Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दोघा पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांची शुक्रवारी अचानक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. देशमुख तसेच वाघ यांच्या बदलीचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांनुसार ही बदली करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.

देशमुख यांच्या जागेवर नाशिकरोड पोलिस ठाण्यात पंढरीनाथ ढोकणे यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढोकणे यांनी यापूर्वीही नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. मात्र, सूत्रे घेऊन महिना होत नाही तोच ढोकणे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागेवर देशमुख यांची नियुक्ती झाली होती. देशमुख यांनी या पदावर सुमारे आठ महिने कामकाज बघितले. दरम्यान, मुंबई नाका पोलिस स्टेशनचा तात्पुरता कार्यभार पीआय सुरेंद्र नामदेव सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवार दाम्पत्याच्या पक्षांतर चर्चेला पूर्णविराम!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणुकीत गट व गणात इच्छुकांची संख्या ही अधिक असल्याने एकालाच पक्ष उमेदवारी देईल. तेव्हा सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन करून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहू असा विश्वास उपस्थितांना देऊन शिवबंधनात अडकण्याचा कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम जिल्हा परिषद सदस्य नितीन पवारांनी शुक्रवारी दूर केला. विशेष म्हणजे पवार दाम्पत्य घरातील सदस्यांसह बैठकीला उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील इच्छुक कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस निवड सम‌ितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे, अॅड. रवींद्र पगार, माजी आमदार दिलीप बनकर, प्रभारी दत्तात्रेय पाटील, पक्षनिरीक्षक डॉ. योगेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडशाखीय वाणी समाजात आयोजित करण्यात आली होती. पवार दाम्पत्य शिवबंधनात अडकणार, अशी चर्चा असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. बैठक संपण्यापूर्वी पवार दाम्पत्य या बैठकीला उपस्थित असल्याने त्यांनी सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

शेतकरी व सर्वसामान्याचे हित राष्ट्रवादीच जोपासणार असल्यामुळे आगामी निवडणुकीत जनता भाजप शिवसेनेला धडा शिकवेल, असा विश्वास निवड समितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी व्यक्त केला. यावेळी कळवण तालुक्यातील कनाशी, अभोणा, मानूर व खर्डेदिगर गट व गणातील ३० ते ३५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवीद्र देवरे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे भरती परीक्षेत दोन बोगस उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या एनटीपीसी परीक्षेत दुसऱ्याच्या नावाने पेपर देणाऱ्या दोघा डमी परीक्षार्थींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात बिहार राज्यातील दोघा तरुणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीलकुमार भिकारी (२६ रा. बदहरी, जि. रोहतास) व मुस्तकीम जाफरी (रा. केशवा, जि. भोजपूर, बिहार) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने गुरूवारी एनटीपीसी पेपर झाला. शहरातील अशोका बिझनेस स्कूल या परीक्षा सेंटरवर इच्छूक उमेदवारांसाठी लेखी पेपर झाला. या सेंटरवर पार पडलेल्या परीक्षेदरम्यान संशयित आरोपी अन्य दोघांच्या नावे परीक्षा देताना सापडले. बोगस विद्यार्थ्यांना हुडकून काढण्यासाठी मूळ विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ्स, स्वाक्षऱ्या आगोदरच घेण्यात आल्या होत्या. पेपर सुरू झाल्यानंतर उपस्थित संशयित आणि मूळ विद्यार्थ्यांच्या माहितीत तफावत आढळून आल्याने या प्रकरणाचे भांडे फुटले. या प्रकरणी आदित्य मधुकर बिडवे, यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी उपनिरीक्षक हिरे अधिक तपास करीत आहेत.

इंडिकासह दुचाकी चोरी

शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी इंडिका कारसह दुचाकीची चोरी केली. तिडकेनगर भागात राहणारे विलास साहेबराव पाटील यांची इंडिका कार (एमएच १५ बीएन ७४९८) बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरी झाली. त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगर ग्राउंड येथे पाटील यांनी कार पार्क केलेली असताना चोरट्यांनी ती चोरी केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गढरी करीत आहेत. दरम्यान, नांदूरगावातील किरण बाळू कड यांची दुचाकी (एमएच १५ सीडब्ल्यू ०६७७) चोरट्यांनी रेल्वे स्टेशनजवळील पोलिस चौकी येथून लंपास केली. कड हे २१ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी या ठिकाणी पार्क केली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.

१६ जुगारी गजाआड

सलग दोन दिवस पोलिसांनी जुगार अड्ड्यांविरोधात कारवाई करीत जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यात. भद्रकालीतील तलवाडी भागातील तीन व पंचटीतील एक जुगार अड्डा गुरूवारी पोलिसांनी छापे टाकून उध्वस्त केला. या कारवाईत १६जुगारींना अटक करीत सुमारे दहा हजाराची रोकड आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तलवाडी नर्सिंग होम भागात पोलिस सातत्याने कारवाई करीत आहे. या ठिकाणी अगदी एक दिवसापूर्वी पोलिसांनी छापा मारून जुगाऱ्यांना अटक केली. मात्र, पोलिसांच्या कारवाईचा फरक पडला नाही. तलवाडी भागात पुन्हा जुगार सुरू झाल्याचे समोर आले. या माहितीवरून पोलिसांनी गुरूवारी दुपारी छापा सत्र राबविले. यावेळी मुसा सय्यद, राजेंद्र कांबळे, विलास गायकवाड, मंगेश भोये, रफिक पठाण, उत्तम वाघ आदी संशयित कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना सापडले. त्यांच्या ताब्यातून सात हजार ३७५ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. दरम्यान, याच भागात सोयल पठाण, सागर जगताप, वाहीद हमीद, रहिस सय्यद, शाहदाब शेख, जाहिर शेख व अरबाज शेख आदी पत्यांचा जुगार खेळतांना आढळून आले. संशयितांकडून एक हजार ७८० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या तीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुन्हा जुगार अड्डे सुरू होऊ नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पंचवटीतही जुगार अड्ड्यांविरोधात कारवाई झाली. सूर्या आर्केड इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यात मिलन जनता नावाचा मटका खेळताना रवींद्र पाटील, लक्ष्मण बेंडकुळे, व भरत गुंजाळ आदींना पोलिसांना पकडले. त्यांच्या ताब्यातून एक हजार ५० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

दुकानातून रोकड लांबविली
मालकाशी ओळख असल्याचे भासवून दुकानात शिरलेल्या भामट्याने काऊंटरमधून सुमारे ५० हजार रुपयांची रोकड हातोहात लांबविली. ही घटना रविवार कारंजा परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश युवराज बावा (रा. क्रांतीनगर, पंचवटी) या कामगाराने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बावा नाशिक मर्चंट बँक शेजारील एका दुकानात कामास आहे. सोमवारी (दि.१६) साडे अकरा वाजेच्या सुमारास दुकानात प्रकाश एकटा होता. यावेळी दुकानात एक अनोळखी व्यक्ती आला. सदर व्यक्तीने मालकाशी ओळख असल्याचे भासवून नोकराकडे मालकाची चौकशी केली. दरम्यान, चोरट्याने नोकरास बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच कांउटरमधील सुमारे ५० हजारांची रोकड हातोहात लांबविली. या प्रकरणाची थोड्यावेळाने वाच्यात झाल्यानंतर प्रकरण सरकारवाडा पोलिसांकडे पोहचले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गोसावी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत ‘एकला चलो रे’चा नारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत प्रथमच ‘एकाला चलो रे’च्या भूमिकेत सर्व राजकीय पक्षांनी वाटचाल केल्याने स्थानिक नेत्यावरच या निवडणुकीची भिस्त अवलंबून राहणार आहे. या तालुक्यात आक्रमक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हे निवडणुकीसाठी स्टार प्रचारक व हायकमांड असतील.

