Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

$
0
0

धुळे ः धुळ्यासह जळगाव, नंदुरबार जिल्हा तसेच गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत ३४ दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीने महिन्याभरात शंभराहून अधिक दुचाकी लंपास केल्या होत्या. या टोळीने तिन्ही राज्यातील पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. चोरांची दुचाकी चोरण्याची पद्धत आगळीवेगळी होती. यामुळे पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागत नव्हते. या टोळीला गजाआड करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने स्थानिक गुन्हा शाखा तसेच शहर आणि उपनगर पोलिस स्टेशनाच्या कर्मचाऱ्याचे खास पथक तयार करण्यात आले होते. चोरट्यांवर नजर ठेवण्यात आली. टोळीचे धागेदोरे हाती लागल्यानंतर त्यांना अटक केली. नंदुरबार शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील १४ तर स्थानिक गुन्हे शाखेने इतर राज्यातील १६ गुन्हे या चोरट्यांकडून उघडकीस आणले आहेत. या टोळीमधील चोरटे हे अठरा ते एकवीस वर्षाच्या वयोगटातील आहेत. आपल्या चैनीच्या वस्तू घेता याव्यात, यासाठी हे दुचाकी चोरी करत असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. दुचाकीची चोरी केल्यानंतर दुचाकीच्या सुट्या भागांची ते विक्री करत, अशी यांची पद्धत होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ते दुचाकी पाचोराबारी गावाजवळील विहिरीत टाकून देत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ध्येयनाम्याला अल्प प्रतिसाद, तरीही थोपटून घेतली पाठ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जनतादेखील शहराच्या विकासाची भागीदार असावी या संकल्पनेतून भाजपकडून ध्येयनामा तयार करण्यासाठी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. मात्र, गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर सुमारे ४३ हजार ६७७ नाशिककरांनी प्रभाग विकासाबद्दल आपल्या सूचना नोंदविल्या आहेत. विशेष म्हणजे शहरात सुमारे ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार इतक्या अल्प मतदारांनीच आपले मत नोंदवले असतानाही मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. त्यामुळे स्थानिक भाजपेयींकडून मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूल केली गेल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत शंभर प्लसचे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. शहराचा लोकाभिमुख विकास व पारदर्शी कारभारासाठी जनतेकडून जाहीरनाम्याबद्दलच्या अपेक्षा जाणून घेण्याचा निर्णय घेत, त्यासाठी मतदारांकडूनच सूचना मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २६ जानेवारीला ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. या संकल्पनेतून भाजप निवडणुकीसाठी पक्षाचा ध्येयनामा जनतेसमोर सादर करणार आहेत. गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर ४३ हजार ६७७ इतक्या नाशिककरांनी प्रतिसाद दिला असून, आपल्या सूचना नोंदवल्या आहेत. शहरात ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार मतदारांनीच या अभियानाला प्रतिसाद दिला आहे. अल्प प्रमाणात प्रतिसाद असतानाही, स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःसह पक्षाची पाठ थोपटून घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून या उपक्रमाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ध्येयनामा येणार शुक्रवारी

नाशिककर जनेतेच्या अपेक्षा व पालकमंत्री, तसेच मुख्यमंत्री यांच्या सूचना लक्षात घेऊन शहरासाठी भाजपचा ध्येयनामा अंतिम करून प्रकाशित केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, महिला व तरुण यांच्यामार्फतच त्या त्या प्रभागात १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल, असे भाजपच्या शहर शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीला काळजी गोदाप्रदूषणाची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जनतादेखील शहराच्या विकासाची भागीदार असावी या संकल्पनेतून भाजपकडून ध्येयनामा तयार करण्यासाठी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. मात्र, गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर सुमारे ४३ हजार ६७७ नाशिककरांनी प्रभाग विकासाबद्दल आपल्या सूचना नोंदविल्या आहेत. विशेष म्हणजे शहरात सुमारे ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार इतक्या अल्प मतदारांनीच आपले मत नोंदवले असतानाही मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. त्यामुळे स्थानिक भाजपेयींकडून मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूल केली गेल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत शंभर प्लसचे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. शहराचा लोकाभिमुख विकास व पारदर्शी कारभारासाठी जनतेकडून जाहीरनाम्याबद्दलच्या अपेक्षा जाणून घेण्याचा निर्णय घेत, त्यासाठी मतदारांकडूनच सूचना मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २६ जानेवारीला ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. या संकल्पनेतून भाजप निवडणुकीसाठी पक्षाचा ध्येयनामा जनतेसमोर सादर करणार आहेत. गेल्या १३ दिवसांत या पोर्टलवर ४३ हजार ६७७ इतक्या नाशिककरांनी प्रतिसाद दिला असून, आपल्या सूचना नोंदवल्या आहेत. शहरात ११ लाख मतदार असताना केवळ ४३ हजार मतदारांनीच या अभियानाला प्रतिसाद दिला आहे. अल्प प्रमाणात प्रतिसाद असतानाही, स्थानिक भाजप नेत्यांनी स्वतःसह पक्षाची पाठ थोपटून घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून या उपक्रमाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ध्येयनामा येणार शुक्रवारी

नाशिककर जनेतेच्या अपेक्षा व पालकमंत्री, तसेच मुख्यमंत्री यांच्या सूचना लक्षात घेऊन शहरासाठी भाजपचा ध्येयनामा अंतिम करून प्रकाशित केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, महिला व तरुण यांच्यामार्फतच त्या त्या प्रभागात १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल, असे भाजपच्या शहर शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सराईताची हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीतील तीन ते चार विद्यार्थ्यांनी मिळून एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराची भरदिवसा हत्या केली. पंचवटीतील उन्नती शाळेजवळ झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांकडून हत्या होण्याची जिल्ह्यातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

