही ठिकाणी त्याचा गैरवापरही केला जातो. पण झोपडपट्टीत पाणी नाही. दोन ते तीन किमी अंतर पार करुन लहान मुले पाणी जेव्हा वाहून आणतात, तेव्हा ही असमानता प्रकर्षाने दिसते. त्यामुळे नेमका काय विकास केला, असा प्रश्नही पडतो. सर्वांना समान हक्क आहे. त्यामुळे पाण्याचे वाटप सर्वत्र व्हावे. त्यासाठी वेगळे सांगण्याची गरजही भासू नये. पण तसे होत नाही. त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडे मैदाने आहेत, पण तेथे कोणतेही खेळ होत नाहीत. त्यामुळे मुले आता मैदानी खेळ विसरू लागले आहेत. सायबर कॅफेत जाऊन ही मुले खेळत बसतात. त्यामुळे अशा प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-बाळू सूर्यवंशी, सिडको


अतिक्रमणापूर्वीच कारवाई व्हावी

अतिक्रमण झाल्यानंतर कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. पण अतिक्रमण होण्यापूर्वीच जर कारवाई केली, तर त्यातून कोणीही अतिक्रमण करणार नाही व अतिक्रमण होण्याचेही प्रमाण कमी होईल. भाजी विक्रेते तर कुठेही मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करुन दुकाने थाटतात. त्यामुळे रहदारीला अडचण तर होतेच, शिवाय त्यामुळे अतिक्रमणांचे प्रमाणही वाढते. शहरात काही ठिकाणी नगरसेवकांच्या पुढाकाराने सीसीटीव्ही बसवले आहेत. पण हे सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे ते कशासाठी बसवले असा प्रश्न पडतो.

- बापू जाधव



आमचाही ना हरकत दाखला घ्या

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळ्या दाखल्यांची मागणी करत असतात. आता तर शौचालयाचा दाखला अनिवार्य केला. त्याचबरोबर कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखलाही महत्वाचा असतो. पण या दाखल्याबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांचाही दाखला अनिवार्य करा. कारण राजकारणीच आमचे सर्वात जास्त बिल थकवतो. ज्या वर्तमानपत्रातून त्यांना राजकारणाची माहिती मिळते व शहराचे प्रश्न कळतात, त्याच वर्तमानपत्राचे बिल थकवणे ही गोष्ट खरेतर चुकीची आहे. त्यामुळे त्यांना हा दाखलाही अनिवार्य करा, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची भाजपविरोधात, भाजपची काँग्रेस विरोधात तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना राजकीय पक्षांनी प्रचाराऐवजी तक्रारीचे अस्‍त्र एकमेकांविरोधात उपसले आहे. तिकीटवाटप करताना दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या भाजपच्या व्हिडीओ प्रकरणात काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी भाजपच्या विरोधात आचारसंहिता विभागाकडे तक्रार दाखल केली असून तिकीट वाटपासाठी पैसे घेतलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपनेही काँग्रेसच्या विरोधात उमेदवारी वाटपावेळी काँग्रेस नेत्यांनी पैसे घेतल्याचा आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून प्रचाराची लगबग सुरू असताना आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यालयात इच्छुकाकडून दोन लाख रुपयांची मागणी करतानाचा व्हिड‌ीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे भाजपची अडचण वाढली असतानाच काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीवरून आचारसंहिता प्रमुखांनी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह उमेदवारांना नोट‌िसा पाठवल्या आहेत. आता या वादात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी भाजपविरोधात आचारसंहिता विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपने उमेदवारीसाठी दोन ते दहा लाख रुपये घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन लाखांच्या व्हिडीओ प्रकरणावरून अगोदरच भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. त्यामुळे या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतल्याने भाजप विरुध्द शिवसेना असा नवा वाद निर्माण होणार आहे. भाजपनेही काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या विरोधात पैसे घेऊन तिकीट वाटपाचे आरोप केले आणि त्यांच्याविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल केली आहे.


आहेरांची नार्को टेस्ट करा

भाजपनेही आता या वादात उडी घेवून काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसवर झालेल्या आरोपांचा संदर्भ देऊन भाजपचे अजित ताडगे यांनी शरद आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आहेर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केला आहे. शोभा बोडके यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकल्याचे सांगत आहेर यांनी तिकीटवाटपात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली आहे.