या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, मनसे या राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोमाने आपली नेत्यांची टीम रणांगणात उतवरली आहे. इगतपुरी तालुक्यात आमदार निर्मला गावित, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार अपूर्व हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार शिवराम झोले, माणिकराव कोकाटे, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड यांनी विशेष लक्ष घातल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. इच्छुक उमेदवारासह राजकीय पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षाचे तालुक्यातील प्रमुख नेतेच निवडणकू रिंगणात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

प्रचारासाठी येणार फौज

शिवसेनेकडे माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, सभापती गोपाळ लहांगे, संदीप गुळवे यांच्यावर धुरा आहे. तर खासदार गोडसे, जिल्हा प्रमुख करंजकर, आमदार राजाभाऊ वाजे यांचे पाठबळ आहे. राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष तथा ज‌ि. प. सदस्य गोरख बोडके, उदय जाधव बाळासाहेब गाढवे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यावर महत्त्वाची धुरा आहे. आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपकडून तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, पांडुरंग बऱ्हे यांनी गटागटात वातावरण निर्माण केले आहे. त्यांना खासदार हरिश्चंद्र चव्हाण, निरीक्षक आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे पाठबळ लाभत आहे. काँग्रेसची धुरा आजतरी आमदार निर्मला गावित व काँग्रेस नेते जनार्दन माळी आदीवर अवलंबून आहे. मनसेची धुरा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम व उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्यावरच मदार आहे. घोटी, शिरसाठे व खेड या गटावर सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर ‘तो’ आज जिवंत असता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामानिमित्त घरातून निघाला. ‘त्याचा’ तसा तो रोजचा दिनक्रम होता. मात्र, त्या दिवशी तो परत आलाच नाही. कदाचित हेल्मेट असते तर तो आज आमच्यासोबत असता. हुंदक्यासोबत वाहणाऱ्या अश्रुत त्यांचे शब्द पुढे विरूनच गेले. विविध अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलेले अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

हेल्मेट नसणे किंवा सीट बेल्टचा वापर न केल्याने दरवर्षी शहर व जिल्हाभरात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडतात. अगदी किरकोळ समजल्या जाणाऱ्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने संबंधितांचे कुटुंबच उघड्यावर पडते. मात्र, तरीही या गंभीर विषयाकडे वाहनचालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर तसेच २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) शुक्रवारी सकाळी श्रध्दाजंली कार्यक्रम तसेच रॅली आयोजन करण्यात आली. कार्यक्रमास १० शाळा व १४ कॉलेजमधील, विद्यार्थी व शिक्षक, स्वयंसेवी संस्था, तसेच ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी २०१६ मध्ये विविध अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ९९१ व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक तसेच मित्र हजर होते. हेल्मेट वा त्या दिवशी सिटबेल्ट बांधला असता तर आजही वेळ आली नसती, असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सांगितले. डॉ. राजेंद्र तिवारी, योगेश हिरे, सागर बर्वे, भूषण सोनजे, कल्याणी विसपुते, ज्ञानेश्वर खराडे, सचिन कुलकर्णी, श्रीमती यादव व रामदास खेडकर या नातेवाईकांनी ते दुर्दैवी अनुभव कथन केले. विद्यार्थी, नागरिकांनी पदयात्रेतून जनजागृतीपर संदेश दिले. गोल्फ क्लब मैदान येथून सुरू झालेली पदयात्रा टिळकवाडीमार्गे सीबीएस व ठक्कर बाजारमार्गे पुन्हा गोल्फ क्लब येथे परत आली. कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे, भरत कळसकर आदी उपस्थित होते.

यमाने वेधले लक्ष
कार्यक्रमासाठी यमराजाची वेशभूषा साकरलेल्या तरूणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्र्यंबक नाका सिग्नल येथे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘हेल्मेट वापरला नाही तर लवकरच तुमच्या भेटीला येतो’, असा संदेश यमराज देताना दिसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वा‌हनांच्या बॅटरी चोरल्याने शेतकरी उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाशिक रोडवरील नवीन कांदा मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांनी थेट विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग तब्बल दीड तास अडवून आपला संताप व्यक्त केला. बाजारसमिती प्रशासन, पोल‌िस आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांची समजूत घालून आंदोलन मागे घेण्यात आले. तत्पूर्वी दोन्ही मार्गांवर वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झालेले हे रास्तारोको आंदोलन दीड वाजेपर्यंत सुरू होते.

नाशिक रस्त्यावर नव्यानेच स्थलांतरीत झालेल्या नवीन कांदा मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे शेतकरी कांदा विक्रीसाठी आलेले होते. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास रात्री मुक्कामाला असलेल्या काही वाहनांच्या बॅटरी चोरीला गेल्याचे शेतकऱ्यांना लक्षात आले. पारनेर येथील सुभाष धर्मा देवरे, येसगाव बुद्रुक येथील रामचंद्र हरीलाल शेलार यांच्या ट्रॅक्टरसह छोटा हत्ती (एमएच ०४ डीके ३६२१) व अन्य दोन वाहनांच्या बॅटरी अज्ञातांनी चोरून नेल्याचे आढळताच बाजारसमितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. कांद्याचे लिलाव बंद पाडले.

उपसभापती विशाल सोनवणे यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांनी 'वाहने सांभाळण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे आमची नाही' असे वक्तव्य केल्याने अधिकच संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर धाव घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. लग्नतिथी असल्याने दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे वऱ्हाडी मंडळीसह प्रवाशांचे मोठे हाल झाले.

घटनास्थळी सटाणा पोल‌िस ठाण्याचे निरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोल‌िस निरीक्षक नितीन मगर, उपनिरीक्षक के. बी. घायवट व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत घालत त्यांना चर्चेसाठी बाजारसमितीच्या आवारात येण्याचे आवाहन केले. दीड तास चाललेला रास्तारोको मागे घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हा दूध संघावर कारवाई आकसातून’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे वेतन देण्यास पैसे नसतांना कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रक्कमेची कपात करून अपहार करण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणी हायकोर्टात दाखल रिटपिटीशनवर कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वेतनातून कपात करून तो न भरल्याप्रकरणी करण्यात आलेली कारवाई चुकीची व आकसातून केली आहे. त्यात चेअरमन व संचालक यांनी कोणताही अपहार केला नसल्याचा दावा चेअरमन दिलीप कातकाडे यांनी केला आहे.