ऋतिक उर्फ पाप्या राजू शेरगिल (वय १७, रा. फुलेनगर) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. शेरगिलवर दोन हत्या, तसेच लुटमारीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भक्तिधामसह परिसरात तो सातत्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. अल्पवयीन असल्याने पोलिसांकडून पकडूनही त्याला फारसा फरक पडत नव्हता. यातून पाप्याच्या नावे अनेक गुन्हे जमा झाले. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उन्नतीशाळेजवळ एका वडापावच्या दुकानाजवळ पाप्या थांबलेला असताना तीन ते चार विद्यार्थ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. चाकूसारख्या धारदार शस्त्राने संशयित मुलांनी पाप्याच्या गळ्यावर सपासाप वार केले. पाप्याला लागलीच खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ऋतिक उर्फ पाप्या राजू शेरगिलवरील हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या मुलांपैकी एकाचे दप्तर घटनास्थळी पडले. पोलिसांनी ते जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पाप्याने हल्लेखोर विद्यार्थ्यांपैकी एकास मारहाण केली होती. त्यामागे एका मुलीचे प्रकरण होते. पाप्या सातत्याने परिसरात दहशत निर्माण करीत होता. विशेषतः शाळा परिसरात त्याचे वास्तव्य राहायचे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एका संशयितास ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते. सर्व संश​यित फुलेनगर परिसरातील आहेत.

पाप्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल होते. लूटमार, खुनाचा प्रयत्न अशा इतर अनेक गंभीर गुन्ह्यांचाही यात समावेश होता. पाप्याला पोलिसांनी बाल न्यायालयात काही काळापूर्वी हजर केले होते. त्या वेळी त्याने आपल्याला आणखी तीन खून करायचे असून, ते झाल्यानंतरच समाधान मिळेल असे सांगितले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या दप्तरामध्ये पॅड, क्रीम बिस्कीटचा पुडा, शाळेची पुस्तके सापडली.
हल्ला करणारे शाळकरी विद्यार्थी आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून याकडे पाहावे, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिठ्ठी पद्धतीने पदवीधरांची भंबेरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च विद्याविभूषित आणि विचारी मतदारसंघ म्हणून ओळख मिरविणाऱ्या पदवीधर निवडणुकीत यंदाही पारंपरिक पद्धतीनेच मतदान करावे लागल्याने हजारो टेक्नोसॅव्ही पदवीधर मतदारांची भंबेरी उडाली. या निवडणूक प्रक्रियेसाठी झालेल्या अवाढव्य खर्चाऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिंगसाठी प्रयत्न झाले असते, तर १५ हजारांवर उमेदवारांची मतेच बाद ठरली नसती, असा सूर आळवला जात आहे.

निवडणुकीसंदर्भातील प्रचार यंत्रणेपासून तर प्रत्यक्षात मतमोजणीपर्यंत इतर सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वापरली जाते. पण, नवतंत्रज्ञानविषयक बदलांशी सर्वांत आधी जुळवून घेणाऱ्या पदवीधर मतदारास जुन्याच पद्धतीने मतदान करावे लागले.

एकंदरीतच पदवीधरसोबत जिल्हा परिषद अन् महापालिकेच्या निवडणुकीचा माहोल यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची पांगापाग झाली. पारंपरिक पद्धतीनेच मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी किचकट ठरणारी यंत्रणा, याद्यांमधील घोळ, गहाळ झालेली किंवा अन्य केंद्रांवर गेलेली नावे या सर्व प्रक्रियेत कसेबसे मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेल्या उच्चशिक्षित मतदारांनी थोडा वेळ नाव न सापडल्यास थेट काढता पाय घेतला, तर यापैकी काहींनी मोठ्या मुश्किलीने नाव शोधून मतदानाचा हक्क बजावला. पण, यातील अनेकांना मतदान प्रत्यक्षात कसे करावे याची माहिती नव्हती. केंद्रात गेल्यानंतर सुचेल त्या पद्धतीने मतदान करीत सुमारे १५ हजार मतदारांनी मत वाया घालविले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग असते, तर टेक्नोसॅव्ही तरुणांचा या मतदानाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला असता व इतके मतदानही वाया गेले नसते, असा मुद्दाही आता पुढे आला आहे.

---

आयोगाने बनावे टेक्नोसॅव्ही

एकीकडे निवडणूक आयोग मतदार जागृती कार्यक्रमावर विशेष भर देत आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून विविधढंगी उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मतदात्यांशी संवाद साधणाऱ्या मोबाइल व्हिडीओपासून सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या साधनांचा उपयोग निवडणुकांसाठी करून घेतला जात आहे. असे असताना मात्र पदवीधर निवडणुकांच्या बाबतीत आयोगाने उदासीनता दाखवून काय साधले, असा सवाल तरुण मतदारांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांशी संवाद साधून मतदानाद्वारे लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचे माध्यम वापरले. मात्र, पदवीधरमध्ये मत करण्यासाठी पारंपरिक चिठ्ठी पद्धत, मतमोजणीसाठी पारंपरिक पद्धत वापरण्यात आली. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांची नेमणूक, त्यांना देण्यात येणारा विशेष भत्ता, पारंपरिक मतमोजणीसाठी पूरक सामग्री, सुरक्षेसाठी पुरेसे कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

---

औषधालाही नव्हते अॅप

निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच्या नियोजनात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण, याला पदवीधर निवडणूक अपवाद ठरली. कुंभमेळ्यासारख्या मेगा इव्हेंटपासून तर महापुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणारे अॅप्स प्रशासनाने तयार केले आहेत. पदवीधर मतदारांशी संवाद साधणारे अन् मतदान पद्धती स्पष्ट करणारे अॅप आयोगानेही बनविले असते, तर किमान बाद होणारे मतदान रोखण्यासोबतच मतदानाची टक्केवारीही वाढविता आली असती, अशी अपेक्षाही पदवीधर मतदात्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकगठ्ठा मतदानाने एकतर्फी बाजी!

$
0
0



jitendra.tarte@timesgroup.com / Twitter : @jitendratartemt

नाशिक ः राज्य सरकारच्या शिक्षणक्षेत्रातील वादग्रस्त निर्णयांच्या यादीत अलीकडे भर पडत असल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांचे असेच निर्णय केंद्रस्थानी ठेवत पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात एकगठ्ठा मतदान टाकल्याने काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना केवळ एकतर्फी विजयच नाही, तर आघाडीची मतेही मिळाली. त्यामुळे शिक्षक संघटनांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरल्याची चर्चा जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आहे.

