Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कारागृहाची होणार झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाइलचे घबाड आढळून आल्यानंतर येथील कैद्यांची थेट तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला करण्याची मजल पोहचल्याने आता या कारागृहाची थेट राज्याच्या कारागृह महासंचालकांकडूनच झाडाझडती घेतली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परिणामी या कारागृहातील कैद्यांना मोबाइल सेवा पुरविणाऱ्यांवर पांघरुण घालणाऱ्यांचे पितळ येत्या काही दिवसांतच उघडे पडणार आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सध्या बेकायदेशीररित्या आढळून येणाऱ्या मोबाइल फोनचे सत्र थांबता थांबेना. एका आठवडाभराच्या कालावधीत या कारागृहात तब्बल ३२ मोबाइल फोन आढळून आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील दोन मोबाइल फोनमध्ये सीम कार्डही आढळून आल्याने संबंधित कैदी बाहेरील गुन्हेगारी जगताशी संपर्कात असल्याचेही सिद्ध झाले आहे. या मोबाइल सत्रामुळे या कारागृहाच्या सुरक्षा व प्रशासन व्यवस्थेची पुरती नाचक्की झाली आहे. त्यातच शनिवारी मोबाइल आढळून आलेल्या एका कैद्याची चौकशी करणाऱ्या तुरुंगाधिकाऱ्यावरच संबंधित कैद्याने हल्ला चढविल्याने या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा कोणताही दबदबा राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय यापूर्वी या कारागृहात कैद्यांच्या आपसांतील हाणामारीत एका कैद्याचा मृत्यूही झाला आहे. त्यापूर्वी एका कैद्याचा खूनही झाला होता. या गुन्हेगारी घटनांचा विचार करता या कारागृहाची सुरक्षाव्यवस्था व प्रशासन यांचा कैद्यांवर वचकच नसल्याचे उघड झाले आहे.

निलंबनाची कारवाई व्यर्थ
कैद्यांकडे मोबाइल फोन आढळून आल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याच्या कारागृह प्रशासनाने तीन तुरुंगाधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर या घटना थांबण्याऐवजी पुन्हा मोबाइल फोन आढळून आल्याच्या घटना उघडकीस आल्या. यावरुन निलंबनाची कारवाई व्यर्थ गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारागृहातला टिवटिवाट थांबेना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड कारागृहात मोबाइलसत्र अद्याप थांबलेले नाही. कारागृह प्रशासनाने रविवारी राबविलेल्या विशेष झडतीसत्रात आणखी आठ मोबाइल फोन आढळले. कारागृहातील मंडल क्रमांक ७ व ८ भागात हे मोबाइल आढळल्याची फिर्याद तुरुंगाधिकारी संतोष खरतोडे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री दिली. आतापर्यंत अवघ्या दहा दिवसांत कारागृहात आढळलेल्या मोबाइलची संख्या तब्बल ४० वर जाऊन पोहोचली आहे.

कारागृहात रविवारी आढळून आलेले आठही मोबाइल फोन सॅमसंग कंपनीचे आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शनिवारपासून मोबाइल आढळून येत आहेत. या घटनांमुळे नाशिकरोड कारागृहाची सुरक्षाव्यवस्था ढासळली असल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनांचा सुळसुळाट झाल्याचा फटका तीन तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबनाच्या स्वरूपात बसला आहे. मात्र ही कारवाई केवळ फुसका बार ठरली आहे. तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही मोबाइल आढळण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. रविवारी पुन्हा आठ मोबाइल आढळल्याने ते सिद्ध झाले आहे.

आणखी साठा असण्याची शक्यता

कारागृहात रोजच बेवारस मोबाइल फोन आढळून येत आहेत. याचा अर्थ कारागृहातील कैद्यांकडे यापूर्वीच मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन पोहोचलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारागृहात अद्याप मोबाइल फोनचा मोठा साठा असण्याची शक्यता निर्माण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकाने बंद करून गुंडाचा वाढदिवस साजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक
मल्हारखान झोपडपट्टीतील एका गुंडाने व्यावसायिकांची दुकाने बंद करून ध्रुवनगरला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले अनेक पदाधिकारीही उपस्थित असल्याची चर्चा आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल प्रयत्न करत आहेत. परंतु दुसरीकडे गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मल्हारखान झोपडपट्टीतील एका कुख्यात व्यक्तीने दुकानदारांना धमकावत दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. दुकानदारांनीही दहशतीपोटी सात वाजताच दुकाने बंद केली होती. परंतु यात गंगापूर पोलिसांनी संबंधित गुंडाला वाढदिवसाची परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कायद्याचा धाक नसल्याने संबंधित व्यक्तिला गंगापूर पोलिस तर पाठिशी घालत नाही ना, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या वाढदिवसाला नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित राहिल्याने शिवसैनिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील ठाकरे उद्यानाचा प्रारंभ

$
0
0

आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान व नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाचे लोकार्पण सोमवारी (दि. २६) युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी, विरोधी पक्षात असतांनाही मोठ्या प्रमाणावर विकास कामे शिवसेनेकडून होत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेवर आल्यावर हा जोर अजूनच वाढेल व नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्यानाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार दादा भुसे यांनी, नाशिक शहरात व जिल्ह्यात शिवसेनेचे काम अतिशय योग्य पद्धतीने व जोरदार सुरू आहे. अनेकजण पक्षात येण्यासाठी तयार असून आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही संस्थांवर भगवा फडकणारच, असे त्यांनी सांगितले.