जिल्हा दूध संघाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे व अल्प तुटपुंज्या उत्पन्नामुळे कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याइतकी रक्कम संघाच्या खात्यात नाहीत. वेतन न मिळाल्यामुळे बरेच कर्मचारी नोकरी सोडून गेले आहेत. इतर व्यवस्था न झाल्याने केवळ ३२ कर्मचारी संघात कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३२ पेक्षा कमी असल्याने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) लागू होत नाही. संबंधित प्रकरण कोर्टात प्रलंबित असतांना पीएफ कार्यालयाने ही कारवाई केली आहे. दूध उत्पादक संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण नाशिक जिल्हा आहे. संघाचा मुख्य व्यवसाय म्हणजे संघाच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक दूध संस्थानी संकलित केलेले दूध गोळा करणे, ते पॅकिंग करून नाशिक शहरात विक्री करणे व इतरत्र पुरवठा करणे, असे आहे. पण संघाचे कार्यक्षेत्र जिल्हा असूनही दुधाचा पुरवठा होत नसल्याने संघ आर्थिक अडचणीत आला आहे, असे स्पष्टीकरण कातकाडे यांनी दिले आहे.

दूध संघावर यापूर्वी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने ३५ लाख ५८ हजार ३० रुपयाच्या वसुलीसाठी सिन्नर येथील शीतकरण केंद्राची मशिनरी सिल केले हो‌ते. सदर मालमत्तेचा लिलाव प्रक्रियाही राबवली. पण कर्मचाऱ्यांच्या वर्तमान व भविष्याचा विचार करता संघाने मुंबई हायकोर्टात तात्काळ धाव घेतली आणि त्यावर स्थिगिती मिळवली. त्यानंतर येवला तालुक्यातील एरंडगाव येथील मालमत्ता सरकारच्या मंजुरीने विक्री केली. त्यातून आलेले २५ लाख रुपये पीएफ कार्यालयात भरले. त्यानंतरही पीएफ कार्यालयाने नोटीस काढली. त्यानंतर सहाकारी संस्थाना कायदा लागू नये, असे पत्र दिले आहे. पण या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा मुद्दा कातकाडे यांनी मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखडा ठरला मृगजळ!

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

नाशिक ः महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन जाहीर केलेला भागशः शहर विकास आराखडा नाशिककरांसाठी मृगजळच ठरला आहे.

विकास आराखडा गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सबंधित विकास आराखड्याचा नकाशाही जाहीर होणे आवश्यक होते. मात्र, हरकती घेण्याची डेडलाइन सुरू होऊन १२ दिवस उलटले तरी अद्याप नकाशा प्रसिद्ध झालेला नाही. ७९ आरक्षणांमध्ये बदल करून डीपीचा नकाशा तयार करण्यासाठी आणखी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हरकतींची मुदत पुन्हा लांबणार असल्याने विकास आराखडा आता महापालिका निवडणुकीनंतरच दृष्टिपथास पडणार असल्याने विकास आराखड्याची घोषणा हा निव्वळ फार्स ठरली आहे.

वर्षभरापासून सरकारकडे प्रलंबित असलेला शहर विकास आराखडा भाजप सरकारने महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नऊ जानेवारीला भागशः प्रसिद्ध केला. मंजूर विकास आराखड्यात ७७ आरक्षणांत बदल करण्यात आले असून, ७९ आरक्षणांमध्ये बदल सुचविले आहेत. मंजूर आराखड्यातून ३१ आरक्षणे वगळली असून, २५ आरक्षणे स्थलांतरित केली आहेत. बदल सुचविलेल्या ७९ आरक्षणांवर हरकती व सूचना मागविण्यासाठी महिनाभराची मुदत दिली आहे. दहा जानेवारापासून या हरकती सरकारने मागविल्या होत्या. त्यामुळे घाईगर्दीत हा भागशः विकास आराखडा गॅझेटमध्येही प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, हा आराखडा गॅझेटमध्ये प्रसिद्ध करताना त्यातील ७९ बदलांसह नवीन नकाशाही प्रसिद्ध करणे आवश्यक होते. आराखडा जाहीर करण्याचे नियोजन नसतानाही तो घाईगर्दीत जाहीर केल्याने त्याचे खरे बिंब आता समोर आले आहे.

आराखड्याचा नकाशा तयार नसल्याने हरकती कशावर घ्यायच्या असा प्रश्न हरकतदारांना पडला आहे. नकाशाची प्रत मिळाल्यानंतरच आरक्षणातील बदल समजणार आहेत. स्थलांतरित रस्ते, सर्व्हे नंबर, आरक्षण आदींची माहिती नकाशावर मार्क केलेली असते. नकाशाला अद्याप दहा ते १५ दिवस लागणार आहेत. तो तयार झाल्यानंतर त्याला पुणे नगररचना कार्यालयाची मान्यता घ्यावी लागेली. त्यानंतर तो प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतरच भागशः डीपी प्रसिद्ध होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीआधी जाहीर केलेला डीपी हा निव्वळ फार्स ठरला आहे.

निवडणुकीचे गाजर

विकास आराखडा जाहीर करण्याची कोणतीही तयारी सरकारची नव्हती. मात्र, नाशिकमधील एका आमदाराने निवडणुकीसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत, सरकारला हा आराखडा भागशः जाहीर करण्यास भाग पाडले. सरकारचे नियोजन नसतानाही तो जाहीर केल्याने आता नगररचना विभागाची गोची झाली आहे. दुसरीकडे विकास आराखड्याचे चित्र स्पष्ट होत नसल्याने बिल्डरांमध्येही संभ्रमावस्था आहे. केवळ महापालिका निवडणुकीसाठी आराखडा जाहीर झाल्याचे आता समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार अधिकाऱ्यांना भोवला दामलेंचा पंच

$
0
0

अतिरिक्त आयुक्तांसह चौघांना नोट‌िसा

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

अभिनेता प्रशांत दामले यांनी महाकवी काल‌िदास कला मंद‌िराची दुरावस्था चव्हाट्यावर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. काल‌िदास कलामंद‌िराच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोट‌िसा बजावल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, सहाय्यक आयुक्त मालिनी शिरसाठ, आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांचा यात समावेश आहे. आठवडाभरात त्यांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाकवी काल‌िदास मंद‌िराच्या दुरावस्थेचे फोटो अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीड‌ियावर टाकल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. काल‌िदास कलामंद‌िराप्रकरणी राज्यभर मनसेच्या कारभाराचे वाभाडे निघाल्यानंतर प्रशासनानेही आता कठोर पावले उचलली आहेत. शहरातील नाट्यगृहांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महाकवी काल‌िदास कलामंद‌िराच्या पुनरूज्जीवनात दुर्लक्ष केल्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, सहाय्यक आयुक्त मालिनी शिरसाठ, आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांचा समावेश असून आठवडाभरात त्यांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेने काल‌िदासच्या नूतनीकरणासाठी गेल्या वर्षी जूनमध्येच ६ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले होते. ऑक्टोबरपासून नूतनीकरणाचे काम सुरू करायचे होते. परंतु, हे काम वेळेत सुरू होऊ शकले नाही. आयुक्त कृष्णा यांनी यासंदर्भात प्रशासनाला आदेशही दिले होते. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यातच आचारसंहिता लागल्याने आता मार्चपर्यंत हे काम करणे शक्य नाही. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

फोटो जुनेच?