विद्यमान सरकारने कारभार हाती घेतल्यापासून गत सरकारची शैक्षणिक तरतूद पुसून टाकण्याचा आरोप संस्थाचालकांकडून होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये बहुतांश शिक्षण संस्था अन् शिक्षणसम्राट हे काँग्रेस अन् राष्ट्रवादीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निगडित आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्रिपदाचा चार्ज हाती येताच तावडे यांनी लावलेला निर्णयांचा धडाका अगोरदपासूनच या क्षेत्राची नाराजी ओढावून गेला होता. यातील टीका झालेल्या बाबींमध्ये चुकीची शैक्षणिक धोरणे , सातत्याने बदलणारे नवनवे अध्यादेश, शिक्षण क्षेत्रातील जाचक निर्णय, अंशदायीन पेन्शन योजना, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, संस्थाचालकाची स्वायत्ता काढून घेण्याचा प्रयत्न, मुख्याध्यापक अतिरिक्त ठरविणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती थांबविणे, क्रीडा व कलाशिक्षकांची पदे रद्द करणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामे देणे, २० टक्के अनुदान मूल्यांकन होऊनही न देणे, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मोर्चे, आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करणे आदी मुद्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)सह विविध संघटनांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक हाताशी घेतली होती. ‘टीडीएफ’च्या जोडीला मुख्याध्यापक संघटना, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी संघटनांनी मोट बांधत काँग्रेसच्या दिशेने बहुसंख्य मते वळविली.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांनी तब्बल ४२ हजार ८२५ मतांची आघाडी घेतली. शिक्षक संघटनांच्या भूमिकेमुळे ही लढत शिक्षणमंत्री विरुद्ध शिक्षक संघटना अशी बनत गेली. याचा पुरावाही निकालाअंती मतपेटीने दिला आहे.

_ _ _

जोखीमही ठरली बिनकामाची

भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्र्यांसह सारा लवाजामा घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी विविध शिक्षक संघटना आणि संस्थाचालकांसोबत झालेल्या बैठकीत संस्थाचालकांची नस दाबत शिक्षक भरतीसारखी अप्रत्यक्ष आश्वासने देऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. यावर आचारसंहिताभंगाची तक्रारही दाखल झाली होती. इतकी जोखीम घेऊनही उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळाने शिक्षणमंत्र्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांबोळी नगराला समस्यांचे ग्रहण

$
0
0

कच्च्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

हिरावाडी परिसरातील तांबोळी नगरमधील नागरिक रस्ते, वीज आणि पाणी या मुलभूत समस्यांमुळे त्रस्त झाले आहे. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या समस्यांमध्ये प्रामुख्याने येथील कॉलनी रस्त्यांचे अजूनही डांबरीकरण झालेले नाही. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, आता या रस्त्यावरील माती वाहून गेल्याने रस्त्यावर केवळ दगड गोट्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मोटरसायकल स्लीप होऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

या परिसरातील नागरिकांकडून सर्व कर वसूल केला जातो. तरीही सुविधांच्या बाबतीत टाळाटाळ का, असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. शिवाय या परिसरातील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. अंधारामुळे चोऱ्या होण्याची भीती असून समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

आमच्या परिसरातील रस्ते कच्चे आहेत, रस्त्यावर दगड गोट्यांचे साम्राज्य पसरले आहे. पथदीप बंद असल्याने रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, घंटागाडीदेखील वेळेवर येत नाही.

-पंकज सोनार, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जू..’ आत्मकथनाला ‘गावगाडा’ पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘जू..’ या आत्मकथनाला वडशिवणे (ता. करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मित्रमंडळातर्फे देण्यात येणारा ‘गावगाडा’ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख ५,५०१ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीतील ज्येष्ठ साहित्यिकांनी एकमताने या पुरस्कारासाठी ‘जू..’ या आत्मकथनाची निवड केली आहे.

साहित्यक्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने याआधी प्रसिद्ध साहित्यिक पार्थ पोळके यांना ‘आभरान’ या आत्मकथनासाठी तर प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना ‘सिझर कर म्हणतेय माती’ या कवितासंग्रहासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

येत्या १२ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रदीपकुमार आवटे यांच्या हस्ते, सैराट आणि फँड्री चित्रपटातील अभिनेते डॉ. संजय चौधरी यांच्या अध्यक्षतेत आणि पार्थ पोळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वडशिवणे येथे पाटेकरांना हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

ऐश्वर्य पाटेकर हे के. के. वाघ कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या ‘भुईशास्त्र’ या पहिल्याच कवितासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक प्रतिष्ठेच्या राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. उडिया, बंगाली, उर्दू, इंग्रजी आदी भाषांमध्ये कवितांचे अनुवाद झाले आहे.

ज्या गावगाड्याने दुष्काळाचे अन पाणकळ्याचे धडे माझ्या समोर वाचून माझं अनुभवविश्व समृद्ध केलं. याच गावगाड्याने माती, माणसं, निसर्ग यांची खरीखुरी ओळख करून देत, मला लिहिते केले; त्या गावगाड्याचा हा सन्मान आहे.

-ऐश्वर्य पाटेकर, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सामान्यांसाठी यशस्वी बना!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

कुठल्याही यशाचे शिलेदार केवळ आपण एकटे नसतो. त्यामागे अनेकांचे आशीर्वाद अन् प्रेरणा असतात. या प्रेरणा घेऊन जनसामान्यांच्या गालांवरील अश्रू पुसण्यासाठी अन् एका ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी यशस्वी बना, असे आवाहन माजी पोलिस आयुक्त डॉ. संजय अपरांती यांनी केले.