राहुल आहेरांविरोधात तक्रार

प्रभाग क्रमांक ७ मध्ये एका उमेदवाराने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या उमेदवार हिमगौरी आडके यांच्या प्रचारासाठी जनलक्ष्मी बँकेची वाहने फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आचारसंहिता कक्षाकडे ही तक्रार दाखल झाली असून, त्याची चौकशी सुरू केली आहे.

२२ पैकी १६ तक्रारी निकाली

महापालिका निवडणुकात आचारसंहिता कक्षाकडे आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत २२ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यात हळदी कुंकू वाटप, बॅनर्स लावणे, उमेदवारांकडून वस्तूंचे वाटप करणे अशा किरकोळ तक्रारींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील गोरक्षा समितीचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षा समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून बुधवारी मालेगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. किरकोळ घटना वगळता शहरातील बंद शांततेत पार पडला. बस वाहतूक पूर्णतः बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

शिर्के यांच्यावरील हल्ल्याने मंगळवारी शहरातील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्यामुळे जिल्हा पोल‌िस प्रमुख अंकुश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला, उप अधीक्षक गजानन राजमाने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मोठा पोल‌िस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आल्याने शहरास छावणीचे स्वरूप आले होते. या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केल्याने सकाळपासूनच शहरात बंदचा परिणाम पाहायला मिळाला. दिवसभर शहरात शुकशुकाट होता. नवीन बसस्थानक येथून सकाळी बाहेरगावी जाणारे प्रवाशी एसटीने रवाना झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव शहरातून होणारी बसवाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र अनेक प्रवाशांना यांची कल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले. खासगी वाहतुकीने प्रवाशांना महामार्गावरील चाळीसगाव फाटा, मनमाड चौफुली येथे पोहोचावे लागले.

शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी, चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आले होते. कॅम्परोड, सटाणा रोड, जुना आग्रा रोड, कॉलेज रोड, नवीन बस स्थानक रोड अशा सर्व प्रमुख रस्त्यांवर व्यापारी गाळे, दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद होते. रस्त्यावरदेखील नागरिकांची तुरळक वर्दळ होती. खबरदारी म्हणून शहरातील बहुतांशी शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोल‌िस प्रशासनाकडून राज्य राखीव पोल‌िस दल, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक जागोजागी तैनात करण्यात आले होते. किरकोळ घटना वगळता दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोल‌िस प्रशासनाकडूनदेखील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.

शिर्के यांचे व्हिडिओद्वारे शांततेचे आवाहन

मच्छिंद्र शिर्के यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोशल मीड‌ियावर त्यांच्यावरील हल्लाबाबत स्वतः शिर्के यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात त्यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे.

‘तो’ गुन्हा खोटा?
मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेला हल्ला हा मंगळवारी त्यांनी जनावरांची गाडी पकडताना वाहनचालकास केलेल्या मारहाणीतून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र स्वतः शिर्के यांच्याकडून पत्रकाद्वारे याबाबत खुलास करण्यात आला असून त्यात त्यांच्यावर खोटा व बनावट गुन्हा नोंदवला आहे. तसेच जळगाव चोंडी गावनजीक झालेल्या घटनेसमयी मी घरी झोपलो होतो. याबाबत पोलिसांनी चौकशी करावी, असे म्हटले आहे. पोलिसांकडून जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला त्यांनी आहे. दरम्यान सुभाष मालू यांना न्यायालयासमोर हजर करून ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे


संशयितांपैकी दोघे अटकेत
दरम्यान, शिर्के यांनी नोंदविलेल्या फिर्यादीतील चार संशयितांपैकी जहीर खान मेहबुब खान (वय २६ रा. मोमीनपुरा), इम्रान खान हमीत खान उर्फ भुऱ्या ड्रायव्हर (वय २८ रा. मोमीनपुरा) यांना अटक करण्यात आली. कोर्टात हजर केले असतात या दोघांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी दिवसभरात बंदच्या दरम्यान प्रतिबंधात्मक कार्यवाइत संगमेश्वर भागातून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.

मारहाण करणाऱ्यांना अटक करा!