प्रशांत दामले यांनी सोशल मीड‌ियावर टाकलेल्या फोटोंवर आता शंका उपस्थित केली जात आहे. सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, दोन दिवस आधीच आयुक्तांनी स्वतः या ठिकाणची पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. परंतु, सध्या या ठिकाणी अशी स्थिती नसल्याचा दावा पालिकेतील अधिकाऱ्यांकडून केला जात असून, फोटो जुनेच असल्याची चर्चा आहे. मनसे आणि भाजपच्या राजकारणात हा विषय वाढविला जात असून, यामुळे पालिका नाहक बदनाम होत असल्याची चर्चा आहे.

तर आठ महिने लागतील

महाकवी काल‌िदास कलामंद‌िराच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर असून, संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी तब्बल ६ ते ८ महिने लागणार आहेत. तोपर्यंत काल‌िदासचे बुकींग बंद ठेवावे लागणार आहे. एवढे दिवस कलामंद‌िर बंद ठेवले तर त्याचा नाट्यचळवळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनही नूतनीकरणाबाबत पेचात सापडले आहे. मार्चनंतर निविदा प्रक्रियेला गती देऊन जूनपासून काम सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

गायकवाड सभागृहाचेही रुपडे पालटणार

प्रशांत दामले यांच्या प्रकरणापासून बोध घेत महापालिका आता काल‌िदास कलामंद‌िरासोबतच दादासाहेब गायकवाड सभागृहाचे रुपडे पालटवणार आहे. ‘काल‌िदास’चा वनवास संपवण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून, जूनपासून कामाला सुरुवात होणार आहे. तसेच ‘दादासाहेब गायकवाड’ या सर्वात मोठ्या सभागृहाचेही नूतनीकरण हाती घेतले जाणार आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दादासाहेब गायकवाड सभागृह पूर्णपणे बंद‌ीस्त करण्याचा विचार सुरू केला असून, त्याचा आराखडा सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे काल‌िदाससोबतच गायकवाड सभागृहाचेही रुपडे पालटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूच्या वापसीने आनंदाश्रू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

चंदू मायदेशी परत येणार… ही बातमी प्रसार माध्यमातून झळकताच काही क्षणांतच वाऱ्यासारखी चंदूच्या गावापर्यंत पोहोचली. चंदूच्या कुटुंबियांनाही सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी ही बातमी कळवली, त्यानंतर तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. गावात तर दिवाळीचा जल्लोष साजरा करण्यात आला. एवढेच नाही तर गावातील लोकांनी चंदूच्या घराकडे धाव घेतली तसेच गावातील तरुणांनी चंदू परत येणार म्हणून डीजेच्या तालावर ठेका धरला.

बोरविहीर गावालगत असलेल्या गावातील ग्रामस्थांनी चंदूच्या कुटुंबियांची भेट घेतली असून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला आपल्या गावाचा सूपुत्र आता गावात कधी येणार, याची वाट बोरविहीरचे ग्रामस्थ पाहत आहेत. चंदू चव्हाण हे मूळचे धुळे तालुक्यातील बोरविहीर गावचे आहेत. चंदू सन २०१२ मध्ये सैन्यात भरती झाले. चंदू यांनी जुलै २०१६ मध्ये राष्ट्रीय ३७ रायफल्स जॉइन केले होते. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणही लष्करात आहे. ते सध्या ९ मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत.

चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचे पालनपोषण आजी-आजोबांनी केले. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहत होते. सीमारेषेवर कामगिरी बजावत असताना चंदू नजरचुकीने सीमारेषा चुकून पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना ३० सप्टेंबर, २०१६ रोजी फोनवरून समजताच चंदूच्या आजी लिलाबाई चिंधा पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा

जागीच मृत्यू झाला होता. चंदू पाकिस्तानात असल्याचे समजल्यापासूनच चव्हाण कुटुंब आणि ग्रामस्थ सगळेच चिंताग्रस्त होते. मात्र शनिवारी सुटकेची बातमी येताच सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केला.


आमचा आनंद आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आता, चंदू कधी घरी येतो याची आस लागली आहे. त्याला भेटण्यासाठी जीव कासावीस होत आहे. शक्य झाले तर मी त्याला भेटण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. मात्र त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यावरच ठरवेन. माझा भाऊ चंदूला मायदेशी परत आणण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच भारतीय डीजीएमओ, भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांचा आभारी आहे. तसेच चंदुच्या सुटकेसाठी दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या भावनेतून चंदूची सुटका झाली आहे.

- भूषण चव्हाण (चंदूचा मोठा भाऊ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूच्या बोरविहीर गावात जल्लोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील बोरविहीर येथील भारतीय सैन्य दलातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण हे सीमारेषेवर कामगिरी बजावत असताना नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. त्यांची पाकिस्तानातून सुटका झाल्याने बोरविहीर गावात जल्लोष करण्यात येत आहे. चंदूच्या सुटकेची बातमी गावात पोहोचताच गावातील तरुणांनी डिजेच्या तालावर ठेका धरला. आता सर्वांच्या नजरा चंदू कधी गावी येतो, याकडे लागल्या आहेत.

चंदू पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याचे समजताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन चंदूची आजी लिलाबाई चिंधा पाटील यांचा मृत्यू झाला. त्यामुळे चंदूच्या कुटुंबाला एकावेळी दोन घटनांना सामोरे जावे लागले. चंदूच्या सुटकेसाठी त्‍याच्या कुटुंबीयाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. भारत सरकारनेही चंदूला मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जवान चंदू चव्हाण शुक्रवारी (दि. २१) मायदेशी परतला. चंदूच्या सुटकेची बातमी कळताच बोरविहीर गावासह धुळे जिल्ह्यात दिवाळी साजरा करण्यात आली.

डीजेच्या तालावर तरुणांचा ठेका

चंदू मायदेशी परत येणार ही बातमी प्रसारमाध्यमातून झळकताच अवघ्या काही क्षणातच वाऱ्यासारखी चंदूच्या गावापर्यंत पोहोचली. सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी ही बातमी चंदूच्या कुटुंबीयांना कळवताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. गावात तर दिवाळीसारखा जल्लोष साजरा करण्यात आला. गावातील तरुणांनी चंदू परत येणार म्हणून डीजेच्या तालावर ठेका धरला.

आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता, चंदू कधी घरी येतो याची आस लागली आहे. त्याला भेटण्यासाठी जीव कासावीस होत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच डीजीएमओ, भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांचा आभारी आहे.

- भूषण चव्हाण, चंदूचा मोठा भाऊ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवननगरला पाणीगळती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पवननगर येथील पाण्याच्या मुख्य लाइनवरील वॉल फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या वॉलपासून तोरणा नगरपर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. महापालिकेची आचारसंहिता सुरू असल्याने या घटनेची माहिती बराच काळ महापालिकेला समजली नव्हती. मात्र स्थानिक नागरिक किरण शिंदे यांनी तातडीने मनपाला कळविल्यानंतरही बराच काळ हे पाणी वाहत होते.