डॉ. अपरांती हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व केटीएचएम कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या आयोजनप्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे, प्रा. पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळ जिल्हा समन्वयक प्रा. डी. एच. शिंदे, संजय सावळे, सोमनाथ कोहरे, प्रा. डोखळे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींसाठी विविध वेबसाइट उपलब्ध आहेत. त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होत असतो, असेही डॉ. अपरांती यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या उद्देशाने विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे प्रा. दीपक शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनत व जिद्दीने मी पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरी मिळवली. यासाठी ४ वेळा परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारचे वाचन, अभ्यासात सातत्य, योग्य मानसिकता, विचार या गोष्टींमुळे आपल्या ध्येयात यशस्वी झाल्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कोहरे यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय सावळे यांनी केला. यावेळी प्रा. ए. पी. मोरे, प्रा. योगेशकुमार होले, विकास कुलकर्णी, दीपक साठे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडाप्रेमींना प्रतीक्षा पॅव्हेलियन उभारणीची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली हे क्रीडा प्रेमी शहर म्हणून ओळखले जाते, त्यामुळे येथील क्रीडाप्रेमींची गरज ओळखून खासदार निधीतून वर्षभरापूर्वी येथील आनंद रोड मैदानावर क्रीडाप्रेमींसाठी पॅव्हेलियन बांधकाम वर्ष उलटूनही विविध परवानग्यांअभावी रखडून पडले आहे.

देवळालीत शहरात खेळाडूंना चालना देण्यासाठी आनंद रोड येथील मैदान राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र या मैदानावर क्रीडा प्रेमींसाठी विविध स्पोर्ट्स क्लबकडून क्रिकेट, फुटबॉलसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र खेळाडू व क्रीडा प्रेक्षकांना बसण्यासाठी आयोजकांना मंडप टाकावा लागतो.

मैदानावर केवळ खड्डेच

उन्हापावसात बसणाऱ्या क्रीडाप्रेमींना खेळाची मजा अनुभवता यावी याकरिता खासदार हेमंत गोडसे यांनी स्टेडियम उभारणीच्या कामासाठी ५० लाख रुपयाचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डाला गतवर्षी दिला. त्या निधीमधील पहिला २५ लाख रुपये निधी कॅन्टोन्मेंटला वर्गदेखील करण्यात आला आहे. मात्र वर्ष उलटून केवळ या ठिकाणी पॅव्हेलियनच्या पायासाठी लागणारे केवळ खड्डेच खणून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात वाळू व बांधकामासाठी लागणारे साहित्य पडून आहे. लवकर हे काम पूर्ण झाल्यास क्रीडा प्रेमींना बसण्यासाठी सोय होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे वस्त्रहरण सुरूच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपवर होत असलेल्या आरोपांचा सिलसिला कायम आहे. भाजपच्या आणखी एका इच्छुक उमेदवाराने भाजपने पैसे घेऊन तिकिटे वाटल्याचा आरोप मंगळवारी केला आहे. प्रभाग क्र. १६ मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार रेखा दाणी यांनी सर्वेक्षणात आपले नाव टॉपला असतानाही, आपले तिकीट ऐनवेळी पैशांसाठी कापण्यात आल्याचा आरोप भाजपवर केला आहे. कुटुंबाची इच्छा नसतानाही अर्ज माघारी घ्यावा लागत असल्याचे सांगत, माघारीसाठी आपल्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी दबाव आणल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, फरांदे यांनी आरोप फेटाळले असून, आपण दाणी यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे.

राज्यात सत्ता असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. निवडणुका जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवत भाजपने जिंकेल त्यालाच उमेदवारी देण्याचा फंडा स्वीकारल्याने निष्ठावंत मोठ्या प्रमाणावर डावलले गेले. आर्थिक सक्षमता बघून उमेदवारी देण्यात आल्या. त्यामुळे भाजपवर तिकिटासाठी पैसे घेतल्याचे जाहीर आरोप झाले. उमेदवारीसाठी भाजप कार्यालयात दोन लाख घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यापाठोपाठ गोपाळ पाटील यांचा दहा लाख देऊनही उमेदवारी नाही असा एक व्हिडीओ व्हायरला झाला. त्यामुळे भाजपने तिकिटांसाठी बाजार मांडल्याचा आरोप स्वपक्षीयांसोबत विरोधकांकडून होऊ लागला. ही दोन प्रकरणे सावरत असतानाच, माघारीच्या दिवशीही भाजपवर पैशांचा आरोप झाला आहे.

प्रभाग क्र. १६ मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार रेखा दाणी यांनी भाजपवर तोफ डागली आहे. माघारीच्या वेळेस त्यांना अक्षरशः रडू कोसळले. या वेळी अर्ज माघारी घेतल्यानंतर त्यांनी पैसे घेऊन नेत्यांनी तिकिटे विकल्याचा आरोप केला आहे. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात आपण टॉपवर होतो. दुपारपर्यंत माझी उमेदवारी निश्चित होती. मात्र, ऐनवेळी माझी उमेदवारी कापून उज्ज्वला हिरे यांना देण्यात आली.

‘माघारीसाठी आमदार फरांदेंचा दबाव’

उज्ज्वला हिरेंकडून पैसे घेऊन तिकीट दिले असून, आमची आर्थिक स्थिती काढल्याचा आरोप इच्छुक उमेदवार रेखा दाणी यांनी केला. आमचे नाव पुढे असताना दोन मिनिटांत तिकीट बदलले. पैसे घेऊन माझी उमेदवारी बदलण्यात आली असे सांगत, भाजपमध्ये पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. आपल्याला अपक्ष निवडणूक लढायची होती; परंतु आमदार फरांदे यांनी माघारीसाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणींत वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालदेवी पात्रातील पुलाची दुरवस्था

$
0
0

चेहेडी ते बेलतगव्हाणदरम्यानची वाहतूक धोकादायक; दुरुस्तीची मागणी करूनही दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चेहेडी ते बेलतगव्हाण या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्स्त्यावरील वालेदेवी नदी पात्रातील पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलावरील गार्ड स्टोनदेखील गायब झाले आहेत. परिणामी, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजेससाठी जाण्यासाठीही हाच पूल असून तो पाण्याखाली गेल्यावर त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तसेच गार्ड स्टोन तुटल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत या पुलाची दुरुस्तीच्या मागणीकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

नाशिक मनपाच्या हद्दीला लागून असलेल्या बेलतगव्हाण या गावाला नाशिकरोडशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन येथे वालदेवी नदीच्या पात्रात पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार बबनराव घोलप यांच्या प्रयत्नांतून पूल उभारण्यात आला होता. परंतु, आजमितीस या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे.