नाशिक ः मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषदेने निषेध नोंदविला आहे. मालेगावमधील काही अज्ञातांनी गोवंशाच्या सुटकेच्या रागातून शिर्के यांच्यावर हल्ला केला असून, संबंधित ट्रक चालक, मालकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी परिषदेने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात म्हटल्यानुसार गोहत्येसाठी गायी घेऊन जाणारा ट्रक अडविल्यानंतर ट्रक मधील भाडोत्री कामगार पळून चालले होते. त्यापैकी एकजण पुलावरून पडून गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्या कामगाराला मारहाण करून शिर्के, मालू व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा योग्य पद्धतीने तपास करावा, अशी मागणी परिषदेचे प्रांताध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत उपाध्यक्ष उमेश जोशी, बाबू नाटेकर, एकनाथ शेटे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र आणि राज्य सरकार ‘फेकू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

हे सरकार पैसेवाल्यांचे सरकार आहे. हे गाडीत बसत नाहीत तर हेलिकॉप्टरने धुराळा करीत फिरतात. मात्र, यांच्यामुळे आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचाच धुराळा होत आहे’ असा केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला चिमटा घेतानाच, शेतकऱ्यावर शेतमाल जाळण्याची वेळ येते हे अतिशय दुर्दैवी आहे. हे सरकार फेकू सरकार असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ढासळणाऱ्या कांदा बाजारभावाने उदिग्न झालेल्या नगरसूल येथील शेतकऱ्याने काढणीला आलेला तब्बल अडीच एकर कांदा जाळल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याबाबत कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी आपल्या येवला दौऱ्यात अचानक मोर्चा नगरसूल गावाकडे वळवला. सुप्रिया सुळे यांची तशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ येवला तालुक्यातील अंदरसुल येथे सभा होती.मात्र, या सभेअगोदर त्या थेट डोंगरे या शेतकऱ्याच्या बांधावरच धडकल्या. बाबांनो कृपया असं काही करू नका. असला मार्ग पत्करू नका. जरा धिर धरा, अशा शब्दात त्यांनी सात्वन केले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठीचा तुमचा आवाज तुमची बहीण दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचवेल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. सुळे यांनी सत्तारूढ भाजप सरकारच्या कारभारावर चांगलेच कोरडे ओढले. कांदा प्रश्नावर त्या म्हणाल्या, आज कांद्याची आवक जास्त असतानाही रेल्वेकडून राज्यातील कांदा बाहेर पाठवण्यासाठी वॅगन उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील कांदा पडून आहे. हे सरकार म्हणजे फेकू सरकार आहे. हे फेकू सरकार शेतकऱ्याचे डोळे पुसायला येत नाही. या सरकारची भूमिका शेतकऱ्यांचा अपमान करण्याचीच असल्याचे दिसत आहे. अन्नदाता सुखी भव म्हणणारे आपण आहोत. मात्र, आज याच अन्नदात्यावर शेतमाल जाळण्याची वेळ का आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही का?

उत्तरप्रदेशमध्ये सध्या निवडणुका असल्यानेच कर्ज माफी म्हणतात. मग या महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवाला कर्जमाफीची गरज नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने येथील शेतकऱ्यांच्या पाठ‌िशी उभे रहायला पाहीजे. त्यांनी कर्जमाफी दिलीच पाहीजे. हेलिकॉप्टर घेऊन गावभर मत मागण्यापेक्षा शेतकऱ्याला सरकारने न्याय देण्याची गरज आहे. मात्र, हे सरकार गरिबाचे नाही फक्त पैसेवाल्याचेच सरकार आहे. हे खाली बसत नाही.हेलिकॉप्टरचाच धुराडा करीत बसतात...गाडीत बसत नाही.माझ्या शेतकरी बंधुचाच या धुराळा या सरकारमुळे होतोय,अशा शब्दात देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोले लगावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मणगावात बच्छावांमध्येच ‘युद्ध’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्हा परिषदचे ब्राह्मणगाव गटात शिवसेना-भाजपात सरळ लढत होत असल्याने या लढतीकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपसह शिवसेनेने वरिष्ठ मंत्री या गटात उतरवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गट हा पूर्वी इतर मागास प्रवर्ग होता. या गटातून गतवेळी शिवसेनेचे प्रशांत बच्छाव विजयी झाले होते. नव्या गटरचनेनुसार व आरक्षणात हा गट आता महिला सर्वसाधारण राखीव झाला आहे. यामुळे या गटातून प्रशांत बच्छाव यांनी आपल्या राजकीय वारसा सुरू ठेवण्यासाठी पत्नी वर्षा बच्छाव यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना भाजपा युती झाली असती तरीही या गटात भाजप-सेनेत मैत्रीपूर्ण लढत रंगतदार ठरणारच होती.