सिडकोतील नागरिकांना कायमच पाणीच्या समस्येला सामोरे जावे लागत असते. पाणी गळतीसुद्धा परिसरात अनेक ठिकाणी हेात असते. या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय सुद्धा मोठ्या प्रमाणावर हात असतो. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय झाला तर महापालिका दंडात्मक कारवाई करत असते. मात्र, पालिकेकडूनच ही पाणी गळती झाली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आचारसंहितेमुळे दुर्लक्ष

या पाण्याची पाइपलाइन अनेक वर्षांपासूनच्या असल्याने या समस्या उभ्या राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असतांनाही प्रशासनाचे याकडे लक्ष जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा वचक राहिलेला नाही व त्यामुळेच असे प्रकार होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरात नेहमी होत असलेल्या या पाणी गळतीमुळे नागरिकांना चांगलेच हैराण केले आहे. एकीकडे पाण्याचा कमी वापर करावा, यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविल्या जातात, तर दुसरीकडे ज्यावेळेस शहरात कोठे पाणीगळती झाल्यावर उपाययोजनेस होणारा उशिर हा त्रासदायक ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् साकारले व्यक्तीचे हुबेहूब शिल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

के. के. वाघ शिक्षण संस्थेतील ललित कला कॉलेजात वार्षिक कला प्रदर्शनात नाशिक मधील नामवंत शिल्पकार संदीप लोंढे यांचा व्यक्ती शिल्प प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला. या शिल्पकलेच्या प्रात्यक्षिकासाठी मॉडेल म्हणून नाशिकचे तरुण चित्रकार अनिकेत महाले होते. शिल्पकार लोंढे यांनी यावेळी अतिशय उत्कृष्टरित्या हातामध्ये ब्रश घेतलेला चित्रकार असे व्यक्ती शिल्प साकार केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाशिकमधील शिल्पकार सुरेश भोईर, यतीन पंडित, वरूण भोईर, रोकडे, चित्रकार शिशिर शिंदे, किरण भोईर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ नगरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी औरंगाबाद येथील चित्रकार नानासाहेब येवले यांचेही प्रात्यक्षिक पार पडले. सोमवारी (दि. २३) रोजी मुंबई येथील चित्रकार श्रीकांत जाधव यांचे चित्र प्रात्यक्षिक के. के. वाघ ललित कला कॉलेज येथे होणार आहे. तरी सर्व कला रसिकांनी या प्रात्यक्षिकाचा कलास्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या घंटागाड्या भंगारात का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने नुकत्याच नवीन घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. परंतु, अनेक दिवस नवीन खरेदी केलेल्या घंटागाड्या तांत्रिक अडचणींअभावी उभ्याच होत्या. यानंतर नवीन घंटागाड्या कचरा संकलन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. परंतु, जुन्या असलेल्या घंटागाड्या भंगारात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सातपूरच्या क्लब हाऊसला लागून अनेक महिन्यांपासून पंधराहून अधिक घंटागाड्या नादुरूस्त अवस्थेत पडून होत्या. यानंतर नवीन घंटागाड्या आल्याने त्या गायबच झाल्या आहेत. त्यातच काही घंटागाड्या उचलून नेण्याचे काम होत आहे. यामुळे जुन्या घंटागाड्यांचे नेमके काय झाले, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याची अभिनव योजना राबविली आहे. यामुळे नाशिककरांनीदेखील त्याचे स्वागत केले होते. परंतु, घंटागाड्यांबाबत नेहमीच महापालिकेची महासभा वादग्रस्त ठरली. त्यातच घंटागाड्या ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी येत असल्याने महापालिकेने स्वतः घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. ८ ते ९ वर्ष झालेल्या घंटागाड्यांची वेळवर दुरुस्तीच न केल्याने अनेक घंटागाड्या पडून होत्या.

आयुक्तांनी लक्ष द्यावे

महापौर अशोक मुर्तडक यांनी नवीन घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता जुन्या घंटागाड्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्र्यंबक रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली जुनी घंटागाडी दुसऱ्या वाहनाकडून ओढून नेण्यात येत होती. महापालिका आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशीही मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर पोलिस ठाण्याची हेल्मेटसाठी जागृती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उपनगर पोलिस ठाण्याने वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. पोलिस ठाण्यासमोर त्यांनी फलक लावला असून हेल्मेट घालून न येणाऱ्या दुचाकीस्वारांना दंड करण्याची ताकीद दिली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही दंडाचा इशारा दिला आहे.

उपनगर पोलिस ठाण्याने पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शंभरावर पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त, उपायुक्तांच्या हस्ते हेल्मेट वाटप केले. शंभर टक्के हेल्मेट असलेले हे शहरातील पहिले पोलिस ठाणे ठरले आहे.

नागरिकांनाही हेल्मेटची सवय लागावी यासाठी या पोलिसांनी हेल्मेट घालून नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढली होती. तथापि, अनेक वाहनचालक हेल्मेटचा आजही वापर करत नसल्याचे दिसत आहेत. पोलिस ठाण्यात येणारे दुचाकीस्वारही हेल्मेट घालत नाहीत. गंभीर बाब म्हणजे काही पोलिसही हेल्मेट न घालताच प्रवास करत आहेत. हे रोखण्यासाठी उपनगर पोलिस ठाण्याने प्रवेशाच्या ठिकाणीच बॅरिकेडवर फलक लावला आहे. हेल्मेट घालून न येणारे दुचाकीस्वार, पोलिस यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्याचा इशारा फलकाद्वारे देण्यात आला आहे. या कार्यवाहीचे स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेतेच सरसावले तिकिटासाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

ग्रामीण भागातील गावोगांवच्या कारभाराची नाडी हाती असलेल्या ‘झेडपी’सह पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील वातावरण आता ढवळून निघाले आहे. तालुक्यातील पाच गटांसह दहा गणांसाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा आकांक्षेला घुमारे फुटत आहेत. येत्या दहा दिवसात तिकिटांसाठीचा खेळ चांगलाच रंगणार आहे. आपल्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडावी, यासाठी प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी तिक‌ीट वाटपाचे धागेदोरे हाती असलेल्या नेत्यांची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या इच्छुकांच्या भाऊगर्दीत तालुक्यातील नेतेमंडळींसह पक्षश्रेष्ठींची मोठी कसोटी लागणार आहे.

या अळणावरचं पाणी कधी कुठल्या वळणावर जाऊन मिळेल, अन् कोण कधी कुणाच्या संगतीला दिसताना नेमका कधी कुणाच्या पंगतीला जाऊन बसेल याचा आजवर कधीच कुणाला ठाव न लागणाऱ्या येवला तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निमित्ताने वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील पाच गट आणि दहा गणांसाठी एकूण १ लाख ५० हजार ६०४ इतके मतदार आहेत. आगामी महिनाभरात रंगणाऱ्या निवडणूक राजकीय संग्रमाकडे उभ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गट-गणातील इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पारावर गर्दी

इच्छुकांनी संपर्क वाढवितानाच उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. राजकीय नेतेमंडळी अन् इच्छुकांच्या बैठकांचे फड रंगू लागले आहेत. गावोगावच्या पारांवरदेखील कुठल्या गणात कुठल्या पक्षाकडून नेमका कोण उमेदवार असणार आणि नेमका कुणात सामना होणार या चर्चांचे फड रंगू लागले आहेत. मुख्य मुकाबला शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये होणार आहे. त्यांच्याकडे इच्छुकांनी दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

घरातीलच सदस्य

उतरणार रिंगणात?

