Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मंगला एक्सप्रेस घसरली, तीन ठार

$
0
0
नाशिकजवळील घोटी येथे आज सकाळी मंगला एक्सप्रेस घसरुन भीषण अपघात झाला. मंगला एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले असून यामध्ये तीन प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तर एकोणतीस जण जखमी झाले आहेत.

स्मारकाबाबत मनसे उदासीन

$
0
0
वेगळा पक्ष स्थापन करुनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले दैवत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांगतात. नाशिकमध्ये सत्ता असतानाही बाळासाहेबांच्या नाशिकमधील स्मारकाबाबत ते गप्प का असा प्रश्न शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.

नाशकात थंडीची चाहूल

$
0
0
दरवर्षी दिवाळीत थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नाशिककरांना यंदा दिवाळी उलटल्यानंतर थंडीची चाहूल अनुभवास मिळत आहे.

डेंग्यूबाबत महापालिका करणार जनजागृती

$
0
0
शहरात डेंग्यूचे पेंशट वाढले आहेत. डेंग्यूची लागण झाल्याने काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेने कॅम्पच्या माध्यमातून डेंग्यूबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

गंगापूररोडला उभारणार सिव्हेज पंपींग स्टेशन

$
0
0
जुना गंगापूररोडवर पाणी पुरावठा विभागाचे पंपींग स्टेशनचा सध्या कोणताही वापर होत नाही.

तृष्णेतून बहरले पुष्प

$
0
0
घराच्या अंगणात, परसात शोभिवंत फुलझाडे लावून बाग करण्याचा छंद सध्याची एक चांगली व्यवसाय संधी बनत आहे. बागकाम व नर्सरी हा फावल्या वेळात हौसेने करता येण्याजोगा घरगुती छंद आनंद देवून जातो. त्यातून मिळणाऱ्या सौंदर्यनिर्मितीच्या आनंदाबरोबरच तृष्णा नर्सरीच्या माध्यमातून व्यवसाय आणि इतरांनाही नर्सरीचे ज्ञान देण्यात पुष्पा कोटकर यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.

तया नाम दिवाळी अंक

$
0
0
दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके आठवतातच मात्र मराठी वाचनप्रिय मंडळीना दिवाळी म्हटलं की उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. दिवाळीचा खुसखुशीत फराळ करताना विनोदी, चुरचुरीत वाचायला मिळावे ही वाचकाची अपेक्षा दिवाळी अंक पूर्ण करतात.

बेशिस्त चालक-वाहकांवर एसटी प्रशासनाचे लक्ष

$
0
0
एसटीने प्रवास करणारे प्रवाशी निश्चिंतपणे प्रवास करतात ते चालक आणि वाहकांवरील विश्वासामुळे. सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची चांगली प्रतिमा तशीच रहावी या दृष्टीने महामंडळ सजग झाले आहे. कामावर असताना मद्यपान व तत्सम व्यसने करणाऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला असून त्यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

सचिनसाठी कपालेश्वरी अभिषेक

$
0
0
विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला त्याच्या दोनशेव्या कसोटीसह भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी निरनिराळ्या क्लृपत्या लढविल्या जात आहेत. त्यात नाशिकमधील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कपालेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक करत सचिनला शुभेच्छा दिल्या.

क्रीडा महोत्सवावर कर्मचाऱ्यांचा बह‌िष्कार

$
0
0
आरोग्य विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या क्रीडा महोत्सवावर बह‌िष्कार टाकला आहे. यामुळे दिवाळीच्या सुटीनंतर हे आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. सुटी संपल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या विद्यापीठाचे कामकाज चवथ्या दिवशीही ठप्पच होते.

ट्रॅकवरचा आवाज

$
0
0
भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणाऱ्या आम आदमी पार्टीची टोपी डोक्यावर घेतलेला एक कार्यकर्ता आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी सध्या इच्छुक आहे. त्यामुळेच पहाटेच्या सुमारास हा कार्यकर्ता गोल्फ क्लबच्या मैदानावर दररोज येतो आहे.

‘आदिवासी क्रांतीकारकांचे धडे मुलांना शिकवा’

$
0
0
स्वातंत्र्यपूर्व लढ्यात आदिवासी क्रांतीकारकांनी ब्रिटीशांना धडा शिकवला. मात्र, आज आदिवासी विद्यार्थ्यांनाच त्याबद्दल माहिती नाही.

उत्तर महाराष्ट्राच्या भूजल पातळीत वाढ

$
0
0
यंदा सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भूजल पातळीत ०.६४ मीटरने वाढली आहे.

डाऊन्स सिंड्रोमच्या ‘केअर’साठी जनजागृती

$
0
0
डाऊन्स सिंड्रोमग्रस्त व्यक्तींमध्ये एकूणच नैसर्गिक क्षमतांची कमी असते. त्यातच पालकांमध्ये या आजाराविषयी गैरसमज अन् अपूऱ्या ज्ञानामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होता.

डिम्ड कन्व्हेयन्सचा महापालिकेला फटका

$
0
0
महापालिका हद्दीत २२ मे रोजी लागु करण्यात आलेल्या लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) मधील ड‌िम्ड कन्व्हेयन्सची तरतूद राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुन्हा केबल बंदचा सिग्नल

$
0
0
कोर्टात पैसे भरुन जिल्हा प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखविणाऱ्या ४४ केबल चालकांचे प्रक्षेपण थांबविण्यात येणार आहे.

डाळिंबाची लाली उतरली

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढू लागल्याने बाजारात लालचुटूक डाळिंबाची लाली कमी होऊ लागली आहे. सटाणा मार्केट कमिटीत डाळिंबाची उठाव कमी झाल्याने शुक्रवारी सरासरी किलोच्या भावात वीस ते पंचवीस रुपयांनी घसरण झाल्याने पासष्ट रुपये भाव मिळाला.

राज्य नाट्यस्पर्धेसाठी १४ नाटके

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे आयोजित ५३व्या महाराष्ट्र राज्य नाट्य हौशी नाट्यस्पर्धेतील काही प्रवेशिका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत आता १७ ऐवजी १४ नाटके होणार आहेत.

भारत मेडिकलचा परवाना रद्द?

$
0
0
ग्राहक आणि रुग्णांना योग्य वागणूक न देणाऱ्या सिडकोतील भारत मेडिकल स्टोअर्सचा परवाना रद्द होण्याची चिन्हे आहेत.

मंगला एक्स्प्रेसला अपघात

$
0
0
दिल्लीहून एर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरून घसरल्याने ३ प्रवासी ठार; तर ३७ जण जखमी झाले. नाशिकरोड ते इगतपुरी या स्टेशनांदरम्यान घोटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images