गार्ड स्टोन वाहून गेले

वालदेवी नदीला गेल्या पावसाळ्यात पूर आला होता. त्यामुळे या पुराच्या पाण्यात या पुलावरील गार्ड स्टोन्स वाहून गेले आहेत. आता पुलावरून येजा करणारी वाहने खाली नदी पात्रात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलाचा संपूर्ण स्लॅबही उखडला आहे. त्यामुळे स्लॅबमधील लोखंडी स्टील उघडे पडले आहे. या स्टीलपासून वाहनांनाही धोका निर्माण झाला आहे. काही पादचाऱ्यांना यापूर्वीच या स्टीलमुळे दुखापत झाली आहे.

कमी उंची धोकादायक

या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल वारंवार वालदेवीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळेच या पुलाचे जास्त नुकसान झाले आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी या पुलाची उंची वाढविणे काळाची गरज असून उंची वाढवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘वॉर रूम’ची शोधाशोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या प्रचारयुद्धाला आता तोंड फुटले असून, प्रचार कार्यालय अर्थात प्रचाराच्या वॉर रूमसाठी मोक्याची जागा पटकावण्याकडे पक्षांचा कल वाढला आहे. मोक्याच्या जागेवर प्रचाराची ‘वॉर रूम’ असावी, यासाठी आता शोधाशोध सुरू झाली आहे. त्यासाठी खास कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. प्रचार कितीही हायटेक झाला असला तरी पारंपरिक माध्यमांचाही आधार घेतला जात आहे. कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी, प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी किंवा बैठकी घेण्यासाठी प्रचार कार्यालयाची आवश्यकता असल्याने त्यांचा शोध घेणे सुरु केले आहे. मोक्याच्या जागेवर कार्यलय असावे, दर्शनी भागात असावे व ते कार्यकर्त्यांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे व्हावे, अशा जागांना प्राधान्य दिले जाते. ही कार्यालये शोधण्यासाठी प्रमुख चौकांमधील दुकाने शोधण्यासाठी पक्षांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे.

प्रतिस्पर्ध्यासमोरच कार्यालयाचा प्राधान्य

काही ठिकाणी जागा उपलब्ध आहे; परंतु त्यांच्या कागदपत्रांमध्ये अपूर्तता असल्याने त्या उपलब्ध होऊनही वापरू शकत नाही. निवडणूक आयोगाने प्रचार कार्यालय सुरू करताना मिळकतीची कागदपत्रे पूर्ण असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जागा शोधणे जिकिरीचे झाले आहे. शक्यतो जागा निवडताना प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचार कार्यालयासमोर जागा निवडण्यास प्राधान्य दिले जात आहे.

‘वॉर रूम’ला नियमांची तटबंदी

प्रचारासाठी जागा निवडल्यानंतरही ती जागा निरीक्षकांकडून मंजूर करून घ्यावी लागत असल्याने कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. उपलब्ध झालेल्या जागेचे क्षेत्रफळ, त्यात असलेल्या सुविधा, तसेच त्या ठिकाणी मंडप टाकणार आहे का, तो मंडप किती मापाचा असणार आहे, त्या ठिकाणी किती झेंडे लावण्यात येणार आहेत, तसेच कोणत्या नेत्याचे कटआऊट लावण्यात येणार आहे या सर्व बाबींची महिती निरीक्षकांना द्यावी लागत आहे. प्रचार कार्यालयाच्या जागेचा शोध घेण्यासाठी जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जात असून, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागा प्रचार कार्यालयासाठी पडताळून पाहिल्या जात आहेत. लवकरात लवक प्रचार कार्यालये सुरू करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारनाट्याने दमछाक

$
0
0

एकूण ४६१ उमेदवारांची माघार; १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारचा दिवस नाट्यमय माघारींनी चांगलाच गाजला. बंडखोरांना थांबवण्यासाठी पक्षांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करीत जेरीस आणले. माघार घेताना अनेकांना रडू कोसळले, तर अनेकांच्या कुटुंबीयांनी माघारीला विरोध करीत थेट माघार अर्जच फाडले. काही बंडखोरांनी तिकिटासाठी सौदेबाजीचा आरोप पक्षावर केला, तर काहींनी पक्षनेत्यांचा घाम काढला. शिवसेना-भाजपने बाहुबली नेत्यांना कामाला लावून अनेकांची माघार करवून घेतली. यामुळे १२२ जागांसाठी आता विक्रमी ८२१ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप व शिवसेने बंडखोरांना आवरण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. त्यात शिवसेनेला चांगले यश आले, तर भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोर आहेत. भाजप व शिवसेना या दोन पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोर होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांची डोकेदुःखी वाढली होती. भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरांची संख्या होती. त्यामुळे भाजपचे माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नाराजांची मनधरणी केली. त्यात काही प्रमाणात यश आले असले, तरी सर्वाधिक बंडखोर मात्र भाजपमध्येच आहेत. विभागीय कार्यालयांमध्ये झालेल्या माघारी नाट्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. बंडखोरांना माघारीसाठी आमिष दाखविण्यात आले, तर काहींवर थेट बाहुबलीच सोडण्यात आले. प्रभाग १६ मधील रेखा दाणी यांचा माघार अर्ज पती विजय दाणी यांनी फाडून टाकला. त्यानंतर माघारीसाठी भाजपने दबाव आणल्याचा आरोपही दाणी यांनी केला. प्रभाग ३० मध्ये देवानंद बिरारी यांचा माघार अर्ज त्यांच्या मुलीने फाडून टाकला.

भाजपात सर्वाधिक बंडखोरी

प्रभाग २३ मधून गोपाळ पाटील यांनी माघार घेतली असली, तरी प्रभाग १४ मध्ये अहमद काझी या अधिकृत उमेदवाराने डावलल्याचा आरोप करीत पक्षाला न सांगताच उमेदवारी माघार घेतली. यामुळे भाजपला पुरस्कृत उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. प्रभाग २५ मध्ये सोनल मंडलेचा, प्रभाग ७ मध्ये मधुकर हिंगमिरे, प्रभाग १२ मध्ये सुरेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अधिकृत उमेदवारांविरोधात जवळपास दहा प्रभागांमध्ये बंडखोरी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. रामदास सदाफुले, गिरीश पालवे, रणजीत नगरकर, भावना नारद, छाया आढाव यांनी माघार घेतल्याने भाजपला हायसे वाटले.