तालुक्यात ‘झेडपी’चे पाटोदा, अंदरसूल, नगरसूल, राजापूर व मुखेड हे पाच गट आहेत. या गटांवर तालुक्यातील ज्येष्ठ नेतेमंडळींनी डोळा ठेवला आहे. आपल्या घरच्या माणसांना उतरविण्याच्या दृष्टीने सगळ्यांनीच तयारी केली आहे. नेत्यांच्या सध्याच्या हालचालीवरून असे चित्र दिसत असल्याने गटात पक्षिय उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांचे काय? असा सवालही कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारताना दिसत आहेत. ‘ओबीसी स्त्री’ राखीव असलेल्या राजापूर गटातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आपल्या पत्नी सुरेखा किंवा सूनबाई डॉ. कविता दराडे, नगरसूल ‘ओबीसी स्त्री’ राखीव गटातून तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार हे आपल्या सूनबाई सविता पवार, मुखेड सर्वसाधारण स्त्री गटातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर हे आपल्या सूनबाई सुवर्णा बनकर, तर राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे हे आपले पुत्र अॅड. शाहूराजे शिंदे यांना अंदरसूल गटातून निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचा सध्या मोठा बोलबाला आहे.

पाचही गट व दहा गणांमध्ये यावेळेस शिवसेनेला इतर राजकीय पक्षांपेक्षा उजवे वातावरण असून, त्यातूनच सेनेकडे इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकेकाळी छगन भुजबळ यांचा यथेच्छ पाहुणचार झोडपणारी मंडळी आता आता गट व गणातील उमेदवारीवर नजर ठेवूनच सेनेत प्रवेशकर्ती होत असल्याने साहजिकच सेनेतील जुने इच्छुक, निष्ठावंत कार्यकर्ते अन् आताची नवी मंडळी यांच्यात तिकीट वाटपावेळी गुंता वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार व्यावसायिकांसमोर पेच

$
0
0

शासकीय परवानग्यांसाठी आर्किटेक्ट व वकिलांकडे धावाधाव

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अनधिकृत भंगार बाजार हटविल्यावर अनेक प्रश्न व्यावसायिकापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यामध्ये असलेल्या भूखंडांवर पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भंगार व्यावसायिकांना शासकीयसह अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. यासाठी भंगार बाजारात खरेदी-विक्री करणारे, आर्किटेक्ट व वकिलांनी आपली नजर फिरविली आहे. भंगार व्यावसायिकांना परवानगीसाठी लागणारी मदत संबधितांकडून होणार असल्याने भंगार व्यावसायिकांनीही त्याचा फायदा होणार आहे. परंतु, खरेदी-विक्री करणारे, आर्किटेक्ट व वकील यांना शासकीय परवानगीचा मोबदला भंगार व्यावसायिकांना द्यावा लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासूनचे भंगार बाजाराच्या अतिक्रमणाचे भिजत घांेगडे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी हटविले आहे. हटविण्यात आलेल्या भंगार बाजारात न्यायालयाच्या आदेशाने पूर्ण परवानगी घेऊनच व्यवसाय करता येणार आहे. यामुळे सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून भूखंडधारकांना मोजणी करून घ्यावी लागणार आहे. तसेच पुढील कारवाईसाठी महापालिकेकडून बांधकामाची परवानगी भंगार व्यावसायिकांना घ्यावी लागणार आहे.

परंतु, अनेक भंगार व्यावसायिकांना स्वतः शासकीय व महापालिकेच्या सरकारी विभागांची माहितीच नसल्याने मोठी अडचण होत असते. भंगार बाजारातील व्यावसायिकांना मोबदला घेऊन शासकीय व महापालिकेच्या अनेक परवानगी उपलब्ध करून देण्यासाठी खरेदी-विक्री करणारे, आर्किटेक्ट व वकील यांची मदत लागणार आहे.

यामुळे अनेकांनी भंगार व्यावसायिकांची भेट घेत परवानगीसाठी लागणारे कागदपत्रांची यादीच दिली आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या भंगार दुकानदारांना शासकीय व महापालिकेच्या परवानगी घेऊन देण्यासाठी संबंधितांना आर्थिक मोबदलाही द्यावा लागणार आहे. यामुळे खरेदी विक्री करणारे, आर्किटेक्ट व वकिलांना आर्थिक लाभ होणार आहे.

वाद होण्याची चिन्हे

एकूण ५० एकरहून अधिक जागेवर वसलेल्या भंगार बाजारात अनेकांनी तुकडा भूखंड खरेदी केले आहेत. यामुळे एका भूखंडावर पाच व्यावसायिकांची नावे आहेत. आता मोजणी करूनच महापालिकेला भूखंड बांधकाम परवानगीसाठी मिळणार आहेत. यामुळे वाद होण्याची चिन्हे असल्याने अनेकांनी अगोदरच वकील व आर्किटेक्टकडे धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेला रोखण्याचे भाजपपुढे आव्हान

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शहर तालुक्यात पूर्वी हिरेंच्या दबदबा असला तरी सध्या मंत्री दादा भुसेंचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील निवडणूक ही हिरे आणि भुसे अशीच रंगणार आहे. आता या सगळ्यात विरोधक म्हणवणारी काँग्रेस, राष्ट्रवादी देखील मरगळ झटकून कामाला लागली असून आघाडीच्या येण्याने तालुक्यात ‘तिरंगी सामना’ पाहायला मिळणार आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गटांपैैकी शिवसेनने चार जागी विजय मिळवला होता. त्यावेळी अद्वय हिरे यांच्या जनराज्य आघाडीला वडनेर गटातून स्वाती ठाकरे यांच्या रुपाने एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला होता. गेल्या पाच वर्षात गिरणा, मोसम खोऱ्यातून बरेच पाणी वाहून गेले. अद्वय हिरे भाजपवासी झाले तर भुसेंनी मोदी लाटेतदेखील आपला गड कायम ठेवत तिसऱ्यांदा विजय मिळवला. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणाचा फटका वडनेर, झोडगे गटातील इच्छुकांना बसला आहे. हे दोन्ही गट अनुक्रमे अनु जमाती, अनु. जातीसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे उमेदवार मिळवण्यात पक्षांना कसरत करावी लागू शकते. तर दाभाडी, कळवाडी, सौंदाणे गट सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने या गटात प्रस्थाप‌ितांवर आपल्या श्रीमतींना मैदानात उतरवण्याची वेळ आली आहे. यात रावळगाव व निमगाव अनुक्रमे सर्वसाधारण व नामाप्र असे आरक्षित झाल्याने चुरस निर्माण झाली आहे.