या वेळी व्यासपीठावर शिवसेना नेते आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, शिवाजी चुंभळे, मामा ठाकरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचनेस पुन्हा स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरील हरकतीबाबत न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या कोर्टात २ जानेवारी रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. तोपर्यंत प्रभाग रचनेच्या कार्यवाहीबाबत कोर्टाने मनाई हुकूम केला आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात हर्षल जाधव यांनी नाशिकच्या दिवाणी कोर्टात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रभाग रचना हरकती संदर्भांत सुनावणी घेण्याचा दिवाणी कोर्टाला अधिकारच नसल्याचा निर्वाळा देत कोर्टाने तक्रारदारास वरिष्ठ कोर्टात जाण्यास मुदत दिली होती. अपीलासाठी देण्यात आलेल्या वेळेपर्यंत प्रभाग रचनेसंदर्भात कोणतेही कार्यवाही करण्याबाबत दिवाणी कोर्टाने मनाई केली आहे. वरिष्ठ कोर्टात अपील करण्यासाठी तक्रारदारास २८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत तात्पुरता मनाई हुकूमदेखील लागू असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर तक्रारदाराच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील करण्यात आले. एस. आर. शर्मा यांच्या कोर्टासमोर सदर अर्ज आला असून, त्यावर सोमवारी (दि. २६) सुनावणी झाली.

त्यानंतर कोर्टाने दिवाणी कोर्टाने दिलेला मनाई हुकूम २ जानेवारीपर्यंत कायम केला. या बाबत बोलताना अॅड. सुधीर कोतवाल यांनी सांगितले की, सदर अर्जावर दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झालेला नाही. काही तांत्रिक कारणांमुळे मनाई हुकूम वाढवण्यात आला असल्याचे अॅड. कोतवाल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मारकाऐवजी गड-किल्ल्यांची दुरुस्ती करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे सरकार केवळ पोकळ घोषणा करतानाच, स्मारकांवर खर्च करण्याऐवजी राज्यातील गड किल्ल्यांची दुरुस्ती करावी, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकावर होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. सरकारकडे पैसा नसताना केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. राज्यातील युती सरकारची वाटचाल काँग्रेस सरकारप्रमाणेच सुरू असल्याचा टोलाही राज यांनी लगावला.

शहरातील विविध विकासकामांच्या पाहणीसाठी राज दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी (दि.२६) त्यांनी गोल्फ क्लब विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. आम्ही म्हणत होतो तेव्हा पाचशे कोटी रुपये खर्च येणार होता. आताचे सरकार ३ हजार ७०० कोटी रुपये खर्च करायला तयार झाले आहे. इतका खर्च करणे खरोखर गरजेचे आहे का? असा सवाल उपस्थितीत करतानाच हा केवळ कागदावरचा खर्च असून, प्रत्यक्षात काम करताना किती पैसे लागतील लागतील याचा भरवसा नाही, असे राज यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गड किल्ले आज अखेरची घटका मोजत आहेत. हाच त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरला तर त्यांना ऊर्जितावस्था मिळू शकेल. स्मारकाची घाईघाईने घोषणा तर केली, मात्र ही दिशाभूल आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचायत समितीने दर्जेदार सेवा द्यावी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण जनतेला पायाभूत सोयी-सुविधा देणाऱ्या पंचायत समितीने नागरिकांच्या गरजा ओळखून दर्जेदार सेवा द्यावी, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. पंचायत समितीच्या अत्याधुनिक इमारतीसह सय्यदपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद््घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

सय्यदपिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत विंचूरगवळी, सुलतानपूर, ओढा, माडसांगवी, लाखलगाव, शिलापूर या गावांतील लोकसंख्येला आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सहाय्यकांसह १४ कर्मचारी येथे उपलब्ध असून कुटुंब नियोजन, अंधत्व निवारणासह विविध आजारांवर उपचार केले जातील, असे उपसभापती अनिल ढिकले यांनी सांगितले. याप्रसंगी युवा सेनेचे आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार योगेश घोलप, माजीमंत्री बबन घोलप उपस्थित होते.