शिवसेनेला दिलासा

देवानंद बिरारी, प्रवीण दाते, सुनील कमोद, दीपक बडगुजर, भूषण देवरे, माजी महापौर विनायक पांडे याचे चिरंजिव ऋतुराज पांडे, भारती ताजनपुरे, पद्मा थोरात, श्याम खोले, नितीन चिडे, सुधाकर जाधव यांनी माघार घेतल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला.

१७ मध्ये ६६ उमेदवार

महापालिका निवडणुकांसाठी जवळपास १२८२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सोमवारी ६६ उमेदवारांनी तर, मंगळवारी ३९५ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे एकूण ४६१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्र.१७ मध्ये सर्वाधिक ६६ उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीसीपीआरमध्येही कपाट बंदच?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहराचा विकास आराखडा भागशः जाहीर केल्यानंतर तब्बल महीनाभरानंतर शहर विकास नियंत्रण नियमावली बिल्डरांच्या हाती आली आहे. सरकारकडून अधिकृतपणे डीसीपीआर जाहीर झाला नसला तरी बिल्डरांकडून प्राप्त झालेल्या डीसीपीआरमध्ये शहराच्या जिव्हाळ्याचा कपाट प्रश्न सुटला नसल्याचे चित्र आहे. तसेच सहा व साडेसात मीटर रस्त्यावरील टीडीआर व एफएसआयचा गोंधळ कायम राहिल्याने बांधकाम व्यवसायाला बुस्टर डोस मिळण्याऐवजी व्यवसायाला मरगळच येणार आहे.
डीसीपीआरमध्ये आरक्षणाच्या बदल्यात रिझर्व्हेशन क्रेड‌िट बॉण्‍ड, आयटी पार्कसाठी अतिरिक्त एफएसआय, २१ दिवसांत भोगवटा प्रमाणपत्र देणे सक्तीचे केल्याने काही अंशी दिलासा मिळणार असला तरी शहर विकासाला बाधा ठरणाऱ्या तरतुदींचाच भड‌िमार करण्यात आल्याने नाशिकवरील अन्यायाची परंपरा कायम राह‌िली आहे.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता व रणधुमाळी सुरू असतानाच शहरवासियांसाठी जिव्हाळ्याची ठरणारी शहर विकास नियंत्रण नियमावलीची प्रत काही बांधकाम व्यावसायिकांच्या हाती लागली आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी, हा डीसीपीआर नाशिकचा असल्याचे समोर आले आहे. शहरात गेल्या दोन वर्षांपासून बांधकामातील कपाटांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. जवळपास सहा हजारांहून अधिक बांधकाम परवानग्या यामुळे रखडल्या आहेत. शासनाने नव्या विकास नियंत्रण नियमावलीतून सूट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या नजरा याकडे लागून होत्या. निवडणुकीच्या धामधुमीत बुधवारी नियमावलीच्या प्रत‌ी सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यात मूळ चटईक्षेत्रात (एफएसआय) दहा टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली असली तरी त्यातून कपाटाचा शंभर टक्के प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे चित्र आहे. कपाटांचा दिलासा मिळाला नसताना दुसरीकडे बाल्कनी बंद‌िस्त करता येणार नसल्याची स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा मह‌िना अशी अवस्था बांधकाम व्यवसायाची होणार आहे. नियमावलीची प्रत खरी ठरल्यास नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला बुस्टर डोस मिळण्याऐवजी तो अधोगतीकडे जाणार आहे. दरम्यान, या डीसीपीआरवर अधिकृत सही व शिक्का नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या डीसीपीआरला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तरीही ही नियमावली बाहेर आलीच कशी यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

तरीही दिलासा!
या डीसीपीआरमध्ये एकीकडे कपाटाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे दिसत नसले तरी,काही दिलासादायक बाबी मात्र समोर आला आहे. डीसीपीआरमध्ये मेट्रोची तरतूद करण्यात आली आहे. झोन बदलाचे अधिकार आयुक्तांना बहाल करण्यात आले आहेत. नदीपात्र ते ब्लू लाइनमधील बांधकामांना यापुढे परवानगी नाकारण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकांना २१ दिवसांत भोगवटा प्रमाणपत्र मिळणार आहे. गावठाणातील ब्लू लाइन व रेड लाइनमधील बांधकामांना परवानगी देण्यात आल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. आयटी पार्कसाठी अतिरिक्त एफएसआय देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेत अवतरणार महिलाराज!

$
0
0

pravin.bidve
@timesgroup.com
Tweet : @bidvepravinMT
नाशिक : निवडणुकांच्या रणसंग्रामाद्वारे महापालिकेच्या सभागृहात पाऊल टाकण्यासाठी अनेक महिलांनी कंबरेला पदर खोचला आहे. पन्नास टक्के आरक्षणामुळे ६१ महिलांना महापालिकेच्या सभागृहात हक्काने विराजमान होता येणार आहे. याखेरीज अन्य १७ जागांवरही दावा करीत एकूण ३८६ महिला उमेदवारांनी पुरुषांनाच आव्हान दिले आहे. हक्काच्या ६१ जागांशिवाय अन्य जागांवरही महिला उमेदवार निवडून आल्यास महापालिकेत महिलाराज पहावयास मिळणार आहे.
शहर विकासाची धुरा सांभाळणाऱ्या महापालिकेसाठी २१ फेब्रुवारीला निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेशण्याची संधी नागरिकांना पाच वर्षांनी चालून आली आहे. संधीचे सोने करण्यासाठी शेकडो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला राखीव आणि सर्वसाधारण अशा विविध गटांमधून उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश महिला प्रथमच निवडणूक लढवित असून अनेकींनी अद्याप महापालिकाही पाहिलेली नाही. राजकीय पक्षाकडून स्वत:ला उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. काहींनी महिला राखीव प्रभागातून आपले आव्हान उभे केले आहे. अर्ज माघारीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, शहरातील ३१ प्रभागांमध्ये तब्बल ३८६ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १५ आणि १९ हे दोन प्रभाग वगळता प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक महापालिकेवर निवडून जाणार आहेत. १२२ जागांपैकी ६१ जागा केवळ महिलांसाठी राखीव असून या जागांसाठी शहरात ३८६ उमेदवार इच्छुक आहेत. प्रभाग १९ मध्ये पाच, २५ मध्ये नऊ तर ५, ९, २४ आणि २८ या प्रभागांमध्ये प्रत्येकी आठ महिला उमेदवार आहेत. प्रभाग १५ मध्ये ११, १२ मध्ये १० तर सातमध्ये सहा उमेदवार आहेत.