भाजपचे उपजिल्हाध्यक्ष व मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांनी पत्नी जि. प. माजी सभापती लता बच्छाव यांना रिंगणात उतरविले आहे. यामुळे या गटात नेहमीच दळवी-बच्छाव असा चुरशीचा सामना बघावयास मिळत असतांना पहिल्यांदाच बच्छाव परिवार एकमेकांसमोर रिंगणात उतरले आहेत. पोलिस यंत्रणेने सर्वाधिक पोलिस बळ या मतदान केंद्रावर लावले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली. या गटातील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मंत्री दादा भुसे यांची जाहीर सभा दोन ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. तर भाजपकडून केद्र‌िय संरक्षणराज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या सभा होणार आहेत. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी गटाचा दौरा करून भाजपला ब्राह्मणगाव व लखमापूर या पंचायत समिती गणात देखील शिवसेना व भाजप उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. गट व गणात राष्ट्रवादी व काँग्रेस दोघांनी आपले उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भाजपने मार्केटिंग केले, शिवसेनेचे मांजर झाले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाजपने मार्केटिंग करून जनतेची फसवणूक केली आहे. तर, उद्धव ठाकरे हे भाजपला राजीनाम्याची केवळ धमकी देण्याचे काम करीत आहेत. ते डरकाळी फोडणारे वाघ राहिले नाहीत. त्यांचे मांजर झाले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

पंचवटीतील वालझाडे मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिल्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महिला शहराध्यक्षा सुनीता निमसे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, अर्जुन टिळे आदी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले. महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला. भाजपने २०१४ ला वोट घेतले आणि २०१६ ला नोटा घेतल्या. आता सोन्याचा हिशेब ठेवायला पाहिजे, असे म्हणताहेत. पारदर्शकता हवी पण ती नियोजनबद्ध असायला हवी, असा टोलाही सुळे यांनी लगावला. संसदेत एटीएम चालत नाही. खासदारांचे हाल आहे तेथे सर्वसामान्यांचे किती हाल असतील. नोटाबंदीच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच केले. मात्र, त्यात सर्वांना सारखा न्याय मिळाला नाही. डिजिटल इंडियाचे करण्याची घोषणा केली जाते. जिथे संसदेतील बिल्डिंगमधील वायफाय चालत नाही तेथे सर्वसामान्य ठिकाणी ते कसे चालणार, असा प्रश्न त्यांनी केला. रंजन ठाकरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद आहेर यांनी आत्मपरीक्षण करावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या तक्रारीनंतर आचारसंहिता विभागाने दोन लाख रुपयांच्या व्हिडीओप्रकरणी भाजपच्या शहराध्यक्षांना नोटीस बजावल्यानंतर भाजपने आता काँग्रेसवर पलटवार केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यावरच तिकीट वाटप करताना पैशांचे आरोप झाले असून, त्यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. त्यामुळे आहेर यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला भाजपवर आरोप करण्याची नैतिकता नसल्याचा दावाही सावजी यांनी केली आहे. संबंधित व्हिडीओ प्रकरण भाजपच्या अंगलट आले असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे भाजपच्या उमेदवारांसह शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे नेते संतप्त झाले आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेर यांच्यावरच तिकिटे विकल्याचा आरोप करीत पक्षातीलच लोकांनी काँग्रेस कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी भाजपवर आक्षेप घेवू नये, असा इशारेवजा सल्ला सावजी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला दे धक्का, शिवसेनेला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील भाजपप्रणित युती सरकारमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप आम्हाला अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करीत या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीबुधवारी पत्रकार परिषदेत केली.

