Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मंगळवारी पाणीपुरवठा बंद

0
0
लुंगे मंगल कार्यालय आणि द्वारका जलकुंभास पंचवटी जलकुंभातून करण्यात येणारा पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने मंगळवारी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

‘बोगस हटाव, आदिवासी बचाव’

0
0
राज्यातील बोगस आदिवासींचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याने खऱ्या आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने योग्य ती कार्यवाही तातडीने करावी आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी राज्यभरातील आदिवासी बांधवांनी मोर्चाद्वारे केली.

सूत्रधार पकडा; विधेयक मंजूर करा

0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे सूत्रधार त्वरित पकडून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी आणि येत्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करावे, अशी मागणी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

'डीपी' विरोधात शेतकरी आक्रमक

0
0
प्रस्तावित शहर विकास आराखड्यात(डेव्हलपमेंट प्लॅन) शहरालगतच्या शेतजमिनींवर टाकल्या गेलेल्या आरक्षणाविरोधात शेतकरी वर्ग एक झाला असून, त्यांनी या आराखड्याविरोधात दंड थोपटले आहेत.

संजीवनीला १५०० मीटरमध्ये रौप्य

0
0
मलेशिया येथे पहिल्या आशियाई शालेय स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नाशिकची धावपटू संजीवनी जाधवने पुन्हा रौप्य पदक पटकावले असल्याची माहिती संजीवनीचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

दुर्दैवी अपघातानंतर माणुसकीचा ओघ

0
0
अभोणा येथील सहावीतील विद्यार्थी करण गायकवाड पायी शाळेत जात असताना अज्ञात बाइकस्वाराने त्याला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मनमाडमध्ये BSNL ची सेवा विस्कळीत

0
0
शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून भारतीय दूरसंचार निगमची (बीएसएनएल) सेवा विस्कळीत झाल्यामुळे मोबाइल धारकांसह टेलिफोन व इंटरनेटधारक त्रस्त झाले आहेत.

माझाही फोटो काढ...

0
0
गेल्या काही वर्षांमध्ये हातोहाती झालेले मोबाइल कॅमेरे अन् सोशल मीडियासारख्या साधनांमुळे चमकोगिरीचा मोह भल्याभल्यांनाही आवरलेला नाही. राजकीय वर्तुळातील कार्यकर्तेही याला अपवाद कसे ठरणार ? एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

रन फॉर रायझिंग नाशिक !

0
0
रूपयाचे घसरलेले मुल्य अन् पेट्रोल डिझेलचे वाढते दर एवढेच नव्हे तर बदललेली जीवनपद्धतीमुळे लठ्ठपणासह जडलेले अनेक आजार हे असंख्य नाशिककरांसाठी डोकेदुखी होऊ बसले आहेत.

आव्हाडांनी बदलली मार्गदर्शनाची दिशा

0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे विभागीय स्तरावर आयोजित युवती ‌मेळाव्यात स्वानुभवित नेत्वृत्त्वाचे नवे धडे देत आमदार जितेंद्र आव्हाडांनी अॅकॅडेमीक्सच्या धड्यांवर पाणी फेरले. थिअरीच्या नोट्सवर अन् मेळाव्यांमधल्या कोट्सवर नेत्वृत्त्व आकार घेत नाही.

आयसीटी’च्या प्रश्नपत्रिका उर्दूतही

0
0
इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलाजी (आयसीटी) या विषयाची दहावीची पाठ्यपुस्तके व प्रश्नपत्रिका उर्दू भाषेतही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तसेच विविध माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आठ भाषांपैकी कोणत्याही दोन भाषांमध्ये उत्तरे देण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

परंपरा न अभ्यासता लिहिणारे वाढत आहेत

0
0
आपल्याला वारकरी व महानुभाव पंथाची दीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्रात जो जन्माला आला त्याच्यामागे या परंपरा आधार म्हणून उभ्या ठाकतात. या परंपरांचा विचार करूनच काळजीपूर्वक लिहिण्याची गरज आहे.

फडणविसांनी आम्हाला अक्कल शिकवू नये!

0
0
‘देशहितासाठी योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी टीका करण्याचा अधिकार कृषीमंत्री शरद पवारांसारख्या नेतृत्वाला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणविसांनी आम्हाला अक्कल शिकवू नये,’ अशी टीका राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मराठी साहित्याचे उर्दू भाषांतर आवश्यक

0
0
‘उर्दू भाषेला मराठी भाषेने आपल्या कुशीमध्ये घेतले आहे. परंतु आजही मराठीतील अनेक चांगले साहित्यप्रकार उर्दूमध्ये भाषांतरित झालेले नाहीत. हे साहित्य उर्दूमध्ये येणे आवश्यक आहे’, असे मत ‘ब्लीट्झ’ मासिकाचे माजी संपादक व चित्रपट गीतकार हसन कमाल यांनी व्यक्त केले.

...आणि 'भाई' नरमले

0
0
जिल्हा काँग्रेसचे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला आलेल्या आमदार भाई जगताप यांनी गेल्या महिन्यात आक्रमकपणे काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची तयारी करा’ असे आवाहन करत राष्ट्रवादीला आव्हान दिले.

सर्वांचीच मागणी डीपी फेटाळा

0
0
आपल्याला हवा तसा ‌विकास आराखडा (डीपी) मंजूर करुन घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार जयंत जाधव यांनी सुलेखा वैजापुरकर यांच्या नावाची शिफारस केली होती.

मंत्र्यांचा जिल्हा : ‘ट्रेकिंग’अनागोंदीचे !

0
0
सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन अशी दोन्ही खाती असलेल्या मंत्र्यांच्याच जिल्ह्यात चक्क दोन कोटी रुपयांचा पर्यटन निधी विनावापर पडून असल्याची बाब समोर आली आहे.

सुवर्णा मटालेंचे जात प्रमाणपत्र वैध

0
0
नाशिक महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुवर्णा मटाले यांच्या जात प्रमाणपत्राबाबत अलका आहिरे यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत चौकशी होऊन विभागीय जातपडताळणी समितीने जात प्रमाणपत्र वैध ठरवले असून, अलका आहिरे यांचा तक्रार अर्ज फेटाळला आहे.

उस्मानीचा शोध : ATS मनमाडमध्ये

0
0
मुंबईच्या मोक्का कोर्टातून पसार झालेला दहशतवादी अफजल उस्मानीच्या शोधासाठी एटीएसचे एक पथक मनमाड शहरातही आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या पथकाने मनमाड रेल्वे स्टेशनसह शहर परिसर पिंजून काढला.

भारनियमामुळे नाशिककर हैराण

0
0
गणेशोत्सवाच्यानंतर विजेच्या लपंडावाने पुन्हा नाशिककरांना त्रस्त केले असतानाच वादळवाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे वीज खंडित होण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. त्यामु‍ळे नागरिकांमध्ये महावितरणबद्दल प्रचंड नाराजी आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images