अत्याधुनिक पंचायत समिती

अल्प लोकसंख्या असतानाही अत्याधुनिक इमारत साकारणारी नाशिक पंचायत समिती ही राज्यभरात नावाजली आहे. गेल्या दीड वर्षात ४ कोटी रुपये खर्चून ही इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीत सुसज्ज सभागृह, महिलांसाठी विशेष दालन, विशेष कॅबिन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुम, ट्रेनिंग सेंटर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. अतिशय देखण्या या इमारतीची पाहणी करण्यासाठी नागपूर पंचायत समितीचे पदाधिकारीही येऊन गेले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळेच नाशिकप्रमाणेच नागपूरातही अशीच इमारत साकार होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबिर तयारीला वेग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकार, सिव्हिल हॉस्पिटल आणि नाशिक महापालिका यांच्यावतीने येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या तयारीने वेग घेतला आहे. त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदानाच्या शेजारी असलेल्या ईदगाह मैदानाच्या ठिकाणी या शिबीराच्या भव्य मंडप उभारणीचे काम सध्या सुरू आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन संकल्पनेतून येत्या १ जानेवारी रोजी महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. यापूर्वी, जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे झालेल्या शिबिरांना उदंच प्रतिसाद लाभला आहे. आता हे शिबिर नाशकात प्रथमच होत आहे. या शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जाणार आहे. या शिबिराची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा दुर्धर अथवा गंभीर आजार असेल, हृदयरोग, किडनीचे आजार, मेंदूचे आजार, कॅन्सर, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कानाचे आजार, पोटाचे आजार, संधीवात अशा कुठल्याही आजाराबाबत या शिबिरात उपचार केले जाणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी व नोंदणीची मोहिम सुरू आहे.
येत्या ३० डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेद्वारे वितरित करण्यात येणारी नोंदणी चिठ्ठी घेऊन रुग्णांना शिबिरात सहभागी होता येणार आहे. शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार पूर्णत: मोफत केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगणवाडी सेविकांची निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत. मागण्यांचा कुठलाही विचार अद्याप करण्यात आलेला नाही. आशा कर्मचाऱ्यांना मानधनही नाही, या साऱ्याच बाबतीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘सिटू’च्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. आमच्या मागण्या त्वरित मान्य करा, असा टाहो यावेळी निदर्शक महिलांनी फोडला.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी आदींद्वारे राज्य सरकार मोठ्या प्रमाणात काम करून घेत आहे. मात्र, या सर्वांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. सिटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशन यांच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरतीन वर्षांनी केंद्र सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते. त्यानुसार, २००८ आणि २०११ साली सरकारने वाढ केली. मात्र, त्यानंतर २०१४ साली अपेक्षित मानधनवाढ झालीच नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केली. शिवाय संप, मोर्चे काढल्यानंतर सरकारने मानधनवाढ व एकरकमी सेवासमाप्ती लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात सेवासमाप्ती लाभाची अंमलबजावणी झालेली नाही.

प्रमुख मागण्या अशा

केंद्र सरकारने आयसीडीएस केवळ तात्पुरती योजना म्हणून न राबवता, त्याचे नियमितीकरण करावे
‘आयसीडीएस’ला महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत उपखात्याचा दर्जा देऊन सरकारचा कायमचा उपक्रम म्हणून राबवावा.
सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
सेविकांना १० हजार व मदतनिसांना ७ हजार ५०० मानधन लागू करा.
सेविका, मदतनिसांना भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्यविमा, घरकुलासाठी अनुदान इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.
सेविका, मदतनिसांना वर्षातून १५ दिवसांची पगारी वैद्यकीय रजा व उन्हाळ्याची सुटी मंजूर करावी.
मानधन दरमहा १० तारखेच्या आत नियमितपणे अदा करण्यात यावे.
आशा वर्कर्स, स्त्री परिचर यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या
आशांचा कामाचा मोबदला व मिटींग भत्ता दुप्पट मिळावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवर गुन्हे दाखल करू

$
0
0

विखे-पाटलांचा इशारा; उद्दिष्टपूर्तीच्या श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