निवडणुकीनंतर एकाही मंत्र्याला नाशिकमधील रस्त्यांवर फिरकू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.सीबीएस परिसरातील हुतात्मा स्मारकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषद घेतली. वडघुले म्हणाले, की भाजप सरकारने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. वर्षभरात कांदा तसेच भाजीपाला मातीमोल भावात विकला जातो आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाला असून, भाजपला धडा शिकविण्यासाठीच शिवसेनेला जिल्हास्तरावर विनाशर्त पाठिंबा देत असल्याची माहिती वडघुले यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निफाड तालुक्यातील देवगाव गटात शिवनाथ जाधव यांना, तर सिन्नर तालुक्यातील पांगरी गटात रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. या गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार असले तरी तेथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ. अन्य गट, गण व महापालिका निवडणुकीत आम्ही भाजप विरोधी प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वडघुले यांनी दिली.

भाजप विश्वासघातकी!

एकीकडे गोंजारायचे तर दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसायचा अशी रणनीती भाजपकडून अवलंबण्यात येत आहे. त्यांनी घटक पक्षांचा विश्वासघात केल्याचा आरोप वडघुले यांनी केला. जागा वाटपात घटक पक्षांना सोबत घेतल्याचे भाजप सांगतो, तर दुसरीकडे घटक पक्षांची ताकद नगण्य असल्याने त्यांना जागा सोडल्या नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अन्य घटक पक्षांची देखील तशीच भावना असल्याचे वडघुले यांनी सांगितले.

‘सरकारमध्ये राहून विरोध नको’

स्वाभिमानी संघटना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये भाजप विरोधी पाऊल उचलायला नको होते. आम्ही स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढू, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली आहे. तर महापालिका निवडणुकीत हंसराज वडघुले यांना प्रभाग २४ मधून उमेदवारी हवी होती. त्यांनी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली असती तर भाजपने निश्चितपणे त्यांना पाठिंबा दिला असता. त्यांनी राजकीय शिष्टाचार पाळला नाही. उलट शहराध्यक्षांशी दूरध्वनीवरून असभ्य भाषेत भाष्य केल्याचा दावा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब...! ८२१ उमेदवारांचे व्हिडीओद्वारे व्हिजन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग रोज नवनवीन फंडे काढून यंत्रणांना जेरीस आणत असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणूक प्रचारासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असतानाच, निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराचे व्हिजन व्हिडीओद्वारे वेबसाइटवर टाकण्याचे नवीन फर्मान काढले आहे. त्यामुळे कमी कालावधीत ८२१ उमेदवारांचे व्हिडीओ अपलोड कसे करायचे, असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. आयोगाचा आदेश म्हटल्यावर महापालिका प्रशासनानेही औपचारिकता म्हणून एका स्वयंसेवी संस्थेवर त्याची जबाबदारी ढकलत आपली मान सोडवून घेतली आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम विनामोबदला संस्थेला करावे लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगाकडून रोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. यातील काही आदेश चांगले असून, मतदारांनीही त्याचे स्वागत केले आहे. उमेदवारांच्या कुंडल्या मांडणे, त्या मतदान केंद्रात लावणे, प्रसिद्धीला देणे आदींमुळे आयोगाची प्रतिमा चांगलीच उजळली आहे. मात्र, काही निर्णयांवर आता प्रशासकीय यंत्रणाही नाक मुरडत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोगाने नवीन सूचना महापालिकांना केल्या आहेत. महापालिकेने एक वेबसाइट सुरू करून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांचे व्हिजन व्हिडीओद्वारे सादर करण्याचे फर्मान काढले आहे. प्रत्येक उमेदवाराचा दोन मिनिटांचा व्हिडीओ या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. आयोगाचाच आदेश असल्याने त्याच्या अंमलबजावणीशिवाय पर्याय नसल्याने यंत्रणेनेही मग खासगी स्वयंसेवी संस्थेवर याची जबाबदारी ढकलली आहे.

पालिकेने एका संस्थेवर हे काम सोपवले असून, या संस्थेकडून प्रत्येक उमेदवाराचे शूटिंग करून ते वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहे. मात्र, प्रचाराला आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ८२१ उमेदवारांचे व्हिडीओ अपलोड कसे होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम संबंधित संस्थेला विनामूल्य करायचे आहे. त्यामुळे चार दिवसांत हे काम होणे अशक्य असले तरी प्रशासकीय यंत्रणा सोपस्कार पूर्ण करण्यात गुंतली आहे.