आरक्षणाचा फटका

आरक्षणामुळे विद्यामान जि.प. सदस्यांमध्ये वडनेर गटातील हिरे समर्थक पवन ठाकरे यांच्या पत्नी स्वाती ठाकरे या पंचायत समिती गणातून नशीब अजमावू शकतात. झोडगे गटातून सेनेच्या ज्योती तलवारे यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. जि. प. ची सर्वाधिक चुरस रावळगाव गटात पाहायला मिळू शकते. गेल्या वेळी सेनेचे सुरेश पवार विजयी झाले होते. त्यामुळे यावेळी सेना-भाजपचा सामना येथे रंगणार आहे. मनसेने संदीप पाटील यांच्या रुपाने दाभाडी गटातून आपले अस्तित्व दाखवून दिले होते. मात्र सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने पाटील यांना गणातून नश‌ीब आजमावे लागू शकते. तर सेना-भाजपकडून मातब्बर महिला उमेदवार दिले जातील. राजकीयदृष्ट्या दाभाडी गट महत्त्वाचा असल्याने इच्छुकांची गर्दी झाली आहे. गेल्या वेळी सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरली होती ती कळवाडी गटाची. हा गट सर्वसाधारण आरक्षित होता. सेनेच्या चंद्रकांत वाघ यांनी विजयश्री घेचून आणली होती. यंदा मात्र महिला आरक्षित असल्याने इथे देखील प्रस्थापितांना आपल्या श्रीमातींना राजकीय रिंगणात उतरवण्याशिवाय गत्यंतर नाही. सौंदाणे गट सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी शरद माळी विजयी झाले होते. यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने चुरस वाढली आहे. निमगाव या एकमेव गटातून राष्ट्रवादीच्या रंजना पवार विजयी झाल्या होत्या. यावेळी ओबीसी राखीव असल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादीचे मधुकर हिरे यांनी सेनाप्रवेश केल्याने गटाची निवडणूक सेना भाजप अशीच होण्याचे संकेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

bhavesh.brahmankar

@timesgroup.com

Tweet - @BhaveshBMT

नाशिक ः शहराच्या मुख्य भागात असलेल्या आणि महापालिकेचे मुख्यालय ज्या हद्दीत येते अशा शहरातील सर्वाधिक मतदार असलेल्या पश्चिम प्रभागात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत येथून पाच जागा जिंकणारा मनसे सध्या विजयी चेहऱ्याच्या शोधात असून, शिवसेनेचीही तीच अवस्था आहे. येथील भाजपचे तीन नगरसेवकच आता आमदार आहेत. त्या जोरावर भाजप जोरदार मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच, तीन आमदार, दोन माजी महापौर आणि सर्वच पक्षांचे मातब्बर नेते या प्रभागात नशीब आजमावत असल्याने येथील लढती अतिशय रंगतदार होणार आहेत.

पक्षांतरामुळे बदलणार समीकरणे

गेल्या निवडणुकीत पश्चिम प्रभागामध्ये १३, १४, १५, २२, २३ आणि २४ असे एकूण ७ प्रभाग होते. आताच्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ७, १२, १३ आणि १४ यांचा समावेश प्रभागात झाला आहे. गत निवडणुकीत मनसेच्या सुनीता मोटकरी, सुरेखा भोसले, अॅड. यतीन वाघ, सुजाता डेरे आणि माधुरी जाधव हे पाच नगरसेवक विजयी झाले, तर भाजपचे प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल आहेर यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसचे उत्तम कांबळे, शिवाजी गांगुर्डे आणि योगिता आहेर विजयी झाले होते. शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि विनायक पांडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया ठाकरे यांनीही विजय प्राप्त केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना यश आले, तर प्रभागातीलच डॉ. राहुल आहेर हे चांदवड-देवळा मतदारसंघातून आमदार झाले. त्यामुळे भाजपचे तीन आमदार या प्रभागात सध्या वास्तव्यास आहेत. नगरसेवक आणि राजकीय नेत्यांच्या पक्षांतरामुळे प्रभागातील परिस्थिती बदलली आहे. मनसेचे पहिले महापौर अॅड. यतीन वाघ यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. सद्यःस्थितीत मनसेचे सुजाता डेरे, सुनीता मोटकरी आणि सुरेखा भोसले हे तीनच नगरसेवक आहेत. यातील आणखी एकजण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या प्रभागात मनसेला विजयी चेहऱ्याची मोठी गरज आहे. यंदा प्रभाग विस्तारात गंगापूररोड, कॉलेजरोडपासून मुंबई नाका, तर महात्मानगरपासून सराफ बाजार, तसेच पुढे गंजमाळपर्यंत पसरला आहे. या भागात उच्चभ्रू, मध्यमवर्गीय वस्तीपासून झोपडपट्टीचाही भाग येतो. प्रभागातील चारही प्रभाग मिळून एकूण १६ नगरसेवक महापालिकेत प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रभागात एकूण १ लाख ५७ हजार मतदार आहेत. या सर्वांनाच आकर्षित करण्यासाठी इच्छुक सरसावले असून, मतदार कुणाच्या पाठीशी उभे राहतात, ही मोठी उत्सुकता आहे.

प्रभाग ७

रंगतदार लढतींची चिन्हे

गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालय, गोळे कॉलनी, अशोक स्तंभालगतचा घारपुरे घाट, कॉलेजरोड-डिसुझा कॉलनी, पाटील लेन, पंडित कॉलनी असा पसरलेला हा प्रभाग उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय वस्तीचा अधिक आहे. मात्र, मल्हार खाण झोपडपट्टीही याच प्रभागात येते. प्रभागातील एकूण लोकसंख्या ४४ हजार ३८२ एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीच्या २८११, तर अनुसूचित जमातीच्या २४६९ लोकसंख्येचा समावेश आहे. प्रभागात एकूण ३६ हजार १५३ मतदार आहेत. प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहेत, तर एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक जागा सर्वसाधारणसाठी आहे. प्रभागात प्रा. फरांदे, डॉ. आहेर, हिरे, बोरस्ते हे विद्यमान नगरसेवक आहेत. या प्रभागात भाजपच्या इच्छुकांची रांग मोठी आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आहेर यांची कन्या हिमगौरी आहेर-आडके, आमदार हिरे यांचे दीर योगेश (मुन्ना) हिरे, अनिल भालेराव यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा भालेराव, माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे, भाजपचे दिवंगत नेते बंडोपंत जोशी यांचे चिरंजीव देवदत्त जोशी हे सारे प्रचाराला लागले आहेत. शिवसेनेच्या वतीने महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राजेंद्र देसाई यांच्या पत्नी संगीता देसाई, शीतल देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे हे या प्रभागातून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून किशोर शिरसाट उमेदवारी करणार आहेत. काँग्रेसला या प्रभागात उमोदवाराचा शोध आहे. भाजप वगळता सर्वच पक्षांना विजयी उमेदवार आणि चेहऱ्याची प्रतीक्षा आहे. भाजपातील इच्छुकांची संख्या लक्षात घेता तिकीट नाही मिळाले, तर ऐनवेळी अन्य पक्षात जाऊन उमेदवारी करण्याचा प्रयत्न काही जण करू शकतात. त्यामुळे येथील लढती रंगतदार असतील.