म.टा प्रतिनिधी, नाशिक

काळे धन बाळगणाऱ्या एक टक्का लोकांसाठी सरकारने ९९ टक्के जनतेला वेठीस धरले आहे. नोटा बंदीच्या निर्णयाला लवकरच ५० दिवस पूर्ण होणार असून लोकांचे हाल सुरूच आहेत. आपले पैसे बँकांमध्ये अडकून पडल्याने लोकांच्या संतापाचा कडेलोट होत आहे. ही परिस्थिती नववर्षातही कायम राहिली तर सरकारवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (दि. २६) नाशिकमध्ये दिला.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी विखे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, एकीकडे नोटा बंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील नवसारीसारख्या ठिकाणी एका कार्यक्रमात नवीन नोटा उधळण्यात आल्या. यावरून नोटाबंदी होणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होती, हे आता सिद्ध होऊ लागले आहे, असे ते म्हणाले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने तब्बल ५८ वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढले. त्यातील अनेक आदेश मागे घेण्याची नामुष्कीदेखील सरकारवर ओढावली. काही आदेशांसाठी शुद्धिपत्रक काढावे लागले. नोटा बंदीबाबत मोदी एकटेच बोलत आहेत. केंद्र सरकारचा सर्व बिनभरवशाचा कारभार सुरू असून लोकांना आणखी किती काळ मुर्ख बनविणार आहात, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या सरकार कॅशलेसचा डंका वाजवत असून १५ लाख कोटींच्या नवीन नोटा छापल्या जात असल्याच्या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले. चलनात होता तेवढा पैसा आता पुन्हा आला तर काळा पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला हवीत. तसेच ३१ डिसेंबरनंतर नागरिकांचे हाल कमी झाले नाहीत तर सरकार विरोधात गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण होताच सरकारने उद्दिष्ट्यपूर्तीच्या श्वेतपत्रिका काढाव्यात, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

महापुरुषांना तरी सोडा…

शिवस्मारकाच्या मुद्दयावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू राजकारणावरही विखे पाटील यांनी टीका केली. महापुरुषांना राजकारणापासून बाजूला ठेवा. त्यांचे पावित्र्य कमी करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाला आलेले शिवभक्त शिवरायांचे मावळे असतील तर ते खाली बसतील, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना करावे लागल्याबद्दल त्यांनी खिल्ली उडविली. सरकार इव्हेंट मॅनेजमेंटच्यापलिकडे जात नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पुतळ्यांना ‘अच्छे दिन’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर त्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटू लागले आहेत. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पुतळ्यांना ऊर्जितावस्था आणण्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी नव्याने पुतळ्यांची उभारणी करण्यात येत आहे.

सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच आगरटाकळी येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते झाला. हे दोन्ही पुतळे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असतांना माजी महापौर अशोक दिवे यांच्या समतानगर येथील समाज मंदिरालगत बसवण्यात आले होते. तेव्हा ते अर्धाकृती होते आता त्याचे नूतनीकरण करण्यात आले असून ते पूर्णाकृती करण्यात आले आहे. पुतळ्यांच्या माध्यमातून विचारांची प्रेरणा समाजाला मिळत असते. डॉ. आंबेडकरांनी आपल्या विचारांचे गुरू म्हणून महात्मा फुले यांना मानत होते. या शिल्पकृतीच्या माध्यमातून गुरुशिष्याचे विचार समाजाला प्रेरणा देतील असे मान्यवरांनी स्पष्ट केले. दोन्ही पुतळ्यांची उंची १२ फुट व चबुतरे ३५ फुटांचे असल्याची माहिती नगरसेवक राहुल दिवे यांनी दिली.

वडाळा नाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मंगळवारी (दि. २७) उद्‍घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता वडाळानाका येथे होणार आहे. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. शालिमार जवळील नेहरू उद्यानाजवळील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याही पुतळ्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तो पुतळा पूर्णाकृती करण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून हा पुतळा कपड्याने बांधलेल्या अवस्थेत असून नागरिक पुतळा खुला होण्याची वाट पहात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते पुतळ्याचे अनावरण व्हावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने उद्‍घाटन समारंभ रखडला आहे.

विचारांचे आचरण कधी?
नव्या पिढीला महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार होण्यास भव्यदिव्य स्वरुपात असणारे पुतळे नक्कीच मार्गदर्शक ठरतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, खरी गरज या बड्या व्यक्तींचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढप्रश्नी ‘तारीख’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पालक शिक्षक संघ कार्यकारिणी आणि शिक्षण खात्याला न जुमानता शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शिक्षण शुल्कामध्ये वारेमाप वाढ केली आहे. ती रद्द करण्यासह संबंधित शाळांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हरकतींवर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण शुल्क नियमन समितीपुढे सोमवारी सुनावणी झाली. मात्र, संबंधित शाळांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. या समितीने पुढील महिन्यात पुन्हा सुनावणी होईल, असे आदेश दिले.

शहरातील केंब्रीज, अशोका, सेंट फ्रान्सिस या इंग्रजी माध्यमांच्या बड्या शाळांच्या मनमानी कामकाजाबद्दल त्याच शाळांतील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह काही पालकांनी शिक्षण खात्यासह कोर्टातही तक्रारी दाखल केल्या आहेत. या शाळा शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित पालक प्रतिनिधींनी विभागीय शिक्षण शुल्क नियमन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख यांच्यापुढे केला. यावेळी समितीचे सदस्य सनदी लेखापाल उल्हास बोरसे, निवृत्त शिक्षण सहसंचालक अरुण ठाकरे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. या सुनावणीदरम्यान उपस्थित पालक व पालक प्रतिनिधींनी संबंधित शाळांनी केलेली शिक्षण शुल्क वाढ ही पालक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या व शिक्षण खात्याच्या मंजुरीशिवाय केलेली आहे. त्यामुळे ती शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने रद्द करण्याची मागणी केली. याशिवाय यापैकी काही शाळांकडून विद्यार्थ्यांना मानसिक व शारिरीक छळही केला जात आहे. या प्रकाराचीही शहानिशा करून कारवाईची मागणी केली.

