Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंगबरोबर मॅनेजमेंटची डिग्री

0
0
मातोश्री एज्युकेशन ट्रस्ट संचलित मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना यंदापासून इंजिनीअरिंगबरोबरच मॅनेजमेंटची डिग्रीही घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून या कॉलेजला इंटिग्रेटेड द्विपदवी अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वाळू माफियांमुळे चिमुरडीचा मृत्यू

0
0
वाळू माफियांनी नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साक्री तालुक्यात घडली. तिच्यासोबत बुडालेल्या तिच्या तीन भावंडांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. आठ दिवसांतील अशा स्वरुपाची ही दुसरी घटना आहे.

एसटीच्या अधिका-यांची बनवाबनवी

0
0
सिन्नरला 'हिरकणी कक्ष' स्थापन झाला असे सांगणाऱ्या विभाग नियंत्रकांचा दावा म्हणजे केवळ बनवेगिरी असल्याचे उघडकीस आले आहे. आगार व्यवस्थापकांचा हवाला देत विभाग नियंत्रकांनी जिल्ह्यात सिन्नरला असा कक्ष सुरू झाल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी केला होता.

अधिका-याला लाच स्वीकारताना अटक

0
0
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नंदूरबार येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी संतोष जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जैनविरुद्ध नंदूरबार शहर पोल‌िस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

'स्तंभ ते आरके'चे होणार रूंदीकरण

0
0
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्याचे विकास आराखड्यानुसार १८ मीटर रूंदीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. आगामी सिंहस्थापूर्वी हा रस्ता रूंद करण्यात येणार असून व्यापाऱ्यांनी मात्र रस्त्याच्या रूंदीकरणाविरोधात आक्रमक भुमीका घेतली आहे.

पहिल्याच पावसाने शहर अंधारात

0
0
नाशिक शहरात रविवारी झालेल्य़ा पावसाने अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यातच घरातील पंखे बंद झाल्याने आणि वातावरणातील उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. रात्री दीड वाजता गेलेली वीज सोमवारी संध्याकाळपर्यंत न आल्याने लोक हवालदील झाले होते.

गटाराचे पाणी घरात

0
0
नाशिक महापालिकेने केलेल्या मान्सूनपूर्व कामाचा फोलपणा सिध्द झाला असून मोटवानीरोड येथील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. सकाळी अचानक शौचालयातून व बाथरुममधून पाणी आल्याने नागरिकांची धावपळ झाली.

२५ टक्के प्रवेशाची ऐसीतैसी

0
0
केंद्र सरकारने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के जागा गरीब मुलांसाठी राखून ठेवण्याची सक्ती केली आहे. तरीही जळगाव शहरात पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची पायपीट सुरूच आहे.

चांगले हत्याकांडातील एक संशयित हजर

0
0
गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे ८ मे रोजी झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडातील फरारी झालेला एक संशयित आरोपी अखेर पोलिसांना शरण आला आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे दिवसभर चौकशी सुरू होती.

इंधन वाहतूकदारांचा संप सुरूच

0
0
भारत पेट्रोलियम कंपनीतील इंधन वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने सोमवारी बाराव्या दिवशीही सुरू होता. रविवारी रात्री या संपाला अज्ञात व्यक्तींनी हिंसक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला; तर सोमवारी हिसवळजवळ तीन टँकरच्या काचा फोडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली.

व-हाडाच्या गाडीला अपघात

0
0
पेठ तालुक्यातील खावणशेत येथे लग्नासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीला अपघात होऊन वऱ्हाडींपैकी दोन जण जागीच ठार झाले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत.

आठ हजार कोंबड्या मृत्युमुखी

0
0
निफाड तालुक्यातील कोटमगाव व थेटाळे शिवारात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे तीन पोल्ट्री फार्मचे शेड कोसळून सुमारे आठ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. जोरदार पावसासह वादळी वा‍ऱ्याने हजेरी लावल्याने थेटाळे येथील चांद कंकर मुलाणी व पोपट कारभारी शिंदे यांचे १२० बाय ३० फुटांचे पोल्ट्रीचे शेड कोसळले.

दहा लाखांची जकातचोरी

0
0
महापालिका हद्दीत येणाऱ्या मालावर नियमानुसार जकात आकारण्याऐवजी जकात अधिकारी आणि एजंटांनी निम्मी रक्कम स्वीकारत अनेक ट्रक बिनभोबाट शहरात सोडल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

नाशिक-पुणे रस्ता "ब्लॉक"

0
0
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक-पुणे रस्ता प्रचंड जॅम असून सिन्नरमधील उद्योगभवनपासून संगमनेर नाक्यापर्यंत गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहे. रस्त्याची एक बाजू पूर्ण ब्लॉक झालेली असून गाड्या काढण्यासाठी किमान एक दिवस लागत आहे.

पुस्तके मिळायला पुन्हा होणार उशीर

0
0
शाळा सुरू होण्यासाठी अवघे १० दिवस उरलेले असतानाही बालभारतीकडे पहिली व दुसरीची पुस्तकेच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. ५ जूननंतर इंग्लिश, गणित व मराठी ही पुस्तके उपलब्ध होणार असून त्यानंतर या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

कोथिंबीरीची जुडी नव्वद रुपयाला

0
0
नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीच्या भावाने उच्चांक गाठला असून संध्याकाळी झालेल्या लिलावात नऊ हजार रुपये शेकड्याने कोथ‌िंबीर विकली गेली.

नाशिक- ढोलक्याआ बैल मुझे

0
0
सध्या शाळांना सुटी असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असते. त्यातही रीतसर तिकीट काढून रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. प्रवासाच्या गर्दीत हात धुवून घेणा-यांची संख्याही काही कमी नाही.

योजना खाणारी बांडगुळे

0
0
कुठल्याही योजनेमागचा केवळ हेतू उत्तम असून भागत नाही, ती योजना कठोरपणे राबवण्याची आंच असावी लागते, अन्यथा कागदावरच्या लाभांचे लोणी प्रत्यक्षात नको त्यांच्याच घशात जाते. राज्यातल्या शाळाप्रवेशांमध्ये सध्या हा अनुभव जागोजाग येतो आहे.

एकलहरा गावाला रस्त्याची प्रतीक्षा

0
0
सिन्नरपाट्यापासून एकलहाऱ्याचा रस्ता मृत्युचा सापळा बनला असून या रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून आश्वासन देऊनही प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

वणव्यांमु‌ळे लोणार अभयारण्य संकटात

0
0
दोन महिन्यात जगप्रसिद्ध लोणार अभयारण्याला आठ ते दहा वेळा आगी लागल्या. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाकडे स्वत:ची यंत्रणाच नाही. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५ हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images