गैरवापराची प्रशासनालाच भीती

एकीकडे आयोगाने प्रसारमाध्यमांमध्ये एखाद्या उमेदवाराचे व्हिजन छापून आले, तर त्याला पेड न्यूज संबोधण्याचे फर्मान काढले आहे, तर दुसरीकडे याच उमेदवाराचे व्हिजन मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दोन मिनिटांचे व्हिजन सादर करण्याचे फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे संबंधित संस्थेला हे काम विनामूल्य करायचे आहे. पालिकेच्या आदेशानुसार हे काम केले जाणार असले, तरी संस्थेकडून त्याचा दुरुपयोग झाला किंवा उमेदवारांकडून पैसे मागण्याचे प्रकार होण्याची भीती प्रशासकीय यंत्रणेलाच आहे. मात्र, आयोगाचा आदेश असल्याने त्याला विरोध कसा करायचा, असा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे दुरुपयोग होवो की सदुपयोग, आपली मान सोडवून घेण्यात यंत्रणा व्यस्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेस्टेशनमध्ये पार्किंग घोटाळा

$
0
0

बनावट पावत्यांनी वाहनचालकांची लूट; पुरावे देऊनही कारवाई नाही

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड येथे महापालिकेच्या नावे सुरू असलेला पार्किंगचा घोटाळा उघड झाल्यानंतर आता रेल्वेचा चारचाकी वाहन पार्किंग घोटाळाही उघडकीस आला आहे. रेल्वेच्या नाशिकरोड आणि भुसावळ प्रशासनाला या गैरप्रकाराची पूर्ण कल्पना असून पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी ‘मटा’शी बोलताना केला.

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात पार्किंगला जागा नसताना प्रचंड संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे येणारे प्रवासी, वाहनचालकांना रेल्वेस्टेशनमध्ये येणे अवघड झाले आहे. रेल्वेने देवी चौकात दुचाकीसाठी पार्किंगची पेड सुविधा उभी केली. मात्र, ती जागाही आता कमी पडू लागल्याने रेल्वे सुरक्षा दलामागील तळावर दुचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सहा तासाचे दहा तर २४ तासाचे वीस रुपये शुल्क आकारले जाते. पार्किंगसाठी ठेकेदाराला ५५३ चौरसमीटरची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित जागेत सुभाषरोडमार्गे येणाऱ्या चारचाकी वाहनांना मोफत पार्किंगची सुविधा आहे.

चारचाकीची लूट

चारचाकी वाहनांसाठी पार्सल आफिसजवळ अधिकृत पार्किंग आहे. ती जागा कमी असल्याने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालक रेल्वे सुरक्षा दलामागील जागेत वाहने उभी करतात. मात्र, या सुविधेमुळे गाडी उभी करणाऱ्या वाहनचालकांना तेथेच दुचाकीचे पेड पार्किंग असल्याने काही मंडळी गैरफायदा घेतात. चारचाकी वाहन उभे झाले की, चालकाकडून ते पैसे घेतात. तसेच, रेल्वेची (खोटी) पावती मिळत असल्याने आणि पार्किंगचा बोर्ड (दुचाकीचा) असल्याने चालकही मुकाट्याने पैसे देतात. ही मंडळी तीस ते चाळीस रुपये घेतात. यावर दुचाकी पार्किंग ठेकेदाराने ही आपली माणसे नाहीत, असे स्पष्ट सांगितले आहे.

लोकप्रतिनिधीचा हात?

सोमाणी गार्डन येथे महापालिकेच्या बनावट पावत्या छापून पार्किंग घोटाळा करण्यात आला होता. ‘मटा’ने तो उघडकीस आणला होता. त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा हात असल्याचे लोकांचे म्हणणे होते. रेल्वे पार्किंग घोटाळ्यामागेही लोकप्रतिनिधी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुभाषरोड परिसरातील टवाळखोर बेकायदेशीर शुल्क वसूली करत आहेत. देवी चौकातील पार्किंगचा ठेका तर एका नगरसेवकाकडे आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात चारचाकी वाहनांचे बेकायदेशीर शुल्क कोणी आकारत असतील तर नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावी. समाजकटंकाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवला जाईल.