सुनावणीला राणेनगरच्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अॅड. सिमना अकील आयुब, तिडके कॉलनी शाखेचे मकरंद वाघ, हरीश वाघ, एलियास खान, अशोका स्कूलचे पालक-शिक्षक संघाचे अमोल कलंत्री, तृप्ती ठाकूर, केंब्रीज स्कूलचे पालक-शिक्षक संघाचे राजेश बडनखे, योगेश पालवे, शेखर कुलकर्णी यांच्यासह इतर पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

गैरहजेरीत निर्णय घेणे अनुचित
पालक व पालक प्रतिनिधींनी या समितीसमोर काही न्यायालयीन आदेशांचे कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर या समितीने या पालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर येत्या जानेवारीमध्ये संबंधित शाळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पुन्हा या विषयावर सुनावणी घेण्याचा अंतिम निर्णय या पालकांना दिला. या पालकांनी पुढील सुनावणीपेक्षा आताच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. यावर संबंधित शाळांच्या वतीने या सुनावणीस कोणीही उपस्थित नसल्याने त्यांच्या गैरहजेरीत अंतिम निर्णय घेणे अनुचित ठरेल असे मत समितीने नोंदविले. मात्र, पुढील सुनावणीस संबंधित शाळांचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास समिती अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय मात्र संबंधित शाळांना बंधनकारक राहील, असेही मत या समितीने यावेळी नोंदवले.

सेंट फ्रान्सिस स्कूलकडून शिक्षण खात्याचे नियम व आदेश धाब्यावर बसविले जात आहेत. या शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या चौकशी समितींच्या अहवालातही या शाळेने नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद आहे. आजच्या सुनावणीस काहीतरी ठोस निर्णय होणे अपेक्षित होते.
- अॅड. सिमना अकील आयुब, उपाध्यक्ष, पालक-शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यावे, पक्षात स्वागतच आहे!

$
0
0

डॉक्टर, इंजिनीअर, वकील आणि आता शेवरे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकारणात शब्दाला नाही तर परिस्थितीला किंमत असते. परिस्थितीनुरूप जसे निर्णय घेता येईल, तसे घ्यावे लागतात. याचा सर्वांत मोठा अनुभव आजमितीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेत आहेत. २०१२ मध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांची परीक्षा घेऊन उमेदवारी देणारे ठाकरे आज गंभीर गुन्हे नावावर असलेल्या योगेश शेवरेला आवताण देत आहेत. या पक्षात आपले स्वागतच आहे, अशी राज ठाकरे यांची भूमिका थोडीफार आशा असलेल्या मतदारांना रूचणार काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेला १२२ उमेदवार मिळवताना नाकी नऊ येण्याची शक्यता आहे. फक्त आऊटगोईंग सुरू असलेल्या मनसेत आज कोणी प्रवेश करणार म्हटले तर पदाधिकाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मग, त्याच्यावर खून, दरोडे, हाणामारी असे गुन्हे दाखल असले तरी बेहत्तर!

सातपूरमधील कुख्यात गुंड योगेश शेवरे याच कलाने जाणारा. काही दिवसांपूर्वी त्याने मनसेत प्रवेश केला. प्रवेश सोहळा पार पडताच पोलिसांनी शेवरेची उचलबांगडी करीत पोलिस स्टेशनला आणले. याच शेवरेने आज प्रथमच पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरेंची भेट घेतली. उच्च शिक्षितांच्या पक्षात शेवरेलाही स्थान मिळाल्याचा ‘आनंद’ या भेटीत मात्र दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विह‌िरीतील पाण्याची सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारत असताना नांदूर शिंगोटेच्या मंडळ अधिकाऱ्यास अॅण्टि करप्शन ब्युरोने गजाआड केले. सिन्नर तहसील कार्यालयातील गोदामपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यास मंगळवारी दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली.
केरूपाटील जिजाबा लांडगे (५६) असे लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. नांदूर शिंगोटे येथे मंडळ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या लांडगेकडे शासकीय धान्य गोडाऊन येथे गोदामपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या विह‌िरीतील पाण्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी मूळ विहीर मालक यांनी हरकत घेतली होती. नंतर, मूळ मालक यांनी हरकत माघार घेतल्याचे प्रमाणपत्र तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी लांडगे यांच्याकडे सादर केले. त्याप्रमाणे नोंद मंजूर करून ७‍/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठीचा आदेश पारीत करण्यासाठी संशयित आरोपी लांडगेने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीच्या पथकाने लागलीच पडताळणी करून सिन्नरच्या शासकीय धान्य गोडावून येथे मंगळवारी सापळा रचला. दोन हजार तसेच पाचशेच्या प्रत्येकी दोन नोटा स्वीकारताना एसीबीने लांडगेला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये दोन पुरोहितांची कसून चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काळ्या पैशांविरोधात मोहीम उघडणाऱ्या केंद्र सरकारने शेवटच्या टप्प्यात धार्मिक स्थळांकडे मोर्चा वळवल्याचे त्र्यंबकेश्वर येथील प्राप्तिकर विभागाच्या छापासत्राने स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये प्राप्तिकर विभागाने सोमवारी चांदवडकर आणि शिखरे या दोन पुरोहितांची तपासणी केली. ही तपासणी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. ही चौकशी बुधवारीही सुरू राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिल्याने अन्य व्यावसायिकांत चलबिचल सुरू आहे.