...सर्वाधिक महिला ११ मध्ये
सर्वाधिक २३ महिला उमेदवार एकट्या प्रभाग ११ मध्ये आहेत. प्रबुध्दनगर, सातपूर गाव आणि कॉलनीचा हा परिसर आहे. त्यामध्येही अनुसूचित जातीमध्ये एका जागेसाठी ११ तर सर्वसाधारण महिला गटात एका जागेसाठी १२ महिला एकमेकींविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्याखालोखाल २० महिला प्रभाग १६ मध्ये तर १९ महिला प्रभाग आठमध्ये आपले भवितव्य आजमावत आहेत. सर्वात कमी चार महिला प्रभाग २० मध्ये आहेत.

महिला विरुध्द पुरुष
काही महिलांनी सर्वसाधारण तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसुचित जमाती, गटातून पुरुष उमेदवारांसमोर आपले आव्हान उभे केले आहे. प्रभाग १, २, ४, ५, ६, ८, १०, १३, १४, १६, १७, १८, २१, २३, २७, ३०, ३१ मध्ये महिलांनी पुरुषांना आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिमण्या’ प्रयत्नांनी माणुसकीला गहिवर!

$
0
0

संजय लोणारी, येवला
दोन पावलांवर टुणटुण उड्या मारत अंगणभर बागडणारी अन् भुर्रकन उडून जाणारी चिमणी.. जितकी ती चपळ तितकीच ती भावनाशीलही असते, हे अनेकदा सिध्द झालेले आहे. चिऊताईच्या या भूतदयेचा अनुभव येवल्यात नुकताच आला.
पोटात अन्नपाणी नसल्याने म्हणा, की इतर कुठल्या कारणाने एक चिमणी झाडावरून पडली. ‘म्हणून तरुच्या तळी निजली ‌ती द्विजा भूवरी’ असेच हे चित्र होते. ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी, चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी’ अशी तिची ही तडफड पाहून तिची जोडीदारीण चिमणी तेथे आली. जोडीदारीणीने मुखात कधी दाणापाणी घालण्याचा, तर कधी तिला हलवून जणू ‘उठा उठा चिऊताई’ म्हणत तिला एकप्रकारे शुद्धीवर आणण्याचा, वाचविण्याचा प्रयत्न केला. ‘तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे’ असे हे चित्र पाहून माणुसकीलाही गहिवरून आले.
येवल्यात मंगळवारी दिसलेलं हे मानवजातीला माणुसकीच्या संदेशासह भूतदयेचा बोध देऊन जाणारे होते. मंगळवारी सकाळी उन्हाचा चटका लागल्याने एका झाडावरून अचानक एक चिमणी खाली पडली. ही चिमणी व्याकूळतेने तडफडत होती. अशात हे चित्र जवळच असलेल्या जयदीप दाभाडे या युवकाच्या नजरेत पडले. त्याने सुरुवातीला बाटलीच्या एका छोट्या झाकणात पाणी आणून ठेवले खरे, मात्र तडफडणारी चिमणी पाणी पिण्याच्या अवस्थेत नव्हती. अशातच झाडावरून चिवचिव करत एक दुसरी चिमणी आली अन् मग सुरू झाले ते आपल्या पक्षी जातकुळातील जोडीदारीणीला वाचवण्याचे अनोखे प्रयत्न. चिवचिव करणारी दुसरी चिमणी दाभाडे यांनी बाजूला ठेवलेल्या झाकणातील पाणी आपल्या चोचीत घेऊन अखेरचा श्वास घेऊ पाहणाऱ्या चिमणीच्या चोचीत भरायची. प्रारंभी चिमणीची चोच तिने आपल्या चोचीने उघडताना आपल्या पाय व चोचीच्या स्पर्शाने तिला जागवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. कधी ही चिमणी झाडावर जायची पुन्हा खाली येताना पडलेल्या चिमणीला भरवायचा प्रयत्न करायची. एका चिमणीला वाचवायचे हे प्रयत्न जवळपास अर्धा तास सुरू होते. अधूनमधून तडफडणाऱ्या चिमणीमुळे दुसऱ्या चिमणीचे प्रयत्न पुन्हा वेग घ्यायचे. चिमणीला वाचविण्याचे हे आटोकाट प्रयत्न अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांती जरी सफल झाले नाही तरी तिचे प्रयत्न मनुष्यप्राण्याला एक मोलाचा संदेश देऊन गेले.

भूतदयेचा संदेश

ब‌हीणाबाईंनी सुगरणीसाठी म्हटलेले ते शब्द येथेही अगदी तंतोतंत लागू होतात, ‘तिची उलूशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुले देले रे देवानं, दोन हात दहा बोटं’ . माणसाला दोन हात दहा बोटं असूनही त्याने या इवल्याशा चोचीकडून भूतदयेचे धडे घ्यावेत, असा संदेशच जणू या चिमणीने दिला. आजच्‍या धकाधकीच्या जमान्यात स्वतःचा विचार करण्यात मग्न असलेल्या माणसाला दुसऱ्याकडे पाहण्यास वेळच मिळत नाही. एखाद्या अपघाताची घटना घडताना ‘नको बाबा झंझट’ म्हणून अपघात स्थळाजवळून येणारे-जाणारे जवळपास अनेक जण आपला पाय काढता घेतानाचे चित्र तर नेहमीच दिसते. अशात पक्षीमात्रांतील एका चिमणीला वाचवण्याचे दुसऱ्या चिमणीचे प्रयत्न हे मानवानेदेखील बोध घेण्यासारखे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारीकडे लागले लक्ष

$
0
0

टीम मटा
पक्षीय उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, फिल्डिंग, उमेदवारी अर्ज दाखल यांसह समोरासमोर उभे ठाकलेले उमेदवार आणि छाननीनंतर आता जिल्हा परिषदेच्या माघारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गट-गणातून कोण माघार घेतो आणि कोण रिंगणात राहतो हे येत्या १३ फेब्रुवारीला माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. पक्षीय उमेदवारांनी मात्र निवडणुकीचे डावपेच आखण्यासह मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची वाहने पहाटेपासूनच गण-गट पिंजून काढत आहेत.