जुबेर पठाण, वरिष्ठ निरीक्षक, आरपीएफ

रेल्वेस्थानकात पार्किंगचा घोटाळा सुरू असल्याची तक्रार मी, भुसावळ रेल्वे कार्यालयाकडे केली होती. माझ्याकडे बेकायदेशीर शुल्क मागितले गेले. हा गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने चारचाकी वाहनांचे अधिकृत पार्किंग त्वरित सुरू करावे.

राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खांबांचे अपघातांना निमंत्रण

$
0
0

वाहनचालकांच्या जिवाला धोका

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्ग व मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणाऱ्या चेहेडी नाका ते पाथर्डी फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्यावरील विजेच्या खांबांचे स्थलांतर गेल्या चार वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे हे खांब अपघातांना निमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचा फटका वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची वेळ येऊन ठेपल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

चेहेडी जकात नाका ते पाथर्डी फाटा दरम्यानच्या रस्त्याचे वडनेर मार्गे रुंदीकरण व डांबरीकरण गेल्या चार वर्षांपूर्वीच झालेले आहे. शहरातील द्वारका येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बायपास असलेल्या या रस्त्यावर मधोमध असलेले वीजेचे खांब स्थलांतरास अद्यापही मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे येथे जीवघेण्या अपघाताची शक्यता वाढली आहे.

चेहेडी पंपिंग स्टेशन भागात या रस्त्यावर मधोमध उभे असलेले विजेचे खांब स्थलांतरित करण्याकडे पालिकेच्या विद्युत विभागाने गेल्या चार वर्षांपासून डोळेझाक केली आहे. या स्टेशन भागातील विजयनगर, श्रीकृष्ण कॉलनी येथे या रस्त्यावरील विजेचे धोकादायक खांबांचे स्थलांतर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका विद्युत विभागाकडे वारंवार केली होती. मात्र या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधीसह विद्युत विभागाने केराची टोपली दाखवली आहे.

डीपीचेही स्थलांतर आवश्यक

श्रीकृष्ण कॉलनी येथे या रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. याठिकाणी रस्त्याला लागूनच डीपी आहे. ही डीपी रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनली असून वाहने या डीपीला लागूनच जातात. त्यामुळे ही डीपी सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत करण्याची आवश्यकता आहे.

विजयनगरजवळील रस्त्यावरील विजेच्या खांबांचे स्थलांतर काही वर्षांपासून रेंगाळले आहे. यास लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणाच कारणीभूत आहे. यावरून प्रशासनही अपघात होण्याची प्रतीक्षा करित असल्यासारखेच कामकाज करित असल्याचे दिसते.

-गणेश खर्जुल, स्थानिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगा-गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भारत देशात गोवंश हत्या कायदा लागू झाला असून आता देशाला खऱ्या अर्थाने सुजलाम् व सुफलाम् करण्यासाठी गो-संवर्धनासह पवित्र गंगा, यमुना व गोदावरीसारख्या नद्यांचे प्रदूषण दूर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वारकरी शिक्षण संप्रदाय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर) यांनी केले. लहवित येथील वाडीचा मळा दारणा-कडवा प्रीति संगमांवर असणाऱ्या भैरवनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या (आळंदी) शताब्दी महोत्सव व संगीत गाथा पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सकाळी दारणा कडवा प्रीती संगमावर सदगुरू विठ्ठलनाथ महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या चरणपादुकांची महामंडलेश्वर विठ्ठलनाथ द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर, स्वामी शिवगिरी महाराज, महंत भक्तीचरणदास, स्वामी कृष्णचैतन्य, स्वामी गणेशगिरी, रामकृष्ण महाराज ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव, खासदार हेमंत गोडसे यांसह विविध महंतांच्या उपस्थितीत शाही स्नान घालण्यात आले.