प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मेनरोडवरील चांदवडकर कुटुंबीय व मंदिराजवळ असलेल्या शिवनेरी चौकातील शिखरे कुटुंबीयांची पहिल्या दिवशी सोने-चांदी मोजदाद, हिशेबांच्या वह्यांची माहिती घेतली, तर मंगळवारी दुसऱ्या दिवशी बँक खात्यांची तपासणी, तीन वर्षांतील आयकर तपशील आणि इतर लिखित व्यवहारांचा मेळ घालण्यात अधिकारी व्यस्त होते. शहरात प्राप्तिकर विभागाची मंगळवारी सायंकाळपर्यंत वाहने उभी होती. कागदपत्रांच्या आधारे प्राप्तिकर विभाग आणखी माहिती घेत आहेत. दोन दिवसांपासून चौकशी सुरू असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.

भीतीने अनेकांनी जाळल्या वह्या?

त्र्यंबकेश्वरमध्ये सोमवारपासून सुरू असलेले चौकशीसत्र अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारीही सुरू राहणार असल्याचे समजते. शिखरे आणि चांदवडकर या दोन्ही कुटुंबांकडे नेमकी काय बेहिशेबी मालमत्ता आढळली किंवा नाही, याबाबत नागरिकांत चर्चा सुरू होती. शहरात प्राप्तिकर खात्याच्या या कारवाईच्या भीतीने मंगळवारी काहींनी आपल्याकडील जुन्या वह्या जाळण्याचे सत्र सुरू केले होते. पुरोहितच नव्हे, तर अन्य व्यावसायिकांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. जमीन खरेदी-व्रिकी एजंट आणि बांधकाम व्यावसायिकांत यामुळे खळबळ उडाली आहे.

छापा नव्हे, नियमित तपासणी

प्राप्तिकर विभागाकडून केवळ कागदपत्र तपासणी सुरू आहे. हा छापा नव्हता. मात्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलेल्या अतीरंजित वृत्तांमुळे पुरोहित संघ नाराज झाला आहे. येथील पुरोहित आणि पौरोहित्याची बदनामी होत आहे. जेव्हा गर्दी नव्हती तेव्हाही येथील पुरोहित प्राप्तिकर भरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस धोरणाला अनुसरून योग्य ते बदल केले जात आहेत. येथे आलेल्या भाविकांचे समाधान होईल असे धार्मिक विधी केल्याने येथे गर्दी वाढली आहे. मात्र नियमित तपासणीप्रमाणे येथे दोन पुरोहित कुटुंबांची तपासणी झाली. यामध्ये आक्षेपार्ह काही आढल्याचे कोणत्याही शासकीय यंत्रणेने अधिकृत सांगितलेले नाही, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळेच्या पटांगणातच गजबजला बाजार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

छोट्या छोट्या जुड्यांमधील कांद्याची पात, ओला केलेले कढीपत्ता, पिकलेली बोरं, भरताची वांगी अन् असं बरंच काही छोट्याशा पथारीवर मांडून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बेज येथील शाळेच्या आवारातच आठवडे बाजार भरविला. रोजच्या जगण्यातील बाजार आणि त्यातील व्यवहार ज्ञान अनुभवताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसून आले.