प्रभाग १२

उमेदवारीवर ठरणार गणित

महात्मानगर, येवलेकर मळा, होलाराम कॉलनी, कालिका मंदिर, टिळकवाडी, राका कॉलनी, मिलिंदनगर, क्रांतीनगर झोपडपट्टी, सिद्धार्थनगर झोपडपट्टी महामार्ग बस स्टँड अशा विस्तारलेल्या या प्रभागाची लोकसंख्या ५० हजार २५७ आहे. यात अनुसूचित जातीच्या ६४५४, तर अनुसूचित जमातीच्या ३३२३ लोकसंख्येचा समावेश आहे. प्रभागात एकूण ३५ हजार ८४२ मतदार आहेत. या प्रभागातही उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीतील रहिवाशांचा समावेश आहे. प्रभागात अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभागातील विद्यमान नगरसेवकांमध्ये मनसेच्या सुजाता डेरे, सुनीता मोटकरी, राष्ट्रवादीच्या छाया ठाकरे, काँग्रेसच्या योगिता आहेर, शिवाजी गांगुर्डे यांचा समावेश आहे. प्रभागात भाजपच्या वतीने सुरेश पाटील, काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले शिवाजी गांगुर्डे, त्यांचे चिरंजीव विक्रम गांगुर्डे, मधुकर हिंगमिरे, उद्योजक धनंजय बेळे यांच्या पत्नी प्रेरणा बेळे, गणेश पालवे, रोहिणी नायडू, हेमंत धात्रक, गणेश कांबळे हे इच्छुक आहेत. काँग्रेसमधून माजी नगरसेविका ममता पाटील, डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका योगिता आहेर, माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे, उत्तम कांबळे यांचे चिरंजीव समीर कांबळे, वर्षा तेजाळे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री छाया ठाकरे या प्रभागातून उमेदवारी करणार आहेत. शिवसेनेकडून विनोद लोणसे, रवी जाधव, मधुकर देवरे, संजय वाघमारे, नीता योगेश चव्हाणके यांनी प्रचार सुरू केला आहे. मनसेच्या सुजाता डेरे, सुनीता मोटकरी या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवसेनेला मात्र या प्रभागात मातब्बर उमेदवाराचा शोध आहे. राष्ट्रवादी आणि मनसे यांनाही या प्रभागात प्रबळ उमेदवारीसाठी प्रतीक्षा आहे. इच्छुकांपैकी कुणाला तिकीट मिळते आणि कोण प्रबळ उमेदवार होतो, यावर या प्रभागातील गणिते अवलंबून आहेत.

प्रभाग १३

समस्या-विकास हे मुद्दे महत्त्वाचे

तेली गल्ली, नेहरू गार्डन, पंचशीलनगर, बुधवार पेठ, बडी दर्गा, कुंभारवाडा, काझी गढी, पठाणपुरा अशा पसरलेल्या या प्रभागाची लोकसंख्या ५२ हजार ५६५ आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ३८३४ आणि अनुसूचित जमातीच्या २२१३ लोकसंख्येचा समावेश आहे. शहरातील सर्वाधिक म्हणजे ४५ हजार ३८१ मतदार या प्रभागात आहेत. प्रभागातील दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. अन्य दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण यासाठी राखीव आहेत. या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हरिभाऊ लोणारी, तसेच विजया लोणारी, माजी नगरसेवक विजय साने यांच्यासह त्यांचे चिरंजीव अजिंक्य साने, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, मनसेतून भाजपत आलेल्या माधुरी जाधव हे इच्छुक आहेत. शिवसेनेच्या वतीने माजी महापौर विनायक पांडे, मनसेतून सेनेत दाखल झालेले माजी महापौर अॅड. यतीन वाघ, विनायक खैरे यांनी प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी शहराध्यक्ष गजानन शेलार, तसेच रंजना पवार इच्छुक आहेत. काँग्रेसच्या वतीने नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेवक शाहू खैरे, बबलू खैरे हे संभाव्य उमेदवार आहेत. मनसेच्या वतीने सुरेखा भोसले यांचे नाव आहे. शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण यांच्यासह त्यांच्या कन्या डॉ. स्नेहल चव्हाण यासुद्धा इच्छुक आहेत. सध्या तरी ते चिन्हाविनाच प्रचार करीत आहेत. त्यामुळे ते कुठल्या पक्षातून इच्छुक आहेत किंवा जाणार आहेत, याची प्रभागात चर्चा आहे. पूर्व भागातील मोठा परिसर यात जोडला गेल्याने या प्रभागात चुरस मोठी आहे. भद्रकाली आणि जुन्या नाशिकचा भाग, तेथील समस्या आणि विकासाची प्रतीक्षा हे मुद्दे या प्रभागात महत्त्वाचे ठरणार आहेत.

प्रभाग १४

पुनर्विकासाचा प्रश्न केंद्रस्थानी

गंजमाळ, चौक मंडई, काझीपुरा, भोईवाडा, नानावली, नागसेनवाडी, गुरुद्वारा परिसर आणि फाळके रोड अशा विस्तारलेल्या या प्रभागाची लोकसंख्या ५१ हजार ६१८ आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ७१०४ आणि अनुसूचित जमातीच्या २०३९ लोकसंख्येचा समावेश आहे. या प्रभागात एकूण ३९ हजार ८०१ मतदार आहेत. प्रभागात अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि दोन जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहेत. यात जुन्या नाशिकचा प्रामुख्याने समावेश आहे. या भागातील मुस्लिम मतदान निर्णायक ठरणार आहे. तसेच, पक्षांना मुस्लिम चेहरा उमेदवारीसाठी निवडावा लागणार आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवकांमध्ये सूफी जीन, विनायक खैरे, शबाना पठाण, निजाम कोकणी यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संजय साबळे, सूफी जीन, निजाम कोकणी, विनायक खैरे इच्छुक आहेत. शहर विकास आघाडी स्थापन करून नशीब आजमावणारे मुशीर सय्यद यंदाही इच्छुक आहेत. मात्र, ते अपक्ष लढतात की कुठल्या पक्षात प्रवेश करतात, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मनसेच्या वतीने शरद काळे, तर काँग्रेसच्या वतीने शबाना पठाण यांनी प्रचार सुरू केला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना या ठिकाणी चांगल्या उमेदवारांचा शोध आहे. दुबई वॉर्ड अशी ख्याती असलेला परिसर या प्रभागात येतो. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात या भागाचा पुनर्विकासासाठी समावेश करण्यात आल्याने ती बाब प्रचाराचा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून ८१० इच्छुक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही स्वबळाचा नारा देत, आता पालिका निवडणूकसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी ८१० इच्छुकांनी अर्ज केले आहेत. भाजपकडे ६८४ जणांनी अर्ज केले होते. त्यामुळे इच्छुकांचा सर्वाधिक कल शिवसेनेकडे असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेकडून संपर्क प्रमुख अजय चौधरी यांच्या उपस्थितीत सोमवारपासून मुलाखती सुरू होणार असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकींमध्ये भगूर, सिन्नर, मनमाड, नांदगाव येथे शिवसेनेने चांगले यश मिळवले होते. त्याप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषदमध्येदेखील शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याच्या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. पालिकेच्या १२२ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेकडे ८१० इच्छुकांनी अर्ज केले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शालीमार येथील शिवसेना कार्यालयात सोमवारपासून सुरू होणार आहे. इच्छुकांनी शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत प्रभागात प्रत्यक्ष दिलेल्या भेटी, कुटुंबांची माहिती, फोननंबर, फोटोग्राफ या माहितीचा एक सेट घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीनंतर उमेदवारांची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवली जाईल. पक्षप्रमुखच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करतील, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व अजय बोरस्ते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images