आतापासूनच ‘लाल दिव्या’वर डोळा

म. टा. वृत्तसेवा, येवला

मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अध्यक्षपदाच्या ‘लाल’ दिव्याची गाडी आपल्या नशिबी यावी यासाठी जिल्ह्यातील अनेक गटातील उमेदवारांनी अगोदरच मोठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. अध्यक्षपद हे ओबीसी स्त्री राखीव असल्याने अशा राखीव गटांकडे आतापासूनच अनेकांच्या नजरा आहेत. तालुक्यातील राजापूर व नगरसूल हे दोन गट या निवडणुकीत ‘ओबीसी स्त्री’ प्रवर्गासाठी राखीव आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा दराडे या राजापूर गटातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. १५ वर्षांपूर्वी झालेल्या झेडपीच्या निवडणुकीत राजापूरचा समावेश असलेल्या नगरसूल गटातून विजयी झालेल्या दराडे यांना झेडपीचे महीला व बालकल्याण सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली होती. नगरसुल ओबीसी स्त्री राखीव गटातून शिवसेनेच्या वतीनेच तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांच्या सूनबाई सविता पवार उमेदवार आहेत. पवार यांचीदेखील जिल्हा परिषद अध्यक्षपदावर नजर असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तगड्या बंडखोरांचा पक्षीय उमेदवारांना ताप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने गटाच्या ७ जागांसाठी ५६ तर गणाच्या १४ जागांसाठी १०५ असे एकूण १६० अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात अपक्षांची संख्या लक्षणीय आहे. तालुक्यात गटात १५ तर गणातून २० असे एकूण ३५ अपक्ष उमेदवार आहेत. विशेषतः सेना-भाजपातून निष्ठावंत असूनदेखील डावलले गेलेल्या इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून राजकीय पक्षांपुढे आव्हान उभे केले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष माघारीकडे लागले आहे.

जि. प. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांची गर्दी झाली होती. त्यात आयत्यावेळी पक्षात येवून अनेकांनी तिकीट मिळवल्याने नाराज बंडखोरांनी थेट अपक्ष म्हणून गण व गटातून उतरण्याची तयारी केली आहे. सात गटांपैकी रावळगाव व झोडगे गटात अपक्षांचा बोलबाला आहे. रावळगाव हा एकमेव खुला गट असल्याने येथे चार इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

तर झोडगे गटातदेखील तितकेच उमेदवार अपक्ष आहेत. यासह अन्य गटांमध्ये देखील एक-दोन अपक्ष उमेदवार असल्याने राजकीय पक्षांना मतांची विभागणी टाळण्यासाठी या अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे.

पंचायत समितीसाठी देखील एकूण २० अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला आहे. त्यात पाटणे आणि रावळगाव गणातून सर्वाधिक तीन-तीन उमेदवार आहेत. त्यासोबतच झोडगे, वडनेर, सौंदाणे गणाचे आरक्षण व पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण देखील सर्वसाधारण महिला असल्याने सभापती पदासाठी रेसमध्ये असलेल्या अनेक मातब्बर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. पंचायत समिती गणातून उमेदवारी देतांना सेना भाजपकडून निष्ठावंतपेक्षादेखील नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेक नाराजांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. याचीही फटका शिवसेना भाजपला बसू शकतो.

सर्वच गट व गणातून अपक्षांची संख्या लक्षात घेता प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांपुढे अपक्षांचे आव्हान असणार आहे. या अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न येत्या काही दिवसात होतील. त्यामुळे १५ फेब्रुवारीला माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, टेस्टी चॉकलेट बनवूया..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॉकलेट हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ. प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आवडतात. त्याचबरोबर अनेकांना ते बनविण्याचीदेखील आवड असते. अशांसाठीच ‘मटा कल्चर क्लब’च्या माध्यमातून ‘डेमो वर्कशॉप फॉर चॉकलेट मेकिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. क्रिएटीव्ह किचन, फ्लॅट नं. ३, लॅण्डमार्क बिल्डींग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे शनिवारी (११ फेब्रुवारी) सकाळी १० ते १२ दरम्यान हे वर्कशॉप होणार आहे.

व्हॅलेंटाईन डे जवळ येत असल्याने शहरभर प्रेमाचा माहोल दाटला आहे. गुलाबाची फुलं, चॉकलेट्स, टेडीबिअर यांची खरेदीही आता वाढली आहे. अशातच अनेकांना आपल्या प्रियजनांना स्वतः चॉकलेट्स करून गिफ्ट देण्याची संधी यातून मिळणार आहे. आरती तहीलिआनी आणि ममता ठक्कर या मार्गदर्शन करणार आहेत. या वर्कशॉपमध्ये टू टोन्ड चॉकलेट्स, हार्ट फिल्ड चॉकलेट्स, किटकॅट, रॉकी चॉकलेट, नटी चॉकलेट आणि रोझ शेप्ड चॉकलेट आदी प्रकार यात शिकविले जाणार आहेत. ‘मटा कल्चर क्लब’ सभासदांना विशेष सवलत दिली जाणार आहे. नोंदणीसाठी ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मटा कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी www.mtcultureclub.com या लिंकला व्हिजिट द्यावी.

‘मटा कल्चर क्लब’च्या सभासदांसाठी नियमित विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नुकताच सलील कुलकर्णी यांचा ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ हा कार्यक्रम पार पडला. अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच अनेक वर्कशॉपही घेता येत असून रांगोळी, मेंदी, केक मेकिंग अशा अनेक वर्कशॉप्सचा यात समावेश होता. चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमधूनही महिलांना चॉकलेट कसे तयार करतात हे शिकण्याची संधी मिळू शकणार आहे. www.mtcultureclub.com या लिंकवर हा कोड स्कॅन करून ऑनलाइन सभासद नोंदणी करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images