बेज येथील बाल विकास मंदिर व महात्मा फुले विद्यालयात ज्ञानरचनावर आधारित आठवडे बाजार संकल्पना विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः भाजीपाला आणून विक्री केली. विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच पालकांनीही भाजीपाला खरेदी केला. विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानातून जीवनकौशल्य व सुप्त गुणांचा विकास होऊन एक आदर्श व सुजाण नागरिक घडावा यासाठी बालआनंद मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान खरेदी-विक्री, नफा, तोटा तसेच मालाची साठवणूक नियोजन विक्री व्यवस्था याबाबत ज्ञान मिळाले. मेळाव्यात भाजीपाला, कटलरी इ. जवळपास ७० ते ७५ दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. रोजच्या व्यवहारातील ज्ञान इतके सहज मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्राचार्य बी. डी. रौंदळ, पर्यवेक्षक बी. आर. सागर, शिक्षक विलास शेवाळे, नितीन पाटील, मिरा आहेर, देविदास जाधव आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. शिक्षकांसह पालकांनीही विद्यार्थ्यांकडून खरेदी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’टॉवरबाबत नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील सर्वात मोठी नागरी वस्ती असलेल्या जनार्दन स्वामी नगरातील रेणुका अपार्टमेंटच्या टेरेसवरील अनाधिकृत मोबाइल टॉवरचे काम बंद करावे, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी नोटीस निफाड नगरपंचायतीने इमारतीच्या मालकाला बजावली आहे.

कोणतीही परवानगी न घेता आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असूनही इंडस कंपनी या इमारतीच्या टॉवरवर टॉवर उभा करीत आहे. त्याविरोधात नागरिक आक्रमक झाल्याने निफाड नगरपंचायतीने या इमारतीच्या मालकाला दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. या टॉवरचे काम गुपचूप आणि अंधारात सुरु असल्याने नागरिक चिडले आहेत.

आरोग्यावर परिणाम होईल म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून या टॉवरला आम्ही विरोध करीत आहोत. परंतु संबंध‌ित कंपनी कोणतीही परवानगी नसताना दादागिरीने हे काम टप्प्याटप्प्याने सुरू ठेवीत आहे. त्यामुळे येथे बसवलेली डीपी आणि टॉवर नगरपंचायतीने काढून घ्यावा अन्यथा भविष्यात नागरिक अधिक आक्रमक होतील.- राहुल नागरे, रहिवासी

रेणुका अपार्टमेंटच्या मालकाला नोटीस बजावली असून, डीपी सील केली जाणार आहे. परत काम सुरू झाल्याचे निदर्शनास आले तर नागरिकांच्या जीव‌िताला धोका होणारे काम करीत असल्याचा ठपका ठेवत फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
- किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकाऊंटचा अभ्यासक्रम अद्ययावत होण्याची गरज

$
0
0

अकाऊंटचा अभ्यासक्रम अद्ययावत होण्याची गरज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड काळाची गरज असून, या विषयाचा अभ्यासक्रम अद्ययावत होणे आवश्यक आहे. यादृष्टीने शिक्षणक्षेत्रात प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हरियाणा येथील एमडी विद्यापीठातील डॉ. जितेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बीसीयूडी विभाग यांच्यातर्फे अकाऊंटिंग, ऑडिटिंग व टॅक्सेशन या विषयांवर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी कॉलेजमध्ये करण्यात आले. त्यावेळी डॉ. शर्मा बोलत होते. ते म्हणाले, की सीएचा कोर्स विद्यापीठ स्तरावर सुरू करून त्यास सरकारी पातळीवरील सर्व सुविधा देण्यात यावी. तसेच, कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी पातळीवरील ऑडिटिंग करण्याची संधी मिळण्याची गरज आहे. वाणिज्य क्षेत्राविषयी विचारविनिमय करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील १७ प्राध्यापक व ७७ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. डॉ. सुहास धांडे, डॉ. नागराज मसनानी यांचे व्याख्यानही यादरम्यान पार पडले. प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांचे संशोधन पेपर वाचन सत्रदेखील झाले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक अध्यक्षस्थानी होते. डॉ. धर्माजी बोडके, संचालक संपत वाघ, भगवान सानप, प्राचार्य डॉ. वसंत वाघ, उपप्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, विभागप्रमुख डॉ. रुपाली शिंदे आदी उपस्थित होते.


हे करणार आज मार्गदर्शन

आज, बुधवारी (दि. २८) डॉ. हरीश आडके, डॉ. इंद्रकांती शेखर, डॉ. रावसाहेब शिंदे, डॉ. धीरज झाल्टे, डॉ. व्ही. एम. गोवीकर, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. अरुण गायकवाड यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवख्यांसह दिग्गजांचीही घालमेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

चार सदस्यीय प्रभाग पद्धती, प्रभागांची मोडतोड, नोटाबंदीच्या निर्णयाने झालेली आर्थिक नाकेबंदी, जिल्हाभरातील सहा नगरपालिकांचे निकाल या पार्श्वभूमीवर या विभागातील प्रभागांत नवख्या इच्छुकांसह दिग्गजांचीही घालमेल वाढली आहे. निवडून येण्यासाठी तडजोड करण्याची तयारीही विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांकडून दाखविली जात आहे. पक्षांतर, परंपरागत शत्रूंशी हातमिळवणी, मित्रांशी गद्दारी अशा अनेक घटना राजकीय पटलावार वेगाने घडू लागल्या आहेत.