भजन परंपरा वाढली

भगवान श्रीकृष्णच्या जीवनातील वर्णन व आजच्या समाजला गरज असणाऱ्या तत्वचिंतनावर संदीपान महाराज शिंदे यांनी काल्याचे कीर्तन केले. यावेळी त्यांनी, वारकरी शिक्षण संस्थेमुळेच आज कीर्तन व भजनसारख्या परंपरा वाढीस लागल्या असून अशा संस्थांमधून विद्यार्थी शिक्षण घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असल्याचे सांगितले. यानंतर नंदकिशोर महाराज वाघमारे, समाधान महाराज पाटील, मनोहर महाराज सायखेडे यांच्या मंजुळ वाणीतून तुकाराम गाथा संगीत पारायण केल्याबद्दल शिंदे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनानंतर पंचक्रोशीतील विविध गावांना लहवित ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळालेला कांदा मुख्यमंत्र्यांना देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जेव्हा एखादा शेतकरी त्याच्या उभ्या पिकाला आग लावतो तेव्हा त्याला किती दुःख झालेले असेल, याची कल्पना करावी. हा जळालेला कांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या या नेत्यांना हेलिकॉप्टरचा धुरळा दिसतो; पण सर्वसामान्यांचे दुःख दिसत नाही. त्यासाठी शेतात, ढेकळात जावे लागते. ते त्यांना माहीत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी राज्य सरकारवर केली.

नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पाच एकर क्षेत्रातील कांदा भाव नसल्यामुळे जाळला. त्यांच्या शेतात सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी भेट देऊन शेताची पाहणी केली. त्यानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर सुळे यांनी परिषदेत ही माहिती दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, की कांदा, मिरची, सोयाबीन अशा कोणत्याच शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे अश्रू व्हायला लागले आहे. सरकार यांना न्याय देणार का, असा प्रश्न त्यांनी केला. या वेळी त्यांनी भाजप, शिवसेनेवरही टीका केली. भाजपने महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा केला आहे. त्याचा समाचार घेताना त्यांनी, महिलांना वेगळा जाहीरनामा कशाला हवा, असा प्रश्न केला. त्यांनाही समान अधिकार मिळायला हवा, त्यांना मुख्य प्रवाहाच्या बाहेर काढायला नको, असे त्यांनी सांगितले.

‘भुजबळ लवकरच बाहेर येतील’

निफाड ः कांद्याचे पीक जाळून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणल्याने सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. निफाड येथे त्यांनी युती सरकारच्या कारभारावर टीका केली. माजी मंत्री छगन भुजबळ यांना अडकवणाऱ्यांना अद्दल घडवा, असे आवाहन करीत भुजबळ लवकरच बाहेर येतील, असे सूतोवाचही त्यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामानाट्यावर टीका करताना, हे फक्त कागदी वाघ असल्याचे त्यांनी म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आमदारांसह इतरांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील स्वामीनारायण मंदिराच्या ट्रस्टींनी मंदिराचे बांधकाम करताना डी. पी. प्लॅनमधील रस्ता आपल्या कंपाऊंडमध्ये सामावून घेत गेट लावत मागच्या बाजूला मोठी भिंत बांधली होती. मंदिराची ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास पाडल्याने धार्मिक भावना दुखावल्याने मंदिर परिसरातील नरेंद्र वसंत महाजन यांनी आमदार अनिल गोटेंसह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपालिकेकडून मंदिराच्या बांधकामाची परवानगी देताना मंदिराच्या आराखड्यामध्ये मूळ रस्ता हा मोकळा दाखविला होता. अशा परिस्थितीत आमदार अनिल गोटे यांनी शहरातील १९ अतिक्रमणांचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. त्यात स्वामीनारायण मंदिराच्या भिंतीचे अतिक्रमणाचा समावेश होता. या प्रकरणामध्ये तेजस गोटे, दिलीप साळुंखे, अमोल सूर्यवंशी, गणेश जाधव, मुन्ना वाडिले, प्रशांत भदाणे, मनोज वाल्हे, अमित दुसाणे यांचावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक के. बी. शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत.

या रस्त्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांनी रस्ता मोकळा करावा यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा व पोलिस विभागाला पाठपुरावा करून अतिक्रमित भिंत काढण्यासाठी निवेदने दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दुसरीकडे या कारवाईला स्वामीनारायण ट्रस्टच्या भक्तांनी विरोध केला. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने भाविकांनी माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images