निष्ठावंतांमध्ये वाढली अस्वस्थता
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरू झाले आहे. याचा फटका पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बसू लागला आहे. भाजप व शिवसेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पक्षाला आता चांगले दिवस आल्यानंतर आपल्याला नगरसेवक बनण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा धरून वर्षानुवर्षे पक्षाचे एकनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षांतरामुळे मोठा धक्का बसला आहे. पक्षांतराच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे, तर आयत्या वेळी प्रवेश करणाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे मेसेज व्हायरल केले जात आहेत.

पॅनलनिर्मितीचीही चाचपणी सुरू
प्रभागांमध्ये पक्षांतर व प्रभाग विकास आघाडी अशा वेगवेगळ्या मार्गाने चांगले पॅनल तयार करून संपूर्ण पॅनलच निवडून आणू, अशी अपेक्षा ठेवून अनेक जण कमाला लागले आहेत. मात्र, मतदारांकडून चारही मते एकाच पक्षाला देण्याचा उदारपणा दाखविला जाणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंग करून एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून दिले जातील, असाही अंदाज कार्यकत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, नेत्यांचे मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू असतांना आपल्याला सोयीच्या ठरू शकणाऱ्या नवख्या उमेदवारांना हाताशी घेण्याची कसब काही मातब्बर नगरसेवकांसह बड्यां नेत्यांनी साधले आहे. मात्र, या नवख्यांना निवडणून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.

पक्षांतर अन् तडजोडी
महापालिका निवडणुकीसाठी काही विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांचे आस्तेकदम सुरू आहे, तर काही इच्छुकांकडून कार्यकर्त्यांच्या भावना आणि विविध पद्धतीने सर्वे करून चाचपणी केली जात आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गजांच्या पक्षबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नव्या चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेकांची अडचण झाली आहे. एकट्याच्या बळावर निवडून येणे जिकिरीचे वाटत असल्याने पक्षांतर आणि तडजोड करण्याची तयारी सुरू आहे. या सोबत जातीय समीकरांचादेखील अभ्यास केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकटफूची आतषबाजी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नगरसेवकांची विविध विकासकामांच्या उद्‍घाटनांची लगीनघाई सुरू आहे. या माध्यामातून ते प्रभागातील नागरिकांना वचनपूर्ती केल्याची जाणीव करून देत आहेत. तर दुसरीकडे, अन्य इच्छुक उमेदवार मतदारांना विविध मोफत सेवा देण्याचा उपक्रम राबवित जनसंपर्क मोहिमेला गती देत आहेत.

मोफत जिओ मोबाइल सिमकार्ड, प्रभागात मोफत वाय-फाय, आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देण्यासाठी शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, धार्मिक सहली, कार्यक्रम, भंडारे, आनंदमेळा,आदी विविध माध्यमातून इच्छुकांनी नागरिकांची काळजी घेतली जात आहे. नववर्षासाठी ३१ डिसेंबरचे ही खास आकर्षणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपापल्या वोटबँकची खास दक्षता घेत विविध मोफत सेवा देण्याचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जुने नाशिकमधील मुस्लिम बहुल इलाख्यात शनिवारी, ३१ डिसेंबर निमित्त नामवंत कलावंतांचा कथडा परिसरात खास कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुकांच्या हालचालींवर लक्ष
निवडणूक काळात मिळणाऱ्या मोफत सेवांमुळे नागरिकही भारावून जात आहेत. दर दिवशी एक नवीन इच्छुक उमेदवार एक नवा उपक्रम व मोफत सेवा देण्यासाठी आपले परिचयपत्रक घेऊन मतदारांच्या दारी धडकतोय. प्रभागाचे मावळते नगरसेवकही या प्रतिस्पर्धी इच्छुकांच्या हालचालींवर खास लक्ष ठेवून आहेत. नगरसेवकांनाही प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विविध विकासकामांचे उद्‍घाटन कार्यक्रमांद्वारे पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडून वचनपूर्ती करून दिल्याची नागरिकांना जाणीव करून देत आहेत.

सुविधा लाभासाठी उसळतेय गर्दी
जुने नाशिमधील यापूर्वीच्या प्रभाग क्रमांक २५, २६, २६, ३८, २९, ३०, ३१, ३७, ३८, ३९, ४०, ५४, ५७ या भागांमध्ये नगरसेवकांनी विकासकामांच्या उद्‍घाटन कार्यक्रमांचे बार उडविले आहेत. यातून मतदारांशी संपर्क वाढविण्यावर त्यांनी भर दिला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांची विकासकामांच्या उद्‍घाटनांची लगीनघाई तर दुसरीकडे अन्य इच्छुक उमेदवारांचे मोफत विविध सेवांचे फंडे वापरत असल्याने निवडणुकीचे वातावरण तापण्यास सरुवात झाली आहे. मोफत मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी नागरिकही पिछाडीवर नाही, हे विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images